अनेकदा उपवर मुलांचे मुलींचे विवाह व्हावे म्हणून काही उपाय सांगा अशी विचारणा होते. जेंव्हा पत्रिकेत विवाह होण्याच्या दृष्टीने गंभिर दोष नसतात तेंव्हा अपेक्षीत काळी विवाह होण्यासाठी काही साधे उपाय केल्याने फ़ळ मिळते.
यातील काही साधे उपाय मी अनेकांना सांगून त्याचा फ़ायदा झाल्याचा मला अनुभव आहे.
उपाय १
उपवर मुलीला किंवा मुलाला श्रीकृष्णाच्या मुर्तीची ( देवघरातला बाळकृष्ण ) विशेष पुजा दर बुधवारी करायला सांगावी. देवघरात बाळकृष्ण उपलब्ध नसल्यास किंवा मुलगा/मुलगी नोकरी व्यवसायाच्या निमीत्तने बाहेर गावी असल्यास एखाद्या फ़ोटोची स्थापना बुधवारी करुन त्यास दर बुधवारी तुळस वाहून पुजा करण्यास सांगावी. दर बुधवारी, कृष्णाला उपवर मुला/मुलींनी हळद कुंक व तुळस वाहून, मनासारखा पती/पत्नी लवकर मिळावी ही इच्छा श्रीकृष्ण पुजेच्या नंतर मनापासून बोलावी. असे केल्याने विवाह ठरण्याच्या मार्गातील अडथळे दुर होऊन विवाह साध्य होतो.
उपाय २
हा उपाय उपवर मुला- मुलीच्या माता- पित्याने उपवर मुला -मुलीला सोबत घेऊन करायचा आहे. अनेक वर्षे कुलदैवताचे दर्शन झाले नसल्यास उपवर मुला- मुली सोबत कुलदैवताचे दर्शन करावे व पुजा करावी. दरवर्षी नियमीत कुलदैवताचे नियमीत दर्शन घेणार्या पालकांनी ज्या मुलाचे/मुलीचा विवाह लवकर व्हावा असे वाटते तीच्या समवेत दर्शन घ्यावे व पुजा करावी. कुलदैवताची वार्षीक पुजा संपल्यावर एक नारळ कुलदैवताला वाहून ( फ़ोडायचा नाही ) या वर्षी मुलाचा /मुलीचा विवाह लवकर व्हावा, उत्तम पती/पत्नी मिळावी असे साकडे कुलदेवतेला घालावे. असे घडल्यावर जावई/सुने सह पुन्हा दर्शनाला येऊ असा संकल्प करुन आल्यास अनेकदा सत्वर विवाह घडतो असा माझा अनुभव आहे. विवाह घडून आल्यावर मात्र सुन-मुलगा किंवा मुलगी व जावई यांच्या समवेत कुलदैवताचे पुन्हा लवकर दर्शन घेण्यास विसरु नये.
उपाय ३
देवघरात अनेकदा मृत माता/पिता यांचे टाक बनवून ठेवले जातात किंवा त्यांचे फ़ोटॊ देवघरात ठेवले जातात. ही जागा यासाठी योग्य नाही. याने देवपुजेचे अपेक्षीत फ़ळ मिळत नाही. असे टाक शास्त्रानुसार विसर्जन करावेत. फ़ोटो शक्यतो असूच नयेत पण तशी भावना असल्यास देवघरापासून दुर वेगळ्य़ा खोलीत स्थापन करावेत. घरातल्या देवपुजेचे अपेक्षीत फ़ळ मिळाल्याने सुध्दा विवाहातले अडथळे दुर होतात.
उपाय ४
उपवर मुलाच्या/मुलीच्या मित्राचे/ मैत्रीणीचे भावंडाचे विवाह संपन्न होताच ( मंगलाष्टके संपुन वधू- वर एकमेकांस हार घातल्यावर ) उपवर मुलीच्या डोक्यावर हात ठेवण्यास नववधू/ वरास आधीच सांगून ठेवावे. यामुळे पुढील विवाह विधी लांबू नयेत यासाठी उपवर मुलीने /मुलाने विवाह वेदीवर थांबून तो सर्व विवाह सोहळा आत्मीयतेने पहावा. आपल्या मित्रास/ मैत्रीणीस/ जवळच्या भावंडास ( ज्यांचे लग्न नुकतेच लागले आहे ) डोक्यावर हात ठेऊन माझ्या सारखा विवाह यामुलाचा/मुलीचा त्वरीत व्हावा असे मनातल्या मनात म्हणायला सांगावे.
उपाय ५
अनेकदा आमचा विश्वास नाही असे सांगून श्राध्द /पक्ष टाळले जातात. अनेक ज्योतिषांनी सांगीतलेल्या तारखा टळल्या असतील आणि आपले ज्योतिषी पत्रिकेत दोष नाही असे सांगत असतील व उपवर मुला मुलीचे आई वडील श्राध्दाचे अधिकारी असता श्राध्द टळले असेल तर सुरवातीस त्रिपींडी श्राध्द करावे. यानंतर विवाह होतो असा अनुभव आल्यास मात्र श्राध्द/पक्ष यांचा लोप करु नये. श्राध्द/पक्ष लोप पावल्याने कुटुंबास पितरांचे शुभ आशिर्वाद मिळण्यास अडथळा निर्माण होतो.
उपाय ६
अनेकदा उपवर मुलाची/ मुलीची जननशांती राहून गेलेली असते किंवा विधीवत पुर्ण केलेली नसते. अग्नी भुमीवर नसता केलेली जननशांती फ़लदायी होत नाही. प्रत्यक्ष गायीच्या ऐवजी चांदीची गाय वापरून अनेक पुरोहीत पुजा पुर्ण करतात. असे केल्याने सुध्दा जननशांती हा विधी संपुर्ण होत नाही अश्यावेळी ते नक्षत्र भुमीवर असताना वशींड वाल्या देशी गायीला गुळ आणि गहू उपवर मुलाच्या/मुलीच्या हाताने खायल्या द्यावे. हे करताना गायीच्या जिभेचा स्पर्श हाताला होतो याची खात्री होईपर्यत गायीला गुळ व गहू हातात धरुन देत रहावे. हे सर्व रस्त्यावरच्या मोकाट गायीला देऊन नये. गाय अनेकदा गुळाच्या वासाने वेगाने पुढे येते. गाय बांधलेली नसल्यास गायीच्या शिंगाने उपवर मुला- मुलीला इजा होण्याची शक्यता या विधीत ठेऊच नये. यासाठी गोशाळेतल्या, व्यवस्थित बांधलेल्या गायीला गुळ व गहू द्यावे.
याहून अधीक उत्तम उपाय आहेत. जे साधे व सोपे नाहीत. या उपायांचा उपयोग मी पत्रिका पाहूनच सांगतो. या पैकी शारदीय नवरात्रात व चैत्री नवरात्रात विशिष्ठ दिवशी कात्यायनी देवीची विधीवत पुजा हा उपाय हमखास उपयोगी होतो. हा उपाय आपल्या दर महिन्याच्या राशीभविष्या सोबत, मी सप्टेंबर २०१८ ते अक्टॊबर २०१८ महिन्याच्या राशीभविष्यासोबत पुन्हा देईनच.
जेंव्हा सप्तमभावाचा स्वामी अशुभ ग्रहांच्या सोबतीत, अशुभ नक्षत्रात, अशुभ स्थानी पडतो, त्याच वेळी वधू वरांच्या पत्रिकेत विवाह सौख्याचा कारक शुक्र बलवान नसेल तर रुक्मिणी स्वयंवरासारखा उत्तम उपाय नाही. याची पारायणे करण्याची रित शास्त्र असे सांगते भाग २ ह्या पुस्तकात पान १०० वर दिलेली आहे. कॉपी राईट मुळे मी ती इथे देत नाही. हा उपाय सहा महिने कालावधीने पुर्ण होतो. ही मानसीकता अनेक उपाय करुन थकलेल्या उपवर मुलांच्यात रहात नाही. यामुळे हा उपाय करायला एकतर उपवर मुले पुढे येत नाहीत किंवा रुक्मिणी स्वयंवराची १८ पारायणे विधीवत पुर्ण करत नाहीत.
यासाठी आपली मुले १८-२० वर्षांची झाल्यावर एकदा उत्तम ज्योतिषाकडून पत्रिका तपासून विवाहयोग सहज व लवकर आहे की उशीरा कष्टसाध्य आहे हे जाणून घ्यावे. वरील पैकी उपायांची क्रमाने योजना करावी. बहुतेक सर्व विवाह वरील उपायाने होणे अपेक्षीत आहे. वर उल्लेखलेल्या कठीण योगात रुक्मिणी स्वयंवराने विवाहयोग येतो असे मी पाहीले आहे.
चांगल्या पगाराची नोकरी असु द्या मग हे सर्व थोतांड करावे लागत नाही.
ReplyDeleteAgree 👍👍
Deleteचांगला पगार असूनही लग्न न झालेले लोक आहेत या जगात.
Deleteसगळ्यानि आपापल्या परीनं अर्थ काढले धन्यवाद कंमेंट्स टाकणाऱ्या ना
Deletevivah hone tyachbarobar uttam vaivahik saukhya labhave hehi titkech mahtvache ahe ,tyasathi uttam upay konta ?
ReplyDeleteदे्व ,वेद,शाश्र, यावर विश्वास असेल त्यांनी हे सर्व करून पहावे
ReplyDeleteरुक्मिणी स्वयंवर कधी वाचणे
ReplyDeleteमाहिती पूर्ण लेख वाचण्यासाठी भेटला.आपण सुद्धा आमच्या ब्लॉग पाहू शकता आणि प्रतिक्रिया देऊ शकता.
ReplyDeletehumbaa.com
ज्योतिषाने कोणालाही नवस करा किंवा भाग बांधायला सांगू नये ,ज्याला सांगितले आहेत त्याने जर का नवस पूर्ण केला नाही किंवा भाग बांधला नाही तर तुम्ही ज्योतिषी जामीन राहता त्या देवा पाशी, .त्रास त्या ज्योतिष्याला होतो कोणाला पटो अथवा न पटो पण हे खरे आहे .
ReplyDeleteThe best guidance for dispare persons i think so.
ReplyDeleteMazi kundli pahta ka
ReplyDeleteMaza khup viswas aahe देवावर व tumhchyavr mi khul devachi manapasu. Pooja karte