डॉ वाईकर एक धाडसी ज्योतिषी

अनेक व्यक्तिमत्वांना अनेक प्रकारे त्यांच्या कलागुणांच्या माध्यमातून संबोधता येते. अशी प्रथा ही आहे की अश्या व्यक्तिमत्वाचा परिचय देताना आपण त्या व्यक्तिच्या अनेक कला गुणांचा संदर्भ देत परिचय देतो. एखादे ज्योतिषी महोदय अभ्यासू आहेत, संशोधक वृतीचे आहेत, तळमळीचे ज्योतिषशास्त्र प्रचारक आहेत असे आपण म्हणू शकतो. मा. शरद उपाध्ये यांच्या सारखे राशीचक्र चे हजारो प्रयोग केलेले मान्यवर मिश्कील आहेत, प्रभावी वक्ते आहेत असे आपण म्हणू शकतो पण एखाद्या ज्योतिषी महोदयांना आपण धाडसी म्हणू शकू का ?

१२ सप्टेंबर २०१८ रोजी नासीकचे सुप्रसिध्द ज्योतिषी, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे माजी अध्यक्ष, ज्योतिष विषयक अनेक पुस्तकांचे लेखक, १९९५ चे ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कृष्णराव वाईकर यांचे नुकतेच निधन झाले. ते धाडशी होते असे म्हणणे अगत्याचे आहे. कारणच तसे आहे. १९९५ च्या महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने घेतलेल्या ज्योतिष विषयक संमेलनाचे ते अध्यक्ष म्हणून निवडले गेले . हे अधिवेशन ३ ते ५ नोव्हेंबर १९९५ रोजी होणार होते. या दरम्यान अनेक गोष्टींचा बादरायणी संबंध लाऊन अंधश्रध्दा निर्मुलन समितीने पंचांग दहन करण्याचा निर्णय २२-१०-१९९५ रोजी एक पत्रक काढून  घेतला.

डॉ. शुक्ल ह्यांनी अल्लख निरंजन च्या २००७ दिवाळी अंकात लिहलेल्या लेखानुसार  अनिस च्या कार्यकर्त्यांनी १९७२ साली संत ज्ञानेश्वर महाराजांनी कशावरुन जिवंत समाधी घेतली असा आरोप करुन समाधी फ़ोडून ते पहाण्याचा घाट घातला होता. पुढे डॉ. रघुनाथ नारायण शुक्ल यांनी काही शास्त्रीय प्रयोग करुन जिवंत समाधी असल्याचे अनिस च्या कार्यकर्त्यांना पटवून दिले.

ही सर्व माहिती -   https://m.facebook.com/photo.php?fbid=235893099871833&id=100003534340216&set=gm.372609146146782   
या लिंक द्वारे वाचावयास मिळेल. अनिस ने कायमच कायदा हातात घेण्याचा हा पहिला तर पंचांग जाळण्याचा दुसरा प्रसंग माझ्या माहितीत आहे. अनिस आणि मृत डॉ. नरेंद्र दाभोळकर कायमच ज्योतिष विषयावर अंधश्रध्दा म्हणुन टीका करत राहीले. परंतु जेंव्हा कायदा हातात घेऊन अनेकांच्या श्रध्देचे स्थान असलेल्या पंचांगाचे दहन करण्याचा मानस पहाता त्याला विरोध करणे जरुरीचे होते. हे काम डॉ. वाईकर यांनी धाडसाने केले.

३० अक्टोंबर १९९५ महाराष्ट्र टाईम्स ने सातारा येथील हे अधिवेशन वादग्रस्त ठरणार असा लेख लिहून वातावरण तापवले. महाराष्ट्र टाईम्सचा पत्रकार या सर्व पार्श्वभुमीवर  डॉ. वाईकरांची मुलाखत घेण्यासाठी आला असता डॉ वाईकरांनी अत्यंत निर्भिडपणे आपली बाजू मांडली. आधी अंधश्रध्दा म्हणजे काय याचा उहापोह करत त्यांनी प्रसिध्दी मिळवण्यास आसूसलेले अनिस चे कार्यकर्ते आपल्या पत्नीचे कुंकू पुसून आणि मंगळसूत्र तोडून हे कार्य करायला पुढे येतील काय असा सवाल केला. हिंदू संस्कृतीमधे कुंकू आणि मंगळसुत्र हे विवाहतेचे प्रतिक असणारी चिन्हे दुसर्या धर्मात नाहीत. ही प्रतिके विवाहीत स्त्रीया श्रध्देने स्विकारतात.

थोडक्यात आपल्याला पंचांग आणि ज्योतिष ही अंधश्रध्दा वाटत असेल तर विवाहीतेची प्रतिके सुध्दा अंधश्रध्दा आहे हे किमान आपल्या पत्नीला पटले आहे का ? जर नसेल पटले तर आपण त्यांनी कुंकू लावले तर पुसून अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कार्याला येता का ? असा खडा सवाल सर्व अनिस कार्यकर्त्यांना या वेळी डॉ. वाईकर यांनी धाडसाने विचारला.

महाराष्ट्र टाईम्स ने कुंकवाची उठाठेव नावाचा अग्रलेख ३२ अक्टोंबर १९९५ ला लिहून या मुलाखतीला प्रसिध्दी देऊन महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची ठाम भुमिका लोकांच्या समोर आणली.

त्यांच्या ठाम धाडसी भुमिकेने अधिवेशन ठरल्या वेळी कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडले हे लिहणे आवश्यक आहे. आज ज्योतिषाला खुप जनसमर्थन प्राप्त आहे. पण एक काळ असा होता की प्रसार माध्यमे, तथाकथीत बुध्दीप्रामाण्यवादी यांच्या विरोधाने ज्योतिषशास्त्र प्रचाराला मर्यादा आल्या. ज्योतिषी हा सन्माननीय व्यवसाय न रहाता उपहासाचा विषय बनला होता.

यामुळे ज्योतिष विषयक संशोधन मागे पडले ते आजवर. आजही संशोधन करुन युजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पिचडी करण्याची सोयनाही. जेव्हा स्वतंत्र युजिसी मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ उभे राहील तेंव्हा उरले सुरले आक्षेप संपतील.

आधीच्या पिढीच्या या योगदानामुळे आजची ज्योतिषांची पिढी ठाम उभी आहे. गरज आहे पुढे जाण्याची. नक्षत्रप्रकाश दिवाळी अंकाच्या माध्यमातून डॉ कृष्णराव वाईकरांना आदरांजली.

1 comment:

  1. खरोखर एक आदर्श व्यक्तिमत्व आहे बरेच जन ज्योतिष एक अंधश्रद्धा आहे असे बोलतात आणि कठीण काळात गुपचूप जाऊन ज्योतिषा ला पत्रिका दाखवताना पाहिलेत

    ReplyDelete