नमस्कार ! हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १४- १५- १६- तारखेला रवि
अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास
बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या
रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.
या महिन्यात रवि अर्थात सुर्य १४ मार्च २०२० ला मीन राशीत
जाणार आहे
२२ मार्च २०२० ला मंगळ मकर या स्वत:च्या उच्च राशीत जाणार
आहे.
२८ मार्च २०२० ला शुक्र वृषभ या स्वत:च्या राशीत जाणार
आहे.
२९ मार्च २०२० ला गुरु मकर राशीत काही महिन्यांकरिता जाऊन
परत जुन २०२० मधे धनु राशीत येणार आहे.
७ एप्रिल २०२० ला बुध मीन या बलहीन राशीत जाणार आहे.
थोडक्यात हा महिना १४ मार्च २०२० ला सुरु झाल्यावर
मंगळ, शुक्र, गुरु आणि बुध हे चार ग्रह राशीबदल करणार आहेत.
याच महिन्यात २२ मार्च ला होणारी मंगळ प्लुटो युती आणि
त्या आधी २० मार्च ला होणारी मंगळ गुरु युती मात्र काही जबरदस्त घटना घडवतील असे भाकीत
मी मागील महिन्यात केले आहे. मंगळ आणि गुरु राजकीय आंदोलने घडवितात. सीएए आणि सीएबी
ला असणारा विरोध या काळात पुन्हा उफ़ाळून आला तर आश्चर्य वाटू नये. मंगळ आणि प्लुटो
एखादी वेगळी घटना घडवेल. ही नेमकी कुठे घडेल हे पहाणे मेदीनीय तज्ञ लोकांना जास्त समजेल.
या महिन्यात मकर राशीत जाणारा मंगळ घरबांधणी उद्योगाला
चालना देईल त्यामुळे बिल्डर लोक खुष होतील. वृषभ राशीत जाणारा शुक्र सौंदर्य प्रसाधने,
कपडे यांचे व्यापारात तेजी आणेल. गुरु मकर राशीत असताना फ़ार काही घडेल असे नाही. बुध
मीन राशीत असताना शेअर्स मार्केट वर येणे जरा कठीणच दिसत आहे.
३१ मार्च २०२० ला
पाय दुखी गुडघे दुखी असणार्यांना जास्त त्रास संभवतो.. २ एप्रिल २०२० ला गर्भवती स्त्रीयांनी काळजी
घ्यावी. ४ एप्रिल च्या
आसपास कागदपत्रे पाहूनच
सह्या करा असे सांगणे
आहे.
आता पाहू या या महिन्याचे राशीनिहाय राशीभविष्य, मेष वृषभ आणि मिथुन राशींच्या साठी. हे राशी
भविष्य आपण लग्नराशीकडून पहा हे सांगायला नको. जर लग्नराशी
माहित नसेल तर मात्र चंद्र राशीकडून हे राशी भविष्य अनुभवा.
मेष रास :
आपल्या
राशीचा मालक मंगळ महिन्याच्या सुरवातीलाच म्हणजे २२ मार्चला मकर राशीत जाणार आहे. ज्यांच्या
मुळ जन्मकुंडलीत मकरेचा मंगळ आहे अश्या पोलीस, मिलीट्री किंवा सिक्युरीटी सर्व्हिसेस च्या लोकांना पुढील दोन महिने
सुट्टी मिळणार नाही. भरपुर धावपळ आणि अचानक घडणार्या घटना अपेक्षित आहेत यामुळे तुमच्या
शारिरीक, मानसीक तसेच बौध्दीक क्षमतेचा कस लागणार आहे. तुमचे वरिष्ठ तुम्हाला नेमके
मार्गदर्शन करणार नाहीत त्यामुळे अडचणी वाढतील. या दृष्टीने ३१ मार्चच्या आसपासचे दिवस
परिक्षा आहे असे समजा.
मुलांच्या
प्रगतीची तसेच मुले प्रवासात असताना चिंता लागेल. कुटुंबात उन्हाळी सुट्टीमुळे नातेवाईक
स्नेही यांचे जाणे येणे वाढले असले तरी तुम्हाला त्यात भाग घेता येणार नाही याचे वैषम्य
वाटेल. महिना अखेरीस काही रोमॅंटीक क्षण तुम्हाला विरंगुळा देऊन जातील. विवाह व्हावा
असे वाटणार्या उपवर मुलांचे विवाह ठरतील असेही योग या महिन्यात आहेत.
४ एप्रिलच्या
आसपास आपण कागदपत्रांच्या वर गफ़लतीने सह्या करुन फ़सवले तर जाणार नाहीना किंवा चुकीच्या
कागदपत्रांच्या वर सह्या करुन आपल्या हाताखालचे लोक आपल्याला अडचणीत आणणार नाहीत ना
हे पहाणे गरजेचे ठरेल.
इतकी सारी काळजी घेतलीत तर व्यस्त असलेला महिना त्रासदायक ठरणार नाही.
वृषभ
रास :
आठवा
गुरु या महिन्यात नववा होत असल्यामुळे अनेकांना ज्यांना सतत निर्णय घ्यावे लागतात किंवा
लोकांच्या कडून काम करुन घ्यावे लागते त्यांना जरा काम करणे सोपे होईल.
आपल्या
राशीचा मालक शुक्र २८ मार्च २०२० पर्यंत मेष राशीत आणि बारावा असल्यामुळे कोणतिही गोष्ट
घडवून आणताना जरा जास्त प्रयत्न करावे लागतील. पण प्रयत्न दुप्पट असल्यास यश मिळेल.
काही आरोग्याच्या संदर्भात बिघाड असेल तर २८ मार्च नंतर हळू हळू आराम पडेल. महिनाभर
नोकरी/व्यवसायाच्या निमीत्ताने प्रवास करताना प्रवास सुखाचा होईल. खासकरुन सरकारी वहानाने
प्रवास करणार्यांना अनुभव येईल. बसेस, ट्रेन वेळेवर असतील. प्रवासात बसायची संधी मिळेल.
वैवाहीक
जोडीदाराबरोबर किंवा व्यवसायात पार्टनर बरोबर संघर्ष सुरु असेल तर २२ मार्च नंतर वातावरण
बदलेल. तुमच्या व्यवहारी वागण्याने आणि मिठ्ठास वाणीने तुम्ही परिस्थिती नियंत्रणात
ठेवली असली तरी, २२ मार्च नंतर परिस्थिती सुधारणार आहे.
विद्यार्थी
असाल आणि परिक्षा सुरु असेल तर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असलेले पेपर्स
पुन्हा पुन्हा चेक करा.
इतके लक्षात ठेवले तर हा महिना तुम्हाला चांगलाच जाईल.
मिथुन
रास :
या महिन्यात राशीचा मालक कुंभ राशीत ७ एप्रिल पर्यंत असल्यामुळे आणि तुमच्या भाग्यस्थानी असल्यामुळे तुम्हाला तुमच्या पध्दतीने यश मिळेल. वापरणारे शब्द, तयार केलेले कागद यात ३-४-५ एप्रिलला गफ़लत होणार नाही असे पाहिले तर सबकुछ ऑलवेल असेल.
या महिन्यात राशीचा मालक कुंभ राशीत ७ एप्रिल पर्यंत असल्यामुळे आणि तुमच्या भाग्यस्थानी असल्यामुळे तुम्हाला तुमच्या पध्दतीने यश मिळेल. वापरणारे शब्द, तयार केलेले कागद यात ३-४-५ एप्रिलला गफ़लत होणार नाही असे पाहिले तर सबकुछ ऑलवेल असेल.
७ एप्रिल
नंतर मात्र राशीचा मालक बलहीन राशीत असल्यामुळे अनेक अधिकारी लोकांना सुध्दा अधिकार
असुन नाईलाजास्तव सहन करावे लागणार आहे. कृती करताना असंख्य अडथळे जाणवतील.
मार्च
महिन्याच्या सुरवातीपासून डॉक्टर्स मंडळीना, वकील मंडळींना कामाचा ताण जाणवेल. पण तुमच्या
कामात यश मिळणार आहे. या महिन्यात घरच्या मंडळींशी थोडा विसंवाद होण्याची शक्यता आहे.
कुणाकडून
काही येणे पैसे असतील तर २८ मार्च पुर्वी तगादा करुन मागून घ्या. नंतर मात्र उशीर होईल.
महिन्याच्या उत्तरार्धात प्रवासाचे योग येतील. या निमीत्ताने खर्च ही वाढणार आहे.
हा महिना
तुमच्या साठी चांगलाच असेल.
No comments:
Post a Comment