१३ फ़ेबृवारी ते १३ मार्च २०२० या महिन्याचे मकर, कुंभ आणि मीन राशीचे राशीभविष्य


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १३ फ़ेबृवारी २०२० ला कुंभ राशीत जाणार आहे
२८ फ़ेबृवारी २०२० ला शुक्र मेष राशीत जाणार आहे.
मार्च  २०२० ला प्लुटो मकर राशीत जाणार आहे. हा प्लुटो मकर राशीत १४ जून २०२० पर्यंत
असेल. १५ जुन २०२० ला प्लुटो पुन्हा वक्री गतीने धनु राशीत प्रवेश करतो.

थोडक्यात हा महिना १३ फ़ेबृवारी २०२० ला सुरु झाल्यावर शुक्र प्लुटो हे दोनच ग्रह राशीबदल करत आहेत.

ज्यांची मकर रास आणि उत्तराषाढा जन्मनक्षत्र असून दुसरे चरण आहे अशांना मार्च, एप्रिल मे २०२० हे महिने त्रासाचे असू शकतील.

प्लुटो जेंव्हा राशीबदल करतो तेंव्हा व्यक्तीच्या जीवनात फ़ार मोठे बदल घडतात असे नाही. परंतु असा राशीबदल एखाद्या मोठ्या घटनेची नांदी ठरणारा असतो. नोव्हेंबर १९८९ रोजी प्लुटो वृश्चिक राशीत गेला. या दिवशी जगाच्या इतिहासात दोन मोठ्या घटना घडल्या. दुसर्या महायुध्दाने झालेली जर्मनीची फ़ाळणी होऊन जर्मनीचे तुकडे करणारी बर्लीन भिंत याच दिवशी जमिनदोस्त झाली. याच दिवशी अयोध्येमधे पहिली कारसेवा होऊन श्रीराम मंदीराचा शिलान्यास झाला. या दोन घटनांनी जगाला इतिहासात नोंद घ्यायला लावली.

श्रीराममंदीर शिलान्यासाने, १९८४ साली ५४२ पैकी फ़क्त दोन जागा जिंकलेल्या भाजपने पुन्हा मुसंडी मारुन ८९ जागा जिंकल्या आणि नोव्हेंबर १९८९ महिना अखेरीस असलेल्या निवडणुकांच्या मधे १९८४ साली ४०० पेक्षा जास्त जागा आलेल्या कॉंग्रेसचा पराभव केला. श्रीराममंदीर निर्माण हा मुद्दा भाजपच्या निवडणुक जाहीरनाम्या मधे महत्वाचा मुद्दा झाला. पुढचा इतिहास ताजा आहे.

मार्च २०२० आणि जानेवारी २०२१ आणि ३० अक्टोंबर २०२१ रोजी एकदा वक्री होऊन पुन्हा मार्गी होऊन प्लुटो मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर ही भारताची रास आहे त्यामुळे या तिनही दिवशी काय घडेल याचा आढावा त्या त्या महिन्यात घेईन. श्रीराममंदीर शिलान्यासासारखी एखादी घटना घडण्याचे संकेत याच महिन्यात धनु राशीत होणारी मंगळ- गुरु युती देत आहे. राजकीय आंदोलनांनी ह्या दरम्यानचा काळ पुन्हा ढवळून निघणार आहे. मार्चला होणारी रवि नेपच्युन अंशात्मक युती, तिथीचा क्षय होत असल्यामुळे क्षयदिन तसेच आश्लेषा या उग्र नक्षत्रामधील चंद्र काही घडण्याची नांदी देत आहे. या दिवशी ही घटना फ़क्त नांदी असेल. याच महिन्यात २२ मार्च ला होणारी मंगळ प्लुटो युती आणि त्या आधी २० मार्च ला होणारी मंगळ गुरु युती मात्र काही जबरदस्त घटना घडवतील.

आता पाहू या या महिन्याचे राशीनिहाय राशीभविष्य, मकर , कुंभ  आणि मीन राशींच्या साठी. हे राशी भविष्य आपण लग्नराशीकडून पहा हे सांगायला नको. जर लग्नराशी माहित नसेल तर मात्र चंद्र राशीकडून हे राशी भविष्य अनुभवा.

विवाहाला उशीर होत आहे ? त्यावरील उपाय

मकर रास:

आपल्या राशीच्या लोकांना मागील महिन्यापासून शनि बदल झाल्यामुळे काही सुक्ष्म बदल अनुभवास येत असतील. हे बदल सध्याच्या प्रतिकूल काळात पेशन्स कसा टिकवून धरायचा याचे वस्तुपाठ देणारे असतील. कारण व्ययेश व्यय स्थानी तसेच लाभेश सुध्दा व्यय स्थानी असल्यामुळे खर्च, मनस्ताप, प्रवास याने जीव मेटाकुटीस येईल. फ़क्त मकर राशीचे लोकच अश्या प्रतिकूल वातावरणात तग धरतात असा अनुभव इतर राशीच्या लोकांना या महिन्यात येईल. २६ फ़ेबृवारीच्या आसपास ही प्रतिकुलता खुप जात असेल. यानंतर मात्र कमी होईल.

आपल्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत या साठी आपण जागरुक असता. आपण शब्दही जपुन वापरता यामुळे इतरांना शब्द धरुन गैरसमज होण्याची किंवा आपल्यावर आरोप करण्याची संधी आपण देत नाही. या महिन्यात दात आणि तोंडाचे आरोग्य जपावे लागेल असे ग्रहमान आहे.

आपल्याला सरकार कडून कुठल्याही प्रकारचे येणे असेल जसे शेतकर्यांना कर्जमाफ़ीचे पत्र असेल किंवा मानधन असेल किंवा पुरस्काराकरता रक्कम येणे असेल तर या महिन्यात अश्या रकमेचा लाभ नक्कीच होईल. या महिन्यात एखादी विमा पॉलीसी संपणार असेल तर शेवटी मिळणारा बोनस हा अनपेक्षीत रित्या खुपच असेल हाच काय तो खर्च, मनस्ताप या पार्श्वभुमीवर एखादा सुखद क्षण असेल.

कुंभ रास :

आपल्या राशीचा मालक जरी व्यय स्थानी असला तरी लाभेश गुरु वर्षभर लाभस्थानी असल्यामुळे फ़ारशी चिंता असणार नाही. या महिन्यात आपल्याला आपल्या वैवाहीक जोडीदाराकडून मह्त्वाचे काही सल्ले सहजपणे मिळतील. सहज सल्ले फ़क्त तुमच्या राशीचे लोक लक्षात ठेवतात आणि गोंधळात पडतात. यामुळे सहज आलेला सल्ला किती महत्वाचा आहे याकडे लक्ष द्या. आपल्या जोडीदाराने दिलेला सल्ला जास्त महत्वाचा हे लक्षात ठेवलेत तर जास्त चांगले असेल.

या महिन्यात लाभस्थानी असलेला मंगळ दशमेश असल्यामुळे आपण करत असलेल्या कृतीचे कौतूक होणे, याची नोंद ठेवली जाणे जेणेकरुन पगारवाढ मिळताना याचा उपयोग होईल असे घडताना काही लोकांना दिसेल. आपण करत असलेले लिखाण सुध्दा आपल्याला काही फ़ायदा सहजपणे देऊन जाईल.

मीनेचा शुक्र कुटूंब स्थानी असल्यामुळे स्त्री नातेवाईकांचे येणे जाणे, घरातील स्त्रीवर्गाकडून सुखद अनुभव येणे घडेल. जलराशीतला शुक सामान्य माणसांना त्यांच्या आवडीचे पेयपान तर पेयपानाची विशेष आवड असलेल्या तळीरामांना उच्ची पेयपानाचा लाभ देईल. शुक्राचा अंमल चटकदार अन्न पदार्थांवर विशेष असतो. पाणीपुरी हा जलराशीतल्या शुक्राच्या अंमलाखाली पदार्थ येतो. अनेकांना उत्तम पाणीपुरी कुठे मिळते याचा शोध लागेल आणि खिशात इतके पैसे असतील की अनेकांना बरोबर घेऊन तुम्ही याचा आस्वाद घ्याल.


मीन रास:

आपल्या राशीचा मालक दशमात असल्यामुळे नोव्हेंबर २०१९ पासून आपले काम वाढेल अर्थातच उत्पन्न सुध्दा, याचा अनुभव आपल्याला येऊ लागला असेल. अनेकांना बरोबर घेऊन काम मार्गी लावायचे कसब आता आपल्याला येईल त्यामुळे अशी खुप कामे तुम्ही मार्गी लावाल. दशमस्थानी असलेला मंगळ या कामांना वेग देईल यामुळे घाबरुन जाता हे कौशल्य सुध्दा शिका. वेगाने निर्णय घ्यायला लागा.

या महिन्यात बुध आणि रवि कुंभ राशीत असल्यामुळे ग्रहमान थोडेसे प्रतिकूल असल्यामुळे काही कामात खर्च वाढेल किंवा अडथळे येतील. क्वचित आपले आरोग्य नीट नसल्यामुळे समोर काम असूनही आपल्याला पुर्ण करता येणार नाही पण यासाठी एखादे काम दुसर्यावर सोपवून त्यावर नियंत्रण ठेवलेत तर ही सुध्दा कला आपण शिकाल.

या महिन्यात मीनेचा शुक्र आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडवेल. आपण स्त्री असाल की पुरुष आपल्या वर्तनाने अनेकांच्या मनात जागा निर्माण होते आहे असा अनुभव आपल्याला या महिन्यात २८ तारखेपर्यंत येताना दिसेल. २८ तारखे नंतर धनस्थानी जाणारा शुक्र आपल्याला सहजपणे काही धन लाभ देऊन जाईल. या महिन्यात थोडेसे प्रतिकुल ग्रहमान असले तरी निरशाजनक नक्कीच नाही

शुभंभवतु



ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर यांचे whatsapp वर मार्गदर्शन मिळण्यासाठी हे वाचा.

No comments:

Post a Comment