नमस्कार ! हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव
पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १४- १५- १६- तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत
जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे
राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.
या महिन्यात रवि अर्थात सुर्य १४ मार्च २०२० ला मीन राशीत जाणार आहे
२२ मार्च २०२० ला मंगळ मकर या स्वत:च्या उच्च राशीत जाणार आहे.
२८ मार्च २०२० ला शुक्र वृषभ या स्वत:च्या राशीत जाणार आहे.
२९ मार्च २०२० ला गुरु मकर राशीत काही महिन्यांकरिता जाऊन परत जुन २०२० मधे
धनु राशीत येणार आहे.
७ एप्रिल २०२० ला बुध मीन या बलहीन राशीत जाणार आहे.
थोडक्यात हा महिना १४ मार्च २०२० ला सुरु झाल्यावर मंगळ, शुक्र, गुरु आणि बुध
हे चार ग्रह राशीबदल करणार आहेत.
याच महिन्यात २२ मार्च ला होणारी मंगळ
प्लुटो युती आणि त्या आधी २० मार्च ला होणारी मंगळ गुरु युती मात्र काही जबरदस्त घटना
घडवतील असे भाकीत मी मागील महिन्यात केले आहे. मंगळ आणि गुरु राजकीय आंदोलने घडवितात.
सीएए आणि सीएबी ला असणारा विरोध या काळात पुन्हा उफ़ाळून आला तर आश्चर्य वाटू नये. मंगळ
आणि प्लुटो एखादी वेगळी घटना घडवेल. ही नेमकी कुठे घडेल हे पहाणे मेदीनीय तज्ञ लोकांना
जास्त समजेल.
या महिन्यात मकर राशीत जाणारा मंगळ घरबांधणी उद्योगाला चालना देईल त्यामुळे
बिल्डर लोक खुष होतील. वृषभ राशीत जाणारा शुक्र सौंदर्य प्रसाधने, कपडे यांचे व्यापारात
तेजी आणेल. गुरु मकर राशीत असताना फ़ार काही घडेल असे नाही. बुध मीन राशीत असताना शेअर्स
मार्केट वर येणे जरा कठीणच दिसत आहे.
३१ मार्च २०२० ला पाय दुखी गुडघे दुखी
असणार्यांना जास्त त्रास संभवतो.. २ एप्रिल २०२० ला गर्भवती स्त्रीयांनी
काळजी घ्यावी.
४ एप्रिल च्या आसपास कागदपत्रे पाहूनच सह्या करा असे सांगणे
आहे.
आता पाहू या या महिन्याचे राशीनिहाय राशीभविष्य, मकर, कुंभ आणि मीन राशींच्या साठी. हे राशी भविष्य आपण लग्नराशीकडून
पहा हे सांगायला नको. जर लग्नराशी माहित नसेल तर मात्र चंद्र राशीकडून हे राशी भविष्य
अनुभवा.
मकर रास:
आपल्या राशीचा मालक २४ जानेवारी पासून मकर राशीत
आहे. सोबत २९ मार्च ला गुरु सुध्दा मकर राशीत आल्यामुळे ४ नोव्हेंबर पासून सतत खर्च,
मनस्ताप आणि प्रवास यामुळे वैतागला असाल तर याला ब्रेक लागणार आहे. सोबत गेले दोन महिने
मंगळ धनु राशीत होता तो सुध्दा २२ मार्च २०२०
ला मकर राशीत गेल्यामुळे मकर राशीच्या लोकांना दिलासा मार्च अखेरीस मिळणार याची खात्री
बाळगा. या महिन्यापासून अपयशाची मालीका सुरु असेल तर ती संपेल. या महिन्यात धनलाभ सुध्दा चांगला होणार असल्यामुळे
हा दिलासा फ़क्त मनाला नसून खिशाला सुध्दा जाणवेल.
हे सर्व जरी खरे असले तरी रविचा तिसर्या स्थानातील
मुक्काम फ़ारसा शुभ नसल्यामुळे सर्दी आणि त्यामुळे कानाला त्रास किंवा जुने कानाचे दुखणे
त्रास देणार नाही ना हे पहाण्याची आवश्यकता आहे. तिसरा रवि तरुणांना स्वतंत्रपणे विचार
करायला प्रवृत्त करील ही चांगली स्थिती आहे.
२८ मार्च पर्यंत चवथा असलेला शुक्र आपल्याला
घरात आनंद देईल. नविन घरगुती सुख देणार्या वस्तू येतील. ज्यांच्या घरात फ़ॅन आहे ते
कुलर आणि कुलर असेल तर अत्याधीक थंडावा देणार एअर कंडीशनर सुध्दा घरी येईल.
एकंदरीत मकर राशीचे सहनशील लोक आधीचा त्रास आणि आत्ताचा दिलासा सुध्दा फ़ारसा व्यक्त
करणार नाहीत पण तुमच्या चेहेर्यातला ड्रायनेस कमी झाल्यामुळे जवळच्या माणसांना तरी
" अरे तुझ्यात फ़रक पडलेला आहे" असे म्हणावेसे वाटेल.
मुलांच्या विवाहाला उशीर होत आहे का ? या प्ले लिस्ट मधे उपाय पहा.
मुलांच्या विवाहाला उशीर होत आहे का ? या प्ले लिस्ट मधे उपाय पहा.
कुंभ
रास:
राशीचा
मालक शनि व्ययात, गुरु म्हणजे लाभेश तीन महिने व्ययात आणि त्याच्या जोडीला दशमेश आणि
तृतीयेश सुध्दा व्यय स्थानी आल्यामुळे हा महिना सुरवातीस बरा असला तरी संपता संपता
त्रास दायक होणार आहे. नको असलेले खर्च, प्रवास आणि सोबत अपयश सुध्दा देणार आहे. साडेसातीचा
चटका उन्हाच्या चटक्या सोबत आपली पाठराखण जुन अखेरीस सोडणार आहे. यामुळे आणि आपण अतिशय
विचारी असल्यामुळे कितीही त्रास झाला तरी मनाला काल्पनीक त्रास बाजूला करण्याची सवय
आत्तापासून लावा. अन्यथा असे बिघडलेले ग्रहमान तुम्हाला आणि तुमच्या स्वभावामुळे तुमच्या
सोबत अनेकांना विनाकारण नसलेल्या दु:खाचा अनुभव देईल.
असे काहिही
घडले तरी नोकरी किंवा व्यवसायाच्या जागेवरुन घरात याल तेंव्हा २८ मार्च २०२० नंतर घरी
आलात की जीवाला शांतता नक्कीच मिळणार आहे.
या महिन्यात
ग्रहमान फ़ारसे चांगले नाही यामुळे साडीसातीत शनि दर्शन चुकवू नका तसेच दररोज शनिच्या
पीडाहर स्त्रोत्रातला मंत्र खाली दिल्याप्रमाणे म्हणलात तर हे ग्रहमान फ़ारसे त्रासदायक
कायम असणार नाही.
शनिचा
पीडाहर स्तोत्रातला साडेसातीत नियमीत जप करायचा मंत्र
सुर्यपुत्रॊ
दिर्घ देहो विशालाक्ष शिवप्रिय: ।
मंदाचार प्रसन्नात्मा पीडा हरतु में शनि ॥
मीन रास:
आपल्या
राशीचा मालक गुरु २९ मार्च नंतर पुढे तीन महिने
लाभस्थानी असल्यामुळे हा काळ अत्यंत चांगली फ़ळे देणारा आहे. आपला स्वभाव पहाता हे पुन्हा
सांगावेसे वाटते की आधी काही काम केले असेल तर तगादा लावल्याशिवाय वसूली होणार नाही.
ग्रह चांगले आहेत म्हणजे एकदा मागुन पैसे येतील पण एकदा तरी मागावेच लागतील.
या महिन्यात
जरा जास्तच पैसे हाताला येतील त्याची उत्तम प्रकारे गुंतवणूक २८ मार्च पुर्वी केलेली
असेल तर हीच गुंतवणुक आयुष्यात कठीण काळी उपयोगी पडेल. कुणी मागीतले म्हणून जास्तीचे
पैसे देऊन टाकू नका हा सल्ला लक्षात ठेवा.
एप्रिल
महिना सुरु होता होता आपल्याला कुणी हातोहात फ़सवणार नाही ना याकडे लक्ष देणी आवश्यक
राहील. व्यावसायीक स्तरावर वातावरण चांगले असले तरी घरगुती वातावरणात थोडासा ताण असेल.
एखादा शब्द इकडे तिकडे झाल्यामुळे घरच्या लोकांच्यावर नाराज न होता अनुकूल काळाचा जास्त
उपयोग करुन घेण्याकडे कल ठेवावा. एकंदरीत महिना आपल्यासाठी चांगलाच
आहे.
No comments:
Post a Comment