नमस्कार ! हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव
पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १५- १६-१७ तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत
जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे
राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.
या महिन्यात रवि अर्थात सुर्य १३ फ़ेबृवारी २०२० ला कुंभ राशीत जाणार आहे
२८ फ़ेबृवारी २०२० ला शुक्र मेष राशीत जाणार आहे.
७ मार्च २०२० ला प्लुटो मकर राशीत जाणार
आहे. हा प्लुटो मकर राशीत १४ जून २०२० पर्यंत
असेल. १५ जुन २०२० ला प्लुटो पुन्हा वक्री गतीने धनु राशीत प्रवेश करतो.
थोडक्यात हा महिना १३ फ़ेबृवारी २०२० ला सुरु झाल्यावर शुक्र व प्लुटो हे दोनच
ग्रह राशीबदल करत आहेत.
ज्यांची मकर रास आणि उत्तराषाढा जन्मनक्षत्र असून दुसरे चरण आहे अशांना मार्च,
एप्रिल व मे २०२० हे महिने
त्रासाचे
असू शकतील.
प्लुटो जेंव्हा राशीबदल करतो तेंव्हा व्यक्तीच्या जीवनात फ़ार मोठे बदल घडतात
असे नाही. परंतु असा राशीबदल एखाद्या मोठ्या घटनेची नांदी ठरणारा असतो. ९ नोव्हेंबर
१९८९ रोजी प्लुटो वृश्चिक राशीत गेला. या दिवशी जगाच्या इतिहासात दोन मोठ्या घटना घडल्या.
दुसर्या महायुध्दाने झालेली जर्मनीची फ़ाळणी होऊन जर्मनीचे तुकडे करणारी बर्लीन भिंत
याच दिवशी जमिनदोस्त झाली. याच दिवशी अयोध्येमधे पहिली कारसेवा होऊन श्रीराम मंदीराचा
शिलान्यास झाला. या दोन घटनांनी जगाला इतिहासात नोंद घ्यायला लावली.
श्रीराममंदीर शिलान्यासाने, १९८४ साली ५४२ पैकी फ़क्त दोन जागा जिंकलेल्या भाजपने पुन्हा मुसंडी मारुन ८९ जागा
जिंकल्या आणि नोव्हेंबर १९८९ महिना अखेरीस असलेल्या निवडणुकांच्या मधे १९८४ साली ४०० पेक्षा
जास्त जागा आलेल्या कॉंग्रेसचा पराभव केला. श्रीराममंदीर निर्माण हा मुद्दा भाजपच्या
निवडणुक जाहीरनाम्या मधे महत्वाचा मुद्दा झाला. पुढचा इतिहास ताजा आहे.
७ मार्च २०२० आणि ८ जानेवारी २०२१ आणि ३० अक्टोंबर २०२१ रोजी एकदा वक्री होऊन
पुन्हा मार्गी होऊन प्लुटो मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर ही भारताची रास आहे त्यामुळे
या तिनही दिवशी काय घडेल याचा आढावा त्या त्या महिन्यात घेईन. श्रीराममंदीर शिलान्यासासारखी
एखादी घटना घडण्याचे संकेत याच महिन्यात धनु राशीत होणारी मंगळ- गुरु युती देत आहे.
राजकीय आंदोलनांनी ह्या दरम्यानचा काळ पुन्हा ढवळून निघणार आहे. ८ मार्चला होणारी रवि
नेपच्युन अंशात्मक युती, तिथीचा क्षय होत असल्यामुळे क्षयदिन तसेच आश्लेषा या उग्र
नक्षत्रामधील चंद्र काही घडण्याची नांदी देत आहे. या दिवशी ही घटना फ़क्त नांदी असेल.
याच महिन्यात २२ मार्च ला होणारी मंगळ प्लुटो युती आणि त्या आधी २० मार्च ला होणारी
मंगळ गुरु युती मात्र काही जबरदस्त घटना घडवतील.
आता पाहू या या महिन्याचे राशीनिहाय
राशीभविष्य, कर्क, सिंह आणि कन्या राशींच्या साठी.
हे राशी भविष्य आपण लग्नराशीकडून पहा हे सांगायला नको. जर लग्नराशी माहित नसेल तर मात्र
चंद्र राशीकडून हे राशी भविष्य अनुभवा.
कर्क रास :
हा महिनाभर रवि अष्टमस्थानी असल्यामुळे तब्येत ठीक राहील
याकडे लक्ष असणे आवश्यक आहे. कोणता पदार्थ खाल्ला किंवा थंडीत स्वेटर न घालता फ़िरले
की आपल्याला त्रास होतो हे अनेकांना आत्तापर्यंत समजले असेल. याकडे लक्ष द्यायला हवे.संततीला
सुध्दा त्रास होणार नाही याबाबत संतती किती जागरुक आहे हे पहा. वडीलांना सुध्दा आजारी
असतील तर त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थीत आहे ना पहावे लागेल.
कर्क राशीचे लोक भावनाप्रधान असल्यामुळे जेंव्हा संतती
किंवा जवळचे नातेवाईक यांना आजारपण येते तेंव्हा जरा जास्त व्यथीत होतात. कर्क राशीचे
स्त्री जातक असतील तर हा स्वभाव जरा जास्त दिसतो. यामुळे आपल्या स्वत:ची काळजी घ्यायला
विसरु नका.
या महिन्यात आपल्याला
काही चांगले अनुभव नक्कीच येतील. घरी येणारी कामवाली वेळेवर येईल. दांडी मारणार नाही.
आपण उच्चपदस्थ अधिकारी असाल तर हाताखालचे लोक दिलेला शब्द पाळून वेलेवर काम फ़ार फ़ॉलोअप
न घेता सुध्दा पुर्ण करतील.
आता आपल्या राशीची चांगली बाजू सांगतो. २८ फ़ेबृवारी पर्यंत
सर्वकाही मनासारखे व्हावे असे ग्रहमान आहे. पैसे ही चिंता असेल तर २८ तारखेपर्यंत ती
संपलेली असेल. २८ तारखेनंतर श्रमाचे चीज झाल्याचा तसेच श्रमाचा, कामाचा योग्य मोबदला
मिळेल असे ग्रहमान आहे.
सिंह रास:
आपल्या राशीचा स्वामी मकर आणि कुंभ राशीत फ़ारसा बलवान
नसतो. त्यात असे असल्यामुळे आपल्याला वैवाहीक जोडीदाराचे या महिन्यात ऐकावेच लागणार
आहे. तुमच्या पध्दतीने दुर्लक्ष करुन चालणार नाही. आपल्या वैवाहीक जोडीदाराचे म्हणणे
नीट पणे समजाऊन घेणे योग्य ठरेल.
शिक्षण क्षेत्रात काम करणार्यांना या महिन्यात काही चांगले
योग येतील. विद्यार्थी असाल तर आपल्याला उत्तम यश मिळेल असे ग्रहयोग या महिन्यात आहेत. आपल्याला क्रिडा प्रकारात स्वारस्य असेल तर या महिन्यामधे
होणार्या क्रिडा स्पर्धात आपण चांगले यश मिळवाल. आपली संतती सुध्दा आपल्याला सुवार्ता
देईल असे ग्रहमान या महिन्यात आहे.
व्यापार्यांना खास करुन भागीदारीत व्यापार करणार्यांना
ह्या महिन्यात अनेक सुसंधी येतील. ह्यावर कार्यवाही करताना भागीदाराशी संघर्ष होणार
नाही असे बघितले तर ह्या संधी फ़ायदा देतील.
८ मार्च च्या आसपास निर्णय घेताना भुल पडली आणि चुकीचा
निर्णय घेतला असे होऊ नये म्हणून सावध असावे. हे घडले नाही तर महिना उत्साहवर्धक आणि
चांगलाच असेल.
कन्या रास :
या महिन्यात आपल्या राशीचा मालक पुर्ण महिनाभर सहाव्या
स्थानी असणार आहे. आरोग्य खराब करणारा हा योग असल्यामुळे पथ्य पाणी संभाळून रहावे.
यात आपले शत्रु किंवा हितशत्रु आपल्यावर कुरघोडी करण्याची शक्यता आहे. ८ मार्च च्या
आसपास हितशत्रुचा गुप्त त्रास होताना दिसेल. नेमके धोरण काय ठेवावे हे समजताना वेळ
जाईल. आपल्या सोबत आपल्या वडीलांचे आरोग्य
संभाळण्याची जबाबदारी वडील वृध्द असतील तर येईल. आपले पथ्य, वडीलांचे पथ्य आणि हितशत्रुचे
पथ्य सांभाळले तर फ़ार अडचण नसेल.
आपण व्यावसायीक असाल तर लाभाचे प्रमाण चांगले राहील. भागीदारीत
व्यवसाय असताना भागीदार आपली अडचण लक्षात घेऊन मदत करील. वैवाहीक जोडीदारा बरोबर झालेला
संवाद हा आयुष्यभर लक्षात रहावा असा उत्साहवर्धक आणि सकारात्मक असेल.
या महिन्यात आपली एखादी जबाबदारी भावंडावर सोपावली तर
भावंडे सकारात्मक प्रतिसाद देतील यामुळे काही चिंता कमी होईल. या महिन्यात जरी वातावरण
उत्साहवर्धक नसले तरी शनि हा पंचमेश पंचमस्थानी येऊन अडीच वर्षाकरता स्थिर झाल्यामुळे
जर दिर्घकाळ चालणारे पारंपारिक विषयावरचे शिक्षण किंवा कौशल्य आत्मसात करावेसे वाटत
असेल तर नक्कीच ग्रहमान अनुकूल आहे. याबाबत आत्ताच निर्णय घेऊन असे शिक्षण/ कौशल्य
आत्मसात करण्यासाठॊ प्रयत्न सुरु करा.
खूपच छान माहिती .
ReplyDelete