स्थान हानी करोती जीव: ?

पुर्वाचार्यांनी असे एक लाख संस्कृत श्रोक ज्योतिष शास्त्रामधे लिहले आहेत आणि त्यांना आलेले अनुभव श्लोकांच्या माध्यमातून आपल्या पिढीला अभ्यासासाठी दिले आहेत. हे त्यांचे ज्योतिषशास्त्र अभ्यासकांवर तसेच त्यांचे मार्गदर्शन होत असलेल्या समाजावर उपकारच आहेत. कोणीतरी शास्त्रज्ञ असा काही शोध लावतो ज्याने मानव जातीवर उपकार होतात. जसे लुई पाश्चर याने लस अर्थात ( Vaccine ) चा शोध लावून जसे मानव जाती वर उपकार केले आहेत तद्वत भारतीय अनेक पुर्वाचार्यांनी ज्योतिष विषयक जे सिध्दांत लिहले आहेत त्याची संख्या एक लाख आहे.

अलॊपथी ला पर्यायी आयुर्वेद, होमीओपथी, युनानी अश्या अनेक शाखा आहेत. मुख्य म्हणजे या शाखा व त्यातील खास करुन आयुर्वेद १००% पर्यायी शाखा आहे. होमीओपॅथी किंवा युनानी यावर मी जास्त बोलणार नाही कारण माझा अभ्यास नाही.

परंतु मानवी जीवनाचा वेध घेऊन व्यक्ती जन्माला आल्यापासून त्याच्या मागील जन्माचा वेध ( नाडी गंथ ) पासून त्याचा मृत्यु कसा कोठे कधी होईल याबाबतचे मार्गदर्शन ज्योतिषशास्त्र करते आणि याला पर्यायी शास्त्र नाही. हस्तसामुद्रीक सुध्दा संपुर्ण पर्याय नाही. कारण मुल जन्माला आल्यावर त्याच्या हातवर काही रेषा विकसीत झालेल्या नसतात त्यामुळे पन्नासाव्या वर्षी काय घडेल याचे भाकीत मुल जन्माला आल्यावर करणे शक्य नाही.

याउलट जन्मवेळ जर बरोबर नोंदवली असेल तर जन्मकुंडली माध्यमातून व्यक्तीचे संपुर्ण आयुष्याबाबत मार्गदर्शन करता येते हे विधान माझे नाही तर जगप्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ कै. भा.नी. पुरंदरे यांनी आपल्या शल्यकौशल्य ह्या आत्मचरित्रामधे केलेले आहे. मी ज्योतिष अभ्यास या आत्मचरित्र वाचून करु लागलो. जन्मवेळ काय घ्यावी याबाबत चे ठाम मत कै. भा.नि.पुरंदरे यांनी याच आत्मचत्रित्रामधे लिहले आहे. हा विषय एका स्वतंत्र लेखाचा होईल. मी यावर युट्युब मधे व्हिडीओ प्रसिध्द केलेली आहे. जिज्ञासूंनी जरुर पहावी.

आजच्या लेखाचा मुद्दा आहे की जे काही एक लाख श्लोक ज्योतिष विषयावर उपलब्ध आहेत त्या सर्व श्लोकांचे अध्ययन करणे आवश्यक आहे. एक व्यक्ती उभ्या आयुष्यात हे करु शकणार नाही. पण एखादा समुह तयार झाला तर मात्र हे शक्य आहे. कारण अभ्यास करताना माला काही सिध्दांत काही विशीष्ठ परिस्थितीत अनुभवाला येतच नाहीत असे मला जाणवते. काही सिध्दांत मुलभुत रित्या नीट मांडले गेलेले नाहीत असेही जाणवते.

उदाहरणार्थ आपण एक श्लोक घेऊ या.  " स्थान हानी करोती जीव:" असा हा श्लोक आहे.

याचा सरळ अर्थ घेतला तर ज्या स्थानी गुरु असतो त्या स्थानाची हानी करतो असा अर्थ अनेकजण काढतात. पुढे जाऊन गुरुचे त्या स्थानी शुभ फ़ळ मिळत नाही पण त्याची दृष्टी शुभ असते असा अर्थ अनेक ज्योतिषी सांगतात. अर्थात गुरुची दृष्टी वाढ करणारी असते किंवा शुभ असते यावर दुमत नाही.

इंटरनेट वर सर्च केले तर अशी नाना मतांतरे आपल्याला हिंदी भाषीक ज्योतिषी किंवा मराठी भाषीक ज्योतिषी करतात. त्यांची साधना किंवा अनुभव लक्षात घेता त्यांच्या विषयी आदरभाव व्यक्त करुन ह्यावर पुन्हा विचारार्थ मी मला उमगलेला अर्थ मी समोर मांडत आहे. यावर चर्चा व्हावी आणि मला जे वाटते ते चुकीचे ठरले तरी आनंदच होईल.

अनेकांनी हा श्लोक अर्धाच अभ्यासला आहे. याचे कारण मुळ श्लोक असा आहे.

' शनिक्षेत्रगतो जीवो  जीवक्षेत्रगतः शनिः।
स्थानहानि करो जीवः स्थानः वृद्धि करः शनिः।। ''

अनेक संस्कृत व ज्योतिष न शिकलेल्या वाचकांसाठी इंग्रजी अर्थ ( Transposition ) असा आहे.  जर शनिच्या राशीत गुरु आणि गुरुच्या राशीत गेला तर गुरुचे कारकत्व ( गुण ) शनि प्रमाणे होते तर शनिचे गुरुप्रमाणे असा अर्थ ह्या श्लोकाचा घ्यायचा.

ह्या श्लोकाचा अर्थ पाहिला तर असे दिसते की स्थान हानी करोती जीव: अर्थात ज्या स्थानी गुरु असतो त्या स्थानाची हानी करतो ह्यासाठी सिध्दांत करणारे पुर्वाचार्य यांनी एक कंडीशन सांगीतली आहेत.

ही कंडीशन अशी - शनिच्या राशीत जेंव्हा गुरु असतो आणि गुरुच्या राशीत जेंव्हा शनि असतो तेंव्हाच
१) शनि जो नेहमी वृध्दी करत नाही तो त्या स्थानाची वृध्दी करतो.
२) गुरु त्या स्थानची हानी करतो

या श्लोकाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपण पुन्हा या कंडीशन एखादी जन्मकुंडली माध्यमातून पाहू


समजा शनि धनु किंवा मीन राशीत आहे आणि गुरु मकर किंवा कुंभ राशीत आहे तेंव्हा तो मकर किंवा कुंभ राशी ज्या स्थानी असतील त्याची हानी करेल असा अर्थ ह्या श्लोकातुन निघतो. याचा अर्थ सरसकट कोणत्याही स्थानी असलेला गुरु त्या स्थानाची हानी करत नाही असा होतो.

ह्या संपुर्ण  श्लोका मधे एक मुलभूत गडबड आहे. ज्या ग्रंथात हा श्लोक आहे तो ग्रंथ मिळाला तर कदाचीत माझे विधान मला मागे घ्यावे लागेल. मी यात गडबड आहे अश्यासाठी म्हणतो की एखाद्या स्थानाची फ़ळे आपण कशी पहातो ?

१) त्या स्थानाचा भावेश कोण आहे आणि त्याची स्थिती कशी आहे.
२) त्या स्थानाच्या माध्यमातून आपण कशाचा विचार करतो त्याचा कारक ग्रह

उदा. वैवाहीक सौख्याचा विचार करताना सप्तमेश आणि कारक ग्रह म्हणून शुक्राचा सुध्दा विचार महत्वाचा आहे.

३) त्या स्थानात असलेले ग्रह
४) त्या स्थानावर किंवा भावेशावर दृष्टी टाकणारे ग्रह
५) कृष्णमुर्ती पध्दतीने सुक्ष्म फ़लीत पहायचे ठरले तर त्या भावाचा उपनक्षत्र स्वामी व त्या अनुषंगाने येणारे कृष्णमुर्ती नियम

असे असताना फ़क्त भावामधले ग्रह भावहानी करु शकतात का ? याचे उत्तर हो आणि नाही असे देता येईल

एखाद्या भावात जर पाप ग्रह असतील तर त्या भावाची हानी करतात या उलट जर शुभ ग्रह असतील तर भाव वृध्दी करतात.

वरील सुत्र जर कंडीशन लाऊन पाहीले तर असे म्हणता येईल की भावेश, कारक ग्रह बिघडलेले असतील आणि त्या भावात पापग्रह असतील तर भाव हानी जास्त होईल. याउलट भावेश आणि कारक ग्रह सुस्थितीत असतील तर भावात असलेले पापग्रह गोचरीने मुळ पाप ग्रहांशी अशुभ योग करतील तेंव्हा अशुभ फ़ळ निर्माण जास्त करतील.

इतके सारे वाचल्यावर असे लक्षात येते की एखादा पाप ग्रह एखाद्या भावात असता त्याभावाची कायमची फ़ळे बिघडवू शकणार नाही. काही काळच फ़ळे बिघडवू शकेल.

गुरु तर शुभ ग्रह आहे. तो ज्या स्थानात आहे त्या स्थानाची वृध्दी करेल असे असताना अर्धा श्लोक वाचून जर तो हानी करेल असा अर्थ कोणी लावत असेल तर हे तर्कसंगत नाही.

म्हणून मुळ श्लोक ध्यानात घ्यायला हवा. मुळ संपुर्ण श्लोकाचा अर्थ पाहीला तर गुरु शनिच्या राशीत असताना आणि शनि गुरुच्या राशीत असताना असे घडू शकते असा ह्या श्लोकाचा अर्थ तयार होतो.

आता हा श्लोक खरच अनुभवाला येतो का हे पहायला हवे. १९०० सालापासून जन्मकुंडली पाहिल्या तर ज्यांची जन्मचरीत्रे उपलब्ध आहेत आणि जन्मकुंडली आहेत अश्यांच्या जन्मकुंडली अभ्यासाव्या लागतील.

सर्वप्रथम ही कंडीशन म्हणजे शनिच्या राशीत गुरु आणि गुरूच्या राशीत शनि १९०० सालापासून किती वेळा आली ते पाहू. नंतर या कालखंडात कोणत्या अश्या व्यक्तीचा जन्म झाला ज्याची किमान विकीपिडीयाने नोंद घेतली आहे हे ही पहावे लागेल. अन्यथा या कालखंडात जन्माला आलेल्या व्यक्तींवर या गुरुचा परिणाम अनुभवणे अशक्य आहे.

हा कालखंड पाहीला असता
अनु.
गुरु मकर राशीत
कालावधी
( दिवस )
अवस्था
शनिची राशी
या कालखंडात जन्माला आलेल्या प्रसिध्द व्यक्ती
पासून
 पर्यंत
२२ मार्च १९३७
१४ मे १९३७
५३
मार्गी
मीन
सद्दाम हुसेन
१५ मे १९३७
१० जुलै १९३७
५६
वक्री
मीन
Morgan Freeman
१४ नोव्हेंबर १९३७
३० मार्च १९३८
१३६
मार्गी
मीन

३० सप्टेंबर १९३८
१७ अक्टोंबर १९३८
१७
वक्री
मीन

१८ अक्टोंबर १९३८
६ नोव्हेंबर १९३८
१९
मार्गी
मीन

(  * इथे १९३७ व १९३८ सालचे दाते पंचांग उपलब्ध नसल्यामुळे गुरुचा स्तंभी कालावधी वेगळा घेतलेला नाही यावर सुक्ष्म अभ्यास केला तर या कालावधीत जन्माला आलेल्यांना वेगळे फ़ळ अनुभवाला आलेले असेल.
** ह्या तारखा Astrosage Software Application प्रमाणे आहेत.
*** याच काळात शनि वक्री असताना काय होते हा अजूनही एक वेगळा अभ्यास असेल जो इथे केलेला नाही  )

अनु.
गुरु मकर राशीत
या कालखंडात जन्माला आलेल्या प्रसिध्द व्यक्ती
पासून
 पर्यंत
२२ मार्च १९३७
१४ मे १९३७
सद्दाम हुसेन, Jack Nikolsan
१५ मे १९३७
१० जुलै १९३७
Morgan Freeman,
१४ नोव्हेंबर १९३७
३० मार्च १९३८
रतन टाटा,  बिरजू महाराज
३० सप्टेंबर १९३८
१७ अक्टोंबर १९३८

१८ अक्टोंबर १९३८
६ नोव्हेंबर १९३८


अनु.
नाव
जन्मतारीख
लग्न
व्यवसाय
मार्गी  गुरुचा परीणाम
सद्दाम हुसेन
२८ एप्रिल १९३७
मिथुन
इराक राष्ट्राध्यक्ष
दोन पत्नी दोन मुलगे तीन मुली हुकूमशहा ( फ़ाशी )
रतन टाटा
२८ डिसेंबर १९३७
धनु
उद्योगपती
अविवाहीत
बिरजू महाराज
फ़ेंब्रुवारी १९३८
कन्या
कथ्थक नृत्य
पत्नी पाच मुले https://en.wikipedia.org/wiki/Birju_Maharaj
Jack Nikolsan
२२ एप्रिल १९३७
NA
अभिनेता, निर्माता
George  Carlin
१२ मे १९३७
NA
स्टॅड अप कॉमेडीयन
मो. हमीद अन्सारी
एप्रिल १९३७
NA
IFS राजदूत, उपराष्ट्रपती
भारतीय राजदूत, मा. माजी उपराष्ट्रपती एक पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी
NA : उपलब्ध नाही

वर दिलेल्या सहा नावांपैकी फ़क्त तिघांच्या जन्मकुंडली Astrosage वर उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या जन्मकुंडली तपासून गुरुचा काय प्रभाव झाला असे शोधायचे ठरवले तर तीन शोध निबंध होतील म्हणून हा लेख इथेच आवरता घेतो.

या अभ्यासामधून मी काढलेले निष्कर्श असे आहेत.

१) स्थान हानी या श्लोका बाबत जे गैरसमज आहेत ते आता पुर्ण श्लोक वाचल्यावर दुर होतील. गुरु सामान्य स्थितीत स्थान हानी करत नाही.
२) स्थान हानी हा श्लोक बरोबर आहे आहे असा निष्कर्ष पुढे अजून अभ्यासातून निघाला तर अशी स्थिती ( गुरुच्या राशीत शनि, शनिच्या राशीत गुरु ) १०० वर्षात एक किंवा दोन वेळा येते त्यामुळे अशी हानी कायमच होते हा आजवरचा समज चुकीचा आहे.
३) एखाद्या स्थानाची हानी होण्यासाठी भावेश, कारक ग्रह आणि भावातले ग्रह कारणीभुत असताना केवळ गुरु शनिच्या राशीत गेला म्हणजे स्थान हानी होते हे सिध्द होण्यास अजूनही संशोधन होण्याची आवश्यकता आहे.

यातून अजुनही ज्योतिषी महोदय पुढे येऊन अभ्यास करुन यावर प्रकाश टाकतील या आशेसह हा लेख संपवितो.

( जेष्ठ ज्योतिषी महोदय हा लेख वाचून ब्लॉग वर उपलब्ध सुविधेचा फ़ायदा घेऊन चांगल्या ( supporting ) वाईट ( Not supporting ) प्रतिक्रिया इथेच देतील तर त्याचा पुढील अभ्यासासाठी उपयोग होईल. यावर संपुर्ण वेगळे मत स्वतंत्र लेखाद्वारे कुणाला लिहायचे असेल तर या ब्लॉगवर गेस्ट म्हणुन मी असा लेख प्रसिध्द करीन. )

No comments:

Post a Comment