Friday, November 29, 2019

बहिणीची माया - जन्मठेप झालेल्या कैद्याची शिक्षा कमी/माफ़ होईल का ? केस स्टडी

४ नोव्हेंबरच्या आसपास एका बहिणीने सेशन कोर्टात बायकोचा खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप झालेल्या भावाची हायकोर्ट मधे सुटका होईल का असा प्रश्न विचारला होता. भारतात जन्मठेप म्हणजे १४ वर्षे किंवा २० वर्षे किंवा किती वर्षे असा स्पष्ट उल्लेख नसल्यास मरेपर्यंत शिक्षा असा अर्थ मी जाणून घेतला. २०११ मधे हा गुन्हा घडला होता. १ एप्रिल २०१७ ला भावाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली.

हाय कोर्ट मधे या शिक्षेविरुध्द अपील करण्यात आले होते आणि तो आता शिक्षा संपवुन बाहेर यावा अशी बहिणीची आशा होती. सुनावणी संपुन १५ नोव्हेंबर २०१९ ला या खटल्याचा निकाल लागणे अपेक्षीत होते. बहिणीने काही ज्योतिषांशी संपर्क करुन जन्मकुंडली दाखवली होती. या दोन चार ज्योतिषांनी तिला ४ नोव्हेंबर २०१९ ला झालेल्या गुरु बदलामुळे भाऊ तुरुंगातून उर्वरीत शिक्षा माफ़ होऊन बाहेर येईल असे सांगीतले होते.

बहुदा बहिणीचे मनात शंका होती म्हणून तीने माझ्याशी संपर्क करुन मला रितसर फ़ी पाठवून विचारले.

या व्यक्तीचे किंवा त्याच्या बहिणीचे नाव मुद्दाम मी लिहीत नाही. बहिण जिथे रहाते तिथे आजूबाजूच्या लोकांना हा विषय माहित नसेल तर उगाचच हा लेख कुठून तरी तिच्या पर्यंत पोचायचा आणि याची जाहीर चर्चा झाली यामुळे आणखीनच दु:ख व्हायचे.

बहिणीने भावाचे जन्मकुंडलीचे विवरण पाठवले होते ते या प्रमाणे जन्मतारीख ०३ ऑगस्ट १९८२, जन्मवेळ ००.४५ मध्यरात्री, जन्मस्थान उत्तर गोवा.




{ माझ्या सॉफ़्टवेअर प्रमाणे रुद्र म्हणजे प्लुटॊ, इंद्र म्हणजे हर्षल आणि वरुण म्हणजे नेपच्युन }

मी ही जन्मकुंडली मांडली. मी सहसा असे प्रश्न प्रश्नकुंडली किंवा कृष्णमुर्ती पध्दतीची प्रश्नकुंडली मांडून सोडवत नाही. शेवटी या गुन्हेगार व्यक्तीचे प्रारब्ध जन्मकुंडलीत जास्त स्पष्ट होते हा माझा विश्वास आहे. फ़र्लो रजा मिळेल का हा प्रश्न कदाचीत प्रश्नकुंडलीत पहाणे योग्य ठरला असता. फ़र्लो रजा ही सजा असताना काही दिवसांची सुट्टी असते. कैदी अशी रजा मिळवून आपल्या घरी जाऊ शकतो. इथे फ़र्लो रजा हा विषय नव्हता तर वरच्या कोर्टात सजा कमी होईल किंवा सजा माफ़ होऊन तो बाहेर येईल का असा प्रश्न होता.

जन्मकुंडली पहाताना ही जन्मकुंडली सर्वप्रथम बरोबर आहे किंवा नाही हे तपासणे आवश्यक असते. या प्रमाणे पाहताना सर्वप्रथम मी लग्नेश तपासला. लग्नेश मंगळासारखा क्रुर ग्रह मला प्लुटो या ग्रहाच्या युतीत सप्तम स्थानी मिळाला. मंगळ आणि प्लुटो युती ही या व्यक्तीचे अपघात दर्शक आहे. रागाच्या भरात पत्नीचा खुन करणे हा अपघातच आहे. अन्यथा गुन्हेगारीची पार्श्वभुमी नसलेला हा माणूस खुन करण्यापर्यंत अपघाताने जाऊ शकतो. शुक्र आणि राहू हे पत्नीसोबत विसंवाद दर्शवितात. मागील जन्मी या दोघांमधे वैमनस्य असणे हे ते कारण असावे.  तात्कालीक कारण काय झाले माहित नाही पण जेंव्हा याने आपल्या पत्नीचा खुन केला तेंव्हा राहू महादशा सुरु झालेली होती.

जन्मकुंडली मधील चंद्र केतू युती आणि चंद्र शनि केंद्र योग याची मानसीक अवस्था नीट रहात नाही असे दर्शवितात.

ज्या दोन चार ज्योतिषांनी भाग्येश भाग्यात जातो म्हणून सुटका होईल असे भविष्य वर्तवले त्यांच्या नजरेतून जन्मकुंडलीत भाग्येश हा राहूच्या नक्षत्रात आहे हे निसटले असावे. शिवाय राहू हा बुधाच्या राशीत आहे आणि बुध हा आश्लेषा या क्रुर व गंडांत नक्षत्रात असल्यामुळे राहूची दशा या व्यक्तीला चांगली नाही हे मी जाणले.

( राहू ज्या ग्रहाच्या राशीत असतो तो ग्रह जर बलवान असेल तर राहूची महादशा सुध्दा चांगली जाते असा सर्वसाधारण नियम माझ्या पाहण्यात होता.)

मी बहिणीला ८०% ग्रहस्थितीच्या आधारे आणि २० % इंट्युशनने  सजा कमी होईल पण उर्वरीत सजा माफ़ होऊन तो लगेचच सुटणार नाही होणार नाही असे भविष्य सांगीतले. तो पर्यंत अनेकांनी तो सुटेल हे भविष्य वर्तन केलेले आहे मला माहित नव्हते. बहिण माझे प्रेडीक्शन ऐकून पुन्हा जन्मकुंडली पहाण्याचा आग्रह करु लागली. मी म्हणालो माझे भविष्य चुकले असे झाले तर आनंद आहे पण हे भविष्य चुकणार नाही.

निकाल माझ्या कडे यायच्या आधीच मी ही केस माझ्याकडे फ़लीत तंत्र शिकायला येणार्या ज्योतिषशास्त्री पास झालेल्या विद्यार्थ्यांना दिली. त्यांनाही माझ्या भविष्य कथनाचे आश्चर्य वाटून त्यांनी चर्चा केली. अनेकदा राहू महादशा ही खुप विचीत्र फ़ळ देते हे विसरुन गोचर ग्रहांच्या आधारे फ़लीत केले तर भविष्य चुकते. मुळ कुंडलीचा दर्जा काय आहे. राहू कोणती फ़ळे देत आहे आणि पुढे देणार आहे याकडे दुर्लक्ष होते.

पुढे या बहिणीचा फ़ोन आला. रडत रडत सजा कमी झाली नाही हा निकाल तिने मला सांगीतला. तिच्या दु:खात सहभागी व्हावे की खुनी व्यक्तीला शासन हे होणारच हे म्हणावे मला समजत नव्हते. पुढे सुप्रिम कोर्टात जावे की माझा भाऊ जेलमधेच मरणार असा प्रश्न तिने मला विचारला. मी तिची भावना पाहून केससाठी लागणारे पैसे जर कर्जाऊ आणायचे नसतील तर सुप्रिम कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. गुरु व्ययेश सुध्दा आहे. यामुळे पुढे येणारी गुरुची दशा सुध्दा फ़ारशी सुखावह नाही असे असताना मी हा सल्ला दिला. कारण प्रयत्न करणे हा माणसाचा स्वभाव आहे. आपण प्रयत्न केला नाही ही बोच बहिणीच्या मनात राहू नये यासाठी.

Monday, November 11, 2019

जन्मकुंडली तयार करताना जन्मवेळ नेमकी कोणती घ्यावी ?

आपल्या पैकी अनेकांना माहित आहे की जन्मकुंडली तयार करण्यासाठी जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ ह्या तीन गोष्टी आवश्यक असतात. या तीन गोष्टी का आवश्यक असतात असा प्रश्न केला तर तो एक वेगळा चर्चेचा विषय होईल. हा विषय ज्योतिषशास्त्राचा गाभा असल्यामुळे चर्चा फ़क्त ज्योतिष शिकलेल्यांना समजेल आणि इतर सामान्य ज्योतिषप्रेमींना समजणार नाही म्हणून हा विषय न घेता फ़क्त जन्मवेळ कोणती घ्यावी या विषयावर चर्चा करु. याचाच अर्थ असा की जन्मवेळ बरोबर नसेल तर आपण दिलेल्या जन्मवेळेनुसार आलेली जन्मकुंडली बरोबर न आल्यामुळे आपल्याला कितीही विद्वान ज्योतिषाने सांगीतलेले भविष्य चुकेल. आपला वेळ, आपण या ज्योतिषाला दिलेली फ़ी वाया जाईल या शिवाय चुकीचा सल्ला बरोबर मानून घेतलेले निर्णय चुकल्याने किती नुकसान होईल ?

जन्मकुंडली तयार करताना जन्मवेळ नेमकी कोणती घ्यावी ?


ही सर्व चर्चा करण्यापुर्वी बालकाच्या जन्माची प्रक्रिया आधी नीट समजाऊन घ्यायला हवी.

बालक जन्माला येते ही प्रक्रिया माझ्या मते तीन टप्यात पुर्ण होते. यातील पहिला टप्पा,  बालक आईच्या शरीरातून बाहेर येते. ही प्रक्रिया नैसर्गीक म्हणजे सिझेरीयन न करता होणारी प्रसुती असो की सिझेरीयन पध्दतीने होणारी प्रसुती असो. या दोनही टप्यात आईच्या शरीरापासून बालक सुटे झाले तरी ते आपले श्वसन सुरु करत नाही.आईच्या शरीरापासून सुटे झालेले बालक लगेचच रडत ही नाही.

याचे कारण आता पाहू. आईच्या गर्भाशयापासून एक २० इंच किंवा ५० सेंटीमीटर नळी ज्याला मराठीत नाळ असे म्हणतात ती बालकाच्या बेंबीला जोडलेली असते. आईपासून बालक सुटे झाले तरी ही नाळ जोडलेली असते. जो पर्यंत ही नाळ जोडलेली आहे तो पर्यंत आई आणि बालकामध्ये नाते नसते. बालक आईपासून सुटे झाले तरी ते आईच्याच शरीराचा भाग असते. कारण त्याला ऑक्सीजन अर्थात प्राणवायू आईने घेतलेल्या श्वासामधूनच मिळत असतो.

दुसरा टप्पा जेंव्हा नाळ कापली जाते ती आहे. या नंतर बालकाच्या शरीरातील ऑक्सीजन ची पातळी हळू हळू खाली जाऊ लागते. नुकतेच जन्मलेले बाळ फ़ारसे हालचाल करत नसते त्यामुळे त्याची ऑक्सीजनची गरज ही कमी असते. पण साधारण पणे तीन ते चार मिनीटात बालकाच्या शरीरातील ऑक्सीजनची पातळी खुपच कमी होते.  असे झाले की बालकाचा मेंदू सुचना देतो आता स्वतंत्र श्वसन करण्याची आवश्यकता आहे. ही सुचना मिळताच आयुष्यात प्रथमच बालक जोर लाऊन फ़ुफ़्फ़ुसे उघडते आणि पहिला श्वास घेते आणि रडते.

बालकाच्या जन्माच्या प्रक्रियेत तिसरा टप्पा म्हणजे बालकाने पहिला श्वास घेणे हा आहे.   असे करताना  बालकाला प्रचंड शक्ती खर्च करावी लागते.याचा बालकाला खुप त्रास होऊन बालक रडते.  आईच्या पोटात जागा कमी असल्याने फ़ुफ़्फ़ुसे म्हणजे हवा भरण्याची पिशवी जशी नवी प्लॅस्टीक बॅग चिकटलेली असते तश्या अवस्थेत असते. बालक जोर लावताच त्यात हवा भरली जाते. पण हे करताना बालकाला रडू येते आणि ते जोराने रडते.

कै. डॉ भा.नि. पुरंदरे हे आंतराष्ट्रीय किर्तीचे स्त्रीरोग तज्ञ अर्थात गायनोकॉलॉजिस्ट होते. त्यांनी  शल्यकौशल्य नावचे आत्मचरित्र लिहले आहे. त्यांच्या या आत्मचरित्रामधे त्यांनी प्रथम बाळ रडते, ती जन्मवेळ जन्मकुंडली तयार करण्यासाठी घ्यावी असे सांगीतले आहे. तुम्ही म्हणाल या स्त्रीरोग तज्ञ किंवा प्रसुतीतज्ञ डॉक्टर साहेबांचा आणि ज्योतिषशास्त्र विषयाचा काय संबंध ? त्यांचे म्हणणे प्रमाण का मानायचे ?

कै. डॉ . भा.नि. पुरंदरे हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे स्त्रीरोग तज्ञ अर्थात गायनोकॉलॉजिस्ट होते तसेच ते ज्योतिषी सुध्दा होते. त्यांनी त्यांच्या शल्यकौशल्य ह्या आत्मचरित्रात पान १८९ ते पान १९४ ह्या पाच पानांवर अनेक जन्मकुंडली  दिल्या आहेत.  जन्मकुंडलीचा अभ्यास, एखादी केस हाताळण्यासाठी डॉक्टर्स ना कसा उपयोग होतो यावरही ह्या पुस्तकात दिले आहे.

त्यांच्या मते एखादी व्यक्ती शेवटचा श्वास बाहेर टाकते हा जर मृत्यु मानला तर पहिला श्वास घेते हा जन्म मानला पाहिजे. ह्या गोष्टीच्या समर्थनासाठी एक हायपोथीकल केस घेऊ. जर नाळ कापण्यापुर्वी मातेला पोटेशियम सायनाईड सारखे विष दिले गेले. असे विष क्षणात मातेच्या शरीरात परसते. तसेच ते नाळे मार्फ़त बालकापर्यंत येऊ शकते. यामुळे आई आणि बालकाचा मृत्यु होऊ शकतो. परंतु नालविच्छेदनानंतर म्हणजे नाळ कापल्यावर असे घडणार नाही. कारण आईच्या शरीराचा आणि बालकाचा नाळेचा संबंध तेंव्हा नसेल.

नुकतेच जन्माला आलेले बालक ही स्वतंत्र श्वास घेऊ लागते. बालक स्वतंत्र श्वास घेऊ लागते याची खुण म्हणजे बालक जेंव्हा प्रथम रडते ती वेळ असते. हीच जन्मवेळ घ्यावी असे भारतातील बहुतांशी ज्योतिषांनी मान्य केलेले आहे.

आपण विचाराल काही केसेस मधे बालक रडत नाही तर काय करायचे ? कोणती जन्मवेळ घ्यायची ? आपण थ्री इडीयड्स चित्रपटात पाहीले असेल. बालकाला अश्यावेळी मिडवाईफ़ किंवा नर्सेस आणि डॉक्टर्स पाठीवर थोपटतात. चिमटे सुध्दा काढतात. यामागे उद्देश असा असतो त्याने वेदना होऊन हातपाय हलवावेत. असे केले की त्याच्या शरीरामधे ऑक्सीजन पातळी झपाट्याने खाली जाते आणि बालक स्वत: श्वास घेण्यासाठी फ़ुफ़ुसे उघडते. अर्थातच हे केल्यावर बहुतांशी बालके रडतात.

असेही घडत असेल की बालके सुखरुप श्वासोश्वास करु लागतात पण मात्र रडत नाहीत. त्या केस मधे ह्या दरम्यानची वेळ घेणे याला पर्याय नाही. पण ९०% बालके रडतात असे गृहीत धरले आणि ती वेळ नोंदली गेली तर जन्मवेळ  मिनीटांच्या हिशोबात अचूक असेल.

जितकी जन्मवेळ अचूक तितके बालकाचे भविष्य बरोबर येते. अर्थात यासाठी ज्योतिषी निष्णांत असला पाहीजे. गेल्या ५० वर्षांपासून केपी अर्थात कृष्ण्मुर्ती पध्दतीन जन्मकुंडलीचा अभ्यास केला जातो. ही पध्दत पारंपारीक पध्दतीपेक्षा जास्त अचूक असली तरी यासाठी जन्मवेळ मात्र अचूक असावी लागते. पारंपारीक पध्दतीमधे जे ज्योतिषी स्पष्ट्ग्रह पाहूनच भविष्य सांगतात त्यांचे ही भविष्य अचूक असते.

यावर आणखी एक प्रश्न सगळे विचारतील की आमची जन्मवेळ आम्ही रडलो तेंव्हा नोंद्लेली आहे किंवा नाही हे कसे समजावे ? फ़ारच कमी ज्योतिषी ह्यासाठी जन्मवेळेचे करेक्शन करुन भविष्य सांगतात. पण यासाठी जन्माला आल्यानंतरच्या घटना पडताळून ही वेळ निश्चीत केली जाते. स्वत: कृष्णमुर्ती महोदयांनी यासाठी बर्थ टाईम करेक्शन असे तंत्र शोधून काढले आहे. हे तंत्र सुध्दा पुढच्या पिढीतील ज्योतिषी अजून विकसीत करत आहेत.

याचर्चेचा निष्कर्श काढला तर इथून पुढे जन्माला येणार्या बालकांची जन्मवेळ अचूक नोंदणे आवश्यक आहे. नुकतीच जन्माला आलेली बालके स्वत: तसे करु शकणार नाहीत. यामुळे ही जबाबदारी आपला विश्वास असो किंवा नसो ती बालकांच्या वडीलांची आहे. बालकाने ज्योतिषावर विश्वास ठेवायचा की नाही हा निर्णय त्याला घेऊ द्यावा. पण त्याच्या जन्माची अचूक वेळ नोंदवण्याची जबाबदारी मात्र सर्वप्रथम बालकाच्या वडीलांनी घ्यावी.

मला कल्पना आहे की ह्या विषयावर अनेक प्रश्न येणार आहेत. मी त्यातले योग्य प्रश्न निवडून याची समर्पक उत्तरे देईन. मी स्वत: प्रसुतीतज्ञ नाही. यामुळे या विषयावरील माहीती वाचूनच मी ही चर्चा करत आहे. मानवी शरीर हे १००% आजच्या सायन्स ला समजलेले नाही. असे असताना बालक नेमके कसे प्रथम रडते यावर एखादी अजून थेअरी असेल. आजच्या चर्चेचा हा विषय नाही. जर शेवटचा श्वास सोडणे म्हणजे मृत्यु मानला तर पहिला श्वास घेणे हा जन्म मानावा आणि त्याचे इंडिकेटर म्हणजे जन्माला आलेल्या बालकाचे प्रथम रुदन अर्थात रडणे आहे.

हा किंचीत तांत्रिक विषय मी माझ्या पध्दतीने समजाऊन सांगीतला.  मीच प्रथम हा सांगीतला असा माझा दावा नाही. अनेकांनी या विषयी लिहले आहे. आपण ही माहिती वाचण्यासाठी जो वेळ दिलात त्यासाठी धन्यवाद ! ही माहिती जर आवडली असेल तर इमेल सबस्क्राईब करा म्हणजे नविन पोस्ट येताच आपल्याला इमेल वर याची सुचना मिळेल.  आपण सर्वांना समजेल या भाषेत ज्योतिष विषयावरील मुलभूत गोष्टींची चर्चा करत राहू. यामुळे अगदी सर्वांना ती समजेल.

Thursday, November 7, 2019

१६ नोव्हेंबर २०१९ ते १५ डिसेंबर २०१९ या काळाचे राशीभविष्य ( तुळ ते मीन राशी साठी )


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १६ नोव्हेंबर २०१९ ला वृश्चिक राशीत जाणार आहे
शुक्र २१ नोव्हेंबर २०१९ ला धनु राशीत जाणार आहे
बुध २१ नोव्हेंबर ला मार्गी होऊन डिसेंबरला वृश्चिक राशीत जाणार आहे.
शुक्र १५ डिसेंबरला मकर राशीत जाणार असला तरी हे भविष्य आपण पुढील महिन्यात पहाणार आहोत.

थोडक्यात रवि आणि बुध शुक्र यांचेच राशी परिवर्तन ह्या महिन्यात होणार आहे. या शिवाय हर्षल
आणि नेपच्युन आहे  त्या राशीत वक्री असणार आहेत. पैकी या महिन्यात २७ नोव्हेंबर २०१९ ला नेपच्युन मार्गी होणार आहे.

या पार्श्वभुमीवर हा महिना बारा राशीच्या लोकांना कसा जाईल ते आपण आता पाहू. हे राशीभविष्य आपण लग्नराशीकडून पहा. ज्यांना लग्नराशी माहित नाही त्यांनी चंद्र राशीकडून पहावे.

१६ नोव्हेंबर २०१९ ते १५ डिसेंबर २०१९ या काळाचे राशीभविष्य ( मेष ते कन्या राशी साठी )






















तुळ रास

आपल्या राशीचा मालक शुक्र २१ नोव्हेंबर पासून धनु राशीत जाणार आहे. २४ तारखेला शुक्र गुरु यांची युती आहे. तिसर्या स्थानी होणारी देवगुरु आणि राक्षसगुरु यांची युती आपल्याला आपल्या लेखनामुळे किंवा अन्य कोणत्या कारणाने प्रसिध्दी मिळण्याचे योग आहेत. एका बाजूला प्रसिध्दी योग असताना दुसर्या बाजूला लेखनावर टीका सुध्दा होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास काय उत्तर द्यायचे याची तयारी झालेली असावी.

११ डिसेंबरला होणारी शुक्र शनि युती शिक्षण क्षेत्रात काम करणार्या लोकांच्या साठी किंवा कमर्शियल आर्ट मधे पेन्सील वर्क, ब्लॅक मेटल वर काम करणार्या लोकांना काही संधी घेऊन येणारी आहे. ही युती म्हणजे मोठा राजयोग आहे. यामुळे तुळ राशीच्या काही लोकांना संधी उपलब्ध होतील. १३ डिसेंबरला होणारी शुक्र प्लुटो युती मात्र जननिंदा घेऊन येणारी आहे. एकाबाजूला सन्मान, संधी तर दुसर्या बाजूला जननिंदा असे विचीत्र ग्रहमान या महिन्यात काही तुळ लग्नाच्या लोकांना अनुभवास येईल.

वृश्चिक रास

आपल्या राशीचा मालक मंगळ महिनाभर वृश्चिक राशीत असणार आहे. आपला एखाद्या गोष्टीचा नको तेव्हडा आग्रह आपल्याला अडचणीत तर आणत नाही ना या कडे लक्ष देण्याची गरज आहे. या महिन्यात आपल्याला वैवाहीक जोडीदाराच्या माध्यमातुन काही धनलाभ होण्याचे योग आहेत. काही वृश्चिक लग्नराशींच्या लोकांना पुर्वी झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई सुध्दा मिळेल असे योग आहेत.

या महिन्यात आपल्या घरी कौटुबीक स्नेह संमेलन भरेल. सर्वच स्नेही गोड बोलतातच असे नाही. आपल्याच घरी येऊन, जेऊन खाऊन आपल्याला वाईट बोलून जाणारे स्नेही या महिन्यात असा स्नेह मेळावा झाल्यास दिसतील. हा त्यांचा स्वभाव आहे असे समजून त्या कडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. कारण ते काही बोलले म्हणजे ते खरे असते आणि त्यामुळे नुकसान होतेच असे नाही.

धनु रास :

आपल्या राशीचा मालक गुरु जो गेले वर्षभर बाराव्या स्थानी होता तो आता रास बदलून धनु राशीत आल्याने आपण जे काम करता त्यात आपले विचार, आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटेल. अनेकदा ग्रहस्थिती अनुकूल नसल्याने काही घडवून आणणे जमले नसेल तर २७ मार्च २०२० पर्य्ंतचे पुढील पाच महिने आपल्या हाताशी आहेत.

आपल्या राशीत होणारी शुक्र गुरु युती आपल्याला लाभ देऊन जाणार आहे. हाताखालच्या लोकांनी केलेल्या कामामुळे असे घडत असेल तर मात्र याची जाणीव ठेऊन कृतज्ञता व्यक्त करायला आपण विसरणार नाही हे पहा. कोणा मित्रांच्या संसारातला गृहकलह समोर येईल आणि तो मार्गी लावताना आपले हात पोळणार नाहीत इतके अंतर ठेऊन हे काम करा,

या महिन्यात बाराव्या स्थानी बसलेला मंगळ काही गुप्त चिंता, गुप्त खर्च देईल. हे उघड करता व्यवस्थित मॅनेज करण्याचे कौशल्य दाखवावे लागेल.

मकर रास :

आपल्या राशीचा मालक शनि अजुनही बाराव्या स्थानी आहे. जानेवारीत तो मकर राशीत येणार आहे. आपल्या संतती संदर्भात खास करुन संततीच्या नोकरीच्या ठिकाणी उद्भवलेल्या प्रश्नामुळे काही चिंता लागून राहील. काही खर्च सुध्दा किंवा प्रवास यामुळे या महिन्यात करणे आवश्यक ठरेल.

या महिन्यात लाभ स्थानी असलेला मंगळ आपले उत्पन्न वाढवेल किंवा एखादा उत्पन्नाचा नविन मार्ग मिळवून देईल यामुळे खर्च असला तरी मॅनेज होईल.  आपल्या नोकरीच्या ठिकाणी हाताखालचे वरिष्ठ सुध्दा आपण अडचणीत असाल तर मोलाचा सल्ला देतील. यामुळे आपण काही कठीण परिस्थिती या महिन्यात आली तरी हाताळू शकाल.

कुंभ रास:

आपल्या राशीला संपुर्ण नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिने चांगले जाणार आहेत. अनेक कामे मार्गी लागतील. अनेक प्रकारचे लाभ जसे आपल्या मुदतठेवी वरचे व्याज, गुंतवणूकीपासून फ़ायदा या काळात अपेक्षीत आहेत.

२४ नोव्हेंबरला शुक्र आणि गुरु युती मुळे आपले वरिष्ठ काही विशेष लाभ आपल्याला मिळवून देतील. २१ नोव्हेंबरला लाभ स्थानात येणारा शुक्र कुंभ लग्नाला राजयोग कारक असल्यामुळे १३ डिसेंबर पर्यंत प्रॉपर्टी मधून लाभ असो की अन्य अनेक लाभ आपल्या पर्यंत पोचोवणार आहे.

याच काळात २१ नोव्हेंबर नंतर आपल्या बुध्दीमत्तेची चमक दिसणार आहे. आपण बुध्दीबळ खेळत असाल किंवा कौन बनेगा करोडपती सारख्या बुध्दीचे प्रदर्शन करण्याच्या स्पर्धा असतील, आपल्याला लोकप्रियता मिळवून देणार आहे. डिसेंबर २०१९ ला होणारा चंद्र आणि नेपच्युन योग कुंभ राशीच्या लोकांचा मुड घालवणारा असेल. हा एक दिवस सोडला तर कुंभ राशीला हा महिना स्मरणात राहील असाच असेल.

मीन रास :

आपल्या राशीचा मालक दशमस्थानी आल्यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात मोठी वाढ होण्यास सुरवात होईल याची चुणूक या महिन्यातच दिसेल. आपल्या नोकरीतले किंवा व्यवसायाचे कार्यक्षेत्र मोठे झाल्यामुळे ह्याचे व्यवस्थापन कसे करायचे या कडे सुरवाती पासून लक्ष द्यावे लागणार आहे. २७ मार्च २०२० पर्यंत कामाचा बोजा वाढत जाणार आहे.

इन्शुरन्स क्षेत्रात काम करणारे, भुवैज्ञानीक, बोअर वेल खोदणारे, जमिनीतून बाहेर आलेली रत्ने घडवणारे, विकणारे यांना या महिन्यात प्रचंड काम करावे लागणार आहे. यातून फ़ायदा होणारच आहे हे विसरू नये. जे लोक परदेशस्थ कंपनीची कामे करतात त्यांनाही भरपुर काम मिळणार आहे. एकंदरित मीन लग्नराशीच्या लोकांना आलेली निराश या महिन्यात दुर होऊन प्रगतीचा आलेख उंचावत जाण्यास आता सुरवात होणार आहे. आपल्याला सुध्दा हा महिना स्मरणात राहील असाच असणार आहे.

शुभंभवतु