ज्योतिष, भविष्य, दिवाळी अंक , Astrology Article in Marathi, Rashifal,Jyotish,Kundali, astrology signs, MarathiMesh,Vrushbh,Mithun,Kark,Sinha,Kanya,Tula,Vrushik,Dhanu,Makar,Kubhh,Meen
Friday, October 5, 2018
नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक २०१८
Nitin Joglekar - Started career as Engineer in 1982 with Bajaj Auto Ltd. Later opted job rotation in Human Resource in 2000. Last 15+ years working as Human Resources Professional, Trainer.
From 2014 working as freelance HR/ Total Productive Maintenance / Career Consultant as well as Astrologer
Saturday, September 15, 2018
नक्षत्रप्रकाश ज्योतिष संमेलन २८ अक्टोंबर २०१८ संदर्भातले निवेदन
२८ अक्टोंबर २०१८ ला आपण संमेलन घेण्याचे घोषीत केले आहे. या संदर्भात या संमेलनाचे शुल्क, स्थान व रुपरेषा १ अक्टोंबर २०१८ रोजी मिळेल. या संदर्भात पुढे जाऊन हे संमेलन पिंपरी- चिंचवड शहरात होईल असे मी आज जाहीर करतो. याचे कारण इतर शहर अर्थातच बाहेर गावाहून येणार्या लोकांसाठी पुणे शहर सोयीचे आहे परंतु कार्यकर्ते मिळणे किंवा संमेलनाचे आयोजन करणे या दृष्टीने मला पिंपरी चिंचवड शहर सोयीचे वाटते.
या संमेलनात व्याख्याने होतील, नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक प्रसिध्द होईल. संमेलनाच्या शुल्कामध्ये तो संमेलनास येणार्यांना उपलब्ध होईल.
संमेलनात व्याख्यान देण्यासाठी जे व्याख्याते निवडले जातील त्यांना संमेलनाचे शुल्क द्यावे लागणार नाही. व्याखानाचा विषय असा असावा जो क्लिष्ट नसेल. ३० ते ४० मिनीटांच्या व्याख्यानात तो सर्वांना समजेल व त्या माहितीचा वापर लगेचच अनेकांना करता येईल. जे विषय आधीच तुम्ही आधी कधी तरी बोलला आहात त्याची पुनरावृती टाळावी.
निवडलेल्या व्याख्यानाच्या आधी व्याख्यात्याबद्दल माहिती सांगीतली जाईल. ज्यात व्याख्यात्याने ज्योतिष विषयक शिक्षण कोठे घेतले. कोणत्या पदव्या त्यांनी घेतल्या आहेत. त्यांचे ज्योतिष विषय सोडता नोकरी/व्यवसाय काय आहे/होता. आजवर त्यांनी कोठे कोणत्या विषयावर
व्याख्याने दिलेली आहेत इत्यादी. या नंतर व्याख्यान ३० ते ४० मिनीटे असेल. शेवटची ५ ते १० मिनीटे प्रश्नोत्तरासाठी असतील.
संमेलनाच्या दिवशी जेमतेम ४ ते ५ व्याख्याने होऊ शकतील परंतु ज्यांना व्याख्यानाची संधी मिळणार नाही किंवा उत्तम विषयावर व्याख्यान देणे शक्य असून जे प्रवास करुन येऊ शकणार नाहीत त्यांच्या साठी नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक ही दुसरी संधी उपलब्ध आहे. आपण त्वरीत संपर्क करावा. विनंती इतकीच आपण लिहीत असलेला लेख हा प्रथमच प्रसिध्द होत असावा. यात अगदी प्रार्थमीक माहिती नसावी तर अभ्यासपुर्ण केस स्टडी असावा. तुम्हाला नक्षत्रप्रकाश दिवाळी अंक विनामुल्य घरपोच प्राप्त होईल.
तसेच जे प्रकाशक/लेखक आपले पुस्तक या संमेलनात प्रकाशीत करु इच्छितात त्यांनी त्वरीत संपर्क करावा. ज्यांचे पुस्तक प्रसिध्द झाले आहे आणि ज्यांना प्रसिध्दी करायची आहे त्यांनी ही संपर्क करावा. नक्षत्रप्रकाश दिवाळी अंकात या प्रसिध्द झालेल्या पुस्तकाचा गोषवारा दिला जाईल. जे सदस्य/प्रकाशक/ विक्रेते आपली ज्योतिष विषयक पुस्तके विक्रीस ठेऊ इच्छितात त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. हे सर्व करण्याचा उद्देश संमेलनाच्या खर्चाचा काही भाग उचलला जावा ही आहे. लेखक/प्रकाशक आणि विक्रेते यांनी या निमीत्ताने संमेलनास स्वतंत्र जास्तीचा निधी द्यावा अशी अपेक्षा आहे. संमेलनात सहभागी होण्याच्या शुल्कातच पुस्तक प्रसिध्द करणे/ आधीच प्रकाशीत पुस्तकाला नक्षत्रप्रकाश मधे प्रसिध्दी देणे किंवा विक्रीस ठेवणे शक्य होणार नाही याची नोंद घ्यावी.
जे सदस्य यंत्र/रत्ने/उपरत्ने संमेलनाच्या ठिकाणी विक्रीसाठी स्टॉल लाऊ इच्छितात त्यांना सुध्दा संपर्क करावा अशी विनंती आहे. या संदर्भात आपल्या सुचनांचे स्वागत आहे. आपणही काही निधी द्यावा अशी अपेक्षा आहे.
ज्यांना यंत्र/रत्ने विक्री स्टॉल लावायचा नाही, पुस्तकही प्रसिध्द करायचे नाही परंतु हे एक चांगले काम आहे या भावनेने रुपये १००/- पासून कितीही असा निधी उदार अंतकरणाने द्यायचा आहे अश्या ज्योतिषप्रेमींचे स्वागत आहे. ज्यांना असे वाटते की मी आजवर नक्षत्रप्रकाश समुहावर मोफ़त सल्ला घेतला त्याची परत फ़ेड म्हणून काही रक्कम संमेलन निधी साठी द्यायची आहे त्यांचे ही स्वागत आहे. हा वेगळ्या अकाउंटला जमा करायचा आहे. याबाबतची माहिती घेण्यासाठी त्वरीत फ़ेसबुक मेसेंजर/ whatsapp वर संपर्क करावा.
संमेलनात सहभागी होण्यासाठी शुल्क वेगळे असेल. ते वेगळ्या अकाउंटला जमा करायचे आहे याची नोंद घ्यावी. याची घोषणा व्याख्याते नक्की झाल्यावर १ अक्टोंबरला केली जाईल.
जे लोक संमेलनात सहभागी शुल्क आधी जमा करतील त्यांना अनुक्रमानुसार पुढच्या रांगेत बसण्याची व्यवस्था करुन दिली जाईल. जे उशीरा आपले स्थान निश्चित करतील त्यांना स्टेज पासून मागे जागा मिळेल अशी व्यवस्था करण्याचा विचार आहे.
१ अक्टोबर नंतर एक बॅकेचे अकाऊंट प्रसिध्द होईल. संमेलनात सहभागी होणार्यांनी त्यात आपले शुल्क जमा करायचे आहे. याच दिवशी या संमेलनात किती लोक सहभागी होऊ शकतात याचा आकडा नक्की होईल. त्या पेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला तर मात्र निराशा होऊ नये या साठी १ अक्टोंबरच्या घोषणेकडे लक्ष द्यावे ही विनंती.
ह्या संमेलनात पिंपरी- चिंचवडचे/पुणे रहीवासी नसलेले परंतु स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे अश्यांचे सुध्दा स्वागत आहे.
हे संमेलन यशस्वी व्हावे या साठी सुचनांचे स्वागत आहे.
नितीन जोगळेकर
9763922176

Tuesday, September 11, 2018
१७ सप्टेंबर २०१८ ते १६ अक्टोबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य तसेच विवाह होण्यासाठी उपाय
नमस्कार, ज्योतिषप्रेमी लोकहो. मी घेऊन आलो आहे १७ सप्टेंबर २०१८ ते १६ अक्टोबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य. या महिन्यात रवि कन्या राशीत आहे. ज्योतिषशास्त्र दृष्टीने महत्वाचा बदल होत आहे. ११ अक्टोंबर २०१८ रोजी गुरु तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. महिन्याच्या राशी भविष्यात इतका मोठा ज्योतिषशास्त्रीय लेख लिहणे शक्य नाही यासाठी हा लेख मी दिवाळी अंक २०१८ मधे लिहणार आहे.
तेंव्हा प्रतिक्षा करा दिवाळी अंकाची. यात वार्षीक राशीभविष्य नोव्हेंबर २०१८ ते अक्टॊंबर २०१९ कालावधीचे असेल. याच सोबत गुरु बदलाचा स्वतंत्र लेख असेलच. कोणत्या राशीला गुरु बदलाने नेमका काय लाभ होईल हे दिवाळी अंकातच वाचा. या शिवाय अनेक अश्या माहितीने नटलेला नक्षत्रप्रकाश दिवाळी २०१८ - २८ अक्टोंबर २०१८ रोजी प्रसिध्द होईल. प्रिंट कॉपीची मागणी आत्ताच नोंदवा. यासाठी देणगी मुल्य असेल. ते कसे द्यायचे या बाबत स्वतंत्र माहिती आपणा पर्यंत येईलच.
दर महिन्याला मी काही उपाय सांगत असतो. ह्या महिन्यामधे नवरात्र सुरु होत आहे. यादृष्टीने मी अनुभवलेले उपाय आपल्यापर्यंत मी पोचवत आहे.
ज्या विवाहासाठी इच्छुक कन्यांचा विवाह लांबला आहे, अडचणी आहेत. प्रेम विवाह करायचा आहे पण त्यात अडचणी आहेत अश्या सर्व कन्यांनी हा उपाय जरुर येता १३ अक्टोबरला करावा व आपला अनुभव कळवावा. हा उपाय असलेली खालील लिंक विवाह इछुक मुलींना पाठवावी. १३ अक्टोबर २०१८ च्या आधी पाठवावी म्हणजे तयारी करता येईल.
http://gmjyotish.blogspot.com/2016/09/blog-post_22.html
हा उपाय, विवाह इच्छुक मुलींनीच करायचा आहे. त्यांच्या साठी त्यांच्या वतीने अन्य कोणी केल्यास फ़ायदा होत नाही
आता १७ सप्टेंबर २०१८ ते १६ अक्टोबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य पाहू. हे राशीभविष्य लग्नराशीकडून तसेच चंद्र राशीकडूनही पहावे.
मेष रास: या महिन्यात आपल्या राशीचा स्वामी मंगळ कर्म स्थानी असला तरी अनेक कामे तुमच्या इच्छा शक्तीने मार्गी लागण्यात काही अडथळे महिन्याच्या सुरवातीपासूनच संभवतात. ही स्थिती महिन्याच्या शेवटापर्यंत कायम असेल. यासाठी अडथळे काय येतील याचा अंदाज आत्तापासून लाऊन त्यावर परिणामकारक उपाय शोधा.
आपल्या राशीचा महत्वाचा ग्रह गुरु पुढे वर्षभर अशुभ स्थानी असल्याने ११ तारखेच्या आधी काही अत्यंत महत्वाची कामे मार्गी लावाच. ह्या महिन्यात तुमचे मामा तुमच्यावर प्रसन्न असतील. मामांच्या सहायाने काही कामे मार्गी लावायची असतील तर ६ अक्टोंबर पुर्वी मार्गी लावा.
हा संपुर्ण महिन्याच्या कालावधीत मेष राशीचे विद्यार्थी कोणतीही परिक्षा देणा्र असतील तर अपेक्षे इतके यश मिळवण्यासाठी दुप्पट अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्या संततीच्या बाबतीत सुध्दा सहामही परिक्षेच्या कालावधीत आजारपण येऊ नये म्हणून काळजी करा.
या महिन्यात काही रोमॅंटीक क्षण अनेकांना अनुभवायला मिळतील. एकंदरीत अनेक वैविध्यपुर्ण घटनांनी भरलेला हा महिना मेष राशीसाठी आहे.
वृषभ रास: तुमच्या राशीचा स्वामी शुक्र स्वत:च्या राशीत असूनही तुम्हाला सर्व सुख समोर असताना, आनंद घेण्यास अडथळे निर्माण होतील. हे म्हणजे अनेक गोड मेजवान्या रक्तातील साखर वाढल्याने आस्वाद घेता येणार असे असेल. व्यावसायीक स्तरावर अनेक कामे तुमचे सहकारी एकदा सांगून मार्गी लावतील पण त्यासाठी ५ अक्टोबर पुर्वी महत्वाची कामे मार्गी लाऊन घ्या.
आपण उच्च शिक्षणासाठी प्रयत्नात असेल तर त्या संदर्भात चांगली बातमी समजेल. आपली संतती बौध्दीक क्षेत्रात काहीतरी जोरदार काम पुर्ण करेल. महिन्याच्या शेवटी आरोग्याचे प्रश्नाने वर्षभर त्रास झाला असेल तर त्यावर चांगला उपाय सापडेल. अडकून पडलेले पैसे मार्गी लागतील.
सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या राशीचा राजयोग कारक ग्रह शनि मार्गी झाल्याने अनेक रखडलेली कामे वेगाने नाही पण हलू नक्कीच लागतील. तुमच्यासाठी सुध्दा हा महिना अनेक घटनांनी भरलेला असेल.
मिथून रास: ऑफ़िसला जाणे हा रोजचा प्रवास महिनाभर तुम्हाला सुखाचा झालेला वाटेल. बसेस वेळेवर येतील. नेहमी ट्रॅफ़िक जाम होणार्या जागी जाम लागणार नाही. तुमचे स्वत:चे वहान दगा देणार नाही. काही दिवस का होईना हे सुख अनुभवा. आपली भावंडे लांब असतील तर काही दिवस त्यांचा सहवास लाभेल.
या महिन्यात काही लिखाण करायचे असेल तर ५ अक्टोंबर पुर्वी पुर्ण करा. कोणत्याही विषयाच्या अभ्यासासाठी हा काळ अनुकूल आहे. आपली संतती सुध्दा आपल्याला आनंद देणार आहे. आणि हो कोणाला तरी प्रपोज करायचे असेल तर बिनधास्त करा. असा हा काळ मिथुन राशीच्या लोकांना जोरदार असणार आहे. तरी सुध्दा प्रकृतीच्या काही तक्रारी असतील. पित्ताचा त्रास असणार्या लोकांनी विशेष काळजी घ्या.
कर्क रास: कोणतेही यश मिळण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. यासाठी संवाद साधणे हा सुध्दा एक प्रयत्नच असतो. या महिन्यात संवाद यशस्वी रित्या साधला जाईल. तो इमेल च्या माध्यमातून असू दे, प्रेझेंटेशन असू दे किंवा इंटरव्ह्यु, संवाद यशस्वी होईल. या महिन्यात अनेक लेखक, प्रकाशक आणि प्रिंटींग व्यवसायात असलेले लोक एखादा महत्वाचा टप्पा पार पाडतील. शैक्षणीक क्षेत्रात असलेल्या लोकांना मात्र संधीचा फ़ायदा घेण्यासाठी खुपच आटापीटा करावा लागेल.
घरगुती स्तरावर भावंडांची चिंता असल्यास दुर होईल. घरात एखादी भौतीक सुखाची वस्तू जसे फ़र्निचर, वाहन इ येण्याचा योग या महिन्यात पाच तारखेच्या आधी असेल. काही कारणाने जोडीदाराशी असलेला संवाद हरवला असे गेले काही महिने वाटत असेल तर तो पुन्हा निर्माण होईल. लांबलेले एखादे दुखणे नियंत्रणात येईल. असे मिश्र ग्रहमान असलेला हा महिना कर्क राशीच्या लोकांना अनुभवायला मिळणार आहे.
सिंह रास: आपल्या राशीचा स्वामी रवि महिनाभर कन्या राशीत असेल. कन्या राशीत रवि गेल्यावर आपल्या खाण्यापिण्याच्या आवडी पुर्ण होण्यास हा खास काळ येतो. घरातल्या लोकांच्यावर गुरगुरु करुन तुम्ही हवे ते तयार करायला सांगणार आणि इतरांना शिल्लक रहाते अथवा नाही याचा फ़ारसा विचार न करता त्याचा स्वाद घेणार. आपला स्वभाव घरच्यांना माहित आहे त्यामुळे तुम्ही आनंद घ्या.
या महिन्यात अधिकार, पद, मान सन्मान या ही पेक्षा पैसे कसे गुंतवायचे यावर जेणे करुन ते कठीण प्रसंगी उपयोगी पडतील यावर विचार करायला वेळ मिळेल शिवाय चार पैसे सेव्हिंग अकाउंटला दिसतील सुध्दा एखाद्या चांगल्या हितचिंतका बरोबर या बाबतीत हितगुज करा. सिंह राशीचे अनेक लोक चांगले कलाकार असतात. या महिन्यात आपल्याला कला प्रदर्शनासाठी उत्तम संधी येणार आहे त्याचा फ़ायदा घ्या. आपल्याला लगेचच सिनेमा मिळणार असे नाही पण अभिनय करायला पथ नाट्यापासून कोणतीही संधी तुम्ही सोडु नये कारण त्यातूनच अभिनय कौशल्य संपन्न होत असते.
कन्या रास: तुम्ही मुळात चिकीत्सक, संशोधक आणि ही तुमची वृध्दींगत करण्यासाठी ६ अक्टोंबर पर्यंत राशीचा स्वामी बुध लग्न स्थानी असेल. आपण ज्याची चिकीत्सा कराल ते अचूक असेल. डॉक्टर असा किंवा चार्टर्ड अकाउटंट असा आपल्याला आपल्या कामाचे समाधान मिळेल व आत्मविश्वास वाढेल.
महिनाभर ज्या गोष्टीची काळजी कराल ती विनाकारण असणार नाही. पुढील महिना केवळ चिंता करु नका पण ही स्थिती पुन्हा येऊ नये म्हणून काहीतरी मुलभूत काम करा. या दृष्टीने काही आर्थिक नियोजन करायला हा महिना अनुकूल आहे मात्र हे सर्व निर्णय ५ अक्टोंबर पुर्वी घेतले जातील असे पहा.
तूळ रास : तुमच्या राशीचा स्वामी खुप काळ तुमच्या राशीत असणार आहे. महिनाभर विवीध घटना घडतील. प्रवास, तिर्थयात्रा यांचे योग येतील. या महिन्यात हा खर्च अनपेक्षित असला तरी सुध्दा त्याची तरतुद करणारा आहे त्यामुळे तिर्थ यात्रा बाबत संधी येताच हो म्हणा. या महिन्यात आपण आनंदी असाल याचे कारण तुम्हाला अपेक्षीत व्यावसायीक संधी, कला प्रदर्शनाच्या संधी, उत्कृष्ट सुगंध, कपडे इ. आवडणारे सर्व काही सहज प्राप्त होणार आहे.
याच सोबत ६ अक्टोंबर नंतर होणार्या कटकटी, इतरांसाठी होणारे अनावश्यक खर्च, डोळ्याचे आजार याने वैतागून न जाता यावर काय पर्याय आहे याचा विचार करावा. केवळ आपल्या सोबत राहीले म्हणजे काही खर्च करावा लागत नाही अश्या विचार करणार्या स्वार्थी मित्रांना जरा टाळा म्हणजे हे अनावश्यक खर्च नियंत्रणात राहतील.
वृश्चिक रास : आपल्या राशीचा अधिपती मंगळ २७ ऑगस्टला मार्गी झाला असला तरी कटकटी संपलेल्या नाहीत. सध्या मंगळाचे केतू सोबत साहचर्य असल्याने कामे मार्गी लागताना अनंत अडथळे यांचा सामना करावा लागेल. फ़ार धाडस दाखवून काम करु नका तर जरा शांत राहून अंतर्मनाचा कौल घेऊन दुरगामी विचार करुन पावले टाकण्याची आवश्यकता या महिन्यात जाणवेल.
या महिन्यात पैशाची आवक चांगली असेल. रवि आणि बुध दोन्ही ग्रह भरपूर आवक या महिन्यात देतील. जुनी येणी वसूल होतील. त्यामुळे खर्च वाढला तरी तरतुद कशी करावी ही चिंता असणार नाही. या महिन्यात गुरु जो आपल्या खर्चाच्या, चिंतेच्या जागी बसून अस्वस्थता गेले वर्षभर वाढवत होता तो या महिन्यात आपले स्थान बदलून आपल्या राशीत येणार आहे. गुरूबदलाचे फ़लित दिवाळी अंकात वाचा.
धनू रास: आपल्या राशीला एक महत्वाचा बदल या महिन्याच्या अखेरीस होणार आहे तो म्हणजे गुरु बदल पण त्या बाबत स्वतंत्रपणे दिवाळी अंकात वाचा. हा महिना या वर्षभरातला असा आहे की जे काही मार्गी लावायचे असेल ते ह्याच महिन्यात ११ अक्टोंबर पर्यंत लावा. या नंतर मात्र खुप खर्च, मनाविरुध्द घटना यात वाढ होईल.
वरील लिहलेले वर्षभर अनुभवयास कमी अधीक प्रमाणात आले तरी हा महिना मात्र नोकरी/व्यवसायाच्या दृष्टीने उत्तम असेल. नोकरी/व्यवसायात अनेक संधी चालून येतील. अधिकार वाढेल तसेच व्यावसायिकांना उत्पन्न नाही तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत वाढल्याचे लक्षात येईल. नविन निर्माण झालेल्या स्त्रोत कायमचे कसे हातात राहतील यावर विचार करा.
मकर रास : कितीही मनाविरुध्द घडले तरी शांत रहायचे हा आपला स्वभाव काही दिवसांकरता अचानक बदलत आहे असा भास नाही तर आपल्या राशीत आलेल्या मंगळाच्या मुळे सत्यात उतरेल. अर्थात डोक्यात राख घालून कडक रिअॅक्शन तुम्ही देणार नाही परंतु नापसंती नक्कीच दाखवाल. इतका आपला अधिकार आहेच तो कधीतरी दाखवायला काय हरकत आहे ?
महिनाभर अनेक हातात आलेल्या संधी विनाकारण जाऊ नयेत म्हणून प्रयत्नशील असा हे सांगण्याची आवश्यकता नाही हा आपला स्वभाव आहे. पण या साठी महिनाभर जागरुक रहा. प्रमोशन हातचे जाऊ नये म्हणुन लक्ष द्या. ५ अक्टोंबर नंतर असे घडू नये यासाठी हालचाल करा. संधी गेली म्हणजे परत येत नाही असे नाही परंतु काही काळ मात्र तसाच जातो हे निश्चित लक्षात असू द्या.
कुंभ रास : आपल्यासाठी हा महिना काही फ़ारसा चांगला नाही. निष्कारण खर्च, चिंता, आजारपण याने व्यापलेला असेल. वैवाहीक जोडीदारासोबत अनावश्यक संघर्ष होऊ नये म्हणून कोणत्या विषयात पडायचे नाही हे ओळखून कटुता कमी करता येईल. नोकरी / व्यवसायाच्या निमीत्ताने प्रवास आहे पण तो सुखकारक व्हावा यासाठी काळजी करा. प्रवासात काही हरवणार नाही, फ़सवले जाणार नाही यासाठी जागृत रहा.
नाही म्हणायला स्पेक्य़ुलेशच्या संधी या महिन्यात येतील पण किती कुंभ राशीचे लोक शेअर्स, रेस किंवा तत्सम भानगडीत पडतात ? त्या पेक्षा एखादे लॉटरीचे तिकीट काढा. किंवा जिथे खरेदी केल्याने काही लकी ड्रॉ काढला जाणार आहे तिथे गंमत म्हणुन नशीब अजमाऊन पहा. याच्या फ़ार नादी लागू नका हे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही.
मीन रास: आपल्या राशीला या महिन्यात काही पैसे बिनकष्टाचे मिळणार आहेत यास्तव एखादी स्मरणात न राहीलेली मॅच्युअर होऊ पहाणारी विमा पॉलीसी तपासा जी अकस्मात बोनस देऊन जाईल किंवा वारसा हक्काने येणारे धन, लॉटरी इ. ने मिळणारे धन या महिन्यात मिळेल. दिवाळी साठी हा मोठा आनंददायक दिलासा असेल.
आपल्या वैवाहीक जोडीदार किंवा वुड बी/प्रेमपात्रा सोबत चांगला काळ जाईल तसेच संघर्ष सुध्दा होईल. यात बॅलन्स कसा साधायचा यासाठी कसरत करावी लागणार आहे. " तुमको जो पसंद वही बात करेंगे, तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे " या जुन्या हिंदी गाण्याच्या ओळी लक्षात ठेवल्यात तर जो काळ चांगलाच असेल त्याही काळात आधीच्या घटनांनी मुड गेला असे होणार नाही.
शुभंभवतु

Sunday, August 12, 2018
१७ ऑगस्ट २०१८ ते १६ सप्टेंबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य
नमस्कार, ज्योतिषप्रेमी लोकहो. मी घेऊन आलो आहे १७ ऑगस्ट २०१८ ते १६ सप्टेंबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य. या काळात रवि अर्थात सुर्य आपल्या स्वत:च्या म्हणजे सिंह राशीत असणार आहे. तसेच १८ ऐप्रिल २०१८ ला वक्री झालेला शनि ६ सप्टेंबर २०१८ ला मार्गी होणार आहे. त्या आधी २७ ऑगस्टला मंगळ मार्गी होऊन आजवर झालेल्या रस्त्यावरच्या अपघातांची संख्या कमी होईल.
हा महिना तसा सणांचा महिना आहे. १७ ऑगस्ट २०१८ ते १६ सप्टेंबर २०१८ या कालावधीत श्रावण महिन्याची सुरवात झालेली असेल. २६ सप्टेंबर २०१८ राखी पोर्णिमा, २ सप्टेंबर २०१८ ला श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि महिन्याच्या शेवटी १३ सप्टेंबरला गणरायाचे आगमन असे सर्वांच्या मनाला मोहून टाकणारे सण या महिन्यात आहेत.
मी आपल्याला काही उपाय दर महिन्याला सांगत असतो तसा या ही महिन्याला एक नाही तर दोन सांगणार आहे.
डॉक्टरी तपासणीत काही दोष नाही परंतु संतती नाही अश्या जोडप्याने श्रीकृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी मंदीरातील जन्माष्टमी सोहळ्यात सहभागी व्हावे. विशेष पुजन करुन संतती व्हावी अशी प्रार्थना करावी. याच सोबत संतान गोपाल स्त्रोत्राचे १००० पाठ किंवा संतान गोपाल मंत्राचे ४००० पठण संकल्प पुर्वक दोघांनी करावे. श्रावण महिन्यात हे पाठ सुरु करुन कृष्ण जन्माष्टमीला संपतील अशी योजना करावी.
अनेक लोक घरात वाद विवाद, क्लेश यांनी त्रासलेले असतात. १३ सप्टेंबर ला होणारे गणरायाचे आगमन वातावरण आनंदाने भरुन टाकते. या निमीत्ताने घरात १० दिवस गणपती नसला आणि दिड दिवस असला तरी १० दिवस एकमेकांना टाकून बोलायचे नाही हा नियम करा. त्याच सोबत हे कृतीमधून पण दिसू द्या. उगाच आदळ आपट ह्या सारख्या रागामुळे होणार्या कृती हे दहा दिवस टाळा. एकदा या सुंदर वातावरणाची सवय १० दिवस झाली की पहा, हे वातावरण संपुच नये असे वाटेल. मग काय हरकत आहे ?
आता १७ ऑगस्ट २०१८ ते १६ सप्टेंबर २०१८ या कालावधीचे राशीभविष्य पाहू. हे आपल्या चंद्र राशी तसेच लग्न राशीकडुन सुध्दा वाचावे.
मेष रास : २७ ऑगस्ट पर्यत राशीचा स्वामी वक्री असल्यामुळे ४ मे पासून नोकरी/व्यवसायाच्या ठिकाणी सुरु असलेली कामाची धावपळ जरा मंदावली असली तरी २७ ऑगस्ट नंतर पुन्हा वेग येईल. ७ नोव्हेंबर पर्यंत आता विश्रांती नाही. पुढील काही दिवसात चांगले नियोजन करुन अनेक कामे हातावेगळी करण्याची संधी चालून आलेली आहे. यात संघर्ष सुध्दा आलाच. आजवर तुमची बाजू रास्त असून संघर्ष टाळला असेल तर संघर्ष झालाच तर ही मात करण्याची संधी आहे हे जाणून संघर्ष करा.
१ सप्टेंबर नंतर शुक्र तुळ राशीत म्हणजे तुमच्या सातव्या स्थानी जातो. तुमचा स्वभाव आक्रमक असला तरी थोडेसे रोमॅंटिक व्हायला काय हरकत आहे. तरुणाईला हा काळ हातात हात घालून बागेत फ़िरण्याचा, वचने देण्याचा आणि घेण्याचा आहे. काही काळ उग्रपणा सोडून हा आनंद घ्या.
वृषभ रास : कमी कष्टात जास्त कमाई कशी होईल असा विचार करणारी अर्थ त्रिकोणातली आपली रास आहे. या महिन्यात राशीचा स्वामी शुक्र आपल्या स्वत:च्या राशीत १ सप्टेंबरला जाणार आहे. तुळ राशीतला शुक्राचा प्रवास व्यापारी असाल तर व्यवसायाच्या अनेक संधी देणार आहे. यातून होणारी कमाई थोडी उशीरा होणार म्हणुन नाराज होऊ नका. अजून दोन महिन्यांनी हा व्यापारातून प्रत्यक्ष फ़ायदा दिसेल. पण आत्ताच त्यासाठी सुरवात करणे आवाश्यक आहे.
नोकरदारांच्या साठी सुध्दा आपले महत्व निर्माण होईल अश्या कामांच्या सुसंधी येतील. जेणे करुन तुम्हाला वरिष्ठांना तुम्ही कसे फ़ायद्याचे काम करत आहात हे पटवून देऊ शकाल. ही संधी सोडू नका हे सांगणे तुमच्या राशीला अजिबातच आवश्यक नाही.
मिथुन रास : आपल्या राशीचा स्वामी या महिन्यात २ सप्टेंबरला तिसर्या स्थानी जातोय. तिसरे स्थान लेखन आणि संवाद कौशल्यासाठी महत्वाचे असल्याने २ सप्टेंबर पासून उत्तम संवाद साधण्याच्या सुसंधी चालून येतील. आपल्या हातून लेखन घडेल. प्रकाशक असाल तर पुस्तके प्रकाशनाचे काम घडेल. तुळेतल्या शुक्राशी बुधाचा लाभ योग होत असल्याने या लेखनाला नवनिर्मीतीची झळाळी असेल. उगाच इतर कोणाच्या लेखनाचे मुल्यमापनाचे काम सोडुन आता स्वतंत्र लेखन तुम्ही करावे असा विचार करा.
आपल्या संततीच्या सुवार्ता येतील त्यामुळे आनंद या महिन्यात अजूनच वाढणार आहे. या सुवार्ता शैक्षणिकच असतील असे नाही तर नोकरी- व्यवसाय संदर्भातील सुध्दा असू शकतील. संतती काही कारणाने दुर रहात असेल तर या महिन्यात प्रत्यक्ष भेट घडेल.
कर्क रास : वैवाहीक जोडीदाराशी संघर्षाचे वातावरण संपले नसले तरी या महिन्याच्या उतरार्धात दोन ग्रहांच्या राशीबदलामुळे मात्र वातावरण बदलणार आहे. शुक्र चतुर्थात आल्याने घरात नविन फ़र्निचर घ्यायचे की नविन गाडी या चर्चेला सुरवात झाल्याने मागील महिन्यात थोडी कटूता आली असली तरी ती संपेल. माफ़ करणे हा तुमचा स्वभाव असल्याने जणू काही घडलेच नाही या भावनेने तुम्ही या चर्चेत भाग घेऊन आपला चॉईस सांगाल.
घरात जेष्ठ व्यक्तींचे आगमन होण्याची शक्यता असल्याने आपण त्या पाहूण्यांच्या सरबराई साठी नियोजन करावे लागेल. घरच्या जेष्ठ व्यक्तीचे सगळ्यांच्या अपेक्षेनुसार स्वागत करुन स्त्री असाल तर हवे नको ते पहाणे हे काम तुम्हाला सहज जमते. केवळ औपचारीक पणाने नव्हे तर आस्थेने तुम्ही हे कराल त्यामुळे जेष्ठांच्या कौतुकाला पात्र व्हाल.
सिंह रास : तुमच्या राशीचा मालक रवि गेले महिनाभर राशी स्वामी कर्क या राशीत आणि त्यातून बाराव्या स्थानी असल्याने अनेकदा माना पेक्षा अपमान सहन करावा लागला असेल. पण आता राशीचा मालक महिनाभर तुमच्या स्वत:च्या राशी आल्याने तुम्हाला बळ प्राप्त होईल. तुमच्या नुसत्या दर्शनाने अनेकांची घाबरगुंडी उडेल त्यामुळे तुमचे किमान दर्शन अनेकांना घडेल अशी व्यवस्था करा बाकी सर्व आपोआप घडेल.
तुमच्या शत्रु स्थानी सध्या बलवान मंगळ असल्याने शत्रुच्या कारवाया जरी थंडावल्या असल्या तरी २७ तारखेनंतर पुन्हा त्याला शत्रुच्या कारवायांना तोंड फ़ुटेल. यावर कशी मात करायची याचा विचार करुन ठेवा. रवि सर्व ग्रहांचा राजा असल्याने असल्या कारवाया डाव्या हाताने थंड करण्याचे कसब तुमच्याकडे आहेच पण परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी निरिक्षण, परिक्षण आवश्यक आहे.
कन्या रास : कन्या राशीला हा महिना फ़ारसा चांगला नाही. राशीचा स्वामी बुध अशुभ फ़ळे निर्माण करणार्या स्थानातून आणि नक्षत्रातून जात असल्यामुळे व त्यातून तुमच्या राशीचा स्वभाव धाडसाने कृती करण्याचा नसल्यामुळे विचारपुर्वक कृती करा जेणे करुन यश मिळेल. व्यवसायाच्या निमीत्ताने प्रवास घडतील. जास्त शारिरीक मानसीक कष्ट होतील पण अपेक्षीत काम मात्र न होण्यामुळे निराशा सतावेल यासाठी तुम्ही कोणतेही काम सुरु करण्यापुर्वी उत्तम नियोजन करा. ते नियोजन जिथे तुमच्या नियंत्रणात नाही तिथे सुध्दा यशस्वी होईल अश्या योजना करा म्हणजे त्रास कमी होईल.
व्यावसायीक स्तरावर जरी जा महिना त्रासदायक असला तरी कौटुंबिक स्तरावर मात्र हा महिना बरा असेल. घरी स्त्रीवर्ग असलेल्या पाहूण्याचे आगमन असेल. या निमीत्ताने कौटुंबिक संमेलने होऊन आनंद होईल. आवडीचे अन्नपदार्थ खाण्याचे योग या निमीत्ताने महिनाभरात अधून मधून येतील.
तूळ रास : तुमच्या राशीचा स्वामी १ सप्टेंबरला तुमच्या राशीत येणार आहे आणि लाभेश रवि महिनाभर लाभ स्थानी असणार ही परिस्थिती तुमच्या राशीला चांगली आहे. या सोबत भाग्येश बुध लाभात असल्याने हा महिना लाभदायक आहे असे वर्णन या महिन्यासाठी यथार्थ आहे. या महिन्यात अनेक कामे मार्गी लागतील. यातून चांगले लाभ होतील हे वेगळे सांगावयाची गरज नाही.
गरज आहे झालेल्या लाभाचे उत्तम नियोजन करण्याची.
व्यावसायीक स्तरावर जरी उत्तम चालले असले तरी घरात मात्र अशांतता राहील. ही परिस्थिती अजून थोडे दिवस असणार आहे. घरगुती वातावरण स्फ़ोटक न होऊ देण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल तर हा महिना खुप त्रास न होता जाईल.
वृश्चिक रास : हा संपुर्ण महिना रवि तुमच्या कर्म स्थानी असणार आहे. ज्यांचे प्रमोशन होणे अपेक्षीत आहे त्यांना ते मिळेल किंवा त्या संदर्भात हालचाली होतील. ज्यांचा जन्म १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर काळातला आहे व दुपारी १२ च्या दरम्यान आहे त्यांना तर हा अनुभव येण्याची शक्यता अजून जास्त आहे. काहींना ह्या महिन्यासाठी वरिष्ठ रजेवर असल्यामुळे अधिकार प्राप्त होणे अपेक्षीत आहे.
आपल्याला काही पैसे रोकड यांचा व्यवहार करणे अपेक्षीत आहे. कुठेही रोख स्वरुपात रक्कम आजकाल फ़ारशी हाताळली जात नाही. पण गरज भासल्यास आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कौटुंबीक स्तरावर उतरार्धात आपला वैवाहीक जोडीदार आपल्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. इतका भाग सोडला तर महिना चांगलाच जाणार आहे.
धनू रास : हा महिना आपल्या साठी चांगले ग्रहमान घेऊन आलाय. धार्मिक यात्रा आपल्याला या महिन्यात घडणे संभव आहे. श्रावण महिना, आपला धार्मिक स्वभाव आणि धार्मिक यात्रा हा संयोग छानच आहे. या महिन्यात आपल्या वैवाहीक जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. फ़ारसा मोठा शारिरीक त्रास होईल असे संभवत नाही पण काळजी घेणे आपले कर्तव्य आहे.
आपण लेखक असाल आणि आजवर आपल्या लेखनाचे पैसे येणे असतील तर जरा मागणी करुन पहा. या महिन्यात हे काम होईल. आपल्याला नविन मित्र मिळतील त्यातून नविन लाभ होणे, व्यावसायीक संधी उपलब्ध होणे अपेक्षीत आहे.
मकर रास : खुप दिवस मंगळ आपल्या लग्न स्थानी आहे. गेले महिनाभर वक्री होता तो २७ ऑगस्टला मार्गी होऊन पुन्हा आपली अडलेली कामे मार्गी लावणार आहे. अर्थातच ही संधी ७ अक्टोंबर पर्यंत असल्याने जे जे आपल्याला मार्गी लावावेसे वाटत आहे त्याची योजना करा.
हे करत असताना या महिन्यात आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. यास्तव बेसावध राहू नका.
महिनाभर वैवाहीक जोडीदाराबरोबर खटके उडत असतील तर आता या महिन्याचा उतरार्धात आता ते थांबेल. या महिन्यात आपले वडील जर लांब रहात असतील तर त्यांची भेट महिन्याच्या उतरार्धात व्हावी. जर आपल्या सोबत असतील तर दिवसाचा जास्त काळ त्यांचा सोबत जाईल. त्यांचे प्रेम आणि आशिर्वाद याचा लाभ होईल. ज्यांचे वडील भेटणे शक्य नसेल त्यांना हाच अनुभव वडीलधार्या व्यक्तीकडून मिळेल.
कुंभ रास : नोकरी व्यवसायानिमीत्त प्रवास अजुनही काही दिवस घडणे शक्य आहे. अश्या प्रवासामुळे काही लाभ होणे अपेक्षीत आहे. याला जोडून एखादी धार्मिक स्थळाची यात्रा करण्याचा योग आल्यास ही एक सुसंधी मानावी लागेल. संतती संदर्भात काही चिंता निर्माण झाली असेल तर ती या महिन्यात दुर होईल.
काही लोकांना आपला जोडीदार फ़ारच रोमॅटीक होतो आहे असा महिनाभर अनुभव येईल. अशी संधी कुंभ राशीला वारंवार येत नाही त्यामुळे हा ही अनुभव घ्यायला तयार रहा.
मीन रास : आरोग्याची काळजी घ्यावी असा महिना आहे. ज्यांनी चाळीशी ओलांडली आहे त्यांनी नियमीत पथ्य आणि औषधे याकडे दुर्लक्ष करु नका. एखादा मोठा प्रोजेक्ट हातात आहे पण थांबला आहे किंवा संथ झाला आहे असे दिसत असेल तर २७ ऑगस्ट नंतर पुन्हा त्याची प्रगती सुरु होईल. आपला नोकरी/व्यवसाय जर अडचणीत असेल तर हा महिना उलटताच त्याला दिशा सापडेल.
या महिन्यात फ़ारसे काही महत्वाचे घडेल असे नाही पण आपले प्लॅनिंग असू द्या. हा वेळ त्यासाठी द्या.
हे राशीभविष्य दर महिन्याला वाचण्यासाठी माझ्या https://www.facebook.com/gmjyotish/ या फ़ेसबुक पेज ला लाईक करा.
जर आपल्याला या शिवाय ज्योतिषशास्त्र विषयात रस असेल तर https://www.facebook.com/groups/npastrogroup/ या
ज्योतिषविषयक समुहाला जॉईन करा.

Subscribe to:
Posts (Atom)