Sunday, December 22, 2019

सौ. प्राची कुबेर यांना त्यांची कन्या दिप्ती हिच्या विवाहाच्या बाबतीत मी केलेले प्रेडीक्शन बरोबर आले

सौ. प्राची कुबेर यांना त्यांची कन्या दिप्ती हिच्या विवाहाच्या बाबतीत खालील प्रमाणे कळवले होते.

आपली कन्या कुमारी दिप्ती हिची जन्मकुंडली प्रथम पाहिली.

हिचा सप्तमेश गुरू आणि शुक्र दोघेही राहूच्या नक्षत्रात असल्यामुळे परजातीय मुलाशी विवाहयोग संभवतो.

हा प्रेमविवाह असू शकतो पण या कारणाने घरच्या लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल.

२९ मार्च ते २० एप्रिल २०१९  किंवा ४ नोव्हेंबर २०१९ ते मार्च २०२० या काळात विवाहयोग आहेत.

वरील जातीबाहेर विवाहाचे प्रेडिक्शन बरोबर असेल तर या विवाहाला परवानगी द्यावी कारण हे प्रारब्ध आहे.

हे प्रेमविवाह संदर्भात प्रेडिक्शन चुकले असेल तर वरील काळात विवाह योग आहेत.

आई-वडिल वेगवेगळ्या जातीचे अश्या मुलाचे स्थळ आले आणि बाकी सर्व तुमच्या अपेक्षा नुसार असेल तर यासाठी विवाह टाळू नये.

शुभंभवतु

मी वर कळविल्या प्रमाणे दिप्ती हिचा विवाह दिनांक २ डिसेंबर २०१९ रोजी संपन्न झाला.

या बाबतची प्रतिक्रिया त्यांनी व्हाटस अप वर लिहून पाठवली आहे.

नमस्कार
आपल्या  भविष्याप्रमाणे  दिप्तीचे लग्न 2 डिसेंबरला झाले आपल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद .लग्नानंतर लगेच दोन नातेवाईकांना देवाज्ञा झाली त्यामुळे शुभ बातमी कळवण्यास  उशीर  झाला त्याबद्दल क्षमस्व

Monday, December 16, 2019

विवाहासंदर्भात तीन चुकीच्या प्रथा

मी ज्योतिष शिकायला लागल्यापासून काही चुकीच्या प्रथांचा विचार करतो आहे. धर्म ग्रंथामधे यासाठी काही कारण सांगीतले आहे का ते शोधतो आहे. जेष्ठ धर्माधिकार असलेल्या जेष्ठांचे विचार ऐकतो आहे. या तीनही प्रथा का आहेत याचे कारण अद्याप समजले नाही पण या तीनही प्रथा गैर आहेत अनावश्यक आहेत आणि अनाठायी याची भिती पसरली आहे.

या पैकी पहिली प्रथा पौष महिन्यात विवाह करु नयेत पुढे जाऊन यासंदर्भात बोलणी करु नयेत, स्थळे पाहू नयेत असेही गैरसमज आहेत. आज याबाबत आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत कारण लवकरच पौष महिना दिनांक २७ डिसेंबर २०१९ ते २४ जानेवारी २०२० या काळात आहे.

या शिवाय सिंहस्थ म्हणजे जेंव्हा सिंह राशीत गुरु असतो तो कालावधी विवाहासाठी वर्ज मानला गेलेला आहे परंतु सिंह राशीत गुरु जाण्यासाठी अजून ८ वर्षे कालावधी आहे तर पितृपक्ष हा कालावधी विवाहाच्या कामासाठी अयोग्य मानला आहे. यावर चर्चा आपण पुन्हा योग्य वेळी करु.

आज आपण चर्चा करु पौष महिन्यात विवाह करु नये किंवा विवाहसंदर्भातले सर्वच कार्येक्रम जसे स्थळांच्या संदर्भात चर्चा, वधू - वरांच्या नातेवाईकांच्या भेटी किंवा विवाह ठरवणे या संदर्भातल्या प्रथा.

पुष्य नक्षत्रात चंद्र असताना विवाह करण्यास योग्य नक्षत्र नाही असे मानून विवाह केला जात नाही. ह्या पुष्य नक्षत्राचा आणि पौष महिन्याचा काही संबंध नाही.  पौष महिन्याला खरमास असेही म्हणतात. काही लोक याला मलमास असेही म्हणतात. खर याचा अर्थ गाढव. रवि जेंव्हा धनू राशीत असतो तेंव्हा रविला शक्ती नसते असेही म्हणतात. जेंव्हा रवि बलवान नसतो तेंव्हा कोणत्याही कार्यात अपयश येण्याची शक्यता असल्यामुळे १७ डिसेंबर ते १३ जानेवरी या काळात येणार्या पौष महिन्यात धार्मिक विधी करु नये असा प्रवाह आहे.

तांत्रिक दृष्ट्या रविला शक्ती नसते असे म्हणणे ही गैर आहे. धनू ही अग्निराशी आहे. गुरु हा शनिचा मित्र आहे त्यामुळे रविला शक्ती नसते तांत्रिक दृष्ट्या न पटणारे आहे. पण ही एकदा प्रथा पडली म्हणजे अनेक पिढ्या चुकीचे बिंबवले जाते.

आजकाल विवाह विवीध कारणाने लांबत आहेत अश्यावेळी एक महिना विवाह विषयक चर्चा सुध्दा करायची नाही हे बरोबर नाही. त्यातुनही मुहूर्त शोधणारे आणि जाहीर करणारे पंचांग जर विवाहाचे मुहूर्त पौष महिन्यात देते तर आपण असे मुहूर्त नाकारणे बरोबर नाही असे माझे मत आहे.

दातेपंचांगकर्ते यांनी सुध्दा काही वर्षांपुर्वी लेख लिहून ही प्रथा अनावश्यक असल्याचे सांगीतले होते.यास्तव पालकांनी विनाकारण भिती बाळगू नये व विवाहाची बोलणी पौष महिन्यात सुरु ठेवावी व विवाह मुहूर्त असताना विवाह संपन्न करावेत. 

Sunday, December 8, 2019

१६ डिसेंबर २०१९ ते १४ जानेवारी २०२० या काळाचे राशीभविष्य ( मकर-कुंभ-मीन )


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १६ डिसेंबरला २०१९ ला धनु राशीत जाणार आहे
बुध २५ डिसेंबरला ला धनु राशीत जाणार आहे.
मंगळ २५ डिसेंबरला वृश्चिक राशीत जाणार आहे.
शुक्र ८ जानेवारी २०२० ला कुंभ  राशीत जाणार आहे.

धनु राशीत संपुर्ण महिन्यात चंद्र, बुध, रवि या या महिन्यात येणारे ग्रह तसेच आधीपासून धनु राशीतच बसलेले गुरु, शनि, केतू आणि प्लुटो यामुळे धनु राशीत सात ग्रह येतील. २५ डिसेंबर २०१९ ची अमावस्या आणि २६ डिसेंबर रोजी असलेले कंकणाकृती सुर्यग्रहण या बाबतचा लेख नुकताच प्रसिध्द झाला आहे.


जानेवारी २०२० पासून नविन वर्ष सुरु होते. यासाठी वार्षिक राशी भविष्य मी आधीच प्रसिध्द केले आहे.

त्याच्या ब्लॉगवर असलेल्या लिंक आणि युट्युब वरच्या लिंक खाली पहा.
https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_54.html  ( मेष ते कन्या रास )

https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_97.html  (  तुळ ते मीन रास )
वार्षिक राशीभविष्य २०२०
मेष -वृषभ- मिथुन https://youtu.be/b97dxZOyD_g
कर्क -सिंह-कन्या https://youtu.be/K32EZmPdVZc
तुळ- वृश्चिक - धनु https://youtu.be/PUCLnZmjx40
मकर-कुंभ-मीन  https://youtu.be/ZheFl5O3Xmc

आता राशीनिहाय १६ डिसेंबर २०१९ ते १४ जानेवारी २०२० या काळाचे राशीभविष्य पहा. हे राशीभविष्य लग्नराशीकडून पहावे. लग्नरास माहित नसल्यास चंद्रराशीकडून पहावे.

मकर रास :


फ़क्त एक महिना राहीलाय तुमच्या राशीचा मालक मकर राशीत येण्यासाठी. २४ जानेवारी २०२० ला शनि मकर राशीत आला की तुमचे दिवस बदलतील. या महिन्यात गुरु, शनि, केतू प्लुटो यांच्या साथीला बुध आणि रवि महिनाभर धनु राशीत आहेत ही परिथिती चांगली नाही. त्यात २५-२६ डिसेंबर २०१९ ला मकर राशीकडून बाराव्या स्थानी होणारी अमावस्या आणि सुर्यग्रहण सुध्दा फ़ारसे चांगले नाही.

आपण निर्माण होणार्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करण्यासाठी सक्षम आहात. जेव्हढे धैर्य, सोसण्याची वृती आपल्याकडे आहे, अन्य राशींकडे नाही यामुळे आपण निर्धास्त असाल असे नाही पण सावधपणे परिस्थिती हाताळू शकाल.

आपल्याला साथ फ़क्त शुक्राची आहे. हा शुक्र आपल्या कर्म स्थानाचा आणि पंचम स्थानाचा म्हणजे क्रियेटीव्हली आव्हानांचा सामना करण्यासाठी आपल्याला साथ देणार आहे. खर्च, नुकसान, नको असलेला प्रवास, आजारपण हे या महिन्यात आपल्यासा सतावेल. पण आपण पुन्हा उभे रहाल हा विश्वास आहे.

कुंभ रास :

मकर आणि कुंभ दोन्ही शनिच्या राशी असल्या तरी एकदम भिन्न वातावरण या महिन्यात आहे. सात ग्रहांचे संमेलन आपले नुकसान करणार नसून उलटा फ़ायदा देणार आहे. २४ जानेवारी २०२० पर्यंत आपले दिवस चांगलेच आहेत. आपल्याला जानेवारी २०२० पर्यंत प्रवास योग आहेत. काहीना  परदेश प्रवासाचे योग सुध्दा येणार आहेत.

सर्व धन स्थानांचे अधिपती लाभ स्थानी असणार आहेत. व्याजाच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून, अचानक धनलाभ आणि दरमहिना नोकरी/व्यवसायाच्या माध्यमातून असे सर्व मार्गांनी धन जमा होणार आहे. व्यवसाय व्यापाराच्या नव्या संधी हाताला लागतील आणि घबाड योग कशाला म्हणतात ते समजेल. कामे सुखासुखी पुर्ण होणार नाहीत. यासाठी तुम्हाला तुमची शारिरीक, मानसीक, बौध्दीक क्षमता पणाला लावावी लागेल.

इतके चांगले दिवस क्वचितच एखाद्या महिन्यात येतात. आपला अनुभव मला जरुर कळवा.

मीन रास :

गेले - वर्षे मीन रास संधी मिळत नाही म्हणुन वाट पहात होती ती एक नाही तर अश्या अनेक संधी आपला दरवाजा ठोठावत आहेत. हे काम करु का ते करु अशी आपली अवस्था होणार आहे. दशमेश दशमात गुरु आपल्याला ह्या संधी कशा उत्तम रितीने हाताळायच्या याचेही मॅनजमेंट ट्रेनिंग देण्यासाठी सज्ज आहे.

आपण या संधीचे सोने करण्यासाठी सज्ज रहा आणि पहा पुढील काही दिवसात ह्या अनेक संधींना व्यवस्थीत हाताळल्यानंतर मोबदला तर नक्कीच मिळेल. एक कमतरता तुमच्यात आहे ते म्हणजे मोबदला रिकव्हरी चे कौशल्य तुमच्या कडे नाही. काम तुम्ही कराल पण तडफ़ेने मोबदला पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्नात कमी पडाल. ही वृत्ती टाकून व्यापारी जसा हिशोबाने मोबदला बसूल करतो तसे वागा. मग याची एकदा सवय लागली म्हणजे जीवनात यशस्वी नक्कीच व्हाल

शुभंभवतु

मी ज्योतिष शिकायला लागल्यापासून काही चुकीच्या प्रथांचा विचार करतो आहे. धर्म ग्रंथामधे यासाठी काही कारण सांगीतले आहे का ते शोधतो आहे. जेष्ठ धर्माधिकार असलेल्या जेष्ठांचे विचार ऐकतो आहे. या तीनही प्रथा का आहेत याचे कारण अद्याप समजले नाही पण या तीनही प्रथा गैर आहेत अनावश्यक आहेत आणि अनाठायी याची भिती पसरली आहे.

या पैकी पहिली प्रथा पौष महिन्यात विवाह करु नयेत पुढे जाऊन यासंदर्भात बोलणी करु नयेत, स्थळे पाहू नयेत असेही गैरसमज आहेत. आज याबाबत आपण विस्ताराने चर्चा करणार आहोत कारण लवकरच पौष महिना दिनांक २७ डिसेंबर २०१९ ते २४ जानेवारी २०२० या काळात आहे.

या संदर्भात अजून माहिती ही लिंक क्लिक करुन वाचा.

https://gmjyotish.blogspot.com/2019/12/blog-post_16.html