Saturday, August 7, 2021

दिनांक 1 सप्टेंबर 2021 पासून ज्योतिष विषयावर सल्ला घेण्याच्या संदर्भातील फ़ी संदर्भात बदल होत आहेत.

 दिनांक 1 सप्टेंबर 2021 पासून ज्योतिष विषयावर सल्ला घेण्याच्या संदर्भातील फ़ी संदर्भात बदल होत आहेत.


याची कृपया माहिती घ्यावी. 


विवाह संदर्भात बरीच माहिती विचारली जाते. यासाठी हे तीन प्रश्न गृहीत धरले जातील.


1) विवाह संदर्भातील प्रश्न फ़ी रुपये 300/- असेल परंतु रुपये 300/- फ़ी मधे इतर प्रश्न विचारता येणार नाहीत.

   विवाह संदर्भातील प्रश्न विचारल्यावर याच फ़ी मधे करीयर किंवा अन्य प्रश्न विचारु नये.


2) विवाहा शिवाय अन्य विषयावर तीन प्रश्न विचारण्यासाठी फ़ी रुपये 300/- आहे


3) गुणमेलन साठी फ़ी पुर्वी प्रमाणे रुपये 300/- एका गुणमेलनासाठी आहे. गुणमेलना मधे वधू वराचे करीयरच्या

   किंवा आर्थिक परिस्थिती संदर्भातील प्रश्नांची उत्तरे दिली जाणार नाहीत. हा स्वतंत्र विषय आहे.


4) वधू वरांना लाभणार्या मुहूर्ताची फ़ी रुपये 500/- आहे. यात तुम्हाला हव्या त्या महिन्यातले पाच मुहूर्त मिळतील.

    या संदर्भातील विवाहाचे अपेक्षीत महिने व विवाह स्थळ ( शहर ) तसेच मुहूर्त सकाळचा , दुपारचा किंवा 

    संध्याकाळचा या बाबतीत माहिती फ़ि सोबत पाठवणे तसेच वधू वरांच्या जन्म तारीख, जन्मवेळ इ पाठवा.


5) संतती संदर्भातील प्रश्नांच्या साठी फ़ी रुपये 600/  आहे.

या साठी पती व पत्नी यांची नाव,जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थळ हवे. संतती विषयावर् असलेला सल्ला हा महागड्या डॉक्टर उपायांना पर्याय नाही. सुरु असलेल्या ट्रीटमेंटला यश मिळत नसेल तर या उपायाने यश मिळेल.


6) प्रत्यक्ष ऑफ़ीसवर अपॉइंटमेट किंवा व्हिडीओ अपॉइंटमेट साठी फ़ी रुपये 1 तासा साठी रुपये 1000 आहे.


अत्यंत महत्वाचे 


1) फ़ी पाठवताना मी उपलब्ध आहे याची खात्री करावी. अनेकदा घरगुती कामासाठी काम बंद असते. अश्यावेळी फ़ी मिळूनही मार्गदर्शन उशीरा मिळेल अशी शक्यता निर्माण होते.


2) फ़ी शक्यतो सकाळी पाठवावी. मार्गदर्शनाचा दर्जा खरा्ब होऊ नये म्हणुन मी खुप उशीरा मार्गदर्शन करत नाही. घाई करु नये.


3) जन्मकुंडली चे फ़ोटॊ कृपया पाठवू नयेत. त्या ऐवजी जन्मतारीख, जन्मवेळ ( सकाळी, दुपारी संघ्याकाळी किंवा रात्री याचा स्पष्ट उल्लेख करावा.  जन्मस्थानाचा तालुका व जिल्हा लिहावा.

4) एकाच जन्मकुंडली वर विवाह किंवा इतर विषयावर तीन प्रश्नांचे साठी फ़ी रुपये 300 आहे. घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा 1 प्रश्न असे पाठवू नये.





Monday, January 25, 2021

माननीय डॉ जयंत नारळीकरांना पत्र

 माननीय डॉ जयंत नारळीकर सर, तुमच्या बदललेल्या दृष्टिकोन चांगला आहे. पण तुम्ही फक्त समाज विज्ञान वादी नाही असे मानत आहात.



दुसरी बाजु सर्व ज्योतिषी फक्त andriod application नाही तर ज्योतिषशास्र विषयक सॉफ़्ट्वेअरचा वापर करून कमीत कमी वेळात अचुक जन्मकुंडली तयार करून भविष्य कथनामधे अचुकते कडै जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा ज्योतिषी लोकांचा प्रचलित विज्ञानाचा वापर करण्याचा दृष्टिकोन तुम्हाला उल्लेखनीय का वाटत नाही याबद्दल बोललात तर आनंद होईल.

बाकी संधी मिळताच आपण आपला जुना दृष्टिकोन उगाळून ज्योतिष हे शास्त्र नाही म्हणला नाहीत हे फार बरे झाले.

तसेही तुमच्या सारख्या मान्यवर पण मुठभर विज्ञान वादी आणि स्वतः ला बुध्दी नसलेले अनेक तथाकथित बुध्दीवादी यांच्या मताला कुणी फारसे विचारत नाही हे आता जाणवले असेल.

मधल्या काळात नागपुरच्या कालीदास विद्यापिठाने ज्योतिषशास्र विषयावर अभ्यासक्रम तयार करून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार केले आहेत. यात विद्यार्थी येत आहेत आणि शिकत आहेत.

महाराष्ट्र ज्योतिष परिषद ही संस्था गेले अनेक वर्षे विद्यापीठाच्या तोडीचे काम महाराष्ट्रात ज्योतिषशास्त्री परिक्षा घेऊन करत आहे.

या सोबत जोडलेल्या बातमी प्रमाणे समाज ज्योतिष सल्ला घेणार कारण मानवी बुध्दीला अगम्य असलेल्या कर्माच्या सिध्दांताचा मागोवा घेत जन्मकुंडली माध्यमातुन ज्या विषयावर मॉडर्न सायन्स जीवनातल्या अनिश्चित गोष्टीबाबत मार्गदर्शन करू शकणार नाही तिथे ज्योतिषशास्र नक्कीच मानवाला दिलासा देते.

याची खात्री समाजाला आहे म्हणुनच ते आपला वेळ व पैसा खर्च करून ज्योतिष विषयावर सल्ला घेतात.

तुम्ही लिहले असतील त्या पेक्षा संख्येने जास्त ग्रंथ माननीय व.दा. भट सरांनी लिहले आहेत आणि त्याच्या अनेक आवृत्ती उपयुक्ततेची साक्ष देत आहेत.

माननीय भट सर बीएस सी आहेत ही बाब विसरून चालणार नाही.

तुम्ही लिहलेल्या विज्ञान कथा या साहित्य प्रकार मानला तर माननीय व.दा. भट सरांना पुस्तकांची संख्या व आवृत्त्या पहाता, या आधीच हा मान मिळायला हवा होता.

इथेच हा प्रकार संपत नाही. घटनेने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारून अंधाश्रध्दा विषयावर बोलणारे काही महाभाग पंचांग जाळू अश्या धमक्या काही वर्षांपुर्वी देत होते.

इथे विज्ञान सोडा, समाजशास्त्र आणि नागरिकशास्त्र यांचा अभ्यास नसलेले मराठी तथाकथित विद्वान एकेकाळी प्रबोधन करत होते. ही त्या काळातली शोकांतीकाच म्हणावी लागेल.

असो, असे काळे कोळसे अनेक आहेत. त्यांना समाज कृतीने उत्तर देत आहे.

आपली निवड साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी झाली यात आनंद आहे. पण तुम्ही पहिल्याच वक्तव्यात जे केले म्हणुन माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधीत ठेवत मला व्यक्त होणे आवश्यकच आहे.

ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर
चिंचवड पुणे 


Like
Comment
Share

Wednesday, July 1, 2020

प्रविण जाधव यांची जन्मकुंडली आणि विवाहयोग



ही पोस्ट श्री संदीप काळे यांनी यांनी आजच  त्यांच्या फ़ेसबुक वॉल वर प्रसिध्द केली आणि कृष्णमुर्ती पध्दतीने पाहून काही प्रश्न उपस्थित केले. श्री संदीप काळे यांनी ( तज्ञांनी उहापोह करावा असे या पोस्ट मधे म्हणल्यामुळे मी हे लिहीत आहे. मी स्वत: ला अभ्यासक मानतो. तज्ञ मानत नाही हे ही नमुद करतो. ) याची लिंक इथे आहे.  https://m.facebook.com/story.php?story_fbid=3369525089738740&id=100000438452764

प्रविण जाधव यांच्या जन्मकुंडलीची माहिती त्यांनी दिल्याप्रमाणे अशी

जन्मतारीख : ५ ऑगस्ट १९८८
जन्मवेळ :  पहाटे २.४५
जन्मस्थान : भांडगाव ( उरळी कांचन जवळील ) तालुका हवेली/ जिल्हा पुणे

मी माझ्या सॉफ़्टवेअर वर ही जन्मकुंडली तयार केली. विवाह प्रश्नासाठी मी कृष्णमुर्ती पध्दती वापरत नाही. जन्मकुंडली, स्पष्टग्रह आणि महादशा वाचकांच्या सोयीसाठी दिलेल्या आहेत.

 (  माझ्या सॉफ़्टवेअर प्रमाणे इंद्र म्हणजे हर्षल , वरुण म्हणजे नेपच्युन आणि रुद्र म्हणजे प्लुटॊ )





विवाह होताना सप्तमेश बलवान नसेल तर अडथळे येतात. प्रविण जाधव यांचा सप्तमेश गुरु आहे. सप्तमेश शनि असताना किंवा सप्तमेश शनिच्या नक्षत्रात असताना याच्या कारकत्वामुळे येणारा विलंब या जन्मकुंडलीत नाही. तसेच बाराव्या स्थानी असल्यामुळे प्रविण यांची पत्नी पंचक्रोशीतील न मिळता दुरची मिळाली असेल असे एक अनुमान निघते. असे अनुमान वधु- वर संशोधनात उपयोगी पडते. मराठा समाजात पदर जुळणे ( ही संकल्पना ज्यांना माहित नाही त्यांनी समजाऊन घ्यावी ) यामुळे दुर गावच्या स्थळांशी विवाह सहसा होत नाहीत. पण अनेकदा यामुळेच दुरची स्थळे उहापोह न होता नाकारली जातात व विवाह लांबतात.

मुख्य मुद्दा विवाह ४ मार्च २०१४ साली का झाला असा प्रश्न ( सप्तमभावाचा उपनक्षत्र स्वामी २,७,११ चा कार्येश नसल्यामुळे ) श्री काळे यांना पडला आहे असे वाटते. ४ मार्च २०१४ ला गुरु गोचर भ्रमण मिथुन राशीतुन होत आहे. तसेच लाभेश मंगळाची महादशा आणि अंतर्दशा ४ मार्च २०१४  ला सुरु आहे. गोचर गुरु आधी सप्तमेश गुरु वरुन भ्रमण करत होता व या तारखेच्या आधी त्याचे शुक्रावरुन भ्रमण व सप्तमावर दृष्टी यामुळे या तारखेच्या दरम्यान विवाह नक्की झाला असणार. अनेकदा विवाह नक्की झाल्यावर काही कारणाने उशीराचे मुहूर्त शोधले जातात. याचे कारण आर्थिक, सामाजीक ( चातुर्मासात विवाह होत नाहीत, पौष मास टाळला जातो इत्यादी ) असू शकतात. यामुळे अगदी ज्या दिवशी गोचर गुरुचे अंशात्मक भ्रमण होईल त्याच दिवशी घडत नाही. ४ मार्च २०१४ ला प्रविणची मंगळ महादशा , मंगळ अंतर्दशा तसेच चंद्र अंतर्दशा आहे. लाभेश्याच्या महादशेत अनेक गोष्टी घडतात. असा एक कोणत्याही पुस्तकात नसलेला नियम मी अनुभवत आहे.

गुरुचे गोचर भ्रमण, गोचर गुरुची दृष्टी तसेच महादशा, किंवा अंतर्दशा शुक्राची किंवा सप्तमेशाची असणे हा नियम सप्तमेश किती निर्दोष व बलवान आहे यावर अवलंबुन आहे. लाभेशाची दशा/ अंतर्दशा , लाभेशाची दृष्टी सप्तमेश किंवा शुक्रावर असताना विवाह होतो हा नियम अजुनही संख्यात्मक दृष्टीने सिध्द झालेला नाही )

सप्तमेश किंवा शुक्र बलवान नसताना काही दैवी उपाय योजून विवाह घडून येतो असा अनुभव मी घेतला आहे. पण पुण्यातील माननीय व दा भट सरांच्या परंपरेत किंवा कृष्ण्मुर्ती पध्दतीमधे उपायांना महत्व नाही.

हे लिहीण्याचा उद्देश इतकाच भावेशाचा, विवाहासाठी शुक्राचा विचार, सप्तमामधील ग्रहांचा विचार केल्याशिवाय विवाह विषयावर जन्मकुंडलीचा विचार करणे शक्य नाही. तसेच कालनिर्णय करताना सप्तमेशाची दशा किंवा शुक्राची दशा व गोचर गुरुचे भ्रमण याशिवाय शक्य नाही.

जेंव्हा सप्तमेश आणि शुक्र बलवान नसतो तेंव्हा उपाय करणे आवश्यक आहे हे विवाह इच्छुक मुलांच्या पालकांनी आणि मुलांनीही याचे महत्व लक्षात घ्यावे.

जेंव्हा सप्तमभावारंभी हर्षल, नेपच्युन किंवा प्लुटॊसारखा ग्रह असतो तेंव्हा कुणाचेही काही चालत नाही. उपाय आणि ज्योतिषी यांचे प्रेडीक्शन सुध्दा चुकते हे ही अभ्यासुंनी विसरुन चालणार नाही.

Sunday, March 29, 2020

एप्रिल मे २०२० मधे कोरोना पेशंट वाढतील हे खोटे संशोधन आणि शनि मंगळ तसेच चंद्र राहू युती

काल एक बातमी आली की जॉन हाफकिन्स इंस्टिट्युट ने केलेल्या संशोधनात भारतात एप्रिल व मे २०२० मधे कोरोनाचा फैलाव वाढेल. २५ लाख लोक कोरोनाग्रस्त होतील आणि ऑगस्ट २०२० ला कोरोना संपेल. ही ता बातमी पहावी पण घाबरून जाऊ नये.


मी केलेल्या भाकिताच्या किंवा भारतात अनेकांनी केलेल्या कोरोना विषयावर भाकिताच्या एकदम विरूध्द असल्यामुळे मी या बातमीचा सोर्स शोधू लागलो.

मी नक्षत्रप्रकाश या फ़ेसबुक समुहावर ९ एप्रिल २०२० पासून कोरोना रोगी कमी कमी होत जातील आणि २४ एप्रिल २०२० नंतर कोरोना प्रसाराचा धोका संपेल असे भविष्य १४ मार्च २०२० ला प्रसिध्द केलेले आहे.

इंटरनेट वर शोध घेतल्यानंतर या बातमीला दुजोरा अनेक दुरदर्शन चॅनल्स ने दिलेला नाही. याचे कारण याची कारणे सांगणारा authentic अहवाल मिळालेला नाही.

किंबहुना जॉन हाफकिन्स युनिव्हसीटीने हे संशोधन केल्याचा इन्कार करून आमचा लोगो कुणीतरी कॉपी करून ही बातमी दिल्याचे ऑफ़िशीयल ट्विटर वरून खुलासा केलाय.


हे कमी की काय म्हणून ३१ मार्च २०२० ला होणाऱ्या शनि मंगळ युती व चंद्र राहू युतीमुळे मुंबई व पश्चिम महाराष्ट्र मधे कोरोना वाढेल असे भाकित एका ज्योतिषी महोदयांनी केलेले आहे.

यावर मला असे वाटते की भारताच्या सहाव्या स्थानी राहू आहे. सहावे स्थान रोगस्थान आहे. चंद्र हा लोकभावनांचा कारक आहे. यामुळे या भविष्यामुळे लोक घाबरून जाण्या पलीकडे काही होणार नाही.

पण यामुळे नुकसान होणार नाही. कोरोना केसेस वाढण्याचा धोका नाही. कारण भारताच्या व्ययस्थानी असलेले मंगळ आता मकर राशीत आलाय आणि गुरूने तोपर्यंत राशी बदललेली असेल. भारताच्या व्ययस्थानी फक्त केतू आहे. यामुळे हॉस्पीटल हे व्ययस्थान दर्शविणार्या स्थानी ग्रहांची गर्दी नाही. व्ययेश व्ययात किंवा षष्ठेश व्ययात ही स्थिती नसल्यामुळे कोरोना रूग्ण वाढण्याचा वेग यात बदल अपेक्षित नाही.

मंगळ शनि युती तापदायक आहे हे खरे पण भारतासाठी मंगळ चतुर्थेश आणि लाभेश असून तो लग्नेशाच्या युतीत जाण्याने भारताला तरी किमान यापासून खुप मोठा किंवा गंभीर धोका नाही.

मला कोणत्याही ज्योतिष महोदयाशना कमी लेखायचे नाही. परंतु लोकहो, अश्या बातम्यांनी घाबरून जाऊ नका.

पण, घराच्या बाहेर सुध्दा तातडीचे काम असल्याखेरीज जाऊ नका. हे युध्द अशा संयमाने जिंकायचे आहे.

हा लेख नावासकट कॉपी पोस्ट करायला हरकत नाही.

© ज्योतिषशास्री नितीन जोगळेकर