ज्योतिषप्रेमी वाचकहो नमस्कार,
९ सप्टेबर २०१६ रोजी मी पुन्हा एकदा दिवसाकाठी जास्त वेळ ज्योतिष विषयाला द्यायचा असे ठरवुन त्या नंतर हा ब्लॉग लिहायला सुरवात केली. सुरवातीला ब्लॉगची लिंक मी आपल्या नातेवाईकांना आणि स्नेह्यांना whatsapp वरुन पाठवली. ज्यात खास करुन मासिक भविष्य हा उपक्रम सप्टेंबर आणि अक्टोबर २०१६ ह्या महिन्यासाठी चालवला. हा पुढे कायमच चालु राहील.
यानंतरचा उपक्रम नक्षत्रप्रकाश ज्योतिषविषयक लेखांचा दिवाळी अंक प्रसिध्द करण्याचा होता. २६ अक्टोबर २०१६ रोजी तो ही पुर्ण झाला. ह्या तीनही गोष्टींना खुप प्रतिसाद ब्लॉगवर मिळाले. १००० पेक्षा जास्त वाचक वर्ग लाभला.
यात नक्षत्रप्रकाशला मिळालेला प्रतिसाद खुपच जास्त म्हणजे नक्षत्रप्रकाश प्रसिध्द झाल्यावर तीन दिवसात पाचशे वाचक ब्लॉगवर येऊन गेले. हे सर्व फ़ेसबुकरील छंद ज्योतिषाच्या ह्या गृपमुळेच शक्य झाले.
या पुढेही दरमहिन्याचे भविष्य आणि आणखी एखादा लेख किंवा ज्योतिषअभ्यासु लोकांसाठी एखादी केस लिहावी असा उपक्रम असेलच.
याशिवाय माझ्याशी संपर्क व्यक्तीगत स्तरावर न साधु शकणारे प्रश्नकर्ते यांच्यासाठी खालील सेवा उपलब्ध होत आहेत.
१. मराठी , हिंदि किंवा इंग्रजी भाषेत जन्मकुंडली बनवुन PDF स्वरुपात इमेलवर पाठवणे.
२. पत्रिका गुणमेलन लग्नाकरिता ज्यात गुण, मंगळ दोष आणि विवाहसौख्य याची चिकित्सा
३. अन्य प्रश्न व त्यावरचे उपाय
या करिता काय फ़ी असा प्रश्न नेहमीच विचारला जातो आणि फ़ीचे स्वरुप हे ऎच्छिक आहे हे मी सांगतो. दुरवर रहाणारे भारतीय लोकांकरीता मी अकाउंटला पेमेंट करा असे न सांगता मी मोबाईल रिचार्ज स्वरुपात सांगतो जे सोपे आहे.
परदेशी व्यक्तींना मात्र असे करता येणार नाही म्हणुन माझा अकाउंट नंबर मी इमेल आल्यावर वैयक्तीक स्वरुपात ईमेल वर देईन.
या शिवाय अजुनही काही उपक्रम करण्याचा मानस आहे.
१. ज्योतिष वर्ग (मराठी) - हा उपक्रम चिंचवडला असणार आहे त्यामुळे पिंपरी- चिंचवड परिसरातले लोक याचा लाभ घेतील.
२. दुरशिक्षण युट्युब मार्फ़त व्याख्यान व त्या नंतर स्काईप द्वारे चर्चा असा ज्योतिष वर्ग दुर असणारे प्रेमी घेतील.
३. ज्योतिष विषयावर संख्याशास्त्रीय संशोधन कसे करायचे याची सर्वमान्य पध्दत ठरविणे
४. ज्योतिष संशोधनाला प्रोत्साहन
५. ज्योतिष संशोधनपर लेखांना जर्नल द्वारे प्रसिध्दी प्राप्त करुन देणे
६. ज्योतिष परिषदांचे आयोजन करणे ज्यात ज्योतिषावर व्याख्याने व संशोधनपर निबंध वाचन असेल.
वाचकांना विनंती आहे की त्यांना कोणत्या उपक्रमात रस आहे हे खालील प्रकारे कळवावे.
1. इमेल - नितीन जोगळेकर - joglekar.nitin@gmail.com
2. दुरध्वनी - फ़ोन - 9763922176
3. Facebook - https://www.facebook.com/nitin.joglekar.9
4. Twitter - @joglekarnitin
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. लोभ आहेच तो वृध्दिंगत व्हावा.
दिपावली तसेच दिवाळी पाडव्याला सुरु होणारे नविन विक्रमसंवतसाठी शुभेच्छा !
नितीन जोगळेकर
No comments:
Post a Comment