आयुष्यातील कलेची वाटचाल


ही कुंडली एका स्री जातकाची आहे. तुळ हे वायु तत्वाचे लग्न असल्याने ५व९ स्थानात वायुतत्वाच्या राशी आल्या आहेत .डोक्याच्या स्थानात बौध्दीक राशी असल्याने बुध्दीमत्ता अुत्तम च आहे.शुक्राचे लग्न स्वाती नक्षत्रात असल्याने बुध्दी बरोबर सौंदर्य लाभले आहे.

हे सौंदर्य अनेक प्रकारचे आहे. भाग्यातल्या , कारक स्थानातल्या गुरुची शुभ दृष्टी लग्नातील उच्चीच्या शनिवर , सातवी दृष्टी लग्नेश शुक्रावर आहे. नववी दृष्टी पंचमातील रविवर आहे जो कलेच्या स्थानात स्थीत आहे.सात्वीक सौंदर्य , अुत्तम लिखाण,हाताशी संबंधीत कला , खेळ याचा शुभ फलादेश मिळाला आहे.मी या जातकाच्या आयुष्याचा आढावा घेतला व महादशे नुसार तृतीय स्थान पराक्रमाचे , पंचम स्थान कलेचे , हे कार्येश झाले हे नमुद करायचे आहे.

हे जातक लहान मुलगी असताना, म्हणजेच राहु महादशेत शनि अंतरदशेत१९६२–६४ या वर्षात ८/९ वर्षा पासून सुंदर रांगोळ्या घालीत असे.हलव्याचे दागिने व रुखवताच्यावस्तु बनवीत असे . राहु पराक्रमात कारक स्थानात तृतीयातआहे. शनि अंतर्दशेतच कां ? तर शनि शुक्राच्या राशीत असुन तृतीयेश गुरुच्या विशाखा नक्षत्रात आहे. राहु भाग्यातील गुरुच्या शुभ दृष्टीत आहे. विशाखा नक्षत्रातील शनि एका कलाकारास शुभ फल कले बाबत देतो यावर प्रथम माझा विश्वासच बसला नाही. सर्वसाधारण पणे माझ्या मते लग्नेश तृतीयात किंवा तृतीयेश लग्नात असल्यास   पराक्रमास लवकरच सुरवात होते. काहीतरी वैशीष्ठ असतेच.





मुळात या जातकाच्या कुंडलीत कलेचा योग जबरदस्त आहेच .कलेचा कारक ग्रह शुक्र आहे. तरिही शुक्र कोणत्या ग्रहांच्या संबंधात येतो ,नक्षत्रात असतो ,त्या ग्रहाच्या व नक्षत्र स्वामीच्या अमला खाली असणा-या कला येतात व त्यांच्या महादशा अंतरदशेत संबंधीत घटनां आयुष्यात घडतात.

हिचे लग्न शुक्राचे असुन स्वाती या कलोपासक नक्षत्रात आहे. मिनेचा नवमांश मिळाला. इथे लग्नात शनि व नेपच्युन दिसले तरी कोमल शरीर , कलोपासक मेंदु , व शनि नेपच्युन गुरु दृष्ट अतिंद्रीय शक्ती असेल .पंचमाच्या लाभात तृतीयस्थान पराक्रमस्थान आहे.अतीशय   महत्वाचे पंचमेश शनि उच्चीच्या राशीत उच्चांशात आहे.पंचमस्थान कलेचे आहे.पंचमात शनिची कुंभ राशी असून तीत रवि आहे. रवि लाभेश असुन पराक्रमातील राहुच्या शततारका नक्षत्रात गुरुच्या दृष्टीत आहे.शुक्र शनि लाभयोग ,राहु मंगळ नवपंचम योग ,शुक्र नेप, रवि नेप, राहु नेप यांच्या शुभ योगाने कामात लिखाणात ,पेंटींग मधे  ,मुर्ती बनवण्यात, फोटोग्राफीत तरलता येते.निसर्गाची ओढ असतेच.या व्यक्ती कलाकुसर करण्यात रममाण होतात.

याचा शोध घेण्यास कुंडलीतले लग्न ,लग्नेश,चंद्र , चंद्राचे नक्षत्र , रवि, रविचे नक्षत्र व जो प्रश्न असेल त्याची कारक स्थाने व कारक ग्रह यांचा विचार करावा लागतो. पराक्रमेश गुरु भाग्यात आहे.मिथुन या बुधाच्या वायुतत्वाच्या राशीत असुन कारक स्थानात असल्याने अनेक कला, अनेक मैदानी खेळ , हाताचे खेळ यात प्राविण्य मिळाले. राहु महादशेत केतु अंतरदशेत व रवि अंतरदशेत शुभ फल मिळाले कारण रवि व केतु राहुच्याच नक्षत्रात आहेत.

मैदानी खेळ - कब्बडी , बॅडमिंटन , टेबल टेनीस या खेळात रविच्या अंतरदशेत कॅप्टन चे पद भूषविले .भरपूर यश मिळाले.  १९७७ नोव्हेंबरला गुरु महादशा सुरु झाली . त्यावेळी असे अढळून आले की गुरुचे नवमस्थान , पराक्रम स्थान धनुराशी ,व शष्ठ स्थान मीनराशी ही स्थाने कार्येश झाली .त्याच बरोबर जे ग्रह गुरुच्या नक्षत्रात आहेत , त्या ग्रहांची स्थाने कार्येश झालीत .
१९७८ ला जातकाचा विवाह झाला . गुरु महादशा गुरु अंतरदशा असताना विवाह झाला.१९७९ मधे गरु अंतर गुरुत प्रथम संततीचा जन्म झाला . गुरु अंतर बुध व चंद्र विदशेत द्वितीय संतती लाभली. गुरु संततीचा कारक ग्रह आहेच परंतु चंद्र पंचमारंभावर असल्याने चंद्र अंतरदशा व बुध विदशेत द्वितीय संतती झाली . गुरु मिथुनेत असल्याने व बुध चंद्राच नक्षत्रात असल्याने हा योग आला.१९८३ला जन्म झाला.

१९८७ ला ज्योतिष शास्राच्या अभ्यासाला सुरवात केली ती ही गुरु - शुक्र-विदशा राहुचीच होती . राहु मूळ या केतूच्या नक्षत्रात असुन केतू नवमात गुरु बरोबर मिथुनेत असल्याने या अभ्यासास सुरुवात झाली. मिथुनेतल्या पुर्नवसु नक्षत्रातील गुरुचे तेवढ्यावर समाधान न झाल्याने अनेक पध्दतीने ज्योतिष शास्र शिकले ते मुळा पासून अभ्यासण्यास.

१९८९मधे रविच्या अंतरदशेत पुन्हा कॅनव्हासवर ऑईल पेंटींगला सुरुवात झाली.पंचमातील रवि राहुच्या शतारका नक्षत्रात असल्याने अुत्तम प्रकारे रंगकला उदयास आली.लहान दोन मुलांचे संगोपन करतानाआपली आवड जपणारे मनं व आपल्या ईच्छे प्रमाणेकाम करत , कितीही अडचणी आल्या तरी हे जातक कलाप्रेमी असल्याने कष्टाने रंग काम अवगत केले. याला कारण तुळेचा शनि सातत्य देणारा , मेषेचा मंगळ शक्ती व उर्जा व गती देणारा,पंचमातील कुंभेचा रवि यश देणारा, भाग्यातला गुरु उच्च कला - अभिरुची देणारा.शनि-रवि-गरु हा महा त्रिकोण योगविलक्षण फल देऊन गेला.पराक्रमातील राहु शुक्राने प्रत्यक्ष काम केले.नवनवीन कल्पना सुचवणारा हर्षल दशमात असलातरी तो नवमात चलित झाल्याने नवमाचेच फल देताना दिसतो.हर्षल गुरुच्याय नक्षत्रात आहे.
हे जातक गणपती गौरी स्वत: हाताने बनवते.सजावट स्वत: करते.येवढेच काय तर एकदा केळफुलाच्या लालकाळपट पानांची अशी रचना केली की लोक थक्क झाले होते. कच-यातून कला शिकवणारा शनिच आहे. श्रवण नक्षत्रातील बुध कल्पनेच्या भरा-या मारणारा आहे.

२२/११/१९९३ ला शनि महादशा सुरु झाली नी या सगळ्यावर वरकडी केली. या महादशेत व शनि अंतरदशेत फक्त देवादिकांचीच चित्र काढली .तुळजाभवानी, माहुरची रेणुका, वणीची सप्तशृंगी ,औंधची यमाई, पांडुरंग स्वामी महाराज ,गणपती कारण शनि गुरुच्या नक्षत्रात आहे. या योगाचा संबंध कुंडलीतील १-५-९ स्थाने आहे.शनि, नेपच्युन , गुरु , रविशी आहे.यात स्वत:च्या कल्पना वापरल्या , याचा अर्थ उच्चीचा शनि शांतपणे मनां प्रमाणे वागतो. तृतीयेश गुरु -राहु कार्येश होतात , शनिने काम करवले, रवि राहु शुक्राने सौंदर्य ओतले.
हे लक्षात आले की मकरेचे जातक भरपूर ताकद , भरपूर कष्ट , भरपूर चिकाटी , हौस निटनेटकेपणा , वेळेची पाबंदी लक्षात ठेऊन काम पूर्ण करते.

२२/११/२०१२ला बुधाची महादशा सुरु झाली.बुध भाग्येश , व्ययेश असून सुखस्थानात कारक स्थानात स्थीत आहे.बुधाने वाक् चातुर्य दिलेच होते आता लिखाणाला सुरुवात झाली. भाषणासाठी निमंत्रणे येऊ लागली.श्रवण मधील बुध कल्पनेचे प्रवास व खरेाखर प्रवास करायला कारण झाला. दिवाळी अंकात लेख येऊ लागले , कविता लिहील्या जाऊ लागल्या, बुधा प्रमाणे विषय वेगवेगळे असत.नवमांश कुंडलीत बुध -हर्षल पंचमात आहेत . पुन्हा एकदा पंचमाचा भाव वधारला. कविता कधी भावनीक तर कधी प्रेमाच्या अथवा वास्तवतेवर निराश रंग असतो कारण चंद्र शनिच्या राशीत आहे . धनिष्ठा मंगळाच्या नक्षत्रात असल्याने लिखाणात बेधडपणा दिसतो . परंतु अतिरंजीत पणा नाही कारण गुरु असेल .
बुधाच्या महादशेत शुक्राच्या अंतरदशेत पेंटींग मधे विविधता आली . अॅबस्ट्रॅक केले गेले . बुक मार्कर तरी वेगवेळ्या क्लुपत्या वापरुन केलेत .निमंत्रण पत्रिकांचा कोरा पेपर वापरुन पेंट केले .मुळात शनिची मकर राशी त्यात बुध मकरेला शनि लग्नात जातकाला झाडांची खूप आवड , नवीन कल्पनेने कागदात झाडे लाऊन वाढवली सुपीक डोके वापरले.

या तुळ लग्नाच्या कुंडलीला गुरु अनिष्टतम फल देणारा असला तरी गुरु नवमात कारक स्थानात असल्याने कोणताच त्रास झाला नाही. लग्नातील शनि नेप , भाग्यातील गुरु केतु ने जातकास आध्यात्मीक ज्ञान दिले.स्वामी सेवा गुरु सेवा घडवतोय.कोणत्याही कामातून मोबदल्याची अपेक्षा नाही.१/५/९ स्थानातील वायुतत्वाने वेळोवेळी देश - परदेश प्रवास घडले.हे गुरुने दिलेले भाग्य आहे. ही स्थान हानी नक्कीच नाही.शिकवण्याची कला व शिकण्याची ईच्छा गुरुमुळेच , वायु तत्वातील गुरु - शनि- रविच यास कारण झालेत. एकंदरीत काय तर आयुष्यात शुभ अशुभ घटनां  घडतातच परंतु समतोल राखणा-या तुळेने व लग्नातील शनिने जातक भावनां व वास्तव यावर समतोल साधु शकतो. चंद्र राशी स्वामी लग्नात उच्चीचा असल्याने जातकास विशेष फल मिळाले आहे.
                                                                         ।।शुभं- भवतु ।।

सौ सुषमा घाटे
९९८७९०३५२७

1 comment:

  1. अतिशय सुंदर विश्लेषण मॅडम

    ReplyDelete