नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१६





नितीन जोगळेकर
सल्लागार - मनुष्यबळ आणि प्रशिक्षण तसेच करीयर कॉन्सेलींग आणि ज्योतिष — पत्ता: सज्जन प्लाझा बेसमेंट, चापेकर चौकाजवळ, हिंदुस्थान बेकरीसमोर  चिंचवड पुणे - ४११०३३
फ़ोन : अपाईंटमेंटकरीता - 9763922176

माझी माहिती

मी गेले ५२ वर्षे चिंचवड पुणे  निवासी आहे. वयाच्या १८ वर्षी डिप्लोमा इन इलेट्रीकल संपादन करुन बजाज अ‍ॅटो लिमीटेड या कारखान्यात इंजिनीयर म्हणुन नोकरीला सुरवात केली. बजाज मधे असताना १९८८  साली कै. श्रीकांत जोगळेकर ( माझे काका ) यांच्या मार्गदर्शनाने योग विद्या धाम पिंपरी चिंचवड ची स्थापना करण्यात सहभाग तसेच पिंपरी चिंचवडच्या योग शिक्षकांच्या पहिल्या बॅच मधे सहभाग होता. १९९२ साला पर्यंत विवीध सामाजीक, धार्मीक संघटना स्तरावर सहभाग घेतला. १९९२ साली चिंचवडला डॉ. धुंडीराज पाठक यांच्या शंकर ज्योतिष विद्यालयात ज्योतिषाचे धडे घेऊन सुरवातीला ज्योतिष विशारद व पुढे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची ज्योतिषशास्त्री ही पदवी संपादन केली. त्याच बरोबर वास्तुशास्त्र विशारद ही सुध्दा पदवी संपादन केली. १९९८ साली ज्योतिष सल्लागार म्हणुन कामाला सुरवात केली. काही व्यावसायीक अडचणींमुळे मला काही काळ सल्लागार काम म्हणुन काम पहाता आले नाही कारण याच काळात माझी बजाज अ‍ॅटो लिमीटेड येथेच एच आर व ट्रेनिंग मॅनेजर पदावर नियुक्ती झाली होती.

दरम्यानच्या काळात त्यांनी अर्थशास्त्र घेऊन बी.ए. व पोस्ट ग्रॅज्युएशन इन ह्युमन रिसोर्सेस डेव्हल्पमेंट या विषयातल्या पदव्या संपादन केल्या व २००७ ते २०१३ पर्यंत एच आर हेड पदावर अन्य कंपन्यात काम केले. २०१३ साली ह्युमन रिसोर्सेस सल्लागार म्हणुन काम सुरु करुन सध्या स्वतंत्र व्यवसाय सुरु आहे. मनुष्यबळ पुरवठा व ट्रेनिंग तसेच उत्पादकता, गुणवत्ता आणि अन्य मॅनेजमेंट विषयावर अनेक कंपन्यांना व व्यावसायीकांना मार्गदर्शन करतो आहे. ट्रेनर म्हणुन काम करण्याची आवड आहे आणि तो सुध्दा व्यवसाय आहे. नजिकच्या काळात आणखी एक क्षेत्रात काम करण्याचा मानस आहे ते म्हणजे करियर समुपदेशन ( कॉन्सेलींग ).

२०१४ पुर्ण वेळ व्यवसायीक म्हणुन कामाला सुरवात केल्यावर वेदमुर्ती करंबळेकरगुरुजी यांच्या आग्रहाने पुन्हा ज्योतिषसल्लागार म्हणुन कामाला सुरवात केली. सप्टेंबर २०१६ पासुन हे सल्ला केंद्र सज्जन प्लाझा बेसमेंट, चापेकर चौकाच्या जवळ, हिंदुस्थान बेकरी समोर पुन्हा सुरु केले आहे. केवळ सल्ला देणे हा भाग यात नसुन काही मुलभूत संशोधन व्हावे हा ही मानस आहे.

ज्योतिषसल्ला तसेच करीयर मार्गदर्शन साठी फ़ोनवर भेटीची वेळ ठरवुन भेट घेता येईल या साठी नंबर - 9763922176


संपादकीय

नक्षत्रप्रकाश हा ब्लॉग वरील दिवाळी अंक वाचकांच्या हातात देताना खुप आनंद आणि समाधान आहे. संकल्प करावा आणि तो पुर्ण व्हावा याचे हे समाधान आहे.  मी ज्योतिषशास्त्र शिकायला १९९२ साली सुरवात केली. डॉ. धुंडीराज पाठक यांनी गिरवुन घेतलेले धडे आज कामी येत आहेत. त्यांच्याच आग्रहाने पुढे चिंचवडचे अनेक विद्यार्थी  महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची ज्योतिषशास्त्री परिक्षा उतिर्ण झाले. आमच्या बरोबर पुण्यात एक महिला डॉक्टर सुध्दा परिक्षेला बसल्या आणि अर्थातच आमच्या सर्वांच्यात त्यांना जास्त गुण होते.  माझ्या मते यामुळे आम्हाला त्या काळात जेव्हा ज्योतिष हे शास्त्रच नाही असा प्रचार होत असताना पुढे अभ्यास सुरु ठेवण्यास नैतीक बळ मिळाले.

कै.डॉ. भा. नि. पुरंदरे यांनी आपल्या " शल्यकौशल्य" या आत्मचरित्रात तर पाच पाने खर्ची घातली आहेत. अश्या मान्यवरांनी ह्या शास्त्राच्या अभ्यासुना आपण चुकत नाही हा विचार मिळवुन दिला आणि सुरवातीच्या काळात श्रध्दा की अंधश्रध्दा हा विचार मागे सारत अभ्यास करायला स्फ़ुर्ती मिळाली. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे अस म्हणतात.  सावित्रीबाई फ़ुले विद्यापीठात ( पुर्वीचे पुणे विद्यापीठ ) ज्योतिष विषयाचे अध्यासन आणि अध्यापन होण्यास अनेक मान्यवरांनी विरोध केला. त्यांच्या मते ज्योतिष हे शास्त्र नाही. अनेकांनी  बुध्दी चातुर्य वापरुन एके काळी समाजाची दिशाभुल केली हा काळ संपला आहे. आज काही मोजक्या युजीसीने अधिकृत केलेल्या विद्यापीठात ज्योतिष विषयाचा अभ्यास होतो.

डॉ. धुंडीराज पाठक केवळ जातकांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी ज्योतिषशास्त्र नाही तर त्याचा अधिक अधिक अभ्यास होऊन संख्याशास्त्राच्या आधारावर नविन नियम तावुन सुलाखुन पुढील पिढीच्या समोर यावेत या बाबत आग्रही असतात. जेणे करुन एखाद्या नैसर्गीक आपत्तीत एकाच वेळी अनेक मृत्यु घडतात तेव्हा सर्वांच्याच पत्रीकेत मृत्यु योग असतात की अजुन काही, याचे उत्तर लोकांना देता येईल. 

कश्यावरुन  ज्योतिष हे शास्त्र आहे हा प्रश्न लोक विचारतात. ह्याचे उत्तर देताना मला बारावीच्या अभ्यासक्रमातला एक धडा आठवावा लागतो. ज्यात  प्रोबॅबिलीटी चा विचार आहे. दहा वेळा एक नाणे वर उडविले आणि सात वेळा ते छापा पडले तर अकराव्या वेळेला पडताना ७०% छापा पडण्याची शक्यता आहे हे प्रोबॅबिलीटीत
 सांगीतले जाते. याचाच अर्थ ३०% वेळेला छापा पडेल अशी शक्यता नसते.  तसेच काही विशीष्ठ ग्रहस्थिती असताना जातकाला ठरावीक फ़ळ मिळेल हे ज्योतिषी ह्या पत्रिकांच्या अभ्यासातुन सांगत असतो. हे तंतोतंत बरोबर येईल असे नाही पण बरोबर येण्याची प्रोबॅबिलीटी नक्कीच असते.  इतका विचार ज्योतिष हे शास्त्र आहे हे पटविण्यास पुरेसा आहे. 

ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायाला येणारे अभ्यासुंचे मला अभिनंदन करावेसे वाटते. समुद्रात कितीही खोल गेले तरी ठाव लागत नाही आणि प्रवास कधी संपेल माहित नाही अशी ही अनगायडेड टुर आहे. अर्थातच माझ्यासारखे अनेक या टुर मधे प्रवास करुन काही काळ आनंदात घालवतात. आपल्याला किमान  डेस्टीनेशन माहीत नसले तरी पाऊल खुणा ठेऊन पुढे जायचे आहे जेणे करुन मागुन येणारे सुखावतील आणि आपल्या पुढे काही लोक आहेत म्हणजे इकडे जाण्यात चुक नाही याचे त्यांना सतत भान राहिल. पुरातन ग्रंथ हे दिपस्तंभासारखे आहेतच शिवाय सन्माननीय व.दा. भट आणि कृष्णमुर्तीसर यांची नावे स्मरण केल्याशिवाय संपादकीय पुर्ण होणार नाही.

दिवाळी अंकाचा हा संकल्प अनेक वर्षे चालावा आणि पुढील पिढीच्या हाती जावा ही प्रभुचरणी इच्छा.  वाचकांना दिपावलीच्या शुभेच्छा तसेच ज्योतिषअभ्यासुंना हीच दिवाळी भेट. मी एकटाच लेखक, संपादक आहे. व्याकरणाच्या दृष्टीने काही चुका राहिल्यास आधीच दिलगीरी व्यक्त करतो.  वाचकांच्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे.
  


                    अनुक्रमणिका

. संपादकीय                        
. फ़क्त विवाहगुण मेलन ?          
. भविष्य खोटे व्हावे ही अपेक्षा       
. जननशांती प्रयोग                 
. वार्षीक राशी भविष्य               
. राजयोग आणि पत्रीकेचा दर्जा        
. नोकरी-व्यवसाय करीयर मार्गदर्शन     
. मधुमेह होईल का ?               
९  ज्योतिष काय सांगते ?             
१०. नक्षत्रप्रकाश संकल्पना              




                                                              २. फ़क्त विवाह गुण मेलन ?

फ़ोनची रिंग वाजली म्हणुन पाहिले तर खैरनारकाकांचा फ़ोन होता.

मी फ़ोन घेतला आणि काकांना म्हणालो " काका नमस्कार,  काय म्हणतात ?"

"नितीनभाऊ मी बाहेरगावी आहे. माझ्यावर अती विश्वास असलेल्या व्यक्तीने मला त्यांच्या मुलासाठी सांगुन आलेल्या मुलीच्या आणि मुलाच्या पत्रीकेचे गुणमेलन ( लग्न लावण्यासाठी ) करावयास सांगीतले आहे. मुलाची पत्रीका मला पाठ आहे. मला त्यांनी सांगुन आलेल्या मुलीची पत्रीका तोंडी सांगीतली आहे. ती मी लिहुन घेतली आहे. त्यांच्या मते ३६ गुण जुळतात.  त्यांनी खात्री करायला सांगीतली आहे. तुम्हाला माहित आहे मी घरी नाही त्यामुळे जुनी पंचांगे उघडुन मला त्या सांगुन आलेल्या मुलीची पत्रीका बनवता येणार नाही. मी जन्मवेळ, जन्मस्थळ, जन्मतारिख सांगतो मला मुलीचे जन्मनक्षत्र सॉफ़्टवेअरवर चेक करुन सांगा. मी दहा मिनीटांनी परत फ़ोन करतो." 

खैरनारकाकांनी मला बाहेरगावी असल्यामुळे फ़ोनवरुन विनंती केली. आजकाल स्मार्ट फ़ोनवर अ‍ॅस्ट्रो-अ‍ॅप उपलब्ध असतात पण  काकांना स्मार्ट फ़ोन यासाठी वापरता येत नाही. कॉप्युटरचा ही वापर जमत नाही अन्यथा नेट कॅफ़ेमध्ये खात्रीची वेबसाईट माहित असल्यास ऑनलाईन काम होते. त्यामुळे हे पर्याय उपलब्ध नसल्याने काकांनी मला फ़ोन लावला होता.

 मला हल्ली स्मार्ट फ़ोनवर तातडीने पत्रीका बनवायला येते. बी.एस.एन एल. इंटरनेट/वायफ़ाय चालु असणे ही खरोखरी भाग्याची परिक्षा असते. अन्यथा सर्व व्यर्थ आहे. मी मुलीचे रेवती नक्षत्र आहे हे लिहुन पत्रीका पडताळत होतो तोच परत त्यांचा फ़ोन आला. " काय झाल नितीनभाऊ ? बनली का पत्रीका ? काय नक्षत्र येत आहे ?

"काका, रेवती नक्षत्र आहे. " मी  म्हणालो.

" होका, अरे वा म्हणजे ३६ गुण जुळतात " काका घाईघाईने म्हणाले.

" काका, मग काय लग्न करा म्हणुन सांगणार का ? " मी त्यांची घाई पाहुन प्रश्न केला.

" हो आता जवळपास सर्व ठरलच आहे. मी एकदा ३६ गुण जुळतात म्हणले की ही मंडळी बार उडवणार. या मुलासाठी मी ७०- ८० पत्रीका पाहिल्या आहेत. कधी पत्रीकाच जुळत नाही आणि जुळली तर मुलगी पसंत पडत नाही. ५-१० ठिकाणी मुलींनी या मुलाला नकार दिला आहे. मुलाचे आई-वडीलच काय मी पण हैराण झालोय." काका म्हणाले.
 " काका, गुण जुळले तर बाकी काहीच पाहायच नसेल तर ज्योतिषी पाहिजे कशाला ?  मुलाच्या घरच्यांकडुन ३६ गुण जुळतात हे सांगायला आजकाल कॉंप्युटर समर्थ आहे. किंवा साधे पंचाग पाहुन गुण जुळतात हे पहाता येते. मग तुम्हाला पत्रीका पहायला कशाला सांगीतल आहे ? त्या मुलीची पत्रीका पहात पहात मी प्रश्न केला. "तुम्हाला त्यांनी तोंडी जी पत्रिका सांगीतली ती तुम्ही नीट पाहिली का ?" मी विचारले.

"काका, तुम्हाला तोंडी सांगीतलेली मुलीची पत्रीका मकर लग्नाची आहे ना ?"
काकांनी ही पत्रीका लिहुन ठेवलेली होती पण ती अंशात्मक  नव्हती. गुण जुळल्यानंतर जातकाच्या इच्छेनुसार, आणि विश्वासानुसार आणखी पुढे जाण्याची गरज असते.  काकांनाही ७०-८० वेळा पत्रीका जुळवल्यामुळे व पहिलीच पत्रीका ३६ गुण जुळाल्यामुळे पुढे जायची इच्छा होत नव्हती.

काका, ही अंशात्मक पत्रीका मी पाहिली आहे. यात मुलीच्या पत्रीकेतला सप्तमेश चंद्र राहुच्या अंशात्मक म्हणजे फ़क्त सहा अंशाने युतीत आहे. अश्या परिस्थीत विवाह सौख्याचा कारक ग्रह सप्तमेश बिघडला आहे. इतकच नाही तर पत्रीकेतला शुक्र जरी पंचमात  आणि वृषभ राशीत असला तरी वक्री असलेल्या शनीच्या प्रतियोगात आहे. सप्तम स्थानावर किंवा सप्तमेशावर किंवा शुक्रावर शुभ दृष्टी नाही हे आपण पाहिल आहे का ?

माझ पत्रीकेच विवेचन ऐकुन काका पॉझ मधे गेले. मला काय म्हणायच आहे हे त्यांना लगेच उमजले. " नितीनभाऊ, तुम्हाला फ़ोन केला हा शहाणपणाच झाला म्हणायचा. मी मुलाच्या वडीलांना सांगतो की मी बाहेरगावी आहे. पंचांग जवळ नाही सबब नाशिकमधल्या जाणत्या ज्योतिषाला विचारुन निर्णय घ्या. पुढील वर्षी सिंहस्त आला आणि मुलाची पत्रिका जुळुन लग्न ठरेना म्हणुन मी ही घाईने हो म्हणणार होतो.

ज्या घटनेमुळे मला हा लेख लिहावासा वाटला ती  गोष्ट संपली. आता जाऊ विवाहासाठी पत्रीका जुळवणे या विभागाकडे.

लग्नाच्या दृष्टीने वधु/वरांच्या पत्रीका जुळवताना महत्वाचे तीन भाग असतात. 

१) पत्रीकेचे गुणमेलन ( राशी/ नक्शत्रांच्या मेलनाने होणारे ज्यात ३६ गुण हे जास्तीत जास्त समजले जातात )
२) दोघांच्या पत्रीकेतला मंगळ
३)  वधु - वरांच्या पत्रीकेतले पंचमेश ( संततीचे स्थान ) सप्तमेश ( वैवाहीक सौख्याचे स्थान ) भाग्येश ( दोघांचे भाग्य कसे आहे हे दर्शवणारे स्थान ) आणि लग्नेश ( दोघांचे व्यक्तीमत्व, स्वभाव दर्शविणारे स्थान ) एकमेकांच्या शुभ दृष्टीत आहेत किंवा नाही हे पहाणे.
 या पैकी पहिला, किमान १८ गुण जुळावे अशी जुनी पध्दत होती . पुण्यातले नामांकित ज्योतिषी श्री सुधीर दाते यांच्या संशोधनातुन अभिनव कोष्टक तयार झाले आहे. हे दाते पंचांगामध्ये आहे. यानुसार तर पत्रिका जुळण्यासाठी किमान १८ गुण ही अट सुध्दा या कोष्टकाने बाद झाली आहे.

यातील गुणमेलनाला जितके महत्व आहे तितकेच मंगळ दोष आणि तितकेच वैवाहीक सौख्यालाही महत्व आहे. आज संततीच्या दोषाला अनेक पर्याय निघाल्यामुळे आताशा तो भाग जरासा गौण ठरतो. शिवाय सध्याचे युग एखाद्या संततीत समाधान मानणारे असल्याने कितीही कठीण योगात डॉक्टरी उपायाने संतती होते किंवा जातक फ़ारच विचारी असेल तर दत्तक घेता येते.

वरील पत्रीकेत मुलाच्या कुंडलीशी ३६ गुण जुळले तरी आणि मंगळ दोष नसला तरी वैवाहीक सुखाच्या दृष्टीने पत्रिकेत वैगुण्य होते.

वैवाहीक सौख्य म्हणजे काय हे प्रथम समजाऊन घेउ. धर्म, अर्थ काम आणि मोक्ष  ह्या चार पातळ्यावर पती आणि पत्नी एकमेकांचे सहचर होणे हा विवाह संस्काराचा पाया आहे. धर्म, अर्थ आणि मोक्ष या पातळ्यावर एखादा संसार अयशस्वी झाला तरी चालतो कारण धर्माचे मर्म समजायला हवे.  अर्थकारण म्हणजे जरुरी नाही दोघांनी नोकरी व्यवसाय करावा.  नवरा- बायको की एखादा व्यवहार चतुर असल्यास आणि दुसरा खर्चीक नसल्यास दोघांच्या पत्रीकेने भाग्य उजळले नाही तरी उपजिवीका हा कार्यभाग चालुन जातो. मोक्षाचे कुणाला फ़ारसे देणे घेणे नसते. परंतु "काम" या स्तरावर दोघांचे जमले नाही तर संसार टिकणे मोठे कठीण ठरते.

marriages are made in heaven but finally settled in bed असे कुणी लिहले आहे त्याचा प्रत्यवाय येतो.

वैवाहिक सौख्य आहे किंवा नाही हे कसे पहायचे ?

प्रत्येकाच्या पत्रीकेत असलेले सप्तम स्थान  वैवाहिक सौख्याचे निदर्शक असते.

यातील महत्वाचे भाग जाणुन घेऊ.

) सप्तमस्थानातील ग्रह
) सप्तमेश
) पत्रिकेतला वैवाहीक सौख्य  कारक शुक्र

सप्तमस्थानातील शुभ ग्रह जसे शुक्र किंवा चंद्र विवाह लवकर घडवुन आणतात. सुस्वरुप जोडीदार दर्शवितात. या उलट  सप्तमस्थानातला मंगळ आणि शनी विवाहाला विलंब करतात. जोडीदार सुस्वरुप असेलच असे नाही आणि सप्तमात शनी असता जोडीदार वयाने जास्त असु शकतो किंवा वयाने जास्त  वाटतो असे व्यक्तीमत्व असते. सप्तमातला गुरु  तर एकमेकांना पुरक असा जोडीदार देतोसप्तमातला रवी आणि बुध हे फ़ारसे उत्तम ग्रह नाहीत. भावेश्याच्या अनुषंगाने ते बोलतात. राहु - केतु - हर्षल - नेपच्युन आणि प्लुटो सारखे ग्रह फ़ारसे चांगले नाहीत.

सप्तमात ग्रह नसणे ही स्थिती  सप्तमेश शुक्र, चंद्र किंवा गुरु  सुस्थितीत असता आणखी चांगली असते. या शुक्रावर, चंद्रावर किंवा गुरुवर पापग्रहांची दृष्टी नसताना निर्भेळ वैवाहीक सौख्य अनुभवास येते.

सप्तमात कोणताच ग्रह नाही. सप्तमेश शुक्र नाही, चंद्रही नाही तसेच गुरुही नाही. सप्तमेश मंगळ, शनी बुध रवी सारखा ग्रह आहे आणि फ़ारसा शुभ नाही तसेच त्यावर अशुभ ग्रहांची  छाया नाही अश्यावेळी वैवाहिक सौख्याची पुर्ण जबाबदारी एकट्या शुक्रावर असते. एकटा शुक्र शुभ स्थानी असेल. स्वराशीत किंवा उच्च  असेल तर वैवाहीक सौख्य देतो.

सप्तमेश जर वक्री असेल किंवा हर्षल, नेपच्युन, शनी किंवा राहुसारख्या ग्रहाच्या योगात असल्यास किमान ५० टक्के वैवाहीक सौख्याची हानी होते. ही हानी म्हणजे पती आणि पत्नीचे "काम" विषयात कंडीशनल जमते. हे नेमके काय हे दोघांनाच माहित असते. याच पत्रीकेत  जर शुक्र ही बिघडला आणि सप्तमस्थानात मंगळ, हर्षल, नेपच्युन, राहु किंवा शनी सारखे पापग्रह बसलेले असतील तर उरलेले ५० टक्के सुध्दा प्रतिकुल होतात. अश्या वेळी जोडीदाराच्या "काम" संकल्पना काय आहेत यावर काय घडते हे अवलंबुन असते. अश्यावेळी जोडीदारची पत्रीका विरक्ती पुर्ण असेल तर जे काय असते ते दोघांच्यातच रहाते.

ह्या अभ्यासाला घेतलेल्या मुलीच्या पत्रीकेतला सप्तमेश राहुच्या पुर्ण युतीत असल्यामुळे  याव्यक्तीच्या "काम" विषयक संकल्पना विचित्र किंवा सामान्य माणसांना न पटतील अश्या असतात. त्यात शुक्र जरी वृषभ या स्वराशीत असला तरी शनी ह्या ग्रहाच्या प्रतियुतीत असल्याने त्यातुन वक्री ग्रहाच्या प्रतियुतीत असल्याने शरीरात "काम" सौख्य अनुभवण्यासाठी जे काय रसायन निर्माण व्हावे लागते त्यात वैगुण्य निर्माण करतो.

अश्या पत्रिकामधले हे स्त्री किंवा पुरुष  एकतर कंडिशनल सौख्य अनुभवु शकते जे जोडीदाराच्या सहकार्यावर अवलंबुन असते किंवा विवाहबाह्य जोडीदाराच्या शोधात रहाते. विवाहबाह्य संबंध हा नियम शुक्र जर मंगळाच्या युतीत असेल तर जास्त अनुभवाला येतो. जर शुक्र मंगळाने नसेल पण बिघडलेला असेल तर मग तीव्र दु:ख पदरात घेऊन ती व्यक्ती  जगते.
सबब, ३६ गुण जुळुनही आणि मंगळ दोष नसुनही हे लग्न १०० टक्के यशस्वी होईल याची खात्री देता येत नाही.
 मग अनिस वालेच काय सामान्य माणसे सुध्दा ३६ गुण जुळले पण विवाह टिकला नाही अशी टीका करुन मोकळे होतात.

मग नेमक कराव काय ? वधु आणि वराच्या कुंडलीत बुध ग्रह प्रभावी नसेल तर प्रेमविवाह करण्याच्या भानगडीत ते पडत नाहीत. वधु किंवा वराच्या किमान एकाच्या पत्रीकेत बुध प्रभावी असेल तर मग प्रपोजल्स पालकांपर्यंत पोहोचतात आणि हा विवाह झालाच तर तो टिकवण्याची जबाबदारी आई-वडील  आणि त्यांचा विश्वासु ज्योतिषी यांची न रहाता वधु- वरांचीही होते.

पण जिथे वधु - आणि वर  या दोघांचा बुध ग्रह प्रभावी नसेल तर एकमेकांचे मार्केटींग हे विवाह जमवण्याच्या मंडळालाच करावे लागते. एकमेकांच्या बाबत काहीही माहिती नसताना एकमेकांना  एका भेटीत आणी जुजबी चौकशीवर विवाह जमवणे म्हणजे मोठी रिस्कच म्हणावी लागेल. मग ती  रिस्क काही  प्रमाणात कॅलक्युलेटेड बनविण्याचे तंत्र म्हणजे विवाह गुणमेलन. हा प्रकार म्हणजे शेअर्स खरेदीच्या वेळचे टेक्नीकल अ‍ॅनेलीसीसचाच प्रकार म्हणाना.

विवाहगुणमेलनासाठी ज्योतिषाकडे कधी जायचे याची एक आचारसंहीता असावी लागते.

आपला मुलगा उपवर झाला किंवा मुलगी उपवर झाली की  आलेल्या स्थळाचे एकदम गुणमेलन न करता एकंदरीत वैवाहीक सौख्य कसे आहे. मंगळ आहे किंवा नाही आणि कोणत्या प्रकारच्या पत्रीका खास जुळु  शकतील उदा. कोणत्या राशीच्या आणि नक्षत्रांच्या पत्रीकेचे गुण किमान १८ पेक्शा जास्त शिवाय संतती सौख्याच्या दृष्टीने एकनाड नको इ. जाणुन घ्यावे म्हणजे काही पत्रीका आई- वडील किंवा लग्न जुळवणारे जबाबदार यांच्या स्तरावर टाळता येतील.

पत्रीका मुलगा किंवा मुलगी पहाण्या आधीच पाहुन, गुणमेलन करुन झालेले असले पाहिजे. आपला जास्तीचा विश्वास असेल तर मंगळ दोष त्याला पर्यायी ग्रहस्थिती आणि वैवाहीक सौख्य याचेही आकलन ज्योतिषाकडुन करुन जमत असेल तरच मुलगा अथवा मुलगी पहावे.

मुलगा आणि मुलगी आधी पाहुन मग  पत्रीकेचा गुणमेलन किंवा आणखी पुढे मेलन केल्यास काही वेळा फ़क्त आई- वडीलच नाही तर उपवर आणि वधु यांना मनस्ताप होतो. मध्यस्त तर आणखीनच पेचात पडतो.

पत्रीकाच पहावी का नाही यावर सुध्दा अनेक मते येतील. पाच मिनीटांच्या भेटीत आपल्याला काय वधु किंवा  वराबाबत काय समजते. वधु- वर जर प्रेमविवाह करत नसतील आणि मग ही रिस्क आपण घेत असाल तर ज्योतिषाच्या सल्याने कॅलक्युलेटेड रिस्क घ्या इतकेच मी सांगु शकतो. प्रेमविवाह हा आंधळे पणाने केलेला नसतो असे गृहीत धरुन हे विधान केलेले आहे. आस्मादिकांचा प्रेमविवाह आहे अस असताना प्रेमविवाह करुच नये असे म्हणणे काळालाही धरुन होणार नाही.

भारतीय पध्दतीत मुहुर्तावर लग्न लावावे असा आग्रह धरला जातो. दाते पंचांगकर्ते कै. धुंडीराज दाते म्हणायचे की पत्रीकेच्या पुढे इच्छाशक्ती, गुणसुत्रे आणि संस्कार प्रभावी ठरतात. आधी गुणमेलन करुन विवाह जमवायचा आणि मग तो वधु - वरांना लाभेल असा मुहुर्त शोधुन त्या मुहुर्तावर तो करायचा याने लग्न हा विधी संस्कार ठरतो. संस्कार प्रभावी ठरल्याने विवाह टिकवायची मानसीक तयारी वधु- वरांची होऊन काही आणिबाणीचे प्रसंग सोडल्यास विवाह टिकण्यास पोषक असे मानसीक संस्कार होऊन तो टिकतो. ही भारतीय परंपराच आणि अनुभव आहेच.

विषाची परिक्षा कोण करतो ? ज्याला विवाह हा केवळ दिखावा म्हणुन करायचा आहे. पुर्वीच्या काळी गांधर्व विवाह ( उत्तम मुहुर्तावर, अग्नीच्या साक्षीने विवाह संस्कार न केलेला विवाह ) तसेच राक्षस विवाह  इ व्हायचे. परंतु ते समाजमान्य नसायचे तसेच ते टिकाऊ होतील याची खात्री देण्याची पध्दतही नव्हती.

विवाह मुहुर्त हा आणखी एक मोठा विषय आहे  त्याविषयी या लेखात जास्त न लिहणे योग्य आहे.
  

                                                 ३. भविष्य खोटे व्हावे ही अपेक्षा

कोणा ज्योतिषाला आपले  भविष्य खोटे ठरावे असे वाटते ? काही प्रसंगी भविष्य चुकावे अशीच प्रार्थना कराविशी वाटते कारण ज्याने प्रयत्नपुर्वक टाळावे असा जातकच ( प्रश्नकर्ता ) हतबल झालेला दिसतो.

मी जिथे नोकरी करायचो तिथे मला ज्योतिषाचा अभ्यास आहे हा विषय लपवण्याचा प्रयत्न असायचा. कारण कामाच्या ठिकाणी ज्योतिष विषयाची चर्चा करणे हा कामाच्या वेळेचा अपव्यय तर आहेच शिवाय ज्यांना ज्योतिष विषयाचा तिरस्कार आहे त्यांना आपल्यावर टीका करायची अनायसे संधी दिल्यासारखे आहे.

सुरेशपासुन ( बदललेले नाव ) हा विषय लपला नाही कारण सुरेश जरी आपल्या गुणांवर नोकरीला लागला होता तरी ज्यांच्या ओळखीने तो आमच्या कंपनीत आला होता त्यांना माझा ज्योतिषविषयक अभ्यास माहित होता.

एकदा कामाच्या निमित्त आम्हाला दोघांना मुंबईला जावे लागले आणि लांबच्या प्रवासात गप्पा होत असताना हा विषय निघाला. कंपनीमध्ये याची चर्चा करायची नाही असे ठरवले असल्यामुळेच ही वेळ योग्य वाटली. मी त्याची जन्मवेळ, जन्मस्थळ आणि जन्मतारीख मागुन घेतली. आजकाल स्मार्टफ़ोनवर अ‍ॅस्ट्रोअ‍ॅपवर पत्रीका बनाविण्यास वेळ लागलाच नाही.

मुंबईला जाताना आम्ही चहा पाण्यासाठी थांबलो. चहा झाल्यावर सुरेशने नेहमीप्रमाणे त्याची सिगारेट शिलगावली आणि त्याची सिगारेट संपवुन तो ड्रायव्हरसीटवर बसला मग मी त्याला प्रश्न विचारला, " बोल काय प्रश्न आहे ?"

सुरेश म्हणाला " प्रश्न काहीच नाही. सर्व काही चांगले आहे. ते तसेच राहिल ना ?"

एखादाच असा जातक असतो ज्याला तात्कालीक प्रश्न काहीही नसतो तर भविष्याचा वेध त्याला खरा भविष्यकाळाच्या नियोजनासाठी हवा असतो. मला अडचण याचीच असते की जेव्हा जातक काहीच विचारत नाही तेव्हा नेमके कशावर बोलायचे ?

सुरेशच्या पत्रीकेत  कुटुंबस्थानातला राहु आणि नेपच्युन वृश्चिक राशिला तर त्याचा अधिपती मंगळ अष्टमस्थानात आहे. तसेच रोग स्थानात मीनेचा गुरु वक्री आहे.

सुरेशच सातत्याने सिगारेट ओढण मला सलत होत त्याच बरोबर त्याच तंबाखु खाणे आणि मुखाचे आरोग्य स्थान बिघडलेले असणे या संदर्भात काही प्रश्न विचारावा असे वाटु लागल्यामुळे मी त्याला 
त्याच बरोबर त्याच तंबाखु खाणे आणि मुखाचे आरोग्य स्थान बिघडलेले असणे या संदर्भात काही प्रश्न विचारावा असे वाटु लागल्यामुळे " हे तंबाखु आणि सिगारेटचे व्यसन किती वर्षांपासुन आहे असा प्रश्न विचारला." यावर उत्तर देताना सुरेश म्हणाला "साधारण २० वर्षे आहे.  हाच प्रश्न का विचारावासा वाटला ? पत्रिकेत अजुन काही विचारण्यासारखे नाही का ?"  सुरेश म्हणाला.

पत्रीकेचे विवेचन करताना मी सांगीतले की कुटुंबस्थान किंवा  दुसरे स्थान हे तोंड/ खाणे पिणे व त्यासंदर्भातल्या सवयी या करता पाहिला जातो. इथे असलेली वृश्चिक रास  आणि त्यात असलेले राहु आणि नेपच्युन ग्रह कुटुंबस्थान किंवा मुखाचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभुत होताना दिसतात याचा प्रत्यवाय लगेच अष्टमात पडलेली वृषभ रास पाहुन येतो. त्यात अष्टमात पडलेला मंगळ आणि केतु हे पापग्रह दिसतात.  "या तंबाखु/ सिगारेटमुळे कधी काही त्रास झाला आहे का ?  पत्रीकेत किमान एकदा तरी यासाठी ट्रिटमेंट घ्यावी लागली असणार असे दिसते" अस म्हणताच  भर हायवेवर सुरेशने कार वेग कमी करत बाजुला घेतली आणि बंद करुन म्हणाला " काय सांगता ?"

" काय सांगु तुम्हाला ? मला कितीतरी दिवस जबडा कितीतरी दिवस निट उघडता येत नव्हता. बरीच ट्रीटमेंट घेतल्यानंतर  ठिक झाला. मला डॉक्टरांनी तंबाखु आणि सिगारेट सोडायचा सल्ला दिलाय पण हे व्यसन सुटतच नाही. डॉक्टरांच्या मते माझ्या जबड्यांच्या स्नायुला फ़ंगल इंन्फ़ेक्शन झाल होत. ते एका खास प्रकारच्या अ‍ॅंटीबायोटिक्सने बर झाल पण डॉक्टरांच्या मते त्यावेळी जरी
त्या जंतुंना या अ‍ॅंटीबायोटिक्सवर मात करता आली तरी हे पुन्हा होऊ शकत."  सुरेश म्हणाला.

मलाही ह्या पत्रीकेत आता औत्सुक्य निर्माण झाल होत " मग आता तुमच म्हणण काय ?" मी सुरेशला प्रश्न विचारला.

"तुम्हाला माहित आहे आणि याचा प्रचारही दुरदर्शन सारख्या माध्यमातुन होतो. कायद्याने आता सिगारेटच्या पाकिटावर आणि तंबाखुच्या पाऊचवर कॅन्सरच्या धोक्याची सुचना दिलेली असताना मी वेगळ काय सांगाव अशी अपेक्शा आहे ? या सर्व सुचना तुम्हाला समजतात मग तुम्ही हे सर्व सोडत का नाही ." तो ऐकतो आहे हे पाहुन मी जरा माझ्या जास्त वयाचा आधार घेत उपदेश केला.

" सोडायची आहे हो पण सुटत नाही म्हणुन तर काळजी वाटते. तुम्ही ही पत्रिका पाहुन नेमक्या विषयाला हात घालाल अशी कल्पना पण आली नाही कारण ही गोष्ट घडली  त्याला आता दहा वर्षे झाली. तेव्हा तर मी ऐन जवानीत होतो. एखाद महिना जेमतेम झाला आणि मग सल्ला झुगारुन मी पुन्हा सिगारेट ओढु लागलो. तंबाखु मात्र गायछाप ऐवजी ही त्यातल्या त्यात चांगल्या ब्रॅडची आणि कापडी छोट्याश्या पिशवीत असलेला पाऊच जो तोंडात ठेवायला सोईचा आणि थुंकताना सार्वजनिक ठिकाणी पिचकारी न मारता फ़ेकता येईल असा वापरतो."

तंबाखुबरोबरच मनातली मळमळ पण बाहेर आली. अनेकांची अनेक व्यसने सुटणे हा मोठा कठीण कार्येक्रम असतो. त्यातुन माझी स्वत:ची बार वर्षे सुटलेली सिगारेट एकदा सुरु झाली होती. काही महिने सुरु राहुन प्रयत्नपुर्वक सोडावी लागल्यामुळे फ़ार  उपदेशामृत पाजणे कठीणच होते.

" मला सांगा पुढे काय होईल ?" मला कॅन्सरचा धोका आहे किंवा नाही ? सुरेशने महत्वाचा प्रश्न विचारला.

सुरेशची पत्रीका इथे वाचकांसाठी दिलेली आहे. जन्मवेळ, जन्मतारिख आणि स्थळ तसेच खरे नाव गुप्त ठेवले आहे. सार्वजनिक ठिकाणी याचा उल्लेख करायचा नाही अशी आचारसंहीता असल्यामुळे हे क्रमप्राप्त आहे. याच कारणाकरता ग्रहांचे अंश ही देणे टाळले आहे.

सुरेश आता त्या धक्यातुन बराच सावरला होता. त्याने गाडी सुरु केली आणि आम्ही परत मुंबईच्या दिशेने जाऊ लागलो.  पत्रीका फ़ार न तपासता कॅन्सर विषयी होय किंवा नाही सांगणे चुकीचे ठरले असते. जर मी वर वर पाहुन कॅन्सरचा धोका आहे म्हणल तर हा आनंदी मनुष्य निष्कारण आपले आयुष्य एका भितीपोटी जगेल. आणि कॅन्सरची भिती नाही म्हणाव आणि ही केस अपवादात्मक रित्या चुकली तर मग मात्र टोचणी लागेल ती कायमची.  "इतक लगेच नाही सांगता येणार, मला संदर्भ तपासावे लागतील "अस म्हणुन मी सुरेशकडुन वेळ मागुन घेतला.मलाही उत्सुकता लागलीच होती.

सावकाशीने मी  खास करुन श्री पै यांनी लिहलेले मेडीकल अ‍ॅस्ट्रोलॉजी हे पुस्तक उघडले ज्यात गुरु हा कॅन्सर प्रोन असतो या संदर्भात. याच कारण सुरेशच्या सहाव्या म्हणजेच रोग स्थानात बसलेला वक्री गुरु. श्री पै हे स्वत: पेशाने डॉक्टर नाहीत परंतु त्यांच्या पत्नी डॉक्टर असल्यामुळे व त्यांच्या प्रेरणेने त्यांनी हे पुस्तक लिहल आहे.  त्यांचा रोगांचा  ज्योतिषशास्त्राच्या अंगाने अभ्यास हा केव्हडातरी व्यासंग आहे. हा व्यासंग खास करुन कॅन्सरचे पेशंटचा. त्यांनी ११३५ कुंडल्यांचा अभ्यास करुन व आपला शोध निबंध धी अमेरिकन फ़ेडरेशन ऑफ़ अ‍ॅस्ट्रोलोजर्स च्या रिसर्च जर्नलमध्ये प्रसिध्द करुन प्रमाणीत केलेला आहे. त्यांच ह्या विषयातल मत मी प्रमाणीत मानुन जातकाला सल्ला देण्याचे ठरवले.

श्री पै यांनी लिहल्या प्रमाणे मंगळ, गुरु आणि हर्षल यांचा योग एकमेकांशी नव्हता ( युती ही नाही आणि दृष्टीयोगही नाही ) तसेच मंगळ, गुरु आणि हर्षल यांची दृष्टी विषीष्ठ स्थानावर असणे हा दुय्यम प्रकारचा योग, याशिवाय  तिसरा आणि चवथ्या प्रकारच्या योगात कॅन्सर होण्याची शक्यता कमी कमी होत जाते परंतु  अजिबात नसते असे नाही.

सुरेशच्या पत्रीकेत धनस्थान किंवा कुटुंबस्थान यावर गुरुची नववी दृष्टी तसेच अष्टमातल्या मंगळाची सप्तम दृष्टी स्पष्टपणे दिसत होती. युरेनस किंवा हर्षलला दृष्टी असते असे मानायचे कारण नाही कारण जुन्या ग्रंथात हर्षल, नेपच्युन किंवा प्लुटॊ या ग्रहांना स्थान नाही. आजकालच्या ज्योतिषांनी कुंभ ही रास हर्षलची मानली आहे. प्रत्येक ग्रहाला सातवी दृष्टी असते हा जरी नियम लावला तरी श्री सुरेश यांच्या कुटुंबस्थानावर किंवा जिभ, तोंड यांचे कारकत्व असलेल्या स्थानावर ही हर्षल अथवा युरेनसची दृष्टी नाही.

म्हणजे श्री पै यांनी सांगीतलेल्या नियमातला एकही नियम संपुर्णपणे लागु होत नसला तरी थोड्याप्रमाणात लागु होतो. तसेच  एखाद्या सिगारेट न ओढणारा किंवा तंबाखु न खाणारा जर असा प्रश्न विचारेल तर कॅन्सरची जेव्हडी शक्यता दिसेल त्यापेक्शा यात जास्त शक्यता असल्यामुळे मी त्याला तुझी पत्रिका कॅन्सर प्रोन आहे त्यामुळे तु सिगारेट आणि तंबाखुचा कायमचा नाद सोड असे सांगीतले.

श्री सुरेश यांचा स्वाभावीक प्रश्न होता की कॅन्सर झालाच तर वयाच्या कितव्या वर्षी होईल ?  मी श्री सुरेश यांना हा काळ  केतुच्या महादशेत म्हणजे २०१६ ते २०२३ या काळात तसेच राहुचे वृषभ राशीतले भ्रमणही तेव्हाच म्हणजे २०२२ च्या सुमारास येईल असे सांगीतले. याच सुमारास श्री सुरेश यांची साडेसाती सुध्दा सुरु होते त्यामुळे त्यांना मानसीक त्रासाबरोबरच बारावा शनी खर्च देऊन जाईल. हा कशाचा हे वेगळे सांगायला नकोच होते. सुरेशने मला व्यसन सोडेन म्हणुन ग्वाही दिली असली तरी हे घडेलच याची खात्री देता येत नाही.


यानंतर सुरेश यांना अचानक नोकरी सोडावी लागली. याचे कारण लिहणे म्हणजे आणखी एक स्वतंत्र प्रकरण लिहावे लागेल. अधुन मधुन आम्ही बोलतो. पण व्यसनाबद्दल मी विचारत नाही. व्यसनाबद्दल खुप चर्चा झाली आहे. एखाद व्यसन माणसाला का लागत याच कारण शोधताना पुर्वजन्म प्रभावाने अस मी सांगीतल्यास ते कोणा कोणाला पटणार नाही. पण सुरेश यांची पत्रीका पहताना खाणे पिणे यांच्या सवयी तपासताना राहु त्या म्हणजे द्वितीय स्थानात सापडतो. राहु हा पुर्वजन्माचे दोष दाखवतो. याचाच अर्थ धुम्रपान किंवा तंबाखुचे कोणत्याही प्रकाराने सेवन हा दोष किंवा सवय ह्याच नाही तर मागील जन्मापासुन आहे हेच दर्शवितो. राहु हा धुम्रपान दर्शवितो असा समज वाचकांनी करुन घेऊ नये परंतु खाण्यापिण्याच्या सवयीत दोष आहे. दुसरे स्थान बाधीत आहे जे सवयी किंवा व्यसन याचे कारण आहे.

दुसरे स्थानी जलराशी असुन तिथे शुक्र असता दारुचे व्यसन लागते. तसेच गुरु असता गोड खाणे याची सवय लागते. बुध असता खाणे लहान मुलाप्रमाणे जास्त वेळा पण थोडे थोडे तसेच मंगळ / रवी असता तिखट पदार्थ खाणे. शुक्र जल राशीत नसता भेळ, वडापाव या सारख्या चटकदार पदार्थांची आवड असे सांगता येते. शनी असता शिळे खाणे तर चंद्र असता दुधाचे पदार्थ याची आवड दिसते. दुसरे स्थानी असलेला राहु  नॉनव्हेजची आवड देतो.

सवयी कशा लागतात असा विचार केला तर अनुकरणाने लागतात.  मात्या पित्याकडुन लागतात, व्यावसायीक सवयी असतात. काही समाजात लहान मुलांना दारु पाजतात किंवा घरातच दारु बनते त्यामुळे दारु पिणे हे चहा पिणे इतके सहज घडत असते. सिगारेटचे तसे नाही. कोणत्याही समाजात ( भारतात तरी ) सिगारेट वडीलांच्या अनुकरणामुळे लागेल पण घरात मुद्दाम ओढायला लावली जाणार नाही.  अर्थात अनुकरण करणे हे जरी साहाजिक असले तरी त्याचे व्यसन होणे आणि ते त्रास होऊनही न सुटणे ह्याचा विचार  केल्यास पुर्वजन्म आणि राहुचा प्रत्यवाय आल्याशिवाय रहात नाही. २०२२ साल अजुन यायचे आहे. परमेश्वर करो आणि सुरेशचे व्यसन सुटो अन्यथा अल्प शक्यता असलेले कॅन्सरच्या शक्यतेचे भविष्य खोटे ठरो. यापेक्षा मी काय मागु.
 ----------------------------------------------------------------------------------------------------------------- 

जितकी भिती समाजात शनि या ग्रहाविषयी विषयी आहे किंबहुना राहूचे प्रभावही तसेच असतात. द्क्षिण भारतात राहू काल विशेष निषीध्द मानला जातो. या काळात द्क्षिण भारतात मोठी खरेदी सोडा पण काडेपेटी सुध्दा न खरेदी करणारे लोक माझ्या पहाण्यात आहेत. इतका कर्मठ पणा उत्तर भारतात दिसत नाही. परंतु ज्योतिष विषयाच्या दृष्टीने राहू महादशा त्याचे जातकावर होणारे परिणाम प्रत्येक व्यक्तीने उत्तम ज्योतिषाच्या सल्याने तपासुन काही निर्णय घ्यावे. अशी गरज काही पत्रिकांकधे असते. राहू महादशेत एखाद्या जातकाचे शिक्षण, पंचमेश किंवा पंचमातले ग्रह अनुकूल असतानाही पुर्ण न होणे. वैचारीक गोंधळ व त्यामुळे होणारे व्यावसायीक प्रश्न किंवा कौटुंबिक प्रश्न या सारख्या पत्रिका मी खुप दिवस पहात आहे. यावर शनिच्या साडेसातीत जसे सरसकट उपाय सांगीतले जातात तसे उपयोगी पडत नाही. काही दिर्घ कालीन उपायांनी परिस्थीती नियंत्रणात येते.   ( नविन अभ्यासकांसाठी - राहु महादशा आणि राहू काल हे वेगवेगळे आहे )
 ---------------------------------------------------------------------------------------------------------------------



                                                                 ४.जननशांती प्रयोग 
ज्योतिष शिकायला लागल्यानंतर वयाच्या ३३ व्या वर्षी मला लक्षात आले की माझी स्वतःची मुळ नक्षत्राची शांत झालेलीच नाही. आधी अनुभवावे मग सांगावे यान्यायाने प्रथम मी माझी स्वतःची मुळ नक्षत्र आणि अमावस्या योगावर जन्माला आल्याची शांत केली. तहान लागली पाणी पिले आणि समाधान झाले इतका कार्यकारण भाव जरी या शांती नंतर दिसला नाही तरी आरोग्यात सुधारणा, स्वभावात सकारत्मक बदल, अकारण चिडणे कमी  झाले इतके स्पष्ट बदल स्वतःला जाणवले. पाठोपाठ माझ्या मुलीचे पुष्य नक्षत्रावर जन्म असल्यामुळे जननशांती कर्म खुप उशीरा म्हणजे तीच्या वयाच्या ९ वर्षी मी करवले.

दर वर्षीच्या दाते पंचांगात खालील प्रमाणे जननशांती सांगीतल्या आहेत.

तिथी - कृष्ण चतुर्दशी, अमावस्या

नक्षत्रे - अश्विनीची पहीली ४८ मिनीटे, पुष्याचा दुसरा व तिसरा चरण, आश्लेशा पुर्ण, मघा प्रथम चरण, उत्तराचा प्रथम चरण्,चित्राचा पुर्वार्ध, विशाखाचा चतुर्थ चरण, जेष्ठा पुर्ण, मुळ पुर्ण, पुर्वाषाढाचा तिसरा चरण, रेवतीची शेवटची ४८ मिनीटे.

योग - वैधृती, व्यतीपात, भद्रा ( विष्टी )

इतर - ग्रहण पर्वकाल, यमल म्हणजे जुळे, सदंत जन्म ,अधोमुख जन्म, माता -पिता-भाऊ - बहिण यांच्यापैकी एकाच्या जन्मनक्षत्रावर जन्म झालेला असताना, तीन मुली नंतर मुलगा किंवा तीन मुला नंतर मुलगी तसेच सुर्य संक्रमण पुण्यकाल, दग्ध, यमघंट, मृत्युयोग या पैकी कारण असेल तर शांती करावी.

मी याला अनुसरुन आलेल्या जातकांना मार्गदर्शन करायला सुरवात केली.

एक केस अशी आली की आमच्या एका साहेबांची मुलगी अभ्यास पुरेसा न झाल्याने बारावीला परिक्षेला ड्रॉप घेण्याचे म्हणत होती. आई वडील मुलीला समजाऊन हैराण झाले की हा निर्णय घेऊ नको. शेवटी पत्रीका पहाणे या विचारापर्यंत वडील पोहोचले आणि पत्रीका माझ्याकडे आली. या मुलीला मेडीकलाला जाण्याची तीव्र इच्छा होती. त्याकाळात फक्त बारावीच्या गुणांच्या आधारावर मेडिकल शाखेला प्रवेश मिळत होता. सी ई टी नव्हती.

पत्रीकेत शिक्षणाचे योग्य योग असताना असे का म्हणुन मी पाहिले असता या मुलीचे नक्षत्र आश्लेषा आढळले. आश्लेषा नक्षत्र राक्षस गणी असल्यामुळे आपल्या अपेक्षापुर्ती साठी तडजोड करणारे नसते.

मी जननशांतींची चौकशी केली असता ती न झाल्याचे समजल्याने शेवटी करण्याचा सल्ला तीच्या वडीलांना दिला पण हे करत असताना उत्तम पौरोहित्य जाणणारे गुरुजी सुचवुन अग्नी पृथ्वीवर असलेल्या योगावरच शांती कर्म करण्याचे दिवस शोधुन दिले. हे सर्व त्या मुलीच्या नशीबाने बारावीच्या परिक्षेच्या आधी जुळुन आले.

शांतीकर्म घडताच एक दृष्य बदल असा घडला की जी मुलगी बारावीच्या परिक्षेला बसणार नाही म्हणत होती ती स्वतःहुन परिक्षा देण्यास तयार झाली. पुढे निकाला अंती उत्तम गुण मिळाले. त्याच वर्षी मुलींसाठी मेडीकलला वेगळा कोटा सिस्टीम आल्याने तीला हवे ते कॉलेजही मिळाले. ती पुढे एम. बी. बी एस झाली हे वेगळे सांगणे नको.

यानंतर लग्न जुळत नाही म्हणुन न केलेली जननशांती दुसर्‍या एका मुलीला लग्नाच्या आधीच्या वयात करायला सांगीतली आणि आश्चर्यकारक रित्या त्वरीत लग्न जुळल्याचे अनुभवले.

असे अनेक अनुभव घेतल्यानंतर आज हे लिहण्याचे कारण घडले. माझ्या मते यावर आणखी संशोधन व्हावे. ह्या संशोधनाला जर लोक पुढे आले तर यातुन निष्कर्ष निघु शकेल.

माझ्या अनुभावात तरी जननशांती कर्म निष्फळ झाल्याचे दिसले नाही. यात या यज्ञ कर्माचा योग्य दिवस शोधणे आणि अग्नी भुमीवर त्या दिवशी असणे हे ज्योतिषाने शोधुन जातकाला सांगणे व त्या दिवशी उत्तम पौरोहीत्य करणार्‍या गुरुजींच्या हस्ते हे घडवणे आवश्यक आहे हे निक्षुन सांगावेसे वाटते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
                      यथा शस्त्रप्रहाराणा कवच विनिवारकम |
                     तथा दैवोपघातानं शान्तिर्भवती वारणम ||

या श्लोकानुसार शस्त्रप्रहाराच्या आघातापासुन जसे कवच शरिराला संरक्षण देतात. तसेच शांती कर्म केल्याने दैवी दोष ( जन्मत: आलेले ) यांचे निवारण होते. अकालमृत्यु भय, शोक, शारिरीक व मानसिक व्याधी दुर होऊन सौख्य, मन:शांती, सुभाग्य, आरोग्य, धन याची प्राप्ती होते.   आजकाल शांतीकर्म ही खर्चीक बाब झाली आहे. शांतीकर्म ज्या कारणासाठी करायचे आहे त्या नक्षत्राच्या देवतांचे जप करणे हा त्याला पर्याय आहे. उदा. वरच्या लेखात मुळ नक्षत्राला शांती सांगीतली आहे. त्याचे शांती कर्म करण्याची ऐपत एखाद्या व्यक्ती कडे नसेल तर त्याने ऒम निऋती नम: हा नक्षत्र जप केल्याने तोच परिणाम साधला जातो. अर्थात जपाची संख्या किमान रोज १०८ इतकी असावी. हे लिहीण्याचा उद्देश इतकाच की शांतीकर्म शक्य नसल्यास काय हे वाचक आणि ज्योतिष अभ्यासकांना समजावे. परंतु शक्य असल्यास शांती कर्म टाळु नये.
 ----------------------------------------------------------------------------------------------------------------------




                                                                 ५.वार्षीक राशीभविष्य
दिवाळी अंक आणि राशी भविष्य याच अतुट नात आहे. अगदी अंधश्रध्दा या विषयाला वाहीलेल्या दिवाळी अंकात वार्षीक राशीभविष्य आल तर आश्चर्य वाटु नये इतपत वाचकांच्या पसंतीचा हा विषय आहे. कारणच तस आहे. व्यापार वर्ग जसा तेजी आणि मंदीच्या चक्राबाबत जास्त जाणुन घेण्यास उत्सुक असतो तसा सामान्य माणुसही आपली साडेसाती कधी आहे कधी संपणार आहे, गुरु अनुकुल आहे अथवा नाही याचा विचार मनाच्या कोपर्यात साठवुन व्यवहाराचे निर्णय घेत असतो.
२००८ - २०११ या काळात मी दररोज एका व्यक्तीबरोबर ऑफ़िसमध्ये जेवण करायचो. अत्यंत प्रभावी, स्पष्टवक्ता अशी त्याची ख्याती. तसाच मोठ्यापदावरचा असल्यामुळे आत्मसन्मानाबाबत ही जागरुक व्यक्ती होती. एकदा एका व्यक्तीने त्यांना अत्यंत हीन भाषेत संबोधले. मी म्हणालो," काय हो ऐकुन कसे घेतले" ? त्यावर ते म्हणाले. "साडेसाती आहे. ती संपुन जाऊ दे मग पहातो". मी म्हणालो " आपलाही अभ्यास  दिसतोय" त्यावर ते म्हणाले "अहो, सारखे राशी भविष्य पहातो त्यात उल्लेख येतो आणि शांत रहातो इतकच. काळ अनुकुल नाही अश्या वेळी शांत रहाणे इष्ट". मला वाटत राशीभविष्याचा इतका उपयोग व्यवहारात झाला तर खुप झालो. आजारी माणसाने जसे पथ्य मोडायचे नसते तद्वत काळ चांगल्या नसलेल्या माणसाने धाडस करणे, अव्यवहार्य वागणे हितावह नसते इतका संदेश या निमीत्ताने द्यावा ही प्रस्तावना.

३१ अक्टोबर २०१६ रोजी नविन व्यापारी वर्षांची अर्थात २०७३ व्या विक्रम संवताची सुरवात होत आहे. विक्रमादित्याच्या नावाने सुरु होणारे हे वर्ष दिवाळीच्या पाडव्याला सुरु होते. संकल्प करणार्या व्यक्तीला भारतात तीन नविन वर्षे मिळतात. १ जानेवारी ला सुरु होणारे इंग्रजी वर्ष. आपल्याला
 आवडो अथवा नाही पण आपण ते जनरीत म्हणुन आपण स्विकारले आहे. त्याच बरोबर चैत्र पाडवा हे शकसंवत आणि दिवाळी पाडव्याला सुरु होणारे विक्रम संवत ह्या तितक्याच प्राचीन आणि शास्त्रशुध्द नविन वर्षे आपल्या परंपरेत आहेत. तीन नविन संकल्प करायचे ठरवले तर तीन नविन  वर्षे आहेत. वर्षभरात एकूण ९ संकल्प घेता येतील. ते सुरु रहाणे ही खरी कसोटी असते परंतु संकल्प मनात आला तर वर्षभर वाट पहायला नको. संकल्पाचे तंत्र शिकणे गरजेचे  आहे. काही गोष्टी ज्या वेगाने घडत नाहीत त्याला संकल्प आवश्यक असतो. त्याशिवाय त्या विषयाला प्राधान्य दिले जात नाही आणि त्या घडत नाहीत. उदा. आपले आरोग्य सुधारणे यासाठी व्यायाम हवा आणि नियमीत व्यायामासाठी संकल्पही  हवाच त्याशिवाय आरोग्य सुधारल्याचा अनुभव येणे शक्य नाही. तेव्हा संकल्प करा आणि तो पाळा. संकल्प केलात तरच कोणत्याही क्षेत्रात सिध्दी म्हणजे हुकमी यश देणारे हे तंत्र आहे. त्यामुळे यशाचा मार्ग संकल्पामधुनच जातो हे सांगावेसे वाटते.


३१ अक्टोबर २०१६ ते पुढील दिवाळी पाडव्यापर्यंत म्हणजे साधारण २० अक्टोबर २०१७ पर्यंतचा काळाचा मागोवा आपण घेणार आहोत. या काळात चार महत्वाचे ग्रह राश्यांतर करणार आहेत.   गुरु , १२ सप्टेंबरला तुळा राशीत जातो म्हणजे तो वर्षभर कन्येतच असणार आहे. राहु ८ सप्टेंबरला कर्क राशीत जातो म्हणजे तोही वर्षभर सिंहेलाच असणार आहे. जानेवारी २६ ला धनु राशीत जाणारा शनि वक्री होऊन पुन्हा वृश्चिके २५ जुनला परतणार आहे व पुढच्या वर्षी २६ अक्टोबरला तो पुन्हा धनु राशीत जाणार आहे. चवथा महत्वाचा ग्रह हर्षल ७ एप्रीलला मेषेत येत आहे. बाकीचे ग्रह महिन्याला - दोन महिन्याला बदलत असतात त्याचा  मागोवा आपण मासिक भविष्यात जास्त प्रकर्षाने घेणार आहोत.

महत्वाचे ग्रह यांच्या भ्रमणातुन  ज्या शुभयोग आणि किंवा अशुभ योगांची निर्मीती वर्षभर होणार आहे त्याचा आढावा  घेत प्रत्येक राशीला होणारे त्याचे परिणाम आपण जाणुन घेणार आहोत. या बलाढ्य ग्रहांच्या शुभयोगातुन किंवा अशुभ योगातुन घडणार्या घटना जरी अनेकांच्या वैयक्तीक आयुष्यात घडल्या नाहीत तरी समाजमनावर परिणाम घडवीतात. उदा. मागच्या वर्षात घडलेली उरीचा दशहतवादी हल्ला किंवा सर्जीकल स्ट्राईक या समाजमनावर परिणाम घडवुनच गेल्या. पाकिस्थानी कलाकारांना भारतात मिळणारा प्रवेश हा अनेकांच्या मतीने अनावश्यक ठरला. याचे ही परीणाम  भारतीय तसेच पाकिस्थानी कलाकारांवर होणारच आहेत. अश्या वेळी राशीभविष्याच्या माध्यमातुन हे सामाजीक परिणाम काय घडतील याचा मागोवा नक्की घेता येईल. वार्षीक राशी भविष्याचा आढावा घेऊ या. १२ ही राशींचा विचार करता हे वर्ष संमिश्र जाणार असे ग्रहमान आहे.

मेष राशी : आपल्या राशीला जवळ जवळ वर्षभर गुरु सहाव्या स्थानात आहे. नोकरदार असाल तर नोकरीत आपली स्थिती मजबुत असेल. एखाद प्रमोशन पॉलीसीप्रमाणे मिळणार असेल तर कोणी अडवु शकणार नाही तसेच आपली शिल्लक, गुंतवणुक यात जवळ जवळ वर्षभर वाढच होण्याचे योग आहेत. कुटुंबात संख्या एकने किमान वाढणार आहे. वर्षभर आपले विरोधक आपल्या पडद्यामागुनच्या हालचालीने चांगलेच त्रस्त होतील पण आपण काय कराल त्याची वाच्यता करु नकाडिसेंबर महिना काही चांगले योग घेऊनच येणार आहे. ह्या महिन्यात आपल्या इच्छापुर्तीचा संकल्पच नियतीने केलेला आहे. खेळाडू असाल तर चमकाल. कलाकार असाल तर झळकाल आणि व्यावसायीक असाल तर फ़ळफ़ळाल असे योग डिसेंबर, जानेवारी महिन्यात दिसतात.

 जानेवारी शेवटचा आठवडा ते फ़ेब्रुवारी महिन्यात मात्र खासकरुन १७ ते २७ तारखांच्या दरम्यान मंगळ आणि हर्षलची युती काही चमत्कारीक घटना घडवताना दिसेल ज्याचा संबंध आपल्या वैयक्तीक जीवनाशी असेल. याच काळात गुरु वक्री असल्याने याचे परिणाम दिर्घकालीन दिसतीलशनि महाराजांची धनु राशीतल्या प्रवेशाने फ़ारसे सुखाऊन जाऊ नका, हा प्रवेश अल्पकाळाचाच आहे. सहाच महिने शनि धनु राशीत जाईल आणि पुन्हा वृश्चिकेत २० जुनला वक्री होऊन परतेल. ते वर्ष संपेपर्यत तो वृश्चिकेतच मुक्कामी आहे. आपल्याला तो आठवा असल्याने नोकरवर्गाचे आपल्याशी असलेले वितुष्ट किंवा कामाच्या ठिकाणी असलेले प्रश्न परिणामकारक रित्या सुटणार नाहीत. पुढच्या वर्षी त्यावर परिणामकारक तोडगा निघेल. ७ एप्रीलला मेषेत प्रवेशाने येणारा हर्षल तुम्हाला अनेक परंपरा मोडाव्या अशी बुध्दी पुढील सहा सात वर्षे देणार आहे. तुम्ही आक्रमक असता त्यामुळे तुम्ही ते करणारच. या नव्या रुपाने तुम्ही अनेकांना चकीत करणार आहातगुरुची अनुकुलता तर शनिची प्रतिकुलता असे संमिश्र परिणामाचे हे वर्ष आपण पहाणार आहात.

वृषभ राशी : वर्षभर पाचव्या स्थानात गुरु आणि राजयोगकारक शनि सप्तम स्थानात असेल. काही काळ तो अष्टमात जाईल हे खरे पण फ़िरुन पुन्हा सप्तमातच येत आहे. अष्टम आणि लाभ स्थानाचा अधिपती गुरु पंचम स्थानात असल्याने ज्यांचा संबध इन्शुरन्स क्षेत्राशी आहे अश्या लोकांची पर्वणी आहे. या वर्षीचे आपले व्यावसायीक ध्येय पुर्ण करायला किमान मार्च पर्यंत चांगले ग्रहमान आहे. राहु वर्षभर आपल्या सुख स्थानात आहे. तो झोपायची जागा बदलणार आहे. आपल्या बेडचे स्थान बदलेल आणि हे सुखावह नक्कीच नसेल. वृषभ राशीचे लोक बिनघोर झोपतात हे वाक्य किमान या वर्षी तरी चुकीचे ठरेल. यात कष्ट आहेत या पेक्षा सवय बदलायला होणारा त्रास होणार. सुखद प्रवास घडणार आहेत. तिर्थयात्रा घडणार आहेत. उत्पन्न वाढणार आहे. वजनही वाढणार आहे त्यामुळे व्यायामाची सवय लाऊन घ्या. एप्रीलला व्ययात जाणारा हर्षल जेव्हा जेव्हा रविच्या युतीत एप्रील मध्ये येईल तेव्हा वडीलांची काळजी घ्या.
साधारण पणे १५ फ़ेब्रुवारी ते  ७ मार्च या काळात आपल्या पत्रीकेत मंगळ आणि हर्षल युती १२ स्थानी होत आहे. हा काळ नुकसानीचा आहे. व्यावसाईक नुकसान, पार्टनरशीप मध्ये गैरसमजुतीने नुकसान असे हे योग आहेत त्यामुळे व्यावसायीकांनी ह्या काळात फ़सगत होईल असे सौदे, करार मदार डोळसपणे हाताळावेत. खुप मोठी जोखीम पत्करु नये. तसेच मे ते जुलै हा काळ सुध्दा खासकरुन व्यावसायीकांना संघर्षाचा असेल. या काळात आपल्याला यशासाठी झगडावे लागेल. १२ सप्टेंबरला गुरु बदल होताना मोठ्या व्यावसायीक संधी चालुन येत आहेत.
थोडक्यात पहिले काही महिने समाधानकारक तर शेवटचे काही महिने संघर्ष असे संमिश्र वर्ष  वृषभ राशीच्या सर्वांना पहायचे आहे.

मिथुन रासचतुर्थ गुरु वर्षभर आहे. तो दशमस्थानावर म्हणजे नोकरी- व्यवसायावर पुर्ण दृष्टी ठेऊन आहे. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ नक्कीच अपेक्षीत आहे. नुसतेच काम वाढणार आहे तर फ़ायदा ही होणार आहेजे कोणी सॉफ़्ट्वेअर इंडस्ट्रीत काम करतात आणि  गेले ६-७ वर्षे एखादे नविन सॉफ़्टवेअर किंवा इलेट्रॉनिक्स प्रॉडक्ट बाजारात आणायच्या उद्योगात नोकरी- व्यवसाय करतात त्यांना मोठा लाभ मार्च नंतर होणार आहे. राहू वर्षभर तिसर्या स्थानात आहे. जे गुढ लिहतात अश्या लेखकांना मोठा सुदर काळ असेल. प्रकाशक आणि प्रिंटर्स यांना व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. बंधु -भगिनी यांची चिंता वर्षभर सतावेल. नोकर वर्गाच्या मागण्या वाढतील. जानेवारी नंतर लेबर्स सप्लायर्स, प्लेसमेंट कन्सलटंट्स यांना खुप काम असेल पण ही संधी थोड्याच काळासाठी असेल. नोकर्यांची उपलब्धता सर्वच राशींसाठी खुपच असेल.
मे नंतर सगळ्यांचेच सुगीचे दिवस संपुन २-३ महिने संघर्ष वाढताना दिसेल. परंतु गुरु महाराज केंद्रात आहेत. त्यांना सगळ्यांची चिंता आहे. सल्ला इतकाच की मे महिन्यानंतर सावधानता. साध्या व्यवहारात सुध्दा सावधानता हवी.
 कर्क रास: वर्षभर तुमच्या धनस्थानात राहु, तृतीयात गुरु आहे. तुम्हाला बोलविता धनी कोणी वेगळाच असल्याची जाणीव या वर्षभरात जाणवेल. बरेच वेळा असे काही  बोलुन जाल ते तुमच्या मनात नसेल. परिणाम चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम होऊ शकतात. मे महिन्यात  एखादा शब्द तोंडातुन बाहेर येण्यापुर्वीच काही सेकंद विचार करा. हे शब्द मुळातच आवश्यक आहेत का ? असतील तर ते कोणाला दुखावणार तर नाहीत ना ? एखादाच शब्द एखाद्याला वर्मी लागतो आणि तो चार चौघात बोलला असेल तर नक्कीच आपला अपमान करण्याच्या उद्देशाने तुम्ही बोलला आहात असा गैरसमज समोरची व्यक्ती करुन घेणार. यामुळे नातेसंबंध, व्यावसायीक संबंध आणि सामाजीक संबंध ताणले जातात. त्यापेक्षा प्रोअ‍ॅक्टीव्हली विचार करुनच बोला.
तृतीयातला गुरु आपल्या भाग्यावर लाभ स्थानावर तसेच सप्तमस्थानावर दृष्टी टाकुन आहे. आर्थीक लाभ आहेच, जोडीदार वर्षभर आनंदी असणार आहे. बायको कमवती असेल तर दिवाळी जोरात आहे आणि नसेल तर  दररोज गरम जेवणाच सुख नक्कीच आहे. नोकरी निमीत्त लहान प्रवास कराल आणि त्याच ठिकाणी एखादे धर्मस्थळ- मंदीर असेल तर दर्शनाचा लाभ घेण्याइतका वेळ ह्या प्रवासात नक्कीच असेल. तुम्ही शिक्षण क्षेत्रात असाल तर एक अनुपम भाग्य उजळणार आहे. तुमचा शोध निबंध नुसता प्रसिध्द नाही तर पेपर प्रेझेंटेशन किंवा पुस्तक प्रसिध्दीचे योग या वर्षी आहेत. जे काय असेल ते नाविन्य पुर्ण असेल. या संकल्पनेला खुप प्रसिध्दी मिळेल.

सिंह रास: सिंहीणी पेक्षा सिंह सुस्तावलेला असतो असे म्हणतात. पुरुष सिंह व्यक्तीला वर्षभर आपल्याला फ़ारच आळस आहे असे वाटेल. त्याच बरोबर गुरु धनस्थानात वर्षभर असणार आहे. तुम्ही गोड खाणार आणि दुपारीही लोळणार असे योग आहेत. लवकर उठण्याचा संकल्पच करा. त्याशिवाय कामे मार्गी लागणार नाहीत. या वर्षभरात तुमच्या घरात एक नविन व्यक्ती येणार आहे. तुम्ही अविवाहीत असाल तर पत्नी, किंवा नविन जन्माला येणारे मुल असो, लहान भावाची पत्नी असेल वा वयाने मोठे असाल तर सुन असेल. आपल्या कुटुंबाच्या सदस्यांची संख्या किमान एकाने वाढणार आहे. धन स्थानातला गुरु तुमची सोन्यातली गुंतवणुक सुध्दा वाढवणार आहे. त्याच बरोबर तुमच्या कामावरच्या जबाबदारीत वाढ होणार आहे. हे तुमचे निर्वीवाद प्रमोशनच असणार आहे.

चतुर्थातला शनि आणि लग्नातला राहू हे  काही कटकटी निर्माण करणार आहेत. पण अधिकार आला की त्रास हा होणारच आहे. तुमच्या राशीला राजयोगकारक मंगळ ग्रह असतोतो मकर राशीला एक नोव्हेंबरला येत आहे. तुमच्या प्रमोशनला असलेले अडथळे नोव्हेंबर महिन्यात संपतील. प्रमोशन नंतर  नुसतीच जबाबदारी नाही तर अधिकार पण मिळणार आहे. तुम्हाला रिपोर्ट करणार्या  लोकांना तुमची भुमिका सुरवातीलाच समजाऊन सांगा. त्यामुळे असहकार होण्याशी शक्यता रहाणार नाहीगेले दोन वर्षे आपल्या मुलांच्या शैक्षणीक प्रगतीत अडथळे येत असतील तर आता संपतीलमंगळ जेव्हा मेषेला येईल तेव्हा फ़ेब्रुवारी महिन्यात तुम्हाला तुमच्या भाग्यात वृध्दी झाल्याचे दिसेल. हे वर्ष तुम्हाला स्मरणात राहील यात शंकाच नाही.
 कन्या रास:  काही कारणाने  त्रस्त असाल तर झालेला गुरु बदल तुम्हाला थोडासा सुखकारक ठरेल. १२ व्या राहू मुळे खर्चाचे प्रमाण वाढलेले असेल. अचानक आणि विनाकारण खर्च वर्षभर मागे लागतील असे थोडेसे तापदायक ग्रहमान असेल. काही नाही तर उत्पन्नाचे काही प्रवाह बंद करतो आहे हे जाणवले असेल. ह्यात जे काय घडत असेल त्यावर तुमचे नियंत्रण नसेल. पण या ऑगस्ट मधे झालेला गुरु बदलाने परिस्थीतीत सुधारणा होणार आहे. एखादा कटु भाग अजुन नियतीने लिहला असेल तर तो घडणारच आहे. हे वर्ष तुम्हाला तापदायकच असणार आहे. खर तर साडेसाती नाही छोटी पनवती नाही अस असताना हे का असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. पण तुम्हाला ग्रहमानच जरा तापदायक आहे हे खरे. ऑगस्टमधे बदललेला गुरुच काय तो तारणहार आहे. त्यामुळे त्याला शरण जा.

लग्नी आलेला गुरु अविवाहीत असाल तर तुमचे दोनाचे चार हात करेल. मुलांचे पालक असाल तर तुमच्या मुलांच्या  शैक्षणीक प्रगतीत वाढ करणार आहे. तुमच्या भाग्यस्थानावर दृष्टी टाकुन प्रतिकुल परिस्थीतीत मदतीचा हात पुढे करणारे व्यक्ती पुढे येण्यास सहाय करणार आहेच. स्थिर रहा. हे ही दिवस नक्कीच बदलणार आहेत याची खात्री बाळगा.

तुळ रास तुळा राशीला आधीच साडेसाती त्यात बारावा गुरु असे ग्रहमान म्हणजे "खाया पिया कुछ नाही ग्लास तोडा बारा आना" हे वाक्य आठवण करुन देणारे असेल. आस्मानी आणि सुलतानी एकावेळी दोन कहर अनुभवायची मनस्थिती ठेवा. तुम्हाला स्थिर रहाणे काय ते शिकवणे गरजेचे नाहीअजुन एक वर्ष दम धरा. २६ जानेवारी २०१७ च्या शनिबदलाने परिस्थीतीत फ़ारसा फ़रक पडणार नाही. पडलाच तर तो तात्पुरता असेलतुम्हाला तारणहार शनि महाराजच आहेत. ते फ़क्त शिकवणार आहेत. चित्रा नक्षत्र सोडल्यास उत्तरा आणि हस्त नक्षत्रांच्या व्यक्तीला साडेसातीचा त्रास संपुन गेलेला आहे. जे शिक्षण शनि महाराजांनी दिले ते धडे आठवा आणि मार्गक्रमण करा. एखादी नवी संकल्पना घेऊन येणार असाल तर जरुर या एप्रील महिना अनुकूल आहेकल्पनेचे स्वागत सुरवातीला थंडे होईल पण नेटाने कार्य चालु ठेवा. वर्षभरात तुम्हाला श्रेय मिळणार नाही पण कल्पना मात्र उचलली जाईल. वर्षाच्या शेवटी शेवटी ही कल्पना तुम्हाला नविन व्यावसायीक मार्ग देऊन जाईल. नोकरीत बदल नाही झाला तरी डिपार्टमेंट किंवा जबाबदारी बदलण्याचे योग वर्षाच्या शेवटी येणार आहेत त्या बदलासाठी सज्ज रहा. राहूचे बदल अनपेक्षीत असतात. म्हणुन वर्षभर मानसीक तयारी ठेवा.

वृश्चिक रास साडेसातीने मानसीक स्थिती त्रस्त झाली आहे का ? त्रासदायक ग्रहमान संपत आल आहे. शनि तुमच्या राशीतुन बाहेर पडणार आहे. पण जाताना पोक्त पणा देऊन जाणार आहे. धनु राशीतला शनि हा मित्र राशीत असल्यामुळे पुढची अडीचकी मिश्र असेलहे वर्ष संमिश्र आहे. जेष्ठा नक्षत्राला अजुनही हुळहुळणार्या जाणिवा त्रस्त करत असतील. त्याचा उद्देश इतकाच आहे की तो तुम्हाला मान मिळावा हा आग्रह सोडा. जितक्या लोकांना नांग्या मारुन आजवर घायाळ केले आहे ते रितसर परतफ़ेड करणार. अगदी तुम्हाला अपेक्षा नसलेले लोक सुध्दा सव्याज देणार. कारण शनिमहाराज तुमचे मुख्य अस्त्र कधी, कसे आणि केव्हा वापरायचे तंत्र शिकवणार आहे. ह्यालाच पोक्त पणा म्हणतात.
गुरु लाभ स्थानात गेलेला आहे ही काय ती जमेची बाजु वर्षभर आहे. पैसे येणारच आहेत. सोबत मुलांची शैक्षणीक प्रगतीच्या बातम्या सुखावणार आहेत. तुमचा जोडीदार नोकरी- व्यवसाय करत असेल तर त्याचीही प्रगती होणार आहे. इतक सर्व चांगल होत असताना दिवाळीचा आनंद घ्यायचा नाही अस तुम्ही नक्कीच करणार नाही. पाडव्याची तयारी करा. जोडीदाराला आणि मुलांना भेट वस्तु आणा. पहा या कठीण काळात कसे वातावरण बदलते ते.

धनु रास: वर्षभर तुम्हाला पळापळ करायची आहे. कधीतरी वाटेल नुसत्याच पायर्या चढतो आहे. कळसाचे दर्शन सुध्दा होत नाही तर देव कधी भेटणार. एक लक्षात ठेवा पायर्या देवालयाच्या चढताय ना ? मग कळस नक्की आहे. गुरु महाराज तुमच्या दशम स्थानात आहेत. ते आत्ताच लाभ देणार नाहीतवर्षभराने नक्कीच लाभदायक स्थिती निर्माण होईल. तोवर नेटाने मार्गक्रमण करणे आणि सिंहावलोकन करणे आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीवर गुरुमहाराजांचे लक्ष आहेच. भाग्यातला राहू तुम्हाला एक चमत्कारीक अनुभव देणार आहे. मागील जन्मीचे तुम्ही काहीतरी चांगले केले आहे म्हणुन तुम्हाला आश्वासक वाटणारे काहीतरी चांगले घडत आहे हा भास नसुन ही राहूची किमया आहे. दोन वर्षांपुर्वी सुरु झालेली साडेसाती तुम्हाला फ़ार त्रास देत नसते. पण गुरु महाराजांनाही सुळापर्यंत नेण्याची क्षमता शनिमहाराजांकडे असते त्यामुळे ते अडीच तास, अडीच दिवस किंवा अडीच महिना तुम्हाला बरेच काही शिकवुन जाईल.

७ एप्रीलला हर्षल तुमच्या पंचमात येत आहे. इलेट्रीकल, इलेट्रॉनिक्स, सॉफ़्टवेअर, काळाला अनुरुप जे काय असेल ते सर्व कल्पकतेने मांडण्यासाठी चा काळ येत आहे. हा काळ पुढील सहा ते सात वर्षे आहे. यावर चिंतन मनन सुरु करा. आज अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातुन सर्वकाही लोकांपर्यंत पोहोचता येते ही कल्पकतेची किल्ली आहे. पहा तुम्हाला काय सुचत आहे.

मकर रास: वर्षभर तुमच्या राशीला शनिमहाराज दशमात होते. ते आता १२ व्या म्हणजे व्यय स्थानात जातील. हा अडीच वर्षाचा असा काळ आहे ज्यात साडेसाती सुरु होत आहे. मकर राशीला साडेसाती फ़ारशी त्रासदायक नसते. पण या शनिने आपल्यावर जी कृपा करुन जे मागाल ते दिल ती स्थिती आता असणार नाही.

गुरु महाराज वर्षभर कन्या राशीत म्हणजे तुमच्या भाग्य स्थानात आहेत. ही सुध्दा एक चांगली स्थिती आहे. तुम्हाला शुभ यात्रा योग आहेत. तिर्थ यात्रा योग आहेत. सदगुरु एक संदेश देऊन जातील. तो लक्षात ठेवा. मोक्षाकडे वाटचालीची दिशा देणारा तो संदेश कायमचा लक्षात ठेवा. याने तुमचे कल्याण आहे. हाच गुरु तुमचे व्यक्तिमत्व उजळुन टाकेल. तुमची नवी ओळख जगाला होईल. मुलांच्या प्रगतीने आनंदी रहाल
आठव्या स्थानातला राहूच तेव्हडा अनुकूल नाही. काही व्याधी जडतील ज्याचे काही वेळा निदान लवकर होणार नाही. झालेच तर औषध लागु पडणार नाही असा वर्षभर अनुभव येत राहील. या करिता तीन उपाय आहेत. घरात कुत्रा असेल तर त्याला खायला देणे, फ़िरवुन आणणे ही कामे स्वत: करा. कुत्रा नसेल तर सकाळी एक तुळशीचे पान खाऊन दिवसाची सुरवात करा किंवा " उं रां राहवे नम" हा जप रोज केलात तर राहू  पीडा नियंत्रणात राहील. राहू महादशा किंवा अंतर्दशा असणारे मकर राशीचे लोक हा उपाय करुन त्रासाची तिव्रता कमी करु शकाल.

कुंभ रास : दशमात शनि आहे तो हळु हळु लाभस्थानाकडे जात आहे. नोकरी व्यवसायातल्या कटकटी कमी होऊन तुम्ही मागाल ते मिळेल. ह्ळु ह्ळु कटकटी कमी होणारच त्या बरोबर आपल्या हवी ती स्थिती  नोकरी व्यवसायात राहील. हा एकच ग्रह तुम्हाला आत्ता लगेच नाही तर  २६ जानेवारी २०१७ ते पुढील दोन- तीन महिने वक्री होई पर्यत दिलासा देईल.

गुरु महाराज अष्टमात आहेत. वाईट काही घडवणे असा स्वभाव त्यांचा नाही. त्यांची वाटचाल मोक्ष त्रिकोणातुन असल्यामुळे संसारीक लाभ वर्ष भर गुरु महाराज देणार नाहीत. ज्यांना अध्यात्मिक प्रगती घडवायची आहे त्यांना हे वर्ष चांगले जाईल. योगाभ्यास, ध्यान याच्यात मन रमेल आणि बॅटरी चार्ज होऊन तुम्ही आनंदी व्हाल.

सप्तम स्थानातला राहु जोडीदाराबरोबर विसंवाद घडवेल. हे माहित असताना कुंभ राशीचा माणुस सावधपणेच संवाद करेल ना ? मग नियमच करा की जोडीदाराच्या बाबतीत जितका चांगला संवाद करता येईल तो करा आणि विसंवादाला जागाच ठेऊ नका. आणि झालाच तर हे घड्णारच होत हे गृहीत धरुन त्रास टाळा. आता जोडीदार  दिवाळी पाडव्याला चांगले गीफ़्ट देईल असे गृहीत धरुच नका त्या पेक्षा हट्टच करा की मला हे हव आहे म्हणजे ते मिळेल.

मीन रास तुमच्या सहाव्या राशीत राहुचे आगमन झालेले आहेचतुम्हाला ज्यांनी त्रास दिला अश्या व्यक्तीना तुम्ही नामोहरम करु शकता. हा तुमचा स्वभाव नाही. परंतु कधी काळी हे केल नाही तर लोक कायमच तुम्हाला गृहीत धरतात. त्यांना एक "जोरोका झटका धिरेसे लगे" याचा अनुभव द्या. शनि तुमच्या भाग्य स्थानामधुन दशमस्थानात जाताना, लोकांना झटका देण्याचे  तंत्र शिकलात तर नोकरी- व्यवसायात येणारे त्रास  टाळता येतील. दशमातला शनि नोकरी व्यवसायात स्थानहरण करतो. ज्यांच्या राशी पत्रिकेत दशमात शनि आहे त्यांना हा अनुभव येईल. प्रत्यक्ष पदानवती न होता तुमचे अधिकार कमी होताना दिसतील.

गुरु तुमच्या सातव्या स्थानात आहे. तुम्ही अविवाहीत असालत तर विचार करा. तुम्हाला जोडीदार कसा हवा याच्या अपेक्षांची यादी वाढवु नका ती कमी करा. लग्न म्हणजे तडजोड असते हे पक्के ध्यानात ठेवले तर अपेक्षा कमी होतील. तुम्ही लग्नाला होकार दिलात तर तुमच्या लग्नाची आशा लाऊन बसलेले तुमचे कुटुंबीय दिवाळी आनंदात घालवतील.
  
  
शुभंभवतु



                                                   ६. राजयोग आणि पत्रिकेचा दर्जा
पत्रीका समोर आली आणि जर पत्रीकेचे संपुर्ण आयुष्याचे कथन करायचे असेल तर पत्रीकेत राजयोग आहेत का आणि असतील तर ते किती आहेत व कसे व कुठल्या काळात फलदायी होतील याचे विवेचन करावे लागते. राजयोग याचा अर्थ प्रत्येक वेळेला एखादी व्यक्ती राजासारखे आयुष्य घालवेल असे नाही. पण पत्रीकेत असलेला अधिकार योग नक्कीच महत्वाचा. या व्यक्तीची पत्रीका पाहिली असताना उत्तरोत्तर प्रगती असे एका वाक्यात वर्णन केले तर गैर ठरणार नाही.

उत्तम निर्णयक्षमता, सहजपणे यशस्वी होणे याच बरोबर चिकाटी आणि ध्येयासक्ती हे गुण या पत्रीकेत येतातच.

राजयोग दोन प्रकाराने पाहिले जातात.

१) पाच महत्वाचे ग्रह केंद्र स्थानात असुन विषीष्ठ राशीत , काही खास अंशात असताना राजयोग होतात. काही ग्रंथात याला पंचमहापुरुष योग ही म्हणले आहे. हे योग स्त्रीयांच्याही कुंडलीत असतात हे वेगळे सांगणे नको. वरील प्रकारचा राजयोग अथवा पंचमहापुरुष योग फलदायी होण्यासाठी आणखी एक महत्वाचे की हा ग्रह अन्य कोणत्या कुयोगात नसावा अन्यथा तो पुर्णतः फलदायी होत नाही.
२) दुसर्‍या प्रकारात पंचम स्थानाचा किंवा भाग्य स्थानाचा आणि केंद्र स्थानाच्या अधिपतीच्या युती/शुभ योगाने फलदायी होणारे राजयोग किंवा विषीष्ठ लग्नाला राजयोगकारक ग्रह केंद्रात असताना आणि कुयोगात नसताना होणारे एका ग्रहाने साध्य होणारे राजयोग.

वरील पैकी समजण्यास सोपा राजयोग प्रथम पाहु.ज्यांना लग्न कुंडली म्हणजे काय ते समजते त्यांना हे सहज समजेल.

शुक्राच्या लग्नाला शनी आणि शनीच्या लग्नाला शुक्र राजयोगकारक होतो तसेच कर्क लग्नाला मंगळ राजयोग कारक होतो. सिंह लग्नाला सुध्दा मंगळ राजयोग कारक होतो.

याचा अर्थ असा की मेष पासुन मीन पर्येत १२ लग्ने होऊ शकतात पैकी सहा लग्ने ही राजयोग कारक असतात.
याचाच अर्थ असा की दररोज बारा लग्नाच्या कुंडल्या मांडल्या जाऊ शकतात आणि त्या पैकी सहा राजयोग कारक असतात. या सहा लग्नात दोन वेळा शुक्र, दोन वेळा शनी आणि दोन वेळा मंगळ राजयोग कारक होतो. एकटा रवी, चंद्र, बुध, गुरु ग्रह या प्रकाराने कोणत्याही लग्नाला राजयोगकारक होत नाही.


 मंगळ ग्रहाची लग्ने म्हणजे मेष आणि वृष्चिक लग्ने तसेच  चार द्वी स्वभाव लग्ने ( मिथुन, कन्या, धनु आणि मीन ) ही सहा लग्ने राजयोग कारक ठरत नाहीत कारण द्वी स्वभाव लग्नाला धरसोड वृतीचा दोष आणि मंगळाच्या लग्नाला असलेला आरंभशुरत्वाचा दोष यामुळे चिकाटी, ध्येयासक्ती, अचुक निर्णयाचा अभाव या मुळे या लग्नांना यश फार अभावाने मिळते.

थोडक्यात महत्वाचे म्हणजे वरील सहा लग्ने म्हणजे वृषभ लग्न, कर्क लग्न, सिंह लग्न, तुळा लग्न, मकर लग्न आणि कुंभ लग्नाच्या कुंडल्या या राजयोगाच्या कुंडल्या आहेत. यात अनुक्रमे शनी जर स्वराशीत , केंद्रात, शुक्र स्वराशीत आणि केंद्रात व मंगळ स्वराशीत आणि केंद्रात असता हा राजयोग जास्त फलदायी होईल.

यातही जिथे दशमस्थानाचा अधिपती आणि भाग्य स्थानाचा अधिपतीच्या योगाने होणारा राजयोग जास्त प्रभावी असतो उदा. अनुक्रमे वृषभ लग्न ज्यात शनी नवमेश दशमेश म्हणुन राजयोग कारक होतो. मकर लग्नाला शुक्र पंचमेश आणि दशमेश म्हणुन कार्यरत होताना जरा कमी प्रभावी तर कर्क लग्नाला मंगळ सुध्दा पंचमेश आणि दशमेश म्हणुन कमी प्रभावी ठरतात.

चतुर्थेश आणि भाग्येशाचे राजयोग उदा कुंभ लग्न, सिंह लग्न आणि तुळा लग्न यांचा पंचमेष आणि चतुर्थेष याचा राजयोग आणखी कमी फलदायी होताना दिसतो.

याच प्रकाराने दोन ग्रहांच्या युतीने/ शुभ योगाने सुध्दा राजयोग होतात. हे योग कोणत्याही लग्नाला असु शकतात परंतु वरील सहा लग्नांना जर आणखी दोन ग्रहांच्या योगाने राजयोग या सोबत असेल तर पत्रीकेचा दर्जा आणखी वाढतो.लग्न राजयोग कारक नसताना दोन ग्रहांच्या सहायाने होणारा राजयोग जर मित्र ग्रहांच्या योगाने होत असेल, केंद्रातुन होत असेल तरच फलदायी होताना दिसतो. अन्यथा हा राजयोग दिसला तरी फलदायी मात्र होत नाही.

मित्र म्हणुन ( शुक्र, शनी आणि बुध ) हा एक गट पडतो तर ( रवि, मंगळ आणि चंद्र ) हा एक गट पडतो.अमावस्या आपण चांगली मानत नाही परंतु अमावस्येला रवी आणि चंद्राची युती होऊन एक राजयोग घडतो मेष आणि वृश्चीक लग्नाला सहजपणे महिन्यातुन एकदा प्राप्त होतो.

असे दोन मित्र ग्रह युती अथवा नवपंचमासारख्या योगात येणे ही गोष्ट सहज घडत नाही. या मुळे राजयोगकारक लग्न नसतानाचा दोन ग्रहांच्या युतीने /योगाने होणारा राजयोग हा अनकॉमन प्रकारचा राजयोग असतो. याचे फल कधी आणि काय मिळेल हे वर्तवणे तितकेच कठीण होऊन बसते.

या प्रत्येक प्रकाराच्या राजयोगाची उदाहरणे देणे लेखन मर्यादा असल्याने अशक्यप्राय आहे. जिज्ञासुंना मात्र अभ्यास करण्यास खाद्य पुरवले आहे असा विश्वास वाटतो.


                                                     ७.  नोकरी व्यवसाय मार्गदर्शन

राजयोगाची कुंडली आणि नोकरी किंवा व्यवसाय मार्गदर्शन याचे एक जवळचे नाते आहे.  मला व्यवसाय करायचा आहे हा विचार सातत्याने मनाशी येत असेल तर आपल्या पत्रीकेत एखादा नैसर्गीक राजयोग म्हणजे जो  वृषभ लग्न, कर्क लग्न, सिंह लग्न, तुळा लग्न, मकर लग्न आणि कुंभ लग्न या पैकी काही आहे का ते तपासावे.  यात राजयोगकारक ग्रह सुस्थितीत आहे अथवा नाही. तसेच त्यावर कोणत्या अशुभ ग्रहाची दृष्टी नाही हे एखाद्या ज्योतिषाकडुन तपासुन घ्यावे. अन्यथा व्यवसायाला आवश्यक स्थिती निर्माण न झाल्याने चिकाटी, जिद्द या सारखे गुण न दिसल्याने व्यवसायात अपयशच येण्याची शक्यता जास्त असते. त्याच बरोबर व्यवसाय करण्याच्या वयात उत्तम महादशा/अंतर्द्शा आहेत ना याचा शोध घ्यावा.

वर उल्लेखलेल्या लग्नाची माणसे नोकरी जरी करत असतील तरी त्यांना वेगाने प्रगती साध्य होते या उलट मेष, वृश्चिक ही मंगळाची लग्ने तसेच  मिथुन, कन्या ही बुधाची लग्ने व धनु  व मीन ही गुरुची लग्ने व्यवसाय करण्याच्या योग्य नाही असे माझे मत आहे. त्यांना स्वत:ला ध्येयवादी ठेवता येत नाही. सातत्याने एक गोष्ट करता येत नाही त्यामुळे स्वतंत्र व्यवसाय सुरु केला तरी तो वेगाने वाढणे कठीण असते. अश्या माणसांनी नोकरी करावी ज्यात व्यवसाय बुडाला की ज्यात आर्थीक नुकसान असते ही भिती रहात नाही.

तुळा लग्न ही चर लग्न असल्याने व्यापार करणे ( खरेदी -विक्री ) यात त्यांना  यश मिळु शकते.  या शिवाय अन्य काही लग्नांना  जसे मेष लग्न किंवा कर्क लग्न ही व्यापार ( खरेदी - विक्री ) करण्यास योग आहेत कारण त्यांच्या अनुक्रमे सप्तम स्थानात किंवा दशमस्थानात तुळा रास आल्याने त्यांना व्यापाराचे गमक चांगलेच समजते. केवळ एक लग्न रास कोणती आहे हे पाहुन व्यापार किंवा व्यवसाय याचा निर्णय घेणे चुकच ठरेल. वर उल्लेख केल्या प्रमाणे यांच्या पत्रिकेतल्या अजुन बरेच ग्रह तपासावे लागतात.

मिथुन लग्न हे फ़ारच बोलके असते. या लग्नाचे लोक उत्तम प्राध्यापक होऊ शकतात किंवा सल्लागार होऊ शकतात. त्यांना कमीशन एजंट म्हणुन सुध्दा यश मिळु शकते. पण या लोकांनी पत्रिकेचा अभ्यास केल्याशिवाय गुंतवणुक करुन व्यवसाय करायचे टाळावे.

कन्या लग्न हे कमी बोलके असते परंतु संशोधक  वृत्ती असते पण धाडस नसते. यांनी संशोधक किंवा ज्या पत्रकारितेत जोखीम नसते परंतु संशोधन जास्त असते अशी पत्रकारिता करणे जास्त लाभदायक ठरु शकते.


धनु लग्न हे उत्तम शरीर यष्टी असलेल्या व्यक्तीचे लग्न असते परंतु  काही विशिष्ठ परिस्थितीत त्यांना उत्तम मानसीक स्थिती लाभते. पत्रीका पाहिल्याशिवाय आणि दोन ग्रहांच्या युतीने होणारे राजयोग असल्याखेरीज व्यवसायाचा निर्णय घेणे  बरोबर ठरणार नाही.

मीन लग्नाचे लोक जरा जास्तच मनस्वी असतात. त्यांना विशीष्ठ ग्रहस्थिती असल्याशिवाय विचार, मानसीक स्थिती याचा ताळमेळ घालता येत नाही. यामुळे व्यवसायात काय नोकरीत सुध्दा मागे पडण्याचे योग येतात. 

आपण व्यवसाय मार्गदर्शन अतिशय ठोबळ मनाने पाहिले आहे. पत्रिकेत असलेल्या अनेक ग्रह त्यांची स्थाने व राशी पाहुन याचा मागोवा घेता येतो.

ज्योतिषाच्या माध्यमातुन नोकरी व्यवसायाच्या मार्गदर्शनाला मर्यादा येत नाहीत. केवळ ज्योतिषाचाच उपयोग करुन एखादा ज्योतिषी नोकरी व्यवसाय मार्गदर्शन करु शकेल इतक संशोधन या विषयात आधीच झालेल आहे. मार्गदर्शनाच तंत्र अजुन चांगल विकसीत होण्याची गरज आहे.

एक संशोधन तर अस सांगत की जगात ३०,००० प्रकारचे व्यवसाय आहेत. आज कोणतच शास्त्र अस नाही की जे एखाद्या व्यक्तीला त्याचे व्यक्तीमत्व आणि  नैसर्गीक गुण जाणुन ३०,०००  व्यावसायीक क्षेत्रापैकी नेमका कोणता व्यवसाय त्या व्यक्तीला योग्य आहे हे सांगेल.

जर योग्य क्षेत्र मिळाल नाही तर व्यक्ती पैसे तर कमावते पण आयुषभर ताण तणाव सहन करत व्यावसायीक जीवन जगते. याचे परिणाम म्हणजे व्यक्ती ताणामुळे आजारी पडते किंवा आनंदी राहु शकत नाही.

ज्योतिषाखेरीज नोकरी व्यवसाय मार्गदर्शानाचे आज जे तंत्र उपलब्ध आहे त्याला मल्टीपल इंटेलिजन्स थेअरी आहे अस म्हणतात. यामुळे एखादी व्यक्तीला ३०,००० व्यावसायीक क्षेत्रामधुन योग्य व्यावसायीक क्षेत्र निवडुन देता येईल का तर असे नाही पण खात्रीने कोणते क्षेत्र या व्यक्तीला अनुकूल नाही व कोणता व्यवसायाचा गट योग्य आहे इतके मार्गदर्शन नक्कीच करता येते.
  

                                                       ८. मधुमेह होईल का ?

भारतात डायबेटीस रोग आता तीस वयाच्या तरुणांना सुध्दा होत आहे हे पाहुन काळजी करावी अशी परिस्थीती आहे. पुर्वी अस म्हणल जायच की हा रोग साधारण चाळीशी नंतर ज्यांच काम बैठ आहे आणि ज्यांना तणावाला सामोरे जावे लागते किंवा ज्यांची शरीर प्रकृती स्थुल आहे अश्यांनाच  जडतो. यातही अनुवंशीकता असल्यास हे प्रमाण अजुनच जास्त असते. पण परिस्थिती वेगाने बदलत आहे. आता वयाच्या तिशीलाच हा रोग भारतीय तरुणांना होत आहे. भारतात दरवर्षी १० लाख लोक केवळ डायबेटीस मुळे मरण पावतात. ही वास्तविकता इतकी भयानक आहे. डायबेटीस आपले शरीर पोखरत आहे याची अनेकांना कल्पनाच नसते.

डायबेटीस झाला की साधारण पणे लोक आपली दिनचर्या बदलतात. व्यायाम करु लागतात आणि डॉक्टरांनी सांगीतलेली पथ्य, आणि औषधे घेत आपले आयुष्य जगतात. डायबेटीस झालेल्या व्यक्तीला सुरवातीला ओरल म्हणजे औषधी गोळ्या खाऊन डायबेटीसचा सामना करता येतो. ही स्थिती फ़ार तर पंधरा वर्षे चालते. यानंतर मग इन्सुलीनचे इंजेक्शन घ्यावे लागते. यानंतर मात्र वेगाने शरीरावर डायबेटीसचा परिणाम होत डॊळे, मुत्रपिंड, स्नायु, ह्रदय अश्या अनेक महत्वाच्या अवयवांना निकामी करत हा रोग शरीर जर्जर करत जातो.

आकडेवारी अस सांगते की २००० साली भारतात ३ कोटी लोक डायबेटीसचे शिकार होते. २०१४ साली हा आकडा ६ कोटी इतका झालाय. यातही महाराष्ट्रात याचे प्रमाण जास्त आहे. ह्याची सरासरी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे.

डायबेटीसचा वाढता प्रभाव आणि आजची जीवनशैली याचा जवळचा संबंध आहे हे कोणीही नाकारणार नाही. शहरातच फ़क्त धकाधकीच जीवन आहे अस नाही तर मधल्या काळात झालेल्या शेतकरी व्यावसायीकांच्या आत्महत्या पहाता व्यावसायीक चिंता फ़क्त शहरातच नाही तर यामुळे ग्रामीण जीवनही व्यापलेले दिसते.

ज्योतिषशास्त्र ह्या सामाजीक संकटाचा सामना करताना कसे उपयोगी पडेल याचा विचार केला असता ज्योतिषशास्त्राच्या prediction अंगाचा वापर करुन जातकाला तुम्हाला डायबेटीस होणार की नाही या अंदाज देता आला तर माणुस आपली लाईफ़ स्टाईल बदलु शकेल का याचा विचार करता येईल. डायबेटीस झाल्यावर आपली लाईफ़ स्टाईल बदलण्यापेक्षा त्या आधीच आपली जीवनशैली बदलली तर? असा विचार करण्याची वेळ आली आहे.

डायबेटीस कोणाला होण्याची शक्यता आहे याचा विचार करताना डॉक्टर्स आपल्याला तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार सांगतात तो  खालील प्रमाणे.

 १. अनुवंशीकता
२. स्थुलता आणि  व्यायाम विरहीत बैठी जीवनशैली
तणावयुक्त जीवन

याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या घराण्यात अनुवंशिकता असेल तसेच ही व्यक्ती स्थुल असेल आणि तणावपुर्ण जीवन व्यतीत करत असताना डायबेटीस लवकरच्या वयाला त्रास देईल तर तीन पैकी एकच गोष्ट लागु पडत असताना उशीरा डायबेटीस होईल हे सांगता येते.

ज्योतिषशास्त्राने ह्या तीनही स्थितीचा अंदाज घेता येतो. शरीरात स्त्राव तयार होण्याची एक साखळी आहे. पिट्युटरी ग्लॅड पासुन शेवटी इन्सुलीन स्त्राव निर्माण करणारी पॅन्क्रीयाज ह्या ग्रंथीची स्थिती बुध आणि शुक्र ग्रहाच्या स्थितीवरुन अंदाज करता येते. जर पत्रिकेत बुध व शुक्र सहाव्या किंवा आठव्या स्थानी असतील, अशुभ ग्रहाच्या सानिध्यात असतील, वक्री किंवा अशुभ नक्षत्रात असतील तर अनुवंशीकता हा अंदाज करता येऊ शकतो.

जल राशीतला बिघडलेला गुरु खास करुन कर्क राशीतला गुरु. त्यातुनही तो ६ किंवा ८ व्या स्थानी असताना वक्री किंवा आश्लेषा नक्षत्रात असताना , हर्षल किंवा नेपच्युनच्या युतीत असताना किंवा अशुभ योगात असताना, स्थुलता ही शारिरीक स्थिती बरेच वेळा दिसते.

तसेच चंद्र सहाव्या  किंवा आठव्या स्थानी किंवा बाराव्या स्थानी, जल राशीत खास करुन कर्क राशीत आश्लेषा नक्षत्रात, शनियुक्त असताना किंवा शनीच्या अशुभ योगात असताना मानसीक स्थिती स्थिर नसते. ह्या व्यक्तीला निष्कारण तणावग्रस्त स्थितीचा सामना करावा लागतो. ह्याची कारणे अनेक वेळा सामाजीक, व्यावसायीक तर काहीवेळा वैचारीक सुध्दा असतात. सतत तणावाखाली असलेली व्यक्ती डायबेटीस रोगाची शिकार लवकर होतात.

भारतात असलेले मुक्त व्यापार धोरण किंवा आजची सामाजीक स्थिती बदलेल अस वाटत नाही. बदलली तरी खुप कालावधीने बदलेल. आपल्या हातात इतकच आहे की ज्योतिषाकडे जाताना केवळ माझ भाग्य कधी उजाडेल, हा प्रश्न घेऊन भाग्य उजाडताना माझ वैयक्तीक आयुष्य कोणत्या रोगाने उजाड होणार नाही ना याचा अंदाज सुध्दा घेण्याची आवश्यकता आहे.

जे अनुवंशीक आहे त्यावर माझ्या मते कोणताच खात्रीचा इलाज आज नाही पण आज अनुवंशीकता पुढच्या पिढीत जाऊ नये म्हणुन काय करता येईल याचा विचार आवश्यक आहे. स्थुलता नियंत्रणात राहील याच्या साठी आपली जीवनशैली सुध्दा  योग्य असावी लागते असे मत रुजुता दिवेकर ह्या आहार आणि स्थुलता विषयाच्या सल्लागार यांनी व्यक्त केले आहे. भारताला डायबेटीस ग्रासत आहे तर त्याच बरोबर योग  हे प्राचिन शास्त्र सुध्दा आपली संपत्ती आहे. योगाभ्यासाने शरीर आणि मनाचे स्थैर्य साधण्याचा व्यायाम करता येतो हे सांगायची आवश्यकता नाही.   
आपल्याला डायबेटीस झालाच तर तणाव हेच कारण असेल असा अंदाज आल्यावर तणाव कमी करणे किंवा तणाव कमी करता आला नाही तर त्याचा सामना करता येईल अशी मानसीकता निर्माण करणे गरजेचे आहे. याकरता अनावश्यक गरजा आणि त्याकरता आपण अनावश्यक ताण निर्माण करणारा व्यवसाय किंवा नोकरी तर करत नाही ना ? याचा विचार करणे माझ्यामते जरुरी आहे.

नशीब नक्कीच उघडावे पण कोट्यावधीची संपत्ती घेऊन एखादा गुलाबजाम खाताना विचार करावा लागत असेल, शांत झोप येत नसेल किंवा दिवसभरात दोन- चार तास सुध्दा तणावमुक्त जीवन जगता येत नसेल तर नशीबाचे मुल्यमापन नव्याने करावेच लागेल.

संदर्भ :
१. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3920109/
२. https://en.wikipedia.org/wiki/Epidemiology_of_diabetes_mellitus
३. मेडीकल अ‍ॅस्ट्रोलोजी - लेखक सुरेंद्र पै
 -------------------------------------------------------------------------------------------------------------------
 तणाव नेमका कसा शरीरावर परिणाम करतो हे सांगताना योगगुरु विश्वास मंडलीक ( योग विद्या धाम नाशीक ) एका वर्गात म्हणाले. समजा आपण १५ किलोमीटर चाललो आहोत. आपल्याला हे असे करण्याचा सराव नसेल तर आपण थकुन जातो. अश्यावेळी पुढे आपल्याला तीन किलोमीटर अजुन चालावयाचे आहे. समजा शेवटचे तीन किलोमीटर हा रस्ता दोन भिंतींच्या मधुन जात आहे. या दोन भिंतीमधे फ़क्त २- ३ फ़ुटाचे अंतर आहे. भिंती उंच आहेत. उडीमारुन त्या पार कर्ता येत नाहीत. आपल्यात अजिबात त्राण नाही. आपण स्वत:ला मानसीक रित्या तयार करत खेचत नेत आहोत. अश्यावेळी २ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर आपल्याला समोरुन विषारी  साप/नाग येताना दिसला ज्याला ओलांडुन पुढे जाणे शक्य नाही. अश्यावेळी पिट्युटरी ग्रंथीत अ‍ॅड्रेनील नावाचे संप्रेरक स्त्रवते. ते काही सेकंदात रक्तात मिसळुन ह्र्दयाची गती वाढते. पायाच्या नसा मोठ्या होऊन शरीरातुन रक्त वेगाने वहाते. अ‍ॅड्रेनील लिव्हरमधे जाऊन त्यातुन साखर रक्तात येते आणि उर्जा निर्माण होते. जो माणुस आता एकही पाऊल उचलत नाही म्हणत असतो तो या अ‍ॅड्रेनील प्रभावाने दोन किलोमीटर उलटा पळत येण्याची शक्ती येऊन पळु लागतो.

हा अ‍ॅड्रेनील मॅकेनिझम शरीरात आयुष्यात ४-५ वेळा वापरला गेला तर फ़ार नुकसान नाही. ही मानसीक स्थिती रोजच आली तर मात्र डायबेटीस चा पेशंट होतो. कारण रोजच अतिरीक्त साखर खाल्ली नाही तरी शरिरात लिव्हरमधुन येते. अ‍ॅड्रेनील मुळे अ‍ॅसीडीटी होते. त्याचे परींणाम वेगळेच.
 --------------------------------------------------------------------------------------------------------------------

                                                             ९. ज्योतिष काय सांगते ?

ज्योतिष काय सांगते ? तुमच्या आयुष्यात हे घडणारच आहे ते शांतपणे पहा असे सुचवते की  ते टाळता येईल याचा प्रयत्न करा हे सुचवते ? माझ्या मते ज्योतिष प्रयत्नवादाचा पाठपुरावा करते आणि माणसाला अशुभ फ़ळ टाळण्याचा किमान प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन करते. विश्वास नाही ना बसत ? खुप मोठे मोठे लोक काही वेळा संतांची वचने किंवा गीता, वेद आणि उपनिषदे यांचे अर्थ लावायला चुकतात किंवा ते  कोणत्या परिस्थीतीत उच्चारले आहे याचा बोध न घेता त्याचा आधार घेत समाजाला चुकीचा संदेश देतात. वयाच्या २५ वर्षाला तुकाराम महाराजांचा ठेवीले अनंते तैसीची रहावे हा अभंग पहाण्याच्या ऐवजी असाध्य ते साध्य करीता सायास करीता अभ्यास तुका म्हणे हे वचन लक्षात ठेवायचे यात गल्लत आपण केली तर दोष आपलाच आहे.

ज्योतिष मुळातच शास्त्र नाही हा आक्षेप घेतला जातो. तो खोडुन काढावा तर ज्योतिषामुळे निराशा येणार आहे असे सांगणारे लोक पुढे येतात. कारण अमुक फ़ळ मिळणार इतके प्रभावी पणे सांगीतले जाते की समोरची व्यक्ती  निराश होते. ह्यात दोष ज्योतिषशास्त्राचा नाही वा सांगणार्या व्यक्तीचा नसुन जातकाच्या पटकन निराश होणे ह्या स्वभावाचा आहे. समजा तुम्ही परगावी जायला निघाला आणि तुम्हाला जाणे आवश्यक आहे असे गृहीत धरले तर येणारे अडथळ्यांची कल्पना असेल तर तुम्ही त्याचा सामना करु शकता. उदा. तुम्ही गावाला जाताना त्या मुख्य रस्त्यावर रास्ता रोको होणार अशी बातमी असेल तर तुम्ही पर्यायी मार्ग निवडावा. हे स्वातंत्र्य आपल्याला आहे. बातम्या ऐकुन मिळालेल्या  सुचनेचा एखादी व्यक्ती सकारात्मक विचार करुन मार्ग बदलुन परगावी जाता येते तसेच ज्योतिषशास्त्राच्या सल्याचे आहे.

जातकाने ज्योतिषाकडुन मिळालेला सल्ला कसा वापरायचा हे स्वातंत्र्य सल्ला घेणारी व्यक्ती घेतच असते. कायम निराश होणारा निराशच होतो तर प्रयत्नवादी पर्याय विचारतो आणि यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो.

 पंचागकर्ते कै. धुंडीराजशात्री दाते यांच्या जुन्या लेखाचा संदर्भ घेऊन सांगावेसे वाटते की ज्योतिषापुढे तीन गोष्टी आहेत ज्यामुळे ग्रह प्रभावामुळे येणारे फ़ळ बदलु शकतेया तीन गोष्टी आहेत प्रयत्न, अनुवंशीकता आणि संस्कार. कसे ते पाहुशनि आणि बुधाचा योग पत्रिकेत असलेली व्यक्ती  दुसर्याची फ़सवणुक करते हा सिध्दांत झाला. असा योग तुमच्या मुलाच्या पत्रिकेत आहे असे समजा. तुम्हाला ज्योतिषाने सांगीतले की हा मुलगा दुसर्या व्यक्तीची फ़सवणुक  करेल. मग आपण दुसर्याची फ़सवणुक करणे हा सामाजीक किंवा कायद्याने अपराध असतो ह्याची जाणिव मुलाला लहानपणापासुन द्यायला हवी. असे संस्कार आपण बोध कथा सांगुन किंवा आपल्या वर्तनामधुन आपण मुलाला दिले तर या मोहापासुन मुल पुढील आयुष्यात दुर रहाण्याची शक्यता जास्त आहे.


 एखादा ज्योतिषी जर आपल्याला मोठा रोग होणार आहे याची पुर्वसुचना देत असेल तर तो कशामुळे होतो हे जाणुन घेणे आवश्यक आहे. हा रोग केवळ निसर्गनियमांच्या विरुध्द वर्तन केल्यामुळे होणार असेल तर आपण निसर्गाच्या नियमांचे पालन करणे इष्ट ठरेल. तसेच या रोगाची  प्रार्थमीक लक्षणे दिसताच औषधे, पथ्य याचे पालन केल्याने रोग आटोक्यात राहील हे नक्कीच. पण या उलट आपण घाबरुन गेलो तर रोगाचा सामना करण्याची मानसीक शक्तीचा वापर करुन न घेता शरणांगती पत्करली असे होईल.

जितके ज्योतिष पुरातन तितक्या प्रयत्नवादाच्या कथा ही पुरातन आहेत. यातल्या एका कथेचा मागोवा घेऊ म्हणजे हा विचार आणखी चांगला पटेल. पुराणात मार्कंडेय ॠषींची कथा आहे. मार्कंडेय ॠषींचा जन्म झाला तेव्हा त्याचे वय अल्प असेल असे भविष्य  मार्कंडेय ॠषींचा पिता मुकुंदु ॠषीं यांना वर्तवण्यात आले. जस जसे मार्कंडेय ॠषींचे वय वाढु लागले तसे त्यांचे पिता निराश होऊ लागले. जेव्हा मार्कंडेय ॠषींना आपल्या आयुष्याबद्दलच्या भविष्याबाबत समजले त्यांनी शिव आराधन सुरु केले. त्यांचे प्राण हरण करण्यासाठी जेव्हा यमाचे दुत आले तेव्हा ते काहीही करु शकले नाहीत म्हणुन स्वत: यमराज प्राण हरण करायला आले. त्यांना स्वत: शिवाने थांबवुन मार्कंडेय ॠषींना दिर्घायुष्याचे वरदान शिवाने दिले.

या कथेने आपल्याला एक गोष्ट समजते की निराश होण्याने काही साध्य होत नाही. प्रयत्नाने
साध्य होते. ज्योतीषामुळे मुलाला अल्प आयुष्य आहे हे समजले त्यावर खुप काळ आधीच शिव आराधना करण्याचा मार्ग मार्कंडेय ॠषींनी शोधला. जर ज्योतिषच जाणुन न घेता मार्गक्रमण केले असते तर त्याचा वडीलांना मुलाच्या अल्पवयात अपमृत्युचे दु:ख करत बसावे लागले असते.

अनुवंशीकतेने येणारे रोग आपल्याला टाळता येत नाहीत. ज्योतिषाने आपल्याला अनुवंशीक  गोष्टींचा मागोवा घेता येतो. आज आपल्याला अनुवंशीक दोष टाळता येणार नाहीत पण किमान पुढच्या पिढीत जाऊ नयेत यासाठी काय कराव याचा विचार करता नक्कीच येईल.





                                                           १०. नक्षत्रप्रकाश संकल्पना


सामान्य ज्योतिषाच्या वाचकाला ग्रह फ़ळ देतात ही कल्पना माहित आहे. बारा स्थानाच्या कुंडलीत ग्रहांची जन्माच्या वेळेस कशी मांडणी झाली आहे यावरुन ज्योतिषी या जातकाला आयुष्यात काय फ़ळे मिळतील याचा मागोवा घेत असतात. फ़ल ज्योतिषाच्या अभ्यासात विवीध राशीतले ग्रह विविध स्थानी पडले असतील तर वेगवेगळे फ़लदायी होतातआणखी सुक्ष्म विचार करायचे म्हणले तर या बारा राशीत सत्तावीस नक्षत्रे विभागलेली आहेत. प्रत्येक राशीला दोन पुर्ण नक्षत्रे आणि तिसर्या नक्षत्राचा एक चतुर्थाश भाग म्हणजेच एक चरणसव्वा दोन नक्षत्रांची एक रास बनते. याराशीत ग्रह भ्रमण करत असतात. ग्रह एका राशीत  एकाच प्रकारचे फ़ळ न देता नक्षत्राला अनुसरुन फ़ळ देतात. पुरातन ग्रंथकार नक्षत्रांच्या अभ्यासाला जोर देतात. कारण ग्रह स्वत:चे अस्तीत्व असते पण नक्षत्राच्या माध्यमातुन ग्रह बोलतात.

एक चित्र डोळ्यासमोर येते का पहाआपण एका वर्तुळाकार सभागृहात आहात ज्याला बारा काचा लावल्या आहेत. या काचा विवीध रंगाच्या आहेत. पण  या काचा संपुर्ण परिघावर आहेत. या काचांवर बाहेरुन विविध प्रकाश येत आहेत, काचांच्या पुढच्या बाजुने ग्रह गोलाकार मार्गावर फ़िरत आहेत. आपण पहातो तेव्हा काही ग्रह वेगाने तर काही मंद गतीने फ़िरत आहेत.

बाहेर विविध तारे अर्थातच नक्षत्रे प्रकाश टाकत आहेत. विवीध रंगाच्या काचातुन तो आत झिरपत आहे. आता हा प्रकाश ग्रह ग्रहण करत आहेत आणि आपल्यापर्यंत पोचवत आहेत. ग्रह आपल्या आपल्या गुणानुसार त्यात बदल घडवत आहेत. ग्रह मागे प्रकाश नसेल तर काहीच करु शकणार नाही. याचे उदाहरण आपण पहातो. चंद्र सुर्याचा प्रकाश ग्रहण करतो. मुळात सुर्याचा प्रकाश किती दाहक असतो. पण जेव्हा चंद्र आपल्यापर्यंत पोचवतो तो अल्हादकारक होतो. तसेच सर्व ग्रहांचे आहे. जर सुर्य नसेल तर चंद्राचा असण्याला काही महत्व नसेल.

या पध्दतीने अनेक ग्रह आकाशगंगेत असलेल्या सर्व नक्षत्रांचे प्रकाश ग्रहण करतात आणि आपल्या पर्यंत त्यातल्या मुळच्या गुणांमध्ये वाढ करुन किंवा बदल करुन आपल्या पर्यंत पोचवतात.

नक्षत्रे आपल्यापर्यंत आपण पुर्वी केलेल्या कर्मांची फ़ळे पोचवत असतात. शुभ कर्माची फ़ळे भरणी, रोहिणी, पुनर्वसु, पुष्य पुर्वा, उत्तरा, हस्त, या सारखी शुभ नक्षत्रे पोचवत असतात तर अशुभ फ़ळे  अश्विनी, कृतीका,आश्लेषा , जेष्ठा, मुळ यासारखी नक्षत्रे पोचवत असतात. काही नक्षत्रे ना शुभ ना अशुभ या प्रकारात मोडतात.

भारतीय शास्त्रे ही मुलत: कर्माच्या सिध्दांतावर आधारीत आहेत. आपण जे काय करतो त्याचे शुभ अथवा अशुभ फ़ळ आपल्याला मिळत असते. कुंडली मांडुन आपल्याला या कर्मफ़ळांचा मागोवा घेता येतो. ती कोणत्या क्रमाने येणार आहेत हे पहाता येते. आपण का जन्माला आलो आहोत आणि काय करणार आहोत याचे सार या मार्गाने समजते.















8 comments:

  1. दिवाळी अंक छान आहे.

    ReplyDelete
  2. very good efforts.....my congratulations and best of luck for future of the magazine and your blog....

    ReplyDelete
  3. दिवाळी अंक उत्तम आहे !

    ReplyDelete
  4. खूप छान माहिती आणि जास्तीत जास्त सोपी करून सांगितली आहे

    ReplyDelete
  5. नमस्कार उत्तम माहिती आहे

    ReplyDelete
  6. छानच खूप छान माहिती आहे

    ReplyDelete
  7. छानच खूप छान माहिती आहे

    ReplyDelete