नमस्कार, ज्योतिषप्रेमी लोकहो. मी घेऊन आलो आहे १७ सप्टेंबर २०१८ ते १६ अक्टोबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य. या महिन्यात रवि कन्या राशीत आहे. ज्योतिषशास्त्र दृष्टीने महत्वाचा बदल होत आहे. ११ अक्टोंबर २०१८ रोजी गुरु तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. महिन्याच्या राशी भविष्यात इतका मोठा ज्योतिषशास्त्रीय लेख लिहणे शक्य नाही यासाठी हा लेख मी दिवाळी अंक २०१८ मधे लिहणार आहे.
तेंव्हा प्रतिक्षा करा दिवाळी अंकाची. यात वार्षीक राशीभविष्य नोव्हेंबर २०१८ ते अक्टॊंबर २०१९ कालावधीचे असेल. याच सोबत गुरु बदलाचा स्वतंत्र लेख असेलच. कोणत्या राशीला गुरु बदलाने नेमका काय लाभ होईल हे दिवाळी अंकातच वाचा. या शिवाय अनेक अश्या माहितीने नटलेला नक्षत्रप्रकाश दिवाळी २०१८ - २८ अक्टोंबर २०१८ रोजी प्रसिध्द होईल. प्रिंट कॉपीची मागणी आत्ताच नोंदवा. यासाठी देणगी मुल्य असेल. ते कसे द्यायचे या बाबत स्वतंत्र माहिती आपणा पर्यंत येईलच.
दर महिन्याला मी काही उपाय सांगत असतो. ह्या महिन्यामधे नवरात्र सुरु होत आहे. यादृष्टीने मी अनुभवलेले उपाय आपल्यापर्यंत मी पोचवत आहे.
ज्या विवाहासाठी इच्छुक कन्यांचा विवाह लांबला आहे, अडचणी आहेत. प्रेम विवाह करायचा आहे पण त्यात अडचणी आहेत अश्या सर्व कन्यांनी हा उपाय जरुर येता १३ अक्टोबरला करावा व आपला अनुभव कळवावा. हा उपाय असलेली खालील लिंक विवाह इछुक मुलींना पाठवावी. १३ अक्टोबर २०१८ च्या आधी पाठवावी म्हणजे तयारी करता येईल.
http://gmjyotish.blogspot.com/2016/09/blog-post_22.html
हा उपाय, विवाह इच्छुक मुलींनीच करायचा आहे. त्यांच्या साठी त्यांच्या वतीने अन्य कोणी केल्यास फ़ायदा होत नाही
आता १७ सप्टेंबर २०१८ ते १६ अक्टोबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य पाहू. हे राशीभविष्य लग्नराशीकडून तसेच चंद्र राशीकडूनही पहावे.
मेष रास: या महिन्यात आपल्या राशीचा स्वामी मंगळ कर्म स्थानी असला तरी अनेक कामे तुमच्या इच्छा शक्तीने मार्गी लागण्यात काही अडथळे महिन्याच्या सुरवातीपासूनच संभवतात. ही स्थिती महिन्याच्या शेवटापर्यंत कायम असेल. यासाठी अडथळे काय येतील याचा अंदाज आत्तापासून लाऊन त्यावर परिणामकारक उपाय शोधा.
आपल्या राशीचा महत्वाचा ग्रह गुरु पुढे वर्षभर अशुभ स्थानी असल्याने ११ तारखेच्या आधी काही अत्यंत महत्वाची कामे मार्गी लावाच. ह्या महिन्यात तुमचे मामा तुमच्यावर प्रसन्न असतील. मामांच्या सहायाने काही कामे मार्गी लावायची असतील तर ६ अक्टोंबर पुर्वी मार्गी लावा.
हा संपुर्ण महिन्याच्या कालावधीत मेष राशीचे विद्यार्थी कोणतीही परिक्षा देणा्र असतील तर अपेक्षे इतके यश मिळवण्यासाठी दुप्पट अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्या संततीच्या बाबतीत सुध्दा सहामही परिक्षेच्या कालावधीत आजारपण येऊ नये म्हणून काळजी करा.
या महिन्यात काही रोमॅंटीक क्षण अनेकांना अनुभवायला मिळतील. एकंदरीत अनेक वैविध्यपुर्ण घटनांनी भरलेला हा महिना मेष राशीसाठी आहे.
वृषभ रास: तुमच्या राशीचा स्वामी शुक्र स्वत:च्या राशीत असूनही तुम्हाला सर्व सुख समोर असताना, आनंद घेण्यास अडथळे निर्माण होतील. हे म्हणजे अनेक गोड मेजवान्या रक्तातील साखर वाढल्याने आस्वाद घेता येणार असे असेल. व्यावसायीक स्तरावर अनेक कामे तुमचे सहकारी एकदा सांगून मार्गी लावतील पण त्यासाठी ५ अक्टोबर पुर्वी महत्वाची कामे मार्गी लाऊन घ्या.
आपण उच्च शिक्षणासाठी प्रयत्नात असेल तर त्या संदर्भात चांगली बातमी समजेल. आपली संतती बौध्दीक क्षेत्रात काहीतरी जोरदार काम पुर्ण करेल. महिन्याच्या शेवटी आरोग्याचे प्रश्नाने वर्षभर त्रास झाला असेल तर त्यावर चांगला उपाय सापडेल. अडकून पडलेले पैसे मार्गी लागतील.
सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या राशीचा राजयोग कारक ग्रह शनि मार्गी झाल्याने अनेक रखडलेली कामे वेगाने नाही पण हलू नक्कीच लागतील. तुमच्यासाठी सुध्दा हा महिना अनेक घटनांनी भरलेला असेल.
मिथून रास: ऑफ़िसला जाणे हा रोजचा प्रवास महिनाभर तुम्हाला सुखाचा झालेला वाटेल. बसेस वेळेवर येतील. नेहमी ट्रॅफ़िक जाम होणार्या जागी जाम लागणार नाही. तुमचे स्वत:चे वहान दगा देणार नाही. काही दिवस का होईना हे सुख अनुभवा. आपली भावंडे लांब असतील तर काही दिवस त्यांचा सहवास लाभेल.
या महिन्यात काही लिखाण करायचे असेल तर ५ अक्टोंबर पुर्वी पुर्ण करा. कोणत्याही विषयाच्या अभ्यासासाठी हा काळ अनुकूल आहे. आपली संतती सुध्दा आपल्याला आनंद देणार आहे. आणि हो कोणाला तरी प्रपोज करायचे असेल तर बिनधास्त करा. असा हा काळ मिथुन राशीच्या लोकांना जोरदार असणार आहे. तरी सुध्दा प्रकृतीच्या काही तक्रारी असतील. पित्ताचा त्रास असणार्या लोकांनी विशेष काळजी घ्या.
कर्क रास: कोणतेही यश मिळण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. यासाठी संवाद साधणे हा सुध्दा एक प्रयत्नच असतो. या महिन्यात संवाद यशस्वी रित्या साधला जाईल. तो इमेल च्या माध्यमातून असू दे, प्रेझेंटेशन असू दे किंवा इंटरव्ह्यु, संवाद यशस्वी होईल. या महिन्यात अनेक लेखक, प्रकाशक आणि प्रिंटींग व्यवसायात असलेले लोक एखादा महत्वाचा टप्पा पार पाडतील. शैक्षणीक क्षेत्रात असलेल्या लोकांना मात्र संधीचा फ़ायदा घेण्यासाठी खुपच आटापीटा करावा लागेल.
घरगुती स्तरावर भावंडांची चिंता असल्यास दुर होईल. घरात एखादी भौतीक सुखाची वस्तू जसे फ़र्निचर, वाहन इ येण्याचा योग या महिन्यात पाच तारखेच्या आधी असेल. काही कारणाने जोडीदाराशी असलेला संवाद हरवला असे गेले काही महिने वाटत असेल तर तो पुन्हा निर्माण होईल. लांबलेले एखादे दुखणे नियंत्रणात येईल. असे मिश्र ग्रहमान असलेला हा महिना कर्क राशीच्या लोकांना अनुभवायला मिळणार आहे.
सिंह रास: आपल्या राशीचा स्वामी रवि महिनाभर कन्या राशीत असेल. कन्या राशीत रवि गेल्यावर आपल्या खाण्यापिण्याच्या आवडी पुर्ण होण्यास हा खास काळ येतो. घरातल्या लोकांच्यावर गुरगुरु करुन तुम्ही हवे ते तयार करायला सांगणार आणि इतरांना शिल्लक रहाते अथवा नाही याचा फ़ारसा विचार न करता त्याचा स्वाद घेणार. आपला स्वभाव घरच्यांना माहित आहे त्यामुळे तुम्ही आनंद घ्या.
या महिन्यात अधिकार, पद, मान सन्मान या ही पेक्षा पैसे कसे गुंतवायचे यावर जेणे करुन ते कठीण प्रसंगी उपयोगी पडतील यावर विचार करायला वेळ मिळेल शिवाय चार पैसे सेव्हिंग अकाउंटला दिसतील सुध्दा एखाद्या चांगल्या हितचिंतका बरोबर या बाबतीत हितगुज करा. सिंह राशीचे अनेक लोक चांगले कलाकार असतात. या महिन्यात आपल्याला कला प्रदर्शनासाठी उत्तम संधी येणार आहे त्याचा फ़ायदा घ्या. आपल्याला लगेचच सिनेमा मिळणार असे नाही पण अभिनय करायला पथ नाट्यापासून कोणतीही संधी तुम्ही सोडु नये कारण त्यातूनच अभिनय कौशल्य संपन्न होत असते.
कन्या रास: तुम्ही मुळात चिकीत्सक, संशोधक आणि ही तुमची वृध्दींगत करण्यासाठी ६ अक्टोंबर पर्यंत राशीचा स्वामी बुध लग्न स्थानी असेल. आपण ज्याची चिकीत्सा कराल ते अचूक असेल. डॉक्टर असा किंवा चार्टर्ड अकाउटंट असा आपल्याला आपल्या कामाचे समाधान मिळेल व आत्मविश्वास वाढेल.
महिनाभर ज्या गोष्टीची काळजी कराल ती विनाकारण असणार नाही. पुढील महिना केवळ चिंता करु नका पण ही स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून काहीतरी मुलभूत काम करा. या दृष्टीने काही आर्थिक नियोजन करायला हा महिना अनुकूल आहे मात्र हे सर्व निर्णय ५ अक्टोंबर पुर्वी घेतले जातील असे पहा.
तूळ रास : तुमच्या राशीचा स्वामी खुप काळ तुमच्या राशीत असणार आहे. महिनाभर विवीध घटना घडतील. प्रवास, तिर्थयात्रा यांचे योग येतील. या महिन्यात हा खर्च अनपेक्षित असला तरी सुध्दा त्याची तरतुद करणारा आहे त्यामुळे तिर्थ यात्रा बाबत संधी येताच हो म्हणा. या महिन्यात आपण आनंदी असाल याचे कारण तुम्हाला अपेक्षीत व्यावसायीक संधी, कला प्रदर्शनाच्या संधी, उत्कृष्ट सुगंध, कपडे इ. आवडणारे सर्व काही सहज प्राप्त होणार आहे.
याच सोबत ६ अक्टोंबर नंतर होणार्या कटकटी, इतरांसाठी होणारे अनावश्यक खर्च, डोळ्याचे आजार याने वैतागून न जाता यावर काय पर्याय आहे याचा विचार करावा. केवळ आपल्या सोबत राहीले म्हणजे काही खर्च करावा लागत नाही अश्या विचार करणार्या स्वार्थी मित्रांना जरा टाळा म्हणजे हे अनावश्यक खर्च नियंत्रणात राहतील.
वृश्चिक रास : आपल्या राशीचा अधिपती मंगळ २७ ऑगस्टला मार्गी झाला असला तरी कटकटी संपलेल्या नाहीत. सध्या मंगळाचे केतू सोबत साहचर्य असल्याने कामे मार्गी लागताना अनंत अडथळे यांचा सामना करावा लागेल. फ़ार धाडस दाखवून काम करु नका तर जरा शांत राहून अंतर्मनाचा कौल घेऊन दुरगामी विचार करुन पावले टाकण्याची आवश्यकता या महिन्यात जाणवेल.
या महिन्यात पैशाची आवक चांगली असेल. रवि आणि बुध दोन्ही ग्रह भरपूर आवक या महिन्यात देतील. जुनी येणी वसूल होतील. त्यामुळे खर्च वाढला तरी तरतुद कशी करावी ही चिंता असणार नाही. या महिन्यात गुरु जो आपल्या खर्चाच्या, चिंतेच्या जागी बसून अस्वस्थता गेले वर्षभर वाढवत होता तो या महिन्यात आपले स्थान बदलून आपल्या राशीत येणार आहे. गुरूबदलाचे फ़लित दिवाळी अंकात वाचा.
धनू रास: आपल्या राशीला एक महत्वाचा बदल या महिन्याच्या अखेरीस होणार आहे तो म्हणजे गुरु बदल पण त्या बाबत स्वतंत्रपणे दिवाळी अंकात वाचा. हा महिना या वर्षभरातला असा आहे की जे काही मार्गी लावायचे असेल ते ह्याच महिन्यात ११ अक्टोंबर पर्यंत लावा. या नंतर मात्र खुप खर्च, मनाविरुध्द घटना यात वाढ होईल.
वरील लिहलेले वर्षभर अनुभवयास कमी अधीक प्रमाणात आले तरी हा महिना मात्र नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम असेल. नोकरी/व्यवसायात अनेक संधी चालून येतील. अधिकार वाढेल तसेच व्यावसायिकांना उत्पन्न नाही तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत वाढल्याचे लक्षात येईल. नविन निर्माण झालेल्या स्त्रोत कायमचे कसे हातात राहतील यावर विचार करा.
मकर रास : कितीही मनाविरुध्द घडले तरी शांत रहायचे हा आपला स्वभाव काही दिवसांकरता अचानक बदलत आहे असा भास नाही तर आपल्या राशीत आलेल्या मंगळाच्या मुळे सत्यात उतरेल. अर्थात डोक्यात राख घालून कडक रिअॅक्शन तुम्ही देणार नाही परंतु नापसंती नक्कीच दाखवाल. इतका आपला अधिकार आहेच तो कधीतरी दाखवायला काय हरकत आहे ?
महिनाभर अनेक हातात आलेल्या संधी विनाकारण जाऊ नयेत म्हणून प्रयत्नशील असा हे सांगण्याची आवश्यकता नाही हा आपला स्वभाव आहे. पण या साठी महिनाभर जागरुक रहा. प्रमोशन हातचे जाऊ नये म्हणुन लक्ष द्या. ५ अक्टोंबर नंतर असे घडू नये यासाठी हालचाल करा. संधी गेली म्हणजे परत येत नाही असे नाही परंतु काही काळ मात्र तसाच जातो हे निश्चित लक्षात असू द्या.
कुंभ रास : आपल्यासाठी हा महिना काही फ़ारसा चांगला नाही. निष्कारण खर्च, चिंता, आजारपण याने व्यापलेला असेल. वैवाहीक जोडीदारासोबत अनावश्यक संघर्ष होऊ नये म्हणून कोणत्या विषयात पडायचे नाही हे ओळखून कटुता कमी करता येईल. नोकरी / व्यवसायाच्या निमीत्ताने प्रवास आहे पण तो सुखकारक व्हावा यासाठी काळजी करा. प्रवासात काही हरवणार नाही, फ़सवले जाणार नाही यासाठी जागृत रहा.
नाही म्हणायला स्पेक्य़ुलेशच्या संधी या महिन्यात येतील पण किती कुंभ राशीचे लोक शेअर्स, रेस किंवा तत्सम भानगडीत पडतात ? त्या पेक्षा एखादे लॉटरीचे तिकीट काढा. किंवा जिथे खरेदी केल्याने काही लकी ड्रॉ काढला जाणार आहे तिथे गंमत म्हणुन नशीब अजमाऊन पहा. याच्या फ़ार नादी लागू नका हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही.
मीन रास: आपल्या राशीला या महिन्यात काही पैसे बिनकष्टाचे मिळणार आहेत यास्तव एखादी स्मरणात न राहीलेली मॅच्युअर होऊ पहाणारी विमा पॉलीसी तपासा जी अकस्मात बोनस देऊन जाईल किंवा वारसा हक्काने येणारे धन, लॉटरी इ. ने मिळणारे धन या महिन्यात मिळेल. दिवाळी साठी हा मोठा आनंददायक दिलासा असेल.
आपल्या वैवाहीक जोडीदार किंवा वुड बी/प्रेमपात्रा सोबत चांगला काळ जाईल तसेच संघर्ष सुध्दा होईल. यात बॅलन्स कसा साधायचा यासाठी कसरत करावी लागणार आहे. " तुमको जो पसंद वही बात करेंगे, तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे " या जुन्या हिंदी गाण्याच्या ओळी लक्षात ठेवल्यात तर जो काळ चांगलाच असेल त्याही काळात आधीच्या घटनांनी मुड गेला असे होणार नाही.
शुभंभवतु

No comments:
Post a Comment