१५ जानेवारी २०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळाचे मेष ते मिथुन राशीचे राशीभविष्य


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १५ जानेवारीला २०२० ला मकर राशीत जाणार आहे
३१ जानेवारी २०२० ला बुध कुंभ राशीत जाणार आहे.
३ फ़ेबृवारी २०२० ला शुक्र मीन या स्वत:च्या उच्च राशीत जाणार आहे.
८ फ़ेब्रुवारी २०२० ला मंगळ धनु या अग्नितत्वाच्या राशीत जाणार आहे.
याशिवाय सर्वात मोठा ग्रह राशीबदल या महिन्यात शनिचा आहे.

२४ जानेवारीला शनि मकर राशीत जाणार आहे. यामुळे वृश्चिक राशीची साडेसाती संपुन कुंभ राशीला सुरु होणार आहे. यासाडेसातीचा त्रास धनु, मकर आणि कुंभ राशीला कसा होईल हे सांगणार्या व्हिडीओ मी युट्युब वर प्रसिध्द केल्या आहेत. त्याची लिंक या प्रमाणे खाली पहा.

साडेसाती- कुंभ राशीच्या लोकांना काय अनुभव येईल ?


साडेसाती- मकर राशीच्या लोकांना काय अनुभव येईल ?


साडेसाती- धनु राशीच्या लोकांना काय अनुभव येईल ?


१५ जानेवारी २०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळात रवि, बुध, शुक्र, मंगळ आणि शनि राशीबदल करणार आहेत. चंद्र दर सव्वादोन दिवसांनी राशी बदलतो. यामुळे महिन्याच्या राशीभविष्यात त्याचा स्वतंत्र अंतर्भाव मी करत नाही. पण चंद्राशी होणारे महत्वाचे ग्रहयोग लक्षात घेऊन प्रत्येक राशीचे राशीभविष्य लिहीतो. आता पाहू राशीनिहाय भविष्य. हे भविष्य आपण आपल्या लग्नकुंडली मधील लग्नराशीप्रमाणे पहा. ज्यांना लग्नराशी माहित नाही त्यांनी चंद्र राशीकडून पहा.

मेष रास:

आपल्या राशीला मंगळ स्वत:च्या वृश्चिक राशीत ८ फ़ेबृवारी २०२० पर्यंत असणार आहे. जो पर्यंत मंगळ वृश्चिक राशीत आहे तो पर्यंत आपल्याला सहज यश मिळणार नाही. काही ना काही कारणाने काम अडकून पडेल. पण ८ फ़ेबृवारी २०२० नंतर मात्र राशीचा मालक धनु राशीत गेल्यामुळे दैनंदिन कामे किंवा महत्वाच्या कामात गती येईल.

३१ जानेवारीला बुध महत्वाच्या लाभस्थानी जाणार असल्यामुळे आपली एखादी केस कोर्टात सुरु असेल तर त्यातील एखादा टप्पा आपल्याला पुढे केसमधे विजय मिळवून देण्याच्या दृष्टीने अनुकूल होईल. काहींच्या कोर्ट केसेस चा निकाल त्यांच्या बाजूने लागेल. जरुरी नाही की दरवेळी कोर्टातच केस असली पाहीजे.  नोकरी/ व्यवसायात  मधे आपण आपल्या शत्रुवर मात कराल पण यासाठी सुध्दा ८ फ़ेब्रुवारी २०२० उजाडावी लागेल. यासाठी शत्रुसोबत संघर्ष कुठेही असो, आपण युक्तीवाद मनाशी तयार ठेवा.

मेष राशीचे लोक मनगटाच्या जोरावर यश मिळवण्यावर विश्वास ठेवत असले तरी या महिन्यात यश मिळवायचा असेल तर बुध्दीचातूर्याने काम करुन यश मिळवा. आपल्याला जर व्याज, घरभाडे या माध्यमातून पैसे येणे असतील तर ३ फ़ेबृवारी पुर्वी हे पैसे येतील असे पहा. ३ फ़ेबृवारी २०२० नंतर व्यवसायासाठी प्रवास व त्यामुळे खर्च किंवा व्यवसायात नुकसान किंवा केलेल्या इन्व्हेस्टमेंट ची एनएव्ही कमी होणे असे अनुभव येतील. पैसे बुडणार नाहीत पण याची चिंता लागून राहील.

२७ जानेवारीला आपल्या व्यवसायात काही गोंधळ निर्माण होणार नाहीना या कडे लक्ष द्या. चुकून पैसे जास्त दिले किंवा कमी घेतले असे होण्याची शक्यता आहे. आपल्या वैवाहीक जोडीदाराचा मुड या दिवशी आपल्याला सांभाळावा लागेल. ज्यांचा विवाह झालेला नाही त्यांच्या आयुष्यात ह्र्दयाचे ठोके वाढले असा अनुभव या दिवशी येऊ शकेल.

इतके लक्ष दिलेत तर हा महिना आपल्यासाठी चांगला जाईल.

वृषभ रास :

आपल्या राशीचा मालक शुक्र या महिन्यात ३ फ़ेब्रुवारी २०२० ला उच्च राशीत त्यातुनही लाभस्थानी प्रवेश करणार आहे. ८ जानेवारी २०२० ते ३ फ़ेबृवारी २०२० या काळात शुक्र कुंभ या मित्र राशीत असणार आहे. हे दोन्ही कालावधी आपल्यासाठी उत्तम असतील. ज्यांच्या दशमस्थानी जन्मकुंडली मधे शुक्र आहे त्यांना नोकरीत/ व्यवसायात काही कामे वेगाने हा्तावेगळी होताना दिसतील. काही कामांच्या बाबतीत संबंधीताकडे शब्द टाकायचा अवकाश मदतीचा हात पुढे येईल. याला अपवाद एकाच दिवसाचा असेल तो दिवस २७ जानेवारी २०२० आहे. ह्या दिवशी अनपेक्षीत गोंधळ काही कारणाने होऊन कामे नीट मार्गी लागणार नाहीत. या दिवशी आपण एखादे औषध नियमीत घेणे आवश्यक असेल तर चुकून घेतले नाही किंवा दोनदा घेतले असे घडू देऊ नका. या दोन्ही कारणाने जर दिवस खराब जाणार असेल तर याकडे लक्ष द्या.

३ फ़ेव्रुवारी २०२० नंतर वृषभ राशीला २८ फ़ेबृबारी २०२० पर्यंत विवीध लाभ सहज होताना दिसतील. आपण वैद्यकीय किंवा न्यायव्यवस्थे मधे म्हणजे जज किंवा वकील असाल तर अनुपम लाभ आपल्याला मिळतील.

कुटुंबातील लहान व्यक्तीला मोठे यश ३१ जानेवारी २०२० पर्यंत मिळणार असून परीणाम म्हणून एखादा सत्कार किंवा गुणगौरव ३१ जानेवारी नंतर होताना दिसेल. जे बुध्दीच्या क्षेत्रात काम करतात अश्या सीए, सॉफ़्टवेअर कोडींग इंजिनीयर्स यांना चांगले यश या महिन्यात मिळताना दिसेल.

हा महिना वृषभ राशीसाठी विशेष चांगला असेल.

मिथुन रास :

आपल्या राशीचा मालक बुध ३० जानेवारी पर्यंत मकर या अष्टमस्थानी असणार आहे. ३१ जानेवारीला बुध कुंभ राशीत गेल्यामुळे आपल्याला मनासारखे यश मिळायला लागेल. संवाद हा आपल्या स्वभावाचा मुख्य भाग आहे. जेंव्हा राशीचा स्वामी बलवान स्थानी जातो तेंव्हा अपेक्षीत शब्द सुचतात आणि संवाद उत्तम होऊन अपेक्षीत यश मिळते. लाभ मिळण्यासाठी अपेक्षीत संधी ८ जानेवारी २०२० नंतर चालून येतील. त्याचे मुल्यमापन करुन पुढे कसे जायचे याचा निर्णय घ्यावा लागेल.

विशेष बुध्दीमान लोकांच्या जन्मकुंडलीत बुध कुंभ राशीत असतो. कुंभ राशीत बुध गेला की त्याचे परीणाम उत्तम असतात. याचा परिणाम म्हणून मिथुन राशीचे लोक काही बुध्दीचातुर्याचा वापर करुन वेगळेपणा दाखवतील. कुणी संशोधन करतील तर कुणी उच्च पदवी घेण्यासाठी असलेला प्रबंध पुर्ण करतील ज्याचे विशेष कौतूक होईल.

 काहीना ८ जानेवारी पर्यंत खुप प्रसिध्दी मिळण्याचे योग या ना त्या कारणाने येतील.

आपली मुले जर कलाकार असतील तर त्यांनाही सुरवातीला अपेक्षीत प्लॅटफ़ॉर्म मिळेल आणि नंतर ३ जानेवारी २०२० नंतर यश मिळेल. सन्मान मिळेल.

जे प्रेमात पडले आहेत त्यांना २७ जानेवारीला खास अनुभव येतील. २७ जानेवारीला असे प्रेमीजन भेटले तर ती भेट लक्षात राहील असे काही नक्कीच घडेल. ज्यांनी अजून प्रेम व्यक्तच केले नाही ते कोणाच्या तरी प्रेमात पडले आहेत असा साक्षात्कार त्यांना या दिवशी येऊ शकेल. ज्यांचे वय प्रेमात पडायचे नाही अश्यांना सुध्दा गुड्डी सिनेमा सारखे इन्फ़ॅच्युएशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हा महिना काही अडचणी घेऊन येणार आहे. बहिणभावाचे बिघडलेले आरोग्य चिंता निर्माण करण्याची शक्यता काही मिथुन राशीच्या लोकांना सतावेल. याशिवाय स्वत:चे आरोग्य नियंत्रणात ठेवावे लागणार आहे. खास करुन १६ जानेवारी २०२० ते ३१ जानेवारी हा काळ काहींना आरोग्याच्या दृष्टीने सतावेल. आरोग्य बिघाड होत आहे असे वाटले तर योग्य काळजी वेळेत घेतली तर हा महिना सुध्दा ठिक जाईल.


No comments:

Post a Comment