अचानक प्रसिध्दी योग

जगाच्या इतिहासात प्रसिध्दी मिळवुन देणारे दुरदर्शन चॅनल्स हे माध्यम एके काळी खुपच प्रभावी होते. आज त्या ही पेक्षा प्रभावी माध्यम सोशल मिडीया आहे. सोशल मिडीयात खास करुन यु ट्युबवर कशाला प्रसिध्दी मिळेल हे सांगता येत नाही. कधीतरी असे दिसते याला भाषेचीही बंधने नाहीत त्यामुळे प्रसिध्दी मिळण्याचा वेग ही प्रचंड आहे.

पुर्वी जेंव्हा दुरदर्शनवर लिमीटेड चॅनल्स होते तेंव्हा  जगभरात प्रसिध्दी मिळण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक होत्या जसे युध्द व नेतृत्व, क्रिडाप्रकारात पदके किंवा नैपुण्य, संगीत, आर्थिक जगतातल्या घटना आणि सनसनाटी घटना, गुन्हे आणि कुप्रसिध्दी

आपण वरील वाक्याचा मागोवा घेण्यासाठी काही घटना पाहू.

दुसरे महायुध्द - प्रसिध्दीस आले हिटलर, मुसोलीनी आणि विस्टन चर्चील
भारतीय स्वातंत्र्य युध्द - महात्मा गांधीजी आणि नेहेरुजी
बांग्ला देश निर्मीती १९७२ - इंदिरा गांधी
भारतीय  खेळाडू - मिल्खासिंग, पै. सतपाल, सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर
लोकप्रिय हिंदी गायक /गायिका - लता मंगेशकर, महम्मद रफ़ी, मुकेश

वरील सर्व उदाहरणे प्रसिध्दीचा मागोवा घेण्यास अपुरी आहेत परंतु असे लक्षात येईल की यांना एका रात्रीत प्रसिध्दी मिळालेली नाही. अनेक वर्षांच्या प्रयत्नातून यांनी प्रसिध्दी मिळवली आहे.


२१-२२ सप्टेंबर १९९५ ला अचानक गणपतीच्या मुर्तीने दुध पिले या घटनेला दुरदर्शनवर अफ़ाट प्रसिध्दी मिळाली आणि त्या सोबत तांत्रिक चंद्रास्वामी यांना एका रात्रीत भारतभर प्रसिध्दी मिळाली.

यानंतर अश्याप्रकारची मोठी प्रसिध्दी धनुष्य नावाच्या गायकाला मिळाली. धनुष्य ने  म्हणलेले " व्हाय धिस कोलावेरी डी "ह्या गाण्याचे शब्द व त्याचे अर्थ फ़क्त तमिळ भाषीकांना माहित होते तरी सुध्दा हे गाणे भारतभर नाही तर जगभरात गाजले.

याची लिंक पाहू https://www.youtube.com/watch?v=YR12Z8f1Dh8

हे गाणे युट्युबवर प्रसिध्द होण्याची तारिख होती २१ नोव्हेंबर २०११ आणि युट्युब वर ३० नोव्हेंबर २०११ ला हे गाणे दहा कोटी पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आणि त्यांना ते आवडले. गणपतीने दुध पिले याला जेंव्हा प्रसिध्दी मिळाली तेंव्हा सोशल मिडीया नव्हता. पण २०११ नंतर सोशल मिडीया प्रसिध्दी क्रांती झाली. हॅशटॅग व ट्वीटर सोबत फ़ेसबुक वर याला प्रचंड प्रसिध्दी मिळाली. याचा परिणाम म्हणून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी धनुषला जपानच्या पंतप्रधान यांना दिलेल्या खास मेजवानीत आमंत्रीत केले.

आपण धनुषची पत्रिका आणि या काळातले गोचर ग्रह, दशा अंतर्दशा आणि प्रसिध्दीचे नियम तपासू 

प्रसिध्दीचे योग : लग्नकुंडलीत पंचमेश जेंव्हा नवमात असतो तेंव्हा जातकाला खुप फ़ॉलोअर्स मिळतात, फ़ॅन मिळतात आणि प्रसिध्दी मिळते. याला पंचमेश गोचर होऊन नवमातून जातो.
या काळात  आणि पंचमेश, नवमेशाच्या दशा अंतर्दशा असतील तेंव्हा ती प्रसिध्दी खात्रीने मिळेल.

धनुषची लग्नकुंडली पाहू - २८ जुलै १९८३ - दुपारी १२:०० वाजता चेन्नईला धनुषचा जन्म झाला.

Add caption

वरील नियमाचा मागोवा घेतला असता. 

१) पारंपारिकने हा नियम सिध्द होत नाही पण पंचमेश शनि
हा नवमातल्या मंगळाच्या नक्षत्रात असल्याने तो नवव्या स्थानाचा कार्येश होतो असा के.पी.
प्रश्न कुंडलीत वापरायचा नियम इथे लागू पडतो.

२) पंचमेश प्लुटोच्या युतीत असल्याने प्लुटो हा जनसमुहाचा कारक समजला जातो हा अजुन एक फ़ॅक्टर
३) नवम स्थानातल्या राहूच्या नक्षत्रात चंद्र हा प्रसिध्दीचा कारक ग्रह आहे.
४) पंचमेश उच्च राशीत असल्याने बलवान आहे. व लग्न बिंदुच्या सानिध्यात आहे.
५) गोचरीच्या शनिने २१ नोव्हेंबर २०११ या तारखेला चित्रा ह्या नवमेश मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश केलेला होता.
६) या काळात शनिची दशा, शुक्राची अंतर्दशा आणि राहू विदशा होती.

याचाच अर्थ पंचमेश शनि गोचरीने शनिवरुन चालला होता, शनिची महादशा सुरु होती ही अजुन अनुकूलता




दुसरी केस पाहू. प्रिया वारीयर नावाच्या १८ वर्षांच्या मुलीचा युट्युब व्हिडीओ ९ फ़ेब्रुवारी २०१८ ला युट्युबर
रिलीझ झाला आणि दिवसभरात तो  १० कोटी लोकांनी पाहिला. या मुलीला आपल्या ( बहुदा डोळा मारणे )
या कृतीने प्रचंड प्रसिध्दी मिळाली.  ही त्याची लिंक https://www.youtube.com/watch?v=NCaRJCMFHec


तिची पत्रिका पाहू.

हिच्या पत्रिकेतला पंचमेश बुध हा उत्तरा या रविच्या नक्षत्रात, रविच्या युतीत  आहे. हा भाग्येशाच्या
द्रुष्टीत नाही, नक्षत्रात नाही किंवा त्याचा उपनक्षत्र स्वामी सुध्दा शनि नसुन चंद्र आहे.

नाही म्हणायला बुधाचा शनिशी होणारा नवपंचम योग हा एकमेव भाग्येशाशी होणारा संबंध आहे.
वृषभ लग्नाला हा शनि ( बलवान नसला तरी ) शुक्राच्या नक्षत्रात आणि राजयोग कारक आहे.

हिला प्रसिध्दी मिळायला ९ फ़ेब्रुवारी २०१८ ला काय ग्रह योग होते ते पाहू या दिवशी राहूची महादशा, भाग्येश शनीची अंतर्दशा आणि चंद्राची विदशा होती.

 या केस स्टडीवरुन काही गोष्टी नक्कीच समजतात की अचानक प्रसिध्दी योग युट्युब वर अनेक क्लिप
असून सर्वांनाच मिळत नाहीत.

परंतु राहू हा अचानक प्रसिध्दीचा कारक आहे. याचा संबंध दशा अंतर्दशा शी आला की प्रसिध्दी मिळते
हा एक अजून फ़ॅक्टर दोघांच्या कुंडलीत आहे.








भारतातल्या या दोनच लोकांना माझ्या माहिती प्रमाणे १० कोटी हीट्स मिळाले. मागच्या महिन्यात अचानक
प्रसिध्दीला आलेल्या मध्यप्रदेशातील विदीशा शहरातल्या संजीव श्रीवास्तव या पन्नाशीच्या व्यक्तीला हिंदी सिनेमाच्या गाण्यावर
नाचताना यु ट्युबवर प्रसिध्दी मिळाली पण अजून त्यांनी १० कोटी हा आकडा गाठला नाही.

मी त्यांना त्यांची पत्रिका ट्विटरवर मागीतली आहे. पण त्यांनी अजून रिस्पॉन्स दिलेला नाही. अधून मधून फ़ेसबुक सुध्दा तुमच्या
आजवरच्या वॉलवरील पोस्टना एकूण किती लाईक्स मिळाले याबाबत आकडेवारी देते पण हा योग अल्पकालावधीत प्रसिध्दीचा नाही.

अजूनही काही लोकांच्या पत्रिका स्टडी करायच्या बाकी आहेत ज्यांना तुफ़ान प्रसिध्दी मिळाली आहे.




यांच्या पैकी Luis Fonsi  याच्या गाण्याला यु ट्युबवर आजपर्यंत १०० कोटी हीट्स मिळाले. १५ एप्रिल १९७८ - San Juan, Puerto Rico  (United States) इथे याचा जन्म झाला असून जन्म वेळ माहित नाही म्हणुन पत्रिका मांडता येत नाही. अन्यथा १०० यु ट्युब वर हीट्स अल्पावधीत मिळणे हे खुपच मोठे रेकॉर्ड आहे जे अजून कोणीही मोडलेले नाही.


No comments:

Post a Comment