मनोगत,

या लेखनाला संपादकीय का म्हणावे असा प्रश्न असल्यामुळे याला मनोगत असे शिर्षक आहे. वास्तवीक लेखक लेखन करतात. त्यातील आशय नेमकेपणाने येईल असे पाहून   शुध्द्लेखनातल्या चुका येणार नाहीत याची काळजी संपादक घेत असतो. व्यावसायीक दृष्ट्या हा अंक नुकसानीत जाणार नाही हे पहाणारा पण संपादक असतो.

नक्षत्रप्रकाश मधे लेखक मीच, आशय शुध्दलेखन संपादन पण मीच करणार आणि हा सगळा कारभार व्यावसायीक दृष्टीने नुकसान दायक होणार नाही यालाही मीच जबाबदार असल्याने हे मनोगत आहे.

नक्षत्रप्रकाश फ़ेसबुक समुह जिथे नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१९ प्रसिध्दी होणार आहे, गायत्रीमाता ज्योतिष केंद्र संचालित हा ब्लॉग जिथे हा अंक कायमचा उपलब्ध असेल, सोबत नक्षत्रप्रकाश हिंदी ब्लॉग आणि नक्षत्रप्रकाश युट्युब चॅनल ह्या सर्व सोशल मिडीयावरुन ह्या दिवाळी अंकापर्यंत पोचता येणार आहे. जीवनात काही वर्षे फ़क्त ज्योतिष हा माझा संकल्प आहे.

मी  ज्योतिष व्यवसाय करतो परंतु हा शुध्द व्यवसाय नसून यात सामाजीक बांधीलकी आहे. यामुळे माझ्या मार्गदर्शनाचा काही भाग फ़ी शिवाय उपलब्ध असावा या भावनेतून दिवाळी अंक किंवा ब्लॉग मी लिहीतो.

मुल पाच वर्षांचे झाले की त्याला शाळेत प्रवेश दिला जातो. नापास झाले नाही तर पंधराव्या वर्षी तो मॅट्रीक पास होतो. या पध्दतीने विसाव्या वर्षी पदवीधर होण्याची व्यवस्था भारतातच नव्हे तर अनेक देशात आहे.पण यानंतर नोकरी कधी लागेल ? विवाह कधी होईल ? भाग्योदय कधी होईल ? ह्या प्रश्नांची उत्तरे एखाद्या कालमर्यादेत देता येत नाहीत. कारण इथे सिस्टीम नाही तर कर्माचा सिध्दांत कार्यरत असतो. अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे  सांगण्याचे समाधान करण्याचे तंत्र ज्योतिषशास्त्र सोडता अन्य पर्यायी शास्त्रात नाही.

जिथे उपाय करुन परिस्थीती बदलता येणे शक्य आहे अश्या ठिकाणी उपाय सुचवतो. हे उपाय शक्यतॊ उपासना पध्दतीचे असतात. उपासनेने प्रारब्ध बदलत नाही परंतु सहजपणे प्रारब्ध भोग भोगताना त्यातील अनुकूल परिस्थीती जाणून मध्यम मार्ग तयार करता येतो यावर माझा स्वत:चा विश्वास आहे. मी सांगत असलेल्या उपासनेवर आधारीत उपायांचा हाच पाया आहे.

गेले तीन वर्षे या पध्दतीने ज्योतिष मार्गदर्शन करताना आलेल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करुन मी माझी मार्गदर्शन पध्दतीत सुधारणा करत आहे.  नियमीत ब्लॉग आणि आणि युट्युब माध्यमातुन तसेच वैयक्तीक मार्गदर्शनाच्या माध्यमातून नियमीत भेटत राहू या !

माझ्या सर्व नक्षत्रप्रकाश फ़ेसबुक सदस्यांना गायत्रीमाता ज्योतिष केंद्र ब्लॉग वाचकांना / नक्षत्रप्रकाश युट्युब प्रेक्षकांना आणि मी वैयक्तिक मार्गदर्शन केलेल्या सर्वांना दिवाळी २०१९ च्या पुनश्च हार्दीक शुभेच्छा !


नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१९ 

No comments:

Post a Comment