Monday, October 28, 2019

आपल्या मुलांच्या विवाहाला उशीर होत आहे का ? उपाय रुक्मिणी स्वयंवर


हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो आणि मुलांचा विवाह लांबलेला आहे म्हणून काळजीत असलेले पालक हो तसेच उपवर विवाह इच्छुक मुलांनो.

मी युट्युबर वर विवाह विषयावर १२ व्हिडिओ तयार केलेल्या आहेत. ज्यांनी आजपर्यंत पाहीलेल्या नसतील तर जरुर पहा. या सर्व व्हिडिओ पहाण्यासाठी ही प्ले लिस्ट पहा.

मुलांचा विवाह वेळेवर व्हावा म्हणून मी सहा उपाय सांगीतले आहेत. यातील चार मुख्य उपाय आहेत तर दोन उपाय हे मुख्य उपायाला पुरक ( सपोर्टींग ) उपाय आहेत. हे मुख्य उपाय खालील प्रमाणे.

१) रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे संपुटयुक्त १८ पारायणे - याची व्हिडीओ पहा https://www.youtube.com/watch?v=0VTG22kFw_0&t=80s
२) ब्रह्मणस्पती सुक्त हवन याची - व्हिडीओ पहा https://www.youtube.com/watch?v=TKmeL3ybpKE
३) श्रीगजानन विजय ग्रंथाचे संपुटयुक्त ३ पारायणे - याची व्हिडीओ पहा
४) कात्यायनी पुजन येणार्या ३ अक्टोंबर २०१९ ला करा - याची व्हिडीओ पहा
५) हळकुंडे प्रयोग ( पुरक उपाय )- याची व्हिडीओ पहा
६) ओपल उपरत्न वापरणे ( पुरक उपाय ) - याची व्हिडीओ पहा

नुकतीच १७ सप्टेंबर २०१९ ला अंगारिका चतुर्थी होऊन गेली. आता नजदिकच्या काळात अंगारिका चतुर्थी नाही. येणार्या २०२० मधे अंगारिका चतुर्थी नसल्यामुळे साल २०२० मधे एका दिवसात होणारा  ब्रह्मणस्पती सुत्र हवन हा प्रयोग करता येणार नाही. ज्यांचा विवाह लांबला आहे अश्या उपवर विवाहइच्छुक मुलांना येणार्या वर्षात रुक्मिणी स्वयंवर पारायण , श्रीगजानन विजय पारायण किंवा कात्यायनी पुजा या वर्षातून फ़क्त दोनदा करता येणार्या उपायावर अवलंबुन रहावे लागणार आहे.

रुक्मिणी स्वयंवर हा उपाय मी दोन व्हिडीओ च्या माध्यमातून सांगूनही मला पुन्हा पुन्हा या विषयावर प्रश्न विचारले जातात. या साठी ही पोस्ट मी तयार करतो आहे.

रुक्मिणी स्वयंवर हा उपाय पारंपारिक आहे. विवाह होण्यासाठी अडचणी येत असतील तर उपाय म्हणून महाराष्ट्रात परिचीत आहे. रुक्मिणी स्वयंवर वाचन हे तप आहे. हे तप केल्याने आपल्या जन्मकुंडली मधील दोष नाहीसे होऊन विवाह जमणे शक्य होईल.  रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी साधारण ४५० वर्षांपुर्वी लिहलेला आहे. हा मुळ ग्रंथ अत्यंत रसाळ आहे.

रुक्मिणी स्वयंवर हे पुस्तक मागवण्यासाठी ही लिंक वापरा. https://www.amazon.in/gp/product/B07B8VYC7X/ref=as_li_tl?ie=UTF8&camp=3638&creative=24630&creativeASIN=B07B8VYC7X&linkCode=as2&tag=nitinjoglekar-21&linkId=681900d29554b257ddcec60921f6da78

शास्त्र असे सांगते ( उतरार्थ ) या वेदवाणी प्रकाशनाच्या पुस्तकामधे हा उपाय म्हणजे १८ पारायणे सुरु करण्यापुर्वी करायचा  संकल्प आहे. संकल्पाशिवाय कोणतीही पुजा किंवा तप फ़लदायी होत नाही. यासाठी सर्वप्रथम आपण संकल्प करणे आवश्यक आहे.

हे पुस्तक विकत हवे असेल तर त्याची ऑन लाईन मागवण्यासाठीची माहिती इथे आहे.

Shastra Ase Sangte ( Utaradha ) -   https://amzn.to/2NQixzf

याप्रमाणे संकल्प करण्यासाठी वेदवाणी प्रकाशनचे हे पुस्तक विकत घ्या. यातील संकल्प वाचून ते संस्कृत आत्मसात करा किंवा आपल्या परीचयाच्या संस्कृत वाचू शकणार्या व्यक्तीकडून संकल्पाचे उच्चारण कसे करायचे समजून घ्या. यामधे ज्या दिवशी हा संकल्प करणार त्या दिवसाचे नक्षत्र कालनिर्णय पाहून योग्य ठिकाणी म्हणा.

थोडक्यात संकल्पाला खुप महत्व आहे. संकल्पामधे हातात पाणी घेऊन हे संकल्पाचे ते वाक्य संपल्यावर हातातील पाणी सोडणे  हे तंत्र आहे. यामुळे हा संकल्प आपण विसरत नाही. संकल्पाप्रमाणे सगळी पारायणे पुर्ण झाल्यावर त्याचे कालांतराने फ़ळ मिळते. शास्त्र असे सांगते या पुस्तकात पान १०० वर दिल्याप्रमाणे हे करा. यासाठी कोणताही पर्याय नाही.

अनेक पालकांनी आमची मुलगी किंवा मुलगा मराठी मिडीयम मधे शिकलेला नाही. त्यांना ही मराठी पोथी मधील शब्द उच्चारता येत नाहीत. मराठी नीट वाचता न आल्यामुळे वेगाने वाचता येत नाही यासारखे सारखे प्रश्न पालकांनी विचारल्यामुळे मी एक पर्याय घेऊन आलो आहे.

संकल्पाचे वाचन झाल्यावर पुजा झाल्यावर , पोथीचे पुजन झाल्यावर पहिल्या दिवशी करायचे वाचनाची म्हणजे सातवा अध्याय, पहिला अध्याय, दुसरा अध्याय आणि सातवा  जर युट्युब वर ऐकायला मिळाला तर पोथी वाचन सोपे होईल. कानाने ऐकायचे, डोळ्यांनी वाचन करायचे आणि त्याप्रमाणे उच्चार करायचे. असे केले तर वाचन सोपे होईल असे वाटते.

१ ते १८ अध्यायांच्या १८ व्हिडीओ करण्यासाठी मी धार्मिक प्रकाशनाची पोथीचा उपयोग केला आहे. आपणही याच प्रकाशनाची पोथी घ्यावी. उद्देश असा की विवीध प्रकाशनाच्या पोठीमधे काही पाठभेद म्हणजे वेगळे शब्द जर आलेले असतील तर यामुळे जे ऐकतो आहे ते आणि जे वाचतो आहे त्यात फ़रक असू नये.

हा उपाय करणार्या उपवर मुलांनी हे लक्षात ठेवावे की टी.व्ही पहाताना, प्रवासात, कानाला युट्युब इयर फ़ोन लाऊन ही पारायणे करणे याने अपेक्षीत फ़ळ मिळणार नाही. अंघोळ करुन शुचीर्भूत होऊन , पोथी समोर ठेऊन कानाला फ़क्त वाचन सोपे व्हावे म्हणून हेडफ़ोन लाऊन हे वाचन करायचे आहे. शास्त्र असे सांगते मधले वाचनाचे कोणतेही नियम शिथील केलेले नसून फ़क्त पोथीतील आज प्रचलीत नसलेले शब्द उच्चार सोपे व्हावे हा उद्देश आहे. थोडक्यात कानाने रुक्मिणी स्वयंवर हेडफ़ोन लाऊन ऐकणे, त्याच वेळी डोळ्यांनी वाचणे आणि तोंडाने बोलणे किंवा ते शब्द उच्चार करणे यामुळे जी एकाग्रता होईल अशी एकाग्रता ह्या तपाचे फ़ळ मिळवण्यासाठी उपयोगी आहे.

आपल्या सोयी साठी पहील्या दिवसाचे रुक्मिणी स्वयंवर वाचन ७-१-२-७ याची प्लेलीस्ट इथे आहे त्याची लिंक खाली डिस्क्रीप्शन मधे येईल या प्रमाणे नऊ प्ले लीस्ट तयार करण्यात येतील ज्यामुळे हे १८ अध्यायांच्या व्हिडीओ पैकी ७-१-२-७ हे व्हिडीओ आपल्याला शोधत बसण्याची आवश्यकता नाही. या प्रमाणे जर आपण वाचन केले तर वाचन करणे सोपे होईल.

आपण फ़क्त या एका व्हिडीओची लिंक आपल्या मोबाईलवर ठेवायची किंवा ९ लिंक कॉपी करुन आपल्या कडे ठेवल्या तर त्या दिवसाचे वाचन शोधणे सोपे होईल.

आपल्या सोयी साठी मी प्रत्येक दिवसाच्या  वाचनासाठी किती वेळ लागतो हे या व्हिडीओ मधे लिहून देत आहे.



पहिल्या दिवसाचे वाचन अध्याय ७-१-२-७ https://www.youtube.com/watch?v=wNuEH-233tc&list=PLp4n_ZhOiRoWe-sbjVjKIvu7i6m-JZGBK

दुसर्या दिवसाचे वाचन अध्याय ७-३-४-७  https://www.youtube.com/watch?v=wNuEH-233tc&list=PLp4n_ZhOiRoUoXHogfM_ylrkDdh0foZPU

तिसर्या दिवसाचे वाचन अध्याय ७-५-६-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoVj8iQAmdaxq9tN8G7O-XeK

चवथ्या दिवसाचे वाचन अध्याय ७-७-८-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoXBXnkt0BAleOF1zjq6abIK

पाचव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-९-१०-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoXO50XmY_XEhfMmuaIt7-aU

सहाव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-११-१२-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoUB2l9gNRe_3FtYJFjN-R5a

सातव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-१३-१४-७  https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoUASojevD37Foa_8XHIWQYH

आठव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-१५-१६-७   https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoXbDNsvpov9epEjp1GA_xDr

नवव्या दिवसाचे वाचन अध्याय ७-१७-१८-७   https://www.youtube.com/playlist?list=PLp4n_ZhOiRoV5IumW4wwx8WI7utRmfJO6


इतका वेळ आपण आपल्या दिवसभरात काढून दिवसभराचे वेळापत्रक आखू शकाल. थोडक्यात मराठी वाचायला वेळ लागतो यासाठी हे वाचन न लांबता इतक्या वेळात पुर्ण होते हे समजले की आपण नोकरी करत असाल तर वेळापत्रक बिघडण्याचे कारण रहाणार नाही.

यापुढे जाऊन हे वाचन करताना आपल्याला काय अडचणी येत आहेत ते कळवा म्हणजे त्या अडचणींवर कशी मात करायची हे समजेल. व त्यावर पर्याय शोधून काढता येईल.

आपल्याला हा संकल्प यशी रित्या पुर्ण होण्यासाठी शुभेच्छा आणि विवाह व्हावा यासाठी सुध्दा शुभेच्छा आणि शुभाअशिर्वाद

Saturday, October 19, 2019

Tuesday, October 8, 2019

१७ अक्टोंबर ते १५ नोव्हेंबर २०१९ काळासाठी रवी तुळ राशीत असताना महिन्याचे राशीभविष्य


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि कन्या राशीमधून तुळ राशीत १७ अक्टोंबर २०१९ ला जाणार आहे.
बुध  तुळ राशीमधून वृश्चिक  राशीत २३ अक्टोंबर जाणार आहे.
शुक्र तुळ मधून वृश्चिक  राशीत २८ अक्टॊंबरला जाणार आहे.
गुरु हा वर्षात एकदा रास बदलणारा ग्रह वृश्चिक राशीतून धनु राशीत ४ नोव्हेंबर २०१९ ला जाणार आहे. ( या बद्दल प्रत्येक राशीवर होणारे परिणाम आपण दिवाळी अंकात पाहू. )
बुध वृश्चिक राशीमधून वक्री गतीने तुळेत ७ नोव्हेंबर २०१९ ला जाणार आहे.
मंगळ कन्या राशीतून तुळ राशीत १० नोव्हेंबर ला जाणार आहे.

या महिन्यात २७ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०१९ काळात दिवाळीचे मुख्य दिवस आहेत. त्यातही बलीप्रतिपदा म्हणजे २८ नोव्हेंबर २०१९ ला विक्रमसंवत ही कालगणना अर्थात व्यापारी वर्ष २०७६ सुरु होत आहे.  हे वर्ष कसे जाईल हे आपण दिवाळी अंकात पाहू.

आता पाहू १७ अक्टोंबर २०१९ ते १५ नोव्हेंबर २०१९ या महिन्याचे राशीभविष्य. हे राशीभविष्य लग्नराशीकडून पहावे. जर लग्नराशीकडून पहाणे शक्य नसेच तर चंद्र राशीकडून अनुभवता येईल.



मेष रास : आपल्या राशीला मी एक आनंदाची बातमी सांगत आहे. दिवाळी संपली की लगेचच गुरु धनु राशीत जाणार आहे. इतके दिवस आठवा असलेला गुरु आपल्यावर बंधने टाकून होता ती आता संपतील. गुरु बदलाचे आपल्या राशीला होणारे परीणाम नक्षत्रप्रकाश दिवाळी अंकात पाहूच पण आत्ता गुरु सोडून इतर ग्रहांचे परीणाम इथे पाहू.

आपल्या राशीचा मालक मंगळ सहाव्या स्थानी आहे. तो दहा नोव्हेंबर म्हणजे अगदी शेवटी तुळ राशीत जाईल. हा महिना तो कन्या राशीत आहे. अजूनही काही शत्रू शिल्लक असतील तर फ़टाक्यांच्या आवाज करा म्हणजे नुसती हूल दिली तरी पुरे आहे. या महिन्यात मंगळ ३१ अक्टोंबर २०१९ ला चित्रा नक्षत्रात गेल्याने विपत्ती अर्थात संकटे संपुन जातील. चित्रा हे मंगळाचे स्वत: चे नक्षत्र आहे. मुलांच्या चिंता असतील तर या महिन्यात संपतील. दिवाळीत गोड पदार्थ असतात पण डायबेटीस असेल तर जपून खा आणि आपल्या जोडीदाराला सुध्दा आरोग्याची काळजी घेत दिवाळी करायला सांगा.  असे वागलात तर दिवाळी आनंदातच जाईल यात शंका नाही.




वृषभ रास : तुमच्या राशीचा मालक २८ अक्टोंबरला सातव्या स्थानात जात आहे. इतके दिवस शुक्र सहाव्या स्थानात म्हणजे बंदीवासात होता तो आता सातव्या स्थानात म्हणजे एक तर रोमेंटीक स्थानी जाणार आहे. शिवाय वृश्चिक ही राशी सर्व काही गुप्त ठेवणार आहे. यामुळे जे काय घडेल ते फ़क्त तुम्हालाच माहीत असेल. याची जाहीर चर्चा होणार नाही. पंचमेश बुध २३ तारखेला सातव्या स्थानी येऊन बसलेला आहे त्यामुळे तुम्हा दोघांच्या रोमान्स ला बहार येईल. व्यापार्यांना उत्तम व्यावसायीक संधी येतील. या दिवाळीत सिझनल विक्री असेल तर छप्पर फ़ाड विक्री होणार आहे.

गुरु बदल पुढील वर्षभर तुम्हाला फ़ारसा अनुकूल नाही परंतु तुमच्या सारखे धोरणी कुणीच नाही त्यामुळे या आठव्या गुरुचा त्रास तुम्हाला फ़ारसा नाही. गुरु बदल झाल्यावर काय करायचे हे दिवाळी अंकात सांगणारच आहे पण योगाभ्यास हा जास्त या काळात करणे हीताचे असेल.

दिवाळीला सुरू होणार्या नविन वर्षाला दररोज योगाभ्यासाचा संकल्प केलात तर गुरू अनुकूल होईल आणि दिवाळीच काय वर्ष ही चांगले जाईल.



मिथुन : तुमच्या राशीचा मालक २३ अक्टोंबरला वृश्चिक या शत्रु राशीत जात आहे. काही क्रिएटीव्ह सुचले असेल तर लिहून काढा किमान मुद्दे तरी लिहा. २३ अक्टोंबर नंतरचा काळ जरी लिखाणाला अनुकूल नसला तरी वाणीने घायाळ करण्यासाठी चांगला आहे. २३ तारखेनंतर एखादा शत्रू शोधून मनात नसेल तर वर्मी शाब्दीक घाव घालण्याची उर्मी येणारच आहे.


भावंडे या महिन्यात काही शुभ वार्ता घेऊन येतील. मुलांच्या पेक्षा मुलींच्या चिंता करण्याची वेळ येणार नाही असे पहा. होणारा गुरुबदल आपल्याला काय काय संधी देणार आहे ते दिवाळी अंकात पाहू. सप्तमेश सप्तमात तो ही गुरु बदल झाल्याने अविवाहीत असाल तर या वर्षभरात बार उडवून द्याल असे दिसत आहे.  विवाहानंतर कसे वागायचे याचा विचार करा. मिथुन राशीचा प्रभाव असला म्हणजे बालीशपणा दिसतो. असे आता वागून चालणार नाही. सुन असो की जावई पदोपदी तुमची परीक्षा असते. याचा विचार केलात तर वर्ष सुध्दा आनंदात जाईल.

कर्क रास: या महिन्यात संपुर्ण महिनाभर रवि तुळ या राशीत असणार आहे. वंशपरंपरागत काही मिळणे असल्यास या महिन्यात मिळायला हरकत नाही. अनेक जण आलेल्या धनाचा उपयोग प्रॉपर्टी खरेदीसाठी करण्याचे योग या महिन्यात आहे. कलाकारांची लॉटरी लागण्याचे योग आहेत पण त्याच बरोबर इनकम टॅक्स खात्याकडून नोटीस येणार नाही ना या कडे लक्ष द्यावे.

महिनाभर पराक्रम करण्याची उर्मी रहाणार आहे मग ती बौध्दीक असो की शारिरीक. कर्क लग्नाला हा पराक्रम शारिरीक आणि बौध्दीक पेक्षाही भावनीक जास्त असेल. या महिन्यात कम्युनिकेशन अर्थात मिडीया, लेखन, प्रकाशन, पत्रकारीता या सारख्या व्यवसायातले लोक काही वेगळे करुन चमकदार कामगिरी करतील. या महिन्यात लहान भावंडांची चांगली बातमी समजेल आणि भावंड जर गायन वादन करत असेल तर त्याबाबत एखादी घटना लक्षात राहील.

या महिन्यात अनेक कर्क राशीच्या लोकांना २८ तारखे पर्यंत अनेकदा प्रणय करण्यास संधी लाभेल. प्रेम गीत जोडीदाराला गाऊन दाखवण्यापासून ते सिनेमाला एकत्र जाण्यापर्यंत फ़क्त नाही तर अनेक बाबीत लक्षात राहील असे काही घडेल. इतके काही घडल्यावर दिवाळी आनंदात तर रहाणारच ना ?

सिंह रास : तुमच्या राशीचा मालक महिनाभर तुळ या राशीत रहाणार आहे. खर तर स्थान पराक्रमाचे पण रास मात्र नीच, अश्या परिस्थितीत सिंह महिनाभर असेल. यामुळे सिंहाने डरकाळी फ़ोडली तरी स्वर घशाच्या बाहेर पडणार नाहीत. यासाठी आजारपण असेल तर वेळीच उपचार करा. पुढारी मंडळींना काळ अनुकूल नाही म्हणून नमते घेण्याशिवाय पर्याय नाही.

प्रवचन कार, व्याख्याते मंडळींना हा महिना जोरदार असेल. नाटककार, संगीतकार आणि गायक सुध्दा दिवाळी पहाट पासून अनेक रियालीटी शो मधे अनेकांना दिसतील. आपला आवाज आणि गायकी यांना मोठे प्रोत्साहन या महिन्यात मिळेल.

या महिन्यात अनेकांना रोख रक्कम कुठे गुंतवावी यावर विचार करायला लागणार आहे. दिवाळी व लक्ष्मीपुजन मोठ्या आनंदात आणि समाधानात करण्याचे योग आहेत कारण या महिन्यात तरी आपल्याला फ़ारशी चणचण जाणवणार नाही.

कन्या रास : आपल्या मालक बुध तेवीस अक्टोंबर पर्यंत धनस्थानी नंतर पराक्रम स्थानी जाऊन १ नोव्हेंबरला वक्री होऊन ७ नोव्हेम्बरला पुन्हा धनात म्हणजे दुसर्या स्थानी जात आहे. एखादा ग्रह वक्री  झाला म्हणजे ५० % फ़ळ देतो म्हणून महत्वाची कामे १ नोव्हेंबर पर्यंत संपुर्ण करा.

या महिन्यात आपल्याला व्यापारात, बौध्दीक खेळात म्हणजे कोडी सोडवणे इत्यादी आणि लेखन कार्यात धन मिळण्याचे जोरदार योग १ नोव्हेंबर पर्यंतच आहेत. आपले पैसे वसूल करणे जर सोपे नसेल तर १ तारखेच्या आधी किमान पोस्ट डेटेड चेक मिळतो का ते पहा. २३ तारखेपर्यंत जमा झालेली पुंजीची नीट  गुंतवणूक करा.

या महिन्यात दिवाळीच्या फ़राळासोबत चटकदार भेळ्पुरी इ. जिभेला पाणी आणणार्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी २३ तारखे पर्यंत आहे. या तारखेपर्यंत घरात स्त्री पाहूणे येण्याची शक्यता सुध्दा आहे. मावस बहीणी, मामे बहीणी, सख्खी बहीण त्याची मुले याने घर भरुन जाईल.

दिवाळीच्या पुर्व असे घरगुती संमेलन मोठ्या आनंदाचे असेल यात शंका नाही.

तुळ रास : तुमच्या राशीचा मालक शुक्र २३ अक्टोंबर पर्यंत तुळ राशीतच असणार आहे. गेले काही दिवस तो तुम्हाला यश देत आहे त्याबरोबर तुमचे व्यक्तीमत्व, तुमच्या कला यांना मोठे प्रोत्साहन देत आहे. हे सगळे जर पैशात कॅश झाले नाही तर काय उपयोग ? ही संधी २३ तारखेनंतर जेंव्हा शुक्र धनस्थानी जाईल तेंव्हा येईल. आपण साधना करुन मिळवलेल्या कलागुणांचे कौतूक आणि सोबत मानधनही मिळेल.

सध्या आपण निवडणूक लढवत असाल तर यश मिळण्याची संधी आहे. येण केण प्रकारेण आपल्याला निवडणुकीतच नाही तर महिनाभर यश मिळण्याचे योग आहेत. अनेक दिवस भिजत पडलेली प्रकरणे या महिन्यात सहजपणे मार्गी लावाल. प्रयत्न करावेच लागतील पण यश मिळेल.

आजवर बुडीत खात्यावर लिहलेले पैसे या महिन्यात २३ तारखेनंतर १ नोव्हेंबर पर्यंत वसूल करु शकाल. दिवाळी असली तरी अनेक व्यावसायीकांना दुर देशात व्यवसायानिमीत्ताने फ़िरावे लागणार आहे. आजकाल संवाद सोपा झाल्यामुळे व्हिडीओ कॉन्फ़रन्सींग करुन दिवाळीला घरातच आहोत असे समाधान सहज मिळवू शकाल. सणासुदीला घरच्यांशी संवाद आनंद मिळणे महत्वाचे आहे.

वृश्चिक रास : नोकरीच्या निमीत्ताने किंवा व्यवसायाच्या निमीत्ताने आपल्यालाही परदेशगमन किंवा दुर प्रवासाला जावे लागणार आहे. ज्यांना हे नेहमी करावे लागत नाही त्यांना ही दिवाळी घरापासून लांब रहाण्याने आनंद हिराऊन घेतल्यासारखे वाटेल परंतु पुर्वी पोस्ट कार्ड ने साधला जाणारा घरच्या लोकांशी संवाद तंत्रज्ञान विकसीत झाल्यामुळे आता जास्त आनंद देणारा झालाय हे काय थोडे आहे ?

या महिन्यात अनेक ग्रह व्ययस्थानात बसल्यामुळे जर खर्च, प्रवास, श्रम आणि चिंता यामुळे व्यापला असाल तर दिवाळीच्या आधी अनेकांना दिलासा मिळेल. बुध २३ ताराखेला बदलून लग्नी येत असल्याने  खर्च नियंत्रणात येईल. २८ तारखेला शुक्र लग्नी आल्यामुळे चिंता किंवा ताण असल्यास संपेल.

हे सगळे जरी असले तरी काही प्रमाणात अपेक्षीत घडत असल्यामुळे त्याचा आनंद कुणाला नाही समजला तरी तुम्हाला समजणार आहे यामुळे दिवाळीच्या पार्श्वभुमीवर चेहेर्यावर तुम्ही स्थितप्रज्ञ दाखवत असाल तरी मनात खुष असाल.

धनु रास :  झुम झुम के नाचो आज गाओ आज आए खुशी के गीत हो असे शब्द असलेले बहुदा मुकेश साहेबांचे गाणे ब्लॅक अ‍ॅड व्हाईट असले तरी पहावेसे वाटेल. https://youtu.be/k7aWtLcTaT4 वर्षभर गुरु महाराज व्यय स्थानी होते. नेकी करो दर्या में डालो असा हा अनुभव होता. फ़ायदा जाऊ दे पण चांगले केले असही कोणी म्हणत नाही असा काळ होता. या महिन्यात गुरु महाराज तुमच्या राशीत येतील आणि आत्मसन्माना पुढे जाऊन आपल्याला समाजात स्थान देतील यात शंका नाही.

गुरु महाराज बदलले म्हणजे लगेचच आपल्याला यश देणार असे होणार नाही परंतु नोव्हेंबर महिना अखेरीस याची चांगली फ़ळे मिळू लागतील. गुरु बदलाचे राशीवार भविष्य आपण दिवाळी अंकातच पहाणार आहोत.

खेळाडूंना ४ नोव्हेंबर नंतर होणार्या स्पर्धेत जोरदार यश मिळून चमकण्याची संधी मिळणार आहे. अनेक व्यावसायीकांना नफ़ा मिळवण्याच्या अनेक संधी या महिनाभरात चालून येतील आणि दिवाळी जोरदार आणि चमकदार होणार आहे.

मकर रास : आपल्याला अजूनही वाटच पाहायची आहे पण जानेवारीत शनि मकर राशीत येणार आहे. आपल्याकडे उतावीळ पण नाही धैर्य आहे म्हणून होणार्या कष्टाचे किंवा नुकसानीचे फ़ारसे दु:ख आपण चेहेर्यावर दाखवत नसाल कारण पुढे चांगले दिवस आहेत याचा आत्मविश्वास आपल्याला नवा उत्साह देतो.

काहींना या महिन्यात बॉसच्या अचानक बदलीमुळे तात्पुरती अधिकाराची जागा मिळणार आहे. आपल्या वरिष्ठांना आपल्यावर ही औट घटकेची जबाबदारी देण्याचा विश्वास आहे यात सारे काही आले. जरा हळूच ही जबाबदारी कायमची मिळते का याबाबत चाचपणी करा. लगेचच प्रमोशन नको म्हणाव पण जबाबदारी ची सवय झाल्यावर द्या म्हणाव. तो पर्यंत माझ्या डोक्यावर कुणाला बसवू नका हे मात्र ठासून सांगाच.

व्यावसायीक असाल तरी जबाबदार्या वाढणार आहेत. याची चांगली फ़ळे लवकरच मिळतील यावर विश्वास ठेवा. उच्च पदवी मिळवणार्यांना या महिन्यात सेमीस्टर परिक्षा पध्दतीत चांगले यश मिळेल. यामुळे दिवाळी आनंददायी जाणार आहे.

कुंभ रास : आपल्या राशीला २४ जानेवारी २०२० पर्यंत चांगला काळ आहे. कारण शनि आपल्या लाभ स्थानी आहे व याच लाभ स्थानात लाभेश गुरु ही येऊन बसणार आहे. हा गुरु नेमके काय लाभ देणार आहे ते आपल्याला दिवाळी अंकातच वाचावे लागेल.

जेंव्हा काळ चांगला असतो तेंव्हा लाभ सर्व बाजूनी होतो असे अनुभवाला येते. आपल्याही कुंडलीत आपल्या पार्टनरला या महिन्यात काही लाभ होणे अपेक्षीत आहे. व्यापार करणार्यांना अचानक सरकारी घोरणाचा लाभ मिळून फ़ायदा होताना दिसेल.

कुंभ लग्न राशीच्या शिक्षण क्षेत्रात असलेल्या, धार्मिक क्षेत्रात असलेल्या लोकांना धार्मीक किंवा शिक्षण क्षेत्रात असलेल्यांना उच्च  अधिकाराची पदे मिळण्याची संकेत या महिन्यात २८ तारखेच्या नंतर मिळत आहेत. अनेकदा यासाठी लॉबींग करावे लागते याची तयारी ठेवा.

ज्योतिषाची आवड असलेल्या, अभ्यास असलेल्यांना या महिन्यात वर्तवलेले भविष्य तंतोतंत बरोबर येण्याचे योग आहेत.एकंदरीत काय कुंभेची दिवाळी जोरदार असणार यात शंका नाही.

मीन रास : मीन लग्नराशी असलेल्यांना खुप काळ झगडावे लागले होते पण आता येणारा गुरु बदल त्यांच्या आयुष्यात फ़ेरबदल घडवून आणणार आहे. जास्त माहितीसाठी आपल्याला नक्षत्रप्रकाश दिवाळी अंकाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

या महिन्यात फ़क्त आपण आजारी पडणार नाही इतके प्रकृतीचे तंत्र संभाळावे लागणार आहे. हा भाग सोडला तर आपल्या राशीला बुध २३ तारखेनंतर अनुकूल होऊन व्यावसायीक सुवार्ता घेऊन येईल तर शुक्र २८ तारखेच्या नंतर काही खास व्यावसायीक किंवा नोकरदारांना अनेक दिवसांच्या प्रोजेक्ट नंतर फ़लदायी होताना दिसणार आहे. गुढ विद्या शिकणार्यांना काही तंत्र अवगत होईल जे कोणत्याही पुस्तकात नसेल. फ़ौजदारी केसेस चालवणार्या वकील मंडळीना एखादी केस त्यांच्या बाजूने लागण्याचे योग येतील.

या महिन्यात काहींना परदेशगमनाची संधी मिळेल. आधीच परदेशात गेलेले असाल तर जवळ जवळ महिनाभर अजून मुक्काम वाढण्याचे संकेत ग्रह देत आहेत. आता यामुळे दिवाळीला घरी नसाल हे बरोबरच असले तरी दिर्घ काळाच्या चांगल्या संधी मिळणार असतील तर दिवाळीच नाही का ?

शुभंभवतु

Tuesday, October 1, 2019

दिवाळी अंक २०१९ साठी जनमानस चाचणी





मराठी भाषा, दिवाळी आणि दिवाळी अंक याचे अतुट नाते आहे. महाराष्ट्रात दिवाळी अंकाची मोठीच परंपरा आहे. गंभीर वैचारिक विषय, राजकारण, धार्मिक, आरोग्य, भटकंती, ज्योतिष, पाककृती, सौंदर्यप्रसाधने, विनोद आदी विषयांना वाहिलेले दिवाळी अंक आहेत. स्वत:चे वेगळे वैशिष्टय़ राखून असलेले दिवाळी अंकही आहेत.

यात ज्योतिष विषयावर दिवाळी अंक आपली स्वतंत्र परंपरा राखून आहेत. यातून नविन संशोधन, केस स्टडीज, राशीभविष्य तसेच एक वर्षापेक्षा जास्त काळ एका राशीत असलेले ग्रह राशी बदलून पुढील राशीत जातात त्याचे राशीनुसार परिणाम जाणण्यामधे अनेकांना आवडते.



दिवाळी अंक दोन अडचणी ने ग्रासलेला आहे. पहिली अडचण प्रिंट कॉपीची वाढती किंमत. दुसरी प्रिंट कॉपी वाचणारा वर्ग कमी होत जाणे. 

या दोन्ही समस्यांवर नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक परीणाम कारक उपाय सुरवातीपासून शोधून आहे. नक्षत्रप्रकाश चा अंक सुरवातीच्या म्हणजे २०१६ पासून ब्लॉगवर उपलब्ध आहे. काही नाममात्र कॉपी आपण प्रिंट कॉपी प्रकारात छापत असतो. याचा उद्देश अंकाचे प्रकाशन करण्याचा कार्येक्रम हा असतो.

२०१८ साली नाममात्र देणगी मुल्य स्विकारुन प्रिंट कॉपी ५० च्या वर वाचकांना पोचवली गेली.

आजवर उपलब्ध असलेल्या अंकांच्या लिंक येथे उपलब्ध आहेत.

१. नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१६  https://www.gmjyotish.tk/p/blog-page_16.html
२. नक्षत्रप्रकाश वासंतीक अंक २०१७  https://www.gmjyotish.tk/p/blog-page_25.html
३. नक्षत्रप्रकाश वर्षपुर्ती विशेषांक २०१७ https://www.gmjyotish.tk/2018/07/blog-post.html
४. नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१८   https://www.gmjyotish.tk/p/blog-page_27.html

हा फोटो मागील वर्षी प्रसिद्ध झालेल्या अंकाचा आहे.

हा अंक कसा असावा हे जाणून घेण्यासाठी एक सर्वे घेत आहे. ह्या सर्वे मधे फ़क्त पाचच प्रश्न आहेत यामुळे आपण पाचच मिनीटे द्या म्हणजे अंक त्या पध्दतीने परिपुर्ण करण्याचा प्रयत्न राहील.

दिवाळी अंक दिवाळीच्या आधी म्हणजेच २६ अक्टोंबर  २०१९ पुर्वी प्रसिध्द करण्याचा प्रयत्न आहेच.

आपण खालील लिंक क्रोम ब्राऊझर मधे उघडून प्रतिसाद द्या ही विनंती. 


आपण जर जनमानस चाचणी अर्थात इंग्रजीतला ( सर्व्हे ) ला प्रतिसाद दिलात तर येणारा
नक्षत्रप्रकाश अंक संग्रहणीय होईल यात शंका नाही.

आर्थीक स्थिरता यावी या साठी उपाय वैभवलक्ष्मी व्रत


हरी ऒम, नमस्कार ज्योतिषप्रेमी मित्रांनो, आर्थिक प्रश्न व त्यावरील उपाय म्हणून आपण कार्तिकस्वामी पुजन हा हा उपाय या वर्षी १२ नोव्हेंबरला २०१९ ला आहे. या दिवशी कृतिका नक्षत्र नाही म्हणून पुजा करायची असे नाही. कार्तिक महिन्यात पोर्णिमेला कार्तिक स्वामी पुजन करावे अशी परंपरा आहे.

याची सर्व माहिती आपल्याला या व्हिडीओ मधे मिळेल. हा व्हिडीओ मागील वर्षी प्रसिध्द केलेला आहे त्यामुळे यामधील तारीख बदलली आहे याची नोंद घ्यावी.

 तो का करायचा याची कारणमिमांसापण जाणून घेतली. पण हा उपाय तर वर्षातून एकदा करता येतो आणि तो दिवस काही कारणांनी चुकला तर काय ?

मित्रांनॊ मानवी गरजा आणि त्याची पुर्ती कशी करायची यावर सगळ्यात जास्त उपाय आपल्या ऋषी मुनींनी केला आणि देवतांच्या आवाहनाचे विवीध प्रयोग त्यांनी शोधून त्याच्या आराधने द्वारे मानवी जीवन समृध्द करण्याचे मार्ग सांगीतले आहेत.




आज आपण असाच एक उपाय पहाणार आहोत ज्याला वैभवलक्ष्मी व्रत असे म्हणतात. वैभवलक्ष्मी व्रत हे स्त्रीयांनी करायचे व्रत आहे, दर आठवड्याला शुक्रवारी करण्याचे व्रत आहे. ह्या व्रताचे प्रयोजन आहे आहे ती लक्ष्मी स्थिर करणे.

अनेकांना खुप पैसे मिळतात पण पैसे मिळण्याचे मार्ग काही दिवसांनी बंद होतात. पैसे यायला लागले की खर्च ही वाढतात आणि पैसे यायचे बंद झाले की खर्च लगेचच बंद होत नाहीत ते चालूच रहातात. अनेकांना आशा असते की पैसे आज आले नाहीत तर उद्या येतील म्हणून लोक शिल्लक पैसे खर्च करतात. ते संपले की कर्ज काढतात. त्याच्या व्याजाच्या बोजाखाली दबतात.

या लोकांच्या कडे लक्ष्मी स्थिर झाली नाही म्हणून हे त्यांचे दिवस येतात. आयुष्यात तुम्हाला किती धन मिळावे याचे गणित तुमच्या जन्माच्या आधी ठरले आहे. तुमच्या जन्मकुंडलीने त्याचा पडताळा घेता येतो. एखादा माणूस म्हणजे स्त्री किंवा पुरूष जन्माला आल्यावर तो किती धन कमवू शकतो हे समजते. अर्थात ते रुपयांमधे नाही समजले तरी याला चणचण भासेल की भासणार नाही. याचे शिल्लक धन किती असेल याचा अंदाज जन्मकुंड्ली द्वारे घेता येतो.

जर आपल्याला पैसे किती मिळणार हे समजले आहेत आणि त्यात वाढ होणारच नसेल तर या वैभवलक्ष्मी व्रताचा काय फ़ायदा असे अनेकांना वाटेल. आत्ता पर्यंतच्या चर्चेवरुन जर जन्मकुंडलीवरुन पैसे किती मिळणार हे ठरलेले असेल तर या व्रताने खर्च करण्याच्या विचारांवर नियंत्रण येते आणि आहे ती लक्ष्मी स्थिर होते. एकदा पैसे म्हणजे काय हे समजले की अनाठायी व वायफ़ळ खर्च कमी होतात. असे झाले की आर्थिक संकटे येत नाहीत. संपुर्ण आयुष्यात मिळणारे पैसे आपल्याला पुरवून वापरण्याची ट्रीक आपल्याला सापडते.

हे व्रत स्त्रीयांना का करायला सांगीतले आहे ? यामागे मोठ्ठा विचार आहे. पैसे कमवण्यासाठी पुरूष जितके कष्ट घेतो, विचार करतो तितके खर्च करताना करत नाही. ही जबाबदारी कमवती असो किंवा नसो स्त्रीकडे येते. खास करुन विवाहीत स्त्रीकडे येते. तिच्याकडे घर चालवण्याची पुन्हा पैसे येई पर्यंत सर्वांना जेवायला घालण्याची जबाबदारी येते.

जे घर पैशा अभावी त्रस्त असते त्या घरातली स्त्री पैसे खर्च करताना विचार करत नाही. हा विचार आपल्या कुटुंबाला समजाऊन सांगत नाही असे बरेचदा दिसते. व्यसनापायी पैसे उडवणार्या पुरुषाला अडवणारी स्त्री नसेल तर हे घडायला वेळ लागत नाही. यासाठी आधी स्त्रीची खर्चाबाबतची बुध्दी स्थिर व्हावी यासाठी हे व्रत स्त्रीयांना खासकरुन विवाहीत आणि घरासाठी जबाबदार स्त्रीयांना करायला सांगीतले आहे.

मला सांगायला आनंद होतो की माझी पत्नी न चुकता हे व्रत अनेक वर्षे दर शुक्रवारी करते. ती गुरुवारी घर जरा जास्त स्वच्छ करते. तिची भावना आहे की जिथे जळमटे तिथे लक्ष्मी येत नाही. शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मीचा फ़ोटॊ पाटावर लाल वस्त्रावर मांडून त्याच्या समोर तांदूळ ठेऊन त्यावर ती एखादा सोन्याचा जिन्नस ठेवते. फ़ोटो ऐवजी यंत्र सुध्दा पुजेसाठी शुक्रवारी स्थापन केले तर चालेल.
 हे यंत्र अमेझॉन वर उपलब्ध आहे


हा फ़ोटॊ सुध्दा अमेझॉन वर उपलब्ध आहे


एक तेलाचा व एक तुपाचा दिवा लाऊन आणि गडवा भरुन पाणी भरुन ठेवते. मग पुजा सुरु होते. फ़ोटॊला व सोन्याच्या जिन्नसाला ती हळद, कुंक आणि लाल फ़ुल वहाते. हे सुध्दा आमच्या घरचे असते. यासाठी घरात लाल जास्वंद, लाल गुलाब याची झाडे बाल्कनीतल्या कुंडीत लावलेली आहेत.

नैवेद्यासाठी पांढरे पेढे, खीर, बत्तासे किंवा साखरफ़ुटाणे विदर्भात याला चिरंजी म्हणतात याचा नैवेद्य दाखवल्यावर ती विष्णूदासांनी लिहलेली आरती लक्ष्मीची, वैभव सुख संपत्तीची ...... ही आरती म्हणते पाठोपाठ लक्ष्मी अष्टक म्हणते व नमस्कार करुन घरच्यांना प्रसाद देते. जर याच वेळी घरात कुणी सवाष्ण स्त्री आली तर तीला लक्ष्मीचे स्वरुप मानून हळद कुंकू लावते. तीलाही प्रसाद देते. नमस्कार करते.

माझा अनुभव असा की ३१ वर्षांच्या आमच्या दोघांच्या संसारात आम्हाला आर्थिक संकटे आली नाहीत. याचे कारण या लक्ष्मी व्रताने आम्हाला वायफ़ळ खर्च करण्याची बुध्दी होत नाही. माझी पत्नी शुक्रवारी उपास करत नाही. ज्यांना हे व्रत नव्याने सुरु करायचे आहे त्यांनी सुरवातीला शक्य असेल तर ठरवून ११ किंवा २१ शुक्रवार उपास करावेत. याचा उद्देश इतकाच की उपाशी राहीले की शुक्रवारी संध्याकाळी पुजा करणे विसरत नाही. एकदा ह्या व्रताची महती समजली की उपास करण्याची आवश्यकता नाही. घरात पाहूणे येऊ देत किंवा अन्य काही पुजा विसरायची नाही. मासीक धर्माच्या वेळी हे व्रत मुलीला, पतीला किंवा अन्य ज्याचा विश्वास आहे त्या व्यक्तीला करायला त्या शुक्रवार पुरते सांगायचे.

शुक्रवार संघ्याकाळ चुकू नये म्हणून ती त्या दिवशी संध्याकाळी घरातच असते. शक्यतो बाजारात जाणे, खरेदीला जाणे ही कामे शुक्रवारी करत नाही. ह्या व्रताचे उद्यापन नाही. जोवर हात पाय चालत आहेत तोवर हे व्रत करायचे. आजारपणात, बाळंतपणात खंड पडला तर पुहा सुरु करायचे.

जन्मकुंडलीपेक्षा जास्त प्रभावी काय आहे तर गुणसुत्रे, इच्छाशक्ती आणि संस्कार. वायफ़ळ खर्च टाळणे ही इच्छाशक्ती सुध्दा आहे आणि संस्कार सुध्दा आहे. दरवेळा खर्च टाळणे म्हणजे मन मारणे असे नाही. आवश्यक तो खर्च करायला पाहीजे. पण अनावश्यक टाळायला पाहीजे.
इतके केले तरी लक्ष्मी प्रसन्न होते. स्थिर होते आणि खरच गरज असते तेंव्हा पैसे हाताशी रहातात.

ज्यांना वैभवलक्ष्मी व्रत सुरु करायचे आहे त्यांनी वैभवलक्ष्मी व्रताचे पुस्तक आणून या व्रताला आरंभ करावा आणि या व्रताच्या महतीचा लाभ घ्यावा.

अशी एक नाही हजारो पारंपारीक उपाय भारतात अनेक पिढ्या प्रचलित आहेत. अनेकांनी याचा लाभ घेतलाय. यातील निवडक व्रतांची, उपायांची माहिती मी आपल्या गायत्रीमाता ज्योतिषकेंद्र संचालीत ब्लॉगवर देणार आहे.