गुरुकृपा, ज्ञानसंपादन आणि अध्यात्मिक जीवन (तुळ ते मीन रास)

या विषयावर प्रत्येक राशीला दिवाळीमधे सुरु होणारे विक्रमसंवत २०७६ हे हिंदू नविन वर्ष किंवा नोव्हेंबर डिसेंबर २०१९ तर २०२० हे संपुर्ण वर्ष कसे असेल हे जाणण्यापुर्वी  गुरुकृपा, ज्ञानसंपादन किंवा अध्यात्मिक जीवनाशी अजीबात रस नाही अश्या लोकांनी थोडे लक्षपुर्वक खालील विवेचन पहावे. अनेक लोक आपले जीवन भौतीक आहे असे मानतात. खावे प्यावे चैन करावी असाही संदेश चार्वाकाने पुर्वी दिला आहे . हेच खरे जीवन आहे असा अनेकांचा समज असतो. हा समज खोटा आहे असे माझे मत नाही. पण अनेकांना गुरुकृपा झाल्यावर मात्र जीवनात बदल झाल्याचे जाणवते. याचा अर्थ लगेचच अनेकांचे अध्यात्मिक जीवन सुरु होते असे नाही. तर असेही काही असते असा पॅरेडाईम शिफ़्ट मात्र होतो. ही गुरुकृपेची सुरवात आहे. भगवे कपडे घातले म्हणजे अध्यात्मिक जीवन असाही अर्थ कुणी काढेल तर तसे नाही. परमेश्वराच्या कोणत्याही स्वरुपावर विश्वास न ठेवणारे परंतु मानवापेक्षा समर्थ अशी अदृष्य शक्ती असते असे मानणारे आणि वैयक्तीक जीवनात कोणालाही त्रास न देता सेवा करणारे सुध्दा माझ्या मते एक प्रकारे अध्यात्मिक जीवन जगतात. येणार्या वर्षात असे वैचारीक  स्थित्यंतर आपल्या आयुष्यात येणार आहे का ? इंग्रजीत ज्याला पॅरेडाईम शिफ़्ट ( Paradigm Shift ) म्हणतात असे काही घडणार आहे का ? हे जाणण्यासाठी हे राशीभविष्य पहा. हे राशीभविष्य लग्नकुंडलीच्या माध्यमातून पहावे. पण लग्नराशी माहीत नसल्यास चंद्रराशीच्या माध्यमातुन सुध्दा पहाता येईल.

तुळ रास:

आपल्या राशीला धनु राशीत येणारा गुरु हा तिसर्या स्थानी येणार आहे. --११ या स्थानांचा मिळुन काम त्रिकोण होतो. वैषयीक सुखाविषयी अतिरेकी भावना त्यांचीच असते हे या सुखाला पारखे होतात. तिसर्या स्थानी जन्मकुंडली मधे गुरु असता अश्यांचे विवाह वेळेवर होतात तसेच लाभ स्थानी गुरु असता सर्व प्रकारचे लाभ वेळेवर झाल्यामुळे या व्यक्तीला आसक्ती अर्थात  नसते.

जी गोष्ट शारिरीक सुखाची तीच आर्थीक परिस्थीतीच्या बाबतीत सुध्दा महत्वाची असते. आयुष्याचा ज्या टप्यावर ज्या गरजा भागवण्यासाठी पैसे हवे ते जन्मकुंडलीमधे तिसर्या स्थानी गुरु असता सहज मिळतात. यामुळे खुप पैसे कमवावे ही भावना सुध्दा या व्यक्तीच्या ठायी नसते. हे सर्व वेळच्यावेळी मिळाल्याने ही व्यक्ती तत्वज्ञानाचा अभ्यासासाठी इच्छुक असते. मोठ्या ग्रंथांचे वाचन आणि त्यातुन मिळणारे तत्वज्ञान हे जीवनाचे सार त्यांना महत्वाचे वाटते. अश्या व्यक्तींना उत्तम संभाषण तसेच वक्तृत्व कला यांचे वरदान असते. आपले भाषणात तोच तोच पण येऊ नये म्हणून ते नियमीत वाचनाने साधे प्रसंग सुध्दा तत्वज्ञानाला पुरक पध्दतीने सांगतात.

येणारा गुरु अश्यांच्या तत्वज्ञान विषयक अभ्यासाला पुरक असणार आहे. या काळात मोठी ग्रंथसंपदा आपल्या हाती लागेल किंवा अश्या तत्वज्ञानी लोकांचा सहवास लाभेल ज्यामुळे आपल्याला ज्ञात असलेल्या सिध्दांताचे बारकावे सहजपणे आपल्याला समजतील. ते इतरांना समजाऊन सांगण्याची विशेष हातोटी सुध्दा लाभेल. या विषयावर लेखन करत असाल तर लेखन पुर्ण होईल. या काळात आपल्या कडून तिर्थयात्रा होण्याचे योग आहेत. तिर्थक्षेत्री तत्वज्ञानावर एखादे सहज कानी पडणारे प्रवचन ऐकण्याने एखादा मोठा सिध्दांत आपल्याला सहजपणे समजेल.


ज्यांच्या जन्मकुंडलीमधे  तिसर्या स्थानी गुरु नसेल त्यांना विवाह वेळेवर होणे, विवाह कोर्ट मॅरेज होता तो संस्कार स्वरुपात होणे यासारखी फ़ळे अनुभवायला मिळतील. विवाह अमर्याद आणि अवास्तव अपेक्षांमुळे लांबला असेल तर याबाबत  विवेक उत्पन्न झाल्याने मत परिवर्तन होऊन उपवर मुले विवाहाचा निर्णय घेतील. अनेकांना सरळ मार्गाने पैसा मिळवावा, अनैतीक मार्गाचा अवलंब करु नये याचे ही ज्ञान हाच गुरु देईल.

हा गुरु अनेकांना अनेक प्रकारचे ज्ञान देत असतो. ज्ञान मिळूनही त्याचा व्यवहारात उपयोग करण्याचे कौशल्य फ़क्त तुळा राशीकडे असते. इतर राशींना हे ज्ञान मिळूनही हा बॅलन्स साधता येतोच असे नाही. आपल्या राशीकडे समतोल पणा हा स्थायी भाव असल्यामुळे या वर्षात गुरु बदलामुळे मिळालेले ज्ञान आपल्याला व्यवहारात वापरायची बुध्दी होईल आणि तसा बदल आपल्या व्यवहारात दिसेल.

वृश्चिक रास:

आपल्या राशीला धनु राशीत येणारा गुरु --१० या अर्थ त्रिकोणातील अर्थ स्थानी एक वर्ष असणार आहे. आर्थीक स्थितीमधे होणारा बदल आपल्याला या वर्षी सहज लक्षात येईल. बॅकेतला बॅलन्स असो, ज्याला इझी लिक्वीडीटी मुळे चलनाला पर्याय म्हणून मान्यता आहे असा सोन्यासारखा धातू आपण सहजपणे खरेदी कराल. अनेकांना उत्पन्नात वाढ होईलच असे नाही पण खर्चात बचत करावी असे वाटून त्याचा मार्ग शोधून ते आपले खर्च कमी करतील आणि पर्यायी शिल्लक वाढेल.

गुरु हा जसा अध्यात्माला पुरक समजला जातो, ज्ञानाचा कारक समजला जातो. विवेक बुध्दीचा कारक समजला जातो तसाच तो व्यवस्थापनाचा सुध्दा कारक ग्रह आहे. व्यवस्थापन अर्थात मॅनेजमेंट जमल्यामुळे अनेकांना व्यवसायात मोठा फ़टका बसतो. हेच ज्याला संसाधने अर्थात सर्व प्रकारचे रिसोर्सेस उत्तम प्रकाराने नियंत्रण करता येतात तो खुप रिसोर्सेस नसताना अभुतपुर्व यश मिळवून जातो. नोकरीत सुध्दा प्रगती त्यांचीच होते ज्यांना मॅनेजमेंट उत्तम प्रकारे करता येते.

ज्यांच्या जन्मकुंडलीमधे दुसर्या स्थानी गुरु आहे अश्यांना मॅनेजमेंट चांगली समजते. या वर्षी  दुसर्या स्थानी गुरु असलेल्या लोकांच्या मुळच्या गुरुवरून गोचर गुरुचे भ्रमण होत असल्यामुळे मॅनेजमेंट कौशल्यामधे अजूनही उत्तम वाढ होईल. आर्थीक व्यवस्थापन, मानवी संसाधने अर्थात ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट, तंत्रज्ञान अर्थात टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट या शिवाय इनोव्हेशन मॅनेजमेंट या चार स्तरावर मॅनजमेंट जमली म्हणजे कोणत्याही व्यवसायातले कोणतेही खाते अत्यंत उत्कृष्ट पणे हाताळले जाते. असे ज्ञान या लोकांना झाल्यामुळे नोकरी व्यवसायात फ़ार वेळ देता त्यांना आपले कुटूंब, आरोग्य आणि सामाजीक संबंध उत्तम रितीने हाताळणे शक्य होईल.

वृश्चिक राशीचे लोक या वर्षी उत्तम काम करुन आपला आदर्श अनेकांच्या पुढे ठेवतील. ह्या रिसोर्सेस चे मॅनजमेंट कसे करावे याचे रोल मॉडेल किंवा एखादा नविन ट्रेंड निर्माण करणे ज्यांच्या जन्मकुंडली मधे दुसर्या स्थानी गुरु आहे अश्या वृश्चिक लग्नराशीच्या लोकांना चांगले जमेल. क्रायसेस अर्थात असाधारण परिस्थीती हाताळताना अनेकांची जमत नाही. पण सहाव्या स्थानी या गुरुची दृष्टी असल्यामुळे या वर्षी आपण अशी असाधारण परिस्थीती सुध्दा चांगली हाताळाल.

ज्यांच्या जन्मकुंडलीत  गुरु दुसर्या स्थानी नाही त्यांना सुध्दा आर्थीक प्रगती आणि आर्थीक नियोजन चांगल्या पध्दतीने समजेल. दरवेळेला काहिही शिकण्यासाठी फ़ॉर्मल एज्युकेशन घेण्याची गरज नसते. जीवन जगण्याचा अनुभव हाच मोठा गुरु आहे याचेही ज्ञान वृश्चिक राशीच्या लोकांना होईल. कारण चुक झाल्यावर ती समजली नाही आणि त्यात सुधारणा करुन तीच चुक पुन्हा करायची नाही हे समजणारा वृश्चिक राशीचा माणुस नसतो.

धनु रास

आपल्या राशीला गुरु पहिला येणार आहे. धनु ही गुरुची स्वत:ची रास आहे. या राशीत गुरु बलवान असतो. ज्यांच्या जन्मकुंडलीमधे धनु राशीचा गुरु आहे त्यांना या गुरुवरुन गोचरीचा गुरु जाताना स्वत:च्या व्यक्तिमत्वात बदल झाले असल्याचे किंवा होत असल्याचे जाणवेल. गुरु ज्ञान, व्यवस्थापकीय कौशल्य आणि प्रगल्भ दृष्टीकोन याचा कारक असतो. या तिनही गोष्टी जेव्हा कृतीतून किंवा बोलण्यातून दिसतात तेंव्हा एकत्रीतपणे व्यक्तिमत्व म्हणून लोकांना दिसते.

आपल्याला हळु हळु या तिनही अर्थात ज्ञान, कौशल्य आणि दृष्टीकोन किंवा विचार यात बदल होताना या वर्षभरात दिसेल. यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. वाढलेल्या आत्मविश्वासामुळे आपण आपले काम कमी वेळात, उत्तम रित्या पुर्ण करु शकाल. आपण बोलाल तेंव्हा आपले कमी शब्द सुध्दा लोकांना आश्वासक वाटतील. आपल्या बोलण्याला लोक सकारात्मक प्रतिसाद देतील. आपण जिथे काम कराल तिथला आपला परफ़ॉर्मन्स अल्टिमेट असा गणला जाईल.परिणामी आपण करत असलेल्या व्यवसायात किंवा पदावर आपली प्रतिष्ठा आणखी वाढेल.

दरवेळेला अध्यात्मिक जीवन म्हणजे तत्वज्ञान, विरक्ती किंवा संन्यास अश्या प्रकारे असत नाही. तुमची जबाबदारी पार पाडताना सामाजीक भान ठेऊन जबाबदारीच्या चौकटीच्या पुढे जाऊन एखादा नविन आयाम प्रस्थापित करणे जो अनेकांना मार्गदर्शक ठरेल हा विचार सुध्दा अध्यात्मिक आहे. शिक्षकाने उत्तम शिक्षण देताना आपल्या चौकटीच्या बाहेर जाऊन जबाबदार विद्यार्थी जबाबदार नागरीक घडविण्याचा संकल्प सुध्दा अध्यात्मिक परिभाषेत नसला तरी त्या मार्गावर असेल. आपण असेच एखादे काम वर्षभरात कराल.


ज्यांच्या लग्नस्थानी धनु राशीत गुरु नाही त्यांना हा गुरु व्यक्तिमत्वाच्या स्वरुपात नाही तर ज्ञानाच्या किंवा कौशल्याच्या पातळीत वाढ करण्यास सहायभुत होईल. जे लेखक आहेत त्यांच्या हातून उत्तम दर्जाचे लेखन होईल. हे लेखन परंपरागत लेखन ठरता नवनिर्मीतीच्या कसोटीला उतरेल. जे धर्मसंस्था संभाळतात किंवा धर्मज्ञानाचा प्रसार करतात त्यांना ही एक उंची गाठण्यासाठी सहायभुत होईल. राजकारण , समाजकारण, कला , क्रिडा ,व्यापार, धर्मकारण सर्वच क्षेत्रात काम करणारे धनु लग्नाचे लोक आपला ठसा या वर्षात उठवू शकतील. शिक्षण  तसेच बॅंकींग फ़ायनान्स क्षेत्रात काम करणार्या लोकांना काही विशेष करुन दाखवण्याची संधी या वर्षात मिळेल.


मकर रास

मकर राशीच्या लोकांना धनु रास बारावी येते. --१२ या धर्म त्रिकोणातील बारावे स्थान अध्यात्म प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असले तरी भौतीक जीवनात खर्च, मनस्ताप आणि मानहानी देणारे असते. याकाळात व्यवहारीक गोष्टींकडे फ़ारसे लक्ष द्यावे असे वाटत नाही. जास्त काळ चिंतन, मनन किंवा एकांतवास यात व्यतीत करावासा वाटतो. यातून साधणारी अध्यात्मिक प्रगती हा एक भाग आयुष्यात महत्वाचा असला तरी भौतीक जगात आपली कामगीरी नीट झाल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकांना या काळात प्रवास करावा लागतो. हा प्रवास सुखाचा नसतो. यातून एकांतवास आणि आजारपण सुध्दा मागे लागते.

ज्यांचे मकर लग्न आहे आणि जन्मकुंडलीमधे धनु राशीचा गुरु आहे , त्यांना व्ययेश व्ययात अशी स्थिती वर्षभर असल्यामुळे अनेक गोष्टींचे नियंत्रण हातातून जाते की काय असा संभ्रम निर्माण होईल. एका बाजूला आजारपण किंवा सुखदायक नसलेला सक्तीचा अतिरीक्त प्रवास यामुळे चित्त आनंदी असणार नाही. दुसर्या बाजूला नियोजन नसलेला खर्च यामुळे वर्षभरात अनेकदा जीव हैराण होईल. कर्माचा सिध्दांत समजणे हे सुध्दा ज्ञान आहे. शनि अपमान देतो पण गुरु अनुकूल नसताना आपल्या सद्गुणांची कदर होणे याचा जास्त त्रास होतो. कर्माच्या सिध्दांतामधे केलेल्या कर्माचे कर्मानुसार फ़ळ मिळते हे समजते. आपण ज्ञानी माणसाचा अपमान केला तर तीच परिस्थीती स्वत:ला भोगावी लागते. यासाठी कोणाला दोष देणे, जे घडत आहे ते आपल्याचा कर्माचे फ़ळ आहे हे समजणे हे ज्ञान अश्या परिस्थीतीत होते.

अनेकदा आत्मपरिक्षण करुन हे कर्माचे फ़ळ जाणुन घेण्याचा विवेक बारावा गुरु देतो. प्रतिकूल काळ सुध्दा माणसाला काही शिकवत असतो. ज्याच्या जन्मकुंडलीत धनु राशीत गुरु आहे त्याला या वर्षी जरा जास्तच त्रास संभवतो. परंतु ज्याच्या जन्मकुंडलीमधे धनु राशीत गुरु नाही अश्या लोकांना खर्च, मानसीक त्रास त्या मानाने कमी संभवतो.

मकर लग्न आहे परंतु जन्मकुंडली मधे धनु राशीचा गुरु नाही अश्यांना वर्षभर गुरुचा अशुभ काळ जरी असला तरी खुप मानसीक त्रास किंवा अपमानास्पद वागणूक मिळेल असे नाही. जी कामे आपल्या इच्छा शक्तीवर पार पडतात किंवा एका शब्दावर पार पडतात ती सहजपणे पार पडणार नाहीत. अश्यावेळी हे काम खात्रीने पार पडेल यासाठी मॅनेजमेंट चे फ़ॉलोअप हे तंत्र शिकावे लागेल. एकदा हे तंत्र शिकलात तर कामे समजपणे मार्गी लागली नाहीत तरी मॅनेजमेंट चे फ़ॉलोअप  तंत्र वापरुन मार्गी लागतील. प्रसंगी साम, दाम, दंड आणि भेद ही वापरावे लागेल.

कुंभ रास :

आपल्या राशीला यावर्षी धनु राशीचा गुरु लाभस्थानी येणार आहे. लाभ स्थान हे सर्व प्रकारचे लाभ देते. उत्तम मित्र परिवार मिळतो. ज्यांच्या जन्मकुंडली मधे अकरावा अर्थान धनु राशीचा गुरु आहे त्याला वरिष्ठ अधिकारी यांच्याशी मित्रत्वाचे नाते कसे जोडावे याचे उपजत ज्ञान असते. हा वरिष्ठ अधिकारी लहान पणीचा मित्र असेल तर त्यालाही कोणाशी तरी मनातले बोलावे, सल्ला घ्यावा, काही खाजगी कामे सांगावी अशी गरज असतेच. ही गरज कशी ओळखावी आणि ती गरज ओळखून त्या प्रमाणे वागावे हे शिकवावे लागत नाही.

नारायण ह्या कथेत पुल उल्लेख करतात तसा ऑफ़िसमधे महत्वाचा पोर्ट फ़ोलीओ संभाळून नाही तर साहेबांच्या घरची कामे करून ही व्यक्ती वरिष्ठांची मर्जी सहज संपादन करु शकते. याचा फ़ायदा घेऊन नातेवाईकांना/ मुलाला चांगली नोकरी मिळवून देणे यासारखी कामे ही व्यक्ती समज करु शकते. या वर्षी गोचरीचा गुरु धनु राशीमधे गेल्यावर अनेक अशी कामे आपण मार्गी लाऊ शकाल.

आपल्या जन्म कुंडलीमधे जर मुळ नक्षत्रात गुरु असेल तर एखाद्या तपस्वी, अध्यात्मीक किंवा ज्ञानी माणसाच्या कृपेने अपेक्षीत असेल तर अध्यात्मीक मार्गदर्शन, कृपा लाभेल. आपल्या जन्मकुंडली मधे जर पुर्वाषाढा नक्षत्रात गुरु असेल तर नोकरीत प्रमोशन, आर्थीक लाभ होण्यासाठी वरिष्ठांची विशेष शिफ़ारस यासारखे लाभ मिळतील.

आपल्या जन्मकुंडलीमधे गुरु जर उत्तराषाढा नक्षत्रात असेल आणि जन्मकुंडलीमधे रवी बलवान असेल तर राजकीय पद मिळण्याचे योग नक्कीच आहेत. जर आपल्या जन्मकुंडली मधे गुरुची दशा सुरु असेल तर अशी राजकीय लॉटरी स्पर्धेत नसताना सुध्दा आपल्याला लाभेल.

ज्यांच्या जन्मकुंडली मधे धनु राशीचा गुरु नाही अश्या कुंभ लग्नाच्या लोकांना हा गुरु लाभ देणारच आहे. परंतु जन्मकुंडली मधल्या गुरु वरुन गुरु जाताना वर्षभर जे लाभ होतील इतके लाभ अपेक्षीत नाहीत. परंतु अडलेली कामे वरिष्ठांच्या मार्गी लागतील. आपली शिल्लक रक्कम सेव्हींग खात्यावर पडून असेल तर दर महिना उत्पन्न मिळेल अशी गुंतवणुक करावी याचे ज्ञान होईल आणि उत्पन्नाचा दिर्घकालीन स्त्रोत तयार होईल. अनेकांना सोन्याचे भाव वाढल्यामुळे पुर्वी कमी भावाने घेतलेले सोन्याचे मुल्य वाढल्याने लाभ झाला याचे ज्ञान होईल. गोड खावेसे वाटते अश्यांना विशेष पक्वांनाचे भोजन वर्षभरात अनेकदा मिळेल.

एकंदरीत कुंभ राशीची कोणतीही व्यक्ती वर्षभरात अनेक प्रकारचे लाभ मिळाल्याने वर्षभर आनंदी राहील.
मीन रास

आपल्या राशीला धनु राशीचा गुरु दहावा येणार आहे. दहावा गुरु म्हणजे कर्मस्थानी येणारा गुरु. आपल्या जन्मकुंडली मधे जर धनु राशीचा गुरु असेल तर आपले काम या वर्षभरात खुपच वाढणार आहे. आपण सामाजीक काम करत असाल किंवा फ़ायनान्स क्षेत्रात असा किंवा राजकीय क्षेत्रात असा, आपली जबाबदारी नक्कीच वाढणार आहे.

जेव्हा प्रथमच अशी जबाबदारी येते तेंव्हा अनेकदा नेमके कामाचे नियोजन कसे करू किंवा कामावर नियंत्रण कसे मिळवू याचे ज्ञान अर्थात मॅनेजमेंट ची पाच तत्वे प्लॅनिंग, ऑरगनाईझींग, कंट्रोलींग, स्टाफ़ींग आणि डेलीगेशन हे शिकावेच लागेल. हे शिकायला कोणत्या मॅनेजमेंट स्कुल मधे ॅडमिशनची गरज असतेच असे नाही. गुरू हा ज्ञानाचा संग्राहक असतो. तुमचा गुरु बलवान असल्यामुळे अश्या पध्दतीने अनेकांना काम करताना तुम्ही पाहीले असेल. तुमच्या आधी या पदावर काम करणारे कसे काम करत होते त्यांचे काम करणे आठवले तरी सुध्दा अनेकदा कामावरच्या अडचणीवर मात करता येईल.

या शिवाय आजकाल ऑनलाईन ट्रेनिंग / ऑफ़लाईन ट्रेनिंग किंवा तीन महिन्यांचा एक्झीकेटीव्ह साठीचा मॅनेजमेंट कोर्स यातूनही परिस्थीती हाताळण्याचे ज्ञान कौशल्य नक्कीच प्राप्त होईल.

अशी संधी मिळणे हे आपले भाग्य आहे. अनेक लोक याच संधीचा फ़ायदा घेऊन चमकदार कामगिरी पार पाडतात. आधीच्या जबाबदार अधिकार्यांपेक्षा वेगळे आणि मापदंडावर मापले असता नेत्रदिपक यश तुम्ही या वर्षी मिळवू शकाल.

ज्यांच्या जन्मकुंडलीमधे धनु राशीचा गुरु नाही त्यांनाही हा गुरु काही लाभ नक्कीच देईल. अनेकांना जबाबदार व्यक्तीच्या गैरहजेरी मधे तात्पुरती जबाबदारी येईल किंवा एखादा महत्वाचा प्रोजेक्ट वर नेमणूक असेल. या प्रोजेक्टसाठी आपण महत्वाचे असाल.

राजकीय नेत्यांना काही विशेष जबाबदारी काही काळापुरती हाताळावी लागेल. फ़ायनान्स क्षेत्रात काम करणार्या कर्मचार्यांना काही काळापुरत्या काही विशेष पॉवर्स दिल्या जातील. आपणास सुध्दा ही महत्वाची संधी आहे. असे झाले तर आपण चमकदार कामगिरी करुन वरिष्ठांच्या नजरेत याल जेणेकरुन जेंव्हा प्रमोशन मिळायची संधी येईल तेंव्हा आपण एलीजीबल असाल.


No comments:

Post a Comment