१४ मार्च ते १३ एप्रिल २०२० चे राशीभविष्य तुळ, वृश्चिक आणि धनु राशींच्या साठी


नमस्कार !  हरी ओम, ज्योतिषप्रेमी लोकहो, खासकरुन राशीभविष्य प्रेमी लोकहो. दर  महिन्याचे राशीभविष्य हे सदर आपल्या आग्रहास्तव पुन्हा ब्लॉगवर आणले आहे.. दर महिन्यात साधारण पणे १४- १५- १६-  तारखेला रवि अर्थात सुर्य एकाराशीतून दुसर्या राशीत जातो. रवि रास बदलल्यानंतर साधारण पणे एक महिना एकाच राशीत असतो. मी अश्या रवि महिन्याचे राशीभविष्य सांगतो. अनेकांना ते आवडते तसेच अनुभवाला येते.

या महिन्यात रवि अर्थात सुर्य १४ मार्च २०२० ला मीन राशीत जाणार आहे
२२ मार्च २०२० ला मंगळ मकर या स्वत:च्या उच्च राशीत जाणार आहे.
२८ मार्च २०२० ला शुक्र वृषभ या स्वत:च्या राशीत जाणार आहे.
२९ मार्च २०२० ला गुरु मकर राशीत काही महिन्यांकरिता जाऊन परत जुन २०२० मधे धनु राशीत येणार आहे.
७ एप्रिल २०२० ला बुध मीन या बलहीन राशीत जाणार आहे.

थोडक्यात हा महिना १४ मार्च २०२० ला सुरु झाल्यावर मंगळ, शुक्र, गुरु आणि बुध हे चार ग्रह राशीबदल करणार आहेत.

 याच महिन्यात २२ मार्च ला होणारी मंगळ प्लुटो युती आणि त्या आधी २० मार्च ला होणारी मंगळ गुरु युती मात्र काही जबरदस्त घटना घडवतील असे भाकीत मी मागील महिन्यात केले आहे. मंगळ आणि गुरु राजकीय आंदोलने घडवितात. सीएए आणि सीएबी ला असणारा विरोध या काळात पुन्हा उफ़ाळून आला तर आश्चर्य वाटू नये. मंगळ आणि प्लुटो एखादी वेगळी घटना घडवेल. ही नेमकी कुठे घडेल हे पहाणे मेदीनीय तज्ञ लोकांना जास्त समजेल.

या महिन्यात मकर राशीत जाणारा मंगळ घरबांधणी उद्योगाला चालना देईल त्यामुळे बिल्डर लोक खुष होतील. वृषभ राशीत जाणारा शुक्र सौंदर्य प्रसाधने, कपडे यांचे व्यापारात तेजी आणेल. गुरु मकर राशीत असताना फ़ार काही घडेल असे नाही. बुध मीन राशीत असताना शेअर्स मार्केट वर येणे जरा कठीणच दिसत आहे.

३१ मार्च २०२० ला  पाय दुखी गुडघे दुखी असणार्यांना जास्त त्रास संभवतो.. २ एप्रिल २०२० ला गर्भवती स्त्रीयांनी काळजी घ्यावी. ४ एप्रिल च्या आसपास कागदपत्रे पाहूनच सह्या करा असे सांगणे आहे.

आता पाहू या या महिन्याचे राशीनिहाय राशीभविष्य, तुळ, वृश्चिक आणि धनु राशींच्या साठी. हे राशी भविष्य आपण लग्नराशीकडून पहा हे सांगायला नको. जर लग्नराशी माहित नसेल तर मात्र चंद्र राशीकडून हे राशी भविष्य अनुभवा.

तुळ रास:

आपल्या राशीचा मालक शुक्र २८ मार्चला सप्तम स्थानामधून अष्टम स्थानी जाणार आहे. शुक्र सप्तमात असताना व्यापारी मंडळीना लाभदायक असल्याचा अनुभव येईल. या काळात खास करुन स्त्रीयांना हवे असलेल्या सौंदर्य प्रसाधने, कपडे किंवा सुगंधी वस्तू जसे परफ़्युम्स इत्यादी चा व्यापार वाढता असेल. शुक्र अष्टमस्थानी गेल्यावर रेस, लॉटरी सारख्या मार्गाने धन मिळते. पण म्हणून फ़क्त नशीब अजमावा.

महिनाभर लाभेश रवि अष्टमस्थानी असताना मित्रांनी फ़सवले, जामिन राहील्यामुळे फ़सवणूक झाली किंवा नोकरांनी चोरी केली असे घडण्याची शक्यता आहे. याबाबत सावधान असावे अन्यथा एका हाताने नशीब उघडले आणि दुसर्या हाताने गमावले असे व्हायचे. ३ ते  ७ एप्रिल दरम्यान  दुसर्या व्यक्तीच्या सल्याने नुकसान होण्याचा संभव असल्यामुळे व्यवहारात सावधानता बाळगा. २२ मार्च २०२० नंतर चतुर्थात येणारा मंगळ गृहसौख्य बिघाड करणार आहे. त्यात ३१ मार्च ला होणारी शनि मंगळ युती मुळे घरगुती वातावरण बिघडले असा अनुभव अनेकांना येऊ शकेल.

काहीसा नरम आणि गरम असा महीना तुळ राशीच्या लोकांना अनुभवायला येईल.

मुलांच्या विवाहाला उशीर होत आहे का ? या प्ले लिस्ट मधे उपाय पहा.

वृश्चिक रास

आपल्या राशीचा मालक २२ मार्च २०२० पर्यंत दुसर्या स्थानी होता तो मकर राशीत तिसर्या स्थानी जाणार आहे. तिसरे स्थान म्हणजे शौर्य स्थान आहे. मकर राशीतला मंगळ शुर असला तरी उतावळा नसतो. विचार पुर्वक कृती करण्याचा गुण मंगळाला या राशीत मिळतो त्यामुळे आपले धाडस या तारखेनंतर विचारपुर्वक केलेली कृती असेल तर नुकसान होणार नाही.

वृश्चिक लग्न असून लेखक असाल किंवा पत्रकार असाल तर तृतीयात आलेल्या मंगळाने लेखणीला धार येईल तर तिथे असलेला शनि व गुरु मुळे लेखन विचारपुर्वक असल्यामुळे याला वजन प्राप्त होईल. महिना शिक्षक पेशात असलेल्या लोकांना चांगला जाईल. २८ मार्च नंतर अनेकांना रोमॅंटीक वातावरणाचा लाभ शुक्र अनेकांना देणार आहे. घरबसल्या लाभ असे काहींच्या वाट्याला योग आहेत. आजकाल असल्या गोष्टींमध्ये फ़सवणूकच जास्त असल्यामुळे सावध रहावे. खास करुन अशी संधि घेण्याचा मोह ४ एप्रिल च्या दरम्यान टाळलेला बरा.

वृश्चिक राशीची अजाणत्या वयातली मुले डोक्यात राख घालून रागारागाने घराच्या बाहेर पडण्याचे वातावरण सध्या नाही ना ? त्यांचे पालकांनी हे जाणून घेण्याची आवश्यकता आहे. हे सर्व पाहता चांगली बाजू असली तरी या महिन्यात सावधानता आवश्यक आहे.

धनु रास:

आपल्या राशीचा मालक २९ मार्च ला तीन महिन्यांच्या साठी मकर राशीत म्हणजे धन स्थानी जाणार आहे. गुरु धन स्थानी म्हणजे कुटूंब स्थानी गेला म्हणजे उत्कृष्ट धनलाभ, घसघशीत पगार वाढ इत्यादी गोष्टी पुढील काळात दिसणार आहेत. नुकसान भरुन काढण्याची संधी या महिन्यात आपल्याला येईल त्यामुळे विनाकारण बॅंकेने कापलेले पैसे किंवा न मिळालेला क्लेम जरा पुढच्या पावली जाऊन तक्रार करुन मिळवा.

चतुर्थ स्थानी आलेला रवि फ़ारसा चांगला नसल्यामुळे कपातील वादळे महिनाभर दररोज होऊ नयेत या साठी जागरुक असावे लागेल. २८ मार्च पर्यंत शुक्र चतुर्थात असल्यामुळे या रविचा परिणाम फ़ारसा दिसणार नाही पण उतरार्धात मात्र तुम्हीच कुटूंब प्रमुख असताना कायम संयम ठेवावा.

२८ मार्च नंतर पंचमात जाणारा शुक्र अनेक कलाकारांना उत्तम अभिनय, गायन वादनाच्या संधी तर कवींना कविता स्फ़ुरणे अशी फ़ळे देणार आहे. लेखकांना हा महिना असे काही लेखन करण्याची संधी तृतीयातला बुध आणि पंचमातला शुक्र देणार आहे की आपली शैली विकसीत झाल्याचा अनुभव काहींना येईल. गुढ कथा लेखकांना सुध्दा धारप स्टाईलच्या कथा एप्रिल पहिल्या आठवड्यात सुचतील. पुरुषांना खास करुन अविवाहीत तरुणांना पहाताक्षणी प्रेमात पडावे असा अनुभव येऊ शकेल. आधीच प्रेमात पडलेल्यांना लक्षात राहतील असे दिवस या काळात अनुभवायला येतील.

एकंदरीत अनेकांना चांगले आणि वाईट असे अनुभव देणारा मिश्र महिना धनु राशीच्या लोकांच्या साठी असेल.


ज्योतिषशास्त्री नितीन जोगळेकर यांचे whatsapp वर मार्गदर्शन मिळण्यासाठी हे वाचा.

1 comment: