दोन समकालीन महिला, दोघींनीही सार्वभौम प्रजासत्ताक देशाचे दीर्घकाल सर्वोच्च पद भूषविलेले, कणखर नेतृत्व म्हणून नावाजलेल्या, धाडशी निर्णय घेणाऱ्या, धडाडीच्या, दोघींनाही पहिल्या महिला पंतप्रधान असल्याचा मान मिळालेला व दोघींचीही कारकीर्द वादग्रस्त असलेली. दोघींनाही आयर्न लेडीचा किताब मिळालेला. श्रीमती थॅचर यांच्या आधी श्रीमती गांधी यांना भारताची आयर्न लेडी म्हणून ख्याती प्राप्त झाली. ब्रिटनच्या ईतिहासात प्रथमच एक महिला राजकीय पक्षाची अध्यक्षा झाली होती. दोघींच्याही कार्यकालात युध्द झालेले व त्यातूनही त्यांची राजकीय कारकीर्द उजळून फायदा झालेला
यात एक मजेची गोष्ट अशी कि दोघींनीही आर्थिक सुधारणेसाठी धाडशी निर्णय घेवून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करून राष्ट्र उध्दाराचे काम केले, पण त्यांच्या धोरणात टोकाचे धृवांतर होते. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीयकरणाचे धोरण राबवले (बँक, विमा इ.) तर इंग्लंडच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी खाजगीकरणाचे धोरण राबवले. आर्थिक विकेंद्रिकरण, सरकारी उद्योगांचे खासगिकरण, कामगार संघटनांचे खच्चिकरण या गोष्टिंच्या त्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या.

१९७०च्या दशकात ब्रिटनची अर्थव्यवस्था काहीशी खिळखिळी झाली होती. जगावर राज्य करणाऱ्या देशावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे कर्ज मागण्याची वेळ आली होती. आपल्या गरिबीसाठी गरीबच जबाबदार आहेत कारण त्यांची काम करायचीच इच्छा नाही, असे त्यांचे विचार होते. शिक्षण मंत्री असतांना त्यांनी शाळेत मुलांना दिले जाणारे दुध बंद करण्याचा निर्णय घेतला. महागाईवर मात करण्यासाठी अर्थव्यवस्थेतील चलनपुरवठा कमी करण्याचे तसेच सरकारी खर्च कमी करण्याचे त्यांनी धोरण स्वीकारले. श्रीमती गांधी यांनीही घटनेची पायमल्ली करून संस्थानिकांची वेतने बंद केली, नोटबंदी केली पण निदान निवडणुकी पुरता का होईना त्यांनी “गरिबी हटावचा” नारादिला. यांचे तुलनात्मक स्वरूपाचे प्रार्थमिक विश्लेषण बघुयात.
श्रीमती मार्गारेट थॅचर
श्रीमती इंदिरा गांधी
श्रीमती मार्गारेट थॅचर
श्रीमती इंदिरा गांधी श्रीमती
मार्गारेट
थॅचर
श्रीमती थॅचर यांच्या कुंडलीत योगकारक
शनी लग्नी शश योगात, रवी बुध वर्गोत्तम, गुरु स्वगृही, व्यय लग्न व्दितीयात
मालायोग, दशमात छत्रदाता राहू व दशमेश लाभात असे ग्रहबल आहे. तर श्रीमती गांधी
यांच्या कुंडलीचे वैशिष्टे म्हणजे तब्बल तीन अन्योन्य योग आहेत. लग्नेश सप्तमेश,
व्दितीयेश पंचमेश, षष्ठेश लाभेश असे तीन अन्योन्ययोग आहेत. दोन्ही कुंडलीत भाग्येश
वर्गोत्तम असून श्रीमती गांधींच्या कुंडलीत लग्नाच्या शुभयोगात व लाग्नेशावर
त्याची दृष्टी आहे तर श्रीमती थॅचर यांच्या कुंडलीत तो लग्नात आहे. श्रीमती थॅचर यांचा सिहेचा चंद्र
असल्याने त्यांना रुलिंग पावर मिळाली तर केतूच्या नक्षत्रात असल्याने कठोरता आली.
श्रीमती गांधीच्या चंद्रा कडे मात्र या गोष्टी कुठून बऱ्या आल्या? (तसे कर्क लग्न हि राजराशी आहे.) कारण त्यांचा चंद्र पूर्णपणे शनीच्या प्रभावा खाली आहे. तो मकरेत कुंभ नवमांशी शनीच्या सप्तम दृष्टीत आहे. धूर्तता, कावेबाजपणा, धोरणीपणा, हव्यास असे गुण तो दर्शवितो पण आक्रमकता? श्रीमती गांधीयांचा चंद्र रविच्या नक्षत्रात आहे. सिंहासनाला धोका निर्माण झाल्यावर आणीबाणी लागू करणे या शनी प्रभावित चंद्राशी सुसंगत आहे. तीच गोष्ट श्रीमती थॅचर यांची त्यांना एकदा आर्थिक विकास व युद्धाने तारले पण दुसऱ्यांदा जेव्हा असा प्रसंग आला तेव्हा केतूच्या गुणांना जागून राजीनामा देवून सत्तेपासून विभक्त झाल्या.

जाने.१९६६ मध्ये गुरु दशेत रवी भूक्तीत
साढेसातीच्या शेवटच्या चरणात श्रीमती गांधी पंतप्रधान झाल्या. वर्गोत्तम भाग्येश
वक्री गुरु लाभात तर रवी स्वनवामांशी असून गुरु रवी योगकारक मंगळाच्या केंद्रयोगात असल्याने दशाभूक्ती
राजयोगकारक झाली. दुसरे असे कि गुरूची पराक्रम स्थानावर दृष्टी आहे. १९७९ मध्ये
राहू दशेत शनी भूक्तीत साढेसातीच्या मधल्या चरणात श्रीमती थॅचर पंतप्रधान झाल्या. राहू
दशमात, स्वामी चंद्र लाभात तर योगकारक शश योगातील शनीची दाशमावर दृष्टी असल्याने दशाभूक्ती राजयोगकारक झाली. नोव्हें. १९९० मध्ये गुरु दशाभूक्तीत श्रीमती थॅचर यांनी राजीनामा दिल्याने स्वराशीत असूनही गुरूला
तृतीयस्थान रुचत नाही हे अधोरेखित झाले. तसेच शनी दृष्टीतील गुरूने त्याच्या
दशाभूक्तीत पराक्रमस्थानाचा नाश केला. १९७७ मध्ये शनी दशा केतू भूक्तीत सार्वत्रिक
निवडणुकीने श्रीमती गांधीचा राजमुगूट उतरवला. कर्क लग्नाला शनी मारक तर नीचेचा
केतू व्ययात. १९८४ मध्ये श्रीमती थॅचर व त्यांच्या मंत्रीमंडाळावर बॉम्ब हल्ला झाला, त्यात
५ ठार झाले पण श्रीमती
थॅचर जखमी होऊन बचावल्या.
मात्र श्रीमती गांधी तितक्या सुदैवी ठरल्या नाहीत. १९८४ मध्येच त्यांच्यावर
झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. श्रीमती गांधीचा अष्टमेश शनी लग्नी असून
घातपात, हिंसा यांचा कारक मंगळाची अष्टमावर दृष्टी आहे. गोचर शनी तेव्हा तुळेत
चतुर्थात होता, त्याची लग्नावर दृष्टी होती. शनी अष्टमेश, मारक आहे. तर त्याच वेळी
श्रीमती
थॅचर यांच्या लग्नातून शनीचे
भ्रमण होते. येथे शनि योगकारक आहे.
पं.
योगेश दैठणकर शास्त्री.
संपर्क
क्र. – ९३७०११२६५५
No comments:
Post a Comment