नमस्कार ज्योतिष प्रेमी वाचकहो,
आज मी पुन्हा ऑफ़ीस सुरु करुन तसेच राशीभविष्य लिहायला लागुन ३ महिने पुर्ण होत आहेत. आपल्या प्रतिसादामुळेच हा उपक्रम सुरु ठेवण्यास आनंद होत आहे. मागच्या महिन्याचे राशी भविष्य माझ्या ब्लॉगवर आजपर्यंत ३३६ जणांनी वाचले हा गेल्या तीन महिन्यातला विक्रम आहे. १५० लोकांना मी राशीभविष्याची लिंक पाठवली असता ३०० च्या वर लोक वाचतात ही पावती सुखावणारी आहे.
आपणास विनंती आहे की जर आपण हे राशीभविष्य नियमीत वाचु इच्छित असाल तर माझ्या ब्लॉगला subscribe करा म्हणजे ते तुम्हाला नियमीत इमेल वर प्राप्त होत राहील.
१५ डिसेंबरला रवि धनु राशीत जात आहे आणि मागील महिन्यात रविला लागलेले शनिचे ग्रहणही संपत आहे. रवि हा तेज पुंज ग्रहांचा राजा जेव्हा शनि सोबत येतो रविचे कारकत्व बिघडते. राजकीय व्यक्तींवर संकटे येतात हे ही आपण मागच्या महिन्यात पाहिले. सुश्री जयललीता यांचा दुख: शेवट झालेला मागील महिन्यात पाहिला. वाचकांपैकी काहींना रवि वडीलांचा कारक असल्यामुळे वडिलांच्या आजारपणाचा सामना करावा लागला असेल. खास करुन तुळ राशीला मी हे लिहले होते. आज हे मी १० डिसेंबरला लिहीत आहे पण अद्याप १४ डिसेंबर पर्यंत त्याचा त्रास जाणवणार आहे.
डिसेंबर महिन्यात रवि अर्थात सुर्य धनु राशीला म्हणजे गुरुच्या राशीला जात आहे. या महिन्यात रवि व गुरु यांचा केंद्र योग होत आहे. दोन्ही ग्रह नेत्रुत्व गुणांनी भरलेले आहेत. जनहितार्थ काम करणारे हे ग्रह जेव्हा केंद्र योगात ९ ते १४ जानेवारी काळात, भारताच्या व्यय स्थानातुन तसेच ते भाग्य स्थानातुन केंद्र योगात जात आहेत. परराष्ट्र खात्याच्या संदर्भात काही महत्वाचे घडेल असे दिसत आहे. गुरु हा फ़ायनान्स चा कारक आहे त्यामुळे नोटबंदी पाठोपाठ आणि महत्वपुर्ण निर्णय फ़ायनान्स संदर्भात आले तर त्याचे आश्चर्य वाटायला नको. ह्या निर्णयाचा संबंध बहुदा परकीय चलन, परकीय गुंतवणुक किंवा तत्सम असेल अशीही शक्यता आहे.
सामान्य माणसांना त्या काळ्या पैशाची पडलेली नाही. त्यांना आता तरी एटीएम च्या रांगा कमी होतील का ? असा प्रश्न पडलेला असेल. ११ डिसेंबर आणि २८ डिसेंबर या तारखांना अनुक्रमे मंगळ आणि शुक्र भारताच्या धनस्थानी जात असल्याने चलन टंचाई ११ डिसेंबर पासुन कमी होऊन ती २८ डिसेंबरला फ़ारच कमी झालेली असेल असे वाटते. आपण कॅशलेस कडेच वाटचाल करावी हे आता क्रमपाप्त असल्याने मी ही PAYTM सुरु केले आहे.
चला १५ डिसेंबर ते १४ जानेवारी काळासाठीच्या राशी भविष्याकडे जाऊ
मेष रास :
महिनाभर नुसतीच पळापळ पण खिशात काही नाही. त्यात नोटबंदीमुळे चलन नाही अशी स्थिती खास करुन छोटे उद्योजक यांना मागच्या महिनाभर जाणवली असेल. नोकरदार ही शनि व रवि यांच्या प्रतिकुलतेने महिनाभर त्रस्त असतील. पण चांगली बातमी अशी की रवि तुमच्या भाग्यात जात आहे. खेळाडु असाल तर या महिन्यात नक्की यश असेल. कोणत्या तरी टीम मधे तुमचा समावेश झाल्याची बातमी येईल. शोध घेतलात तर तुमची स्वत:ची एक स्वतंत्र क्रिडा शैली तुम्हाला सापडेल जी सहजासहजी कोणीच कॉपी करु शकणार नाही.
२८ डिसेंबरला शुक्र लाभात जाईल. अविवाहीत असाल तर येणारी बातमी चांगली असेल. मुळचा शुभ ग्रह तुम्हाला काही देण्यासाठी लाभात २०-२५ दिवस मुक्कामी असेल. १-२-३ जानेवारी तारखांना सुध्दा आईकडुन एक चांगला आशीर्वाद मिळेल जो सुख देऊन जाईल. एखादी जुनी लाईफ़ इन्शुअरन्स पॉलीसी मॅच्युअर होत असेल तर ती सुध्दा बोनसच्या रुपात अनपेक्षीत लाभ देईल.
मेष राशी वालो. एक महिनाभर सुखाचा आहे. शनिचा त्रास २६ जानेवरी नंतर जवळ जवळ संपणार आहे. असे एकंदरीत ग्रहमान आहे.
वृषभ रास
मंगळ २१ जानेवारी पर्यंत कुंभ राशीत म्हणजे तुमच्या दशम स्थानात रहाणार आहे. महिनाभर नोकरी- व्यवसायात लढाई करायची आहे असे मागील महिन्यात सांगीतले आहे. हे लक्षात ठेऊन जर संभाव्य लढाईची तयारी चांगली केली असेल तर समाधान लाभेल की आपल्याला शरणांगती पत्करावी लागली नाही. तयारी केली नसेल तर मात्र पराभवातुन काही शिकण्याचे तंत्र आत्मसात केल्यास पुन्हा अशी शरणांगती पत्करावी लागणार नाही. ह्या लढाईत मनालाही जखमा होणार पण आहेत त्यामुळे आत्मविश्वास गमाऊ नका.२८ डिसेंबरला शुक्र दशमात उतरला म्हणजे शत्रु पळुन जाण्याची तयारी करेल तोवर खिंड लढवायची आहे. लढाई फ़क्त शक्तीवर आणि नशीबावर जिंकायची आहे. तडजोडीला फ़ारसा वाव असेल असे दिसत नाही. २३-२४ डिसेंबर तारखांना मनाच्या हिंमतीवर पार करायच्या आहेत.
या सगळ्या पार्श्वभुमीवर गुरुची मंगळावर दृष्टी आहे. दररोज सकाळी श्री गणपतीचे स्मरण करा. युध्दात यश देणारी आणि संकट हरण करणारी देवता श्री गणपतीच आहे.
मिथुन रास
मिथुन राशीचा स्वामी बुध १९ डिसेंबर ते ८ जानेवारी पर्यंत वक्री होणार आहे. प्रोफ़ेसर असाल तर आपल्याला झोपेतुन उठुन जरी लेक्चर द्यायला सांगीतल तरी उत्तम होईल असा खात्री असलेला लेसन बिघडेल. घरात सुध्दा हवे ते शब्द तोंडातुन न आल्याने काही गैरसमज होतील. शेअर मार्केट, इंन्शुरन्स एजंट खात्री असल्या शिवाय सल्ला देऊच नका अंगाशी येईल.
भाग्यात गेलेला मंगळ आपल्याला धाडस करा असे खुणावेल परंतु ८ जानेवारी पर्यंत फ़ायनान्स संदर्भात धाडस करु नका. २८ डिसेंबरला भाग्यात जाणारा शुक्र तुमच्या कलात्मकतेला एक नविन व्यासपीठ मिळवुन देईल. त्या संधीचा लाभ घ्या. तुमची कला प्रदर्शन करण्याची संधी २८ डिसेंबर नंतर सोडु नका आणि पहा आपल्या कलागुणांचे चीज होताना दिसेल. ३०-३१ तारखा या दृष्टीने फ़ारच महत्वाच्या आहेत. हो पण ज्या कलेत पाठांतराचा/ शब्द फ़ेकीचा/ बोलण्याचा भाग महत्वाचा आहे तो भाग दगा देणार नाही यासाठी जास्त कष्ट घ्या.
कर्क रास
सप्तमामध्ये शुक्र आहे. त्याचे वास्तव्य २८ डिसेंबर पर्यंत आहे. इंग्रजी वर्षाअखेर अनेकांना सुट्टी असते. दुरच्या प्रेक्षणीय स्थळी सुट्टीवर सहकुटुंब जाण्याचे योग आहेत या दृष्टीने ही वर्षाखेर लक्षात राहील अशी असेल. अष्टमात मंगळ आहे हा तब्येतीचे काही छोटे त्रास दर्शवितो. पायाला खरचटणे, ठेच लागणे अश्या गोष्टी घडण्याची शक्यताही आहे. हे फ़ार मोठे होणार नाही यास्तव प्रवासाला निघालात तरी रिस्क नको हा मंत्र लक्षात ठेवा. शुक्र २८ ला कुंभेत गेला तरी ३० व ३१ तारखांना चंद्र सप्तमात असल्यामुळे आनंदाला विरजण लागणार नाही.
१-२-३ तारखांना चंद्र-मंगळाची युती तीही अष्ट्मात होते आहे. हा लक्ष्मी योग आहे. शेअर मार्केट २ जानेवारीला उघडताच प्रॉफ़ीट बुक करायचा विचार असेल तर तांत्रीक बाजु पाहून निर्णय घ्या. याच काळात बुध वक्री असल्याने शेअर मार्केट मधे मोठे बदल दिसतील त्यामुळे निर्णय विचारपुर्वक घ्या. शेअर मार्केटमधुन असुदे किंवा लॉटरीचा १ जानेवारीचा बंपर ड्रॉ असुदे खिसा गरम होणार आहे.
सिंह रास
तुमच्या राशीला महत्वाचा ग्रह रवि जो शनिबरोबर गेले महिनाभर असल्याने अनेकदा तुमच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे जाणवले असेल. ही स्थिती आता नाही. रवि १५ डिसेंबरला तुमच्या पंचमस्थानात येत आहे. हे स्थान नवनिर्मीतीचे आहे. आपली प्रतिष्ठा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जी काय खेळी करायची ती करुन टाका. ही खेळी नाविन्यपुर्ण असेल ज्यामुळे जे तुम्हाला वाकुल्या दाखवत होते त्या सर्वांना एक धक्का बसेल. नाविन्यपुर्ण पध्दतीने हा " जोरो का झटका धीरे से लगे" असा तुमचा प्रयत्न असेल.
राशीचक्रात सर्वात प्रमुख ग्रह रवि असतो तो जेव्हा शनिच्या युतीत जातो तेव्हा तुमची प्रतिष्ठा पणाला लागते शिवाय तुम्ही नाऊमेद होऊ शकता. पण आता हा महिना तुमचा आहे. रवि पुर्वेला उगवतो म्हणुन त्याला पुर्व म्हणतात. आता महिनाभर तुम्ही म्हणाल ती पुर्व याचा अनुभव नक्की येईल. सप्टेंबर २०१७ पर्यंत राहू तुमच्या राशीला आहे फ़ार धाडस नको. साधूने नागाला जी गोष्ट सांगीतली ती आठवा. साधूने सांगीतल्यामुळे नागाने फ़ुत्कारणे बंद केले परिणामी मुले जाता येता दगड मारु लागली. म्हणुन दंश करुन नका पण फ़ुत्कार सोडाच.
कन्या रास
कन्या राशीचे लोक फ़ारच चिकीत्सक म्हणुन वधु- वर संशोधनात सुध्दा फ़ार वेळ घालवतात. हा मामला फ़ार चिकित्सेचा नाही तर आपल ह्र्दय काय सांगते हे तपासुन निर्णय घेण्याचा असतो. आजुबाजुला अश्या संधी महिनाभर असतील. त्याची जाणिव ह्र्दयकरुन देईल तेव्हा त्याची शास्त्रीय चिकित्सा करु नका. हवा तो जोडीदार मिळावा असे वाटत असेल तर २८ डिसेंबर पर्यंत फ़क्त ह्र्दयाचेच ऐका. तुमच्या राशीचे शुभमंगल होण्यासाठी हे वर्षभर गुरुमहाराज तुमच्या लग्नी येऊन बसलेत. पण तुम्ही निर्णय घेणार असाल तर.
तुम्ही खुपच हुशार आहात, बुध्दीमान आहात आणि सर्व निर्णय बुध्दीला घासुन घेता हा तुमचा स्वभाव आड येतो म्हणुन तुमचे शुभमंगल लांबते आहे. तुम्ही ह्र्दयाचे ऐकुन निर्णय घेण्याची संधी वर्षातुन एकदा येते. गुरु अनुकुल असेल तर त्यावर लग्नाचे शिक्कामोर्तब होते. तुम्ही निर्णय घेतलात तर जानेवारी महिन्याचा शेवटी लग्नाची तारीख पक्की होण्याचेही योग आहेत.
तूळ रास
साडेसातीचा भर आता ओसरला आहे. खुप मानसीक छळ होण्याचा काळ संपला असे या महिन्यात नक्की जाणवेल. कारण तुमच्या चतुर्थात चक्क शुक्र नावाचा शुभ ग्रह येऊन बसला आहे. १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत आनंद लुटण्याचा काळ आहे असे नक्की जाणवेल. या काळात चिंतारहीत जीवन जगाल आणि सुख साधानांचा आस्वाद घ्याल. २६ अक्टॊबरला साडेसाती संपते तोवर शनि उपासना सुरुच ठेवा.
२८ डिसेंबरला शुक्र तुमच्या पंचमस्थानात येईल. तुम्ही कलाकार असाल तर नवनिर्मीतीचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा. २८ डिसेंबर ते २८ जानेवारी हा महिना तुम्ही काही तरी नविन निर्माण करणार आहात हे नक्की. त्याच बरोबर तुम्हाला हा शुक्र त्याचे फ़ळ ही देऊन मग पुढे जाईल. तुमची रचना, तुमचे शब्द, तुमची सुरावट, तुमच संगीत, तुमचे चित्र, तुमचे व्यक्तीमत्व कोणाच्या तरी मनात आनंद देऊन जाईल.
इतके झाल्यावर प्रपोजल न येईल तरच नवल. तुम्हीही त्याकडे दुर्लक्ष करु नका. शब्द टाकताना, बोलताना फ़क्त विचार करा कारण बुध वक्री आहे. तुम्ही नको त्या शब्दात अडकुन पडाल. गुळाच्या गणपतीची गोष्ट जी "आहे मनोहर तरी" मधे सुनिता देशपांडे यांनी लिहलेली आहे. ज्यात फ़ार विचार न करता पुल प्रपोजलवर सह्या करुन मोकळे होतात. ही गोष्ट वाचुन मगच सह्या करा किंवा शब्द द्या.
वृश्चिक रास
सातही राशी जरा मनमुराद आनंद लुटावा अश्या मनस्थितीत असताना तुम्हाला ग्रहमान अजुन अनुकूल नाही असेच म्हणावे लागेल. साडेसातीची हीच ख्याती आहे. एक महिनाभर दम धरा. मधली अडचकी संपुन जेव्हा शनि, मंगळाच्या म्हणजे शत्रु राशीतुन सहा महिने बाहेर पडेल तेव्हाच सुटकेचा निश्वास सहा महिने टाका. २६ जानेवारीला शनि धनु राशीला जात आहे. त्याच परिणाम आत्ता दिसेल पण शांत रहा.
२०-२१-२२ डिसेंबर या तारखांना भाग्येश चंद्र तुमच्या लाभ स्थानातुन जात आहे. वर्षभर गुरु तिथे आहे त्यामुळे दरमहिन्याला ही एक स्थिती तुम्हाला १२ सप्टेंबर २०१७ पर्यंत आहे. जेव्हा जेव्हा चंद्र कन्येत जाईल तेव्हा काही चांगले घडेलच.
धनु रास
कुटुंबस्थानी असलेले शुक्राचे भ्रमण २८ डिसेंबर पर्यंत आनंद निर्माण करेल. हे स्थान खाणे-पिणे दर्शविते. भेळ-पाणी पुरी सारखे जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थांची रेलचेल या काळात असेल. शुक्र तुमचा लाभेश असल्यामुळे एखादी नवी गुंतवणुक तुम्ही कराल. थोडक्यात व्यस्त जीवनात एखादी झुळुक यावी तसे घडेल.
मंगळाचे भ्रमण तुमच्या तृतीय स्थानातुन असणार आहे. तिसरे स्थान हे शौर्य स्थान आहे. मंगळ हा शौर्य, उर्जा आणि धाडस याचा कारक असल्याने तुमचे बाहु स्फ़ुरण पावतील. जरा शंख वाजला की आपल्याला शौर्य दाखवण्याची उर्मी दाटुन येईल. शौर्याला विवेकाने आवरा. कारण जानेवारी च्या १४-१५ तारखांना शेवटी मंगळ आणि शनि यांचा केंद्र योग आहे. बुध ही वक्री आहे धाडस अंगाशी येईल. गरज आणि खात्री असेल तरच धाडस करा. या धाडसाला प्लॅनिंगची जोड द्या. प्लॅन बी -सी तयार ठेवा. मग धाडस अंगाशी येणार नाही.
मकर रास
मकर राशीला जानेवारी महिन्यात साडेसाती सुरु होते. सहसा शनि मकर आणि कुंभ राशीला पिडत नाही याचे कारण पत्रिकेत शनि फ़ारच बिघडला सेल तरच मकर आणि कुंभेचे लोक अनितीने वागतात. त्यांना हवे ते कष्टाने मिळवण्याचा स्वभाव असल्याने ज्याला पाप म्हणतात असे फ़ारसे घडत नाही. मग शनि शिक्षा देणार कशाची ? साडेसाती कष्ट देते पण मकर आणि कुंभ राशीचे लोक त्याला भित नाहीत.
काही तयारी मात्र आवश्यक असते. जुनी दुखणी, चुकीच्या गुंतवणुकी आणि बिघडलेली नाती मात्र सताऊ नयेत यासाठी या महिन्यात विचार करा.
तुमच्या राशीला शुक्र राजयोग कारक आहे. तो लग्नी येताना व्ययेश आणि तृतीयेश गुरु सोबत नवपंचम योग करतो आहे. शुक्र आणि गुरु भक्तीचे कारक ग्रह आहेत. शुक्र पंचमेश आहे त्यामुळे कवि असाल तर एखादी भक्तीरचना सहज सुचेल. २०-२१-२२ डिसेंबर तारखांना अनुपम योग आपल्या भाग्यात येत आहे. काय घडले ते सांगायला विसरु नका. मलाही उत्सुकता आहे.
कुंभ रास
तुमच्या राशीमधुन मंगळाच भ्रमण सुरु आहे. शनिच्या राशीचा शांत पणा बिघडवणारे योग आहेत. मुळच्या चंद्रावरुन मंगळ जाताना एखादा दिवस मनस्तापाचा जाईल. शनि दशमात आहे व तो या मंगळाशी केंद्र योग करतो आहे त्यामुळे जरा जास्त त्रास संभवतो. तेव्हा तुमच्या पध्दतीने आधीच संभाव्य कारणे शोधुन त्यावर विचार करुन ठेवा
२८ डिसेंबर पर्यंत दुरचे प्रवासाचे योग येतील. हा प्रवास शुभ असेल कारण तो शुक्र घडवणार आहे. त्यामुळे प्रवास वेळेवर व सुखदायक असतील. लाल डब्याच्या एस टीचे नाईलाजास्तव तिकीट काढले तरी ऐन वेळी ती उपलब्ध नाही म्हणुन आरामदायक २ बाय २ येईल आणि प्रवास सुखाचा होईल असे योग हा शुक्र देतो.
मीन रास
२८ डिसेंबर पर्यंत शुक्र तुमच्या लाभस्थानी आहे. तो अष्टमेश आहे. शेअर मार्केटमधला प्रॉफ़िट बुक करायची चांगली संधी आहे. बुध वक्री होत असल्यामुळे मात्र हा निर्णय विचारपुर्वकच घ्या. लेखक असाल तर पुर्वी लिहलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती तुम्हाला लाभ देऊन जाईल किंवा जे प्रसिध्द झालेले नाही ते प्रसिध्द होताना येणारा लाभ आता मिळेल.
जे येणार आहे ते जाणारही आहे कारण मंगळ व्यय स्थानात बसला आहे. परदेश वारी किंवा लांबचा प्रवास सुरु असताना तुम्ही हात आखडणार नाही हे निश्चीत. हे सर्व चालु असताना येणारे पैसे आणि खर्च याचा ताळमेळ बसणार नाही. इलाज नाही. तुम्हाला याचा फ़रक पडत नाही. मीन राशीचे लोक असले फ़ालतु विचार मुळी करतच नाहीत.
शुभंभवतु

I read your article with great interest and get amused every time. Nice attempt and keep it up. Wishing you a very bright prospect in this venture.
ReplyDeleteतूळ साडेसाती कधी संपणर
ReplyDeleteमकर राशि ला कोनता खडा चालतो -
ReplyDeleteIts great article thanks.
ReplyDeleteअतिशय सुंदर शब्दरचना असुन, अभ्यासपुर्वक आपण राशी भविष्य संगता आहात खुप छान,तसेच माला रोज देखिल वाचायला आवडेल आपला ब्लॉग .
ReplyDeleteखूपच छान , आभारी आहे
ReplyDelete