सर्व ज्योतिषप्रेमी वाचकांचे दिवाळी अंकाला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार. १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या महिन्याचे राशी भविष्य सुरु करण्यापुर्वी एक महत्वाची माहिती आपल्या सर्वांना देऊ इच्छितो. या महिन्यात कार्तिक पोर्णिमा अर्थात त्रिपुरारी पोर्णिमा दिनांक १४ नोव्हेंबर रोजी आहे. त्याच दिवशी कृतिका नक्षत्र सुध्दा आहे. महाराष्ट्रात कार्तिकेय फ़ारसे लोकांना माहित नाहीत. कार्तिकेय हे शिव-पार्वतीचे जेष्ठ पुत्र व गणपतीचे मोठे भाऊ. दक्षिणेत यांना विशेष पुजले जाते. या दिवशी कार्तिकस्वामींचे दर्शन घेतल्याने वर्षभर आर्थिक चिंता रहात नाही. कृतिका नक्षत्र १४ नोव्हेंबरला सायंकाळी ४ वाजुन २७ मिनीटानी सुरु होते. यानंतर कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे. विधीवत पुजा करावी. रात्री १९ वाजुन २२ मिनीटांनी म्हणजे रात्रीचे ७ वाजुन २२ मिनीटांनी पोर्णिमा संपते तो पर्यंतच दर्शन घ्यावे.
जे वाचक पुण्याला रहातात त्यांना पर्वतीवर असलेल्या मंदीरमधे दर्शन घेता येईल. तसेच चिंचवड येथे पदमजी पेपर मिल्स - थेरगाव येथे सुध्दा कार्तिकेय मंदीर आहे. असेच मंदीर सातारा तसेच सोलापुर येथेही आहे. ज्या ठिकाणी दाक्षिणात्य पध्द्तीची मंदीरे असतात तिथेच प्रदक्षीणा मार्गावर कार्तिकेयाची मंदीरे स्थापन केलेली असतात. हे ही सोयीचे नसल्यास आपल्या घरी कार्तिकेयाचा फ़ोटॊ ठेऊन श्रध्देने पुजन करता येते.
आता मासिक भविष्याकडे जाऊ. या महिन्यात रवि अर्थात सुर्य वृश्चिक राशीत महिनाभर आहे. बुधाचा २८ नोव्हेंबरला धनु राशीत प्रवेश, शुक्राचा मकर राशीत २ डिसेंबरला प्रवेश आणि मंगळाचा कुंभ राशीत ११ डिसेंबरला प्रवेश हे महत्वाचे बदल आहेत. वृश्चिक राशीतला रविचा महिना काहीवेळा काहीजणांना आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक जातो. खास करुन मुळव्याधीचे रोगी जास्त त्रस्त होतात. यासाठी फ़क्त दुपारी ताजे ताक सुंठ घालुन प्यावे. हिवाळा असल्याने शक्यतो रात्रीचे ताक पिऊ नये,
मेष रास : ११ डिसेंबरला मंगळ कुंभ राशीत जाईपर्यंत नोकरीच्या/ व्यवसायाच्या ठिकाणी लढाई चालु असणार. २८-२९ नोव्हेंबर हे मनस्तापाचे दिवस असतील. त्याच बरोबर ७ डिसेंबर ते १४ डिसेंबर हा काळ फ़ारसा चांगला असणार नाही. आरोप- प्रत्यारोप होतील. आपले इंटरेस्ट संभाळुन रहा. २५-२६ नोव्हेंबर आणि ५-६ डिसेंबरला मनासारख्या काही गोष्टी घडतील. हा महिना पेशन्स दाखवा. २६ जानेवारी पर्यंत स्थिर रहा. दिवस सुखाचे येतील.
वृषभ रास : २८ नोव्हेम्बर नंतर बुध आपल्या अष्टमात जातो आहे. आपण व्यापारी असाल किंवा शेअर मार्केटमध्ये असाल तर आपले अंदाज चुकण्याचे योग आहेत. जोखीम घेऊ नका असे सांगणारा हा महिना आहे. या महिन्यात कामाचे चांगले प्लॅनिंग करा म्हणजे पुढील महिन्यात जेव्हा मंगळ दशमात जाऊन लढाईचे योग आहेत तेव्हा प्लॅनिंगला वेळ मिळणार नाही. ३०-३१ तारखा फ़ारश्या चांगल्या नाहीत तसेच सप्तमात होणारी ७ ते १४ डिसेंबरला होणारी रवि- शनि युती पती-पत्नी मधे वैचारीक मतभेद निर्माण करेल. हे फ़ार मोठे वादळ असेल असे नाही. २८-२९ नोव्हेंबर हे दिवस चांगले जातील.
मिथुन रास : दिवाळीत सप्तमात आलेला शुक्र आपल्या सप्तमस्थानात २ डिसेंबर पर्यंत विराजमान आहे. पती-पत्नी यांना सुखसंवाद करायला उत्तम काळ आहे. ३० नोव्हेंबर आणि १- २ डिसेंबर तारखा स्मरणात रहातील. अष्टमातला मंगळ तब्येतीचे दुखणे निर्माण करत नाहीना या कडे पहावे. ११ डिसेंबर पर्यंत कोणतेही दुखणे अंगावर काढु नका. भावंडासंबंधी काही समस्या उभी रहाण्याची शक्यता ७ ते १४ डिसेंबरच्या दरम्यान आहे. भावंडाशी या काळात वितुष्ट घेऊ नका. अडचणीत असतील तर मदत करा.
कर्क रास : सप्तमस्थानात आलेला मंगळ पती-पत्नीमधे महिनाभर विनाकारण धुस-फ़ुस घडवेल. याकडे कसे पहायचे ते तुम्ही ठरवा, ही धुस-फ़ुस होऊ नये असे वाटत असेल तर ज्या गोष्टींमुळे हे घडु शकते ते टाळा. एखाद्या कौटुंबीक संमेलनाचा योग या महिन्यात येईल. अश्या वेळी हे संमेलन पत्नीच्या माहेरी असेल तर वेळात वेळ काढुन तिकडे जा. हे वादाचे कारण नको. आपण रियल इस्टेट क्षेत्रात नोकरी करत असाल आणि खास करुन मार्केटींग करत असाल तर यशाचा काळ आहे. काही प्रॉपर्टी खरेदी- विक्री च्या प्रयत्नात असाल तर ते घडुन येईल.
सिंह रास : नोकरी - व्यवसाय आणि घरात महिनाभर तणाव राहील. घरात तुमचे म्हणणे कुणाला पटणार नाही. यावर एकच पर्याय आहे. तुम्हाला जे काय सांगायचे आहे ते प्रथम ज्याला ते पटकन समजते त्याला सांगा. आणि त्यालाच ते इतरांना सांगायला सांगा. नोकरी- व्यवसायात शत्रुंना नामोहरम करण्याची सुवर्ण संघी चालुन येईल. केवळ आपले सामर्थ्य दाखवुन शत्रुला नामोहरम करण्याची संधी घ्या. शत्रु पुढे अनेक दिवस डोके वर काढणार नाही.
कन्या रास: मुलांच्या प्रगतीची चिंता करावी लागेल. खास करुन या महिन्यात एखादी परिक्षा असेल तर मुले नीट अभ्यास करत आहेत ना याची चौकशी करा. लहान मुले असतील तर परिक्षेच्या काळात त्यांना मैदानी खेळ खेळायची लहर येईल. काही वेळ खेळायला हरकत नाही पण त्या खेळात कसली रिस्क नसते ना या कडे लक्ष द्या. मुले परिक्षेचा अभ्यास सोडुन दुरदर्शन वर फ़ार वेळ घालवत आहेत असे वाटले तर नक्कीच योग्य ते करा.
तूळ रास : आपण ७ ते १४ डिसेंबर काळात वडीलधारे व्यक्तींच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. त्यांना वेळेवर औषधे -उपचार करा. लेखक असाल तर हा महिनाभर उत्तम लेखन होईल. फ़ेसबुक - व्हॉट्स अपवरचे तुम्ही लिहलेले पोस्टला खुप प्रसिध्दी मिळेल. १८-१९ नोव्हेंबरला ही प्रसिध्दी खुप मिळेल. घरचे वातावरण थोडेसे गरम असेल. कोणत्या कारणामुळे घरातली शांतता बिघडत आहे ते लक्षात घेऊन त्याचे निराकरण करा. काहींना प्रॉपर्टीचे घेण्याचे योग २ डिसेंबर पर्यंत आहेत.
वृश्चिक रास : महिनाभर कामाचा ताण जाणवेल. ११ डिसेंबर पर्यंत कामाच्या निमीत्तने लहान प्रवासही अपरिहार्यपणे करावे लागतील. तुमचे विचार अनेकांपर्यंत पोचवताना तुम्ही तहान भुक विसरुन काम कराल. जे पैसे डुबले असे वाटत होते त्याच्या वसुलीचे प्रयत्न २ डिसेंबर पर्यंत नेटाने करा. यश मिळण्याची शक्यता आहे. ७ ते १४ तारखांना अकस्मात संघर्षाला सामोरे जावे लागेल. हे का घडत आहे याची कारण मिमांसा करा. नुकसान नाही पण काही काळ नाते संबंध बिघडण्याची शक्यता यामुळे आहे.
धनु रास : धनु राशीचे लोक काही काळे काम करतील अशी शक्यता नसते. पण डिसेंबर महिन्यात नाईलाजास्तव केलेले बेकायदेशीर कृत्य समोर येईल. काय घडु शकते याची कल्पना येताच परिस्थीती आटोक्यात राहील हे पहा. या शिवाय तुमच्या मनासारखे व्हावे असा काळ २ डिसेंबर पर्यंतच आहे. जे काही आजवर तुमच्या मनात आहे ते घडवण्यासाठी प्रयत्न करा. यश नक्की मिळेल. महिनाभर नविन लोक भेटतील. तुमचे मधुर नाते निर्माण होईल असा काळ आहे.
मकर रास : वरिष्ठांची नाराजी, किरकोळ कामातही बिघाड असे योग २ डिसेंबर पर्यंत आहेत. हाताखालचे लोक अचानक सुट्टीवर जाणे यासारखे प्रश्न वरिष्ठ पदावर असलेल्या लोकांना हाताळावे लागतील. यातुन बाहेर पडण्यासाठी तुम्हाला अधिक काम करावे लागेल. असे असुनही काही कामे मनासारखी होतील पण ती सहज होणार नाहीत. २८ नोव्हेंबर नंतर प्रवासाचे योग संभवतात. हे नोकरीच्या/ व्यवसायाच्या निमीत्ताने असणार आहेत त्यामुळे काम जास्तच पडेल.
कुंभ रास : नोकरी व्यवसायात आपल्या अधिकाराला आव्हान मिळेल. ते आव्हान निपटुन काढायला केवळ बुध्दी चातुर्य पुरे पडणार नाही तर त्याही पुढे जाऊन पैसा खर्च होईल. हा महिनाभर अनेक लाभ होण्याचे योग आहेत. यामुळे अचानक खर्च आले तरी त्याची तजवीज झालेली असेल. दशमात असलेला रवि तुम्हाला यश देईल पण महिनाभर तुम्ही व्यस्त असाल. नोकरी व्यवसायात सरकारी मदतीने काही नविन प्रस्ताव येतील. हे फ़ायद्याचे असतील. याकडे आपण कसे पहाता यावर त्याचा फ़ायदा अवलंबुन आहे.
मीन रास: या ना त्या मार्गाने पैसे हाती पडल्याने तुम्ही खुश व्हाल. उत्तम सुखाचा लाभ महिनाभर आपल्या राशीला आहे. आपले व्यापारी अंदाज बरोबर येतील. २५-२६ तारखांना होणारा किरकोळ मनस्ताप सोडला तर हा महिना स्मरणात राहील असे एकंदरीत ग्रहमान आहे. आलेले पैसे चांगल्या पध्दतीने गुंतवा हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. लग्न व्हायचे असेल तर स्थळे येणार आहेत. त्याबाबत अजुनही निर्णय घेतला नसेल तर घ्या. स्थळे नाकारुन वेळ निघुन गेली तर लग्न लांबेल.

No comments:
Post a Comment