१४ मार्च ते १३ एप्रिल २०२० चे राशीभविष्य कर्क , सिंह आणि कन्या राशींच्या साठी


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १४- १५- १६-  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १४ मार्च २०२० ला मीन राशीत जाणार आहे
२२ मार्च २०२० ला मंगळ मकर या स्वत:च्या उच्च राशीत जाणार आहे.
२८ मार्च २०२० ला शुक्र वृषभ या स्वत:च्या राशीत जाणार आहे.
२९ मार्च २०२० ला गुरु मकर राशीत काही महिन्यांकरिता जाऊन परत जुन २०२० मधे धनु राशीत येणार आहे.
७ एप्रिल २०२० ला बुध मीन या बलहीन राशीत जाणार आहे.

थोडक्यात हा महिना १४ मार्च २०२० ला सुरु झाल्यावर मंगळ, शुक्र, गुरु आणि बुध हे चार ग्रह राशीबदल करणार आहेत.

 याच महिन्यात २२ मार्च ला होणारी मंगळ प्लुटो युती आणि त्या आधी २० मार्च ला होणारी मंगळ गुरु युती मात्र काही जबरदस्त घटना घडवतील असे भाकीत मी मागील महिन्यात केले आहे. मंगळ आणि गुरु राजकीय आंदोलने घडवितात. सीएए आणि सीएबी ला असणारा विरोध या काळात पुन्हा उफ़ाळून आला तर आश्चर्य वाटू नये. मंगळ आणि प्लुटो एखादी वेगळी घटना घडवेल. ही नेमकी कुठे घडेल हे पहाणे मेदीनीय तज्ञ लोकांना जास्त समजेल.

या महिन्यात मकर राशीत जाणारा मंगळ घरबांधणी उद्योगाला चालना देईल त्यामुळे बिल्डर लोक खुष होतील. वृषभ राशीत जाणारा शुक्र सौंदर्य प्रसाधने, कपडे यांचे व्यापारात तेजी आणेल. गुरु मकर राशीत असताना फ़ार काही घडेल असे नाही. बुध मीन राशीत असताना शेअर्स मार्केट वर येणे जरा कठीणच दिसत आहे.

३१ मार्च २०२० ला  पाय दुखी गुडघे दुखी असणार्यांना जास्त त्रास संभवतो.. २ एप्रिल २०२० ला गर्भवती स्त्रीयांनी काळजी घ्यावी. ४ एप्रिल च्या आसपास कागदपत्रे पाहूनच सह्या करा असे सांगणे आहे.

आता पाहू या या महिन्याचे राशीनिहाय राशीभविष्य, कर्क, सिंह आणि कन्या राशींच्या साठी. हे राशी भविष्य आपण लग्नराशीकडून पहा हे सांगायला नको. जर लग्नराशी माहित नसेल तर मात्र चंद्र राशीकडून हे राशी भविष्य अनुभवा.

कर्क रास: 

विवाह इच्छुक तर २९ मार्च २०२० नंतर विवाह होण्याच्या दृष्टीने ग्रहमान निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. पुढील एका महिन्यात निर्णय नाही घेतलात तर मात्र शनि सप्तमात असल्यामुळे निर्णय घेताना अडचणी येताना दिसतील. कोणत्याही स्थळाला हो म्हणू नका पण या विषयात निर्णय घेण्याचे पुढे ढकलण्याची पध्दत वाढत आहे म्हणून सांगणे आहे.

आपल्या आवडत्या व्यक्तीला विवाहासाठी प्रपोज करायचे असेल तर या महिन्यात काळ अनुकूल आहे. पाश्चात्य पध्दतीने गुडघ्यावर बसून विवाह करण्यासाठी प्रपोज करण्यासाठी संधी मिळेल आणि २८ मार्च नंतर प्रयत्न केलात तर होकार सुध्दा मिळेल.

शैक्षणीक क्षेत्रात काम करणार्या लोकांना त्यांचे काम उठून दिसावे यासाठी काही आकर्षक संधी चालून येतील. याचा फ़ायदा घ्या. २८ मार्च नंतर आपल्याला अनेक लाभ होणार आहेत. कशाचा लाभ मिळवायचा याबाबत आधीच विचार कराल तर योग्य दिशेने प्रयत्न करुन हवे तेच मिळवाल.

काही आरोग्याच्या तक्रारीवर खास करुन सर्दी आणि खोकला किंवा श्वसन संस्था संदर्भातील आजार हाताबाहेर जाऊ देऊ नका. इतके पथ्य पाळले तर हा महिना चांगलाच जाईल.

मुलांच्या विवाहाला उशीर होत आहे का ? या प्ले लिस्ट मधे उपाय पहा.

सिंह रास:

आपल्या राशीचा मालक व सर्व ग्रहांचा राजा रवि पुर्ण महिनाभर मीन राशीत असणार आहे. मीन ही राशी रवि ग्रहाचा मित्र असलेल्या गुरुची राशी असली तरी ही जलराशी असल्यामुळे व यात गुरुचे एक नक्षत्रचरण सोडल्यास शनि व बुध या ग्रहांची नक्षत्रे असल्यामुळे रविचा जोर या राशीत नसतो. महत्वाचे म्हणजे मीन राशी सिंह लग्नाला अष्टमात आल्याने या राशीत रवि अगदीच बलहीन होतो.

आपल्या राशीचा मालक अष्टम या अशुभ स्थानी असल्यामुळे या महिन्यात नेत्रदिपक असे काही घडणार नाही. याचा अर्थ आपल्याला सुचणार नाही असे नाही. सातत्याने परिस्थीतीचे आकलन करत विचार करत रहा आणि स्वत: चे आरोग्य बिघडणार नाही असे पहा. सिंह राशीच्या व्यक्ती मानी असतात. अहंकार ही मोठा असतो अश्यावेळी एखादा अधिकार हातातून गेला की या लोकांना अस्वस्थता येते. याचा परिणाम म्हणून स्वास्थ्य बिघडू शकते. पुढील महिन्यात रवि स्वत:च्या उच्च राशीत जाईल तेंव्हाच काही घडेल तो पर्यंत शांत रहा.

शनि अडीच वर्षे आपल्या सहाव्या स्थानी असल्यामुळे आणि बलवान असल्यामुळे हाताखालील लोकांच्या सहायाने उस्ताद शत्रुला तुम्ही हरवू शकाल त्यामुळे या महिन्यात अश्या व्यक्तींना आपल्या प्रभावाखाली घ्या. या महिन्याच्या २९ तारखेला तीन महिन्यासाठी सहाव्यास्थानी येणारा गुरु देखील तुमच्या शत्रुला उपदेश करुन जिंकण्याची संधी देणार आहे. नाही शत्रु बधला तर शनिच्या मार्गाने म्हणजे कुटील कारस्थानासाठी सज्ज रहा.

पुढील दोन महिने मंगळ, तीन महिने गुरु आणि अडीच वर्षे शनि यांचे सहाय घेऊन तुम्ही शत्रुला नामोहरक करु शकाल पण त्यासाठी विचारांची आणि योजनेची आवश्यकता आहे ती या महिन्यात करा. हाच या महिन्याचा महत्वाचा संदेश तुमच्या साठी आहे.

कन्या रास:

आपल्या राशीचा मालक बुध मागे खुप दिवस वक्री होता आणि आता मीन या स्वत:च्या बलहीन राशीत ७ एप्रिलला जाणार आहे. तोवर बुधाचा मुक्काम कुंभ ह्या त्याचा आवडत्या वायु राशीत असणार आहे. बुध्दीच्या जोरावर आणि वाणीच्या ताकदीवर कोर्टात युक्तीवाद करणार्या वकीलांना तसेच बुध्दीच्या जोरावर रोग्यांना तपासून त्यांचा नेमका रोग शोधून औषधे देणार्या डॉक्टर्स आणि वैद्यराज यांच्यासाठी १४ मार्च ते ३ एप्रिल हा काळ अनुकूल असणार आहे. ४ एप्रिलच्या आसपास बुध नेपच्युन युती मुळे होणार्या चुका होणार नाहीत असे ठरवून जर आपण काम केलेत तर अनेक नव्या गोष्टी समजतील आणि मार्गीही लागतील.

या महिन्यात २८ मार्च ला शुक्र जो तुमच्यासाठी भाग्येश आणि धनेश ही आहे, भाग्य स्थानी जाणार असल्यामुळे धनलाभ होईल. लगेचच पैसे हातात येतील असे नाही पण येणार आहेत. हा महिनाभर सप्तमात रवि असल्यामुळे वैवाहीक जोडीदारासोबत खटके उडण्याची शक्यता असल्यामुळे संकल्प करा की ज्या विषयावर चर्चा केल्यामुळे वाद होतो ते विषयच शिवा लष्करे स्टाईल विषय कट म्ह्णून बंद ठेवा.

लिखाण करणार्यांच्या साठी २२ मार्च नंतर पर्वणी आहे. २२ मार्च नंतर तुमच्या लेखणीला सुर गवसेल याची खात्री बाळगा. ३१ मार्च च्या आसपास गर्भवती महिलांनी विशेष खबरदारी घ्यावी. इतके झाले तर कन्या राशीच्या लोकांना महिला चांगलाच असेल.


ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर यांचे whatsapp वर मार्गदर्शन मिळण्यासाठी हे वाचा.


No comments:

Post a Comment