१६ जुलै ते १६ ऑगस्ट २०१८ चे राशीभविष्य आणि चातुर्मास प्रारंभ

नमस्कार ज्योतिषप्रेमी लोकहॊ, दरमहिन्याचे राशीभविष्य मी आपल्या सेवेस आलो आहे. १६ जुलै २०१८ ते १६ ऑगस्ट २०१८ या काळात रवि कर्क राशीत प्रवेश करणार आहे. याच काळात चातुर्मास प्रारंभ होणार आहे. तरुण लोक म्हणतील चातुर्मासाचे आम्हाला काय ? आम्ही काय व्रत वैकल्य करायला म्हातारे झालोय ? व्रत वृध्द लोकांनी करावे आणि तरुणाईने कसेही वागावे असा समज असेल तर तो आधी बदलणे आवश्यक आहे. मी व्रत बध्द आहे याचा अर्थ नियम घालून त्या प्रमाणे वागतोय असा आहे. नियम काय असावेत ? ते धार्मिक नियम असावेत का ? असे प्रश्न ही पडतील. हिंदू धर्माने या काळात सांगीतलेले नियम हे आरोग्य रक्षणासाठी आहेत. यातील काही नियमांचे पालन करता पावसाळ्यात आरोग्य रक्षण होते. आरोग्य रक्षण झाले की आपली नैमीतिक कामे जसे नोकरी/व्यवसाय उत्तम रितीने पार पडतील. म्हणजे हे दिवस पावसाळ्यात आरोग्य बिघडल्याने वाया जाणार नाहीत.

काही साधे नियम तर आपण पाळतो जसे पाणी पिणे याबाबतीत आपण काटेकोर असतो. याकाळात जरा जास्त काटेकोर असावे. कारण पावसाळ्यात पाणी दुषित होते. हवेतही सुर्यप्रकाश कमी असल्याने रोगजंतू वाढतात. पचनशक्ती मंद असते यास्तव पचायला हलके अन्न घेतले की आरोग्य रक्षण होते. इतकाच अर्थ यात समावला आहे. चातुर्मासात  एक वेळ जेऊन रहा असे सांगीतले तर तरुणांना हे जमेलच असे नाही. पण जरा कमी जेवणे शक्य आहे. जड पदार्थ वारंवार न खाणे, ज्या पदार्थात संसर्ग होऊ शकतो ते टाळणे. इतके केले तरी आरोग्य रक्षण होईल.

दर महिन्यात मी एक साधा आणि सोपा उपाय सुचविणार आहे. या महिन्यात हनुमान चालीसा हा उपाय आपल्यासमोर प्रस्तुत आहे. हनुमान ही देवता संकट हरण करणारी आहे. साडेसातीत नित्य हनुमान चालीसा पठण करावाच. परंतु जर संकट आले असेल तर मात्र हनुमान चालीसा  संकल्पपुर्वक १०० पाठ केल्याने संकट टळते हा माझा स्वत:चा अनुभव आहे. एकटयाला १०० पाठ करणे शक्य नसते परंतु घरचे सगळे सदस्य संकल्प पुर्वक पाठ करायला बसले तर तर सर्वांना मिळुन १०० पाठ करण्यास कमी वेळ लागेल.

नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा |
संकट ते हनुमान छुड़ावें मन क्रम बचन ध्यान जो लावें ॥

आपला घरचा सदस्य जर आजारी असेल आणि मृत्युसम पीडा होत तर सर्व नातेवाईकांनी संकल्प करुन १०० पाठ करावेत. रोगी माणुस एकप्रकारे बंदीवान होतो. चालू फ़िरु शकत नाही. परावलंबी होते हे संकट आहे.

तरुण मुले रागाऊन घर सोडून जातात. एकप्रकारे ती आपल्या चुकीच्या विचारांनी बंदी होतात. अश्यावेळी ती परत यावीत यासाठी हा उपाय करावा.

जो सत बार पाठ कर कोई छूटई बन्दि महासुख होई ||    १०० पाठ केल्याने हे संकट टळते असा अनुभव आहे.

जेंव्हा एखादे काम करण्यासाठी साहस करायचे आहे. अश्या वेळी हनुमंताचे स्मरण आणि हनुमान चालीसा पाठ यामुळे शक्ति प्राप्त होते.

मध्यंतरी अमेरीकेचे माजी राष्ट्रपती ओबामा सुध्दा हनुमंताचे उपासक असल्याचे ऐकले होते. यावरुन हनुमंत उपासनेची महती समजते.

आता मुख्य विषयाकडे जाऊ ते म्हणजे १६ जुलै २०१८ ते १६ ऑगस्ट २०१८ काळाचे राशीभविष्य पाहू. हे राशीभविष्य लग्नराशीकडून तसेच चंद्र  राशीकडून सुध्दा पहाता, अनुभवता येईल.

मेष रास: आपल्या राशीचा मालक मंगळ २७ ऑगस्ट पर्यंत वक्री असणार आहे. नोकरी/व्यवसायात अनंत अडचणींना सामोरे जावे लागेल. कारण दशमेश ही वक्री आणि राशीचा मालक वक्री असल्याने जे काम आपण इच्छाशक्तीच्या जोरावर रेटुन नेता त्यात कमतरता आल्याने अडचणी महिनाभर असतील. हाताखालचे सहकारी शब्द फ़िरवतील. २ ऑगस्टच्या दरम्यान संघर्षमय परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. वर हनुमान चालीसा हा उपाय दिला आहे.  या महिन्यात २४ जुलैच्या आसपास शुक्र व वक्री नेपच्युन अशुभ योगाने आपले व आपल्या जोडीदाराचे भांडण नाही झाले तरी गैरसमज होण्याची शक्यता दिसते. अविवाहीतांनी प्रेमात असताना उगाच तिसर्या व्यक्तीसोबत संशय येणार नाही असे वर्तन ठेवावे. उगाच संशयावरुन तुझे माझे ब्रेक अप होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास: १ ऑगस्ट पर्यंत राशीचा स्वामी शुक्र चतुर्थात असल्याने आराम असेल. आनंद उपभोगुन घ्या ही संधी तुमच्या राशीला वर्षभरात एकदाच काही दिवस येते. १ ऑगस्ट नंतर शुक्र पंचम स्थानी जातो आहे. पंचम स्थान प्रेमाचे आणि शुक्र प्रेमाचा कारक असल्याने एखाद्या वेळी ह्र्दयात वाजे समथिंग असे झाले तर काही विशेष नाही. अविवाहीत असाल तर आनंदच आहे. विवाहीत असाल तर हल्ली तुला माझ्या बद्दल प्रेमच वाटत नाही असे जोडीदाराला म्हणण्याची संधी तुम्ही देणार नाही. एकंदरीत ह्या महिन्याचा उतरार्ध रोमॅंटीक आहे म्हणायचा. या महिन्यात वृषभ राशीचे लोक जर चुकून परिक्षा/ स्पर्धा परिक्षा देणार असतील तर अभ्यास जरा जास्तच करावा. भ्रमात राहू नये.

मिथुन रास : आपल्या राशीचा मालक बुध २६ जुलै ला वक्री होतो. काही महत्वाची कामे २६ जुलै पर्यंत संपवा. आपली रास बौध्दीक रास आणि सगळा खेळ शब्द सामर्थ्यावर आहे. नंतर अचानक शब्द आठवत नाहीत असे अनुभव येतील यासाठी कोणतेही महत्वाच्या कामात पुर्वतयारी महत्वाची आहे. खुप महत्वाचे कामाला जाताना सोबत हिरवी इलायची ठेवा. एखादी इलायची फ़ोडून खा. वक्री बुधाचा त्रास कमी होईल. व्यावसायीकांना तंगी जाणवेल. अचानक येऊ घातलेले धन बुडते की काय अशी भिती निर्माण होईल. यासाठी करार पक्के तपासून त्यातल्या अटी, व शर्ती यांचा निट अभ्यास करुन ठेवा.

कर्क रास : जोडीदाराशी संघर्ष होणे शक्य आहे. आपण स्त्री असाल २७ जुलै आणि २ ऑगस्टच्या आसपास मनस्ताप जास्तच होईल. यास्तव मनस्ताप टाळण्याचा हुकमी उपाय शोधून ठेवा. आपला जोडीदार घरात आल्यावर त्याला काय हवे असते. कश्यामुळे त्याला आनंद होतो हे केलेत तर बराच फ़रक पडेल. तुमची राशी लढणारी नाही. रडणारी आहे. तेंव्हा मनस्ताप टाळता येईल का ते पहा. या महिन्यात काही पैसे शिलकी पडले तर ते कशात गुंतवायचे याचे प्लॅनिंग केलेले चांगले. तुमचा स्वभाव पैसे उधळण्याचा नाही पण तुम्हाला भावनीक आवाहन करुन पैसे मागीतले तर नाही म्हणता येत नाही म्हणुन आपले सुचवले.

सिंह रास : हा महिना म्हणजे आपली इच्छाशक्ती पणाला लाऊन काम करण्याचा आहे. मुळात राशीचा स्वामी बाराव्या स्थानी आणि बरेच दिवस राहूच्या संगतीत राहील्याने फ़सगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जरुर नाही की तुमचा कोणी गैरफ़ायदा घेईल पण तुमचे जजमेंट चुकू नये म्हणुन जरा जास्तच विचारपुर्वक कामे हाताळावीत. प्रॉपर्टी संदर्भातली कामे रखडतील. २५ जुलै नंतर शत्रु डोके वर काढणार आहे. संघर्ष अटळ आहे पण तुमची सरशी होणार. परंतु संघर्ष कुठे कसा होणार आणि आपण तो कसा हाताळणार, आपला प्लॅन बी काय असणार यावर आत्त्तापासून विचार करा मग संघर्ष फ़ारसा त्रास दायक होणार नाही.

कन्यारास : आपल्या राशीचा स्वामी बुध २६ जुलैला वक्री होणार आहे. तोही कर्क राशीत आणि लाभ स्थानी. १५ जुलै ते २६ जुलै, अनेक कामे मार्गी लाऊ शकाल. अनेक योजना मार्गी नाही लागल्या तरी आपल्याला त्याचा प्लॅन तयार करता येईल. आपण धार्मिक असाल तर या महिन्यात यात्रा/धर्मस्थळे यांना भेट देण्याचे योग महिनाभर आहेत. या ना त्या कारणाने आपल्याला प्रवास योग आहेत. पण प्रवासात नुकसान संभवते. यास्तव आपला खिसा/पाकिट संभाळा. डेबीट/क्रेडीट कार्ड हरवले तर त्याची सुचना कुठे द्यायची याची माहिती घेऊन ठेवा. इतके चांगले प्लॅनिंग केल्यावर मनस्ताप झालाच तर कमी होईल.

तुळ रास: १ ऑगस्ट पर्यंत आपल्या राशीचा स्वामी लाभ स्थानी रहाणार आहे. जे मनात आणाल ते पुर्ण होईल असे ग्रहमान आपल्याला लाभणार आहे. व्यावसायीक असाल तर लाभही मनासारखा या काळात होईल. एखादे पद/अधिकार हवा असेल तर शब्द टाकून पहा. आपण पुरुष असाल तर  कामात आपल्या स्त्री सहकार्याची मदत या काळात घ्या आणि पहा काम कसे मार्गी लागते. स्त्री अधिकारी वर्गाने सुध्दा हा प्रयोग या काळात करुन पहावा. सरकारी लॉटरीचे एखादे तिकीट घेऊन आपले नशिब आजमाऊन पहा. जोडीदार मात्र रुसला आहे असे आपल्याला महिनाभर जाणवत राहील. यासंदर्भात त्याच्या आवडीची गोष्ट करुन पहा म्हणजे रुसवा अधून मधून कमी होईल.

वृश्चिक रास : आपल्या राशीचा स्वामी वक्री असल्याने दररोज प्रवास करुन ऑफ़ीसला जाता त्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याने उशीर होणे, बस/ ट्रेन चुकणे, मोबाईल बिघडणे या सारखे अनुभव येऊ शकतात. यासाठी जुना 3G मोबाईल शोधून ठेवा. प्रवासात अडथळे येऊ नये म्हणून खबरदारी घ्या. व्यावसायीक असाल तर या महिन्यात खुप चांगले व्यवहार/ करार होऊन व्यवसायात प्रगती साधण्याचे योग आहेत. नोकरदारांना सुध्दा प्रगतीचे योग आहेत. यास्तव आपला सल्ला पुन्हा विचारण्यात आला तर अभ्यासकरुन द्या. यातून उच्च/ वरिष्ठ लोकांच्या लक्षात आपण रहाल.

धनू रास : आपल्याला सुध्दा गुरु मार्गी झाल्याने प्रगतीमधे मध्यंतरी अडथळे निर्माण झाले असतील तर ते दुर झाल्याचा अनुभव येईल पण अजूनही मोठे यश हुलकावणी देते असाच योग आहे. नेटाने त्याच्या मागे राहीले पाहीजे. डोळ्याची काळजी घ्या. दुसर्या व्यक्तीचा सल्ला किती योग्य आहे याचा विचार करा. दुसर्या व्यक्तीचा सल्ला डोळे झाकून आमलात आणु नका.  या मोसमात डोळे येणे किंवा तत्सम संसर्ग आपल्याला होऊ शकतो. गुरु मार्गी झाल्याने फ़ारसे पदरात पडले असे ग्रहमान या महिन्यात तरी नाही.

मकर रास: साडेसातीचा कहर आहेच त्यात नोकरी-व्यवसायात काही अडथळे असतील तर थोडासा मार्ग निघेल. या महिन्यात बेकायदेशीर व्यवसाय किंवा लाचखाऊ लोकांना अडचणीत यावे लागणार आहे. शनिच्या साडेसातीची ही खासीयत आहे. व्यावसायीक असून भागीदाराच्या शोधात असाल तर आपल्याकडे नोकरी करणार्या व्यक्तीला भागीदार बनवावे असे मनात येईल. यावर विचार करुन योग्य तो निर्णय घ्या. आपली पत्नी जर प्रेग्नंट असेल तर काळजी घ्या. घराचे बांधकाम सुरु असेल तर त्यात अडथळे येऊन कामाची गती मंद होईल.

कुंभ रास : आपल्याही राशीचा मालक लाभस्थानी वक्री आहे. हा महिना तरी वक्री रहाणार असल्याने आपल्या मनासारखे होण्यात अजूनही अडथळेच आहेत. या महिन्यात सातत्याने व्यावसायीक नुकसान होत असेल तर तो अटोक्यात येईल. लांबचा प्रवास ठरला असेल तर रद्द होईल. जोडीदारा बरोबर आनंदाने घरचे चविष्ट भोजन, सासरचे पाठबळ लाभल्याने आनंदात वाढ होईल. याच सोबत आरोग्य संभाळणे आवश्यक आहे. आपण विद्यार्थी असाल आणि महत्वाची परीक्षा या काळात देणार असाल तर जरा जास्त अभ्यास करा. ह्या परिक्षे संदर्भात जास्तीचा आत्मविश्वास नको.

मीन रास :  अस्वस्थता १० जुलैनंतर गुरु मार्गी झाल्याने कमी होईल पण आपल्याला खरे यश हे १२ अक्टॊबर नंतरच मिळणार आहे. आर्थिक लाभात वाढ होण्यास काही काळ थांबणे आवश्यक आहे. विद्यार्थी असाल आणि शिष्यवृती शोधत असाल तर नक्की लाभेल. नुकतेच शिक्षण संपवले असाल आणि ट्रेनिंगच्या शोधात असाल तर ते मिळेल तसेच सोबत काही स्टायपेंड मिळेल. प्रेम व्यक्त व्हावे असे वाटत असेल तर एखाद्या डेटवर जा. अपेक्षीत जोडीदाराला प्रेम व्यक्त करण्याची संधी द्या. जोडीदार स्वत:च प्रेम व्यक्त करेल. पण त्या आधी जोडीदार अश्या संधीच्या शोधात आहे ह्याची खात्री असू द्या.

शुभंभवतु

2 comments: