नमस्कार !
हरी ओम, ज्योतिषप्रेमी
लोकहो, खासकरुन
राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर महिन्याचे राशीभविष्य
हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७ तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत
जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे
राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.
या महिन्यात रवि अर्थात सुर्य १५ जानेवारीला २०२० ला मकर
राशीत जाणार आहे
३१ जानेवारी २०२० ला बुध कुंभ राशीत जाणार आहे.
३ फ़ेबृवारी २०२० ला शुक्र मीन या स्वत:च्या उच्च राशीत
जाणार आहे.
८ फ़ेब्रुवारी २०२० ला मंगळ धनु या अग्नितत्वाच्या राशीत
जाणार आहे.
याशिवाय सर्वात मोठा ग्रह राशीबदल या महिन्यात शनिचा आहे.
२४ जानेवारीला शनि मकर राशीत जाणार आहे. यामुळे वृश्चिक
राशीची साडेसाती संपुन कुंभ राशीला सुरु होणार आहे. यासाडेसातीचा त्रास धनु, मकर आणि
कुंभ राशीला कसा होईल हे सांगणार्या व्हिडीओ मी युट्युब वर प्रसिध्द केल्या आहेत. त्याची
लिंक या प्रमाणे खाली पहा.
साडेसाती- कुंभ राशीच्या लोकांना काय अनुभव येईल ?
साडेसाती- मकर राशीच्या लोकांना काय अनुभव येईल ?
साडेसाती- धनु राशीच्या लोकांना काय अनुभव येईल ?
१५ जानेवारी
२०२० ते १२ फ़ेब्रुवारी २०२० या काळात रवि, बुध, शुक्र, मंगळ आणि शनि राशीबदल करणार आहेत. चंद्र
दर सव्वादोन दिवसांनी राशी बदलतो. यामुळे महिन्याच्या राशीभविष्यात त्याचा स्वतंत्र
अंतर्भाव मी करत नाही. पण चंद्राशी होणारे महत्वाचे ग्रहयोग लक्षात घेऊन प्रत्येक राशीचे
राशीभविष्य लिहीतो. आता पाहू राशीनिहाय
भविष्य. हे भविष्य आपण आपल्या लग्नकुंडली मधील लग्नराशीप्रमाणे पहा. ज्यांना लग्नराशी
माहित नाही त्यांनी चंद्र राशीकडून पहा.
कर्क रास:
आपल्या राशीला ३ फ़ेबृवारी पर्यंत अचानक धनलाभाचे
योग आहेत. हे धन अचानक बक्षीस मिळाल्यामुळे किंवा लॉटरी मुळे इत्यादी मार्गाने होऊ
शकेल. २७ जानेवारीला हे धन गुप्त मार्गाने येईल. याचा अर्थ आलेले धन कसे आले याचा शोध
आपल्याला लागणार नाही. कदाचित एखाद्या व्यक्तीने आपल्याला पुर्वायुष्यात फ़सवले असेल
तर त्याचा आता पश्चात्ताप होऊन असे धन तो परत करेल पण ते या व्यक्तीने दिले हे आपल्याला
समजणार नाही. असेही या महिन्यात कुटुंबासाठी
काही अनपेक्षित खर्च करावे लागणार आहेत त्याची सोय होईल. २७ जानेवारीला घरातील काही
व्यक्तींच्या वर्तनाने मानसीक त्रास होणे काहींना संभवते.
आपली मुले खेळाडू असतील तर या महिन्यात त्यांना
यश मिळेल. पण क्रिडा स्पर्धांचा अनावश्यक ताण होऊन ती आजारी पडणार नाहीत ना अशी काळजी
करावी लागेल. कर्क राशीच्या लोकांना आपल्या वैवाहीक जोडीदाराशी किरकोळ वादावादी होणे
या महिन्यात संभवते. व्यवसायातील भागीदाराशी सुध्दा काही कारणाने संघर्ष होईल असे काही
कर्क राशीच्या लोकांना फ़ळ मिळेल.
आपल्या राशीला भावंडांशी सुध्दा या महिन्यात
संघर्ष होणे काहीच्या बाबतीत घडू शकेल. एका बाजूला वैवाहीक जोडीदाराशी, धंदयातल्या
भागीदाराशी, महिन्याच्या शेवटी भावंडांशी संघर्ष यामुळे या महिन्यात अनेकदा मानसीक
क्लेश होणे असे घडेल. यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होऊन आजारी पडणे संभवते. काही वेळा
संघर्ष हे टाळणे शक्य नसते परंतु मानसीक स्थिती मात्र प्राणायाम केल्याने , खास करुन
अनुलोम -विलोम सारख्या प्राणायामाने नियंत्रणात ठेवणे शक्य असते.
हे लक्षात ठेवले तर महिना चांगला
नसला तरी फ़ारसा खराब जाईल असे नाही.
सिंह रास:
आपल्या राशीचा स्वामी रवि अर्थात सुर्य महिनाभर
मकर याराशीत सहाव्यास्थानी मुक्काम करुन असणार आहे. मकर या शत्रु राशीत तसेच सहाव्या
स्थानी दैदिप्यमान सुर्याला जरा नमते घ्यावे लागते. आपल्या आरोग्याची काळजी महिनाभर
घ्यावी लागेल. आपल्या आरोग्याचे परिक्षण करुन औषधाचे डोसेस कमी जास्त करावे लागतील
तसेच पथ्य पाळून राहील्यास फ़ारसा त्रास संभवणार नाही. याच सोबत या महिन्यात कोणत्याही
क्षेत्रात आपला पराभव होणार नाहीना आणि कुणी अपमान करणार नाहीना या कडे विशेष लक्ष
द्यावे लागेल. अन्यथा आरोग्य बिघाड होण्याने जितका त्रास होईल त्यापेक्षा जास्त त्रास
कुणी कुरघोडी करुन आपल्याला हार पत्करायला लावली किंवा आपला अपमान केला यामुळे होऊ
शकते.
या महिन्यात काही जणांचे अनेकांशी विनाकारण वाद
होणे अपेक्षीत आहे. महिन्याच्या उतरार्धात भावंडांमुळे चिंता लागून राहील. नोकरी करणार्या
लोकांना सुध्दा असेच अनुभव येतील. सरकारी नोकरांनी आपले वर्तन तपासणे अपेक्षीत आहे
अन्यथा खातेनिहाय कारवाईस तोंड द्यावे लागेल.
या महिन्यात मित्रांना हात उसने पैसे शक्यतो
देऊच नका. अन्यथा हे पैसे परत येण्याची शक्यता नाही. आधीच पैसे दिले असतील आणि परत
देण्याची वेळ टळून गेली असेल तर तगादा लाऊन पोस्ट डेटेड चेक घ्या. काही नाही तर प्रॉमीसरी
नोट घेऊन ठेवा जेणेकरुन तोंडी व्यवहाराला लेखी झाल्याने महत्व प्राप्त होईल. या महिन्यात
कुणालाही जामिन रहाण्याआधी अनेकदा सर्व बाबी तपासा.
सिंह राशीला राजयोग कारक असलेला मंगळ महिन्याच्या
सुरवातीला विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती देईल. महिन्याच्या शेवटी मोठी पदवी साठी
मिळवण्यासाठी मार्ग सापडेल आणि पदवी आपल्याला जवळ जवळ मिळाली आहे असा आत्मविश्वास प्राप्त
होईल. जे लोक शिक्षण क्षेत्रात आहेत त्यांना मोठे यश मिळणे या महिन्यात अपेक्षीत आहे.
्काहींना शिक्षणासाठी परदेश गमन करण्याची संधी चालून येईल. अनेक व्यक्तींना या महिन्यात
सर्व प्रकारचे सुख मिळणे, शांत झोप लागणे , अनेक गोष्टी मनासारख्या होणे यासारखी फ़ळे
मिळू शकतील.
हा महिना अनेकांना फ़ारसा चांगला
नाही. काही लोकांनाच बरा जाणे अपेक्षीत आहे.
कन्या रास:
आपल्या राशीचा मालक बुध या महिन्यात सुरवातीला
पंचमस्थानी आहे आणि नंतर तो सहाव्या स्थानी ३१ जानेवारी नंतर जाणार आहे, बुध पंचमात
असताना संतती आपण केलेल्या कृती मुळे आपल्यावर खुष होईल. ३१ तारखेनंतर मात्र लग्नेश
आणि दशमेश सुध्दा सहाव्या स्थानी गेल्यामुळे अनेकांना नोकरी मिळेल. नोकरीत अपेक्षीत
घडेल पण थोडासा संघर्ष करुनच मिळेल. हा संघर्ष बुध्दीमत्तेचा परीचय देण्याचा असेल.
आपल्या प्रेझेंटेशन मधे अडथळे येणार नाहीत ना या कडे लक्ष द्या.
या महिन्यात कानाचे आरोग्य या कडे काहींना लक्ष
द्यावे लागेल. हिवाळ्यात थंडी लागून सर्दी होणे आणि सर्दी मुळे कानदुखी होणे किंवा
अपघाताने कानाचे आरोग्य बिघडू नये या साठी अनेकांना लक्ष द्यावे लागेल.
काही विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे आल्यामुळे
शिक्षण सोडावे लागेल किंवा आपल्या राशीच्या मुलांच्या शिक्षणात काही अडथळे येत आहेत
याची जाणीव या महिन्यात काहींना होईल.
३ फ़ेबृवारी २०२० पर्यंत आपण कोणाचा सल्ला घेतो
आहे, तो किती उपयुक्त आहे याचे भान ठेवावे लागेल अन्यथा चुकीचा सल्ला घेऊन केलेल्या
गुंतवणुकीतून अपेक्षीत लाभ होणार नाही. अविवाहीत लोकांना उत्तम स्थळे चालून येतील आणि
पौष आहे म्हणून विवाह संदर्भात बोलणी करायची नाहीत हा चुकीचा पायंडा टाळलात तर विवाह
ठरेल. ज्यांचा आधीच विवाह झालेला आहे त्यांना सासुरवाडीकडून भाग्योदय होऊ शकेल अश्या
संधी चालून येतील.
हा महिना अनेकांना काही बाबी
जसे सल्ला घेणे यावर लक्ष दिल्यास चांगलाच जाणे अपेक्षीत आहे.
छान माहिती .
ReplyDelete