११ अक्टोंबर २०१८ आपण एकट्या गुरुचा बदल सर्व राशींच्या साठी कसा असेल हे लिहले होते. वार्षिक भविष्य लिहीताना सर्व मोठे ग्रह ज्यांचे एका राशीत एक वर्ष किंवा त्याच्या पेक्षा जास्त काळ भ्रमण होते अश्या सर्व ग्रहांचा अभ्यास करुन एकत्रित राशीभविष्य लिहावे लागते.
या वर्षांत गुरु जरी वृश्चिक राशीत गेला असला तरी सहाच महिन्यात तो पटकन २९ मार्चला धनू राशीत प्रवेश करणार आहे. लगेचच वक्री होऊन तो वृश्चिक राशीत येणार आहे. मग पुढे नोव्हेंबर २०१९ पर्यंत गुरु वृश्चिक राशीत असेल.
या वर्षात आणखी एक महत्वाचा बदल होणार आहे राहू व केतू यांचा. २३ मार्च २०१९ ला राहू मिथूनेत तर केतू धनू राशीत प्रवेश करतो.
मकर लग्नाची भारताची कुंडली पहाता २०१९ मधे लोकसभा निवडणुकांचे निकाल काय लागतात हे सांगणे ज्योतिषशास्त्र दृष्टीने अत्यंत कठीण असे चॅलेंज आहे. मोदी सरकार परत सत्तेवर येताना कठीण निवडणुकीची परिक्षा आणि प्रक्रिया पार करुन यावे लागणार आहे. अन्य कोणी पक्ष सत्तेवर येऊ शकत नाहीत पण भाजपचे आज असलेले संख्याबळ बळ वाढणे सुध्दा एक कठीण असेल. भाजपला यासाठी जुन्या शिवसेनेसारख्या , शक्य झाल्यास चंद्राबाबू नायडू, राजकारणात कधीच स्पष्ट विरोध न केलेल्या ओरीसातील बीजू जनता दल यांच्याशी समझोता करावाच लागेत असे आत्ता तरी दिसत आहे. निवडणुकीच्या तारखा ही फ़ार मोठी रणनिती असते. मोदी सरकारने काही कारणाने फ़ेब्रूवारी- मार्च २०१९ मधे लोकसभा निवडणूका घेतल्या किंवा त्या एप्रिल -मे २०१९ च्या पुढे गेल्या तर चित्र वेगळे असेल.
आता राशीवार वार्षिक राशीभविष्य पाहू. हे लग्नराशी कडून तसेच चंद्राच्या ही राशीकडून पहावे. खास करून कर्क- वृश्चिक आणि मीन राशीला चंद्राकडून राशीभविष्य जास्त अनूभवाला येते कारण या राशी भावनाप्रधान राशी आहेत.
मेष रास: आठवा गुरु आणि नववा शानि तर चवथ्या स्थानातून तिसर्या स्थानी जाणारा राहू हे मोठ्या ग्रहांचे बदल पार्श्वभुमीवर मंगळ कसा भ्रमण करतो यावर आपल्या राशीचे भविष्याचे वर्णन करता येते. खरे तर आठवा गुरु आपल्याला अडथळे देणार आहे. मंगळ ६ नोव्हेंबर ला कुंभ राशीत गेल्याने २३ डिसेंबर पर्यंत तरी फ़ार अडचणी नसतील. २३ डिसेंबर ते ५ फ़ेंब्रुवारी हा काळ मात्र जास्त त्रासाचा असेल. खर्चात वाढ, कामात अपयश या समस्या त्रास देतील. ५ फ़ेबृवारी २०१९ ते २२ मार्च २०१९ पर्यंत अनेक कामे इच्छाशक्तीच्या जोरावर पार पाडाल असा अनुभव येईल. यानंतर मात्र इच्छाशक्ती असो की धाडस याचा जोरदार प्रयत्न केल्याशिवाय कामे मार्गी लागतील असे दिसत नाही.
अनेकदा जोरदार प्रयत्नात व्यावहारिक रित्या जास्त शक्ति किंवा पैसे खर्च होतात. केवळ आपले खरे व्हावे या नादात जास्त पैसे किंवा श्रम करुन एखादी गोष्ट यशस्वी करणे व्यावहारिक होत नाही. यास्तव येणार्या काळात केवळ आवश्यक असेल तेव्हडीच कामे व्हावीत असा आग्रह धरा. जे काम पुढे ढकलणे शक्य आहे ते पुढे ढकलणे व्यवहार्य आहे. आपले वय तरुण असेल तर हा सल्ला पटणार नाही. परंतु आपण जगाचा अनुभव घेतला आहे अश्यांना हा सल्ला जरुर पटेल.
याचा अर्थ गुरु आठवा आला म्हणजे आमचे काहीच चांगले होणार नाही का ? तर तसे नाही. २९ मार्च २०१९ पासून १० ऎप्रिल या काळात गुरु धनु राशीत मार्गी असताना काही महत्वाची कामे जरुर मार्गी लागतील. पण यासाठी खुप चांगले नियोजन मात्र करावे लागेल. १५ डिसेंबर ते १४ जानेवारी २०१९ काळात आपल्याला यश मिळेल तसेच रवि १४ ऎप्रिलला मेषेत गेल्यावरी महिनाभर यश मिळेल.
या काळात नविन प्रोजेक्ट अत्यंत आवश्यक असेल तरच घ्या. त्यातही वर दिलेल्या काळात त्यावर जास्त काम करा म्हणजे यश मिळेल आणि उत्साह टिकून राहील.
वृषभ रास : जी स्थिती मेष राशीची तीच वृषभेची आहे. मेषेचा भाग्येश गुरु अष्टमस्थानी आहे तर वृषभेचाही भाग्येश -दशमेश राजयोग कारक शनि अष्टमात आहे. ही स्थिती सामान्य संसारी माणसाच्या दृष्टीने फ़ार उत्तम आहे असे नाही. पण जितका त्रास मेषेला आहे तितका तुम्हाला नाही. ज्यात फ़ायदा नाही त्यात तुम्ही हातच घालत नाही. सारासार व व्यवहार्य विचार करुन निर्णय घेणारे अनेक पर्यायांचा अवलंब करतात त्या पैकी तुमची रास असल्याने प्रतिकूल परिस्थितीत काय करा हे सांगण्याची आवश्यकता तुम्हाला नाही.
कुटुंबस्थानी स्थानी येणारा २३ मार्च २०१९ रोजी येणारा राहू कुटुंबात थोडेसे गैरसमज निर्माण करेल पण हे कसे हाताळावे ह्याचे पुर्ण ज्ञान आपल्याला उपजत असल्याने कपातील वादळे कपाच्या बाहेर येतील असे घडणार नाही.
२३ डिसेंबर २०१८ ते ५ फ़ेब्रुवारी असा काळ आहे की जर अविवाहीत असाल आणि विवाह इच्छुक असाल तर नक्कीच विवाह ठरेल किंवा होईल या दृष्टीने आपले नियोजन करा. ज्या अविवाहीतांच्या कुंडलीत शुक्र दशा- अंतर्दशा आहे अश्यांना हा अनुभव नक्की येईल. १५ ऎप्रिल २०१९ ते १५ मे २०१९ असा काळ आहे ह्या काळात राजयोग कारक शनि अनुकूल नसतानाही अनेक गोष्टी मार्गी लागतील असा काळ आहे. अजून एकदा आपल्या राशीला ४ जून ते २८ जून २०१९ असाच यशदायी काळ आहे. त्याचेही चांगले नियोजन करा.
वृषभ राशीच्या लोकांना आता लक्षात आले असेल की ग्रहयोग कसेही असोत तुमचे विचार आणि ठोस कृती तुम्हाला थोडे का होईना यश देऊन जाते. मी नेहमी सांगतो नियोजन करा जे तुमच्या रक्तात आहे. नातेसंबंध कसे निर्माण करायचे आणि कुणालाही न दुखावता कसे पुढे जायचे ह्याची उपजत कला असल्याने हा एक वर्षाचा काळ तुम्हाला चांगलाच जाणार आहे.
मिथुन रास : आपल्या राशीला गुरु सहावा आहे. तो सातव्या स्थानाचा अधिपती आहे. १३ वर्षांनी एक वर्ष अशी स्थिती आहे की हा गुरु किमान वर्षभर वैवाहीक जोडीदाराशी विसंवाद करेल. मिथून राशीचे लोक संवाद करण्यात उपजत हुशार असल्यामुळे ही स्थिती खरच किती वेळा येईल ? माझ्या मते ह्या स्थितीचा त्रास इतर राशीच्या विवाहीतांना होतो तितका आपल्याला होणार नाही. कारण आपण या ही स्थितीत एखादा दमदार विनोद करुन वातावरण हलके ठेवण्याचा प्रयत्न कराल आणि दहातल्या सहा वेळा यशस्वी व्हाल. फ़क्त सर्व वेळा विनोद करण्यासारख्या नसतात याचे भान ठेवलेत तर मला वाटते की अडचण होऊ नये.
लग्न स्थानी येणारा राहू आपल्या व्यक्तिमत्वात काही आश्चर्यकारक बदल होतील या दृष्टीने जरा स्वत: मधे होणारे बदल अनुभवा.
आपल्या राशीचे सामर्थ्य शब्दात आहे. आपण शब्द कुठे कसा वापरता यावर यश कसे मिळते हे ठरते. वर्षभरात तीनदा बुध जेंव्हा वक्री होईल तेंव्हा मात्र आपले शब्द आपल्या नियंत्रणात नसतील तेंव्हा ह्या काळात वैवाहीक जोडीदाराशी किंवा व्यवहारात शब्द तीन वेळा विचार करुनच बोलावेत इतके नियोजन मात्र आवश्यक आहे. हा काळ १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१८ , ५ मार्च ते २८ मार्च २०१९ आणि ७ जुलै ते १ ऑगस्ट २०१९ आहे. या काळात आपण कोणत्याही गणितात हुशार असलात तरी पुन्हा तपासून पहा हा सल्ला आवर्जून देणे आहे. या काळात शेअर्स मार्केट मधले व्यवहार जपून, विचार पुर्वक केल्यास फ़ार अडचणी न येता वर्ष पार पडेल.
१५ ऎप्रिल ते १५ मे हा काळ चमकण्याचा आहे तर ४ जून ते २८ जून काळात परदेशात जाण्याची संधी येऊ शकते. अनेकदा अशी संधी पासपोर्ट नसल्याने किंवा तो संपल्याने वाया जाते यासाठी आधीच नियोजन करा. परदेशात नाही गेलात तरी या काळात लांबचे प्रवास घडतील असे योग आहेत. एकंदरीत ह्या दिवाळी पासून पुढच्या दिवाळी पर्यंतचा काळ चांगला आहे यात शंका नाही.
कर्क रास : विद्यार्थी वर्गाला गुरु चांगली फ़ळे देणार असून किमान या वर्षी अभ्यास चांगला होईल आणि गुण ही उत्तम मिळतील. विद्यार्थी या संज्ञेला प्राप्त नसलेले बाकीचे जन या वर्षी धर्मशास्त्रातली एखादी माहिती जरुन समजून घेतील असे गुरुचे फ़ळ कर्क राशीच्या लोकांना मिळणार आहे.
२३ मार्चला १२ व्या स्थानी जाणारा राहू कारण नसताना व्यावसायीक अप्रगती चा कारक होईल. एखादी सुरु असलेली व्यवसायाची बाजू अचानक बंद पडेल किंवा अपेक्षीत पैसे देणार नाही. हा विचार करुन मार्च पर्यत व्यवसाय वृध्दी साठी प्रयत्न करुन अजून एखादा व्यवसाय सुरू केल्यास गोळाबेरीज जमेल आणि आर्थिक नुकसान होणार नाही.
५ फ़ेबृवारी ते ७ मे २०१९ हा काळ नोकरी/व्यावसायिक प्रगतीचा समाधान देणारा ठरावा. या काळात आपल्या बुध्दीने आपले एखादे नवे काम सुरु होऊन ते आर्थिक प्रगती देऊन जाईल. नोकरीत असाल तर नक्कीच आपल्याला प्रोत्साहन मिळेल आणि व्यावसायीक असाल तर निश्चित फ़ायदा होईल. २२ जून ते ८ ऑगस्ट काळात आपले व्यक्तिमत्व उजळून निघेल. भरपूर फ़ायदा होऊन पैसे शिल्लक पडतील असे हे ग्रहमान आहे. नाही म्हणायला सहाव्या स्थानातला शनि काही आजारपण आणि शत्रु पीडा ही देणार आहे यासाठी चांगले नियोजन आवश्यक आहे.
सिंह रास : बदललेला गुरु अध्यात्म त्रिकोणातून जात आहे याच्याशी तुमच्या राशीला काही देणे घेणे नसते. आपली नजर इतकी चांगली आहे की आपल्याला भगवे कपडे घातलेला ढोंगी आणि साध्या कपड्यातला सिध्द योगी प्रयत्न केला तर सहज ओळखता येतो. असा योगी नजरेस पडल्यास आपण नमस्कार करणार आहात पण पुढे जाऊन जीवनाला पुरक एखादे तत्वज्ञान समजून घ्या. या काळात होणारा मानसीक त्रास कमी होण्यास मदत होईल. प्रमोशनच्या दृष्टीने एखादी परिक्षा असेल तर सहज पास व्हाल. उच्च शिक्षणासाठी हा गुरु वर्षभर अनुकूल आहे.
नोकरीत एखादे अपग्रेडेशन पदरात पडेल. याने काही पगार वाढेल असे नाही परंतु पुढची पायरी ओलांडली जाईल.
राहू बदल आपल्या पथ्यावर पडेल. विनाकारण होत असलेली मानहानी बंद होईल आणि हा राहू आपल्याला मोठा लाभ देऊन जाईल.
५ फ़ेबृवारी ते २२ जून हा काळ वर म्हणल्याप्रमाणे एखादे प्रमोशन घेऊन येईल. यानंतर परदेशात जाण्याची संधी आपल्याला २२ जून नंतर आल्यास नवल वाटावयास नको. परदेशात खर्च ही हॊइल त्याची तरतूद करुन ठेवल्यास आणि तिथल्या वातावरणात स्वत:ला जमवून घेण्यास
काय लागते याची नीट चौकशी केल्यास परदेशगमन फ़ार त्रासदायक वाटणार नाही.
कन्या रास : तिसर्या स्थानी आलेला गुरु आपण अविवाहीत असाल तर विवाह घडवून आणण्यास सहायभूत होईल. आपले उत्पन्न या वर्षात नेहमीपेक्षा जरा जास्त वाढेल याचे कारण या वर्षी एकतर पे स्केल बदलेल, सरकारी नोकर असाल तर सातवा पे कमीशन लागू होईल.
खरा लाभ आपल्याला २३ मार्च नंतर अपेक्षीत आहे. नोकरी बदलामुळे मोठ्या पदावर नियुक्ती किंवा सरकारी नोकरीत खाते बदलामुळे वरची ग्रेड/पद याचा लाभ होईल. हा बदल आपल्याला खुप अधिकार देऊन जाईल. राहूची खासीयत अशी की हे सर्व अचानक घडून येईल. जादू झाल्यासारखे, अपेक्षित नसलेले बदल आपल्या नोकरीच्या/व्यवसायाच्या ठिकाणी होतील. हे सगळे इतके अनपेक्षित असते की बस तयार रहा असे म्हणणे जरुरी आहे. आपण नियोजन करावे अशी परिस्थिती इथे नसते. १९६३-१९८२ साली जन्माला आलेल्यांना हा अनुभव नक्की येईल.
बाकीच्यांना किमान दैनंदीन कामाचे स्वरुप बदलेल. नोकरी बदलेल असे बदल नक्की दिसतील.
१ जून २०१९ ते २० जून २०१९ तसेच १ ऑगस्ट नंतर मोठे व्यावसायीक लाभ पदरात पडतील. कन्या राशीला वर उल्लेख केलेले अनपेक्षित बदला्चे ओझे वाटू लागेल. यासाठी फ़क्त मनाची तयारी करावी लागेल. पहिल्यापेक्षा आपले जीवन खुपच व्यस्त असेल. श्वास घ्यायला वेळ मिळत नाही असे वाटेल पण यातून नोकरी/व्यावसायीक प्रगती आहे हे लक्षात असू द्या.
तूला राशी : गुरु बदल आपल्याला कौटुंबीक सौख्य वर्षभर देणार आहे. आपल्या कुटुंबात एका व्यक्तीची भर पडेल मग ते आपले मुल असू दे किंवा नातवंड असू दे. हे दोन्हीही योग नसेल तर मुला-मुलीच्या विवाहाने कुटुंब मोठे होईल. कदाचीत एखादा पाहूणा वर्षभर कामानिमीत्त आपल्या घरी वारंवार येईल आणि वातावरण बदलेल. अर्थ त्रिकोणातून होणारे गुरुचे भ्रमण आपली संपत्ती वाढवेल, आपले अधिकार तसेच आपल्या सुचना ऐकणारे लोक वाढवेल.
२३ मार्चला भाग्यात जाणारा राहू परमार्थ साधनेच्या दृष्टीने सिध्द मंत्र देणारा, जप करुन घेणारा, गुरुची भेट घडविणारा असेल.
विद्यार्थी असाल आणि सी ए सारखी परिक्षा देत असाल तर या वर्षी जरी यश नाही आले तरी या वर्षी झालेला अभ्यास पोढील वर्षी यश देण्यास पुरक ठरावा. कुणास माहीत एखाद्या वेळेस याच वर्षी यश आपल्याला माळ घालेल तेंव्हा अभ्यास करण्यास चुकू नका. तूळ राशीच्या लोकांना १५ मे नंतर एखादी हुरहूर लावणार्या व्यक्तीमत्वाशी ओळख होईल. अविवाहीत असाल तर पुढे काय करायचे तुम्हीच ठरवा.
वृश्चिक रास : आपल्या पहिल्या अर्थात लग्न स्थानी येणारा गुरु आपल्या व्यक्तिमत्वात महत्वाचा बदल घड्वून आणणार आहे. कधी नव्हे ते आपण लोकांच्या वर विश्वास टाकू लागाल. यातून आपले नाते संबंध सुधारतील. सततच्या अविश्वास दाखवल्याने दुरावलेली माणसे पुन्हा जवळ येतील. नेट वर्कींगचा फ़ायदा आजवर समजला नसेल तर तो नक्की समजेल. या भावनेतून आजवर आपण ओळख न दर्शविणार्या सहकार्यांना आता ओळख दाखवू लागाल.
आठवा राहू आपल्याला पीडा कारक आहे. ही पीडा समजून घेणे मोठे कटकटीचे असते. पीडा कश्यामुळे आहे हे समजले तर अचानक नाहीशी करण्यासाठी उपाय निश्चीत करता येतील.
साडेसातीचा शेवटचा टप्पा आहे. शनि उपासना पुढील वर्षभर सुरुच ठेवा. पुर्वाषाढा नक्षत्राला ह्या वर्षी शनिची सर्वात जास्त पीडा आहे यास्तव शनिचा पीडाहर स्तोत्रातला मंत्र वृश्चिक , धनू आणि मकरेच्या लोकांनी जपावा. शनिवारी दिवाळी असो की नसो वेळ काढून तैलाभ्यंग करावे याने शारिरीक पीडा नाहीश्या होतात.
धनू रास : आधीच साडेसातीचा अति तीव्र काळ आणि त्यात बाराव्या स्थानी गुरुचे भ्रमण यातून मानसीक त्रास आणि वाढते खर्चाचे प्रमाण याने वैतागून जाल अशी वर्षभर स्थिती आहे. किमान ११ अक्टोंबर २०१८ ते २९ मार्च पर्यंत आहे. पुढे गुरु धनू राशीत आल्यावर आणि वक्री काळात ( १० ऎप्रिल ते ११ ऑगस्ट हे चार महिने ) जरा उसंत मिळेल असे वाटते. हा गुरु तुमच्या कडून तिर्थ यात्रा, साधना करुन घेणार आहे. साडेसाती का येते याचा अर्थ समजाऊन सांगणारा आहे.
सप्तमात २३ मार्च २०१९ ला येणारा राहू नव्या व्यावसायीक संधी घेऊन येईल. अशी माणसे जी आपण कधी पाहिली नाही ती आपल्याला संधी देतील. व्यावसायीक असाल तर जरा अस्थिरता देणारा कालखंड असला तरी लाभदायक नक्कीच असेल.
ऑगस्ट - सप्टेंबर २०१९ हे महिने आपल्याला व्यावसायीक/नोकरीत मान सन्मान देणारे असतील. दरवेळेला आपले प्रमोशन होईलच असे नाही पण चार लोकांच्या देखत झालेला आपल्या नावाचा उल्लेख सुखावणारा असेल. एकूण काय पुर्वार्ध जरी सुरळीत नसला तरी उतरार्धात मात्र काही घटना आपल्याला सुख देऊन जातील.
मकर रास: साडेसातीत बारावा शनि तुम्हाला पीडा देईलच असे नाही. मकर लग्न असो की रास या राशीचे लोक सहसा दुसर्या व्यक्तिला त्रास देत नाहीत. परिणामी साडेसातीच्या पहिल्या टप्प्यात होणारा त्रास त्यामानाने कमी असतो. त्यात गुरु लाभात येत आहे. वर्षभर हा गुरु ज्या ज्या ग्रहाच्या शुभयोगात येईल त्या ग्रहाचे फ़ळ जोरदार देईल. थोडक्यात साडेसातीचा प्रभाव ह्या वर्षी तरी तुमच्या वर फ़ारसा नाही. ज्यांचे जन्मनक्षत्र उतराषाढा आहे त्यांना डिसेंबर २०१९ नंतर हा शनि पीडा देईल.
२३ मार्च २०१९ नंतर येणारा सहावा राहू मात्र फ़ार विचीत्र फ़ळे देतो. लोक विनाकारण शत्रूत्व करतात. काही विचीत्र रोग होतात ज्याचे निदान लवकर होणार नाही आणि झालेच तर औषध लगेच फ़ळ देत नाही अशी सर्वसाधारण फ़ळे मिळतात. ज्यांचा बुध वक्री आहे किंवा धनू राशीत मूळ नक्षत्रात, सिंह राशीत मघा नक्षत्रात आहे त्यांनी आरोग्याच्या बाबतीत जरा सावधान रहावे. शारिरीक पीडा झाली नाही तरी चिंता मात्र लागून राहील असे हे योग आहेत.
या सर्व पार्श्वभुमीवर १ जानेवारी २०१९ ला राजयोग कारक शुक्र लाभात गेल्याने अनेक प्रकारचे लाभ होताना दिसतील. लाभात जाणारा शुक्र जेंव्हा अनेक ग्रहांशी युती/शुभयोग करेल त्या तारखा उदा जानेवारी २०१९ मधल्या १, ७ , १०, १२, १८, २२, २६ या तारखा चांगली फ़ळे देतील. ही जास्त करुन व्यावसायीक संधी देणारी, अविवाहीतांचे विवाह घडवण्यास मदत करणारी असतील यामुळे जानेवारी २०१९ हा महिना मकर राशींच्या लोकांच्या चांगला स्मरणात राहील.
कुंभ रास : आपल्या राशीचा अधिपती सध्या लाभ स्थानात बसला आहे. दशम अर्थात कर्मस्थानी येणारे गुरुचे आगमन आपल्यासाठी नोकरी/व्यवसायात प्रगती कारकच असेल. दशम स्थानी असलेला गुरु जेंव्हा राजयोग कारक शुक्राशी शुभयोग करेल उदा. २२ जानेवारी २०१९ हा दिवस असो की ९ मे २०१९ हे दिवस आपल्याला भाग्यवृध्दी होताना दिसेल.
२९ जानेवारी २०१९ ते २६ फ़ेबृवारी २०१९ हे भाग्येश शुक्राचे धनू राशीतील भ्रमण जास्त फ़ळ देणारे असेल. १८ फ़ेब्रुवारीला होणारी लाभस्थानातील शनि आणि शुक्र युती तुम्हाला कले मधे यश देईल, किर्ती देईल आणि धन सुध्दा देऊन जाईल असे योग या वर्षात येत आहेत. हा योग आपल्या आयुष्यात तीस वर्षात एकदाच येतो. तुमच्या व्यक्तीमत्वाला भाग्येशाची जोड मिळाल्याने तुम्ही रोल मॉडेल व्हाल.
पंचम स्थानी असलेला राहू नवनिर्मीतीच्या कामाला पोषक असेल. विद्यार्थी मात्र शिक्षणाकडे दुर्लक्ष करुन नविन छंद जोडण्यास उत्सुक झाल्याने कुंभेच्या माता पित्यांची चिंता वाढवतील. नवनिर्मीती ही उर्मी असते. यास्तव त्यांना किमान १-२ तास छंदात रमू द्या मात्र शैक्षणीक जबाबदारीची जाणिव सारखी दिलीत म्हणजे काही नुकसान होईल असे वाटत नाही.
मीन रास : आठवा गुरु तुमच्या राशीला फ़ारच ताप देऊन गेला त्यातून तुम्ही बाहेर पडाल. झालेली पडझड आता भरून काढायची आहे. दृढ निश्चय करणे जमवा आणि झालेले नुकसान भरून काढण्याच्या कामाला लागा. त्या आधी आपले नुकसान झाले आहे याची जाणिव ठेवा. व्यवहाराच्या दृष्टीने अत्यंत कमी गंभीर असलेल्या राशीला नफ़ा/ नुकसान समजत नाही म्हणून हे लिहणे भाग आहे.
एकटा गुरु काही तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवेल असे नाही. शनि सुध्दा फ़ार चांगल्या जागी नाही अश्या वेळेला निग्रहाने एक एक दिवस आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे.
२५ जानेवारी २०१९ हा एकमेव दिवस तुमच्या राशीला काही चांगले जोरदार बदल घडवेल असा आहे. या दरम्यान येणार्या संधीकडे सकारात्मक दृष्टीने पहा हा एकमेव सल्ला आपल्या राशीला आहे.
चवथा येणारा राहू तुम्हाला प्रिय असणार सुखाची झोप घेऊ देणार नाही. याच अर्थ तुम्ही खुप कामात असाल आणि काम चांगले झाले म्हणजे यश मिळेलच असे नाही. हा राहू व्यर्थ चिंता मात्र करायला लावेल. चिंता खरच आहे की विनाकारण आहे यावर एकाग्रपणे विचार केला म्हणजे विनाकारणच्या चिंता समजून येतील. त्याला किती महत्व द्यायचे ठरवा म्हणजे हा राहू तापदायक होणार नाही.
॥ शुभंभवतु ॥

खुप छान आणि सखोल मार्गदर्शन केले आबैत सर. चंद्र आणि लग्न राशिवरून कोणता अनुभव येतो, ते पाहुन आपल्याला नक्की कळवेन. ��
ReplyDeleteKhup chan mahiti ahe Sir.
ReplyDeleteखूप छान विवेचनात्मक पध्दतीने लिहिले सर , धन्यवाद !
ReplyDelete