नमस्कार ! हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव
पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७ तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत
जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे
राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.
या महिन्यात रवि अर्थात सुर्य १५ जानेवारीला २०२० ला मकर राशीत जाणार आहे
३१ जानेवारी २०२० ला बुध कुंभ राशीत जाणार आहे.
३ फ़ेबृवारी २०२० ला शुक्र मीन या स्वत:च्या उच्च राशीत जाणार आहे.
८ फ़ेब्रुवारी २०२० ला मंगळ धनु या अग्नितत्वाच्या राशीत जाणार आहे.
याशिवाय सर्वात मोठा ग्रह राशीबदल या महिन्यात शनिचा आहे.
२४ जानेवारीला शनि मकर राशीत जाणार आहे. यामुळे वृश्चिक राशीची साडेसाती संपुन
कुंभ राशीला सुरु होणार आहे. यासाडेसातीचा त्रास धनु, मकर आणि कुंभ राशीला कसा होईल
हे सांगणार्या व्हिडीओ मी युट्युब वर प्रसिध्द केल्या आहेत. त्याची लिंक या प्रमाणे
खाली पहा.
साडेसाती- कुंभ राशीच्या लोकांना काय अनुभव येईल ?
साडेसाती- मकर राशीच्या लोकांना काय अनुभव येईल ?
साडेसाती- धनु राशीच्या लोकांना काय अनुभव येईल ?
१५
जानेवारी २०२० ते
१२ फ़ेब्रुवारी २०२०
या काळात रवि, बुध, शुक्र,
मंगळ आणि शनि
राशीबदल करणार आहेत.
चंद्र दर सव्वादोन दिवसांनी राशी बदलतो.
यामुळे महिन्याच्या राशीभविष्यात त्याचा स्वतंत्र अंतर्भाव मी करत नाही.
पण चंद्राशी होणारे
महत्वाचे ग्रहयोग लक्षात
घेऊन प्रत्येक राशीचे
राशीभविष्य लिहीतो. आता
पाहू राशीनिहाय भविष्य. हे भविष्य
आपण आपल्या लग्नकुंडली मधील लग्नराशीप्रमाणे पहा. ज्यांना लग्नराशी माहित नाही त्यांनी
चंद्र राशीकडून पहा.
तुळ रास :
आपल्या राशीचा स्वामी शुक्र २ फ़ेबृवारी २०२० पर्यंत
कुंभ राशीत पंचमात असून आपल्याला या काळात आपल्या मुलांबरोबर जास्त काळ दिल्याने
मुलांबरोबरचे नातेसंबंध अजूनच दृढ होण्यास मदत होईल. आपण मुलांचे विश्व त्यांच्या
अपेक्षा समजून घेतल्याने मुले आनंदी होतील.
३ फ़ेब्रुवारी नंतर आपल्याला तब्येती कडे जास्त लक्ष
देणे आवश्यक आहे. वैवाहीक जोडीदाराचा लवकर संपणारा रुसवा या काळात पहायला मिळेल.
या महिन्यात रवि आपल्या चतुर्थात असल्यामुळे आपण जर
सरकारी योजनेतले घर किंवा प्रधानमंत्री आवास योजनेतले घर किंवा म्हाडा सारख्या
योजनेतले घरासाठी किंवा सरकारी निवास मिळावा म्हणून प्रयत्नशील असाल तर नक्कीच
काही घडण्याची शक्यता आहे. अर्थात सरकारी कामे दिरंगाईने चालतात हे लक्षात ठेऊन या
प्रक्रियेत आपण एक स्टेप पुढे जाल असे म्हणावे लागेल.
आपण जर दररोज नोकरी/व्यवसायाच्या साठी प्रवास करत
असला तर पुढील काही दिवस तरी प्रवास सुखाचा होईल. आपणाला लिखाणाची आवड असेल तर
उत्तम लिखाण एकटाकी हातावेगळे होईल. जर आपण लिखाण प्रसिध्द करण्याच्या खटपटीत असाल
तर लिखाणाला सहज प्रसिध्दी लाभेल.
तुळ राशीच्या विद्यार्थ्यांना ३१ जानेवारी २०२०
पर्यंत शिक्षणासंदर्भात कुठे प्रवेश मिळवायचा असेल. उच्च पदवी मिळवण्यासाठी काही
संशोधन करायचे असेल तर काळ अनुकूल आहे. आत्ताच याचे प्लॅनिंग करुन दररोज काही करा.
पालकांना आपल्या मुलांचे शिक्षण योग्य दिशेने चालले आहे ना याचा आढावा घेऊन
त्यांना पुरक मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे या काळात आवश्यक आहे.
शिक्षणाची योग्य दिशा समजल्यानंतर आपली मुले योग्य शिक्षण घेतील.
हा सर्व महिनाभराचा काळ आपल्याला सर्व स्तरावर खुप
चांगला जाणारा नसला तरी समाधानकारक नक्कीच असेल.
वृश्चिक रास :
आपल्या राशीचा स्वामी मंगळ लग्नी
असला तरी तो सहाव्या भावाचा सुध्दा स्वामी असल्यामुळे या महिन्यात ७ फ़ेबृवारी
२०२०पर्यंत वारंवार तब्येत बिघडेल परंतु औषधे घेतल्यास लगेचच नियंत्रणात येईल असा
अनुभव येणे शक्य आहे. जेंव्हा आरोग्य उत्तम असेल तेंव्हा आपण आनंदात असाल. आपली
नेहमीची कामे उत्तम प्रकाराने मार्गी लावाल.
आपला ओढा हरप्रयत्न करुन आपली
संपत्ती अर्थात बॅंक बॅलन्स वाढवण्याकडे असेल परंतु आपणच निर्माण केलेले शत्रुत्व
असो की कुपथ्य केल्यामुळे शरीरात निर्माण झालेले रोग असोत यामुळे आपला बॅक बॅलन्स
वाढता असला तरी त्याचे टार्गेट वेळेवर पुर्ण होणार नाही.
याकाळात आपल्याला वैवाहीक
जोडीदाराबरोबर खुप उत्तम काळ आनंदाने व्यतीत करण्याची संधी दिनांक ३ फ़ेबृवारी
पर्यंत मिळणार आहे. याचे चांगले नियोजन केलेत तर घरगुती समारंभ असोत की घरातच
साजरा केलेला एखादा क्षण असो याची स्मृती दिर्घकाळ मनावर ठसा उमटवेल.
ज्यांचा विवाह अजूनही झाला नाही
आणि प्रेमात पडले असाल तर किंवा कुणीतरी जोडीदार म्हणून लाभावे असे वाटत असेल तर
यासाठी दिनांक ३ फ़ेबृवारी नंतर असा प्रयत्न करा. असाही १४ फ़ेबृवारीला व्हॅलेंटाईन
डे येत आहे. आपल्याला अपेक्षी घडले तर हा महिना आपल्याही स्मरणात रहाणारा असेल.
या महिन्यात आपले एखादे काम व्हावे
म्हणून आपण आपल्या भावंडाकडे मदत मागीतली तर बहूदा भावंडे तशी मदत करतील असे
ग्रहयोग आहेत. आपल्या आणि भावंडाच्या मधे इस्टेट संदर्भात काही प्रकरण लांबले असेल
तर या महिन्यात ते सुध्दा मार्गी लागेल असे ग्रहयोग या महिन्यात आहेत.
हा महिना आपल्यासाठी धडाडीने यश
संपादन करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. नोकरी असो की व्यवसाय जिथे रिस्क येते
तिथे काही वेळा काही लोक माघार घेतात. कारण अपयशाची भिती असते. या महिन्यात किती
रिस्क घ्यायची याचा अंदाज आणि पर्याय तयार ठेऊन रिस्क घ्या. आपल्याला नक्कीच यश
मिळणे संभवते.
येत्या २४ जानेवारी ला आपली
साडेसाती संपुर्णपणे संपते आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना हा महिना नक्कीच सर्व
स्तरावर लक्षात राहील असा असेल.
धनु रास:
आपल्या राशीचा मालक गुरु लग्नेश
लग्नात २०२० शेवटापर्यंत असेल. यामुळे या वर्षी जे कराल ते यशस्वी होईल असे योग
आहेत. दर महिन्याला काय यशस्वी व्हायला पाहीजे याचा प्लॅन कराल तर वर्ष आपल्याला
खुप पुढे घेऊन जाईल. २४ जानेवारीला धनस्थानी जाणारा शनि आपल्याला साडेसातीच्या
उतरत्या अडचकीत काय फ़ळे देईल ते वरची लिंक क्लिक करुन ऐकायला मिळेल.
या महिन्यात गेले दोन महिने
बाराव्या स्थानी ठाण मांडून बसलेला मंगळ लग्नी आल्यामुळे अनावश्यक खर्च कमी होईल.
आरोग्य सुधारेल तसेच अनावश्यक प्रवास सुरु असतील तर ते कमी होऊन स्थिरता येईल.
आपली मुले दिर्घ काळ शिक्षणासाठी किंवा अन्य कारणाने परगावी किंवा परदेशात असतील
तर या महिन्यात त्यांची भेट होणे अपेक्षीत आहे.
या महिन्यात आपल्याला गुंतवणूकीचा विचार करुन त्या
संदर्भात काही निर्णय घ्यावे लागतील इतके पैसे सेव्हींग अकाउंट वर जमा असतील. ३१ जानेवारी पुर्वी
ही रक्कम गुंतवणूकीचा विचार करा. याचा अर्थ नाही केलात तर ही रक्कम दुसरीकडे खर्च होईल
असा अजिबात नाही. आपण नोकरी/व्यवसायात जर धाडसाने काही निर्णय घेतलेत तर त्याचे चांगले
परिणाम या महिन्यात आपल्याला दिसतील. खास करुन व्यापारी असाल तर धाडस करणे फ़लदायी होईल.
हा महिना हॉटेल किंवा खानावळी व्यावसायीकांच्या साठी चांगला आहे. यादृष्टीने काही प्लॅनींग
करा आणि याचा लाभ घ्या.
३ फ़ेबृवारी २०२० नंतर एखादी
प्रॉपर्टी खरेदी करायच्या विचारात असाल तर या दृष्टीने विचार करायला हरकत नाही. घरात
काही गृहउपयोगी वस्तू किंवा वाहन किंवा फ़र्निचर सुध्दा या तारखेनंतर घेण्याचा निर्णय
आपल्यापैकी काही लोक घेतील.
हा महिना धनुराशीच्या लोकांना
एकंदरीत सुखदायी असेल.
खूप छान .
ReplyDelete