केरळ राज्यातले पुरसंकट का आले ?

अनेकदा एखाद्या राज्यावर/शहरावर  पुरसंकट का येते हे शोधण्याचा मी प्रयत्न मागे केलेला आहे.

१) http://gmjyotish.blogspot.com/2017/10/blog-post.html
२) http://gmjyotish.blogspot.com/2018/06/blog-post.html

या दोन लेखांचा पुन्हा वाचन केले तर मी २०१८ मधे मुंबई जलमय होणार नाही असा अंदाज केलेला बरोबर आला २०२४ पर्यंत मुंबईला जलमय व्हायचा धोका नाही असे मी वरील लेखात लिहले आहे.

असे असताना केरळचा स्वतंत्र अभ्यास न केल्यामुळे किंवा केरळ जलमय होण्याचा ट्रेंड नसल्यामुले या संकटाचा मागोवा ज्योतिषशास्त्रात घेता आला नाही.

असे का झाले याचे कारण मात्र शोधणे शक्य आहे म्हणून हा लेख प्रपंच

केरळमधे १९३१ सालानंतर प्रथमच २०१८ सालाच्या १ ऑगस्ट ते २० ऑगस्ट कालावधीत ७७१ एम एम पाऊस पडला. या पैकी ३१० एम एम पाऊस एकट्या ८ ऑगस्टला पडला. यामुळे आलेल्या पुरात ४८३ लोक  मृत्युमूखी पडले तर १५ लोक बेपत्ता आहेत. १४ जिल्ह्यात रेड अलर्ट होता यावरुन हा पुर किती भयानक होता हे समजेल. १९३१ साली मात्र अनेक लोक मृत्युमूखी पडल्याची नोंद नाही.


१९३१ साली फ़क्त ऑगस्ट महिन्यात ११३२ एम एम पाऊस पडला होता त्यामुळे १९३१ साल आणि २०१८ सालचे ऑगस्ट महिने यांची ज्योतिषशास्त्रीय स्थिती सारखी असायला हवी. १ नोव्हेंबर १९५६ ला केरळ राज्याची निर्मीती झाली हे गृहीत धरुन कर्क लग्नाची केरळची पत्रिका मांडली असता १२ ऑगस्ट १९३१ तशीच ग्रहस्थिती आली.

१९३१ साली कोणत्या ऑगस्ट महिन्याच्या कोणत्या तारखेला सर्वात जास्त पाऊस पडला याची नोंद इंटरनेट वरील इतिहासात नाही. पण जेंव्हा जलराशीत चंद्रासह सर्वात जास्त ग्रह येतात त्या दिवशी पाऊस जास्त पडतो असा निष्कर्ष मी काढला आहे. या निष्कर्षावरुन हा दिवस १२ ऑगस्ट १९३१ हा असावा असे मानायला हरकत नाही.



१२ ऑगस्ट १९३१
८ ऑगस्ट २०१८





















कर्क लग्नाच्या कुंडलीत १९३१ साली कर्क या जलराशीत चंद्र, रवि, गुरु शुक्र तर मीन या जलराशीत राहू आणि हर्षल हे ग्रह होते तर सहाव्या स्थानी शनि वक्री होता ज्याची व्ययस्थानातल्या प्लूटो शी अंशात्मक प्रतियुती झाली होती.

कर्क लग्नाच्या २०१८ सालच्या कुंडलीत ८ ऑगस्ट २०१८ ह्या दिवशी कर्क ह्या जलराशीत चंद्र ,रवि, वक्री बुध व राहू हे ग्रह होते, तर शनि वक्री सहाव्या स्थानी व प्लुटो सुध्दा वक्री ह्याच स्थानी होता.

जलराशीत रवि, राहू , शनि सहाव्या स्थानी शनि वक्री अस समान स्थिती  होती तर १९३१ साली प्लुटो १२ व्या स्थानी शनिच्या प्रतियोगात आणि  २०१८ साली प्लुटॊ  सहाव्या स्थानी  शनिच्या सोबत ही सुध्दा अशीच स्थिती मानता येईल.

सहावे स्थान  अपघात, संकटे याचे आहे तसेच १२ वे स्थान हानीचे मानले जाते. १९३१ आणि २०१८ साली सहाव्या स्थानी शनि वक्री आणि प्लुटो यांचा संबंध या स्थानांशी आहे. शनि संकटे आणतो तसेच प्लुटो सुध्दा संकटे आणतो.

 या दोन्ही वर्षी या राज्यावर संकट आले ते जलराशीतील ग्रहांच्या अधिक्यामुळे आले. २०१८ मधे मनुष्य हानी  नोंद्ली गेली आहे. १९३१ साली ऑगस्ट महिन्यात २०१८ पेक्षा जास्त पाऊस झाल्याची इतिहासात नोंद आहे पण सुदैवाने इतक्या मोठ्या प्रमाणात मनुष्य हानीची नाही. याचे एक कारण असावे. २०१८ मधे केरळ मधील जनसंख्या १९३१ पेक्षा तीन पटी हून जास्त वाढल्यामुळे घरे नदीच्या प्रवाहाजवळ आली असावीत. हे जिथे जिथे नैसर्गीक आपत्ती आली तिथे घडले आहे. २०१३ मध्ये उत्तराखंड मधल्या दुर्घटनेत नदीच्या प्रवाहाच्या जवळची घरे जलमय झाली, वाहून गेल्याचे निष्कर्ष आहेत.

हे संशोधन पुर्ण झाले असे मानणे बरोबर नाही. या पुढील पावसाळ्यात सर्व राज्यांच्या कुंडल्या तपासून दरवर्षी कोणत्या राज्याला, शहराला पावसाळी संकटाचा धोका आहे हे शोधता येईल. जर हे शोधता आले तर आधीच इशारा देता येईल. अर्थात हा इशारा मानणे त्या प्रमाणे शासनाने कृती करणे याबाबत आग्रह धरता येत नाही. परंतु किमान धोका  आहे हे सांगता येईल असे वाटते. मी स्वत: ला मेदीनीय तज्ञ मानत नाही. यासाठी नक्षत्रप्रकाश वरील किंवा वाचकांपैकी मेदीनीय शाखेच्या तज्ञ लोकांनी आपली मते लेखाच्या खाली नोंदवावी.

No comments:

Post a Comment