Sunday, March 29, 2020

एप्रिल मे २०२० मधे कोरोना पेशंट वाढतील हे खोटे संशोधन आणि शनि मंगळ तसेच चंद्र राहू युती

काल एक बातमी आली की जॉन हाफकिन्स इंस्टिट्युट ने केलेल्या संशोधनात भारतात एप्रिल व मे २०२० मधे कोरोनाचा फैलाव वाढेल. २५ लाख लोक कोरोनाग्रस्त होतील आणि ऑगस्ट २०२० ला कोरोना संपेल. ही ता बातमी पहावी पण घाबरून जाऊ नये.


मी केलेल्या भाकिताच्या किंवा भारतात अनेकांनी केलेल्या कोरोना विषयावर भाकिताच्या एकदम विरूध्द असल्यामुळे मी या बातमीचा सोर्स शोधू लागलो.

मी नक्षत्रप्रकाश या फ़ेसबुक समुहावर ९ एप्रिल २०२० पासून कोरोना रोगी कमी कमी होत जातील आणि २४ एप्रिल २०२० नंतर कोरोना प्रसाराचा धोका संपेल असे भविष्य १४ मार्च २०२० ला प्रसिध्द केलेले आहे.

इंटरनेट वर शोध घेतल्यानंतर या बातमीला दुजोरा अनेक दुरदर्शन चॅनल्स ने दिलेला नाही. याचे कारण याची कारणे सांगणारा authentic अहवाल मिळालेला नाही.

किंबहुना जॉन हाफकिन्स युनिव्हसीटीने हे संशोधन केल्याचा इन्कार करून आमचा लोगो कुणीतरी कॉपी करून ही बातमी दिल्याचे ऑफ़िशीयल ट्विटर वरून खुलासा केलाय.


हे कमी की काय म्हणून ३१ मार्च २०२० ला होणाऱ्या शनि मंगळ युती व चंद्र राहू युतीमुळे मुंबई व पश्चिम महाराष्ट्र मधे कोरोना वाढेल असे भाकित एका ज्योतिषी महोदयांनी केलेले आहे.

यावर मला असे वाटते की भारताच्या सहाव्या स्थानी राहू आहे. सहावे स्थान रोगस्थान आहे. चंद्र हा लोकभावनांचा कारक आहे. यामुळे या भविष्यामुळे लोक घाबरून जाण्या पलीकडे काही होणार नाही.

पण यामुळे नुकसान होणार नाही. कोरोना केसेस वाढण्याचा धोका नाही. कारण भारताच्या व्ययस्थानी असलेले मंगळ आता मकर राशीत आलाय आणि गुरूने तोपर्यंत राशी बदललेली असेल. भारताच्या व्ययस्थानी फक्त केतू आहे. यामुळे हॉस्पीटल हे व्ययस्थान दर्शविणार्या स्थानी ग्रहांची गर्दी नाही. व्ययेश व्ययात किंवा षष्ठेश व्ययात ही स्थिती नसल्यामुळे कोरोना रूग्ण वाढण्याचा वेग यात बदल अपेक्षित नाही.

मंगळ शनि युती तापदायक आहे हे खरे पण भारतासाठी मंगळ चतुर्थेश आणि लाभेश असून तो लग्नेशाच्या युतीत जाण्याने भारताला तरी किमान यापासून खुप मोठा किंवा गंभीर धोका नाही.

मला कोणत्याही ज्योतिष महोदयाशना कमी लेखायचे नाही. परंतु लोकहो, अश्या बातम्यांनी घाबरून जाऊ नका.

पण, घराच्या बाहेर सुध्दा तातडीचे काम असल्याखेरीज जाऊ नका. हे युध्द अशा संयमाने जिंकायचे आहे.

हा लेख नावासकट कॉपी पोस्ट करायला हरकत नाही.

© ज्योतिषशास्री नितीन जोगळेकर

Monday, March 23, 2020

इटालीतील कोरोनामुळे झालेला नरसंहार

इटाली मधे आज २३/३/२०२० ला ५४७६ ही सर्वात जास्त मनुष्यहानी दाखवत आहे. ही मनुष्यहानी, ज्या देशात ही साथ निर्माण झाली त्या चीन पेक्षा जास्त आहे. असे म्हणतात इटालीची जनसंख्या ६ ते ७ कोटी आहे आणि इथली मेडीकल व्यवस्था उत्तम आहे असे असताना, शिवाय युरोपीयन देश सार्वजनिक आरोग्याविषयी जागरुक असताना असे का घडावे.

अनेकदा, राज्यकर्त्यांकडून इतक्या चुका होतात तेंव्हाच अशी असाधारण परिस्थिती निर्माण होते. ज्योतिषशास्त्रीय पध्दतीने याचा मागोवा घ्यायचा झाला तर इटाली देशाचे सिंह लग्न गृहीत धरुन याची कुंडली मांडून आपल्याला पहावी लागेल


या सिंह लग्नाच्या कुंडलीत सहाव्या स्थानी शनि आणि प्लुटॊ ( रुद्र ) दिसत आहेत. सहावे स्थान हे रोग स्थान आहे आणि यात शनि असणे हे दिर्घकाळ दर्शविते तसेच प्लुटॊ सुध्दा समाज जीवनावर झालेला आघात दर्शवत आहे.


लग्नेश रवि कुंभ या बलहीन राशीत १३ मार्च पर्यंत होता. १४ मार्चला रवि  अष्ट्मस्थानी गेल्याने अजूनही वाईट परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे.



२९ मार्च २०२० ला गुरु मकर राशीत गेल्यावर अजूनही भयावह स्थिती निर्माण होईल आणि आज मिलीट्री रस्त्यावर आहे त्यावेळेस रेडक्रॉस आणि परकीय देशांच्या मदती शिवाय चित्र नियंत्रणात येणे कठिण आहे.



या स्थितीतुन इटलीला बाहेर यायला १४ एप्रिल २०२० हा दिवस उजाडावा लागेल. जेंव्हा रवि मेषेत जाईल तेंव्हा निसर्गतह: या देशातील साथ आटोक्यात येईल. माझ्यामते तो वर या देशातील मृतांची संख्या एक लाख ही संख्या पार करुन जाईल.

इतकी भयावह स्थिती अन्य कोणत्याही देशाची येऊ शकेल हे पहाताना फ़्रान्स देशातही थोड्या प्रमाणात हेच चित्र पहायला मिळेल. फ़्रान्स ची राजधानी पॅरीस कन्या लग्न आहे तर इटालीची राजधानी रोम पुन्हा सिंह लग्न असल्यामुळे इटालीमधे माझ्यामते जात प्रकोप आहे.

Tuesday, March 10, 2020

१४ मार्च ते १३ एप्रिल २०२० चे राशीभविष्य



1) १४ मार्च  ते १३ एप्रिल २०२० चे राशीभविष्य मेष , वृषभ आणि मिथुन राशींच्या साठी

2) १४ मार्च  ते १३ एप्रिल २०२० चे राशीभविष्य कर्क , सिंह आणि कन्या राशींच्या साठी

3) १४ मार्च ते १३ एप्रिल २०२० चे राशीभविष्य तुळ, वृश्चिक आणि धनु राशींच्या साठी

4) १४ मार्च ते १३ एप्रिल २०२० चे राशीभविष्य , मकर, कुंभ आणि मीन राशींच्या साठी