नमस्कार ! ज्योतिषप्रेमी नक्षत्रप्रकाश सदस्यजनहो, तसेच सदस्य नसूनही ज्योतिष विषयावर प्रेम असलेले सर्व लोकहो. आज म्हणजे ५ जुलै २०१८ ला आपल्या नक्षत्रप्रकाश ज्योतिष समूह हा फ़ेसबुक वरील ज्योतिष विषयक समूहाची स्थापना होऊन एक वर्ष होत आहे.
या निमीत्ताने नव्या तंत्रज्ञानाच्या सहायाने व्हिडिऒ च्या माध्यमातून एक संमेलन व्हावे व जो तो आपल्या वेळेनुसार, जसा वेळ होईल तसा एकेक व्हिडिऒ पाहिल असा माझा संकल्प होता. प्रत्यक्षात या समुहावर त्या संकल्पाला प्रतिसाद मिळाला नाही म्हणुन हा जुनाच उपक्रम करणे भाग आले. आपल्या समुहाचे नक्षत्रप्रकाश हे नाव कसे सुचले हे सांगणे सुध्दा आवश्यक आहे. मी दिवाळी अंक स्वत: लिहून तो ब्लॉग वर प्रसिध्द करुन त्याची फ़ेसबुक वर लिंक देऊन तो ज्योतिषप्रेमींपर्यंत पोहोचवणे हा जुना संकल्प २०१६ दिवाळी आणि २०१७ वर्षप्रतिपदेला पार पडला. हा उपक्रम जर प्रिंट मिडीयामधून द्यायचा ठरला असता तर मोठे खर्चिक काम होऊन अशक्य झाले असते. म्हणुन मी या आधीचे दोन्ही अंक ब्लॉगवर लिहून फ़ेसबुक आणि व्हॉटस अपच्या माध्यमातून ज्योतिषप्रेमींच्या पर्यंत पोचवले. या दोन्ही अंकांना नक्षत्रप्रकाश हे नाव मी दिले होते. पहिल्या दिवाळी २०१६ अंकात मी नक्षत्रप्रकाश हेच नाव का दिले याबाबत माझे विचार दिले आहेत.
या दोन्ही अंकातील वार्षिक राशीभविष्य सोडता लिहलेले लेख कालबाह्य नाहीत त्यामुळे पुन्हा वाचावेसे वाटल्यास ते जरुर वाचावे. सोशल मिडीयाचा यादृष्टीने उपयोग फ़ारच उत्तम आहे. ह्या त्याच्या लिंक आहेत.
१.नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१६
२. नक्षत्रप्रकाश वासंतीक विशेषांक २०१७
हे करताना एकच अडचण येत होती ती म्हणजे नक्षत्रप्रकाश २०१६ च्या दिवाळी अंकाला प्रसिध्दी देताना त्या फ़ेसबुक ज्योतिषविषयक समुहाच्या प्रमुखांना माझ्या उद्देशाबाबत शंका होती. त्यांचे शंका घेणे रास्त आहे. हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. यामुळे २०१७ ला दिवाळी अंक प्रसिध्द करण्याचा विचार जुलै २०१७ मधे येताच माझ्या मनावर दडपण आले होते. ( काही घरगुती अडचणींमुळे मला नक्षत्रप्रकाश २०१७ दिवाळी अंक प्रसिध्द करता आला नाही.) नक्षत्रप्रकाशच्या विशेषांकाच्या प्रसिध्दीला तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून मी ५ जुलै २०१७ ला समुह स्थापन केला व नक्षत्रप्रकाश हे विशेषांकाचे नाव समुहाला दिले. वर्षातून एकदाच दिवाळी अंकाद्वारे कशाला, रोजच ज्योतिषविषयक आपली किंवा अनेकांची उत्तम मते, रास्त मार्गदर्शन, संशोधन आणि गैरप्रकारांना लोकांच्या समोर आणण्यासाठी ह्या समुहाचा वापर नक्षत्रप्रकाश नावाने करायचे ठरवले.
नक्षत्रप्रकाश वर्षपूर्ती विषेशांक सादर करताना ह्यात ज्योतिषविषयक लेख लिहणे आहेच. त्याच सोबत एखाद्या जाणत्या ज्योतिषी विषयक सेवा देणार्या जेष्ठाची मुलाखत द्यावी. काही ठराव सोशल मिडीयाचा उपयोग करुन पास करुन घ्यावेत असे संकल्प मनात आहेत. तांत्रिक दृष्ट्या हे कसे पुर्ण होतात हे पहावे लागेल. जर काही संकल्प पुर्ण झाले नाहीत तर नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१८ आहेच.
एकदा एका सदस्यांने मला फ़ोन करुन विचारले की समुहाचे हे नियम आपण कसे ठरवले त्या मागे प्रेरणा काय आहे ? मला वाटते ज्या गुरुजनांकडे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ( पुस्तकरुपाने ) मी ज्योतिष ज्ञान घेतले, ते गुरुजन ज्योतिषमार्गाने पैसे मिळवण्याच्या बाबतीत फ़ार आग्रही न रहाता ज्ञानवर्धन करण्याच्या वृतीने काम करत आहेत. पुस्तक फ़ुकट वाटता येत नाहीत म्हणुन ते पैसे घेतात. ते सुध्दा पुस्तके, त्याची पाने, त्यातून दिले जाणारे ज्ञान पहाता, त्यात होणारी गुंतवणुक पहाता फ़ारच कमी घेतात असे माझे मत आहे.
जर ते हे आयुष्यभर कमविलेले ज्ञान अल्प किंमतीत देत असतील तर मी दिवसभर पोस्ट अॅप्रुव्ह करण्यासाठी/ नविन मेंबर्सना प्रवेश देण्यासाठी स्वत:ला गुंतवतो. इतके केले तर खुप ज्ञान आपण ज्योतिषप्रेमी लोकांपर्यंत पोचवू शकतो असे मला वाटते. पोस्ट ज्योतिषज्ञान विषयकच असाव्यात हा आग्रह मी धरतो. पण प्रतिसादात लोक काय लिहीतात यावर माझे फ़ारसे नियंत्रण नाही. नक्षत्रप्रकाश समुहावरील ज्योतिषप्रेमी वाचकांना निर क्षीर विवेक आहे. यामुळे योग्य ते वाचक घेतील असा माझा विश्वास आहे.
आजकाल कॉपी-पेस्ट मुळे माहिती सहजणे इकडची तिकडे जाऊ शकते. हे खरोखरीच ज्ञान आहे का ? हे तपासण्यासाठी मी कोणतीही पोस्ट कॉपी-पेस्ट करताना आपला अनुभव लिहा असे सांगतो. या नियमामुळे अनेकांना मी नाराज करतो. परंतु आपण स्वत: फ़क्त कॉपी-पेस्ट करणार असाल तर आपले त्यात कर्तुत्व काय आहे ? हा प्रश्न विचारावासा वाटतो. जगात खुप माहिती उपलब्ध आहे. याचा अनुभव घ्या मगच ते अनुभवसिध्द ज्ञान म्हणून लोकांच्या समोर आणा हा माझा आग्रह आहे.
या समुहावर फ़क्त कुंडलीचाच अभ्यासाला प्रोत्साहन का ? हस्तसामुद्रीक, न्युमरोलॉजी, वास्तू का अभ्यासले जात नाही यावर मी स्वतंत्र लेखात चर्चा याच अंकात करणार आहे. ज्योतिष प्रेमींनी हा ही लेख जरुर वाचावा.
मी अनेक वेळ असे लिहीतो की ह्या नक्षत्रप्रकाश समुहाचा उपयोग लोकांना ज्योतिष विषयक ज्ञान मिळावे ह्या साठी व्हावा. अनेकदा लोक वैयक्तिक प्रश्न विचारत रहातात. यातून वैयक्तिक अडचणी दुर होतात या बरोबर दुसरे जेष्ठ ज्योतिषी काय सल्ला देतात हे नव्या ज्योतिष शिकलेल्या लोकांना समजते. काही संशोधन प्रकल्प करण्यासाठी या समुहाचा उपयोग व्हावा असे वाटत असताना मात्र ह्याला फ़ारसा प्रतिसाद मिळत नाही याची खंत वाटते.
मागील वर्षी मुंबईमधे एलफ़िस्टन पुलावरच्या चेंगरा चेंगरीत काही लोक मृत पावले त्यांच्या पत्रिका कोणी मिळवू शकेल का असा प्रश्न मी विचारला होता. जेणे करुन अपघातात एकाचवेळी मृत्युमुखी पडलेल्या अनेकांच्या कुंडलीचा अभ्यास करुन ह्यात काय साम्य आहे हे समजू शकेल. दुर्दैवाने ह्याला मला प्रतिसाद मिळाला नाही. इतकेच काय ह्या समुहावर बॅक मॅनेजर्सच्या कुंडल्या जमा करणे हा ज्योतिषशास्त्री अभ्यासक्रमाला असलेल्या अभ्यासक्रमाला फ़ारशी मदत मिळाली नाही.
काही उपक्रमांना थोडीशी मदत मिळाली जसे उशीरा विवाह झालेल्यांच्या पत्रिका इत्यादी. परंतु १० हजार पेक्षा जास्त संख्या असलेल्या समुहात संख्याशास्त्राला मदत होईल असा डाटा मिळू शकत नाही ही एक खंत मनाला वाटते. या संदर्भात अजून काय योजना केल्यास संख्याशास्त्रीय संशोधनास या समुहाचा उपयोग होईल असे कोणाला सुचवायचे असल्यास त्यांचे स्वागत आहे.

No comments:
Post a Comment