इंग्रजी महिन्याची १ तारीख आली म्हणजे मला वेध लागतात १४- १५ तारखेला सुरु होणार्या नविन रवि महिन्याचे. १५ मार्चला सुरु होतोय रविचा मीन महिना. अनेक लोक नव्याने वाचु लागल्याने त्यांना हे समजत नाही की हे काय आहे ? दर महिन्याला साधारणपणे १४-१५ तारखेला रवि राशी बदलतो. कोणी इंग्रजी महिन्याचा संदर्भ घेऊन राशीभविष्य लिहतात. मी सुर्य महिना घेऊन लिहतो.
या महिन्याच्या मध्यावर म्हणजेच २८ मार्च रोजी गुढीपाडवा आहे. वर्षा ऋतु संपल्यावर अश्विन या महिन्यासोबत येणारा शरद ऋतु सृष्टीमध्ये नवचैतन्य घेऊन येतो तसेच शिशीर ऋतु संपुन चैत्र महिन्याबरोबर येणारा वसंत ऋतु सुध्दा नवचैतन्य घेऊन येतो. झाडांना येणारी नविन पालवी येते. हा ऋतु बदल आनंददायी असतो. नविन वर्ष अर्थात शके १९३९ अर्थात हेमलंबीनाम संवत्सराची सुरवात होत आहे. या निमीत्ताने नक्षत्रप्रकाश चा वासंतीक अंक प्रकाशीत करण्याचा संकल्प आहे. याचा सोहळा फ़ेसबुक वरुन दिसेल तसेच याची लिंक ही त्याच वेळेला प्रकाशीत होईल. या निमीत्ताने आपल्या सर्वांना नविन लेख वाचावयास मिळतील तसेच ज्योतिष संशोधनाच्या कार्यास आपला हातभार लागेल. नेमके काय संशोधन करायचे आहे हे आपणासर्वांना वासंतीक अंक वाचला की समजेल.
गुढीपाडव्यास पंचांगावरील श्रीगणपतीचे पुजन करुन वर्षफ़ल ऐकुन वर्षाची सुरवात करण्याची प्रथा आहे. पंचांग आणले नसेल तर आणा. आपली संस्कृती काही चांगल्या प्रथा व त्याचे अर्थ यावर विवीध लेख दाते पंचांगात असतात. याचा उपयोग संस्कृती संवर्धनासाठी होणार आहे.
मीन या रवि महिन्याच्या या राशीभविष्याची सुरवात होताना ७ ऐप्रील २०१७ रोजी हर्षल हा ग्रह मीन राशीतुन मेष राशीत जातो. हर्षल हा ग्रह जसा अधुनिकतेचा कर्ता आहे, बुध्दीमत्तेचा, संशोधनाला चालना देणारा आहे तसाच तो स्फ़ोटक ग्रह आहे. त्यात मेष रास ही अग्नितत्वाची रास असल्याने काही वेगळे परीणाम विवीध राशींच्या लोकांना अनुभवास येतील. या बाबतचा लेख वासंतीक अंकात वाचावयास मिळेल.
आता १४ मार्च २०१७ ते १३ ऐप्रील २०१७ या कालावधीचे राशीभविष्य पाहू
मेष रास : मेष राशीला ७ ऐप्रीलपासून एका नव्या पर्वाला सामोरे जावे लागणार आहे. ७ ऐप्रीलला तुमच्या राशीत येणारा हर्षल आधीच येऊन बसलेला मंगळ. आधीच उन्हाळा, रास अग्नि तत्वाची त्यात आग ओकणारे दोन ग्रह तुमच्या राशीला आहेत. त्यांची युती नाही ही एक समाधानाची बाब आहे. मंगळ १३ ऐप्रीलला तुमच्या राशीतुन बाहेर पडतो आहे तर रवि १४ ऐप्रीलला तुमच्या राशीत जाणार आहे. या महिन्यात फ़ारशी झळ नाही. तुमचे नक्षत्र अश्विनी असेल तर तुम्हाला तुमच्या मनोवृत्तीत होणारा बदल हर्षलच्या राशीबदलानंतर जाणवायला लागेल. याबाबत आपण वासंतीक अंकात पाहुच. भरणी आणि कृतीकेला मनोवृत्तीत बदल व्हायला अजुन वेळ आहे.
भावंडांसंदर्भात चिंता असेल तर ती २७ तारखेच्या आसपास कमी होईल. गेले महिनाभर खुप प्रवास झाला असेल आता कमी होईल. मेषेत असलेल्या मंगळाने तुमच्या मुळच्या उतावीळ स्वभावाला महिनाभर खत पाणी घातले असेल. आता जरा तुम्ही शांतपणे विचार कराल. सिंह सुध्दा सिंहावलोकन म्हणजे मागे वळुन पहातो तसे करा. तुमच्या उपद्रव मुल्याने कोणाला त्रास झाला असेल तर जरा वेळीच सॉरी म्हणा. २९ ३० मार्च ला कटकटी वाढतील. मनस्ताप होईल. डोक्यावर बर्फ़, तोंडात साखर ठेवा. हे सर्वकाळ जमण आपल्याला अशक्य आहे पण कधी तरी स्वभावाला मुरड घालायला हवी.
वृषभ रास : मंगळ तुमच्या व्यय म्हणजे खर्चाच्या स्थानी जात आहे. नको तेव्हढा खर्च महिनाभर आहे. याची तजविज करायला लागा. हा मंगळ चिंता ही देईल. घरात कोणीतरी वहान वेगाने चालवुन अपघात घडवेल किंवा आगीसारख्या घटना घडणार नाहीत ना या साठी काळजी घ्या. घरातल्या तरुणांच्या कृतीकडे खास करुन लक्ष द्या. त्यांचे चित्त विचलीत होईल अश्या घटना किमान महिनाभर घडु देऊ नका.
शेअर बाजारात तुम्हाला स्वारस्य असेल तर २७ मार्च पुर्वी जोखीम असलेले शेअर्सवर लक्ष द्या. योग्य तो सल्ला घेऊन ते शेअर्स काढायचा सल्ला मिळत असल्यास तो माना. २७ मार्चनंतर आपल्या मुलांची परिक्षा असल्यास त्या पेपर्सचा जास्त अभ्यास करण्याचा सल्ला ही मुलांना द्या. खास करुन गणित विषय नाहीना आणि मुलांना तो कठीण जात नाही ना ह्याची तपासणी करा. आजकाल पाल्यांची कमी तर पालकांची परिक्षा पदोपदी असते.
मिथुन रास : हा महिना तुम्हाला अनेक घटना घडताना दिसणार आहेत. लाभ स्थानात येणारा मंगळ तुम्हाला लाभ देऊन जाणार आहे. एखाद्या खटल्याचा निकाल तुमच्या बाजुने लागेल. नोकरीत /व्यवसायात गेले महिनाभर झालेली पळापळ कमी होईल. ७ ऐप्रीलला येणारा हर्षल तुम्हाला एखादे नवे व्यावसायीक अकाऊंट उघडुन देईल. हा लाभ अधुनीक तंत्राचा फ़ायदा घेऊन होईल. दशमामध्ये येणारा रवि एक महिनाभर तुम्हाला मान मिळवुन देईल. तुमचे प्रमोशन अपेक्षीत असल्यास त्या संदर्भात हालचाली घडवील. तुमचे लेखन प्रसिध्द होईल.
गेले महिनाभर तुमच्या कलेला प्रसिध्दी मिळायचे योग येत असतील. या महिन्यात जरा त्यात अडचणी येतील. ह्या महिन्यात येणार्या अडचणी संपल्या की पुन्हा चांगले दिवस येतील. त्यामुळे निराश न होता या संधीचा पाठपुरावा करा.
कर्क रास : गेले महिनाभर काही आरोग्याच्या तक्रारी असतील त्या आता संपतील. नोकरी व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. महिनाभर यामुळे दगदग होणार आहे. हा मंगळ नुसतीच दगदग देईल असे नाही तर तुमच्या कला कौशल्याला नविन व्यासपीठ मिळवुन देईल. तुम्ही खेळाडु असाल तर अनेक स्पर्धा पुढील महिन्यात असतील तर त्या तुम्ही गाजवाल. या निमीत्ताने काही करार होऊन त्यातुन तुमचे उत्पन्न वाढणार आहे. ७ ऐप्रीलला दशमास्थानात येणारा हर्षल तुम्हाला नविन तंत्रज्ञान, संशोधन क्षेत्रात काही संधी घेऊन येणार आहे. ही अत्यंत अधुनिक वातावरणात जाण्याची एक संधी आहे.
२०-२१ तारखेला मनस्ताप संभवतो. २५- २६ तारखेला काही गुढ गोष्टी समजतील. ३०-३१ मार्चला तुम्ही अचानक प्रसिध्दीच्या झोतात याल. एकंदरीत विवीध घटनांनी भरलेला हा महिना आहे.
सिंह रास : रवि मीन राशीत जाणे ही तुमच्या साठी चांगली ग्रहस्थिती नाही. त्यात दशमेश शुक्र वक्री होऊन अष्टमात पडल्याने अजुनच चमत्कारीक परिस्थीती असेल. मंगळच काय तो तुमच्या मदतीला असेल. जबरदस्त ताकदीच्या सिंहाला जंगलातुन पकडुन पिंजर्यात कोंडल्यासारखे आहे. पण हे फ़क्त महिनाभर. जेव्हा हाच रवि मेषेत जाईल तेव्हा पिंजरा तुम्हाला थांबवु शकणार नाही. तुमच्या डरकाळीने तुम्ही पुन्हा आपली पत मिळवाल.
चांगला भाग आहे तो म्हणजे ७ ऐप्रीलला बदलणारा हर्षल तुमच्या भाग्यस्थानात जाईल. जेव्हा जेव्हा तुमच्या राशीच्या अधिपती चंद्र ह्या हर्षलशी योग करेल तेव्हा सत्ता संपादन असुदे किंवा तुम्ही नियंत्रण करणार असाल अशी परिस्थीती अजुन उत्तम रित्या कशी हाताळावी याचा नविन फ़ॉर्म्युला दर महिन्याला तुमच्या चिंतनाने तुम्हाला गवसेल.
या महिन्यात तुम्हाला चांगले काही घडताना दिसले माही तरी दिर्घकाळ सत्ता, पत संभाळु शकाल असे मार्ग या महिन्याच्या शेवटी सापडतील.
कन्या रास : तुमच्या चिंतनाला एक उत्तम दिशा गवसण्याचे ग्रहमान या महिन्यात निर्माण होऊन ते दिर्घकाळ तुम्हाला साथ देईल. मंगळ अष्टम स्थानी गेल्यावर उष्णतेचे विकार महिनाभर त्रास देतील. आधीच तुमचे पचन मंद असते त्यात अॅसिडीटी आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. २७ मार्च नंतर बुध प्रतिकुल झाल्याने प्रतिकार शक्ती कमी होऊन अजुन त्रास संभवतो. योग, आयुर्वेद आणि निसर्गोपचाराचा विचार कराल तरच महिना बरा जाईल.
परदेशातुन काही व्यावसायीक प्रस्ताव या महिन्यात येतील. व्यापार करत असाल तर या कडे डोळेझाक करु नका. काही महत्वाचे व्यावसायीक निर्णय २७ मार्च पुर्वीच घ्या. अविवाहीत असाल तर लग्न जमण्याचा प्रक्रियेत अचानक अडथळे आल्याचे भासेल पण लांबलेली बोलणी महिना अखेरीला पुढे सरकुन निर्णय होतील असे ग्रहमान आहे.
तुला रास : तुमचे सप्तम स्थानी मंगळ येत आहे. महिनाभर रवि सहाव्या म्हणजे शत्रु स्थानी असणार असणार आहे. याशिवाय तुमचा राशी स्वामी षष्ठ स्थानी असल्याने तुमची शक्ती कमी झालेली आहे. नोकरी /व्यवसायात कटकटी १३ एप्रिल पर्यंत जास्त असतील. हा मंगळ तुमचा शत्रु कुरघोडी करतो की काय अशी स्थिती आहे. जेव्हा काही मित्र शत्रु होतात तेव्हा " हेची काय फ़ळ मम तपाला" असे म्हणण्याची वेळ येते असे काहीसे ग्रहमान वर्षभर आहे. त्यात ७ ऐप्रिलला सप्तमात येणारा हर्षल काय ग्रहमान घेऊन येतो ते वैयक्तीक लग्न कुंडलीत तपासावे लागणार आहे.अर्थातच सर्वांना हर्षल खराब असेल असे नाही.
सप्तमस्थानातला मंगळ अनेकांना नोकरी व्यवसायात काही संधी देऊन जाईल. काही व्यावसायीक लाभ सुध्दा होतील पण याला संघर्षाची झालर असेल. जुनी व्यावसायीक येणी येत नसतील तर कटु शब्द बोला. तुमच्या स्वभावाचा फ़ायदा घेऊन जर लोक तुम्हाला बुडवत असतील तर आता यादीच काढा आणि कटु शब्द ठरवुनच बोला. पहा काय परिणाम घडतो.
वृश्चिक रास : तुमच्या सहाव्या स्थानी मंगळ येत आहे. तसेच पाचव्या स्थानी रवि असणार आहे. हीच वेळ आहे शत्रुला गाफ़ील ठेऊन हालचाली करण्याची. तुमच्या हालचाली प्रभावी ठरतील. तुम्ही परिस्थितीवर नेमके नियंत्रण मिळवाल.
अविवाहीत तरुण काही प्रेमाचे शब्द बोलायला गेलात तर ते समोरच्या व्यक्तीच्या मनावर परिणाम करतात असे वाटणार नाही. पण प्रयत्न सोडु नका. याच महिन्यात तुम्हाला अजुन संधी मिळणार आहेत जेव्हा तुमचा प्रभाव पडुन होकार सुध्दा मिळु शकेल.
तुम्ही व्यवसायीक असाल तर उत्तम व्यावसायीक संधी खासकरुन नविन तंत्रज्ञान संदर्भात तुमचे दार ठोठावतील. या संदर्भात आपल्या जन्मपत्रिकेचे आकलन करुन व्यापार वृध्दी करण्याचे योग तुम्हाला नजिकच्या काळात आहेत.
धनु रास : मागील महिन्यात शनि बदल झाला असुन मुळ नक्षत्र असलेल्यांना साडेसाती जाणवेल. मंगळ मेषेत गेल्याने संतती संदर्भात चिंतेचे वातावरण राहील. मुलांची शैक्षणिक चिंता करावी लागेल. नोकरी व्यवसायात काही अपुर्व संधी डोकावतील. याचे पुर्ण विश्लेषण करुन मगच संधी घेणे योग्य ठरेल.
मीन रास तुमच्या चतुर्थात असुन शुक्र महाराज तिथे बराच वास करुन आहेत. किंचित व्यस्तता असली तरी सुखनिद्रा नक्कीच मिळेल. १५ मार्च, २४ मार्च या तारखांना तसेच १ एप्रीलला काही खास योग तुम्हाला फ़ळे देऊन जातील.
मकर रास : नुकतीच साडेसाती सुरु झाली असली तरी ग्रहमान फ़ारसे तापदायक नाही परंतु चतुर्थ म्हणजे सुख स्थानी येणार मंगळ १ मार्च पासुन काहीसा त्रासदायक होईल. कामावर थोडा ताण वाढेल. साडेसाती संपे पर्यंत कोणतेही काम सुखा सुखी घडणार नाही. मकर रास सहनशील असली तरी त्याचा त्रास नक्की जाणवेल. ही स्थिती १४ एप्रिल पर्यंत आहे. अजुनही गुरुची शुभ दृष्टी असल्याने त्यातही खुप त्रास न होता सर्व स्तरावर पुढे जात रहाल असेच ग्रहमान आहे. गुरु वक्री असला तरी थोडासा चांगला प्रभाव आहेच त्यामुळे चिंता करावी असे नाही.
भावंडे काही प्रस्ताव देऊन गेली असतील तर त्यावर मार्ग निघेल. ज्यांना लेखनाची आवड आहे त्यांना चांगले लेखन हातावेगळे करता येईल. काही सुचत असल्यास लिहुन टाका. २७ मार्च पर्यंत बुध म्हणजे शब्द तुम्हाला सहाय करतील. लेखक नसाल तरी तुमचे शब्द अनेक कामे मार्गी लागण्यास सहायभूत होतील. शब्द फ़क्त मधात भिजवा, साखरेत लोळवा आणि गंमत पहा.
कुंभ रास : गेले महिनाभर शनिने मुक्काम दशमस्थानातुन हलवल्यामुळे नोकरी- व्यवसायात किंचीत शांतता अनुभवत आहात. मीनेतला शुक्र कुटुंबस्थानी आल्यावर भेळ, वडापाव या सारखे पदार्थ तुम्हाला वारंवार समोर येतील. एकंदरीत या दृष्टीने चैन सुरु आहे. असे असले तरी मेषेतला मंगळ येत असल्याने भावंडाकडुन थोडासा मनस्ताप होईल असे दिसते. वडिलधारे मंडळी, लहान भावंडे यांचा गोतावळा जमा होईल. चर्चेतुन नक्कीच कठीण प्रसंगातुन मार्ग मिळत असतो. यामुळे चर्चा टाळु नका.
कुंभ रास ज्योतिष प्रेमी असते असा अनुभव आहे. कालनिर्णयचे वार्षीक भविष्य वाचुन झाले की पंचांगाताले वाचायचे. दर महिन्याचे किंवा दररोजचे राशी भविष्य चुकवायचे नाही हा तुमचा परिपाठ असतो. मी त्यामुळेच कुंभ राशीचे भविष्य अजुनच काळजीपुर्वक लिहीतो. पण आपल्या कार्यशक्तीवरचा विश्वास वाढवा. तुम्ही भविष्य बदलु शकाल असा अनुभव या महिन्यात थोडेसे धाडस केलेत की येईलच.
मीन रास : १४ मार्चला रवि लग्न स्थानी येत असल्याने जर महिनाभर मानहानी होण्याचे प्रसंग आले असतील. सरकारी कामे होत नसतील किंवा वडीलांशी वाद होत असतील तर आता ते कमी होतील. आरोग्याविषयी काही तक्रारी असतील तर आता बरे वाटेल. कुटुंबस्थानी मंगळ आल्याने तिखट मेजवानी होणार आहे.
तरुण मंडळी मीनेत शुक्र असल्यामुळे आरश्यासमोर दिर्घकाळ रहातील. एखादी फ़ॅशन किंवा हेअर स्टाईल तुम्हाला कशी सुट होते याकडे लक्ष जाऊन या दृष्टीने बरेच प्रयोग होतील. स्त्रीयांनीच ब्युटी पार्लर मधे जावे असे थोडीच आहे. तरुण मुले आणि पुरुष सुध्दा या विश्वात रमतील असे ग्रहमान आहे. ज्यांचा विवाह व्हायचा आहे, हा महिना फ़ारसा फ़लदायी ठरला नाही तरी बोलणी पुढे सरकतील हे नक्की.
शुभंभवतु

Really nice article and reading according to sun....really awesome experience
ReplyDelete