राशीकुंडली आणि बरेच काही
ज्योतिष शिकताना आपण लग्न कुंडली तयार करायला शिकतो तसेच राशी व नवमांश कुंडली ह्या सुध्दा शिकतो. पैकी राशी कुंडलीचा नेमका उपयोग काय असा प्रश्न बरेच वेळा विचारला जातो. ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने काही प्रश्नांची उतरे चपखल देता येत नाहीत. म्हणुन ह्या लेख लिहावा असे वाटले.
काही लोक मानसीकता पहाण्यासाठी चंद्रकुंडली पहातात. हे सुध्दा योग्य आहे. कर्क राशीचा माणुस, एखादी त्याच्या आयुषात घडलेली वाईट घटना मनाला फ़ार लाऊन घेईल. त्याचा परिणाम म्हणुन काही मनोकायीक रोग त्याला जडण्याची शक्यता पहाताना चंद्र कुंडली आवश्यकच आहे. थोडक्यात जीवनात काय घटना घडतील हे लग्न कुंडलीवरुन पहाता येईल. त्या कधी घडतील हे ग्रह गोचर व दशा- अंतर्दशा पाहून सांगता येईल परंतु झालेल्या घटनेचा जातकावर प्रभाव कसा पडेल हे पहायला चंद्र कुंडली उपयोगी आहे. हे मत मला आपल्या समुहावर असलेल्या मा. सतिश उपाध्ये यांच्याकडून समजले. यासाठी त्यांचे अभिनंदन व आभार.
भारतीय तत्वज्ञान अत्यंत सुक्ष गोष्टींचा उहापोह करते. भौतिक देह पहाताना लग्नकुंडली पहावी, मानसीक देह किंवा मनोव्यापार पहाताना चंद्र कुंडली पहावी असे अनेक ज्योतिष विषयावरचे तज्ञ लोक सांगतात. जन्मोजन्मीचे संस्कार गुरु वरुन पहावेत. जन्मोजन्मीच्या वासना राहू वरुन पहाव्यात आणि आत्मा, आत्मबल इत्यादी रवि वरुन पहावे असे माझे मत बनले आहे.
साडेसाती पहाताना आपण चंद्राचा विचार करतो कारण कर्मफ़ळे मिळताना चंद्र अर्थात मनाला त्रास होतो. ह्या वेळेला आपण खास करुन चंद्र कुंडली पहातो. चंद्राच्या व्ययस्थानातून जेंव्हा शनि भ्रमण करतो तेंव्हा मानसीक पीडेला सुरवात होते. जेंव्हा जातकाच्या चंद्र राशीमधल्या जन्मनक्षत्रावरुन शनिचे भ्रमण सुरु होते तेंव्हा ही पीडा पराकोटीला पोहोचते. उतरत्या साडेसातीत शनिचे भ्रमण चंद्राच्या धन अर्थात कुटुंब स्थानामधून होत असते. आपल्याला भाऊ बहिण असतात हे जन्माने आलेले नाते लग्नकुंडलीतून समजते. पण जेव्हा नात्यातल्या व्यक्तींसोबत मनाचे बंध बांधले जातात. साडेसातीत ही बंधने ताणली जातात तो त्रास उतरत्या साडेसातीत दिसतो.
राशीकुंडलीचा उपयोग महुर्त शास्त्राचा विचार करताना, लग्नाचा मुहुर्त शोधताना याचा उपयोग नक्की होतो. राशी कुंडली स्वतंत्र बनवली म्हणजे वधु- वरांच्या जन्मराशी नुसार विवाहाला ग्रह बल शोधता येते. पण राशी कुंडली न बनवता गुरु कितवा येतो हे पहाताना लग्न कुंडलीतल्या चंद्रापासुन तात्कालिक ग्रहांचे स्थान शोधणे थोडे कठीण जाऊ शकते. या साठी राशी कुंडलीची योजना असावी असे वाटते.
त्याही पुढे जाऊन मुहुर्तावर लग्न लावण्याची आवश्यकता काय आहे ? तसेच अनेक मुहुर्तापैकी कोणता मुहुर्त वधु- वरांना योग्य हे शोधण्याची आवश्यकता का आहे यावर थोडा प्रकाश टाकु.
अनेकदा अनेक जोडपी असे म्हणतात की वडीलांनी सांगीतले ह्या मुलीशी लग्न कर म्हणुन केले. त्यांनी पत्रिका जुळते की नाही हे पाहिले किंवा नाही हे त्यांनाच माहीत. परंतु आमचे स्वभाव, घरगुती निर्णय घ्यायची पध्दत, घरगुती संकटांना सामोरे जाण्याची पध्दत किंवा आमचे दोघांचे विचार इतके पुरक आहेत की आमच्यात मतभेद होत नाहीत आणि गेली अनेक वर्षे आमचा संसार सुखात चालला आहे.
अश्या जोडप्याचे खरच नशीब आहे की त्यांना उत्तम जोडीदार मिळाला. अश्यांचा पत्रिकांचा अजून अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. पण ज्यांचा विवाह व्हायचा आहे त्यांच्या पत्रिका उत्तम जुळतात अशी ग्वाही मिळाल्यावरही उपलब्ध मुहुर्तांपैकी सोयीचा मुहुर्त निवडायचा की लाभणारा असावा ? आजकाल पालक वधू वरांना लाभणार्या पैकी मुहूर्त सोडुन पंचागात उपलब्ध सोयीचा मुहूर्त निवडतात. मुहुर्त निवडायचा यावर विचार करताना मार्च महिन्यातला लाभणारा मुहुर्त टाळायचा कारण या काळात १० वी १२ वी च्या परिक्षा असतात व त्यामुळे दोन्ही कुटुंबातली १० वी १२ वी ला असलेली मुले विवाहात येऊ शकत नाहीत. मग मे महिन्यातला मुहुर्त शोधायचा कारण तो सर्वांना सोयीचा असतो. हे व्यवहार म्हणुन बरोबर असले तरी वधु-वरांच्या दृष्टीने तितकेसे बरोबर असेलच नाही.
विवाहा साठी किमान चंद्र, शुक्र आणि गुरु वधुवरांच्या राशीकुंडलीनुसार लाभतात किंवा नाही याची खात्री करुन मगच विवाह मुहुर्त निश्चीत करावा. विवाहप्रसंगी, विवाह हा संस्कार असल्यामुळे ह्या संस्काराचा परिणाम आयुष्यभर रहाण्यासाठी, ते गांभिर्य येण्यासाठी गुरु अनुकूल असावा. चंद्रापासून ४-८-१२ स्थानी गुरु येत असेल तर विवाह एकतर आधी करावा किंवा उशीरा करावा. गुरु हा मॅनेजमेंटचा कारक असल्याने, विवाह हा मोठा इव्हेंट असल्याने; गुरु अनुकूल नसताना अनेक अडथळे खास करुन वधू पित्याला पार पाडावे लागतात. गुरु अनुकूल नसता वधू- वर आजारी पडणे, वधू वर लग्नाला हो म्हणले असते तरी मनाने द्विधा मनस्थितीत ऐन लग्नाचे वेळी मनाचा गोंधळ उडणे यासारखे प्रसंग येऊ शकतात.
ऐन वेळी वधू किंवा वराने नियोजीत वधू किंवा वराबरोबर होणार्या विवाहास नकार दिला तर काय काय घडू शकते याचा विचार करुन अनेक पालकांच्या ह्र्दयाचा ठोका चुकू शकेल. मध्यमवर्गीय पालक कर्ज घेऊन मुलांचे विवाह करतात. अनेकदा हॉल भाडे, केटरिंग करता आगाऊ पैसे द्यावे लागतात. लग्नाच्या निमीत्ताने अफ़ाट खरेदी झालेली असते. अश्यावेळी पैसे वाया जाणार या शिवाय नातेवाईक व समाज यांना नाव ठेवायला जागा मिळून पालकांना मोठ्या कठीण मनस्थितीला सामोरे जावे लागते.
शुक्र हा प्रेमाचा कारक असल्याने तो सुध्दा विवाह प्रसंगी अनुकूल असणे महत्वाचे. विवाहात वधू वरांना एकमेकांबाबत प्रेम निर्माण होणे आणि काळासोबत वाढत जाणे अपेक्षीत असते. सोबत चंद्र अनुकूल असल्याने हा संस्कार करुन घेण्यास आवश्यक मानसीक स्थिती उत्तम रहाते. हे सर्व वधू- वरांना लाभणारा मुहूर्त शोधल्याने शक्य होते.
यामुळे काढीव मुहुर्त, उपलब्ध मुहुर्त आणि वधुवरांना लाभणारा शुभ मुहुर्त यातील फ़रक ज्योतिषाला/पुरोहीताला माहित असणे गरजेचे आहे. आज फ़ालतु कारणामुळे घटस्फ़ोटापर्यंत जाणार्या जोडप्यांना थांबवण्यासाठी मुळात त्यांचा विवाह लाभणार्या मुहूर्तावर करणे आवश्यक आहे. नवरा बायको यापैकी अनेकदा दोषी दोघेही नसतात. पण कठीण काळात त्यांचे वागणे बदलते. अश्यावेळी जरा थांबून घटस्फ़ोटाऐवजी नाते सुधारण्यासाठी वाट पहाणे ही समज विवाह हा संस्कार झाल्याने येते.
समाजात कुप्रथांचे मोठे प्रस्थ माजले आहे. काय तर आमचा वैदीक परंपरांवर विश्वास नाही म्हणुन कोर्ट मॅरेज करायचे. मग असा विवाह संस्कार न होता कॉन्ट्रॅक्ट होते. यासाठी पुर्वजांनी संशोधनाने निर्माण केलेल्या पध्दती, परंपरा यांच्याकडे डोळस पणे पहाण्याची आवश्यकता आहे.

No comments:
Post a Comment