श्री मुकेश अंबानी यांची कुंडली एक अभ्यास

मुकेश अंबानींची कुंडली अभ्यासाला का घेतली याचे कारण नक्षत्रप्रकाशच्या सदस्याने या कुंडलीबाबत आपले मत देण्यास सांगीतले होते.  मुकेश अंबानी यांचे जीवन थोडक्यात पाहू

जन्मतारीख : १९ एप्रिल १९५७, संध्याकाळी ०७-५३, जन्म स्थळ एडन - येमेन देश -अक्षांश १२.४६ उत्तर , रेखांश ४५.२ पुर्व

मला लेखन सुरवात करण्यापूर्वी अ‍ॅस्ट्रोसेग चे आभार मानणे आवश्यक वाटते. किती जणांच्या जन्मकुंडली त्यांनी अभ्यासार्थ उपलब्ध केल्या आहेत.

मुकेश अंबानी यांचा जन्म धिरुबाई अंबानी आणि कोकीलाबेन यांच्या पोटी झाला हे सर्वश्रुत आहेच. त्यांनी केमीकल इंजिनीयरिंगची पदवी मुंबई महाविद्यालयातून घेतली आहे तर एम बी ए परदेशातील स्टॅन्डफ़ोर्ड महाविद्यालयातून पुर्ण केले आहे.

त्यांच्या करीयर च्या बाबतीत त्यांनी वैयक्तिक निर्णय कधीपासून घ्यायला सुरवात केली हे त्यांच्या चरित्रात वाचायला मिळेल. आपण ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने आढावा घेऊ. धिरुभाई अंबानी येमेन मधे पेट्रॊल पंपावर काम करत होते ते मुंबईला मुकेश अंबानी यांच्या जन्मानंतर परत आले. १९५८ साली त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीची स्थापना करुन मसाले इत्यादी निर्यात करु लागले. त्यानंतर त्यांनी सिंथेटीक कपडा मील
सुरु केली. २००२ पर्यंत ते कार्यरत होते ज्या काळात रिफ़ायनरी, पेट्रोकेमीकल्स, टेलीकॉम असे अनेक व्यवसाय करुन त्यांनी नाव कमावले.

माझ्या मते मुकेशजींचा जन्म आणि त्यांची कुंडली ही ह्या सर्व प्रगतीला कारण होती. याचा अर्थ असा नाही की धीरुभाई कुशल व्यापारी नव्हते. परंतु अनेकदा मी पाहिले आहे, जेंव्हा भाग्यवान व्यक्तीचा जन्म होतो तेंव्हा त्याला काम करण्यासाठी योग्य ठिकाणाची निर्माण हो्ते.



२१ ऑगस्ट १९५८ ला मुकेश अंबानी १ वर्ष वयाचे असताना त्यांची केतू महादशा संपुन शुक्र महादशा सुरु झाली याच दरम्यान धिरुभाईंनी
नविन व्यवसाय सुरु केला हा काही योगायोग नव्हे. हे प्रेरणा अफ़ाट संपत्ती जमा करण्याच्या उद्देशाने हुशार व्यापार्याच्या पोटी जन्म घेणार्या मुकेशजींच्या कुंडलीने धिरुभाईंना दिली असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही.

( असे म्हणतात की प्रत्येक प्रगत आत्मा आपण कुठे, कुणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे ठरवून जन्म घेतो. ह्या गृहीतकावर हे वरील विधान
आधारीत आहे )








मुकेश अंबानी यांच्या कुंडलीतील भावेश्याचे विवेचन केले तर असे दिसते.

लग्नेश - सप्तमात- व्यवसाय पॅशन
धनेश - दशमात
तृतीयेश - लग्नी, धाडस करण्यास प्रोत्साहन
चतुर्थेश - लग्नी,
पंचमेश - दशमात
षष्ठेश  - सप्तमात - अनेकांचे व्यवसायात सहाय
सप्तमेश - शुक्र - दशमेशाच्या युतीत अर्थ त्रिकोणात
अष्टमेश /लाभेश - षष्ठात ( अर्थ त्रिकोणात ) धनेश व पंचमेश ( गुरुच्या ) नवपंचम योगात
नवमेश - चंद्र धनात ( अर्थ त्रिकोणात )
दशमेश - बलवान रवी अर्थ त्रिकोणात
व्ययेश - अर्थ त्रिकोणात

ही सर्व बाजू व्यवसायाला अतिशय पोषक आहे. सर्वात महत्वाचे ग्रहयोग / भावेश मला असे दिसले. प्रत्येक केंद्र स्थानानंतर  येणारा त्रिकोण हा धनेश असतो ( स्वत: धनेश/पंचमेश/अष्टमेश आणि लाभेश ) यांचे एकमेकांशी नवपंचम योग झाले असता धनाचे नीट नियोजन होते. अनेक उद्योगपतींची करोडॊ रुपयांची प्रॉपर्टी नॉन ऑपरेशनल असेट्स असतात.  यामुळे त्यातुन फ़ारसे धन पुन्हा पुन्हा निर्माण होत नाही.  केवळ याच कारणाने रिलायन्स उद्योग समुहाची प्रॉपर्टी सातत्याने वाढतच गेली.


२१ ऑगस्ट १९५८ ते २१ ऑगस्ट १९७८ या काळात धंद्यात धिरुभाईंनी मागे वळून पाहिले नाही इतकी प्रचंड प्रगती या काळात साधली याचे कारण सप्तमेश हा व्यवसायाचा कारक शुक्र, अर्थ त्रिकोणात  उच्च राशीतल्या बलवान दशमेश रविच्या अंशात्मक युतीत आहे. शाळेत/कॉलेजात असताना सुध्दा मुकेश खुपसा वेळ ऑफ़िसमधे असायचे याचे कारण ते व्यवसायाची पॅशन असे म्हणतात.

यानंतर रविची दशा येते २१ ऑगस्ट १९७८ ते १९८४ या काळात. बलवान दशमेशाने या काळात यश दिले नसते तर नवल मानावे लागले असते. याकाळात लायसन्स राज होते. कोणीही कोणताही व्यवसाय करायला मुक्त नव्हते अशा काळात धिरुभाईंनी टाटा आणि बिर्ला व इतर ४३ कंपन्या असताना या पॉलीमर कपड्याच्या व्यवसायात असताना शासनाकडून लायसन्स मिळवले. मुकेशजीना या काळात आपले एम बी ए सोडून वडिलांच्या व्यवसायात सहभागी व्हावे लागले. अशी ही बलवान दशमेशाची महती.

यानंतरची दशा चंद्राची आहे. कुंडलीत चंद्र धनु राशीत धनस्थानी कर्क नवमांशात आहे. भाग्येश धनात असताना या सर्व वडीलांच्या  कर्तुत्वाचा वारसा, भाग्यरुपाने त्यांना मिळणार हे ही उघड आहे.

मुकेश अंबानी यांची सध्याची दशा २१ ऑगस्ट २००१ ते २१ ऑगस्ट २०१९ राहूची असल्याने कटकटीची ठरली असणार. याच काळात वडीलांचा मृत्यु, संपत्तीची भावा बरोबर वाटणी आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न इत्यादी याच बरोबर अनेक व्यवसायात झालेली पिछेहाट यामुळे व अन्य कारणाने २००८- २००९ मधे रिलायन्स च्या शेअरची किंमत रुपये ७५० वरुन २५० इतकी खाली आली.
( याकाळात मंदी होती पण सर्वच संपती ऑपरेशन असेटस मधे असली की असे होणार )






 राहूची महादशा खास करुन राहूत -शनि हा काळ २७ सप्टेंबर २००६ ते २ ऑगस्ट २००९ हा या दृष्टीने बोलका आहे.

राहूची महादशा संपल्यावर गुरुची महादशा २१ ऑगस्ट २०१९ नंतर सुरु होते. रिलायन्स इंडस्ट्री यानंतर मात्र भरपुर प्रगती करेल असा
अंदाज आहे. ज्यांना त्यांच्या शेअर्स मधे गुंतवणूक करायची आहे त्यांच्या साठी ही चांगली संधी असेल.

No comments:

Post a Comment