Wednesday, November 14, 2018

१६ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २९१८ या कालावधीचे राशीभविष्य आणि कार्तिक स्वामी दर्शन.

नमस्कार ज्योतिषप्रेमी लोकहो. घेऊन आलो आहे १६ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २९१८ या कालावधीचे राशीभविष्य आणि कार्तिक स्वामी दर्शन.



या महिन्यात येणारी पोर्णिमा कार्तिकस्वामी दर्शनासाठी उत्तम दिवस समजला जातो. कार्तिकस्वामी ह्या देवतेचे दर्शन आवर्जून दररोज घेण्याचा प्रघात महाराष्ट्र आणि त्यावरील राज्यात नाही. महाराष्ट्रात कार्तिकस्वामींचे दर्शन कार्तिक पोर्णिमेला घेतले जाते. संपुर्ण दिवस हा ह्या दर्शनासाठी योग्य मानला जात नाही तर पोर्णिमेच्या दिवशी जेंव्हा कृतिका नक्षत्र असते तो कालावधी कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी उत्तम मानला जातो. कार्तिकस्वामी अर्थात कार्तिकेय म्हणजेच पुराणात ज्यांना शंकर पार्वतीचा जेष्ठ पुत्र व गणपतीचा मोठा भाऊ ह्या देवतेच्या दर्शनाने वर्षभर आर्थीक संकटे सतावत नाहीत असा हा उपाय आहे. यामुळे जे कर्जबाजारी आहेत. कर्जाने त्रासले आहेत किंवा ज्यांना अर्थिक व्यवस्थापन निटसे जमत नाही त्यांनी आवर्जून कार्तिक स्वामींचे दर्शन २२ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजून ५० मिनीटानंतर घ्यावे. कार्तिक स्वामींचे दर्श २३ नोव्हेंबर सकाळी ११ वाजेपर्यंत आपण घ्यावे. ही पुजा कशी करावे याचे वर्णन दातेपंचाग शके १९४० मधे पान २५ वर आहे. मंत्र पठणाने विधीवत केलेली पुजा जास्त लाभदायक असते.

 कार्तिकस्वामींना मोरपीस अर्पण करण्याची पध्दत आहे. या साठी २२ तारखेपर्यंत वाट न पहाता जेंव्हा मिळेल तेंव्हा ते घेऊन ठेवावे कारण त्या दिवशी मोरपीसाला सुध्दा खुप पैसे मोजावे लागतात.
आपण जवळच्या कार्तिक स्वामींच्या मंदीरात जाऊन पुजा करावी. जिथे मंदीर नाही अश्यांनी वरील प्रतिमा व्यवस्थित स्थापन करून पुजन करावे. अगदीच शक्य झाले नाही तर स्मरण करावे.


वरील पॅरेग्राफ़ वाचल्यावर अनेक लोक असे म्हणतील की वर्षभरात एकदा दर्शन घेऊन काही काम धंदा न करता पैसे कसे येतील. मलाही तेच म्हणायचे आहे. काम धंदा /नोकरी तर करायलाच पाहीजे. परंतु या दिवशी कार्तिक स्वामींची पुजा केल्यानंतर अजून पैसे कोणत्या मार्गाने सहज, बुध्दीचा किंवा कष्टाचा किंवा दोन्हींचा वापर करुन मिळवावेत याचा मार्ग सापडू शकतो. कोणतिही पोर्णिमा शुभ असते. शुभ असते याचा अर्थ त्या दिवशी मानसीक स्थिती उत्तम असते. या दिवशी पुजा झाल्यावर सहज मन एकाग्र होऊ शकते व चिंतनातून अर्थप्राप्तीचा एखादा नविन मार्ग सापडू शकतो किंवा आपण करणार आहात ती गुंतवणूक चुकीची तर नाही याचे ज्ञान झाल्याने आपण आर्थीक संकटात पडणार असाल तर त्यापासून मुक्तता मिळू शकेल.

आता पाहू या १६ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर या वृश्चिक राशीत रवि महिनाभर असलेल्या महिन्याची इतर ग्रहांची स्थिती आणि या महिन्याचे राशीभविष्य



१६ नोव्हेंबर २०१८ ते १५ डिसेंबर २०१८ काळाची चंद्र सोडून ग्रहस्थिती पाहीली असता जो तो ग्रह आहे त्याच राशीत या काळात रहातो.

या महिन्याच्या सुरवातीला   गेले दीड महिना वक्री असलेला शुक्र मार्गी् होणार असून तो स्वत:च्या तूळ राशीत राहून उत्तम फ़ळे देणार आहे. बुध या महिन्याच्या सुरवातीलाच १७ नोव्हेंबरला वक्री होणार असून तो ७ डिसेंबरला मार्गी होईल. याचे शेअर बाजारात दिसती.
गुरु सुध्दा १५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात अस्तंगत असल्यामुळे याचे ही परिणाम म्हणून विवाह विषयक बोलणी पुढे जाणार नाहीत. कर्जे किंवा आर्थिक व्यवहार वेगाने चालणार नाहीत असे दिसतील.

राशीवार भविष्य पहाताना हे आपण लग्नराशी किंवा चंद्र राशी किंवा दोन्ही राशीकडून वाचून अनूभव घेऊ शकाल.

आता राशीवार भविष्य पाहू

मेष रास: मेष राशीचा मालक मंगळ महिनाभर कुंभ या शनिच्या राशीत लाभ स्थानी असल्यामुळे महिनाभर जे अपेक्षीत असेल ते प्रयत्न केल्याने मिळेल. याला अपवाद फ़क्त ६ डिसंबर ते १० डिसेंबर या काळाचा आहे. या काळात आपण संभ्रमात पडाल त्यामुळे नेमके काय हवे त्याकडे फ़ोकस न करता आल्यामुळे काही भलतेच स्विकारून बसल्याने घोळ होऊ शकेल. यासाठी ज्या कामांचा महिनाभर पाठपुरावा करुन मार्गी लावायची आहेत त्या संदर्भात ६ ते १० डिसेंबर २०१८ या काळात निर्णय घेताना सावधानता बाळगा.

ज्यांचा संबंध फ़ोटॊग्राफ़ी, सिनेमा, एक्स रे याच्याशी आहे अश्यांना ४ डिसेंबर नंतर मोठ्या व्यावसायीक संधी येतील. ज्यांचा व्यवसाय ह्या क्षेत्रात नाही त्यांनी मात्र ४ डिसेंबर नंतर येणार्या व्यावसायीक संधी पारखून घ्याव्यात. वैवाहीक जोडीदार व एकंदरीत कौटुंबीक स्तरावर वातावरण आनंददायी असेल.

ज्यांना दमा, फ़ुफ़्फ़ूसे, सर्दी, पचन यासंदर्भात त्रास आहेत ते जास्त वाढणार नाहीत यासाठी त्रास होताच आपल्या डॉक्टरची भेट घेऊन औषधे घ्यावीत.थोडक्यात आरोग्याच्या बाबतीत चालढकल न करता काळजी घ्यावी.

वृषभ रास : ग्रहस्थिती उत्तम आहे असे नाही. आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. मद्य प्राशन करणार्यांनी विशेष सावधानता बाळगावी. एकतर आरोग्य बिघडेल आणि नशेत खिसा ही मारला जाईल अशी शक्यता नाकारता येत नाही. जे शेअर बाजारात रिस्क घेतात त्यांनी व्यवहार करताना अनेक वेळा तपासून पहावेत.

एका बाजूला नोकरी/व्यवसायात कामाचे प्रेशर आणि दुसर्या बाजूला आरोग्याच्या तक्रारी यामुळे हैराण होऊ नये असे वाटत असेल तर महिन्याच्या सुरवातीला ज्यांना आरोग्याचे कायमचे त्रास जसे डायबेटीस किंवा अन्य काही असल्यास त्याची तपासणी करुन आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमीत औषधे घ्यावीत.

याच महिन्यात बुध वक्री होणार आहे जो तुमच्या कुटुंबास्थानाचा आणि संततीच्या स्थानाचा मालक आहे. या दोन्ही स्तरावर १७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०१८ हा काळ काही उत्तम असेल असे वाटत नाही. तुमच्या कुटुंबाची किंवा संततीसंदर्भात एखादी चिंता सतावेल.

मिथुन रास: आपल्याही राशीचा स्वामी बुध हा जवळ जवळ तीन आठवडे वक्री असणार आहे व तो सहाव्या स्थानी वक्री होणार आहे. हा बुध आपल्या वाणीने अकारण शत्रुत्व निर्माण करेल यास्तव जाता जाता मस्करी करायची, शाब्दीक कोटी करायची यावर नियंत्रण ठेवा. लग्नेश सहाव्या स्थानी वक्री झाला म्हणजे प्रतिकार शक्ती कमी असेल. प्रतिकार शक्ती देणारा दुसरा ग्रह रवि सुध्दा याच स्थानी असल्याने साथीचे रोग सहजपणे शिरकाव करु शकतील यास्तव महिनाभर अरोग्याच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असेल. मिथुन लग्न रास असलेल्या लोकांना याचा अनुभव येऊ शकेल.

पंचमात शुक्र तो ही तुळेचा आपल्याला विशेष फ़ळ देऊन जाईल. ज्यांचा कला क्षेत्रात संबंध आहे ते काही कलाकृती निर्माण करतील. विद्यार्थी वर्गाला खास करुन कला क्षेत्रातील लोकांना परिक्षा मधे यश नक्कीच मिळेल.  तरुणांना ह्र्दयात वाजे समथिंग ह्या ओळीचा अनुभव नक्कीच येईल.

भाग्यातला लाभे्श आणि सहाव्या स्थानाचा मालक मंगळ आपले आजवर लिटीगेशन मधले प्रॉपर्टी मॅटर्स वर हालचाल होऊन एक टप्पा पुढे जाताना दिसतील. पण अजून पुर्ण निकाल लागायला वेळ लागेल असे अनुमान आहे.

कर्क रास: आपली संतती आपल्यासाठी फ़ारच गंभीर विषय असतो. ६ ते १० डिसेंबर या काळात संतती साठी काही वेळ द्यावा लागेल. एखादे छोटेसे आजारपण असेल किंवा काही काळजीचा विषय निर्माण झाल्यामुळे आपल्याला त्याकडे लक्ष वळवावे लागेल.

हा काळ सोडला तर तुळेचा शुक्र चतुर्थात आल्याने "सुख म्हणजे काय असत " ह्या प्रशांत दामले यांच्या गाण्याचा प्रत्यय वारंवार येईल. घरातले फ़र्निचर, सॉफ़्ट फ़निर्शिंग याबाबत नीट रचना करायला आता वेळ मिळेल. शिवाय आजवर ज्या घरगुती साधनांचा सोय म्हणुन वापर करायला जमले नसेल तो मोड आता सापडेल.

इतके सारे चांगले  घडत असताना घरातल्या माणसांशी संवाद घडत नाही ही रुखरुख मात्र असेल. दरवेळेला शाब्दीक संवादच सर्वकाही असते असे नाही. घरातले सगळे आनंदात दिसत आहेत ही स्थिती पाहून आनंदी नसाल तर नवलच.

सिंह रास : तुमच्या राशीचा मालक महिनाभर वृश्चिक या राशीत मुक्कामाला आहे. तुमचे जे काही आहे ते खुले. कोल्ह्याच्या चालीने छुपे काही करावे हा तुमचा स्वभाव नाही. तरी सुध्दा छुपे पणाने झोपल्याचे सोंग आणून जरा पहा तुमच्या आजूबाजूला काय घडते आहे. कोण तो उंदीर तुम्ही झोपला हे पाहून तुमची आयाळ कुरतडायला येतो ते या महिन्यात शोधून ठेवा.

सिंह राशीची अनेक माणसे कलाकार असतात. तुळेत गेलेला शुक्र आपल्याला काही लिखाण करायला स्फ़ुर्ती देईल. जरा त्याचा अनुभव घेऊन पहा. शेअर मार्केटमधे जरा जपून रिस्क घ्या. या महिन्यात तुमचे नियमीत येणारा पगार आणि गुंतवणूक या बाबत जरा जागरुक रहा.

उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी यांनी ६ ते १० डिसेंबर या काळात परिक्षा आल्यास अती आत्मविश्वासाने परिक्षा देऊ नये. नेहमी पेक्षा जरा जास्तच अभ्यास करावा तसेच खेळाडू, पोलीस यांनी ही ह्या काळात अति आत्मविश्वास दाखवू नये.

कन्या रास : कन्या राशीचा मालक बुध जवळ जवळ महिनाभर वक्री असल्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी आपले नोकरी/व्यवसायातले काम काळजीपुर्वक करण्याची आवश्यकता आहे. खास करुन अकाऊंटस, कम्युनिकेश्न, प्रिटींग यात काही चुका होऊ नयेत म्हणून सर्व माहिती पुन्हा तपासणे आवश्यक आहे.

कौटुंबीक वातावरणात अजिबात ताण नसेल. भेळ पुरी, पास्ता, पिझ्झा या सारख्या पदार्थांचा आस्वाद घेण्याचे क्षण अनेकदा या महिन्यात येतील. नात्यामधल्या अनेक स्त्रीया जसे बहिणी, मावश्या यांचे संमेलन घरात भरेल. यामुळे बंधू वर्गाला विनाकारण अस्वस्थता येणार नाही ना या साठी खुलासा करणे आवश्यक ठरेल.

जे पत्रकार आहेत, संपादक आहेत यांनी आपल्या लिखाणामुळे शत्रूता निर्माण होणार नाही ना याचा विचार करुन लेखन करावे. सोशल मिडीया वर जे कायम लिहीतात त्यांनी सुध्दा आपण काय लिहीतो, काय फ़ॉर्वर्ड करतो हे तपासून मगच कृती करावी.

तुला रास : आपल्या राशीचा स्वामी शुक्र महिनाभर तुला या स्वत:च्या राशीत असणार आहे. कलाकारांच्या साठी हा महिना उत्तम असेल.  खरेदी विक्री करणारे व्यापारी, सौंदर्य प्रसाधनाचे व्यवसाय करणारे, सुगंधाचे व्यापार करणारे यांना या महिन्यात खुप उलाढाल करण्याचे योग आहेत.

कलाकारांना आपण कोणत्या अ‍ॅगलने छान दिसतो याचा शोध लागेल आणि त्याचा वापर करुन ते जास्त प्रसिध्दी मिळवतील. स्वत:ची सेल्फ़ी काढण्यात गर्क असलेल्या लोकांना सुध्दा हे अ‍ॅगल सापडतील. काहींना लाईफ़ इन्शुरन्स पॉलीसी संपल्यामुळे, लॉटरीच्या तिकीटामुळे पैसे मिळतील.

किरकोळ आरोग्याचे प्रश्न डोके वर काढू नयेत म्हणुन काळजी घ्यावी. काही आर्थिक जबाबदार्या मात्र नको असताना घ्याव्या लागतील. पण हे सर्व व्यवस्थीत मॅनेज करता आले तर हा महिना चांगला जाईल.

वृश्चिक रास : खरे बोललेले सख्या आईला पटत नाही हा अनुभव या महिन्यात येईल. एकंदरीत घरगुती संघर्षाचे वातावरण असेल यासाठी आपली भुमिका तपासून, शब्द विश्वासार्ह असतील असे पहावे म्हणजे सगळे नियंत्रणात राहील.

या महिन्यात आपल्या हातात येणारे धनादेश ( चेक्स ) यावरची तारीख व रक्कम इत्यादी तपासून घ्यावी. कॅशीयर मंडळींनी नोटा तपासून घ्याव्यात अन्यथा फ़सगत होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशीला या महिन्यात खर्चाची जुळवणी करताना बेजार होण्याचा हा महिना आहे अश्यावेळी कामात गडबड होऊन अजून भुर्दंड नको म्हणून वर लिहील्याप्रमाणे रोखीचे, कॅश चे व्यवहार तपासून पहावेत.

धनू रास : धनू राशीतील मूळ नक्षत्राचा साडेसातीचा त्रास कमी होईल.  आता शनि पुर्वाषाढा नक्षत्रात २७ नोव्हेंबरला प्रवेश करत आहे. ज्यांचे धनू राशीत पुर्वाषाढा नक्षत्र आहे त्यांना साडेसातीत अनेकदा मनस्ताप होईल. असे जरी असले तरी या महिन्यात आवक जोरदार असेल. या सोबत अनेक लाभकारक गोष्टी या महिन्यात आपल्याला मिळणार आहेत.

नोकरी व्यवसाया निमीत्ताने या  महिन्यात काहींना खुपच प्रवास करावा लागेल तर काहींना प्रवासाचे बेत  काही अडचणीमुळे रद्द करावे लागतील. धनू राशीचा मालक गुरु वर्षभर बाराव्या स्थानी असणार आहे. त्याच्या सोबत रवि आणि बुध असल्याने प्रवासा बरोबरच खर्च सुध्दा जास्त असणार आहे. एका बाजूला उत्तम आवक आणि खर्च सुध्दा असल्याने महिन्याची गोळाबेरीज शेवटी शुन्य असेल.

मकर रास : हा महिना आपल्या नोकरी/व्यवसायात भक्कम परिस्थीती बनविणार आहात. यामुळे जेंव्हा केंव्हा बढती किंवा पगारवाढ मिळेल तेंव्हा आपले कर्तुत्व कोणी नाकारू शकणार नाही. या महिन्यात शिलकीत असलेले पैसे कसे चांगल्या पध्दतीने गुंतवणूक करायचे यावर निर्णय घ्यायला लागणार आहे. पैसे कसे साठवायचे आणि वाढवायचे यावर आपला खुप अभ्यास असल्याने गुंतवणूकीचे निर्णय बरोबरच असतील.

आपल्या घरात असलेले नोकर आणि नोकरी- व्यवसायात आपले कनिष्ठ काय करत आहेत याचा अंदाज घ्या. अनेक वर्ष आपण ज्यांना खात्रीचे, विश्वासाचे वाटणारे हे लोक आपल्याला अडचणीत आणणार नाहीत ना याची काळजी घ्यायची आवश्यकता आहे. ही बाब नियंत्रणात ठेवली तर हा महिना आपल्याला चांगला जाईल.

कुंभ रास : कुंभ राशीचा मालक शनि लाभ स्थानात अजून खुप काळ असणार आहे त्यामुळे कुंभ राशीची अजून काही काळ चांगली स्थिती आहे. अकारण चिड चिड करणे हा अपला स्वभाव नाही तरी सुध्दा मंगळ महिनाभर कुंभ राशीत असल्यामुळे थोडीशी चिड चिड होईल.

या महिन्यात राजयोग कारक शुक्र स्वत:च्या राशीत भाग्यात असल्याने महिनाभर सुख लाभेल. उच्च शिक्षण घेणार्यांना हा काळ अनुकूल असेल. या काळात एखादा कठीण विषय देखील सहज समजेल. अनेकांना वरिष्ठांच्या गैरहजेरीत जास्तीचे अधिकार मिळतील.

आपल्या पित्याशी विनाकारण संघर्ष होण्याची शक्यता असल्यामुळे जो विषय खात्रीने संघर्ष निर्माण करेल असा विषय या महिन्यात टाळलेला चांगला.

मीन रास : ११ अक्टोंबर नंतर वर्षभराने प्रथमच चांगले वातावरण तयार होत आहे. राशीचा स्वामी गुरु चांगल्या स्थितीत आलेला आहे जो पुढे तीन वर्षे उत्तम स्थितीत असणार आहे. तीन महत्वाचे ग्रह बुध, रवि आणि गुरु चांगल्या स्थितीत आल्यामुळे आपण जे करणार आहात त्याच्या प्लॅनिंग साठी हा काळ अनुकूल असेल. उत्साहाने कामाला लागा.

जितके नियोजन अर्थात प्लॅनिंग उत्तम तितक्या अडचणी कमी व दैनंदीन कामे मार्गी लागतील. जेंव्हा अनेक छोटे टप्पे पार पाडाल तेंव्हाच मोठे यशाचे शिखर गाठू शकाल याचा विश्वास ठेऊन काम सुरु ठेवा. नजीकच्या काळात अजून काही ग्रह आपल्या यशाकडे जाण्याच्या मार्गावर आपल्याला सहाय करतील

शुभंभवतू

Friday, October 5, 2018

नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१८

                                                                 



                                                                   अनुक्रमणिका

Saturday, September 15, 2018

नक्षत्रप्रकाश ज्योतिष संमेलन २८ अक्टोंबर २०१८ संदर्भातले निवेदन

२८ अक्टोंबर २०१८ ला आपण संमेलन घेण्याचे घोषीत केले आहे. या संदर्भात या संमेलनाचे शुल्क, स्थान व रुपरेषा १ अक्टोंबर २०१८ रोजी मिळेल. या संदर्भात पुढे जाऊन हे संमेलन पिंपरी- चिंचवड शहरात होईल असे मी आज जाहीर करतो. याचे कारण इतर शहर अर्थातच बाहेर गावाहून येणार्या लोकांसाठी पुणे शहर सोयीचे आहे परंतु कार्यकर्ते मिळणे किंवा संमेलनाचे आयोजन करणे या दृष्टीने मला पिंपरी चिंचवड शहर सोयीचे वाटते.

या संमेलनात व्याख्याने होतील, नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक प्रसिध्द होईल. संमेलनाच्या शुल्कामध्ये तो संमेलनास येणार्यांना उपलब्ध होईल.

संमेलनात व्याख्यान देण्यासाठी जे व्याख्याते निवडले जातील त्यांना संमेलनाचे शुल्क द्यावे लागणार नाही.  व्याखानाचा विषय असा असावा जो क्लिष्ट नसेल. ३० ते ४० मिनीटांच्या व्याख्यानात तो सर्वांना समजेल व त्या माहितीचा वापर लगेचच अनेकांना करता येईल. जे विषय आधीच तुम्ही आधी कधी तरी बोलला आहात त्याची पुनरावृती टाळावी.

निवडलेल्या व्याख्यानाच्या आधी व्याख्यात्याबद्दल माहिती सांगीतली जाईल. ज्यात व्याख्यात्याने ज्योतिष विषयक शिक्षण कोठे घेतले. कोणत्या पदव्या त्यांनी घेतल्या आहेत. त्यांचे ज्योतिष विषय सोडता नोकरी/व्यवसाय काय आहे/होता. आजवर त्यांनी कोठे कोणत्या विषयावर
व्याख्याने दिलेली आहेत इत्यादी. या नंतर व्याख्यान ३० ते ४० मिनीटे असेल. शेवटची ५ ते १० मिनीटे प्रश्नोत्तरासाठी असतील.

संमेलनाच्या दिवशी जेमतेम ४ ते ५ व्याख्याने होऊ शकतील परंतु ज्यांना व्याख्यानाची संधी मिळणार नाही किंवा उत्तम विषयावर व्याख्यान देणे शक्य असून जे प्रवास करुन येऊ शकणार नाहीत त्यांच्या साठी नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक ही दुसरी संधी उपलब्ध आहे. आपण त्वरीत संपर्क करावा. विनंती इतकीच आपण लिहीत असलेला लेख हा प्रथमच प्रसिध्द होत असावा. यात अगदी प्रार्थमीक माहिती नसावी तर अभ्यासपुर्ण केस स्टडी असावा. तुम्हाला नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक विनामुल्य घरपोच प्राप्त होईल.

तसेच जे प्रकाशक/लेखक आपले पुस्तक या संमेलनात प्रकाशीत करु इच्छितात त्यांनी त्वरीत संपर्क करावा. ज्यांचे पुस्तक प्रसिध्द झाले आहे आणि ज्यांना प्रसिध्दी करायची आहे त्यांनी ही संपर्क करावा. नक्षत्रप्रकाश दिवाळी अंकात या प्रसिध्द झालेल्या पुस्तकाचा गोषवारा दिला जाईल.  जे सदस्य/प्रकाशक/ विक्रेते आपली ज्योतिष विषयक पुस्तके विक्रीस ठेऊ इच्छितात त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. हे सर्व करण्याचा उद्देश संमेलनाच्या खर्चाचा काही भाग उचलला जावा ही आहे. लेखक/प्रकाशक आणि विक्रेते यांनी या निमीत्ताने संमेलनास स्वतंत्र जास्तीचा निधी द्यावा अशी अपेक्षा आहे. संमेलनात सहभागी होण्याच्या शुल्कातच पुस्तक प्रसिध्द करणे/ आधीच प्रकाशीत पुस्तकाला नक्षत्रप्रकाश मधे प्रसिध्दी देणे किंवा विक्रीस ठेवणे शक्य होणार नाही याची नोंद घ्यावी.

जे सदस्य यंत्र/रत्ने/उपरत्ने संमेलनाच्या ठिकाणी विक्रीसाठी स्टॉल लाऊ इच्छितात त्यांना सुध्दा संपर्क करावा अशी विनंती आहे. या संदर्भात आपल्या सुचनांचे स्वागत आहे. आपणही काही निधी द्यावा अशी अपेक्षा आहे.

ज्यांना यंत्र/रत्ने विक्री स्टॉल लावायचा नाही, पुस्तकही प्रसिध्द करायचे नाही परंतु हे एक चांगले काम आहे या भावनेने रुपये १००/- पासून कितीही असा निधी उदार अंतकरणाने द्यायचा आहे अश्या ज्योतिषप्रेमींचे स्वागत आहे. ज्यांना असे वाटते की मी आजवर नक्षत्रप्रकाश समुहावर मोफ़त सल्ला घेतला त्याची परत फ़ेड म्हणून काही रक्कम संमेलन निधी साठी द्यायची आहे त्यांचे ही स्वागत आहे.  हा वेगळ्या अकाउंटला जमा करायचा आहे. याबाबतची माहिती घेण्यासाठी त्वरीत फ़ेसबुक मेसेंजर/ whatsapp वर संपर्क करावा.

संमेलनात सहभागी होण्यासाठी शुल्क वेगळे असेल. ते वेगळ्या अकाउंटला जमा करायचे आहे याची नोंद घ्यावी. याची घोषणा व्याख्याते नक्की झाल्यावर १ अक्टोंबरला केली जाईल.

जे लोक संमेलनात सहभागी  शुल्क आधी जमा करतील त्यांना अनुक्रमानुसार पुढच्या रांगेत बसण्याची व्यवस्था करुन दिली जाईल. जे उशीरा आपले स्थान निश्चित करतील त्यांना स्टेज पासून मागे जागा मिळेल अशी व्यवस्था करण्याचा विचार आहे.

१ अक्टोबर नंतर एक बॅकेचे अकाऊंट प्रसिध्द होईल. संमेलनात सहभागी होणार्यांनी त्यात आपले शुल्क जमा करायचे आहे. याच दिवशी या संमेलनात किती लोक सहभागी होऊ शकतात याचा आकडा नक्की होईल. त्या पेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला तर मात्र निराशा होऊ नये या साठी १ अक्टोंबरच्या घोषणेकडे लक्ष द्यावे ही विनंती.

ह्या संमेलनात पिंपरी- चिंचवडचे/पुणे  रहीवासी नसलेले परंतु स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे अश्यांचे सुध्दा स्वागत आहे.

हे संमेलन यशस्वी व्हावे या साठी सुचनांचे स्वागत आहे.

नितीन जोगळेकर
9763922176

Tuesday, September 11, 2018

१७ सप्टेंबर २०१८ ते १६ अक्टोबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य तसेच विवाह होण्यासाठी उपाय

नमस्कार, ज्योतिषप्रेमी लोकहो. मी घेऊन आलो आहे १७ सप्टेंबर २०१८ ते १६ अक्टोबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य. या महिन्यात रवि कन्या राशीत आहे. ज्योतिषशास्त्र दृष्टीने महत्वाचा बदल होत आहे. ११ अक्टोंबर २०१८ रोजी गुरु तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. महिन्याच्या राशी भविष्यात इतका मोठा ज्योतिषशास्त्रीय लेख लिहणे शक्य नाही यासाठी हा लेख मी दिवाळी अंक २०१८ मधे लिहणार आहे.

तेंव्हा प्रतिक्षा करा दिवाळी अंकाची. यात वार्षीक राशीभविष्य नोव्हेंबर २०१८ ते अक्टॊंबर २०१९ कालावधीचे असेल. याच सोबत गुरु बदलाचा स्वतंत्र लेख असेलच. कोणत्या राशीला गुरु बदलाने नेमका काय लाभ होईल हे दिवाळी अंकातच वाचा. या शिवाय अनेक अश्या माहितीने नटलेला नक्षत्रप्रकाश दिवाळी २०१८ - २८ अक्टोंबर २०१८ रोजी प्रसिध्द होईल. प्रिंट कॉपीची मागणी आत्ताच नोंदवा. यासाठी देणगी मुल्य असेल. ते कसे द्यायचे या बाबत स्वतंत्र माहिती आपणा पर्यंत येईलच.

दर महिन्याला मी काही उपाय सांगत असतो. ह्या महिन्यामधे नवरात्र सुरु होत आहे. यादृष्टीने मी अनुभवलेले उपाय आपल्यापर्यंत मी पोचवत आहे.

ज्या विवाहासाठी इच्छुक कन्यांचा विवाह लांबला आहे, अडचणी आहेत. प्रेम विवाह करायचा आहे पण त्यात अडचणी आहेत अश्या सर्व कन्यांनी हा उपाय जरुर येता १३ अक्टोबरला करावा व आपला अनुभव कळवावा. हा उपाय असलेली खालील लिंक विवाह इछुक मुलींना पाठवावी. १३ अक्टोबर २०१८ च्या आधी पाठवावी म्हणजे तयारी करता येईल.

http://gmjyotish.blogspot.com/2016/09/blog-post_22.html

हा उपाय, विवाह इच्छुक मुलींनीच करायचा आहे. त्यांच्या साठी त्यांच्या वतीने अन्य कोणी केल्यास फ़ायदा होत नाही

आता  १७ सप्टेंबर २०१८ ते १६ अक्टोबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य पाहू. हे राशीभविष्य लग्नराशीकडून तसेच चंद्र राशीकडूनही पहावे.

मेष रास: या महिन्यात आपल्या राशीचा स्वामी मंगळ कर्म स्थानी असला तरी अनेक कामे तुमच्या इच्छा शक्तीने मार्गी लागण्यात काही अडथळे महिन्याच्या सुरवातीपासूनच संभवतात. ही स्थिती महिन्याच्या शेवटापर्यंत कायम असेल. यासाठी अडथळे काय येतील याचा अंदाज आत्तापासून लाऊन त्यावर परिणामकारक उपाय शोधा.

आपल्या राशीचा महत्वाचा ग्रह गुरु  पुढे वर्षभर अशुभ स्थानी असल्याने ११ तारखेच्या आधी काही अत्यंत महत्वाची कामे मार्गी लावाच. ह्या महिन्यात तुमचे मामा तुमच्यावर प्रसन्न असतील. मामांच्या सहायाने काही कामे मार्गी लावायची असतील तर ६ अक्टोंबर पुर्वी मार्गी लावा.

हा संपुर्ण महिन्याच्या कालावधीत मेष राशीचे विद्यार्थी कोणतीही परिक्षा देणा्र असतील तर अपेक्षे इतके यश मिळवण्यासाठी दुप्पट अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्या संततीच्या बाबतीत सुध्दा सहामही परिक्षेच्या कालावधीत आजारपण येऊ नये म्हणून  काळजी करा.

या महिन्यात काही रोमॅंटीक क्षण अनेकांना अनुभवायला मिळतील. एकंदरीत अनेक वैविध्यपुर्ण घटनांनी भरलेला हा महिना मेष राशीसाठी आहे.

वृषभ रास: तुमच्या राशीचा स्वामी शुक्र स्वत:च्या राशीत असूनही तुम्हाला सर्व सुख समोर असताना, आनंद घेण्यास अडथळे निर्माण होतील. हे म्हणजे अनेक गोड मेजवान्या रक्तातील साखर वाढल्याने आस्वाद घेता येणार असे असेल. व्यावसायीक स्तरावर अनेक कामे तुमचे सहकारी एकदा सांगून मार्गी लावतील पण त्यासाठी ५ अक्टोबर पुर्वी महत्वाची कामे मार्गी लाऊन घ्या. 

आपण उच्च शिक्षणासाठी प्रयत्नात असेल तर त्या संदर्भात चांगली बातमी समजेल. आपली संतती बौध्दीक क्षेत्रात काहीतरी जोरदार काम पुर्ण करेल. महिन्याच्या शेवटी आरोग्याचे प्रश्नाने वर्षभर त्रास झाला असेल तर त्यावर चांगला उपाय सापडेल. अडकून पडलेले पैसे मार्गी लागतील.

सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या राशीचा राजयोग कारक ग्रह शनि मार्गी झाल्याने अनेक रखडलेली कामे वेगाने नाही पण हलू नक्कीच लागतील. तुमच्यासाठी सुध्दा हा महिना अनेक घटनांनी भरलेला असेल.

मिथून रास: ऑफ़िसला जाणे हा रोजचा प्रवास महिनाभर तुम्हाला सुखाचा झालेला वाटेल. बसेस वेळेवर येतील. नेहमी ट्रॅफ़िक जाम होणार्या जागी जाम लागणार नाही. तुमचे स्वत:चे वहान दगा देणार नाही. काही दिवस का होईना हे सुख अनुभवा. आपली भावंडे लांब असतील तर काही दिवस त्यांचा सहवास लाभेल.

या महिन्यात काही लिखाण करायचे असेल तर ५ अक्टोंबर पुर्वी पुर्ण करा. कोणत्याही विषयाच्या अभ्यासासाठी हा काळ अनुकूल आहे. आपली संतती सुध्दा आपल्याला आनंद देणार आहे. आणि हो कोणाला तरी प्रपोज करायचे असेल तर बिनधास्त करा. असा हा काळ मिथुन राशीच्या लोकांना जोरदार असणार आहे.  तरी सुध्दा प्रकृतीच्या काही तक्रारी असतील. पित्ताचा त्रास असणार्या लोकांनी विशेष काळजी घ्या.

कर्क रास: कोणतेही यश मिळण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. यासाठी संवाद साधणे हा सुध्दा एक प्रयत्नच असतो. या महिन्यात संवाद यशस्वी रित्या साधला जाईल. तो इमेल च्या माध्यमातून असू दे, प्रेझेंटेशन असू दे किंवा इंटरव्ह्यु, संवाद यशस्वी होईल. या महिन्यात अनेक लेखक, प्रकाशक आणि प्रिंटींग व्यवसायात असलेले लोक एखादा महत्वाचा टप्पा पार पाडतील. शैक्षणीक क्षेत्रात असलेल्या लोकांना मात्र संधीचा फ़ायदा घेण्यासाठी खुपच आटापीटा करावा लागेल.

घरगुती स्तरावर भावंडांची चिंता असल्यास दुर होईल. घरात एखादी भौतीक सुखाची वस्तू जसे फ़र्निचर, वाहन इ येण्याचा योग या महिन्यात पाच तारखेच्या आधी असेल. काही कारणाने जोडीदाराशी असलेला संवाद हरवला असे गेले काही महिने वाटत असेल तर तो पुन्हा निर्माण होईल. लांबलेले एखादे दुखणे नियंत्रणात येईल. असे मिश्र ग्रहमान असलेला हा महिना कर्क राशीच्या लोकांना अनुभवायला मिळणार आहे.

सिंह रास: आपल्या राशीचा स्वामी रवि महिनाभर कन्या राशीत असेल. कन्या राशीत रवि गेल्यावर आपल्या खाण्यापिण्याच्या आवडी पुर्ण होण्यास हा खास काळ येतो. घरातल्या लोकांच्यावर गुरगुरु करुन तुम्ही हवे ते तयार करायला सांगणार आणि इतरांना शिल्लक रहाते अथवा नाही याचा फ़ारसा विचार न करता त्याचा स्वाद घेणार. आपला स्वभाव घरच्यांना माहित आहे त्यामुळे तुम्ही आनंद घ्या.

या महिन्यात अधिकार, पद, मान सन्मान या ही पेक्षा पैसे कसे गुंतवायचे यावर जेणे करुन ते कठीण प्रसंगी उपयोगी पडतील यावर विचार करायला वेळ मिळेल शिवाय चार पैसे सेव्हिंग अकाउंटला दिसतील सुध्दा एखाद्या चांगल्या हितचिंतका बरोबर या बाबतीत हितगुज करा. सिंह राशीचे अनेक लोक चांगले कलाकार असतात. या महिन्यात आपल्याला कला प्रदर्शनासाठी उत्तम संधी येणार आहे त्याचा फ़ायदा घ्या. आपल्याला लगेचच सिनेमा मिळणार असे नाही पण अभिनय करायला पथ नाट्यापासून कोणतीही संधी तुम्ही सोडु नये कारण त्यातूनच अभिनय कौशल्य संपन्न होत असते.

कन्या रास: तुम्ही मुळात चिकीत्सक, संशोधक आणि ही तुमची वृध्दींगत करण्यासाठी ६ अक्टोंबर पर्यंत राशीचा स्वामी बुध लग्न स्थानी असेल. आपण ज्याची चिकीत्सा कराल ते अचूक असेल. डॉक्टर असा किंवा चार्टर्ड अकाउटंट असा आपल्याला आपल्या कामाचे समाधान मिळेल व आत्मविश्वास वाढेल.

महिनाभर ज्या गोष्टीची काळजी कराल ती विनाकारण असणार नाही. पुढील महिना केवळ चिंता करु नका पण ही स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून काहीतरी मुलभूत काम करा. या दृष्टीने काही आर्थिक नियोजन करायला हा महिना अनुकूल आहे मात्र हे सर्व निर्णय ५ अक्टोंबर पुर्वी घेतले जातील असे पहा.

तूळ रास : तुमच्या राशीचा स्वामी खुप काळ तुमच्या राशीत असणार आहे. महिनाभर विवीध घटना घडतील. प्रवास, तिर्थयात्रा यांचे योग येतील. या महिन्यात हा खर्च अनपेक्षित असला तरी सुध्दा त्याची तरतुद करणारा आहे त्यामुळे तिर्थ यात्रा बाबत संधी येताच हो म्हणा. या महिन्यात आपण आनंदी असाल याचे कारण तुम्हाला अपेक्षीत व्यावसायीक संधी, कला प्रदर्शनाच्या संधी, उत्कृष्ट सुगंध, कपडे इ. आवडणारे सर्व काही सहज प्राप्त होणार आहे.

याच सोबत ६ अक्टोंबर नंतर होणार्या कटकटी, इतरांसाठी होणारे अनावश्यक खर्च, डोळ्याचे आजार याने वैतागून न जाता यावर काय पर्याय आहे याचा विचार करावा. केवळ आपल्या सोबत राहीले म्हणजे काही खर्च करावा लागत नाही अश्या विचार करणार्या स्वार्थी मित्रांना जरा टाळा म्हणजे हे अनावश्यक खर्च नियंत्रणात राहतील.

वृश्चिक रास : आपल्या राशीचा अधिपती मंगळ २७ ऑगस्टला मार्गी झाला असला तरी कटकटी संपलेल्या नाहीत. सध्या मंगळाचे केतू सोबत साहचर्य असल्याने कामे मार्गी लागताना अनंत अडथळे यांचा सामना करावा लागेल. फ़ार धाडस दाखवून काम करु नका तर जरा शांत राहून अंतर्मनाचा कौल घेऊन दुरगामी विचार करुन पावले टाकण्याची आवश्यकता या महिन्यात जाणवेल.

या महिन्यात पैशाची आवक चांगली असेल. रवि आणि बुध दोन्ही ग्रह भरपूर आवक या महिन्यात देतील. जुनी येणी वसूल होतील. त्यामुळे खर्च वाढला तरी तरतुद कशी करावी ही चिंता असणार नाही. या महिन्यात गुरु जो आपल्या खर्चाच्या, चिंतेच्या जागी बसून अस्वस्थता गेले वर्षभर वाढवत होता तो या महिन्यात आपले स्थान बदलून आपल्या राशीत येणार आहे. गुरूबदलाचे फ़लित दिवाळी अंकात वाचा.

धनू रास: आपल्या राशीला एक महत्वाचा बदल या महिन्याच्या अखेरीस होणार आहे तो म्हणजे गुरु बदल पण त्या बाबत स्वतंत्रपणे दिवाळी अंकात वाचा. हा महिना या वर्षभरातला असा आहे की जे काही मार्गी लावायचे असेल ते ह्याच महिन्यात ११ अक्टोंबर पर्यंत लावा. या नंतर मात्र खुप खर्च, मनाविरुध्द घटना यात वाढ होईल.

वरील लिहलेले वर्षभर अनुभवयास कमी अधीक प्रमाणात आले तरी हा महिना मात्र नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम असेल. नोकरी/व्यवसायात अनेक संधी चालून येतील. अधिकार वाढेल तसेच व्यावसायिकांना उत्पन्न नाही तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत वाढल्याचे लक्षात येईल. नविन निर्माण झालेल्या स्त्रोत कायमचे कसे हातात राहतील यावर विचार करा.

मकर रास : कितीही मनाविरुध्द घडले तरी शांत रहायचे हा आपला स्वभाव काही दिवसांकरता अचानक बदलत आहे असा भास नाही तर आपल्या राशीत आलेल्या मंगळाच्या मुळे सत्यात उतरेल. अर्थात डोक्यात राख घालून कडक रिअ‍ॅक्शन तुम्ही देणार नाही परंतु नापसंती नक्कीच दाखवाल. इतका आपला अधिकार आहेच तो कधीतरी दाखवायला काय हरकत आहे ?

महिनाभर अनेक हातात आलेल्या संधी विनाकारण जाऊ नयेत म्हणून प्रयत्नशील असा हे सांगण्याची आवश्यकता नाही हा आपला स्वभाव आहे. पण या साठी महिनाभर जागरुक रहा. प्रमोशन हातचे जाऊ नये म्हणुन लक्ष द्या. ५ अक्टोंबर नंतर असे घडू नये यासाठी हालचाल करा. संधी गेली म्हणजे परत येत नाही असे नाही परंतु काही काळ मात्र तसाच जातो हे निश्चित लक्षात असू द्या.

कुंभ रास : आपल्यासाठी हा महिना काही फ़ारसा चांगला नाही. निष्कारण खर्च, चिंता, आजारपण याने व्यापलेला असेल. वैवाहीक जोडीदारासोबत अनावश्यक संघर्ष होऊ नये म्हणून कोणत्या विषयात पडायचे नाही हे ओळखून कटुता कमी करता येईल. नोकरी / व्यवसायाच्या निमीत्ताने प्रवास आहे पण तो सुखकारक व्हावा यासाठी काळजी करा. प्रवासात काही हरवणार नाही, फ़सवले जाणार नाही यासाठी जागृत रहा.

नाही म्हणायला स्पेक्य़ुलेशच्या संधी या महिन्यात येतील पण किती कुंभ राशीचे लोक शेअर्स, रेस किंवा तत्सम भानगडीत पडतात ? त्या पेक्षा एखादे लॉटरीचे तिकीट काढा. किंवा जिथे खरेदी केल्याने काही लकी ड्रॉ काढला जाणार आहे तिथे गंमत म्हणुन नशीब अजमाऊन पहा. याच्या फ़ार नादी लागू नका हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही.

मीन रास: आपल्या राशीला या महिन्यात काही पैसे बिनकष्टाचे मिळणार आहेत यास्तव एखादी स्मरणात न राहीलेली मॅच्युअर होऊ पहाणारी विमा पॉलीसी तपासा जी अकस्मात बोनस देऊन जाईल किंवा वारसा हक्काने येणारे धन, लॉटरी इ. ने मिळणारे धन या महिन्यात मिळेल. दिवाळी साठी हा मोठा आनंददायक दिलासा असेल.

आपल्या वैवाहीक जोडीदार किंवा वुड बी/प्रेमपात्रा सोबत चांगला काळ जाईल तसेच संघर्ष सुध्दा होईल. यात बॅलन्स कसा साधायचा यासाठी कसरत करावी लागणार आहे. " तुमको जो पसंद वही बात करेंगे, तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे " या जुन्या हिंदी गाण्याच्या ओळी लक्षात ठेवल्यात तर जो काळ चांगलाच असेल त्याही काळात आधीच्या घटनांनी मुड गेला असे होणार नाही.

शुभंभवतु



Sunday, August 12, 2018

१७ ऑगस्ट २०१८ ते १६ सप्टेंबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य

नमस्कार, ज्योतिषप्रेमी लोकहो. मी घेऊन आलो आहे १७ ऑगस्ट २०१८ ते १६ सप्टेंबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य. या काळात रवि अर्थात सुर्य आपल्या स्वत:च्या म्हणजे सिंह राशीत असणार आहे. तसेच १८ ऐप्रिल २०१८ ला वक्री झालेला शनि ६ सप्टेंबर २०१८ ला मार्गी होणार आहे. त्या आधी २७ ऑगस्टला मंगळ मार्गी होऊन आजवर झालेल्या रस्त्यावरच्या अपघातांची संख्या कमी होईल.

हा महिना तसा सणांचा महिना आहे. १७ ऑगस्ट २०१८ ते १६ सप्टेंबर २०१८ या कालावधीत श्रावण महिन्याची सुरवात झालेली असेल. २६ सप्टेंबर २०१८ राखी पोर्णिमा, २ सप्टेंबर २०१८ ला श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि महिन्याच्या शेवटी १३ सप्टेंबरला गणरायाचे आगमन असे सर्वांच्या मनाला मोहून टाकणारे सण या महिन्यात आहेत.

मी आपल्याला काही उपाय दर महिन्याला सांगत असतो तसा या ही महिन्याला एक नाही तर दोन सांगणार आहे.

डॉक्टरी तपासणीत काही दोष नाही परंतु संतती नाही अश्या जोडप्याने श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी मंदीरातील जन्माष्टमी सोहळ्यात सहभागी व्हावे. विशेष पुजन करुन संतती व्हावी अशी प्रार्थना करावी. याच सोबत संतान गोपाल स्त्रोत्राचे १००० पाठ किंवा संतान गोपाल मंत्राचे ४००० पठण संकल्प पुर्वक दोघांनी करावे. श्रावण महिन्यात हे पाठ सुरु करुन कृष्ण जन्माष्टमीला संपतील अशी योजना करावी.

अनेक लोक घरात वाद विवाद, क्लेश यांनी त्रासलेले असतात. १३ सप्टेंबर ला होणारे गणरायाचे आगमन वातावरण आनंदाने भरुन टाकते. या निमीत्ताने घरात १० दिवस गणपती नसला आणि दिड दिवस असला तरी १० दिवस एकमेकांना टाकून बोलायचे नाही हा नियम करा. त्याच सोबत हे कृतीमधून पण दिसू द्या. उगाच आदळ आपट ह्या सारख्या रागामुळे होणार्या कृती हे दहा दिवस टाळा. एकदा या सुंदर वातावरणाची सवय १० दिवस झाली की पहा, हे वातावरण संपुच नये असे वाटेल. मग काय हरकत आहे ?

आता १७ ऑगस्ट २०१८ ते १६ सप्टेंबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य पाहू. हे आपल्या चंद्र राशी तसेच लग्न राशीकडुन सुध्दा वाचावे.

मेष रास : २७ ऑगस्ट पर्यत राशीचा स्वामी वक्री असल्यामुळे ४ मे पासून नोकरी/व्यवसायाच्या ठिकाणी सुरु असलेली कामाची धावपळ जरा मंदावली असली तरी २७ ऑगस्ट नंतर पुन्हा वेग येईल.  ७ नोव्हेंबर पर्यंत आता विश्रांती नाही. पुढील काही दिवसात चांगले नियोजन करुन अनेक कामे हातावेगळी करण्याची संधी चालून आलेली आहे. यात संघर्ष सुध्दा आलाच. आजवर तुमची बाजू रास्त असून संघर्ष टाळला असेल तर संघर्ष झालाच तर ही मात करण्याची संधी आहे हे जाणून संघर्ष करा.

१ सप्टेंबर नंतर शुक्र तुळ राशीत म्हणजे तुमच्या सातव्या स्थानी जातो. तुमचा स्वभाव आक्रमक असला तरी थोडेसे रोमॅंटिक व्हायला काय हरकत आहे. तरुणाईला हा काळ हातात हात घालून बागेत फ़िरण्याचा, वचने देण्याचा आणि घेण्याचा आहे. काही काळ उग्रपणा सोडून हा आनंद घ्या.

वृषभ रास : कमी कष्टात जास्त कमाई कशी होईल असा विचार करणारी अर्थ त्रिकोणातली आपली रास आहे. या महिन्यात राशीचा स्वामी शुक्र आपल्या स्वत:च्या राशीत १ सप्टेंबरला जाणार आहे. तुळ राशीतला शुक्राचा प्रवास व्यापारी असाल तर व्यवसायाच्या अनेक संधी देणार आहे. यातून होणारी कमाई थोडी उशीरा होणार म्हणुन नाराज होऊ नका. अजून दोन महिन्यांनी हा व्यापारातून प्रत्यक्ष फ़ायदा दिसेल. पण आत्ताच त्यासाठी सुरवात करणे आवाश्यक आहे.

नोकरदारांच्या साठी सुध्दा आपले महत्व निर्माण होईल अश्या कामांच्या सुसंधी येतील. जेणे करुन तुम्हाला वरिष्ठांना तुम्ही कसे फ़ायद्याचे काम करत आहात हे पटवून देऊ शकाल. ही संधी सोडू नका हे सांगणे तुमच्या राशीला अजिबातच आवश्यक नाही.

मिथुन रास : आपल्या राशीचा स्वामी या महिन्यात २ सप्टेंबरला तिसर्या स्थानी जातोय. तिसरे स्थान लेखन आणि संवाद कौशल्यासाठी महत्वाचे असल्याने २ सप्टेंबर पासून उत्तम संवाद साधण्याच्या सुसंधी चालून येतील. आपल्या हातून लेखन घडेल. प्रकाशक असाल तर पुस्तके प्रकाशनाचे काम घडेल. तुळेतल्या शुक्राशी बुधाचा लाभ योग होत असल्याने या लेखनाला नवनिर्मीतीची झळाळी असेल. उगाच इतर कोणाच्या लेखनाचे मुल्यमापनाचे काम सोडुन आता  स्वतंत्र लेखन तुम्ही करावे असा विचार करा.

 आपल्या संततीच्या सुवार्ता येतील त्यामुळे आनंद या महिन्यात अजूनच वाढणार आहे. या सुवार्ता शैक्षणिकच असतील असे नाही तर नोकरी- व्यवसाय संदर्भातील सुध्दा असू शकतील. संतती काही कारणाने दुर रहात असेल तर या महिन्यात प्रत्यक्ष भेट घडेल.

कर्क रास : वैवाहीक जोडीदाराशी संघर्षाचे वातावरण संपले नसले तरी या महिन्याच्या उतरार्धात दोन ग्रहांच्या राशीबदलामुळे मात्र वातावरण बदलणार आहे. शुक्र चतुर्थात आल्याने घरात नविन फ़र्निचर घ्यायचे की नविन गाडी या चर्चेला सुरवात झाल्याने मागील महिन्यात थोडी कटूता आली असली तरी ती संपेल. माफ़ करणे हा तुमचा स्वभाव असल्याने जणू काही घडलेच नाही या भावनेने तुम्ही या चर्चेत भाग घेऊन आपला चॉईस सांगाल.

घरात जेष्ठ व्यक्तींचे आगमन होण्याची शक्यता असल्याने आपण त्या पाहूण्यांच्या सरबराई साठी नियोजन करावे लागेल. घरच्या जेष्ठ व्यक्तीचे सगळ्यांच्या अपेक्षेनुसार स्वागत करुन स्त्री असाल तर हवे नको ते पहाणे हे काम तुम्हाला सहज जमते. केवळ औपचारीक पणाने नव्हे तर आस्थेने तुम्ही हे कराल त्यामुळे जेष्ठांच्या कौतुकाला पात्र व्हाल.

सिंह रास : तुमच्या राशीचा मालक रवि गेले महिनाभर राशी स्वामी कर्क या राशीत आणि त्यातून बाराव्या स्थानी असल्याने अनेकदा माना पेक्षा अपमान सहन करावा लागला असेल. पण आता राशीचा मालक महिनाभर तुमच्या स्वत:च्या राशी आल्याने तुम्हाला बळ प्राप्त होईल. तुमच्या नुसत्या दर्शनाने अनेकांची घाबरगुंडी उडेल त्यामुळे तुमचे किमान दर्शन अनेकांना घडेल अशी व्यवस्था करा बाकी सर्व आपोआप घडेल.

तुमच्या शत्रु स्थानी सध्या बलवान मंगळ असल्याने शत्रुच्या कारवाया जरी थंडावल्या असल्या तरी २७ तारखेनंतर पुन्हा त्याला शत्रुच्या कारवायांना तोंड फ़ुटेल. यावर कशी मात करायची याचा विचार करुन ठेवा. रवि सर्व ग्रहांचा राजा असल्याने असल्या कारवाया डाव्या हाताने थंड करण्याचे कसब तुमच्याकडे आहेच पण परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी निरिक्षण, परिक्षण आवश्यक आहे.

कन्या रास : कन्या राशीला हा महिना फ़ारसा चांगला नाही. राशीचा स्वामी बुध अशुभ फ़ळे निर्माण करणार्या स्थानातून आणि नक्षत्रातून जात असल्यामुळे व त्यातून तुमच्या राशीचा स्वभाव धाडसाने कृती करण्याचा नसल्यामुळे विचारपुर्वक कृती करा जेणे करुन यश मिळेल. व्यवसायाच्या निमीत्ताने प्रवास घडतील. जास्त शारिरीक मानसीक कष्ट होतील पण अपेक्षीत काम मात्र न होण्यामुळे निराशा सतावेल यासाठी तुम्ही कोणतेही काम सुरु करण्यापुर्वी उत्तम नियोजन करा. ते नियोजन जिथे तुमच्या नियंत्रणात नाही तिथे सुध्दा यशस्वी होईल अश्या योजना करा म्हणजे त्रास कमी होईल.

व्यावसायीक स्तरावर जरी जा महिना त्रासदायक असला तरी कौटुंबिक स्तरावर मात्र हा महिना बरा असेल. घरी स्त्रीवर्ग असलेल्या पाहूण्याचे आगमन असेल. या निमीत्ताने कौटुंबिक संमेलने होऊन आनंद होईल. आवडीचे अन्नपदार्थ खाण्याचे योग या निमीत्ताने महिनाभरात अधून मधून येतील.

तूळ रास : तुमच्या राशीचा स्वामी १ सप्टेंबरला तुमच्या राशीत येणार आहे आणि लाभेश रवि महिनाभर लाभ स्थानी असणार ही परिस्थिती तुमच्या राशीला चांगली आहे. या सोबत भाग्येश बुध लाभात असल्याने हा महिना लाभदायक आहे असे वर्णन या महिन्यासाठी यथार्थ आहे. या महिन्यात अनेक कामे मार्गी लागतील. यातून चांगले लाभ होतील हे वेगळे सांगावयाची गरज नाही.
गरज आहे झालेल्या लाभाचे उत्तम नियोजन करण्याची.

व्यावसायीक स्तरावर जरी उत्तम चालले असले तरी घरात मात्र अशांतता राहील. ही परिस्थिती अजून थोडे दिवस असणार आहे. घरगुती वातावरण स्फ़ोटक न होऊ देण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल तर हा महिना खुप त्रास न होता जाईल.

वृश्चिक रास : हा संपुर्ण महिना रवि तुमच्या कर्म स्थानी असणार आहे. ज्यांचे प्रमोशन होणे अपेक्षीत आहे त्यांना ते मिळेल किंवा त्या संदर्भात हालचाली होतील. ज्यांचा जन्म १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर काळातला आहे व दुपारी १२ च्या दरम्यान आहे त्यांना तर हा अनुभव येण्याची शक्यता अजून जास्त आहे. काहींना ह्या महिन्यासाठी वरिष्ठ रजेवर असल्यामुळे अधिकार प्राप्त होणे अपेक्षीत आहे.

आपल्याला काही पैसे रोकड यांचा व्यवहार करणे अपेक्षीत आहे. कुठेही रोख स्वरुपात रक्कम आजकाल फ़ारशी हाताळली जात नाही. पण गरज भासल्यास आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कौटुंबीक स्तरावर उतरार्धात आपला वैवाहीक जोडीदार आपल्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. इतका भाग सोडला तर महिना चांगलाच जाणार आहे.

धनू रास :  हा महिना आपल्या साठी चांगले ग्रहमान घेऊन आलाय. धार्मिक यात्रा आपल्याला या महिन्यात घडणे संभव आहे. श्रावण महिना, आपला धार्मिक स्वभाव आणि धार्मिक यात्रा हा संयोग छानच आहे. या महिन्यात आपल्या वैवाहीक जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. फ़ारसा मोठा शारिरीक त्रास होईल असे संभवत नाही पण काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.

आपण लेखक असाल आणि आजवर आपल्या लेखनाचे पैसे येणे असतील तर जरा मागणी करुन पहा. या महिन्यात हे काम होईल. आपल्याला नविन मित्र मिळतील त्यातून नविन लाभ होणे, व्यावसायीक संधी उपलब्ध होणे अपेक्षीत आहे.

मकर रास : खुप दिवस मंगळ आपल्या लग्न स्थानी आहे. गेले महिनाभर वक्री होता तो २७ ऑगस्टला मार्गी होऊन पुन्हा आपली अडलेली कामे मार्गी लावणार आहे. अर्थातच ही संधी ७ अक्टोंबर पर्यंत असल्याने जे जे आपल्याला मार्गी लावावेसे वाटत आहे त्याची योजना करा.
हे करत असताना या महिन्यात आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. यास्तव बेसावध राहू नका.

महिनाभर वैवाहीक जोडीदाराबरोबर खटके उडत असतील तर आता या महिन्याचा उतरार्धात आता ते थांबेल. या महिन्यात आपले वडील जर लांब रहात असतील तर त्यांची भेट महिन्याच्या उतरार्धात व्हावी. जर आपल्या सोबत असतील तर दिवसाचा जास्त काळ त्यांचा सोबत जाईल. त्यांचे प्रेम आणि आशिर्वाद याचा लाभ होईल. ज्यांचे वडील भेटणे शक्य नसेल त्यांना हाच अनुभव वडीलधार्या व्यक्तीकडून मिळेल.

कुंभ रास : नोकरी व्यवसायानिमीत्त प्रवास अजुनही काही दिवस घडणे शक्य आहे. अश्या प्रवासामुळे काही लाभ होणे अपेक्षीत आहे. याला जोडून एखादी धार्मिक स्थळाची यात्रा करण्याचा योग आल्यास ही एक सुसंधी मानावी लागेल. संतती संदर्भात काही चिंता निर्माण झाली असेल तर ती या महिन्यात दुर होईल.

काही लोकांना आपला जोडीदार फ़ारच रोमॅटीक होतो आहे असा महिनाभर अनुभव येईल. अशी संधी कुंभ राशीला वारंवार येत नाही त्यामुळे हा ही अनुभव घ्यायला तयार रहा.

मीन रास : आरोग्याची काळजी घ्यावी असा महिना आहे. ज्यांनी चाळीशी ओलांडली आहे त्यांनी नियमीत पथ्य आणि औषधे याकडे दुर्लक्ष करु नका. एखादा मोठा प्रोजेक्ट हातात आहे पण थांबला आहे किंवा संथ झाला आहे असे दिसत असेल तर २७ ऑगस्ट नंतर पुन्हा त्याची प्रगती सुरु होईल. आपला नोकरी/व्यवसाय जर अडचणीत असेल तर हा महिना उलटताच त्याला दिशा सापडेल.

या महिन्यात फ़ारसे काही महत्वाचे घडेल असे नाही पण आपले प्लॅनिंग असू द्या. हा वेळ त्यासाठी द्या.

हे राशीभविष्य दर महिन्याला वाचण्यासाठी माझ्या https://www.facebook.com/gmjyotish/ या फ़ेसबुक पेज ला लाईक करा.
जर आपल्याला या शिवाय ज्योतिषशास्त्र विषयात रस असेल तर https://www.facebook.com/groups/npastrogroup/ या
ज्योतिषविषयक समुहाला जॉईन करा.




Monday, July 2, 2018

नक्षत्रप्रकाश वर्षपूर्ती विशेषांक २०१८

Monday, June 25, 2018

व्हावे मोकळे आकाश

व्हावे मोकळे आकाश

१९९२ सालची दिवाळी मधे एक पुस्तक माझ्या हाती पडले. पुस्तकाचे नाव होते अंधश्रध्दा एक प्रश्नचिन्ह. लेखक डॉ. नरेंद्र दाभोळकर. ( मी स्वत: डॉ नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली याचा निषेध करतो. कुणाचीही हत्या याने कोणतेच प्रश्न सुटत नाहीत असे माझे मत आहे. डॉ नरेंद्र दाभोळकरांनी केलेले भानामती, करणी, बुवाबाजी या विरुध्दचे काम हे अत्यंत प्रशंसनीय आहे ) या पुस्तकात कशावरुन ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली असा प्रश्न डॉ साहेबांनी विचारला होता. यासंदर्भात आमचा पत्र व्यवहार झाला तेंव्हा फ़लज्योतिष अशास्त्रीय आहे असे मत त्यांनी लिहले आणि किंबहुना मी ज्योतिष यासाठी शिकायला लागलो.

मी तीन कुंडल्या देतो. या व्यक्ती जिवंत की मृत हे आव्हान  अंधश्रध्दा निर्मुलन समीतीने भारतातल्या ज्योतिषांना काही वर्षांपुर्वी दिले. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने ते अनेक वर्षांपुर्वीच स्विकारले आहे. अंधश्रध्दा निर्मुलन समितीने आ्जही महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने दिलेली उत्तरे, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी घातलेल्या अटी झाकून आजही एखादी व्यक्ती मृत आहे की जिवंत असा अशास्त्रीय प्रश्न विचारण्याची प्रथा सुरु ठेवली आहे. माझ्या मते ज्या गोष्टीचे उत्तर ज्योतिष शास्त्रा शिवाय मिळते, तो प्रश्न का विचारायचा ?

भारतीय दंडसंहीतेने सुध्दा परागंदा व्यक्ती सात वर्षे पर्यंत गायब असल्यास त्या व्यक्तीच्या जोडीदाराला विवाह बंधनातून मुक्त होण्याची परवानगी देऊन आपली मुक्तता केली असताना, ह्या प्रश्नाचे उत्तर देण्याची सक्ती मात्र ज्योतिष मानणार्या व्यक्तींना केली जाते. अन्यथा ज्योतिष हे शास्त्रच नाही असे आम्ही म्हणु अशी धमकी दिली जाते.

"So far as prayer related to astrology is concerned, the Supreme Court has already considered the issue and ruled that astrology is science. The court had in 2004 also directed the universities to consider if astrology science can be added to the syllabus. असा स्पष्ट निर्वाळा सुप्रिम कोर्टाने दिला आहे.

२००४ मधे ज्योतिष हे शास्त्र आहे, भारतीय उच्च महाविद्यालयातून ज्योतिष शिकवले जावे असा स्पष्ट निकाल दिलेला असताना महाराष्ट्रात पुन्हा एक याचीका मुंबई हायकोर्टात दाखल झाली होती. ही याचीका जनहित मंच च्या वतीने भगवानजी रियानी आणि त्यांचे सहकारी दत्ताराम कुमकर यांनी  दाखल केली होती.

The (PIL) filed by Janhit Manch and its convener Bhagwanji Raiyani, along with his associate Dattaram Kumkar, had questioned the validity of predictions by many well-known astrologers.

ही जनहितार्थ याचीका मुंबई हायकोर्टाने फ़ेटाळून यापुढे ज्योतिष विषयाला भारतीय दंडसंहिता च्या या जाहीरात विषयक कायद्याच्या अंतर्गत आव्हान देता येणार नाही असे एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे.

माझ्या माहितीत आज ज्योतिषशास्त्र विरोधात कोणतीही जनहितार्थ याचिका प्रलंबीत नाही. मी जेंव्हा ज्योतिषशास्त्र असे लिहले आहे तेंव्हा कुंडली माध्यमातून फ़लीत वर्तवणारे शास्त्र मला अपेक्षीत आहे. वास्तू, डाउझींग, हस्तसामुद्रीक इ. बाबत नाही.

असे असताना यु.जी.सी अंतर्गत महाविद्यालये मात्र ज्योतिषशास्त्र विषयक अभ्यासक्रम शिकवण्यास तयार नाहीत किंवा कालीदास युनिव्हर्सिटी असा अभ्यासक्रम शिकवत असताना तो समकक्ष म्हणुन त्याला मान्यता नाही. यामुळे यावर संशोधनपर प्रबंध लिहीण्यास अडचणी आहेत. इंटर डिसीप्लीनरी अश्या अंतर्गत सुध्दा याला मर्यादा येत आहेत.

ज्योतिषशास्त्र अभ्यासकांमधे असे काही उत्तम अभ्यासक आहेत ज्यांनी आपली आयुष्ये खर्ची घालून जे काय संशोधन आजवर केले आहे ते त्यांच्या पर्यंतच राहील आणि अभ्यास म्हणुन पुढे येणार नाही अशी अवस्था झाली आहे. भारतीय जनतेला याचा उपयोग होणार नाही.

जन्माला आल्या आल्या या जातकाला डायबेटीस होईल की नाही हे वर्तवण्याचे तंत्र ज्योतिषभास्कर सुरेंद्र पै यांनी कुंडलीच्या अभ्यासाने विकसीत केले आहे. १९८९ साली प्रसिध्द झालेल्या मेडीकल अ‍ॅस्टोलॉजीवर आधारीत कुंडलीद्वारे रोगनिदान या पुस्ताकात या तंत्राचा आणि अनेक रोगांचा उल्लेख आहे. डायबेटीस हा नजीकच्या काळात भारतात वाढणार असल्याचे तज्ञ म्हणतात. कुणालाही जर कुंडली अभ्यासाने डायबेटिस होणार असे समजले तर ती व्यक्ती खुप आधीपासून आपली लाईफ़ स्टाईल बदलून या रोगापासून बचाव करेल असा उपयोग या शास्त्राचा आहे. परंतु ज्योतिषशास्त्र नाही असा प्रचार केल्यामुळे या पध्दतीच्या संशोधनाला सुध्दा युनिव्हर्सीटी मधे मान्यता मिळत नाही. असे झाले  तर हे शास्त्र फ़क्त भाग्य कधी उजाडेल ? लग्न कधी होईल इथपर्यंतच मर्यादीत राहील.

मी ज्योतिष शिकायला १९९२ साली सुरवात केली तेंव्हा स्वत: ला बुध्दीजीवी समजणारे लोक  ज्योतिष हे शास्त्र नाही असा प्रचार करत होते.. माझ्या मते आज हा प्रचार संपला आहे. घुसमट नाही परंतु प्रोत्साहन सुध्दा नाही अशी काहीशी अवस्था आहे. भारतातील सर्वांनी किमान ज्यांना शिक्षण, शैक्षणीक अभ्यास, संशोधन, त्याला मिळणारी मान्यता याची महती समजते त्यांनी हा ज्योतिषशास्त्र हा विषय युनिव्हर्सीटी अभ्यासक्रमात असावा असा आग्रह धरला पाहिजे.

हे सर्व बदलावे, यु.जी.सी ( युनिव्हर्सीटी ग्रॅन्ट्स कमिशन ) या संस्थेने मान्यता दिलेल्या युनिव्हर्सिटी मधून ज्योतिषशास्त्र शिकवले जावे असे मला वाटते. हे सर्व घडणार कसे या साठी सध्याचे एच आर डी मिनीस्टर माननीय प्रकाश जावडेकर साहेब, जे सर्व युनिव्हर्सीटी संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतात तसेच यु.जी.सी ( युनिव्हर्सीटी ग्रॅन्ट्स कमिशन ) च्या मुख्य अधिकार्यांना एक पत्र लिहून त्याचा पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे.

मी खाली मसूदा देत आहे. आपण त्याला मान्यता देऊन यु.जी.सी ( युनिव्हर्सीटी ग्रॅन्ट्स कमिशन ) मान्यताप्राप्त युनिव्हर्सीटी मधे ज्योतिषशास्त्र विषयक अभ्यासक्रम सुरु व्हावा यासाठी आपले आग्रहपुर्वक मत द्यावे ही विनंती.

मा. प्रकाशजी जावडेकरसाहेब, केंद्रीय मनुष्य संसाधन मंत्री
भारत सरकार

महोदय,

नक्षत्रप्रकाश चे सदस्य असलेले सर्व सभासद आणि ज्योतिषप्रेमी आपणास नम्र निवेदन करतो की माननीय सुप्रिम कोर्टाने २००४ मधे ज्योतिष हे शास्त्र आहे असा निर्वाळा देऊन आता १४ वर्षे झाली. अद्याप युजीसी ने हा विषय युनिवर्सिटी माध्यमातून शिकवण्यास मान्यता दिलेली नाही. आपणास विनंती आहे की या संदर्भातले अडथळे दुर करावेत.

आपले नम्र,

ज्योतिषप्रेमी, अभ्यासक
भारतीय नागरीक

आपणास विनंती आहे की आपण ह्या सोबत असलेल्या लिंक ला जोडलेल्या मतप्रदर्शनात आपले बहुमोल मत द्यावे. जेणे करुन हा पत्राचा मसुदा व मत संख्या यातून निर्माण होणार्या भावना माननीय मनुष्य़बळ मंत्री यांच्याकडे सुपुर्त करता येतील.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScpo8R6AAjZYLvqKMb5__oIxb2dBpVY7zSrd_2Gr7-BhET4kQ/viewform

Sunday, June 10, 2018

१५ जून ते १५ जुलै या महिन्याचे भविष्य आणि पावसाचे प्रमाण कसे असेल याचा ज्योतिषशास्त्रीय अंदाज

नमस्कार ज्योतिष प्रेमी लोकहो. दरमहिना जेव्हा रवि राशी बदलतो त्या महिन्याचे भविष्य मी लिहून प्रसिध्द करत असतो. आपला प्रतिसादही उत्तम असतो या करिता धन्यवाद. आज मी भविष्य लिहीयला सुरवात केली आहे तो दिवस ६ जून आहे. १ जून पासूनच वातावरण पावसाळी झालेले आहे. ८ जून ला रविचा मृग या पावसाच्या नक्षत्रात प्रवेश होईल. एक अत्यंत जुने ज्योतिषशास्त्र निर्मीत पावसाचे मॉडेल आहे. रविच्या नक्षत्रावरुन ( त्याचे वाहन शोधून ) त्या द्वारे पाऊस वर्तवण्याचे. मागील वर्षी मी असे पाऊसमान वर्तवले होते जे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाशी साधारण पणे जुळले.  मी यावर्षी सुध्दा २०१८ पावसाळ्यात पाऊस कसा पडेल यावर लेख लिहला आहे.

पावसाशी आपला संबंध आपण शेतकरी असाल तर जवळचा आहेच पण भारतीय अर्थव्यवस्था आजही खरीप अर्थात पावसाच्या पाण्याशी संबंध प्रस्थापीत करुन आहे. दुष्काळ आणि महागाईचा आणि अर्थात प्रत्येक सामान्य माणसाशी संबंध आहे.

हा लेख मी माझ्या ब्लॉग वर लिहला आहे. ही त्याची लिंक घ्या आणि वाचा.

पावसाचे प्रमाण कसे असेल याचा ज्योतिषशास्त्रीय अंदाज


मागील महिन्यात मी मकरेचा मंगळ आणि जमिन/वास्तू विषयक कामासंबंधात लिहले होते. या महिन्यात २६ जून पर्यंत त्यांनी वास्तू संबंधातल्या कामाविषयी गती घेण्यास हरकत नाही. माझा वैयक्तीक अनूभव असा. माझ्या घराच्या शेजारी एका वास्तूचे काम TDR ट्रान्स्फ़र च्या कामासाठी रखडले होते. २ मे २०१८ ला मकरेत मंगळ गेला आणि ते मार्गी लागले. आता ती इमारत वेगाने पुर्ण होते आहे.

या माहिन्यापासून एक छोटासा उपाय मी आपल्याला सांगणार आहे. ज्यामुळे आपले आयुष्य सुखकर होण्यास मदत होईल. घरात देवपुजा करताना आवर्जून कापूर वापरा. कर्पुर आरती केल्याने घरातील वातावरण शुध्द होते. घरातले वाद- विवाद कमी होतात. हा उपाय सांगताना चांगला कापूर कुठे मिळतो हे ही सांगणे आवश्यक आहे. सनातन ही संस्था अत्यंत उत्तम कापूर माफ़क किमतीत उपलब्ध करुन देते. आजवर जे कापूर वापरतात पण सनातन संस्थेचा कापूर वापरला नसेल त्यांनी वापरून पहा.

आपल्या लग्नराशी व चंद्र राशीनुसार राशीभविष्य वाचा, अनुभव कळवा. आपल्या व्हाटस अप किंवा दुसर्या समुहावर फ़ॉर्वड करा त्यासाठी प्रोत्साहन आहे.

आता राशीभविष्या विषयी राशीनिहाय पाहू.

मेष रास: मेष राशीचा स्वामी मंगळ सध्या मकरेत असून तो २६ जूनला वक्री होणार आहे. या नंतर आपल्या इच्छा शक्तीच्या जोरावर नोकरी/व्यवसायात आपल्याला काम करावे लागेल. २७ ऑगस्ट पर्यत ही स्थिती असल्याने ज्यांचे व्यवसाय घरबांधणी किंवा त्या संदर्भात असेल त्यांनी एक छोटासा उपाय करावा. दर मंगळवारी एक नारळ मारुतीच्या मंदीरात वहावा/ पुजारी असल्यास वाढवावा. याने अडचणी दूर होतील.आपल्या चतुर्थात शुक्राचा प्रवास सध्या सुरु आहे. सुखाची झोप ४ जुलै पर्यंत आपल्याला आहे. एखादी नविन वस्तू नक्की खरेदी कराल ज्याने घरात रहाणे सुखकारक होईल. महिन्याच्या सुरवातील काही घरातील महिला संदर्भात घटना घडतील पण फ़ार काळजीच्या असतील असे नाही.

वृषभ रास: आपल्या राशीचे चिन्ह आपण कष्टाळू आहात असे दर्शविते. हे खुप छान आहे. कधीतरी आराम करावा अशी संधी ४ जुलै ते १ ऑगस्ट २०१८ पर्यंत आहे. काही जमले नाही तर वेळेवत घरी या. आपल्या घरच्या लोकांच्या समवेत वेळ द्या. पहा एका वेगळा आनंद आपल्याला मिळेल. आपण व्यावसायीक असा किंवा नोकरदार. काही चिंता असणारच आहेत. पण कधीतरी आराम करा किंवा घरच्यांना वेळ द्या. १० जुलै नंतर आपले अर्थिक प्रश्न हळू हळू मार्गी लागतील ही जमेची बाब या महिन्या पासून चांगली घडणार आहे.

मिथुन रास: आपल्या राशीचा स्वामी स्वत:च्या राशीत आणि तुमच्या राशीत २५ जुन पर्यंत असल्याने काही महत्वाची कामे मार्गी लावा. २७ जून ते ७ जुलै या कालावधीत जी कामे आपण सहजा सहजी करता त्याला खिळ लागू शकेल. या कालावधीत जर काही महत्वाचे घडणार असेल त्याचे प्लॅनिंग चांगले करा. तुमच्या कल्पना शक्तीचा वापर करुन आजवर बुडीत खात्यात पडलेले धन पुन्हा मिळवण्याची संधी २७ जून पर्यंतच आहे. यामुळे यावर विचार करा. १० जुलै नंतर संतती संदर्भात एखादी सुवार्ता कानी पडेल.

कर्क रास: आपल्याला २३,२८ ३० जून आणि ४ व ७ जुलै हे दिवस मनाला त्रास देणारे ठरतील. बाकी दिवस नेहमीसारखेच असतील. ४ जुलै नंतर आपल्या धनस्थानी शुक्र जात आहे. काही पैसे शिल्लक दिसत असतील तर योग्य ठिकाणी गुंतवा असा संदेश घेऊन हा शुक्र आलेला आहे. आपल्याला कुणी लग्नासाठी प्रपोज केले असेल तर त्यावर विचार करा. चांगली व्यक्ती असून उत्तर देण्यात चाल ढकल केली असेल तर हे सर्व दिर्घ काळ मागे पडू शकेल.  यासाठी २६ जून पुर्वी विचार पुर्वक निर्णय घ्या.

सिंह रास : राशीचा मालक कर्म स्थानात महिनाभर मुक्काम ठोकून असेल. पॉलिसी प्रमाणे जर प्रमोशन मिळणे असेल तर त्या दृष्टीने हा कालावधी उत्तम आहे. प्रयत्न करा. सरकारी खात्यात असाल तर या महिनाभरात चांगली शिफ़ारस मिळेल. हे सर्व आधीच घडले असेल तर प्रमोशनचे ऑर्डर हातात मिळेल. राशीभविष्यावर टिकाकार म्हणतात की याचा अर्थ जगातल्या १/१२ टक्के लोकांना प्रमोशन मिळणे शक्य आहे का ? याचे उत्तर नाही. पण या दृष्टीने चांगले केलेले काम वरिष्ठांच्या नजरेस पडण्यास अनुकूल काळ आहे. अनेकांना ह्या महिनाभरासाठी विशेष अधिकार प्राप्त होऊ शकतो मग तो साहेबांच्या दिर्घकालीन रजे मुळे असेल किंवा डेप्युटेशन मुळे असेल. इतर लोकांची सरकारी खात्यात अडकलेली कामे मार्गी लागतील.  व्यावसायीकांना उत्तम लाभ घडेल असे ग्रहमान आहे. २५ जून ते ४ जुलै हा खर्चाचा काळ सोडला तर तर बाकी महिना ठिक जाईल.

कन्या रास: राशीचा मालक बुध महिनाभर कर्म व लाभ स्थानातून भ्रमण करणार असल्याने कर्म केले की तात्काळ फ़ळ असे ग्रहमान सध्या दिसत आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लावा. त्यात नक्की काही प्रमाणात यश मिळणारच आहे. २५ जून ते ४ जुलै तर येणारे संभाळण्यास दोन हात अपुरे पडतील असे ग्रहयोग आहेत. ४ जुलै नंतर प्रवासाचे योग आहेत. तिर्थयात्रा असो की प्लेजर टुर यातून नक्की आनंद मिळेल. लक्ष पुर्वक येणार्या संधीचा लाभ घ्या.

तूळ रास : तूळा राशीवर सुध्दा या महिन्यात ग्रह प्रसन्न आहेत. नोकरी / व्यवसायात अश्या अनेक संधी पुढे येतील. अनेकदा नोकरदारांना एखादे अचानक /अनपेक्षीत काम त्रासाचे वाटते. पण हीच पुढे संधी असते हे वाक्य लक्षात ठेऊन महिनाभर येणार्या कामाकडे सकारात्मक दृष्टीने पहा. अचानक शेअर्स चा भाव भुतो न भविष्यती वाढेल. किंवा अचानक धन लाभाचे योग चार जुलै नंतर येऊ शकतात. वारसा हक्क मिळणे अडकले असेल तर ते ही काम होऊन जाईल. लाईफ़ इन्शुरन्स पॉलीसी मॅच्युअर होणार असेल तर अनपेक्षीत जास्त मॅच्युरिटी बोनस मिळेल. प्रॉपर्टी संदर्भातली कामे मार्गी लागण्याचे योग ही मागील महिन्यापासून आहेत. घराचा ताबा अडला असेल तर तो २६ जून पर्यंत प्रयत्न केल्यास  मिळून जाईल असे उत्तम ग्रहमान आहे.

वृश्चिक रास : काय धाडस करायचे ते २६ जून पुर्वीच करुन निर्णय घ्या. एकदा मंगळ २६ जून नंतर वक्री झाला त्यानंतर की जरा जास्तच प्रयत्न करुन मगच यश मिळेल. नोकरी व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल. प्रसिध्दी मिळेल असे योग आहेत. गेले एक दोन महिने खराब असलेले ग्रहमान या महिन्यात पुर्ववत होऊ लागेल. ४ जुलै नंतर रखडलेले खुप काही मार्गी लागेल असे ग्रहमान आहे. महिना खुप उत्तम जाईल असे नाही परंतु खराब निश्चित नाही.

धनू रास : राशीचा स्वामी गेले ३-४ महिने वक्री होता तो १० जुलैला मार्गी झाल्याने त्यातूनही त्याचा मुक्काम अक्टोबर पर्यंत लाभ स्थानी असल्याने अनेक प्रकल्पांना दिशा मिळेल. अनेक नव्या व्यावसायीक संधी चालून येतील असे ग्रहमान या महिन्याचा पुर्वार्धात आहे. रवि सहाव्या स्थानी आल्याने आपल्याला सरकारी कागदाचा वापर करुन अनेक कामे मार्गी लावता येतील. वडीलांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. तुमच्या स्वत: च्या तब्येतीचे प्रश्न असतील तर या महिन्यात चांगले औषध मिळून किंवा त्याच्या शिवाय आराम पडेल असे ग्रहमान आहे.

मकर रास : जोवर शनि मार्गी होत नाही आणि धनु राशीतून मकरेत येत नाही ( २४ जानेवारी २०२० )  तोवर कष्ट/त्रास/खर्च आपली पाठ सोडणार नाही हा पार्श्वभुमीवर येणारे ग्रहमान कितीही अनुकूल असले तरी सुर्यापुढे काजव्यांचा प्रभाव कितीसा पडणार ? जमेची बाजू आपली चिकाटी आणि स्थिर बुध्दी आहे. दशमात गुरु मार्गी झाल्यावर कामाचे तास वाढणार आहेत. सप्तमात आलेला शुक्र व्यवसायात भरपूर फ़ायदा देणार आहे तसेच आपल्या जोडीदाराचा सहवास आपल्याला सुखावह वाटणार आहे. प्रेमात असाल तर होकार मिळेल. होकार असेल तर सहवास लाभेल असे ग्रहयोग तरुणाई साठी आहेत. चांगला रोमॅंटिक सिनेमा पहायला जा उगाच डोक्याला ताप होईल असे काही पाहू नका. या महिन्यात हेच काय ते फ़ळ तुमच्या तपाला.

कुंभ रास : राशीचा मालक वक्री असला तरी लाभात आहे त्यामुळे महिनाभर यश मिळेल पण विलंब होणार याची जाणते झाल्यापासून सवय झालेली असेल. तुमच्या राशीचा भाग्येश शुक्र सहाव्या स्थानी असल्याने ४ जुलै पर्यंत खोळंबा होतो आहे असे जाणवत राहील. ४ जुलै नंतर मात्र तो सुख घेऊन येईल. तत्पुर्वी वायू राशीतील बुध आणि गुरु यांचे योग झाल्याने अनेक प्रमेये बुध्दीच्या जोरावर तुम्ही लिलया सोडवाल.  हे प्रमेय आपण कसे सोडवले याबाबत आश्चर्य करत रहाल. नवनिर्मीतीचा खुप आनंद या महिन्यात सुरवातीलाच तुम्हाला मिळून जाईल.

मीन रास :  निराशा होण्यास कारण आहे पण जिद्दीने प्रयत्न करत रहा असा सल्ला द्यावासा वाटतो. दगड फ़ोडुन मुर्ती घडवायचे काम तुम्हाला नियतीने दिले आहे. प्रत्येक दगडावरच्या घावाला लगेच काही घडत नाही. पण याचा अर्थ ते श्रम/ कष्ट फ़ुकट गेले असे मात्र नाही. यासाठी दररोज पुढे जाण्याचा संकल्प मात्र करणे आवश्यक असते. तेव्हढे नियमाने करा. १० जुलै नंतर मुर्तीला आकार प्राप्त होईल. यानंतर मात्र आकार मिळालेली मुर्ती सुबक कशी दिसेल याकडे लक्ष द्यावे लागेल. श्रमाचा/कष्टाचा मार्ग जिद्दीने चालायचा आहे हा मतितार्थ आहे.

शुभंभवतु



Monday, June 4, 2018

२०१८ पावसाचे मॉडेल आणि ज्योतिषशास्त्रीय अंदाज

१ जून २०१८ ही तारीख आली की पावसाचा मौसम सुरु होतो. शेतकरी पावसाच्या अंदाज अजमावत आपले कामाचे व्यवस्थापन करतात तर मुंबईकरांच्या जीवाला घोर लागतो.

मागच्या वर्षी
१) २४ जुलै २०१७ ला ४५१ एम एम पाऊस पडला आणि मुंबई जलमय झाली.
२) २९ ऑगस्ट २०१७ ला ४६८ एम एम पाऊस पडला आणि मुंबई जलमय झाली
३) १९ सप्टेंबरला ते २० सप्टेंबर २०१७ च्या दरम्यान  मधे ३०३ एम एम पाऊस पडला.

वरील तीन दिवसापैकी ज्या दिवशी भरती असावी कारण त्या दिवशी मुंबई जलमय होताना त्याची परिणामकता जास्त होती.

या लेखाचे दोन भाग असतील.

अ) एकूणच जून २०१८ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत भारतात पावसाचे प्रमाण काय असेल?
आ) मुंबईत जलमय होण्याची शक्यता असलेले दिवस कोणते असतील ?

पहिला भाग - पावसाचे मॉडेल आणि भारत भर पाऊस कसा पडेल.

दुसरा भाग - मुंबईमधे कोणत्या तारखांना खुप पाऊस पडण्याची शक्यता आहे 

१) १६ - १७ जून २०१८ मध्यम
२) १४-१५ जुलै २०१८  मध्यम ते जास्त
३) १०-११  ऑगस्ट २०१८ मध्यम
४) ७ व ८ सप्टेंबर २०१८ मध्यम

एकंदरीत मुंबईत ३०० एम एम पेक्षा कधीही जास्त पाऊस या तारखांना पडण्याची शक्यता नाही.
मुंबई २०१८ साली तरी जलमय होण्यापासून बचावेल.

महत्वाचे - हे सर्व अंदाज आहेत. वाचकांनी सोबत हवामान खात्याचा अंदाज घेऊन मगच कृती करावी.

Tuesday, May 8, 2018

१४ मे ते १४ जून २०१८ चे राशीभविष्य, अधिक महिना आणि मकरेचा मंगळ

ज्योतिषप्रेमी लोकहो नमस्कार, दर महिन्यात आपण राशीभविष्य पहातो. रविचा राशीबदल गृहीत धरुन तो पहातो. या महिन्यात रवि वृषभ राशीत १४ मे २०१८ ते १४ जून २०१८ या कालात असणार आहे. याच दरम्यान मराठी अधिक जेष्ठ महिना येत असल्यामुळे कोणीतरी अशी शंका विचारेल की रविचा राशीबदल होत नाही तो अधिक महिना असे असताना मी, रवि वृषभ राशीत महिनाभर असेल अस कस म्हणतो ?

मराठी अधीक महिना १५ मे रोजी रात्री ०७ वाजून ५० मिनीटांनी सुरु होईल. तर रविचा राशी बदल १४ मे राजी पहाटे ०५ वाजून २ मिनीटांनी झालेला असेल. अधीक महिना १३ मे रोजी रात्री ०१ वाजून १३ मिनीटांनी संपेल तर  रविचा मिथुन राशीत प्रवेश १५ जून ला सकाळी ११ वाजून ३६ मिनीटांनी होईल. अधिक जेष्ठ महिन्यात रविचे राश्यांतर होत नाही म्हणुनच याला मल मास म्हणतात.

मलमासात विवाह होत नाहीत कारण त्या मासाला शुध्दी नसते. पण याचा अर्थ अधिक जेष्ठ मासात विवाहाची बोलणी करु नयेत असे मात्र नाही. विवाहाची बोलणी विनाकारण लांबवू नयेत. अधिक मासात साखरपुडा होऊ शकतो, नामकरण अर्थात बारसे होऊ शकते किंवा गृहप्रवेशही करायला हरकत नाही. फ़क्त विवाह मुहूर्त नसतात इतकेच लक्षात घ्यावे.

या काळात नविन जप, व्रत याचा आरंभ करु नये असे शास्त्र सांगते. पण आपली नित्याची पुजा, आधी घेतलेली व्रते सुरु ठेवण्यास अडचण नसते. अधिक मासात आपल्या जावयांना बोलावून त्यांना अनारसे द्यावेत, या निमीत्ताने भेट वस्तू देऊन नाते वृध्दींगत करावे.

ज्या मुलांनी पालकांच्या संमतीशिवाय विवाह केलेला आहे आणि मुलीशी /जावयाशी संबंध बिघडले आहेत अश्या पालकांनी या महिन्यात या निमीत्ताने जावयाला/लेकीला घरी बोलवून यथोचीत सन्मान करावा. ही नविन प्रथा सुरु करण्यास काय हरकत आहे असे मला या निमीत्ताने सुचवावेसे वाटते. ( लव्ह जिहाद सारख्या प्रकरणाची चाहूल लागताच मुलीला समजवा. ते घडुच देऊ नका.  ते प्रेम नाही. षडयंत्र आहे. यावर जास्त लिहीणे योग्य नाही. मी लव्ह जिहादचे समर्थन करत नाही इतकेच सांगणे आहे )

सैराट नावाचा सिनेमा मी पाहिला. त्याचा शेवट मला चटका लावून गेला. सिनेमा हे प्रबोधनाचे साधन आहे म्हणताना ऑनर किलींगच्या घटना महाराष्ट्रात जवळ जवळ नसताना, माननीय नागराज मंजुळे यांनी असा शेवट दाखवून काय मिळवले ? असा प्रश्न मला पडला होता. अधिक मासाच्या या निमीत्ताने एखाद्या कुटुंबाने, अश्या विवाह संबंधांना मान्यता देऊन जर जावयाला अधीक महिन्याच्या निमीत्ताने घरी बोलावले तर  नातेसंबंध सुधारतील. हा पायंडा, ऑनर किलींगसारख्या घटना घडु नयेत व  जातीय विषावरचा उतारा आहे असे मला वाटते. दर वेळेला प्रेमविवाह आंतरजातीय असतोच  असे नाही. अनेकदा पालकांचे अहंकार प्रेमविवाहाला मान्यता देत नाहीत. असे अहंकार म्हणजे सुध्दा नातेसंबध सुधरण्यास अडथळा आहे. तो दुर करण्यास ही संधी आहे.

२ मेला मंगळ मकर राशीत गेला आहे. तो ६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत मकर राशीत असणार आहे. मकरेमधे गेलेला मंगळ ज्यांना स्वत: चे घर खरेदी करायचे आहे त्यांना फ़िरुन प्रयत्न करायचे आहेत अश्या लोकांसाठी उत्तम संधी आहे. ज्यांच्या पत्रिकेत मकरेचा मंगळ आहे त्यांना प्रॉपर्टीत वाढ करण्याची सुवर्ण संधी आहे. स्वत: चे घर होण्यास अनंत अडचणी आहेत असा ज्यांचा अनुभव आहे  त्यांनी घरातल्या सगळ्या लोकांच्या पत्रिका ज्योतिषाकडून तपासून घेऊन ज्यांच्या पत्रिकेत मकरेचा मंगळ आहे अश्या कुटुंबातील सज्ञान मुलांच्या नावाने प्रॉपर्टी खरेदी केल्यास हा प्रश्न सुटेल. यासाठी कायदा व कर सल्लागाराशी बोलूनच हे करावे.

आता १४ मे २०१८ ते १४ जून २०१८ या काळासाठी असलेले राशी भविष्य पाहू

मेष रास : गेले अनेक महिने केतू तुमच्या कर्म स्थानी येऊन बसल्याने कामाच्या ठिकाणी संघर्ष, अडथळे यात वाढ झालेली असेल अश्यात आता मंगळही या स्थानी आलेला आहे. कर्मस्थानात आता मंगळाची दाहकता डबल झाल्याने अडथळे, संघर्ष यात खुप वाढ झालेली दिसेल. थंड पडलेल्या गृह निर्माण व्यवसायाला मात्र या निमीत्ताने चालना मिळेल. जे या व्यवसायात आहेत त्यांना वेगाने कामे पुर्ण करावी लागतील. ६ नोव्हेंबर पर्यंत हा काळ आहे. शनि वक्री असल्याने कामगार मिळणार नाहीत. कोर्ट केसेस पुढे जाणार नाहीत अश्या पार्श्वभुमीवर मेष रास असलेल्या लोकांना संघर्ष करायचा आहे. २७ मे नंतर कर्ज प्रकरणे मार्गी लागतील. ८ जून पर्यंत तुम्हाला सुट्टी नाही असे ग्रहमान या महिन्यात आहे.

वृषभ रास : रवि तुमच्या राशीत महिनाभर असणार आहे. आरोग्यात सुधारणा होईल. या निमीत्ताने या महिन्यात व्यायामाची सवय लाऊन घ्या.  कुटुंबातील अपेक्षीत गोष्टी घडण्यासाठी २७ मे पर्यंत थांबावे लागणार आहे. २७ मे नंतर मुलांच्या संदर्भात काही चिंता असतील तर त्या कमी होतील. सतत प्रवास करणार्यांना या महिन्यात जरा ब्रेक मिळेल. व्यापारी वर्ग आवक कमी झाल्याने चिंतेत असतील तर १० जून ला गुरु मार्गी झाल्यावर हा प्रश्न सुटेल. कोणी आजारी असेल आणि दिर्घकाळ सुरु असलेल्या ट्रीटमेंट १० जून नंतर पुर्ण होऊन त्याचा त्रास संपेल. या निमीत्ताने होणारा खर्च थांबेल.

मिथुन रास : या महिन्याचे ग्रहमान तुमच्या राशीला फ़ारसे चांगले नाही. २७ मे पुर्वी महत्वाची कामे उरका. २७ मे ते १० जून या काळात तुमच्या राशीचा स्वामी बाराव्या स्थानी असल्याने कामे म्हणावी तशी मार्गी लागायला अडचण होईल. त्यात रवि सुध्दा महिनाभर बाराव्या स्थानी असल्याने अपमानास्पद घटना घडतील. ज्ञान ही तुमच्या जवळ असलेली महत्वाची बाब, पण त्याबाबत शंका घेतली तर तुम्हाला अपमान झाल्यासारखा वाटेल यास्तव महत्वाच्या वेळी तुमचे ज्ञान बरोबर असल्याचे पुरावे सोबत ठेवा. शाब्दीक संघर्षात तुमचा पराजय होणार नाही याची सातत्याने काळजी घ्या.

कर्क रास : शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना नविन करार, व्यावसायीक शिक्षण, इंजिनीयरींग क्षेत्रात वेगळ्या संधी चालून येतील. आपले व्यावसायीक आडाखे चुकू नयेत यास्तव १० जून पुर्वी महत्वाचे विषय मार्गी लावा. ज्या लोकांना कामासाठी परदेशात रहावे लागत आहे त्यांना ८ जून कामे संपवून परत येण्याची संधी मिळणार आहे. वैवाहीक जोडीदाराशी असलेले रुसवे फ़ुसवे, ब्रेक अप्स या महिन्याच्या शेवटी संपुष्टात येऊन तुम्हाला अपेक्षित गोडवा पुन्हा निर्माण होईल.  आरोग्याचे प्रश्न, व्यावसयीक प्रश्न निर्माण होणार नाहीत ना ? यावर विचार करा.

सिंह रास : राशीचा स्वामी आपल्या दशमस्थानी आला आहे. आपण सरकारी नोकरीत असा किंवा खाजगी, या वर्षी प्रमोशन अपेक्षीत असेल तर हाच महिना महत्वाचा आहे. या महिन्यात तुमचे अ‍ॅप्रेजल किंवा कॉन्फ़िडेन्शीयल रिपोर्ट म्हणजे सी. आर. ( जो कधीच गुप्त रहात नाही ) आपल्या प्रमोशनची खात्री देणारा असेल असा बनवून घ्या. प्रमोशन अपेक्षीत नसले तरी आपल्या अधिकार क्षेत्रात वाढ देण्याचे ग्रहमान आहे. महत्वाचा निर्णय घेताना तुमचा सल्ला वरिष्ठ घेत असतील तर ते एक प्रकारे प्रमोशन आहे. सहाव्या स्थानी मंगळ दर दोन वर्षांनी येतो. याचाच अर्थ तुमच्या विरोधकांना गप्प बसविण्याची कृती करण्याचे दिवस सुरु आहेत. तुमच्या प्रमोशनच्या आड कुणी येत असतील तर त्यांना चारी मुंड्या चित करा.

कन्या रास: विनाकारण चिंता करण हा आपला स्वभावच आहे. या महिन्यात असे कारण मला दिसत नाही. विनाकारण चिंता करण्यावर अनुलोम विलोम प्राणायामासारखा  सारखा दुसरा प्रभावी उपाय नाही. तुमच्या राशीचा स्वामी २७ मे ला वृषभ राशीत गेला की एखादी चिंता असेलच त्याचे निराकरण होताना दिसेल. व्यावसायीक असाल तर अन्य मार्गाने जसे व्याज किंवा परमेश्वर कृपेने फ़ारच कमी कष्टात काही लाभ ८ जून नंतर होऊ शकतात. संतती बाबतच्या चिंता संपल्या नाहीत तरी एखादी सुवार्ता नक्कीच या महिन्यात ऐकायला मिळेल.

तूळ रास : तूळ राशीला चतुर्थात गेलेला मंगळ घरात वाद निर्माण करेल पण तुम्ही तो योग्य रितीने हाताळाल. पण प्रॉपर्टीच्या संदर्भात काही घडेल. एखादी नविन इस्टेट किंवा अद्याप स्वत: च्या घरात रहायला गेलेला नसाल तर त्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलाल. व्यापारी असाल तर महत्वाचे सौदे २७ मे पुर्वी पुर्ण करा अन्यथा १० जून पर्यंत रखडतील. तुमच्या राशीचा मालक सध्या भाग्यस्थानी आहे जो ८ जूनला कर्म स्थानी जाणार आहे. जे काम करणे तुमच्या मनात आहे त्यावर जेष्ठांचा सल्ला घेऊन ८ जून नंतर प्रत्यक्ष कृतीत आणा. सर्व बाजुने विचार करुन घेतलेला निर्णय योग्यच ठरेल.

वृश्चिक रास : दिर्घकालीन ग्रह स्थिती फ़ारशी अनुकूल नाही असे जरी असले तरी राशीचा स्वामी मंगळ पुढील काही महिने बलवान होऊन तुमच्या शौर्य स्थानात येणार आहे. परिस्थिती हाताबाहेर जाते असे वाटले तर ती नियंत्रणात आणताना धाडस करण्यास अनुकूल काळ आहे. कसा डाव टाकायचा आणि नियंत्रण मिळवायचे याचे कौशल्य तुमच्याकडे जन्मजात आहे. जिथे कुठे तुम्हाला बोलायची, लिहायची संधी मिळणार आहे तुमच्या फ़ायद्याची ठरणार आहे. नोकरी व्यवसायात तुम्हाला ट्रेंड सेट करण्याची संधी मिळणार आहे.

धनू रास : नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने फ़ारच महत्वाचा काळ येत आहे. अनेक संधी चालून येत आहेत. तुमच्या नवकल्पना आमलात आणुन त्या यशस्वी करण्याच्या दृष्टीने पावले टाका. तुमच्या कल्पना नक्कीच लाभदायी होतील. बुडीत खात्यात टाकलेले पैसे मागण्याचा काळ आहे. आजवर ज्यांना पैसे दिले आणि त्यांनी परत दिले  नाहीत त्यांना मागा. जोडीदारा बरोबर आनंदाने अनेक गोष्टी करण्याचे योग आहेत. मग ते फ़िरायला जाणे असेल किंवा खरेदीला.

मकर रास : मकर राशीत मंगळ गेल्याने आपल्या विचार करण्यात किंवा कृतीत वेग आल्याचे आपल्या स्वत:ला जाणवेल. अनेक गोष्टी पेंडीगला पडल्या असतील त्या या काळात कार्यान्वीत होतील.   प्रॉपर्टीचे काम मागे पडले असेल तर ते आधी करा. इच्छाशक्तीचा वापर जरा वाढवूनच कामे मार्गी लागतील. मकर राशीच्या लोकांना कुणाला प्रपोज करायचे असेल तर ८ जून पर्यंत थांबा. जरा स्वत:ला आपण प्रपोज करण्यासाठी सुयोग्य बनवा. श्री विष्णु अवतार ज्यांचे आराध्य आहे त्यांना २७ मे नंतर भक्तीत रममाण होण्यासाठी अनुपम काळ आहे.

कुंभ रास : मकरेचा मंगळ बाराव्या स्थानी आल्याने खर्च वाढणार असला तरी तो प्रॉपर्टी खरेदी, दुरुस्ती यासाठी असल्याने प्रॉडक्टीव्ह असेल. कामाच्या निमीत्ताने प्रवासाचे योग येतील. प्रवास फ़ारसा सुखकर नसेल यासाठी प्लॅनिंग जोरदार करा. आजच रेल्वे तिकीट बुकिंगच्या IRCTC ने त्यांचे वॅलेट वापरात आणले आहे. तात्काळ तिकीट वॅलेट वापरुन वेगाने हातात पडल्याने कन्फ़र्म होण्याचे प्रमाण वाढेल असे म्ह्णतात. मकर राशीतला मंगळ काही विमान प्रवास देत नाही त्यामुळे तो खडतर होणार नाही हे पहा.  शेअर मार्केटवाल्यांनी कॅलक्युलेटेड रिस्क घ्यायला हरकत नाही. काही लाभ आत्ता पदरात पडले नाहीत तरी पोर्ट्फ़ोलीओ सुधारेल.

मीन रास : तुम्ही मुळचे सुखासीन वृत्तीचे आहात त्यात चतुर्थात शुक्र म्हणजे सुखाची झोप काढावी अश्या मनस्थितीत असणार. राशीचा स्वामी अनुकूल नाही म्हणुन प्रयत्न करायचा नाही का ? आपले वरिष्ठ, वडीलधारे किंवा वडील  आणि आपले कुटुंब तुम्हाला हव ते देण्यास तयार असतील. मागून तर पहा. याचा उपयोग काही प्रॉडक्टीव्ह गोष्टींसाठी करा. पुढील काही काळ भाग्य अनुकूल आहे. जरा प्रयत्न वाढवा यश मिळेल असे ग्रहमान आहे. याचा फ़ायदा आपल्या स्वप्नपुर्ती साठी करा.

शुभंभवतु



Monday, April 9, 2018

१४ एप्रिल ते १३ मे २०१८ या महिन्याचे भविष्य आणि ज्यांच्या वाढदिवस १४-१५-१६-१७ एप्रिल आहे त्यांचे अभिनंदन

पत्रिकेत एकटा एखादा ग्रह व्यक्तीचे आयुष्य बदलू शकतो का ? याचे उत्तर काही खास परिस्थितीत हो असेच देता येईल. दशमस्थान हे व्यक्तीचे कर्मस्थान म्हणुन ओळखले जाते. या ठिकाणी रवि, मंगळ, गुरु किंवा शनि सारखा बलवान ग्रह स्वराशीत, उच्च राशीत असताह्या व्यक्तींना उच्च अधिकार प्राप्त होतो. एखादा ग्रह स्वराशीत/उच्च राशीत असून स्वनवमांशात किंवा उच्च नवमांशात असेल तर अजूनहीबलवान होतो. तोच ग्रह पत्रिकेत दशमभावारंभी असेल तर ही पत्रिका अजून विशेष प्रभावी होते.

सर्व ग्रहांच्या मधे बलवान रवि आहे. तो ग्रहांचा राजा समजला जातो पण तो ३६५ दिवस बलवान नसतो. दिवसभरात तो दुपारी माध्यानसमयाला बलवान असतो तर १४-१५-१६-१७  एप्रिल या दिवशी मेष राशीत आणि मेष नवमांशात विशेष बलवान असतो. ज्यांचा जन्म या तारखांना आहे त्यातुन दुपारी १२ च्या दरम्यान आहे त्यांना नोकरी-व्यवसायात विशेष अधिकार मिळतो. त्यांची नोकरीत प्रगती वेगाने होते.

आपल्या ओळखीचे लोक शोधा ज्यांची जन्मतारीख १४-१५-१६ किंवा १७  एप्रिल आहे. आपल्याला त्यांची नोकरी/व्यवसायातली प्रगती पाहून पटेल की खरच किमान या बाबतीत हे लोक भाग्य घेऊन जन्माला आलेले आहेत. या महिन्यात त्यांचे अभिनंदन.

शनि धनु राशीत १८  एप्रिल ते ६ सप्टेंबर २०१८ काळात वक्री होणार आहे. ज्यांची रास धनु आहे, खास करुन पुर्वाषाढा नक्षत्र १ चरण आहे किंवा मुळ नक्षत्र ४ व ३ चरण आहे त्यांना मानसीक दृष्ट्या त्रास देणारा हा सर्वात कठीण काळ असेल. अर्थात शनि उपासनेने हा त्रास कमी होतो यास्तव खालील नवग्रहपीडाहर स्त्रोत्रामधला हा श्लोक दररोज २१ वेळा जपावा. शनिवारी संध्याकाळी शनि दर्शन घ्यावे.

माझे ही मुळ नक्षत्र ३ रे चरण आहे. मी ही हा त्रास पुन्हा एकदा आयुष्यात दुसर्या वेळेला अनुभवणार आहे. शनिमहाराज मला सोडणार  नाहीत. त्यांनी सदवर्तनी गुरु महाराजांना अडिच घटका त्रास दिला. मी तर सामान्य माणूस.

सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालाक्ष: शिवप्रिय:।
दीर्घचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:।।

आता १४ एप्रिल ते १३ मे मेष महिन्याचे भविष्य पाहू. हे राशीभविष्य जसे चंद्र राशीकडुन पहावे तसे लग्नराशी कडुन सुध्दा पहावे.

मेष रास : आपल्या राशीत सध्या हर्षलचे भ्रमण असताना त्यावरुन रविचे भ्रमण ही स्थिती खासच डोक्याला त्रास देणारी असेल. डोक्यावर बर्फ़ ठेवणे हे प्रत्यक्ष करणे शक्य नसले तरी किमान १८ एप्रिल ला डोके शांत ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबस्थानी १९ एप्रिलला येणारा शुक्र घरात शांतता ठेवेल. मंगळ २ मे नंतर मकर राशीत येणार आहे. त्यानंतर मात्र युध्दजन्य परिस्थितीने असेल पण तो पर्यंत डोक्यात विचार ठेवा पण डोके गरम होऊ देऊ नका. हेच तुमच्या हिताचे आहे.

वृषभ रास : राशीचा मालक शुक्र महिनाभर आपल्या राशीत असणार आहे. ही उत्तम स्थिती असली तरी फ़ारशी सुखाची नाही. असेही वृषभ राशीचे लोक कष्टाला घाबरत नाहीत. आरोग्याच्या तक्रारी, खर्च यामुळे महिनाभर आपली झोप उडणार आहे हे निश्चित. २ मे नंतर आरोग्याचा तक्रारीला आराम पडेल. नोकरी- व्यवसायाचा मालक शनि अशुभ स्थानी वक्री होणार असल्याने ही एक चिंता अजून लागून राहील असे काहीसे ग्रहमान या महिन्यात आहे.

मिथुन रास: आपल्या राशीचा स्वामी कर्म स्थानातून लाभ स्थानात ९ मे ला जाणार आहे. मागील महिनाभर जी काही कामे केली असतील त्याचे फ़ळ मिळेल अशी स्थिती ९ मे नंतर येईल. त्याच्या आधीच खर्चाची तयारी आहे कारण या महिन्यात आपण प्लेजर टुर करणार आहात. थंड हवेच्या ठिकाणी जाणार म्हणजे खर्च होणारच. पाहूया तुमच्या जोडीदाराचा राग निवळतोय का ? मागच्या किंवा या महिन्यात असे काही झाले तर ही एक संधी आहे.

कर्क रास : आपल्या संततीच्या काळजीत असाल तर २ मे नंतर यावर दिलासा मिळेल. तुमच्या दशमातून रविचे भ्रमण आहे. तुमची जन्मतारीख जर १४-१५-१६ किंवा १७ एप्रिल असेल तर प्रमोशन/अधिकारात वाढ खात्रीने दिसेल. वाढदिवस नसेल तरी इतरांना या महिन्यात नोकरीत काही विशेष अधिकार प्राप्त होतील. लाभ स्थानी महिनाभर शुक्र आहे. तो व्यापारी वर्गाला भरपूर आवक देणार आहे. सर्व आर्थिक चिंता मिटतील असे ग्रहमान आहे.

सिंह रास : तुमच्या राशीचा मालक बरेच महिन्यांनी बलवान होतो आहे. मागील काही महिने आपली गळचेपी झालेली असेल तर भरपाई होईल. एक डरकाळी मात्र अवश्य द्या. दशमात येणार शुक्र तुम्हाला सहजतेने कार्यात यश देणार आहे. या महिन्यात जर तुमचा सी आर भरला जाणार असेल तर तो चांगलाच असेल जेणेकरुन तुमचा अधिकार जेंव्हा केंव्हा प्रमोशन होईल तेंव्हा वाढेल. घरगुती फ़्रंट वर काही चिंता असतील पण तुम्ही लक्ष देऊच नका.

कन्या रास : ९ मे पर्यंत तुमचे गुण, तुमचा अभ्यास आणि तुमचे विश्लेषण याची चर्चा व्हावी असे योग आहेत. होणार नसेल तर ती तुम्ही घडवा. थोडा आत्मविश्वास दाखवा आणि बोलणार्याची माती विकली जाते हे सत्य असेल तर तुमची बुध्दीमत्ता हे तर १०० नंबरी सोने आहे. तुम्ही घोडे दामटा. त्या शिवाय यश नाही. भाग्यात जाणारा शुक्र तुम्हाला यश देणारच आहे. ९ मे पर्यंत एकही संधी सोडु नका आणि कच ही खाऊन नका.

तूळ रास : तुमच्या राशीचा स्वामी जवळ जवळ महिनाभर अशुभ स्थानी असणार आहे. ह्या स्थानी असलेला राशी स्वामी सहज यश देत नाही. कोणतेही काम आपले सहज पुर्ण होणार नाही. चांगले प्लॅनिंग करुन प्रयत्न करावे लागतील. आपला भाग्येश व व्ययेश सप्तम स्थानी जाणार आहे. याचा अर्थ आपले भाग्य व्यापारातुन, खास करुन परदेशी वस्तु, परदेशी व्यक्ती या माध्यमातून उघडण्याचे संकेत आहेत. नाराज राशीस्वामी असताना प्रत्येक सौदा नीट तपासून घ्या.

वृश्चिक रास : घरगुती कलह मिटवताना आपल्याला बराच काळ द्यावा लागेल. आपण मोजके आणि जिव्हारी लागेल असे बोलता असा लौकीक आहे. शक्य असेल तर जरा राग गिळा. तुम्हाला खास आपले वाटणारे मित्र किंवा सासुरवाडीचे लोक सध्या कुणाच्या संगतीत काय खिचडी पकवत आहेत त्याकडे फ़क्त लक्ष द्या. ९ मे नंतर हे तुमच्या विरुध्द उघड बोलणार आहेत. अश्यावेळी तुमच्या हातात नेमकी बातमी हवीच.

धनु रास : तुमच्या राशीतून होणारे मंगळाचे भ्रमण आणि त्याचा २५ एप्रिल ला होणारा प्लुटो बरोबरचा सहयोग जरा उद्वीग्नता देणारा असेल. साडेसातीच्या पार्श्वभुमीवर मंगळाचे हे पुर्वाषाढा नक्षत्रातले भ्रमण ज्यांचे नक्षत्र पुर्वाषाढा आहे त्यांना १४ ते १८ तारखांपर्यंत मातेसोबत वाद विवादातून पीडा देईल. माताच काय पण मातेसमान सर्व व्यक्तिंचे गैरसमज यातून उद्वीग्नता येईल.
आपण काय करणार. वाद टाळणे इतकेच आपल्या हातात असते. शिक्षण क्षेत्रात काही अपेक्षीत संधी आपल्यासाठी वाट पहात आहेत.

मकर रास : मंगळाच्या भ्रमणाचा त्रास मकर राशीच्या लोकांना खर्चाच्या मुळे जाणवत असेल. अजून काही दिवस म्हणजे २ मे पर्यंत तो आहे. रविचे भ्रमण चतुर्थ स्थानातुन होताना तुमची झोप हा पापग्रह उडवेल. बुध भाग्यकारक संवाद घडवेल असे असताना मनातून हे फ़ार पुर्वीच व्हायला हवे होते असे जाणवेल.  पंचमातून होणारे शुक्राचे भ्रमण मुलांच्या खास करुन मुलीच्या प्रगतीने तुम्हाला सुख देणारे असेल.

कुंभ रास : मला सातत्याने इतरांची सेवा करावी लागते अशी आपली तक्रार असते. वृषभ राशीतुन होणारे शुक्राचे भ्रमण महिनाभर सुखावणारे असेल. आपण महिला असाल तर एकतर माहेरी जाल किंवा ज्यांची सेवा तुम्हाला करावी लागते असे लोक घरात असणार नाहीत. क्वचीत असा योग येतो. या महिन्यात घरात तुमच्या मर्जीची सुख देणारी वस्तू जसे पंखा, कुलर, एअर कंडिशनर किंवा यासारखी वस्तू खरेदी करण्याचे व सुख उपभोगण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला मिळणार आहे.

मीन रास : दशमातून होणारे मंगळाचे भ्रमण आपल्याला २ मे पर्यंत दमविणार आहे. शारिरीक आणि मानसीक श्रम तुम्हाला एका मर्यादेपर्यंतच मानवतात पण हा परिक्षेचा काळ या महिन्यात संपुन त्यापासून काही चांगल्या गोष्टी, नविन संधी मात्र निर्माण होताना दिसतील. उत्पन्नाचे स्त्रोत ही वाढतील. काही अनुभव लेखन घडावे असे वाटत असेल तर चांगली संधी आहे. या कष्टातुन निर्माण झालेल्या श्रमावर एक चांगला उपाय असेल.

ज्योतिष शिकायचे आहे तर आधी पंचांग शिकायला हवे.

http://gmjyotish.blogspot.in/p/blog-page.html   पंचांग शिकूया - भाग १
http://gmjyotish.blogspot.in/p/blog-page_24.html   पंचांग शिकूया - भाग २

आपला आग्रह असेल तर ढोबळ कुंडली कशी मांडायची, स्पष्ट ग्रह, दशा अंतर्दशा या बाबत लिखाण मला करायला नक्की आवडेल.




Friday, March 9, 2018

१४ मार्च ते १३ एप्रिल २०१८ या महिन्याचे राशीभविष्य आणि विवाह लवकर व्हावा या साठीचा उपाय

आपल्या कन्येचा विवाह वेळेवर व्हावा ही कोणत्या पालकांची अपेक्षा नसणार ? प्रत्येक पालक ह्या साठी प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांना दैवी उपायांची जोड मिळाली तर विवाहाच्या संदर्भात मुलींच्या पत्रिकेत खुप कठीण योग नसतील तर विवाह त्वरीत जुळुन येतात असा माझा अनुभव आहे.

चैत्रातले नवरात्र आणि अश्विन महिन्यातले नवरात्र असताना विशीष्ठ दिवशी कात्यायनी देवीची उपासना केली असता असा विवाह योग जुळून येतो असा माझा अनुभव आहे. मार्च महिन्यात २२ तारखेला संध्याकाळी असा योग येत आहे. ही पुजा कशी करावी याचा  विधी खालील लिंक क्लिक केली असता मिळेल.

http://gmjyotish.blogspot.in/2016/09/blog-post_22.html

हा उपाय करावा तसेच विवाह जमल्यावर किंवा झाल्यावर अनुभव कळवावा.

आता १४ मार्च २०१८  ते १३ एप्रिल २०१८ कालावधीसाठी राशीभविष्य पाहू. हे भविष्य चंद्र राशी तसेच लग्न राशीकडून सुध्दा वाचावे.


मेष रास : राशीचा स्वामी महिनाभर धनु राशीत तुमच्या भाग्य स्थानी आहे ही जमेची बाजू असली तरी शनि या शत्रु ग्रहाशी त्याची गाठ १-२-३ एप्रिलला पडणार आहे. या तारखांना नोकरी /व्यवसायात संघर्ष अपेक्षीत आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्या विरोधात जातील. याबाबत जागरुक रहा. ज्यांच्या पत्रिकेत धनु राशीत अशी युती आहे त्यांनी वहाने जपून चालवा. २ एप्रिलच्या आधी व नंतर २-४ दिवस जोखीम पत्करु नका.
असेही ग्रहमान महिनाभर फ़ारसे तुमच्या मर्जीप्रमाणे नाही. खर्च होणार आहे. मग तो प्रवास किंवा आजारपणे यामुळे असेल. तुमचा स्वभाव नाही पण प्रत्येक कृती विचारपुर्वक करायची आहे इतके महिनाभर लक्षात ठेवा.

वृषभ रास : १४ मार्च ते २७ मार्च खिसे उघडे ठेवा. व्यावसायीक असाल तर अनेक लाभ चालत येणार आहेत. फ़क्त शेअर्स च्या बाबतीत २३ मार्च नंतर विचार करुन कृती करा. अचानक मार्केट खाली येणे अश्या घटना घडून नुकसान होऊ शकते. २७ मार्च नंतर मात्र व्यवहारांच्या बाबतीत जास्त काळजी घ्या. तरुणांच्या वागण्याकडे पालकांनी २८ मार्च ते १ एप्रिल या काळात लक्ष द्या.  राशीचा स्वामी व्ययात जात असल्याने काही संकटे येणार नाहीत याबाबत २८ मार्च ते १ एप्रील जागरुक रहा.

मिथुन रास : हा काळ प्रेमात पडलेल्या तरुणासाठी फ़ारसा चांगला नाही. गैरसमजातून ब्रेक अप होऊ नये यासाठी तसेच सर्वसामान्य राशीच्या लोकांसाठी आजारपणे, अपघात या पासून बचाव व्हावा यासाठी खबरदारी घेण्याचा काळ खास करुन २८ मार्च ते १ एप्रिल  आहे. आपल्या राशीचा स्वामी बुध २३ मार्च पासून वक्री होत असल्याने आपल्याला आपले शब्द जपून वापरावे लागतील किंवा शब्द आठवणार नाहीत असाही त्रास जाणवेल. खास मिटींग मधे गाफ़ील राहू नका. तयारी करुन जा.

कर्क रास : कर्क राशीच्या स्त्रीया आपल्या मुलांच्या बाबतीत २८ मार्च ते १ एप्रिल  या काळात जागरुक रहा. ही शनि- मंगळाची युती जरा त्रास दायक असते. इतके सोडले तर बाकीच्या फ़्रंटवर या महिन्यात फ़ार चिंता करावे असे ग्रहमान नाही. मागील पानावरुन पुढे असे ग्रहमान आहे.

सिंह रास : राशीचा स्वामी महिनाभर अशुभ स्थानी असल्याने प्रतिकार शक्ती कमी होऊन काही आजारपण नियमीत पणे दरवर्षी या महिन्यात येत असेल तर त्याबाबत काळजी घ्या. तुमची पत तुमची प्रतिष्ठा या महिन्यात पणाला लागेल असे ग्रहमान राशीचा स्वामी रवि महिनाभर अशुभ स्थानी असल्यामुळे आहे. घरच्या आघाडीवर सुध्दा फ़ारसे चांगले ग्रहमान नाही. घरात सुध्दा तुमचा शब्द ऐकला जाईल असे वाटत नाही. त्यापेक्षा वादात न पडता सिंह जसा अलिप्त असतो तसे रहा हा सल्ला. पुढील महिना तुमचा आहे. प्रॉपर्टी संदर्भात एखादा खटला निकालाच्या दरवाज्यात असेल तर आपले वकील तो जिंकतील याबाबत खात्री करुन घ्या.

कन्या रास : तुमचे आराखडे या महिन्यात २३ मार्च नंतर चुकू शकतात. व्यापारी अंदाज चुकून किंवा तुम्ही केलेली कागदपत्रे चुकून नुकसान होणार नाही ना याची काळजी २३ मार्च ते पुढे १५ एप्रील पर्यंत घ्या. शेअर बाजारातले निर्णय या काळात जास्त काळजी पुर्वक घ्या. प्रिंटिंग/प्रकाशन/कमीशन एजंट व्यवसायात सुध्दा खबरदारी हवी आहे. व्यापारात येणारे नविन प्रपोजल्स २७ मार्च पुर्वी मार्गी लावा. घरात भांड्याला भांडे लागू शकते यासाठी २८ मार्च ते १ एप्रिल  या काळात डोक्यावर बर्फ़, तोंडात साखर धरुन ठेवा.

तुळ रास : तुला राशीचा स्वामी २७ मार्च पर्यंत सहाव्या स्थानी आहे. आपल्या त्रिकोणातल्या राशीत शुक्र आला आहे. आपल्याला कर्ज हवे असल्यास पटकन मिळुन जाईल. वसूली करायची असल्यास एक नोटीस धाडा आणि पहा काय गंमत होते. चेक बाउंन्स झाला असल्यास या महिन्यात पोलीस कारवाई करुन आपल्या देणेकर्यांना जरा वठणीवर आणा. तुमच बॅलन्स करणे सोडा आणि जरा कडक व्हा. पैसे बिनव्याजी वापरण हा स्वभाव आहे त्यांना जरा दणका द्याच. २७ तारखेनंतर घरच्या फ़्रंटवर काय काय घडते आहे ते तुम्ही कुणाला सांगू नका. फ़ारच रोमॅंटीक काळ असेल.

वृश्चिक रास : आग है लगी हुवी हर तरफ़ यहा वहा हे गाणे आठवा. आग लागलीच तर अग्नीशमन करण्यासाठी काय काय करावे लागेल याचा अंदाज घ्या. नोकरी व्यवसायात आग लागली तर ते साहजीक आहे. पण घरच्या फ़्रंट्वर आग लागणे जरा त्रासदायक. तोंड येणे, गरम चहा/सुप पिल्याने तोंड भाजणे, पानातला चुना लागणे यासारख्या घटना होतील. तोंडाचा अल्सर होणार्यांनी थंडावा देणारी मलमे शोधून ठेवा. २७ मार्च पर्यंत शिमगा संपला तरी तुमचे कवित्व संपणार नाही. आपल्या प्रतिस्पर्ध्याला जळवण्यासाठी हुकमी प्रतिक्रिया द्याल. लोन हवे असेल तर २७ तारखेनंतर प्रयत्न करा.

धनु रास:  आग घरात लागली तर ठीक विझवता येईल पण मस्तकात लागली तर काय करणार ? आपले व्यक्तीमत्व मुळात अंगार त्यात मंगळाचा आपल्या राशीत प्रवेश आहे. डोक्यावर बर्फ़ धरा नाहीतर जवळचे सुध्दा जळून खाक होतील असे या महिनाभरात अनेकदा घडेल. तुमचा राग सात्विक असतो. तुमचे रागावणे व्यक्तींवर नसून स्वभावावर किंवा चुकीच्या गोष्टींवर असते हे जवळच्यांना समजले तर ठीक नाहीतर त्रास तुम्हालाच. १८ मार्चला पाडव्याच्या मुहूर्तावर घरात एखादी नविन वस्तू येईल. ती आल्यावर भौतीक सुखाचा अनुभव एखाद्या थंड हवेच्या झुळकीसारखा असेल.

मकर रास : शनि आणि मंगळ जर सर्वात जास्त हानी कोणाला देणार असतील तर तुम्हाला. साडेसाती सुरु आहे. शनि तुमच्या राशीचे स्वामी असले तरी त्यांनी गुरु ला सोडले नाही तर तुम्हाला काय ते सोडणार ? आलेला पैसा घरी न येता त्याला वाटा फ़ुटतील. ती गुंतवणुक नसेल तर विनाकारण झालेला खर्च असेल. तुमची साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी असते पण मित्रांनी तुम्हाला खड्यात घालायचे ठरवलेच असेल तर खोट्या प्रतिष्ठेसाठी काही पैसे खर्च कराल. कशी भुल पडली असा प्रश्न स्वत:ला नंतर विचाराल.

कुंभ रास : शनि देत आहे अजून देणार आहे. काही अपघाताने आपला फ़ायदा होणार आहे ? हजारो लोक लॉटरीवर पैसे लावतात आणि तुम्ही चक्क जिंकता असे ग्रहमान शनि मंगळाच्या योगाने येत आहे. शनि-मंगळाच्या युतीचा तुमच्या वैयक्तीक जीवनावर वाईट प्रभाव न पडता लाभ होणार आहे. असे ग्रहमान क्वचितच असते. तुमचा कुंभ भरुन वहाणार आहे त्याचे प्लॅनिंग करा. २७ मार्च २०१८ पर्यंत शिल्लक वाढली तर गुंतवणुक करा. शेअर मार्केटमधे नको. सध्या तरी PPF/FD चा विचार करा. एकदा शेअर मार्केट स्थिरावले की मग विचार करा.

मीन रास : मीन राशीचे लोक जरा थंड असतात. पण पुढील महिना तुमची पळापळ होणार आहे. अचानक कामे वाढतील. तुम्हाला अनेक फ़्रंटवर लढाई करावी लागणार आहे. तुमच्या राशीचा मालक वक्री असल्याने या लढाईचे काय होणार ? यश हव असेल तर इच्छा शक्तीचा प्रचंड दबाव तयार करावा लागेल. हीच संधी आहे स्वत:ला सिध्द करण्याची. इथे मागे पडलात तर खुप काळ लागेल तुमची पत वाढायला. तुमच्या राशीच्या स्वामीची प्रार्थना करा आणि लढायला तयार व्हा.


Thursday, February 8, 2018

१२ फ़ेबृवारी २०१८ ते १४ मार्च २०१८ ह्या काळाचे राशीभविष्य तसेच महाशिवरात्रीला काय करावे याची माहिती.

आपणा सर्वांना आत्तापर्यंत मी रवि ज्या महिन्यात ज्या राशीत असतो तो महिना गृहीत धरुन राशीभविष्य प्रसिध्द करतो. या महिन्यात १२ फ़ेबृवारी २०१८ ते १४ मार्च २०१८ ह्या काळात रवि कुंभ राशीत आहे. कुंभ राशीत रविला बलहीन असतो. या काळात अनेकांना विवीध रोगांना सामोरे जावे लागते. यास्तव या महिन्यात खाणे-पिणे याचे विशेष लक्ष देऊन करणे आवश्यक ठरते. प्रत्येकाच्या पत्रिकेत असलेला रवि हा रोगप्रतिकारक शक्तीचा कारक बलहीन असल्याने हे सांगणे आवश्यक वाटते.

या महिन्यात दोन महत्वाची पर्वे येतात. १३ फ़ेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. या दिवशी शिवआराधन केल्याने नातेसंबंधात असलेले प्रश्न कमी होतात किंवा सुटतात. शक्य असेल तर उपवास करावा. उपवासाचा आग्रह नाही. परंतु शंकराला आधी पाणी मग थोडेसे दुध पुन्हा पाणी याचा अभिषेक करावा. घरात पिंडी असेल तर घरी करावा. मंदीरात गर्दी असल्याने हे शक्य नसेल तर घरी करावे.  हे करताना तांबे धातूचे  ताम्हण घेऊ नये. स्टीलचे चालेल किंवा चांदीचे असल्यास उत्तम. कारण तांबे आणि दुध याचा संपर्क आल्यास ते जल/दुध तिर्थ म्हणुन प्राशन केल्यास रोग उद्भवतील. यानंतर १०८ बेलाची पाने वाहून प्रत्येक पान वहाताना ओम नमशिवाय हा जप करावा. नाते संबंध सुधारावेत अशी प्रार्थना शिवाकडे करावी. त्यानंतर आरती करावी. दुधमिश्रीत पाणी तिर्थ घ्यावे. शंकराला नैवैद्य म्हणुन जे ठेवाल ते प्रसाद म्हणुन घ्यावे. महाशिवरात्रीच्या दिवशी हे संध्याकाळी प्रदोष पुजनाने शिवाअराधन करुन नातेसंबंध पुन्हा पुर्ववत होतात असा अनुभव आहे.

२६ फ़ेब्रुवारीला येणारी आमलकी एकादशीचे दिवशी आवळा वृक्षाच्या सहवासात असणे. आवळा श्री विष्णूंची पुजा करुन अर्पण करणे. प्रसाद रुपी आवळ्याचे सेवन करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आवळा ७२ रोगांवर औषध आहे. आयुष्याची वाढ करणारा आहे.

या शिवाय होळी व रंगपंचमी हे पारंपारीक सण आल्याने हा महिना आनंदाचा आहे.

हे राशीभविष्य आपण लग्नराशीकडून सुध्दा वाचा हे सांगणे आहेच शिवाय ही लिंक कॉपी पेस्ट करुन पुढे पाठवली तर मला आनंदच वाटेल.

आता राशीवार भविष्य पाहू

मेष रास : आपल्या राशीचा स्वामी मंगळ ७ मार्च पर्यंत अशुभ स्थानी असल्यामुळे आपल्या आक्रमक स्वभावाला अपेक्षीत यश नाही तुर्तास धाडस करु नका अंगाशी येईल. १४ फ़ेबृवारी ते २ मार्च पर्यंत लाभस्थानी बुध रवी आणि शुक्र असल्याने अनेक मार्गाने आपल्याला लाभ अपेक्षीत आहेत मग विनाकारण धाडस कशाला करता ?

आपले नातेसंबंध उत्तम असतील. नोकरी व्यवसायात आपल्याला रिपोर्ट करणारे रिपोर्टी आपल्याला लाभदायक गोष्टी करतील. तुमच्या वरिष्ठांची चिंता अजून सहा महिने करुच नका. आपला जोडीदारही आनंदात असेल.  आपल्या संततीलाही नेत्रदिपक यश मिळेल असा हा महिना आपल्यासाठी लाभदायक आहे.

वृषभ रास: जोवर शनि अष्टमात आहे तोवर सहजा सहजी काहीच घडणार नाही पण तुम्हाला याची चिंता असणार नाही. चिकाटी आणि साखर पेरणी हा आपला गुण जोवर आपणापाशी आहे तोवर ग्रहमान कसेही असू द्या. सहसा या महिन्यात कोणाची ऑफ़िशीयल प्रमोशन्स होत नाहीत पण आपल्याला स्पेशल अधिकार या महिन्यात मिळतील आणि ते पुढे प्रमोशनने तुमच्या पाशी कायम रहातील असे योग आहेत.

नोकरी व्यवसायाच्या पटलावर अनेक गोष्टी घडुन मनासारखे व्हावे असे योग आहेत. नातेसंबंधापैकी चिंता फ़क्त जोडीदाराच्या आरोग्याबाबत  ७ मार्च नंतर करावी लागेल. हारी हुवी बाजी को जितना मुझे आता है हे गाणे प्रत्येक वेळेला मनासारखे झाल्यावर तुम्ही मनातल्या मनात का होईना तुम्ही म्हणणार आहात.

मिथुन रास: तुमच्या राशीचा स्वामी बुध महिन्याच्या सुरवातीला भाग्य स्थानी तर नंतर २ मार्च ला कर्म स्थानी जाऊन बसणार आहे. बर भाग्यात असलेला बुध कुंभ राशीत असल्याने तुमची असली ताकद बुध्दीमता वापरुन केलेली प्रत्येक कृती तुम्हाला संधी निर्माण करुन देणार आहे पुढे यश ही देणार आहे. तुमचे व्यावसायीक अंदाज/अ‍ॅनालिसीस बरोबर येईल.

कौटुंबीक स्तरावर संतती कला क्षेत्रात नविन संधी घेताना दिसेल. भावंडे सुध्दा आपपल्या क्षेत्रात नाव कमवताना दिसतील. तुमचे रिपोर्टी काय करु शकतील याचा अंदाज तेव्हडा घ्या. वरिष्ठांची चिंता करु नका. एकंदरीत चांगले ग्रहमान या महिन्यात आहे.

कर्क रास : हा महिना काही तुमच्या साठी बनविलेला नाही अशी खुण गाठ बांधून मगच कामाला सुरवात करा. आपल्याला अपयश मिळेल का तर तसे नाही. पण मनासारखे घडावे असे ग्रहमान नाही इतकेच नमूद करायचे आहे.

कौटुंबीक स्तरावर काळजी करावी या पेक्षा त्यांच्या कडे लक्ष द्यावे लागेल असे ग्रहमान आहे. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जरा बरे ग्रहमान महिनाभर असेल. ३ मार्च नंतर परिस्थितीत जरा बदल घडेल हे ही नसे थोडके.

सिंह रास : तुमच्या राशीचा स्वामी पुढील महिनाभर सप्तम स्थानी असणार आहे. हे स्थान म्हणजे बाजार आहे. तुम्ही कलाकार असाल तर तुम्हाला कला पेश करायला उत्तम संधी महिनाभर असली तरी पैसा वसूल परफ़ॉर्मन्स द्यायला हवा आहे. Conviction चा पैसा आहे अस  संजय जाधव वारंवार म्हणतात याचा अनुभव तुम्हाला येईल.

कौटुंबीक स्तरावर ठिक असेल. नोकरीच्या ठिकाणी आगाऊ रिपोर्टीचे कान ओढून लंबे करण्याची वेळ आली आहे. हे करताना नियमाचा आधार घेतल्याशिवाय काही करायचे नाही असा नियम ठेवा. पुढच्या महिन्यात साहेबांच्या कानाला लागण्याची भिती वाटावी असे कान ओढा म्हणजे सगळे  व्यवस्थित होईल.

कन्या रास: या महिन्यात तुमच्या महिन्याचा स्वामी सहाव्या स्थानी २ मार्च पर्यंत असेल. आरोग्य संभाळावे लागेल पण त्याचे बरोबर झालेले नुकसान भरुन काढण्याच्या संधी सुध्दा वाट पहात आहेत. धक्का मारल्या शिवाय काहिही पदरात पडणार नाही असे एकंदरीत वातावरण महिनाभर आहे.

कौटुंबीक स्तरावर सर्व काही ठीक असेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संघर्ष करावा लागेल पण २ मार्च नंतर ही स्थिती कायम रहाणार नाही असे एकंदरीत वातावरण आहे.

तूळ रास : आपल्या राशीचा स्वामी ३ मार्च पर्यंत पंचम स्थानी म्हणजे नवनिर्मीतीच्या कामात व्यस्त असणार आहे. तुमचा भाग्येश तुम्हाला या कामी मदत करणार आहे. फ़क्त डोळे मिटा अनेक नविन गोष्टी तुमच्या बंद डोळ्यांच्या समोर दिसू लागतील. जे कलाकार आहेत त्यांना नविन सुचेल. एक डायरी जवळ ठेवा. जे सुचेल ते लिहीत जा.  ज्यातून नविन कलाप्रदर्शनाची संधी पुढे चालून येईल.

कौटुंबीक स्तरावर कटकटी असणार आहेत. पण तुमच्याकडे ते बॅलन्स करायाचे कौशल्य असल्यामुळे फ़ारसे बिघडणार नाही.

वृश्चिक रास: तुमच्या राशीचा स्वामी या महिन्यात वृश्चिक राशीत असणार आहे. मंगळाची ही दुसरी रास आक्रमक पणे जे साध्य होत नाही ते कुटीलपणे मिळवण्यात आग्रही असते. ज्यांना याचा डंख बसतो ते दु:खी होतात. काय करणार आपले हे हत्यार आहे. आपला राशी स्वामी योध्दा आहे. सतत प्रयत्नशील असणे त्याचा स्वभाव आहे.

७ मार्च पर्यंत जरा आराम करा. आपले विचार सोडून  जाणिव करुन घ्या की गादीचा कापूस असो ही फ़ोम किती मऊ असतो. या सुखमंचकी आनंद घ्या. नंतर आपली कारवाई सुरू करा. कौटुंबिक स्तरावर हाच अनुभव तुम्हाला येणार आहे. नोकरी व्यवसायात आपली स्थिती चांगली असेल. मग कशाची चिंता आहे?

धनू रास: आपल्या राशीचा मोठा त्रासदायक काळ सुरु आहे. त्यातून मूळ नक्षत्राच्या लोकांना खासच त्रास आहे. साडेसाती अगदी त्रासदायक होण्याचा काळ म्हणतात तो हाच कारण सध्या शनि मूळ नक्षत्रात आहे. तरी सुध्दा न कंटाळता शनिवारी शनिदर्शन आणि दररोज नवग्रह पीडाहर स्त्रोत्रातला खालील मंत्र म्हणला की त्रास कमी होईल.

सुर्यपुत्रो दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिय: ।
मंदाचार प्रसन्नात्मा पीडा हरतु मे शनि ॥

शनिला ही प्रार्थना समजते आणि शनि महाराज पीडा हरण करतात असा अनुभव आहे.  इतर राशींना जर साडेसातीचा त्रास होत असेल तरी उपाय हाच आहे.

मकर रास:  आपला राशी स्वामी खर्चाच्या, मनस्तापाच्या आणि पीडेच्या स्थानी आहे. आपले धैर्य आणि चिकाटी हे गुण शनिचे असल्यामुळे तुम्ही खचून न जाता मार्गक्रमण करता. असे असले तरी हा महिना आपल्यासाठी रोख रक्कम घेऊन येणार आहे. कुठे गुंतवू हा प्रश्न तुमच्या मनी असेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. फ़ार रिस्क घेऊ नका असा सल्ला आहे. हा निर्णय लवकरात लवकर म्हनजे २ ते ३ मार्च च्या आत घ्यावा लागणार आहे.

कौटुंबीक स्तरावर हा महिना चांगला असेल. अनेक नातेवाईकांचे घरी आगमन होईल. त्यांच्या बरोबर सहभोजन होईल. या महिन्यात काही रिपोर्टी आणि तुमचे वरिष्ठ सुध्दा घरी आल्यास आश्चर्य वाटु नये असे ग्रहमान आहे. पाहूणचार करताना काय बोलायचे याचे भान ठेवा म्हणजे हवे ते घडेलच.

कुंभ रास: महिनाभर दशमस्थानी असलेला मंगळ नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी संघर्ष/ पळापळ देणार आहे. अचानक काही घडेल त्याला तोंड द्यावे लागेल याची तयारी ठेवा. ७ मार्च नंतर ही परिस्थिती नियंत्रणात येईल.

कौटुंबीक स्तरावर ग्रहमान ठीक आहे. नोकरी व्यवसायात सर्वांचे सहकार्य मिळून वर लिहल्याप्रमाणे संघर्षात्मक परिस्थितीवर आपण यश मिळवणारच आहात. एकंदरीत असे ग्रहमान महिनाभर आहे.

मीन रास: ३ मार्च पर्यत ग्रहस्थिती तुमच्या नियंत्रणात नाही. प्रवास, आजारपण, खर्च याने नुसते वैतागुन जाल असे ग्रहमान ३ मार्च पर्यंत असणार आहे. त्यानंतर मात्र हळू हळू परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल.

कौटुंबीक स्तरावर जोडीदार आजारी पडणे किंवा सासुरवाडीच्या लोकांचे आरोग्य बिघडणे याच बरोबर घरातले नोकर किंवा तुम्ही ज्यांच्यावर नोकरी व्यवसायात अवलंबुन आहात असे लोक आजारी पडणे किंवा त्यांच्या घरचे लोक आजारी झाल्याने ते कामावर न येणे आणि वरिष्ठ मात्र कामाचा तगादा करणे या कचाट्यात तुम्ही सापडणार आहात. असे झाले तर काय करायचे याचे प्लॅनिंग  केलेले असेल तर कुठलेही संकट सहजपणे परतावता येते हा मंत्र ध्यानात ठेवावा.


Saturday, January 13, 2018

१४ जानेवारी २०१८ ते १२ फ़ेबृवारी २०१८ पर्यंतचे राशीभविष्य

दर महिन्यात जेंव्हा रवि आपली राशी बदलतो तो महिना गृहीत धरुन मी राशीभविष्य लिहतो हे आता ज्योतिष प्रेमींना माहित झाले असेल. १४ जानेवारी रोजी रवि मकर राशीत प्रवेश करतो. दर महिन्याला हा रविचा राशीप्रवेश साधारणपणे १३-१४-१५ तारखांना होतो हे गृहीत धरुन मी राशीभविष्य १० तारखेपर्यंत प्रसिध्द करतो. यामहिन्यात ज्योतिष वर्गाची नविन बॅच १४ जानेवारी २०१८ ला सुरु होत असल्याने राशीभविष्याला विलंब झाला. ज्योतिष वर्गाविषयीची माहिती या लिंकवर पहा. http://gmjyotish.blogspot.in/2017/12/blog-post_22.html


या महिन्यापासून राशीभविष्य लिहण्याच्या पध्दतीत थोडा बदल असणार आहे. आपण मला लिहून कळवा की हा बदल तुम्हाला कसा वाटतो ?

सामान्य माणुस भविष्यातून काय पहातो ? एकतर पैसे आवक ठिक असेल ना आणि नातेसंबंध ठिक असतील ना ? नाते संबंध म्हणजे दरवेळी आई-वडील, भाऊ -बहिण, वैवाहीक जोडीदार आणि मुले इतकाच भाग नसतो तर नोकरी व्यवसायातले आपले सहकारी, वरिष्ठ आणि कनिष्ठ सुध्दा आपले जीवन आनंददायी किंवा कटु करु शकतात. तुमचे वरिष्ठ म्हणजे नोकरीतील बॉस आणि व्यवसाय करत असाल तर आपले ग्राहक हेच आपले वरिष्ठ. कनिष्ठ म्हणजे आपण अधिकारी असाल तर आपल्याला रिपोर्ट करणारे किंवा घरगुती स्वरुपात सेवा देणारे यांना कनिष्ठ संबोधता येईल.

हे राशी भविष्य जसे चंद्र राशीकडून पहावे तसेच ते लग्नराशीकडून देखील पहावे व अनुभवावे.

आपण राशीभविष्य पाहू

मेष राशीच्या लोकांना जर लहान भाऊ किंवा बहीण असेल तर त्यांच्या बाबत चांगली बातमी येईल. आजवर तुमची भेट घ्यायला ते टाळत असतील तर आत्ता ते प्रयत्नपुर्वक २७ जानेवारीनंतर भेटतील.  हाताखालचे लोक किंवा सेवेदार सुध्दा आपल्या शब्दाबाहेर जाणार नाहीत.  आपला वैवाहिक जोडीदार या महीन्यात नोकरी व्यवसाय या मध्ये व्यस्त असेल. एकंदरीत आपले जोडिदाराबरोबर काही आनंदाचे क्षण जमून येतील इतकी उसंत या महिन्यात नाही. आपले वरिष्ठ  यांच्या बाबतीत फ़ारसे वेगळे काही घडणार नाही. आपली मुले देखील काहीतरी चमकदार कामगिरी करतील. एकंदरीत नातेसंबध स्तरावर महिना चांगला असेल.

नोकरदारांना वेळच्या वेळी पगार मिळत असतो. व्यावसायीकांना येणे असेल तर ६ फ़ेब्रुवारीपर्यंत देणेकरी झुलवत ठेऊ शकतो हे गृहीत धरुन नियोजन केलेले बरे.

वृषभ राशीच्या लोकांना आपल्या जोडादाराच्या बाबतीत जानेवारी महिन्यात संघर्षाची स्थिती आलेली असेल तर या महिन्यात तशी असणार नाही. तुम्ही अधिकारी असाल आणि गेले २ -३ महिने हाताखालचे लोकांनी असहकार केला असेल तर आता परिस्थिती बदलेल. हेच लोक तुमच्या वरिष्ठांकडे तुमची प्रशंसा करतील. यामुळे वरिष्ठ खुष होतीलच असे नाही पण नाराजी असेल तर कमी होईल. मुलांच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर २७ जानेवारीनंतर ते सुटतील.  बाकीच्या नातेसंबंधाबाबत फ़ारसे वेगळे काही घडणार नाही. आपलाही महिना नातेसंबंध स्तरावर बरा असेल.

खर्च कमी झाले म्हणजे उत्पन्न वाढल्यासारखे आहे असा अनुभव २७ जानेवारीनंतर अनावश्यक खर्च नियंत्रणात आल्याने येईल. व्यावसायीकांना फ़ार मोठे उत्पन्न येईल असे नाही. नेहमीचे व्यवहार सुरु राहतील.

मिथून राशीच्या लोकांना अधिकारी असाल तर हाताखालचे लोक गुप्त कारवाया करुन तुमची झोप उडवतील. तुमचे मित्र वाटणारे सहकारी त्यांना साथ देतील.  ते जास्तीत जास्त काय करतील याचा आढावा घेऊन ठेवा. यासगळ्या प्रकाराने तुमचे वरिष्ठ अडचणित येणार नसतील  तर ते आपली साथ देतील.  भावंड आजारी असेल तर ती चिंता दुर होईल. मुलांचे  होणारे कलाप्रदर्शन इतकेच काय ते चांगले ह्या महिन्यात दिसेल.

या महिन्यात आवक वाढेल असे नाही पण आवक पेक्षा खर्चाचे प्रमाण वाढलेले दिसेल. यात अचानक आलेले खर्च असतील. यासाठी आत्ताच तरतूद करुन ठेवा. आपले प्लॅनिंग चांगले असेल तर संकटावर मात करणे सोपे होते.

कर्क वैवाहीक जोडीदार याच्यासोबत एखादा सिनेमा पहाणे किंवा हॉटेलमधील जेवणाचा आस्वाद घेणे असे सुखद प्रसंग नक्कीच आहेत.  भावंडे कटू बोलली तरी २७ जानेवारीनंतर ही कटूता कमी होईल. नोकरी-व्यवसायातले आपले कनिष्ठ आणि वरीष्ठ यांच्या स्तरावर काय चालले आहे ह्या बाबत जरा चाचपणी करा. मागील महिन्यात या दोघांनी एकत्र येऊन आपल्या विरुध्द षडयंत्र केलेले असेल तर आता वातावरण निवळेल. मुलांच्या बाबतीत फ़ारसे मनावर घेऊ नका.

व्यावसायीक असाल तर एक मोठे डील फ़ेबृवारी महिन्याच्या ६ तारखेपर्यंत येणार आहे. लगेच काही नविन व्यवसायाचे उत्पन्न येते असे नाही पण हालचाली तर नक्कीच सुरु होतील.

सिंह राशीला महिनाभर वरिष्ठ तुम्हाला घरी काही सुख लाभू देतील असे वाटत नाही. घरी असताना सुध्दा फ़ोनवरुन काहीतरी अपमानास्पद बोलून आपली झोप उडवतील. महिनाभर वरीष्ठांचे चमचे काही तरी चुकीचे बोलून आपल्याला अडचणीत आणतील. मित्र वाटणारे सहकारी सुध्दा संशयास्पद भुमिका घेतील. भावंडे खास करुन लहान बहीण असेल तर ती रुसली आहे असे महिनाभरात कधी तरी घडेल.  वैवाहीक जोडीदार तुमच्या मनस्तापात भर घालणार नाहीत हे मात्र नक्की. असा एकंदरीत नातेसंबंध स्तरावर संमिश्र वातावरणाचा महिना असेल.

व्यावसायीकांना  काही येणे असेल तर २७ जानेवारी पुर्वी सतत फ़ॉलोअप करुन मिळवा. खास करुन एखादे येणे जर उशीर झाला तर मिळणार नसेल किंवा ती व्यक्ती शब्द फ़िरवेल असे वाटत असेल तर अश्या वसूलीला २७ जानेवारीपुर्वी जमा करुन घेण्याला प्राधान्य द्या.

कन्या राशीला  या महीन्यात भावंडांशी जुळवूनच घ्यावे लागणार आहे. हाताखालचे लोक फ़ारसे त्रासदायक नसतील . वरिष्ठ तुमचा सल्ला घेतील. ही परिस्थिती जरा नाजूक असते तेव्हडी कुशलतेने हाताळा. वरिष्ठांच्या फ़ार पुढे किंवा मागे असून चालत नाही. त्यांनी सल्ला मागीतला म्हणजे आपण फ़ार मोठे झालो असे नाही.

अजून विवाह झाला नसेल तर रोमान्स ला ग्रहण लागेल. लगेच ब्रेक अप होत नाही हे खरे. पण काहीतरी बिनसलय हे जाणवेल. या ठिकाणी हम मुश्ताक है वो बेजार हा शेर आठवावा अशी परिस्थिती आहे.  विवाह झाला असेल तर तिकडे जैसे थे असेल. म्हणजे रोमान्स  नसेल पण भांडणेही नक्कीच नसतील. ही केवळ नाराजी असेल.

कन्या राशीचे लोक फ़ारसे व्यावसायीक नसतात. त्यांना व्यावसायीक तेजी किंवा मंदी फ़ारशी झेपत नाही. आपली नोकरी करावी आणि गुजराण करावी असे साधे लोक असतात. प्लॅनिंग जबरदस्त असते. नाही म्हणायला शेअर मार्केटचा तुमचा अभ्यास बरोबर असतो. पण डेरिंग नसते. यावेळेला डेरिंग करुन पहा. ६ फ़ेब्रुवारीच्या आत पोझीशन क्लिअर करा. जास्त रिस्क नको.

तूळ राशीला वैवाहीक जोडीदार जरा तिखट बोलून तुम्हाला हर्ट करेल. काय करणार त्यांचा स्वभाव आहे. आपल्याला ही परिस्थिती कशी हाताळायची याचे चांगले कौशल्य आहे.  भावंडे तुमच्या शब्दाबाहेर नसतील. हाताखालचे किंवा वरीष्ठ , मुले यांच्या सर्वांच्या स्तरावर सर्वकाही ठिक असेल. नोकरी व्यवसायात काही लहान प्रवास मागे लागले असतील तर २७ जानेवारी नंतर थांबतील. २७ जानेवारी ते ६ फ़ेबृवारी कुशल मंगल असल्याचे जाणवेल.

व्यावसायीक असाल तर आर्थिक स्तरावर फ़ारसे काही घडताना दिसणार नाही. आराम तरी कधी करणार ? घ्या जरा निवांत झोप.

वृश्चिक राशीला भावंडे अबोला धरतील. मुलांच्या खर्चाला ब्रेक लागेल अशी परिस्थिती नाही. नोकरी/व्यवसायात हाताखालचे लोक गुप्त कारवाया करत असतील तर या महिन्यात तुम्ही आक्रमक पणे त्यांना अडवाल. कनिष्ठ तुमच्याच शाळेत शिकलेले असतील त्यामुळे त्यांचा रोख नक्की तुम्हाला कळेल. वरिष्ठ अचानक पवित्रा बदलून अडचणीत आणतील. वैवाहीक जोडीदार काय तो तुमच्याशी प्रेमाने वागेल असे महिनाभर वातावरण आहे.

या महिन्यात आलेले पैसे योग्य जागी गुंतवण्याच्या संधी येतील. २७ जानेवारी पुर्वी हे काम लक्षपुर्वक संपवा. एकदा हातात आलेले पैसे गुंतवले नाहीत तर त्याला वाटा फ़ुटतील.

धनु राशीला भावंडांशी सुसंवादाच्या संधी येणार आहेत. जर काही तातडीचा नसलेला पण महत्वाचा संवाद साधायचा असेल तर  जरुर करा.या महिन्यात मुले खर्च वाढवणार आहेत तर क्वचित चिंताही करायला लावतील. मुले तरुण, धाडशी असतील तर जरा जास्त लक्ष द्या. यावर नियंत्रण कसे करायचे याचा आधी विचार करा. आपल्या ऑफ़ीसमधले हाताखालचे लोक काही तरी कारण काढून घरच्या व्यक्तींशी संपर्क करतील.  वरिष्ठ ही याला साथ देतील. ऑफ़ीसच्या लोकांना घरी बोलावण्याची संधी हवी असेल तर चांगले प्लॅनिंग करा. आपले सर्वांशीच संबंध चांगले होतील.

या महिन्यात तुम्हालाही गुंतवणूकीची संधी आहे. काही सरकारी योजना जसे पीपीएफ़ ची गुंतवणुक असेल किंवा अन्य योजना यांचा विचार करा. गुंतवणुक चांगली झाली तर ते एक प्रकारे उत्पन्नच असते.

मकर राशीला सुदैवाने भावंडांची सध्या प्रगती असल्याने ती चिंता नाही. तुमचा जोडीदार सहसा तुम्हाला अडचणित आणत नाही. मुलांच्या स्थितीत फ़ारसा फ़रक पडणार नाही.  कनिष्ठ म्हणजे तुम्हाला सेवा देणारे आणि वरिष्ठ यांची मानसीकता चांगली असल्यामुळे महिनाभर ह्या स्तरावर काही तणाव नाही. नुकत्याच सुरु झालेल्या साडेसातीच्या पार्श्वभुमीवर हा महिना तरी त्रासदायक असणार नाही.

या महिन्यात आपल्याला शेती/प्रॉपर्टी इ अन्य मार्गाने उत्पन्न सुरु होईल. एखादी प्रॉपर्टी भाडेकरार करुन देण्याच्या विचारात असाल तर योग्य पर्याय आहे.

कुंभ राशीला भावंडे सोडता  वैवाहीक जोडीदार असो की मुले असोत, तुम्हाला सेवा देणारे असो की वरिष्ठ; सर्वच स्तरावर तणावाची परिस्थिती असेल. कुणाची तब्येत बिघडेल तर कोणी तुमच्यावर नाराज होईल. बुध्दीमत्तेच्या जोरावर तुम्ही हे सर्व मॅनेज कराल. बुध्दीमत्ता अनेक प्रकारची असते. जे मुळात बुध्दीमान असतात त्यांना भावनीक स्तरावरचे प्रश्न कसे हाताळावेत याचे उत्तम ज्ञान असते. या पैकी कुंभ रास आहे. महिन्याचा सुरवातीला ही स्थिती असली तरी ही परिस्थिती उतरार्धात नियंत्रणात येणार आहे त्यामुळे काळजी घ्या पण अनावश्यक काळजी करु नका.

या महिन्यात अठन्नी आमदनी खर्चा रुपया असे वातावरण आहे. अनावश्यक खर्चाने बेजार होणार आहात. याची तरतूद आधीच करा.

मीन राशीला या महिन्याच्या सुरवातीपासून भावंडे आपल्याला सहकार्य करतील. एखाद्या महत्वाच्या कागदपत्रांवर सही हवी असेल तर उत्तम संधी आहे. हाताखालचे लोक मनापासून सहकार्य महिनाभर करणार आहेत त्यामुळे ऑफ़ीसचे एखादे महत्वाचे रेंगाळलेले काम पार पाडा. वरिष्ठ त्यांच्या व्यापात असतील त्यांचा फ़ारसा त्रास नसेल. मुले किंवा वैवाहीक जोडीदार सुध्दा आपल्या शब्दाबाहेर जाणार नाहीत त्यामुळे महत्वाच्या योजना आखा.

व्यावसायीक असा किंवा नोकरदार या महिन्यात अनेक मार्गांनी जास्तीचे पैसे येणार आहेत. त्याचे काय करायचे याचा विचार करुन ठेवा.