देव तारी त्याला कोण मारी अशी म्हण मराठीत आहे. याचा प्रत्यय फ़क्त २७ जुलैच्या दापोली कृषी विद्यापीठाच्याच अपघातात आला आणि त्या आधीचे दोन तश्याच प्रकारचे अपघात आठवले. दापोली अपघातात वाचलेले प्रकाश सावंत देसाई यांच्याशी माझा प्रत्यक्ष परियच नाही. यासंदर्भात झालेली उलट सुलट चर्चा हा लेखाचा विषय नाही. या बसमधे बसून ते निघाले होते. अंबेनळी घाटातल्या अपघातात ते एकटेच वाचले हा माझ्या दृष्टीने चमत्कार आहे. असे कोणते योग त्यांच्या जन्मकुंडली मधे आहेत जेणेकरुन इतक्या भीषण अपघातातून ते वाचले ?
त्यांची जन्मकुंडली जेंव्हा मिळेना तेंव्हा मला याच प्रकारचे घाटातले दोन अजून अपघात आठवले.
१) श्री सुनिल भातखंडे - खंबाटकी घाटात १७ जानेवारी १९८६ साली दरीत बस पडुन झालेल्या अपघातात सुखरुप बचावले. बस मधले अनेक लोक या अपघातात मृत्युमुखी पडले. जे तीन चार प्रवासी वाचले त्या पैकी एक श्री सुनिल भातखंडे आहेत.
२) श्री पांडुरंग कुंभार उर्फ़ पंडित पॉटर - हिमाचल प्रदेशात २००८ साली कुलू च्या जवळ बस दरीत कोसळुन जखमी झाले. हा अनुभव मृत्युसम परिस्थितीचा होता. डोक्याला जबर जखम होऊन, मृत्युच्या जवळ जाऊन ते वाचले. या अपघातात चार लोक मृत्युमुखी पडले.
काय नियम आहे जेंव्हा जातक स्वत:ची चुक नसताना मोठ्या वहानातून अनेकांच्या समवेत जात असताना अपघात होतो व मृत्युमुखी पडतो किंवा वाचतो.
मला माहित असलेला नियम लग्नेश जर सहाव्या स्थानी पडला असेल तर असे अपघात घडतात. अपघातात अनेक जण सापडतात पण सर्वच मृत्युमुखी पडत नाहीत. मग वाचण्याचे योग काय असतात ? जर सहाव्या स्थानामधला लग्नेष जर भाग्येशाच्या सोबत असेल तर सही सलामत वाचण्याची शक्यता असते. पहिली कुंडली सुनिल भातखंडे यांची आहे. या कुंडलीत लग्नेशाच्या सहाव्या स्थानाशी काहीच संबंध नाही त्यामुळे ते अपघातात सापडले पण कोणतीही फ़ारशी इजा न होता सही सलामत वाचले.
मी अनेक वर्षांनंतर सुनिल भातखंडे यांची ओळख काढून त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थळ मागीतले. आमच्या गप्पा ही फ़ोनवर झाल्या. तसेच अपघाताची तारीख आणि वेळही त्यांनी दिली ती ह्या प्रमाणे
जन्मतारीख - ०७ ऑगस्ट १९६१
जन्मवेळ - ४:३५ पहाटे
जन्मस्थळ - कराड
सुनिल भातखंडे त्या काळात बजाज आटो लिमीडेड मधे नोकरी करत. त्यांचे मुळ गाव कर्हाड असल्याने गुरुवारी आठवड्याच्या सुट्टीत पुण्याहून कर्हाड ला जायचे. गुरुवारी रात्री कर्हाड वरुन निघून सकाळी पुन्हा बजाज मधे पुण्याला शुक्रवारी नोकरीवर हजर होत.
एकदा कर्हाड वरुन येताना खंबाटकी घाटात त्यांची एस.टी. ५०० फ़ुट दरीत कोसळली. अर्थात हा सरळसोट खड्डा नव्हता. गाडी अती तिव्र उतारावर खाली जात असताना त्यांना बसच्या बाहेर येण्याची संधी मिळाली . १००- २०० फ़ुट ते चढून वर आले. त्यांच्या डोक्याला जखम होती आणि त्यातून रक्त वहात होते. रात्रीच्या वेळी अनेक वहान चालकांनी ते रक्त पाहून त्यांना वहानात घेण्याचे नाकारले. शेवटी हात दाखवून घाडगे पाटील कंपनीची बस थांबली व त्यांनी सुनील भातखंडे यांना पारगाव खंडाळा पोलीस स्टेशनला सोडले. पुढे त्यांनीच पोलिस कंप्लेट केल्यावर पोलीस तपास होऊन त्या एस टी मधील सुनिल भातखंडे व अजून २-३ लोक सोडता सगळे अपघातात मृत झाल्याचे जगाच्या समोर आले.
अश्याच प्रकारच्या अपघातात सापडून जरा जास्त जखमी झालेल्या, लगेचच बेशुध्द अवस्थेत पोहोचलेल्या, मृत्युचा अनुभव कसा असतो.( Near death experience ) नावाची एक टर्म आहे. ज्यात आपला आत्मा शरीरा बाहेर पडतो. काही काळ जिवंतपणी ने येणारा अनुभव घेऊन पुन्हा शरीरात प्रवेश करतो असा सिध्दांत आहे. जगात असा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. श्री पांडुरंग कुंभार उर्फ़ पंडीत पॉटर या फ़ेसबुक सेलीब्रेटीला असाच अनुभव २००८ साली हिमाचल प्रदेशात आला. त्यांची जन्मकुंडली खाली दिलेली आहे.
पुणे महानगर पालिकेचे अनेक कर्मचारी दिल्ली ते हिमाचल प्रदेशात सहलीला गेले असताना परतीच्या वाटेवर कुलू जवळ दुपारी १२:०० वाजता २६ सप्टेंबर २००८ तारखेला हा अपघात घडला.
जन्मतारीख : १३ डिसेंबर १९७१
जन्मवेळ : रात्री ०८:०० वाजता
जन्मस्थळ : पिंपरी
या जन्मकुंडलीचा अभ्यास केला असता लग्नेश बुध सहाव्या भावात असून जेष्ठा या नक्षत्रात याचा अर्थ स्वत:च्या नक्षत्रात वक्री आहे.सर्व साधारण पणे लग्नेश सहाव्या भावात असताना अपघाताचे योग येतात. तसा यांचा अनुभव आहे. अर्थात या ही घटनेत ते स्वत: पेशाने ड्रायव्हर असूनही वहान चालवत नव्हते. अर्थात या स्थितीवर त्यांचे नियंत्रण नव्हते.
या अपघातात चार जण घटनास्थळी मृत पावले. दोघे यानंतर काही कालावधीत मृत्यु पावले.
पहिल्या श्री भातखंडे यांच्या पत्रिकेत लग्नेश सहाव्या भावात नव्हता म्हणून त्यांना फ़ारशी दुखापत न होता ते वाचले. श्री कुंभार यांनी तर मृत्यु पाहिला. आपुले मरण म्या पाहिले डोळा असा हा प्रसंग अनुभवला कारण लग्नेश सहाव्या भावात आहे.
मला प्रतिक्षा आहे दापोली अपघातात सही सलामत वाचलेल्या श्री सावंत देसाई यांच्या जन्मकुंडलीची. कारण या अपघातात प्रत्यक्ष दर्शी वाचलेले ते एकमेव आहेत. या अपघातात मृत्यु पावलेल्या चार जन्मकुंडल्या मिळालेल्या असून जर अजून सर्व मिळाल्या तर हे संशोधन खात्रीने एका निष्कर्शाप्रत पोहोचेल.
ज्या दापोली अपघातात मृतांच्या कुंडल्या मिळाल्या आहेत त्या सर्वांच्या कुंडलीत लग्नेश सहाव्या भावात नाही परंतु अजून एक फ़ॅक्टर जो कॉमन आहे त्याची पुष्टी अजून काही कुंडल्या मिळाल्या म्हणजे होईल.
दापोली अपघातात मृत पावलेल्यांच्या जर सर्वांच्या जन्मकुंडली मिळाल्या तर खालील निष्कर्ष निघू शकतील.
१) लग्नेश सहाव्या स्थानी असता व्यक्ती अपघातात सापडतो. लग्नेश कोणताही ग्रह असेल तर असे घडेल की फ़क्त मंगळ यावर अजून अभ्यास बाकी आहे.
२) लग्नेश सहाव्या स्थानी असता अपघातात मृत्यु येण्यासाठी अजून कुठला ग्रह कारणीभूत असतो ?
३) लग्नेश सहाव्या स्थानी असता अपघाताचे योग कोणत्या दशेत आणि अंतर्दशेत येऊ शकतो ?
आशा करुया की ह्या सर्व जन्मकुंडली आपल्यास मिळतील आणि अपघातात मृत होण्याचे किंवा वाचण्याचे कोणते ग्रह योग असतात हे कोडे सुटेल

श्री सुनिल भातखंडे |

अप्रतिम आणि मुद्देसूद लेख लिहिला आहे, जमल्यास इतर जीवित आणि मृत मित्रांच्या कुंडल्या मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. लवकरच मिळतील अशी आशा आहे. तुमच्या भावी संशोधनास हार्दिक शुभेच्छा..!!
ReplyDeleteअतीशय सुंदर विश्लेषण सर
ReplyDelete