डिसेंबर २०२० महिन्यात मिळालेले दोन प्रतिसाद

 २० मे २०२० ला एका पुरुष व्यक्तीला विवाह आणि नोकरी साठी दोन उपाय सुचवले होते. कालच त्यांचा नोकरी मिळाली असा मेसेज आला. नोकरी कधी मिळाली याच उलगडा त्यांनी केला नाही पण आता परमनंट करतील का असा प्रश्न त्यांनी केला आहे.


काही अत्यंत साध्या उपायाने नोकरी मिळणे किंवा असलेल्या नोकरी मधे स्थिरता येणे शक्य होते. अत्यंत निष्ठा प्रत्येक उपाय करता हवी


यांच्या जन्मकुंडलीमधे विवाहयोग कठीण आहे. ते उपाय करतील आणि त्यांचा विवाह जमेल अशी आशा आहे. कारण अनेकदा नोकरी नाही म्हणुन विवाह नाही असे होत असते.


दुसरा प्रतिसाद


या शिवाय मुंबई मधील एका विवाह इच्छुक मुलाच्या मातेने ३ जुन २०२० ला मुलाच्या विवाहासाठी सल्ला मागीतला. त्यांनी उपाय ही केले. विवाह ठरला व १६ नोव्हेंबर २०२० ला झाला सुध्दा . या मातेने दिलेली प्रतिक्रिया खालील प्रमाणे.


नमस्कार सर, आपण  माझ्या मुलाचा विवाहयोग जुळुन येण्यासाठी मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे कुलदैवतेला नारळ अर्पण केला, हळकुन्ड उपाय , श्री गजानन पारायण व आपण पत्रिकेप्रमाणे काही उपाय सांगितले होते ते केले आणि त्याचा विवाहयोग जुळून आला व १६.११.२०२० रोजी त्याचा विवाह संपन्न झाला. आवर्जून सांगावेसे वाटते की मुलगी आपण वर्णन केल्याप्रमाणे आहे. खूप खूप धन्यवाद सर.  आधी २७.११.२०२० विवाह करण्याचे ठरले होते परंतू सुयोगचे आजोबा ९.११.२०२० सकाळी घरात पडले व डोक्याला मार लागला आणि ते बेशुध्द झाले नंतर शस्त्रक्रिया केली आता त्याची प्रकृती सुधारते आहे म्हणून आम्ही विवाह आधी करुन घेतला . परत एकदा आभार सर.


विवाह जमण्यासाठी न कंटाळता विवाह इच्छुक मुलाने/मुलीने व त्यांच्या पालकांनी अनेकदा दोन-तीन उपाय करणे आवश्यक असते. 

No comments:

Post a Comment