श्रीगजानन विजय ग्रंथ पारायणाने प्राची आंग्रे हिचा विवाह ३० ऑगस्ट २०२० ला झाला

 माझी मावशी श्रीमती अनुराधा वैद्य -पुणे  जी श्रीगजानन महाराजांची भक्त आहे तिच्या परिचयातील ताराबाई आंग्रे यांची नात कुमारी प्राची आंग्रे हिचा विवाह होत नाही म्हणुन चिंतेत होती. मावशीने मला तिची जन्मकुंडली माहिती पाठवुन उपाय विचारला. अनेक उपायापैकी श्रीगजानन विजय हा उपाय मला उपयुक्त वाटला म्हणुन मी १९ व्या अध्यायाचे संपुटयुक्त तीन पारायणे प्राचीला करायला सांगीतली.


तिने साधारण तीन महिन्यात पारायणे पुर्ण केली आणि तिचा विवाह त्यानंतर महिनाभरात जमुन आला. ३० ऑगस्ट २०२० ला तिचा विवाह झाला आणि ती संपुर्ण आनंदात आहे.


तिचा मी आज इंटरव्ह्यु रेकॉर्ड केलेला असुन तो युट्युब वर प्रसिध्द केलेला आहे. याची लिंक https://www.youtube.com/watch?v=t6FhIoPsa_I ही आहे. आपण हा इंटरव्ह्यु युट्युब वर पाहू शकाल.


मला श्रीगजानन विजय ग्रंथांच्या पारायणाने विवाह जमल्याची माहित असलेली ही दुसरी केस आहे. 


आपला विवाह लांबला असेल किंवा आपल्या मुलांचा विवाह लांबला असेल तर हा उपाय आपण मुलांना सांगा. तो त्यांनी स्वत: हा केला पाहिजे. अनेकदा कात्यायनी पुजा सारख्या छोट्या उपायाने सुध्दा विवाह जमुन येतो. पण या साठी जन्मकुंडली पहाणे आवश्यक आहे.


जय गजानन

No comments:

Post a Comment