Thursday, September 22, 2016

विवाह लवकर व्हावा यासाठी उपवर मुलीने करावयाची पुजेची माहिती


ज्यांचा विवाह ठरण्यास अडचणी येत आहेत अश्या उपवर विवाह इच्छुक कन्यांसाठी नवरात्रातील षष्ठी तिथी कात्यायनी देवीची पुजा करण्याचा दिवस आहे. या दिवशी कात्यायनी देवीची पुजा केली असता विवाह होण्यातले अडथळे तसेच प्रेमविवाह होण्यासाठी येणारे अडथळे दुर होतात असा  अनुभव आहे.

अश्विन महीन्यात शारदीय नवरात्रात येणारा ३ अक्टोबर २०१९ हा दिवस  सायंकाळी ६ नंतर या पुजेला अनुकुल दिवस आहे.  कात्यायनी देवीचे वरील चित्र स्थापन करुन  किंवा खालील लिंक मधे दिलेले यंत्र उपवर विवाह इच्छुक कन्येने किंवा उपवर मुलाने सायंकाळी पिवळे किंवा लाल वस्त्र धारण करुन पुजा करावयाची आहे. यात देवीला पिवळे फ़ुल/फ़ुले वहायची,पाच हळकुंडे  तसेच पिवळ्या रंगाचा नैवेद्य तसेच मध अर्पण करायचा असतो. हात जोडुन  विवाह त्वरीत तसेच मनासारखा पती किंवा पत्नी ( उपवर मुलांनी म्हणायचे संकल्पामधला बदल ) मिळावा यासाठी जप करत आहे असा संकल्प करावा.

या पुजेसाठी अवश्यक साहीत्य अमेझॉन वर मिळण्यासाठी ही लिंक

1. https://amzn.to/2ZTruue  कात्यायनी यंत्र

3. https://amzn.to/2HRHqH0  हळकुंडे

या पुजेनंतर  १०८ वेळा खालील मंत्राचा जप करावा.

हा जप उपवर मुलींनी असा म्हणावा

" कात्यायनी महामाये महायोगिन्यधीवरी नंदगोपीसुतं देवी पतिमे कुरु ते नम:"

हा जप उपवर मुलांनी असा म्हणावा

" कात्यायनी महामाये महायोगिन्यधीवरी नंदगोपीसुतं देवी पत्नीमे कुरु ते नम:"

(  मुलांनी जप करताना वरील मंत्र नीट वाचावा व फ़रक समजून घ्यावा . या मंत्रात मुलांनी जप करताना पति ऐवजी पत्नी हा शब्द उच्चारणे अपेक्षीत आहे.  )

हा जप व पुजा ज्यांचा विवाह व्हायचा आहे अश्या मुलींनी/मुलांनी करणे अपेक्षीत आहे.

त्यांना वेळ नाही म्हणून अन्य कोणी केली तर फ़ळ मिळेल अशी शक्यता नाही.

मंत्र जप झाल्यावर प्रार्थना पुर्वक आपली इच्छा पुर्ण व्हावी अशी मनात प्रार्थना करावी. व नंतर हळकुंड पिवळ्या कापडात बांधुन ठेवावे. हे कापड असलेली हळकुंडे जो पर्यंत विवाह होत नाही तो पर्यंत कायम झोपताना उशाशी ठेवावी. विवाह जमला तर ही हळकुंडे हळदी समारंभात कुटून हळद करुन वापरावी.
सहा महिन्यांच्या आत लांबलेला विवाह जमतो किंवा होतो असा अनुभव आहे.

१६ सप्टेंबर ते १५ अक्टॊंबर कन्यारवी महिन्याचे राशीनिहाय भविष्य

१६ सप्टेंबर ते १५ अक्टॊंबर या काळात रवि अर्थात सुर्य कन्या राशीत असतो. कन्या ही चिकित्सक राशी आहे. या राशीचे लोक अतिशय चिकित्सक असतात. खास करुन या महिन्यात जन्माला आलेले  कन्या राशीचे ( चंद्र कन्या राशीत असलेले ) अजुनच चिकीत्सक असतात. स्वच्छता या राशीचा गुण पण कधी कधी ते स्वत: यामुळे हैराण होतात. हात धुवायला साबण असेल तर डिस्पेन्सर का नाही. हात धुतल्यावर ज्याला हात पुसले तो नॅपकीन स्वच्छ होता का या शंका आणि त्यामुळे येणारी मानसीक व्यग्रता त्यांना त्रास देते.

आता राशीवार भविष्याकडे जाऊ

मेष रास:  ह्या महिन्यात रवि आपल्या सहाव्या म्हणजे नोकरी  व्यवसायाच्या ठिकाणी जाणार आहे. जिथे गुरु आधीच आहे. महिनाभर आपल्याला काही विषीष्ठ अधिकार प्राप्त होतील. डेप्युटेशन विथ पॉवर असा भाग आहे. काळजी पुर्वक निर्णय घ्या. १८ तारखेनंतरचे निर्णय चांगले असतील कारण मंगळ धनु राशी जाईल आणि त्याचे शनिबरोबर असलेले गोष्टी बिघडवायचे कॉन्ट्रॅक्ट संपेल. १३ अक्टोबर पर्यंत शुक्र सप्तमात आहेच. नविन करार त्या आधी करा.   प्रेमी असाल तर आपली प्रिय व्यक्तीच्या सहवासात हा काळ जास्त जाईल. २२ तारखेपर्यंत शब्द देऊ नका. शब्द जपुन वापरा.

वृषभ रास:  १८ तारखेपासुन मंगळ अष्ट्मात गेला आहे. आगीतुन फ़ुफ़ाट्यात असे नको व्हायला असेल तर उष्ण्तेच्या विकारापासुन संभाळा. नोकरीच्या फ़्रंटवर महिनाभर वातावरण बरे राहील.  वृषभ राशीचे लोक कष्टाळु आणि सेटींग करण्यात पटाईत असतात त्यामुळे  नोकरीत काय कुठेच फ़ारसे तणाव निर्माण होऊ देत नाहीत. घरच्या फ़्रंट्वर वातावरण तापलेले असेल तर निवळेल.

मिथुन रास:  मागिल दोन तीन महिने तुमचे विरोधक तुम्ही आडवे पाडले असतील. अर्थातच तुमच्या सवयी प्रमाणे बोलबच्चन करुनच. शारिरीक स्तरावरची लढाई तुम्हाला मानवत नाही.  पंचमातल्या तुळेच्या शुक्राकडे पहाल की नाही ? प्रेमाचे वचन द्यायचे असेल असे ठरवले असेल तर द्या की. १३ अक्टोबर पर्यंत काळ चांगला आहे. अगदी प्रपोज करायचे असले तरी करुन टाका.  विवाहीत असाल तर मात्र जरा जपुन. ३ नोव्हेंबरपर्यंत वातावरण स्फ़ोटक राहील. दिवाळी येत आहे. जोडीदाराच्या दिवाळी भेटीचे बजेट दुप्पट करा आणि काही काळ तरी भांडण टाळा.

कर्क रास: काय मजा आहे ना ? तुळेचा शुक्र तुमच्या चतुर्थात आहे. राजभोग घेताय ना ? लेखक असाल तर महिनाभरात लिहुन हातावेगळे कराच.  नोकरीत असाल तर १८ तारखेपासुन गंमत पहा. तुम्हाला रडविणारे आता रडतील. ३ नोव्हेंबर पर्यंत आपल्याला हव्या त्या गोष्टी घडवा. २२ तारखेपर्यंत बोलला नसाल तर पुढेही बोलण्याची वेळ येणार नाही.

सिंह रास : रवि तुमच्या राशीतुन बाहेर पडुन कन्येत गेलाय जिथे गुरु विद्यमान आहे. या महिन्यात आपल्या कुटुंबाची संख्या किमान १ ने वाढेल. किमान अशी शुभ वार्ता तरी येईलच. शनि- मंगळाने सौख्य हानी झाली होती. गेले २-३ महिने जो त्रास भोगला तो आता १८ तारखेपासुन कमी होईल. १३ अक्टोबर नंतर शुक्र चतुर्थात आल्यावर  दिवाळी नक्कीच आनंदमय होईल.

कन्या रास :  तुम्ही चिकीत्सक आहात तरी पण २२ तारखेपर्यंत केलेले व्यवहार पुन्हा तपासुन पहा. काही गफ़लत तर नाही ना झाली. शुक्राने आवक वाढवली असेल आणि तुम्ही गुंतवणुक करुन बसला असाल म्हणुन जरा लक्ष द्या. बंधु-भगीनी काय म्हणतात. जे काय गैरसमज झाले असतील ते दिवाळीत मिटवा. १८ तारखेपासुन चतुर्थात मंगळ येतो आहे. तो अष्टमेश आहे. थोडी तरी सौख्य हानी होणार आहे. डॊक्याला तेल लाऊन मगच झोपा.

तुळ रास : घरातल्या कुरबुरी १८ तारखेपासुन कमी होतील. रवि व्ययात आहे. उगाच पोलीसांना / सरकारी नोकरांना कायदा शिकवायला जाऊ नका. तो शर्मा बेकायदेशीर बांधकाम करुन परत पंतप्रधानांना शिकवायला गेला  तसे व्हायचे. खर्चावर नियंत्रण वर्षभर हवे आहे. या महिन्यात तर खासच. कुणाला २२ तारखेपर्यंत हात उसने दिलेले असेल तर मुदत टळायच्या आधीच तगादा लावा. मीच उशीरा भविष्य लिहायला लागलो नाहीतर मागच्याच महिन्यात देऊ नका म्हणुनच सांगीतले असते.

वृश्चिक रास : वर्षभर पैसे मोजायचे आहेत. या महिन्यात जरा जास्तच मोजा. सरकारी काम करणारे कंत्राटदार या महिन्यात वसुल करा. शासनाकडुन काही पैसे येणे असेल तर सेटींग लावाच. तब्येत काय म्हणते ? आता काही दुखण असेल तर आराम पडेल. घरच्या वातावरणात ताण येईल असे घडु देऊ नका. घरच्या मंडळीकडुन दुखावला गेलात तरी गप्प रहा. शेवटी आपली माणसे आहेत. साडेसाती आहे. इलाज नाही.

धनु रास : या महिन्यात नुसती पळापळ आहे. मी ही ज्योतीष कार्यालय उघडलय आणि दुपारचे लवंडायचे सोडुन नविन ब्लॉग लिहायला घेतलाय. गुरु मागच्या महिन्यात दशम स्थानात गेलाय पण रवि दशामात गेल्यावर खरी पळापळ सुरु झाली आहे. महिनाभर उसंत मिळणार नाही. चांगले प्लॅनींग करा. कामे आपोआप हातावेगळी होतील. पुढच्या महिन्यात दिवाळीसाठी पैसे हवे असतील तर महिनाभर कामच करा.

मकर रास :  गुरु भाग्यात आहेच. त्यात आत्माच्या कारक रवी येतो आहे. गुरु दर्शन देणार. प्रचिती येणार हे निश्चीत. अर्थातच साधना काय केली आहे तसेच फ़ळ मिळणार आहे. दशामातला शुक्र तुम्हाला हा महिना तरी नोकरीत सुखासुखी दान देणार आहे. काही नाही तर पळापळ नक्कीच असणार नाही. १८ तारखेला मंगळ महाराज व्ययात गेले आहेत. दिवाळी आहेच दिवाळ निघणार नाही याची काळजी घ्या. खर्चाचे प्लॅनिंग  कराच.

कुंभ रास :  नोकरीच्या ठिकाणचे स्फ़ोटक  वातावरण संपुन जरा बरा काळ येईल. गुरु नाही आणि रवीही अनुकुल नाहीच. हा महिना जरा अ‍ॅडजेस्ट करुन  घ्या. पुढच्या महिन्यात जरा अजुन वातावरण बदलेल. कष्टच जास्त आहेत. निष्कारण डोक्याला तापच करु नका. रात्री डोक्याला तेल लावा आणि निवांत झोपा.

मीन रास : स्थळ पहाताय ? जमेल हो नक्की जमेल. हा महिना काय घेऊन काय घेऊन येतो ते पहा. १८ तारखेपासुन सर्वच फ़्रंटवर लढाई आहे पण काळजी नसावी. दुख: भरे दिन बीते रे भय्या अब सुख आयो रे .. पळापळीत या उक्तीचा अनुभव येईल. नोकरीत /व्यवसायात गाडी डी -रेल होता होता राहीली ना ? आता काही बाकी नाही राहिल.  दिवाळी पळत पळत का होईना सुख देऊन जाणार आहे.

                                                  । शुभं भवतु ।