Wednesday, July 1, 2020

प्रविण जाधव यांची जन्मकुंडली आणि विवाहयोग



ही पोस्ट श्री संदीप काळे यांनी यांनी आजच  त्यांच्या फ़ेसबुक वॉल वर प्रसिध्द केली आणि कृष्णमुर्ती पध्दतीने पाहून काही प्रश्न उपस्थित केले. श्री संदीप काळे यांनी ( तज्ञांनी उहापोह करावा असे या पोस्ट मधे म्हणल्यामुळे मी हे लिहीत आहे. मी स्वत: ला अभ्यासक मानतो. तज्ञ मानत नाही हे ही नमुद करतो. ) याची लिंक इथे आहे.  https://m.facebook.com/story.php?story_fbid=3369525089738740&id=100000438452764

प्रविण जाधव यांच्या जन्मकुंडलीची माहिती त्यांनी दिल्याप्रमाणे अशी

जन्मतारीख : ५ ऑगस्ट १९८८
जन्मवेळ :  पहाटे २.४५
जन्मस्थान : भांडगाव ( उरळी कांचन जवळील ) तालुका हवेली/ जिल्हा पुणे

मी माझ्या सॉफ़्टवेअर वर ही जन्मकुंडली तयार केली. विवाह प्रश्नासाठी मी कृष्णमुर्ती पध्दती वापरत नाही. जन्मकुंडली, स्पष्टग्रह आणि महादशा वाचकांच्या सोयीसाठी दिलेल्या आहेत.

 (  माझ्या सॉफ़्टवेअर प्रमाणे इंद्र म्हणजे हर्षल , वरुण म्हणजे नेपच्युन आणि रुद्र म्हणजे प्लुटॊ )





विवाह होताना सप्तमेश बलवान नसेल तर अडथळे येतात. प्रविण जाधव यांचा सप्तमेश गुरु आहे. सप्तमेश शनि असताना किंवा सप्तमेश शनिच्या नक्षत्रात असताना याच्या कारकत्वामुळे येणारा विलंब या जन्मकुंडलीत नाही. तसेच बाराव्या स्थानी असल्यामुळे प्रविण यांची पत्नी पंचक्रोशीतील न मिळता दुरची मिळाली असेल असे एक अनुमान निघते. असे अनुमान वधु- वर संशोधनात उपयोगी पडते. मराठा समाजात पदर जुळणे ( ही संकल्पना ज्यांना माहित नाही त्यांनी समजाऊन घ्यावी ) यामुळे दुर गावच्या स्थळांशी विवाह सहसा होत नाहीत. पण अनेकदा यामुळेच दुरची स्थळे उहापोह न होता नाकारली जातात व विवाह लांबतात.

मुख्य मुद्दा विवाह ४ मार्च २०१४ साली का झाला असा प्रश्न ( सप्तमभावाचा उपनक्षत्र स्वामी २,७,११ चा कार्येश नसल्यामुळे ) श्री काळे यांना पडला आहे असे वाटते. ४ मार्च २०१४ ला गुरु गोचर भ्रमण मिथुन राशीतुन होत आहे. तसेच लाभेश मंगळाची महादशा आणि अंतर्दशा ४ मार्च २०१४  ला सुरु आहे. गोचर गुरु आधी सप्तमेश गुरु वरुन भ्रमण करत होता व या तारखेच्या आधी त्याचे शुक्रावरुन भ्रमण व सप्तमावर दृष्टी यामुळे या तारखेच्या दरम्यान विवाह नक्की झाला असणार. अनेकदा विवाह नक्की झाल्यावर काही कारणाने उशीराचे मुहूर्त शोधले जातात. याचे कारण आर्थिक, सामाजीक ( चातुर्मासात विवाह होत नाहीत, पौष मास टाळला जातो इत्यादी ) असू शकतात. यामुळे अगदी ज्या दिवशी गोचर गुरुचे अंशात्मक भ्रमण होईल त्याच दिवशी घडत नाही. ४ मार्च २०१४ ला प्रविणची मंगळ महादशा , मंगळ अंतर्दशा तसेच चंद्र अंतर्दशा आहे. लाभेश्याच्या महादशेत अनेक गोष्टी घडतात. असा एक कोणत्याही पुस्तकात नसलेला नियम मी अनुभवत आहे.

गुरुचे गोचर भ्रमण, गोचर गुरुची दृष्टी तसेच महादशा, किंवा अंतर्दशा शुक्राची किंवा सप्तमेशाची असणे हा नियम सप्तमेश किती निर्दोष व बलवान आहे यावर अवलंबुन आहे. लाभेशाची दशा/ अंतर्दशा , लाभेशाची दृष्टी सप्तमेश किंवा शुक्रावर असताना विवाह होतो हा नियम अजुनही संख्यात्मक दृष्टीने सिध्द झालेला नाही )

सप्तमेश किंवा शुक्र बलवान नसताना काही दैवी उपाय योजून विवाह घडून येतो असा अनुभव मी घेतला आहे. पण पुण्यातील माननीय व दा भट सरांच्या परंपरेत किंवा कृष्ण्मुर्ती पध्दतीमधे उपायांना महत्व नाही.

हे लिहीण्याचा उद्देश इतकाच भावेशाचा, विवाहासाठी शुक्राचा विचार, सप्तमामधील ग्रहांचा विचार केल्याशिवाय विवाह विषयावर जन्मकुंडलीचा विचार करणे शक्य नाही. तसेच कालनिर्णय करताना सप्तमेशाची दशा किंवा शुक्राची दशा व गोचर गुरुचे भ्रमण याशिवाय शक्य नाही.

जेंव्हा सप्तमेश आणि शुक्र बलवान नसतो तेंव्हा उपाय करणे आवश्यक आहे हे विवाह इच्छुक मुलांच्या पालकांनी आणि मुलांनीही याचे महत्व लक्षात घ्यावे.

जेंव्हा सप्तमभावारंभी हर्षल, नेपच्युन किंवा प्लुटॊसारखा ग्रह असतो तेंव्हा कुणाचेही काही चालत नाही. उपाय आणि ज्योतिषी यांचे प्रेडीक्शन सुध्दा चुकते हे ही अभ्यासुंनी विसरुन चालणार नाही.

No comments:

Post a Comment