प्रदोष व्रत

साडेसातीत मनाला सर्वात जास्त कष्ट किंवा क्लेश होतात. याचे कारण चंद्र मनाचा कारक आहे. मन हे स्वच्छ पाण्यासारखे असते.

पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाए वैसा असे हिंदी शब्द फ़ार प्रचलीत आहेत. मनाला सुखाचा स्पर्श झाला की सुखावते आणि दु:खाचा स्पर्श झाला की दु:खी होते. फ़क्त योगी विवेकाने मनाला सुखी आणि दु:खी होण्यापासून दुर ठेऊ शकतात. आपण योगसुत्रे हा पतंजली महामुनी रचीत ग्रंथाचे मराठी भाषांतर वाचले तर मन, आत्मा, चित्त ,बुध्दी, विवेक याचा अर्थ विचारांची दिशा यांचे वेगवेगळे अस्तीत्व समजून सांगीतले आहे. कोणा जीवलगाचा मृत्यु झाला की सामान्य माणूस शोक करतो परंतु योगी विचार करतो आणि म्हणतो अरे हे तर घडणार होते. जो जन्माला आला त्याला मृत्यु तर आहेच. शिवाय कोणी आधी मरावे याला काही नियम नाही. मग शोक कशाचा करायचा ?

श्रीमहादेव तर महायोगी आहेत. त्यांची पुजा अर्चना केल्याने मनाला स्थिरता येते. साडेसातीत अनेकदा आपले जवळच्या नातेवाईकांच्या मुळे दु:ख प्राप्त होते. वास्तवीक आपण केलेल्या कर्माची फ़ळे शनि देत असतो. आपण मात्र दोष शनिला किंवा संबंधीत व्यक्तीला देतो.अश्या नातेवाईक कारण वाटणार्या दु:खाला सुध्दा सामोरे जाताना प्रदोष व्रत करावे. याच अंकात ज्यांचा चंद्र बिघडला आहे म्हणजे जन्मकुंडलीत चंद्राच्या अशुभ योगात शनि असल्यामुळे जेंव्हा मनाला कायमच दु:ख होते तेंव्हा हे व्रत आयुष्यभर करावे.

आता हे व्रत कसे करायचे ते पाहू

दर महिन्याच्या दोन एकादशी नंतर दुसर्या किंवा तिसर्या दिवशी प्रदोष संध्याकाळी असतो. प्रदोष ज्या दिवशी संध्याकाळी शिवआराधन करावे.

हा दिवस कालनिर्णय मधे असतो तो पाहून या दिवशी आपल्याला संध्याकाळ मोकळी मिळेल या पध्दतीने आखावा. नोकरीच्या ठिकाणी महिन्याचे हे दोन दिवस संध्याकाळी वेळेवर घरी जाणार त्यामुले  आपण उपलब्ध असणार नाही हे आधीच सांगावे.

प्रदोष दिवशी संध्याकाळी शक्यतो प्राचिन शिवमंदीरात जावे. जाताना घरुन पाणी, थोडे दुध बाटलीत न्यावे, पांढरी फ़ुले तसेच बेलपान न्यावे. मंदिरात सर्वप्रथम पिंडीवर पाणी वहावे. नंतर दुध ( एक पळी/चमचा इतकेच ) नंतर पुन्हा पाणी वहावे. त्यानंतर शक्य असेल तर १०८ बेल पत्रे वहावित प्रत्येक वेळी बेलपत्र वहाताना ओम नम:शिवाय चा जप करावा. नंतर पांढरी फ़ुले वाहून प्रसाद अर्पण करावा ( प्रसादाला पांढरे पेढे/साखरफ़ुटाणे ) यासारखा पदार्थ घेऊन जावा.  ( १०८ बेल पत्रे नसतील तरी १०८ वेळा ओम नम:शिवाय जप करावा )

या नंतर शंकराची आरती करावी. आरती साठी तुपाचे निरांजन घरुन न्यावे.

अनेकदा संध्याकाळी शिवमंदीरात प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी पुजा बांधली जाते. याचा अर्थ शिवपिंडीवर भोलेनाथाचा पितळी मुखवटा ठेवला जातो. यावर फ़ुलांची आरास करतात. अश्यावेळी पिंडीवर दुध, पाणी हा अभिषेक करता येत नाही. अश्यावेळी मंदीराच्या बाहेर एखादी शिवपींड असते त्यावर हे वहावे आणि वर लिहील्याप्रमाणे पुजा करावी.

या प्रमाणे साडेसातीत जर जास्त त्रास होत असेल तर दर महिन्याला दोन या प्रमाणे संपुर्ण साडेसाती मधे प्रदोष पुजा करावी किंवा जास्त त्रास होताना करावी. तसेच जर नात्यांमधे संघर्ष होत असेल तर ११ किंवा २१ प्रदोष करावेत.


No comments:

Post a Comment