कायमची साडेसाती व उपाय

आपण अनेकांशी चर्चा केल्यावर असे लक्षात येते की काही जणांना साडेसातीचा खुपच त्रास होतो तर काही जण नेहमीच आनंदात असतात. असे का यावर विचार करायचा ठरला तर साडेसातीचा त्रास होतो म्हणजे काय हे समजाऊन घ्यावे लागेल. साडेसातीत मनाला दु:ख होते. मन उद्विग्न होते असा सर्वांचा अनुभव आहे. काही जणांना आजारपण येते तर काहींची प्रकृती साडेसातीत सुध्दा उत्तम रहाते असाही अनुभव अनेक जण सांगतील. ज्यांना साडेसातीत आजारपण येते त्यांना अजूनच जास्त दु:ख होते.

एकदा मानसीक स्थिती बिघडली म्हणजे जीवनात जगताना घेतले जाणारे निर्णय सुध्दा चुकतात. मानसीक स्थिती ठिक नसताना अनेकदा आपण भावनेच्या भरात महत्वाचे निर्णय घेतो. बर त्यावेळी निर्णय घेऊ नये इतके भान काहींना रहात नाही.

या सगळ्याची कारणे माहित करुन घेणे हा या लेखाचा उद्देश आहे. ज्यांनी ज्योतिष शास्त्र शिकले नाही अशांना सुध्दा समजेल अश्या भाषेत हा लेख असेल. यामुळे आपण हा लेख वाचताना सोबत येणारी चित्रे सुध्दा पहा आणि समजाऊन घ्या.

साडेसाती म्हणजे शनि ग्रह हा ग्रह अर्थात समज सर्वांच्या मनात पक्का आहे. मग अनेकांना प्रश्न पडत असेल की शनिच्या भ्रमणाने साडेसाती येते तर इतर ग्रहांच्या भ्रमणाने काय घडते ? शनिकडे दु:ख हे कारकत्व आहे. कारकत्व म्हणजे दु:ख देण्याचा स्वभाव. हा शनि जेंव्हा आपल्या चंद्र राशीवरुन तसेच आधीच्या राशीमधून व नंतरच्या राशीमधून भ्रमण करतो तेंव्हा दु:ख वारंवार होते.

चंद्र म्हणजे माणसाचे मन आहे. या मनकारक ग्रहाचा जेंव्हा संबंध गोचर म्हणजे भ्रमणाने शनि शी येतो तेंव्हाच मनाला दु:ख होते. शनि हा काही सॅडिस्ट खलनायक नाही. आपण कुणालातरी दु: दिल्यावर काय होते हे दर्शविणारे परिणाम देणारा ग्रह आहे. साडेसातीत असे परीणाम आणखी जास्त मिळतात कारण शनिचे चंद्रावरुन भ्रमण होते.

गोचर भ्रमण निट समजावे म्हणून सध्या धनु राशीत शनि आहे त्याचे चित्र पाहू. धनु राशीचा अंक आहे. या ठिकाणी सध्या शनि आहे. यामुळे ज्यांची रास ( चंद्र ज्या राशीत आहे ती रास ) धनु आहे त्यांना खुपच मानसीक पीडेला गेले अडीच वर्षे सामोरे जावे लागले.

पण एखाद्याच्या जन्मकुंडलीतच शनि आणि चंद्र एकत्र अंशात्मक युतीत असेल तर काय घडेल ? ज्यांचा ज्योतिष अभ्यास झालेला नाही त्यांच्या साठी ही स्थिती विस्ताराने पाहू. शनि आणि चंद्र नुसते एका राशीत नाही तर दोघांच्या मधे पाच अंश किंवा त्या ही पेक्षा कमी अंतर असेल तर त्याला अंशात्मक युती म्हणतात.

अशी युती जन्मकुंडली मधे असेल तर व्यक्तीला दु: वारंवार होते. यांच्या मनाची अवस्था दु:खी होते. कोणत्याही शुल्लक कारणाने यांना दु: होते. साडेसाती मधे आणि खास करुन शनिची महादशा किंवा अंतर्दशा मधे हे दु: जरा जास्त होते.

अशी माणसे कायमची साडेसाती मला लागली आहे असे म्हणतात. पुढे पुढे दु: करणे हा या माणसांचा स्वभाव होतो. मन कायम निराशेने व्यापलेले असते.

अशी माणसे जर मार्गदर्शनासाठी आली तर मी त्यांना प्रदोष व्रत करायला सांगतो. प्रदोष हा दिवस एकादशी नंतर दुसर्या किंवा तिसर्या संध्याकाळी त्र्ययोदशी आली असता येतो. या दिवशी शिवपुजन करण्याने मनाला बरे वाटते. अश्या व्यक्तीने दररोज ओम नम:शिवाय हा मंत्र एक माळ करावा. यामुळे मनाची स्थिती चांगली रहाते

प्रदोष व्रताची माहिती या दिवाळी अंकात इथे वाचता येईल.

याशिवाय साडेसाती म्हणजे चंद्रावरुन शनिचे भ्रमण किंवा जेंव्हा चंद्र शनिचे अशुभ योग गोचरीने होतील तेंव्हा डॉ बाख यांची पुष्प औषधी जरुर तज्ञांच्या सल्याने घ्यावीया लेखात उल्लेख केलेली डॉ बाख औषधे यासंदर्भातील पुस्तके इथे मिळतील.

No comments:

Post a Comment