हा लेख मी २८ अक्टोंबर २०१८ पुर्वीच म्हणजे नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१८ चा भाग म्हणून प्रसिध्द होण्यापूर्वीच ज्योतिषप्रेमी लोकांना वाचनासाठी उपलब्ध केला कारण एकतर तो लिहून तयार होता आणि गुरु बदल लगेचच होत होता. सर्व सदस्यांनी तो वाचून अनेक प्रश्न विचारले. एक प्रश्न होता गुरु बदल लग्न राशीकडून पहावा की चंद्र राशी कडून. उत्तर दोन्ही कडून पहावा. लग्नराशीकडून बदललेला गुरु काय घडेल ते दाखवतो तर त्याचे परिणाम तुमच्या मनस्थितीवर काय होतील हे चंद्र राशी दर्शविते यामुळे हा लेख दोन्ही कडून वाचावा. जर गुरु ४-८-१२ अर्थात अशुभ असेल तर काय करावे असा प्रश्न होता.
वधू -वरांना गुरु चंद्र राशीकडून ४-८-१२ असेल तर विवाह पुढे ढकलावा. नाईलाज असेल तर जप- हवन केल्याने तो अनुकूल होतो. ज्यांना गुरु ४-८-१२ येतो त्यांनी नियमीत गुरुवारी श्रीदत्तगुरु, श्रीसाईबाबा, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गजानन महाराज शेंगाव यांच्या मंदीरात आरती करावी, आरतीच्या वेळेस हजर रहावे. यांच्या गुरुचरित्र, श्री साईविजय किंवा श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करावे. ज्ञान दान करावे. ज्ञानी माणसांना त्रास देऊ नये. अपमानीत करु नये.
या शिवाय ज्यांना तीव्र त्रास जाणवेल अश्यांनी नवग्रहपीडाहर स्त्रोत्रातील गुरुचा मंत्र रोज म्हणावा तो असा आहे.
देवमन्त्री विशालाक्षः सदा लोकहिते रतः |
अनेकशिष्येसम्पूर्णः पीडां हरतु मे गुरु: ||
जेथे विद्यार्थी आहेत अश्या ठिकाणी हरबळा डाळ दान करावी याने पीडा कमी होते.
----------------------------------------------------------------------------------------------------------
राशीभविष्याच्या सोबत आणखी एक विषय लोकांना आवडतो आणि मोठ्या प्रमाणात चर्चेला येतो तो म्हणजे ग्रहांचे राश्यांतर किंवा एका राशीमधून पुढच्या राशीत जाणे. या वर्षीच्या दिवाळीच्या म्हणजे इंग्रजी तारीख ४-५-६-७-८-९ नोव्हेंबरच्या बरोबर एक महिना आधी गुरुचा राशीबदल होणार आहे. हा राशी बदल ११ अक्टोंबरला रात्री ०७-२० वाजता होणार आहे. नंतर गुरु २९ मार्च २०१९ ला धनु राशीत जातो. मग लगेचच १० ऎप्रिलला वक्री होऊन २२ ऐप्रिल २०१९ ला वृश्चिकेत येणार आहे. यानंतर गुरु ११ ऑगस्ट २०१९ ला मार्गी होऊन ४ नोव्हेंबर २०१९ ला धनु राशीत जातो.
गुरु, शनि, राहू, हर्षल, नेपच्युन आणि प्लुटो ह्या ग्रहांचे राशीबदल एका वर्षात एक राशी किंवा त्याही पेक्षा जास्त काळाने होतात. त्यांच्या कालावधी सर्वसाधरण पणे
असा असतो
गुरु - १३ महिने
राहू - १८ महिने
शनि - ३० महिने
हर्षल - ७ वर्ष
नेपच्युन - साधारण पणे १२ वर्षे
प्लुटो - साधारण पणे २० वर्षे
त्यामानाने चंद्र - २.२५ दिवस, बुध व शुक्र साधारण पणे २० ते २५ दिवस, रवि ३० दिवस आणि मंगळ ६० दिवस हे सहा वेगवान हालचाल करणारे ग्रह आहेत.
वरील कमी वेगाने राशी बदल करणारे सहा ग्रह जेंव्हा राशीबदल करतात यांचे बदल अनेक सामाजीक, आर्थिक, राजकीय इ. परिणाम अतिशय दृष्य स्वरुपात असतात.
११ अक्टोबरला होणारा गुरु बदल हा तुला ह्या शुक्राच्या राशीतून वृश्चिक या राशीत होणार आहे. तुला राशी ही अत्यंत समतोल, सौम्य, व्यापारी, कलासक्त राशी आहे. गेल्या वर्षभरातल्या महत्वाच्या घटना पाहिल्या तर व्यापाराला प्रोत्साहन मिळून भारतीय अर्थव्यवस्था नोटबंदीचे व जीएसटी सारखे बदल पचवून मजबूत झाली आहे. आज जगात कुठेही मंदी आहे अशी चर्चा नाही.
वृश्चिक राशी ही कुटनिती, कटकारस्थाने, द्वेष याला प्रोत्साहन देणारी आणि मंगळाची शक्ती बहाल करणारी राशी आहे. यातून गुरुचे होणारे भ्रमण बारा वर्षांनंतर होणार आहे. गुरु राजस वृतीचा, राजकारण आणि समाजकारणाचे नियंत्रण करणारा, सकारात्मक बदल वेगाने घडवणारा ग्रह मंगळाच्या राशीत आल्याने राजकीय हालचालींना वेग येईल. भाजप हा गुरुच्या अंमलाखालील पक्ष साम,दाम,दंड आणि भेद सर्वच निती वापरुन सर्वच निवडणुकात यश संपादन करताना वेगवान राजकीय हालचाली करुन सर्वांना चकीत करुन सोडेल. गुरु वक्री झाला म्हणजे ४ महिन्यांपेक्षा जास्त काळ असतो. भारतीय राजकारणात वक्री गुरुच्या कालखंडात मध्यवर्ती निवडणुका पार पडताना निकाल काय लागतो हे पहावे लागणार आहे. गुरुचा वक्री प्रवास हा जेष्ठा नक्षत्रात असल्याने राजकीय पटलावर बरेच काही घडणार आहे. राजकीय भविष्यावर
भाष्य करणे हा विषय नाही.
वृश्चिक राशी ही रसायने यांच्या उद्योगाला पुरक आहे त्यामुळे रसायन उद्योग वाढीला लागेल. वृश्चिक रास भारताच्या लाभस्थानी येत असल्याने परदेशांशी कूट नितीवर भारताचे नियंत्रण असेल. वृश्चिक रास जलराशी आहे त्यामुळे समुद्रमार्गावर नियंत्रण वाढेल. पेट्रोलवर नियंत्रण वाढण्यासाठी काही नविन करार भारताच्या फ़ायद्याचे होतील.
आता कोणत्या राशीला या गुरु बदलाने काय परिणाम घडतो ते पाहू. या ठिकाणी आपण फ़क्त गुरुचा विचार करत आहोत.
मेष रास: मेषेला गुरु आठवा होत आहे. आठवा गुरु येतो. हा गुरु अशुभ समजला जातो. यामुळे मेष राशीचे लोक जर धर्मकार्य करत असतील तर त्यात विघ्ने येतील. मेष रास धर्म कार्ये करते म्हणजे काय तर जेथे धर्मासाठी क्षात्र तेज वापरावे लागते अश्या कामात विघ्ने येतील. पोलिस आणि मिलीट्री यांना त्यांच्या शत्रुवर म्हणजे अनुक्रमे गुंड व परकीय आक्रमणे यांचा सामना करताना प्रचंड अडथळे येतील. लोकक्षोभाला सामोरे जावे लागेल.
परदेशात कार्यरत असलेल्या लोकांना तिथला पॉलीसीत बदल झाल्याने संकटे येतील. ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांना काही कारणाने पैसे जास्त खर्च होणे, विलंब होणे किंवा अडचणींचा सामना करावा लागेल. काही परदेशातील लोकांना युध्दजन्य परिस्थितीमुळे रेस्क्यु करुन भारतात आणावे लागेल. खासकरुन अरब देशात ही परिस्थिती जास्त संभवते.
मेष राशींच्या खास करुन परदेश आणि धर्मकार्य करणार्या लोकांना खास त्रास वर्षभर सहन करावा लागेल. एकंदरीतच सर्वच मेष राशीच्या लोकांना अनारोग्य, भाग्यहानी वरिष्ठाची गैरमर्जी, अंगीभुत कार्यात अडथळे याचा सामना करत काढावे लागेल.
ज्यांचा विवाह या वर्षात होत आहे त्यांनी विवाहापुर्वी आपल्या ज्योतिषाच्या सल्याने जप, शांती इ. आठव्या गुरुच्या साठी धर्मकृत्ये करुनच विवाहाला उभे रहावे. चंद्राकडून येणारा ४/८/१२ गुरु विवाहात अडथळे आणतात यास्तव नियोजन उत्तम असावे.
वृषभ रास : आपल्या राशीला गुरु सातव्या स्थानी येत आहे. जे व्यावसायीक केमीकल व्यापारी/उत्पादक आहेत त्यांच्या साठी अत्यंत उत्तम काळ असेल तसेच सागरी व्यापार करणारे, मर्चंट नेव्हीत काम करणारे यांच्या साठी काम वाढणार आहे. नेव्ही साठी उत्पादन करणारे, पाण्यातील क्रिडा संदर्भात व्यवसाय/उत्पादन करणारे यांच्या साठी अत्यंत उत्तम कालावधी वर्षभर असेल. तसेच १ ग्रॅम सोन्याचे दागीने किंवा इंडस्ट्रीमधे जिथे कुठे गोल्ड प्लेटींग लागते, पिवळा धातू लागतो जसे पितळ, ब्रांझ इत्यादी उद्योगात तेजी येईल.
सातवा गुरु एकंदरीत नव्या व्यावसायीक संधीत वाढ करणार असल्याने व्यावसायीक उलाढाल वाढणार आहे. वैयक्तिक स्तरावर अनेकांचे विवाह ठरतील किंवा होतील. ज्यांना एक संतती आहे आणि दुसर्या संततीची अपेक्षा आहे असे ह्या काळात निर्णय घेऊन द्वितीय संततीला जन्म देतील.
राजकारण किंवा समाजकारणावर भाष्य करणारे सिनेमा/ नाटके नव्याने निर्माण होऊन यात काम करणारे वृषभ राशीच्या कलाकारांना/ निर्मात्यांना चांगले यश मिळेल. पत्रकार नवनविन भानगडी लोकांच्या समोर आणून टी आर पी मिळवतील. यात अनेक वेळा खोटारडे पण असेल. तहलका सारखे स्टींग ऑपरेशन यांची वाढ होईल.
मिथुन रास : आपल्या राशीला गुरु सहावा येतो. त्यातूनही तो सप्तमेश सहावा आल्याने ज्यांचे वैवाहीक संबंध फ़ारसे चांगले नाहीत अश्यांना तणाव सहन करावा लागेल. वर्षभर आपल्या वैवाहीक जोडीदाराशी सुसंवाद घडणे दुरापास्त होताना दिसेल यास्तव कशावर बोलल्याने ताण होतो हे विषय टाळल्यास तणाव कमी होईल. वर्षभर असेच घडेल असे नाही पण एकंदरीत घटनांची बेरीज करता असे चित्र उपस्थित होईल.
या सर्व ताणामुळे डायबेटीस रोगी असलेल्यांना जास्त त्रास होण्याचा संभव असल्याने त्यांनी पथ्य, व्यायाम औषधे याकडे लक्ष द्यावे. सहाव्या स्थानातला गुरु हा दशमस्थानी तसेच दुसर्या स्थानी दृष्टी टाकतो यास्तव आपल्या नोकरीच्या ठिकाणी प्रमोशनचे योग येतील. हे वर्षभरात एकदाच होणार आहे. यास्तव वर्षभर आपले वर्तन तसेच परफ़ॉर्मन्स उत्तम राहील याकडे लक्ष द्यायला हवे. तसेच पैसे शिल्लक पडल्याने सोने, एफ़ डी यासारख्या संपत्तीमधे वाढ संभवते.
अनेकांना कुटुंबामधे एक जण वाढला असे दिसेल. मग ते स्वत: ला मुल झाल्याने, मुलाला मुल झाल्याने किंवा घरात सुन आल्याने कुटुंब मोठे झाले असे दिसेल. यानिमीताने गोड खाण्याचे योग जरी अनेकदा आले तरी पथ्य पाणी याकडे लक्ष द्यायला हवे.
कर्क रास : आपल्या राशीला गुरु पाचव्या स्थानी येत आहे. पाचवे स्थान विद्या, संतती याचे आहे. संततीची प्रगती होईल याच सोबत आपण शिक्षण सुरु असेल खास करुन धर्म शिक्षण सुरु असेल तर ते पुर्ण होईल. हे शिक्षण अनेकदा फ़ॉर्मल स्वरुपात नसते. अनेकदा धर्म या शब्दाची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा अर्थ समजून उमजून शिक्षण होत नसते. परंतु कुळाचार, नात्याने पडलेल्या जबाबदार्या कश्या पार पाडाव्यात याचे शिक्षण धर्म शिक्षण स्वरुपात मोडते.
पाचव्या गुरुची दृष्टी लाभस्थानावर आहे तशीच ती भाग्य स्थावर सुध्दा आहे. आपले उत्पन्न वाढण्याचे योग या काळात आहेत. तसेच आपल्याला अनेक जेष्ठांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभेल असे योग वर्षभर येत आहेत. एकंदरीत वर्षभरात अनेक भाग्यकारक घटना घडताना दिसतील. ज्यांना प्रसिध्दी हवी अश्यांना हे वर्ष ह्या साठी चांगले जाईल.
सिंह रास: आपल्या राशीला गुरु चवथ्या स्थानी येत आहे. सुखाच्या स्थानी येणारा गुरु सुखात वाढच करतो. घराचे वाढीव बांधकाम होऊन वापरासाठी जास्तीची जागा मिळणे. घरातील अडगळ कमी होऊन वापरासाठी जागेत वाढ होणे. घरातील ले ऑऊट बदलून सुध्दा हा अनुभव येणे शक्य आहे. याच सोबत वहानांच्या संख्येत वाढ होणे सुध्दा संभंव आहे. सिंह राशीला ह्यात काही रस नसतो. माझ्या अधिकारात, कार्यक्षेत्रात किंवा मान सन्मान यात वाढ होते आहे का हे पहाण्याचा आपला स्वभाव आहे.
गुरु आपल्या कार्यक्षेत्रात वाढ करेल. जास्तीचे काम वाढेल तसाच अधिकार आणि मान ही वाढेल. काम वाढले म्हणजे ते करण्यासाठी सहकारी सुध्दा वाढतील. आपल्याला मॅनेजमेंट करायची आहे. पॉलिसी तयार करायची आहे की काम नेमके कसे करायचे ? कुणाचे करायचे जेणे करुन आपला मान वाढेल.
या वर्षभरात आपल्याला यात्रा योग येतील. या निमीत्ताने दुरचा प्रवास घडेल तसेच आपल्या सासुरवाडीच्या लोकांचा उत्कर्ष होत असलेला पहायचे योग आहेत ? याचा काय फ़ायदा असा प्रश्न तुम्ही विचाराल ? आपला वैवाहीक जोडीदार यामुळे खुष असेल तर घरचे त्रास नक्कीच कमी होतील. आपल्याला योग किंवा तत्सम अध्यात्म विद्येत रुची निर्माण होऊन आपली प्रगती या दिशेने होईल.
कन्या रास: आपल्या तिसर्या स्थानी गुरु येत आहे. तिसरे स्थान भावंडांचे तसेच शौर्य स्थान आणि संवाद करण्याचे स्थान. या ठिकाणी गुरु आल्याने आपल्या भावंडांच्या घरात चांगले काहीतरी घडेल. त्यांच्या घरात पाळणा हलेल किंवा मुलाचा विवाह होऊन एखादे माणुस घरात वाढेल अश्या प्रकाराने फ़रक दिसेल.
आपण लेखक असाल तर आपले लेखन अनेकांना दिशादर्शक असेल. या वर्षभरात आपण लेखनाचा संकल्प कराल तर नक्कीच पुर्ण होईल. एखादे पुस्तक लिहून पुर्ण होईल तसेच ते प्रसिध्द होण्याचा सुध्दा योग या वर्षात आपल्याला आहे. जे अजून लेखक या प्रकारात बसत नाहीत त्यांचे स्फ़ूट लेखन फ़ेसबुक, whatsapp च्या माध्यमातून प्रसिध्द होऊन अनेक ठिकाणी कॉपी पेस्ट होईल. यात आपले महत्व कमी होऊ नये म्हणून आवश्यक ती खबरदारी घ्या.
आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या घटना म्हणजे या वर्षात विवाह होणे अपेक्षीत असेल तर तो होईल. किमान तो ठरेल अशी अपेक्षा नक्कीच पुर्ण होईल. त्याच सोबत आपले उत्पन्न गुरु वृश्चिक राशीत असताना वाढीचे योग येतात.
तुळ रास: आपल्या राशीच्या कुटुंब स्थानातून गुरुचे भ्रमण होताना कुटुंबात एका सदस्याची वाढ होते. तुम्हाला संततीक्षम वयात असाल तर आणि अपेक्षा करत असाल तर असे योग येतील. लग्नाच्या वयाच्या मुलीचे/मुलाचे आई- वडील असाल तर सासू सासरे व्हाल. एक माणूस तुमच्या संसाराचा भाग होईल. मुला -मुलीचे लग्न झाले असेल तर आजोबा/आजी व्हाल असे योग आहेत.
वर्षभरात गोड खाण्याच्या संधी अनेकदा येतील. यासाठी वजन वाढू नये म्हणून किंवा डायबेटीस प्रमाणाबाहेर वाढू नये याची काळजी घ्या. आपल्या लग्नराशीनुसार गुरु सहाव्या स्थानाचा अधिपती असल्यामुळे आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
मुळ कुंडलीत धनस्थानात धनकारक ग्रह जसे शुक्र किंवा स्वत: गुरु असेल तर आपल्या बॅंकेतली शिल्लक, रोकड/डिबेंचर्स/मुदत ठेव किंवा सहज रोकड करता येण्याजोगे धातू जसे सोने यात वाढ होणे अपेक्षीत आहे. पैसे सेव्हींग खात्यात ठेऊन फ़ारसे काही साध्य होत नाही यास्तव मुदत ठेवी, अन्य गुंतवणुकीचे पर्याय शोधणे आवश्यक आहे.
वृश्चिक रास : आपल्या राशीत येणारा गुरु कुटुंबेश आहे तसाच तो पंचमेश ही आहे. आपल्या संततीच्या काही चिंता असतील तर त्या दूर होतील. आपल्या मधे आणि वैवाहीक जोडीदारामधे जर काही कारणाने विसंवाद झालेला असेल तर तो दुर होण्यासाठी अपेक्षीत चांगले वातावरण निर्माण होईल.
हा गुरु आपल्या भाग्यस्थानावर पण वर्षभर दृष्टी टाकत आहे. या मुळे आपला विश्वास बसावा अशी जेष्ठ व्यक्ती आपल्या आयुष्यात येईल. वृश्चिक रास सहसा कुणावरही सहज विश्वास टाकत नाही. या पध्दतीने या व्यक्तीला पारखून घ्या. पण हे वर्ष अश्या व्यक्ती सहवासात आल्या असता त्यांचे शब्द नीट ऐका. कधीतरी असा सल्ला मिळेल ज्याची कल्पना आपण करु शकणार नाही. आपला गुरु तत्वावर विश्वास असेल आणि गुरु मिळावा अशी अपेक्षा असेल तर ती ही आपल्या साधनेनुसार पुर्ण होईल.
धनू रास : गुरु तुमच्या राशीला बारावा होणार आहे. अस घडेल की अनेक घटना तुम्हाला अपेक्षीत असणार नाहीत. चंद्र रास धनू असेल तर मनाची शक्ती खुप खर्च होईल. साध्या गोष्टींवर खुप विचार करावा लागेल. जर लग्नरास धनू असेल तर खर्च वाढू शकेल. दरवेळेस खर्च हा काही अनुत्पादक ( Non Productive ) असतो असे मानण्याचे कारण नाही. घर खरेदी करणे. मुलांचे विवाह किंवा धार्मिक विधीसाठी होणारा खर्च अनुत्पादक असतो असे मानण्याचे कारण नाही. अश्या समारंभात निर्माण होणारा आनंद खुप मोठा असतो.
बाराव्या स्थानी असलेला गुरु लग्नराशीकडून असेल तर धर्मयात्रा किंवा प्रवास देईल आणि चंद्र राशीकडून असेल तर ध्यान धारणा या सारख्या क्रियांमधून मिळणारा आनंद आजवर घेतला नसेल नसेल तर घेऊन पहा. मन सहज एकाग्र होऊन या क्रिया सहज जमू लागतील. याचे काही अध्यात्मिक फ़ायदे असतात. पण जास्त फ़ायदा मन:शांती हा आहे.
मकर रास : दोन्हीही हाताने नियती द्यायला आलेली आहे अशी स्थिती आहे. जे आजवर आपल्याला गमावले असे वाट्ते ते सुध्दा आपल्याला परत मिळेल असे योग या वर्षी आहेत. लाभातल्या गुरुची पंचम स्थानावर दृष्टी आहे तशीच ती तिसर्या आणि सातव्या स्थानावर आहे. तिसरे स्थान म्हणजे जवळच्या प्रवासाचे स्थान तसेच ते संवादाचे स्थान आहे. वर्षभर जवळचे प्रवास सुखकर होण्याचा अनुभव देतील. कारण काहिही असेल पण रोज ऑफ़िसला जाताना ट्रॅफ़िक जाम झाले, वहान बंद पडले असे अनुभव येणार नाहीत. महत्वाचे म्हणजे आपले इतरांशी संवाद सुधारतील.
आपला वैवाहीक जोडिदाराशी असलेला ताळमेळ वाढेल. आपल्या मनात काय आहे ते जोडीदाराला समजते असा अनुभव येईल. मकर राशीचे लोक अनेकदा व्यापारी असतात यादृष्टीने व्यापारात सुध्दा वाढ होणे या वर्षात अपेक्षीत आहे.
कुंभ रास : आपल्या दशमस्थानातून वर्षभर गुरुचे भ्रमण आहे. हे भ्रमण अर्थ त्रिकोणातून होत असल्यामुळे आपले अधिकार, आपले उत्पन्न आणि आपल्यावर अवलंबून असणारे, आपल्याला रिपोर्ट करणारे सहकारी या तीनही गोष्टीत वाढ होणार आहे. आपल्या जन्मस्थ मंगळाशी गुरुचा शुभ योग होत असेल अर्थात मंगळ जर मीन राशीत असेल तर ही गोष्ट जरा जास्तच अनुभवायला मिळेल.
आपल्या चतुर्थ स्थानावर पण गुरुची दृष्टी आल्याने, घरातली सुखाची साधने जसे सुखकारक फ़र्निचर, वहान यात ही वाढ अपेक्षीत आहे. एकंदरीत हा गुरु आपल्यावर कृपा करणार यात शंका नाही. स्टीवन कोवेई यांनी सांगीतलेला सिध्दांत मात्र लक्षात ठेवा. अधिकार वाढला म्हणजे जबाबदारी वाढते. ती पेलण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे.
मीन रास : गेले वर्षभर आठव्या गुरुने मीन राशीच्या लोकांना पीडा दिली आहे. कोणी आर्थिक अडचणीत आहे कोणी मानसीक दृष्ट्या खचले आहे. अश्यांना मोठा दिलासा गुरु महाराज देणार आहेत. आपल्या व्यक्तीमत्वात सुधारणा होईल. आजवर आपल्याकडे दुर्लक्ष करणारे लक्ष देऊ लागतील. विद्यार्थी असाल तर परिक्षेत यश मिळणार आहे.
आपण मोठे लेखक असा की स्फ़ुट लेखक, या काळात आपल्याकडून खुप चांगले लिखाण होणे अपेक्षीत आहे. आधीच काही लेखन झालेले असेल आणि प्रसिध्दी साठी अडले असेल तर त्याला चांगली प्रसिध्दी मिळेल.

Excellent as usual
ReplyDeleteMast
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteKhup Chan
ReplyDelete