Sunday, January 26, 2020

तानाजी, छपाक चोरीचा मामला आणि सिनेमाचे यश आणि ज्योतिषशास्त्रीय विचार

सिनेमा ही सिनेमातल्या कलाकारांनी  केलेल्या कलेचे प्रत्यक्ष प्रदर्शन नसून फ़ोटोग्राफ़ी आहे. कलाकारांच्या कलेचे प्रत्यक्ष प्रदर्शन म्हणले तर ते नाटक आहे. म्हणून नाटक हे शुक्राच्या अंमलाखाली येते तर कोणतीही फ़ोटोग्राफ़ी ही राहूच्या अंमलाखाली येते. नाटकात मुळ संहीता जरी बदलत नसली तरी जितके प्रयोग करु तितके वेळा कलात्मक बाजू सुधारण्याची संधी असते तसे सिनेमाचे नाही. एकदा रिलीज झाला की त्यात बदल होत नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे राहूच्या अंमलाखाली असलेल्या गोष्टींचा बेभरवशीपणा.

अनेक दिवस माझा असा समज होता की जितके सिनेमे कै.शाहीर दादा कोंडके यांनी दिले तितके सर्व सिल्वर जुबिली हीट झाले. पण तस नाही. दादा कोंडके यांचे काही सिनेमे सिल्वर ज्युबिली झाले नाहीत.

राहूच्या अंमलाखालील सिनेमाचा बेभरवशी कारभार एखाद्या निर्मात्याला, कलाकाराला इतकी प्रसिध्दी देऊन जातो तर कित्येकांना देशोधडीला लावतो. अमिताभचा सिनेमा चालला म्हणून अमिताभची सिनेमा तयार करण्यासाठी लागणारे सेट्स पुरवणारी कंपनी चालली नाही आणि अमिताभ ला कोर्टाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.

राहूच्या अंमलाखालील बेभरवशी गोष्टींमुळे निर्माता सिनेमाच्या टाय़टल पासून, कलाकारांच्या सिलेक्शन मधे सुध्दा ज्योतिष, न्युमरोलॉजी, मुहूर्त याचा उपयोग करुन सिनेमाचा व्यवहार नियंत्रीत करु पहातो.

महेश कोठारे यांच्या सिनेमाची नावे पाहीली तर झपाटलेला, धुमधडाका, धडाकेबाज, पछाडलेला,थरथराट, देदणादण किंवा खबरदार पाहीले तर यात पाच अक्षरे दिसतात. अर्थात सिनेमाचे टायटल पाच अक्षरांचे म्हणजे सिनेमा चालणार असा काही फ़ॉर्म्युला नाही अन्यथा पाच अक्षरे असलेले सिनेमे पडायलाच नको. पण तसे नाही. शेवटी प्रेक्षकांना अपेक्षीत करमणूक देताना सिनेमात खर्च झालेला पैसा किमान वसूल व्हावा ही निर्मात्याची माफ़क अपेक्षा असते, या शिवाय कलाकारांना प्रसिध्दी मिळावी, कलाकारांचा ब्रॅड तयार व्हावा ही अपेक्षा कलाकारांची असते. सिनेमा चालला किंवा सुपर हीट झाला तर तो बोनस. यामुळे सिनेमाचा मुहूर्ताचा शॉट, रिलिझ करण्याची तारीख, टायटल न्युमरोलॉजी इथपासून कलाकारांच्या जन्मकुंडली पाहून सध्या प्रसिध्दीचा काळ आहे किंवा नाही इथपर्यंत ज्योतिष विषयावरचे मार्गदर्शन घेतले जाते.
Chappak

१० जानेवारी २०२० ला दोन सिनेमे रिलीझ झाले. एक होता छपाक तर दुसरा तानाजी. छपाक बॉक्स ऑफ़िसवर आपटला. ह्या सिनेमाने निर्मात्याने केलेला खर्च जेमतेम भरुन काढला अशी माहिती आहे तर तानाजी मात्र जोरदार चालला. थोडक्यात एकाच दिवशी रिलीझ झालेले सिनेमे रिलीझच्या दिवसाचे पंचांग पाहून चालतात असे नाही. पण सिनेमा तयार झाल्यावर मात्र अनेक निर्माते, त्यांचे फ़ायनान्सर आणि कलाकार एकत्रीत सिनेमा पहात असतील तेंव्हा याचे भविष्य लक्षात आल्याशिवाय रहात नाही. मग रिलीझ च्या तारखेचे अर्थात त्या दिवसाच्या पंचांगाचे महत्व लक्षात येते. माझी खात्री आहे की छपाक सिनेमाची निर्माती आणि कलाकार दिपीकाला हे नक्कीच लक्षात आल्यामुळे तीने १० जानेवारी २०२० तारीख निवडली असावी. १० जानेवारी २०२० ला अजून कोणताही सिनेमा रिलीझ झाला असता तर माझ्या मते तो चालायला पहिजे अशी ग्रहस्थिती नक्कीच होती.

Tanhaji

छपाक सिनेमात प्रेक्षकांना अपेक्षीत करमणूक काहीच नसावी, कारण ना ती लव्हस्टॊरी आहे ना तो अ‍ॅक्शन सिनेमा आहे ना विनोदी सिनेमा. अ‍ॅसीड फ़ेकून चेहेरा विद्रूप झालेल्या मुलीची कहाणी कितीही रंगवली तरी लोकांच्या मनात जागा करण्याचा फ़ॉर्म्युला तो नसावा. पण १० जानेवारी २०२० ला रिलीझ झाल्यामुळे या सर्वावर मात करुन सिनेमा किमान खर्च भरुन येईल इतका चालला.
Choricha Mamla 2020
३१ जानेवारी २०२० ला चोरीचा मामला नावाचा दुसरा मराठी सिनेमा रिलीझ होत आहे. १९७६ साली चोरीचा मामला नावाचा निळू फ़ुले, यशवंत दत्त, उषा चव्हाण कलाकार असलेला पहिला सिनेमा प्रदर्शीत झाला होता. चोरीचा मामला, मामाही थांबला हे सचीन च्या गंमत जंमत सिनेमातले गीत खुप चालले. यामुळे जेव्हा गुगल वर सर्च करताना हा सिनेमा लगेचच दिसत आहे. हिंदी सिनेमा भारतदेश डोळ्यासमोर ठेऊन काढला जातो पण मराठी सिनेमाचे तसे नाही. हा सिनेमा महाराष्ट्रातच चालणार त्यामुळे त्याचे टायटल मराठी माणसांना परिचीत असेल आणि विनोदी सिनेमा असेल तर निम्मा व्यवसाय झाल्यात जमा आहे.

मराठी सिनेमा रिलीझ करताना निर्मात्याला हिंदी सिनेमा रिलीझ होण्याच्या तारखा सोडाव्या लागतात कारण मराठी प्रेक्षक सुध्दा बिग बजेट, बहू चर्चीत सिनेमा याच दिवशी रिलीझ होणार असेल तर मराठी सिनेमा त्या आठवड्यात चांगला असून आपटतो. याचे कारण मुहूर्त नसून सिनेमा प्रेक्षकांचे अर्थकारण आहे. आजकाल सहकुटूंब सिनेमा मल्टीस्क्रिन सिनेमा गृहात पहाणे म्हणजे किमान एकहजार तर कमाल दोन हजार रुपये खर्च होतात. त्या आठवड्यात मराठी माणून दोन सिनेमे नक्कीच पहात नाही.

यामुळे मराठी सिनेमाच्या वाट्याला चांगले मुहूर्त येतच नाहीत किंवा सिनेमा तयार असूनही वाट पहावी लागते. ३१ जानेवारी २०२० लाच पाच हिंदी सिनेमे रिलीझ होत असताना यापैकी बिग बजेट, बहूचर्चीत, प्रसिध्द सिनेकलाकारांच्या त्या सिनेमातील रोलमुळे सिनेमा चालेल असा एकही सिनेमा नाही ही जमेची बाजू आहे. या दिवसाचे पंचांग आणि पहिला शो ज्या वेळेला रिलीझ होतो यावेळेचे लग्न पहाता हा सिनेमा चांगला व्यवसाय करेल याची खात्री वाटते.

Sunday, January 5, 2020

१५ जानेवारी २०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळाचे राशीभविष्य

1. १५ जानेवारी २०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळाचे मेष ते मिथुन राशीचे राशीभविष्य  https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_46.html


2.  १५ जानेवारी २०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळाचे कर्क ते कन्या राशीचे  राशीभविष्य https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_20.html


3. १५ जानेवारी २०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळाचे तुळ ते धनु राशीचे राशीभविष्यhttps://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_6.html


4.  १५ जानेवारी २०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळाचे मकर ते मीन राशीचे राशीभविष्य https://gmjyotish.blogspot.com/p/blog-page_47.html