राहू - एक छलिया ?


पत्रिकेतील राहू, केतू हे ज्योतिषी लोकांचे आणि जातकांचे आवडते विषय. जातक कोणतीही समस्या ज्योतिषाकडे घेऊन आला की पहिले पत्रिकेतील राहूची स्थिती बघायची ही जुन्या ज्योतिषांची आवडती सवय. मग लगेच पत्रिकेत कालसर्प दोष, ग्रहण योग, शाप योग इत्यादी शोधले जायचे. विद्यमान कालातही राहू महादशेने ग्रस्त जातक ज्योतिषांकडे सतत धावतांना दिसतात. तर अशा सर्वव्यापी राहुविषयी आपण जाणून घेऊ.

राहू या छायाग्रहाची उत्पत्ती कशी झाली ? दैत्यांनी अमृत प्यायले मग विष्णूने राहूचे मस्तक धडावेगळे केले वगैरे कहाण्या सर्वश्रुत आहेत. या कथांची इथे पुनरावृत्ती नको. आपण या लेखात मुख्यतः राहूच्या कार्यकत्वाची, त्याच्यापासून होणाऱ्या फायद्यातोट्यांची चर्चा करूयात. साधारणपणे शनी हा ग्रह एकदम आपटवणारा आहे म्हणजे सडन डेथ देणारा आहे तर राहू हा छळून छळून मारणारा ग्रह आहे. पारंपारीक ज्योतिषात राहूला शनीची छाया मानले जाते पण हे खूपच सरसकटीकरण झाले. राहू हा ज्या ग्रहाच्या युतीत असतो त्याच्या कार्येशत्वात बाधा आणतो परंतु आमच्या संशोधनात पत्रिकेत राहू, शनी युती असता राहू शनीच्या कार्येशत्वात बाधा आणत नाही असे आढळून आले आहे. कृष्णमूर्ती गुरुजींनी Nodess are stronger than Planets असे म्हंटले आहे आणि त्याचा राहू, केतू महादशेत हमखास प्रत्यय येतो

आपण आता राहूचे पत्रिकेत येणारे अनुभव बघुयात. हे अनुभव मुख्यतः राहू महादशेत जोरदार येतात परंतु विशिष्ट भावातील राहूची फळे लाईफटाईम लक्षात राहतील अशी असतात. केपी पद्धतीप्रमाणे राहूचे कार्येशत्व काढून ते फल महादशेत मिळेल असे सांगितले जाते मात्र राहू कुठेही, कसाही असला तरी त्याची काही फळे कॉमन असतात जी राहू महादशेत अनुभवाला येतातच. या फळातील सगळ्यात मुख्य फळ म्हणजे फसवणूक. राहू महादशेत पदोपदी फसवणूक होते. सुरुवातीला जातकाच्या ते लक्षातच येत नाही. नंतर लक्षात आल्यावर जातक सावध होतो मात्र वारंवार इतर लोक या महादशेत जातकास फसवण्यासाठी संधी शोधत असतात. त्यामुळे राहू महादशेत जातकाने अशा लोकांपासून आणि कोणतेही पैशांचे व्यवहार करतांना अत्यंत सावध रहावे. राहू महादशेत अनुभवास येणारे दुसरे महत्वाचे फळ म्हणजे तणाव. राहू महादशेत जातक सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावाखाली असतो. राहूची इतर फळे म्हणजे राहू मुख्यतः जातकाला पोटाशी संबंधित छोटेमोठे विकार देतो. उदा. अपचन आणि गॅसेस. राहू महादशेत जातक नेहमी या विकारांने त्रस्त असतो. राहू महादशेत येणारा अजून एक सामान्य अनुभव म्हणजे जातकाला प्रकृतीचे त्रास होत रहातात मात्र बऱ्याचदा त्याचे निदानच होत नाही, कोणतेही औषध त्यासाठी लागू पडत नाही. अशा वेळेस अंतर्दशा बदलली म्हणजे हा त्रास कमी होतो मात्र नक्षत्राच्या माध्यमातूम जातकाला अष्टम स्थानचे फळ मिळत असेल आणि प्रत्यंतर दशा देखील , १२ आणि मारकेश स्थान दाखवत असेल तर जातकाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. राहू हा मृत्यूचा कारक नाही. त्यामुळे (जातकाने आत्महत्या केली नाही तर) राहू महादशेत सहसा मृत्यू होत नाही पण उत्तरायुष्यात राहू महादशा चालू असेल आणि आधी सांगितल्याप्रमाणे ,१२ स्थानं कार्यान्वित झाली असतील तर जातकाचा विपन्नावस्थेत मृत्यू होऊ शकतो

राहूचे अजून एक मुख्य फळ म्हणजे आळशीपणा. जातकाला कामावर जायची इच्छाच होत नाही. दिवसेंदिवस घरातच बसून राहतो तो. राहू महादशेत जातकांनी नोकरी गमावण्याचं हे एक मुख्य कारण आहे. राहूचा अजून एक गुणधर्म म्हणजे तो जातकाला बोल्ड (धाडसी) बनवतो. राहू महादशेत बऱ्याच जातकांना शेळीचा वाघ बनलेले अस्मादिकांनी पाहिले आहे. हाच राहू पत्रिकेत जास्त खराब असेल तर जातकाचा खोटेपणा करण्यामागे कल वाढतो. खोटे डॉक्युमेंट्स, खोटी मृत्युपतत्रं वगैरे बनवली जातात. पत्रिकेत चोरीचे कुयोग असतील तर जातक चोरी देखील करायला लागतो. माझ्या ओळखीचे एक उद्योगपती अचानक पंचतारांकित हॉटेल्समधून चमचे वगैरे चोरायला लागले. त्यांनी आमच्याजवळ अपराधी भावना व्यक्त केली असता आम्ही सहज म्हणून त्यांची पत्रिका बघितली तर राहू महादशा, अंतर्दशा चालू झालेली आढळली. राहू आणि नीचेचा मंगळ ही युती माणसाला हिंसक आणि दहशतवादी बनवते

राहूचे जसे अवगुण आहेत तसेच राहू काही बाबतीत फायदा देखील करून देतो. जसं की परदेशात सेटलमेंट. राहू ,१२ चा बलवान कार्येश असेल तर जातक राहू महादशेत नक्की परदेशी सेटल होतो. इतर वेळेस हुकलेल्या संधी राहू महादशेत नक्की चालून येतात. मात्र राहू हा फसवणुकीचा देखील कार्येश असल्यामुळे जातकांनी एजंट लोकांना वगैरे पैसे देतांना १० वेळा विचार करावा. वर म्हंटल्याप्रमाणे राहू जातकाला धाडसी बनवतो. राहू महादशेचा फायदा घेऊन जातकांनी जी काम धाडसाची आहेत ती जरूर करून घ्यावीत. जसं की एखादी रिस्क घेऊन धंद्यात उडी मारणे, आपल्या आवडत्या मुलीला प्रपोज करणे, वगैरे (फक्त हे करतांना स्वतःचा मी टू होऊ देऊ नये याची काळजी घ्यावी). :)
अजून एक महत्वाची बाब म्हणजे हा राहू जर ,,१०,११ चा बलवान कार्येश असेल तर जातकाला नक्कीच करोडपती बनवतो. अर्थात यासाठी आणि ही स्थाने देखील महत्वाची.

तर अशा या खतरनाक राहू महादशेत बचाच कसा करावा हा प्रश्न ज्योतिषांना नेहमी विचारला जातो. राहू महादशेत करावेत असे काही उपाय म्हणजे कालभैरव अष्टक वाचणे, दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे, श्री हनुमान वडवानल स्तोत्राचे वाचन करणे, इत्यादी. उत्तरेकडचे ज्योतिषी राहू महादशेत राहूचे रत्न गोमेद घालायला सांगतात. मात्र हा राहू ,,१२ चा बलवान कार्येश असेल तर जातक उद्धवस्त झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे गोमेद हे रत्न १० वेळा विचार करूनच वापरावे. आमचे ज्येष्ठ ज्योतिषी मित्र श्री नितिन जोगळेकर हे राहू महादशेत सूर्योपासना सुचवतात. हा देखील एक चांगला उपाय आहे. मात्र राहू कशाने शांत होईल किंवा कुठल्या उपायांनी राहू चांगले फळ देईल याची गॅरंटी नाही. बऱ्याचदा कुठल्याच उपायांनी राहूला फरक पडत नाही. तेव्हा राहूची महादशा भोग भोगून संपवणे हाच राहू महादशेवरचा हमखास उपाय आहे

ज्या जातकांना राहू महादशा चालू आहे त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा. लेखावरील आपला अभिप्राय नक्की कळवा. शुभं भवतु

डॉ. सचिन कुलकर्णी


10 comments:

  1. खूप योग्य शब्दात, भरपुर माहिती मिळाली सर. धन्यवाद!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्रज्ञाजी.

      Delete
  2. Replies
    1. धन्यवाद सारंगजी.

      Delete
  3. Very nice information First time i got clear information 👌👌👍👍

    ReplyDelete
  4. अतिशय उपयुक्त माहिती

    ReplyDelete
  5. Excellent writting... currently I am going through rahu dasha which is getting over from Nov 18. Got lot of information about Rahu....keep it up and keep writing

    ReplyDelete
  6. सचिन,
    खूप छान, योग्य त्या शब्दात, आणि ज्योतिषी शब्द कळत नसलेल्या जातकाला समजेल अश्या पद्धतीने लिहिलेली माहिती. देव तुझे भले करो.

    ReplyDelete
  7. खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग माहिती,मी सहज माझी पत्रिका बघितली आणि मलाही 2009 पर्यत राहू महादशा होती.त्या दरम्यान मला अगदी विनाकारण पोलीस चौकशी ला सामोरे जावे लागलेले, आणि त्याच वेळी निकाल खराब लागल्यान अगदी इंजिनीअरिंग सोडायची तयारी केलेली.पण कदाचित तेव्हा मी दर शनिवारी मारुती चे दर्शन घेयचो त्यामुळे थोडक्यात निभावले असावे. असो सामान्य लोकांना समजेल अशी माहिती दिलीत.दिवाळी अंक देखील छान आहे.आपणास दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  8. धन्यवाद...खरं आहे ....
    १.राहूचे अजून एक मुख्य फळ म्हणजे आळशीपणा.
    २.राहूचा अजून एक गुणधर्म म्हणजे तो जातकाला बोल्ड (धाडसी) बनवतो
    ३.राहूची फळे लाईफटाईम लक्षात राहतील अशी असतात.

    राहू अशी वाट लावतो की अजून काय वाट लावायची बाकी आहे, असा एटीट्युड तयार होतो. आणि तो जातक बोल्ड च होऊन जातो.
    हाता तोंडाशी आलेला घास जातो कायम ..नेहमीच.

    राहू महादशेत.. घंटानादाचा त्रास होतो. ईश्वरी स्पंदनांची ओढ च नसते...फुल्ल गुंडा बनवून टाकतो.

    या राहूला कुणीच टफ-फाईट देत नाय... गप्प भोगायचं बस्स...

    फायदा तसा एकच ...राहू महादशेनंतर माणूस , चांगली माणस ओळखण्यात जामच हुशार होतो...

    ReplyDelete