लग्नस्थान


लग्नेश अर्थात लग्न स्थानाच्या अधिपतीची स्थिती जाणल्याशिवाय कोणत्याही पत्रिकेचा अभ्यास सुरू होत नाही. लग्नेश लाभेशाच्या नक्षत्रात किंवा राशीत असता, वक्री नसताना, बलवान असताना जातकाची इच्छा शक्ति प्रबळ असते. उपलब्ध साधने याचा सुयोग्य वापर करून यश संपादन करतो. याउलट जर लग्नेश बलवान नसेल, ६,८ किंवा १२ स्थानी असेल, वक्री असेल तर राजयोग असलेल्या जातकाला इच्छा शक्तीच्या अभावामुळे यश संपादनात अडथळा येतो.

लग्नेश जर बलवान ( केंद्रात किंवा कोणात, उच्च/स्वराशीत, उच्च किंवा स्वनवांशात ) असेल तर जातकाची इच्छाशक्ती प्रभावी असते असे पाहिले. लग्नेश जर लाभ स्थानाशी ( लग्नेश लाभे्शाच्या राशीत किंवा नक्षत्रात किंवा भावचलीतात लाभ स्थानात ) असेल तर यश हमखास मिळते असे.

लग्नेश जर पंचमात किंवा पंचमेशाच्या राशीत किंवा नक्षत्रात असतो तेव्हा त्याचे विचार प्रभावी असतात. किंबहुना तो आपल्या विचार प्रदर्शनाने यश मिळवतो. पण तो जर भाग्यात किंवा भाग्येशाच्या नक्षत्रात किंवा राशीत असता फ़ार प्रयत्न न करता कुणाच्या तरी प्रभावाने किंवा पुर्वसंचीताने एखाद्या घराण्यात जन्म होऊन यश मिळते. प्रत्येक स्थानाचे असे वेगवेगळे परिणाम शोधता येतील यावर अभ्यास आवश्यक आहे.

आपण लग्नी असलेले ग्रह व्यक्तीमत्वावर कसा परिणाम करतात ते पाहू. यासाठी अंशात्मक कुंडली म्हणजे काय हे माहित असणे आवश्यक आहे. जर लग्न धनु राशीत कर्क नवांशावर उदीत होत आहे याच अर्थ धनु लग्न राशीत ( १० अंश ते १३ अंश २० कला ) या मधे कुठेही. अश्यावेळी लग्नाच्या अंशावर असलेला गुरु व्यक्तीमत्वावर जबरदस्त प्रभाव टाकेल. हा गुरु वक्री नसावा हे ओघाने येतेच. जर लग्नभावारंभी म्हणजे ज्या अंशावर लग्नबिंदु उदीत होत आहे त्या अंशाच्या १-२ अंश आसपास रवि, मंगळ, गुरु यासारखा ग्रह असेल तर याव्यक्तीचे व्यक्तीमत्व नेत्रुत्वाला पोषक असेल. चंद्र वा शुक्र असता ही व्यक्तीचा चेहरा प्रभावी असेल. तर शनि असता ही व्यक्ती आपल्या धोरणी स्वभावाचा फ़ायदा घेईल. बुध असता व्यापारी वृत्ती असेल असे सर्व साधारण म्हणता येईल. अर्थातच लग्नभावारंभीचा ग्रह जितका बलवान तितका त्याचा प्रभाव जास्त असेल.

लग्न भावारंभी बलवान केतु असता किंवा राहू असता ते ज्या राशीत असतात त्याचा अधिपती कुठे आहे यावर बरेच काही अवलंबुन असते.
आता लग्नभावारंभी असलेल्या ग्रहाच्या नवपंचम योगात जेव्हा पंचम आणि भाग्य स्थानातले ग्रह असतात त्यांना ग्रॅंड ट्राईन असे म्हणतात. याचा अजून जास्त परिणाम व्यक्तीमत्वावर पडतो. यावर लवकरच काही कुंडल्या आपण पाहूया.

आपण स्वामी स्वरुपानंदन पावस यांची अंशात्मक कुंडली व त्रोटक आयुष्य पाहू.

लग्नभावारंभी नेपच्युन व त्याच्या नवपंचम योगात तुळेचा शुक्र हा भक्तिमार्गासाठी अत्यंत पोषक आहे. भाग्यातला गुरु सुध्दा अध्यात्मविचाराला पोषक आहे. गुरुचा नेपच्युन आणि शुक्राशी अंशात्मक नवपंचम योग होत नसला तरी गुरुला पाचवी आणि नववी दृष्टी असते त्याचा प्रभाव स्वामीजींच्या व्यक्तीमत्वावर नक्कीच आहे.

तुळेचा शुक्र हा कलेचा कारक आहे. तसेच तो पंचमेश आहे त्यामुळे प्राकृतातली ज्ञानेश्वरी मराठीत आणि काव्य निर्मीतीतुन आणण्याचे महान कार्य स्वामीजींनी केले. इथे नेपच्युन लग्न भावारंभी असल्यामुळे अध्यात्म व अंतर्स्फ़ुर्ती या दृष्टीने तो प्रभावी आहे.

पत्रिकेत राहू चतुर्थभावारंभी असुन तो व्यक्तीगत सुखाची हानी करतो पण हा योग अध्यात्मासाठी पोषक आहे. तर दशमभावारंभी असलेला केतु अध्यात्म/धर्मकार्यासाठीचा पोषक आहे.



श्री अमिताभ बच्चन यांची कुंडली पहाता लग्नेश जरी वक्री असला तरी त्याचा दोन शुभ स्थानाच्या ( पंचम- भाग्य ) अधिपती व दोन केंद्र स्थानाच्या अधिपती ( दशमेश - सप्तमेश ) होत आहे. यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व प्रचंड प्रभावी आहे. त्यांची सर्व प्रगती ( १९७१ ते १९९० ) शनिच्या महादशेत झाली. या काळात त्यांना बारा पैकी सहा पुरस्कार मिळाले. उरलेले सहा बुधाच्या महादशेत ( १९९० ते २००७ ) मिळाले.


शनिमहादशेत बुध अंतर्दशा असताना ( २६/१/१९७४ ते ४/१०/१९७६ ) शोले मधे अवार्ड मिळाला व भुमिका गाजली. शनिच्या महादशेतल्या शुक्र महादशेचा काळ ( १३/११/१९७७ ते १३/१/१९८१ ) ह्या काळात सर्वात जास्त दोन पुरस्कार आणि प्रसिध्दी


तिसरी कुंडली

ही कुंडली एका स्त्री ची असुन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ट्रेनी इंजिनीयर म्हणुन एका कंपनीत नोकरीला लागली. पुढे लग्नेश राजयोग कारक शनि ( नवमेश - दशमेश ) याच्या युतीत व लाभेशाच्या ( गुरु उच्चीचा ) नवपंचम योगाने जिद्दीने मॅनेजींग डायरेक्टर पदावर पोहोचली.


No comments:

Post a Comment