संपादकीय

एकला चालो रे  या रविंद्रनाथ टागोरांच्या गीताचा अनुभव घेत मी दिवाळी २०१६ पासून नक्षत्रप्रकाश चे लेखन संपादन करताना आज नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१८ चे संपादकीय लिहीताना पाच सहकारी मिळाल्याने मन आनंदीत आहे. सहकारी कोण आहेत कुणी काय सहकार्य केले आहे ते अंक वाचताना लक्षात येईल.

दिवाळी हा सणच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा आहे. एकटाच वाटचाल करताना अजून काही सहकारी हातात दिवा घेऊन आले तर चालताना फ़क्त पायाखालचे दिसणे जाऊन मोठा प्रकाश पडून चालणे सुलभ होईल असे एक चित्र आज डोळ्यासमोर दिसत आहे. ह्या मार्गावर जेंव्हा अनेक सहकारी लाभतील तेंव्हा "लोग जुडते गये कारवा बढता गया"  असे वर्णन करण्याचा दिवस लवकर दिसेल अशी आशा आहे.

नक्षत्रप्रकाश चे दर वर्षी तीन अंक लिहावेत पैकी एक दिवाळीला, एक वर्षपुर्तीला आणि एक समयोचीत असावा असे वाटते आहे. याचे रुपांतर एका मासीकात झाले तर हवेच आहे. यासाठी दोन अडथळे आहेत. दर महिन्याला नविन लेख संशोधनपर लेख लिहणारा अभ्यासू लेखकांचा गट हवा शिवाय प्रिंट कॉपी घरपोच पाठवण्याची मागणी करणारा वाचक वर्ग हवा. असे झाले तर हा एक मोठा संकल्प पुर्ण होईल. मला फ़क्त दररोज अन्य काहिही न करता ज्योतिष विषयक काम करण्याची संधी मिळाली तर मी भाग्यवान ठरेन.

यातून पुढे या मासीकाला जर ज्योतिष विषयक जर्नलचा दर्जा पुढे मिळाला तर अजूनच बहार येईल.

महाराष्ट्र ज्योतिष परिषेदेने पुढे यावे आणि ज्योतिष विद्यापीठ स्थापन करावे. हा महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचा १९९५ च्या अधिवेशनामधला संकल्प आहे. यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी नक्षत्रप्रकाश आणि त्याच्या बाहेरील ज्योतिषी महोदयांनी एकत्र यावे ही इच्छा आहे.

हा अंक वाचनीय करण्यासाठी जे सहकारी पुढे आले त्यांचे आभार. त्यांचे सहकार्य मिळेलच ह्या अपेक्षे सहीत                                               

   
                                              सर्व वाचकांना दिपावलीपर्वाच्या हार्दीक शुभेच्छा !



5 comments:

  1. माझ्या हार्दिक शुभकामना.

    ReplyDelete
  2. Paris Jyotish KaryalayOctober 28, 2018 at 8:46 AM

    सर हार्दिक शुभेच्छा.

    ReplyDelete
  3. हार्दिक शुभेच्छा

    ReplyDelete
  4. छान आहे दिवाळी अंक

    ReplyDelete