Wednesday, April 26, 2017

संपुर्ण मे महिन्याचे राशीभविष्य

नमस्कार ज्योतिष प्रेमी लोकहॊ. मेषेत हर्षल गेला आणि भारतात अतिरेकी कारवायांना जोर चढला आहे. जम्मु काश्मीरच्या मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींना भेटत आहेत तोवर माओवाद्यांच्या हल्ल्यात जेवायला बसलेले जवान शहीद झाल्याची बातमी येत आहे. भगव्या कपड्यात अतिरेकी घुसले असुन त्याचा आलेला इशारा अजुन एक बातमी देतो आहे. हे सर्व पुढील काही दिवस सुरु रहाणार आहे. जेव्हा  म्हणजे कर्क ह्या नीच राशीत मंगळ जाईल आणि ह्या मेषेतल्या हर्षलशी अशुभ योग करेल तेव्हा ह्या अतिरेकी कारवायांनी भारत हदरलेला असेल. असो ही सर्व तिसर्या महायुध्दाकडे वाटचाल आहे असे अनेक ज्योतिषी म्हणत आहेत. याचे प्रत्यंतर लवकरच येईल. भारत या युध्दात ओढला जायला मात्र अजुन काही वर्षांचा कालावधी जावा लागेल.

आता संपुर्ण मे महिन्याचे राशी भविष्य पाहू

मेष रास: राशीचा स्वामी मंगळ शृंगारीक वृषभ राशीत महिनाभर आहे पण जोडीदार बाहेरगावी जाण्याने विरह आहे. पण ही परिस्थीती महिनाभर असेल असे नाही.  घशाची काळजी घ्यावी. उन्हाळा आहे म्हणुन खुप आईस्क्रीम, थंड पाणी याचा अतिरेक टाळायला पाहीजे. परदेशात असाल आणि भारतात यायचा प्लॅन जमला नसेल तरी आज तंत्रज्ञान पुढे गेल्याने आपण भारतात असून समारंभात सहभागी असल्याचा आनंद घ्याल.

वृषभ रास: राशीचा मालक लाभस्थानी असल्यामुळे ऐप्रिल प्रमाणे मे महिन्यात सुध्दा मनाप्रमाणे गोष्टी घडणार आहे. काही कामे अजुनही मागे पडली असतील जरा जोर लाऊन १५ मे पर्यंत पुर्ण करा. मुले परदेशात असतील, शिक्षणासाठी बाहेरगावी असतील तर त्यांना काही मार्गदर्शनाची आवश्यकता लागेल. व्यावसायीकांना परगावाहुन/परदेशाहून व्यावसायीक प्रस्ताव येतील त्यावर विचार करा.

मिथुन रास: तरुण जर परदेशात शिक्षणासाठी जायचा प्रयत्न करत असतील तर हा महिना प्रयत्न करण्यासाठी योग्य काळ आहे.  ऑन लाईन अर्ज करायचा असेल किंवा अन्य कोणत्याही प्रोसेस करायच्या साठी योग्य काळ आहे. आपल्या लेखनाचे प्रकाशन करायचे असल्यास सुयोग्य काळ आहे. नोकरीत स्थिती मजबुत असेल. प्रमोशनचे रिपोर्ट तुम्हाला हवे तसे लिहले जातील.

कर्क रास:  शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना त्यांच्या मागण्या पुर्ण होऊन त्याचे फ़ळ हाती लागल्याचा अनुभव येईल. मागच्या महिन्यात असलेली धावपळ संपुन सुखाने सुट्टी घेऊन मित्रांच्या गाठीभेटी घडतील. मागील महिन्यात नविन खरेदी केलेल्या वस्तुंचा उपभोग घ्यायला जमले नसेल तर ह्या महिन्यात ते घडेल. परदेशातुन एखादे पत्र/प्रस्ताव येणे असल्यास फ़ॉलो-अप करा.

सिंह रास: हा महिना नोकरी व्यवसायात भाग्याचा आहे. मेषेत रवि असताना अनेक गोष्टीत यश संपादन कराल. १५ मे पर्यंत ही स्थिती आहे.  तुमच्या राशीचा राजयोग कारक मंगळही कर्मस्थानी आल्याने प्रयत्नाने अनेक कामे मार्गी लाऊ शकाल. यासाठी चांगले प्लॅनिंग करा. सर्व बाबी काटेकोर पणे तपासणे मात्र आवश्यक आहे.

कन्या रास: महिनाभर नोकरी/व्यवसायात कुचंबणा होईल. यासाठी छोटासा उपाय करुन पहा. हिरवी विलायची जवळ ठेवा. हिरवी विलायची खाऊनच महत्वाच्या वेळी बोलायला सुरवात करा आणि अनुभव कळवा. व्यावसायीकांना नविन प्रस्ताव येतील त्यावर विचार करा. विद्यार्थ्यांनी परिक्षा झाल्या नसल्यास झटुन अभ्यास करायला हवा. जोडीदाराशी उत्तम संवाद होईल.

तुळ रास : तुमचा स्वभाव कर्ज घेण्याचा नाही पण चुकून झाले असल्यास या महिन्यात ते फ़ेडण्याच्या दृष्टीने मार्ग दिसेल. उच्च शिक्षण घेत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या शिक्षकांच्या हट्टीपणामुळे मनस्ताप सहन करावा लागेल. जोडीदाराशी जरा विसंवाद झालाच तर मार्ग कसा काढायचा हे सांगाण्याची आवश्यकता तुम्हाला नाही. महत्वाचे निर्णय जरा विचारपुर्वक घ्या.

वृश्चिक रास:  शत्रु पक्ष तडजोडीचे प्रस्ताव घेऊन येईल त्यावर विचार करुन निर्णय घ्या. माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सांगायला हा महिनाभर संधी येतील. तुम्हाला हे व्यक्त करायला संकोच होत असेल तर मग संधी निघून जाईल. शेअर बाजारात आत्ता मुव्ह कराल तर फ़ायद्याची ठरेल. फ़क्त सल्ला घेतल्याशिवाय रिस्क घेऊन नका. नोकरीत वरिष्ठांशी पंगा घेऊ नका.

धनु रास: राशीचा मालक आणि सुख स्थानाचा मालक गुरु वक्री आहे त्यातुन मूळ नक्षत्राला साडेसातीचा तीव्र झटका आहे. काही मनासारखे घडणे जवळ जवळ अशक्यच आहे.  मंगळ दशमात आल्याने संघर्षा शिवाय नोकरी/व्यवसायात काही घडणार नाही. गुरुची उपासना आणि शनिमहाराजांची उपासना सुरु ठेवा. काही चमत्कार घडणार आहेत याचा अनुभव कळवा.

मकर रास: तुमच्याही राशीचा मालक वक्री होऊन रुसला आहे. मनस्ताप असोत की कष्ट तुम्ही कशालाच भीत नाही म्हणुन याही परिस्थितीत तुम्ही तुमची कामे पुढे नेणार आहातच. तुमच्या राशीला शुक्र राजयोग कारक असतो तो महिनाभर पावरफ़ुल आहे मार्ग नक्की निघेल. क्रिडा प्रकारात रस घ्याल आणि याही परिस्थितीत थोडे सुख मिळवाल.

कुंभ रास: शुक्र तुमच्या कुटुंबस्थानी किंवा धनस्थानी महिनाभर आहे. शुक्र रोकड पैसा घेऊन आलेला आहे. त्याचे नीट नियोजन करा. गुढ गोष्टी तुम्हाला आवडतात. याचे आकलन होण्यासाठी जी बैठक हवी असते ती महिनाभर लाभेल. सहजपणे गुढ गोष्टींचे ज्ञान होईल. कामासाठी लहान प्रवास करावे लागतात अश्यांना या महिन्यात काही कारणाने वर्क फ़्रॉम होम ची संधी मिळणार आहे.

मीन रास : कर्म स्थानाचा अधिपती आणि राशीचा अधिपती गुरु महिनाभर वक्री असणारच आहे. घेतलेल्या कामात व्यत्यय येणारच आहे यासाठी गुरु आराधना करा म्हणजे काही महत्वाची कामे तरी मार्गी लागतील. मंगळ तुम्हाला साहस करण्याचे प्रोत्साहन देईल. स्वभावाला मुरड घालून आवश्यक तेव्हडे साहस करायला हरकत नाही. हा ही महिना फ़ार अनुकूल आहे असे नाही.

Tuesday, April 18, 2017

संतती होण्यास अडचणी आहेत अश्यांसाठी

पंचम स्थानाच्या प्रश्न, त्यातुन संततीच्या संदर्भात म्हणजे जरा नाजुक मामला. दोघापैकी कोणाला मेडीकली काय दोष आहे हे विचारायला थोडीशी अडचण. फ़ेलोपीन ट्युब्ज ब्लॉक आहेत हे उत्तर पटकन येते पण काऊंट कमी आहे हे सांगणारे पुरुष थोडेच आहेत. याही पेक्षा वेगळी कारणे आहेत पण त्याची चर्चा करण्याचा हा लेख नाही.

एक दिवस ओळखीतुन एक फ़ोन आला की माझ्या फ़ेलोपीन ट्युब्ज ब्लॉक आहेत सहा वेळा IVF झाली पण गर्भ धारणा झाली नाही. भारतात IVF चा सक्सेस रेट ५५% आहे अशी माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे आणि एका वेळेच्या IVF प्रयोगाची किंमत साधारण ३ ते ३.५ लाख आहे. पाच -सहा वेळा IVF फ़ेल झाली की जोडप्याचा धीर खचतो आणि कधीतरी पैसे हा ही प्रश्न असतोच.

ज्योतिषशास्त्र दृष्टीने पंचमेश सुस्थितीत म्हणजे पंचमात, लाभ स्थानी, भाग्य स्थानी किंवा दुसर्या स्थानी असला की संतती त्रासा शिवाय होणार असे सर्वसाधारण पणे म्हणता येते. पंचमेश गुरु असेल तर त्याचे नैसर्गीक कारकत्व संतती देण्याचे आहे त्यामुळे वरील विधान खात्रीलायक रित्या करता येते. हीच परिस्थीती पंचमेश गुरु शिवाय मंगळ, बुध, शुक्र , चंद्र किंवा रवि असता व तो वरील स्थानी असता ( २,५,९,११ ) असुन त्यावर जर भाग्येशाची पुर्ण दृष्टी असता तसेच खात्रीलायक विधान करता येते.

नवरा - बायको या दोघांच्याही कुंडलीत वरील स्थिती असताना ज्योतिषाकडे जाण्याचा प्रश्न संतती संदर्भात येत नाही.

याउलट पंचमेश ६,८ किंवा १२ स्थानी असता, किंवा शनि पंचमेश असुन ६,८ किंवा १२ स्थानी असता, भाग्येशाच्या पुर्ण दृष्टीमधे नसताना परिस्थिती वेगळी होते. संतती इच्छुक जोडपे लगेचच निदान करुन घेते. यातुन स्त्रीचे पंचमस्थान बिघडले असताना फ़ेलॊपीन ट्युब ब्लॉक या सारखा खर्चीक आणि वेळखाऊ तर PCOD या सारखे  पण डॉक्टरी उपायाने संतती प्राप्त होताना दिसते.

फ़ेलोपीन ट्युब ब्लॉक ही अत्यंत असाधारण परिस्थिती असताना आणि ४-५ वेळा IVF फ़ेल गेली असताना आता कधी IVF करु हा प्रश्न घेऊन जोडपे येते तेव्हा या जोडप्याला संतती सुख आहे ना ? हा प्रश्न आधी पहावा लागतो तर पुढचा प्रश्न जोडप्याचा मुळ प्रश्न नेमके कधी IVF करावे हा येतो.

नोव्हेंबर २०१६ मध्ये एक जोडप्याने मला प्रश्न विचारला आणि श्री गजानन महाराज शेंगाव यांच्या कृपेने माझे मार्गदर्शन योग्य ठरुन कोणतेही यज्ञ -याग न सुचविता काही तारखा मी सुचवल्या,  ज्या दिवशी IVF केली असता सक्सेस्फ़ुल होईल असा अंदाज दिला.

आजच १८-०४-२०१७ रोजी  या जोडप्यातील पुरुष प्रत्यक्ष भेटला आणि त्याने IVF सक्सेसफ़ुल होऊन पत्नी प्रेग्नंट असल्याची गोड बातमी मला सांगीतली. सोबत आनंदाने जास्त दक्षिणाही देऊ केली. मी त्याला सांगीतले की तु एक मला लेखी देशील तर हा प्रयोग पुन्हा करण्याची मला संधी असे अडचणीतले लोक मला देतील. तो पुरुष विचारात पडलेला दिसला. कदाचीत ३ महिन्यापर्यंत ही बातमी जवळच्या नातेवाईकांना ही न सांगण्याची प्रथा असल्याने त्याने मला लेखी देण्याचे आश्वासन दिले नाही.

लेखी मागण्याचा उद्देश असा की जसा IVF हा प्रयोग आहे तसाच मी IVF सुयोग्य तारखा देणे हा सुध्दा प्रयोगच आहे. जर डॉक्टरने IVF यशस्वी होणार नाही असे सांगीतले असताना, माझ्या सल्याने जोडपे पुन्हा प्रयोग करत असेल तर मला जरा जास्त विचार करुन तारखा द्यायला हव्यात. किंबहुना त्या आधी पंचमेश पुजन/हवन या सारखे विधी करुनच मगच हा प्रयोग करायला हवा.

जितके मी जास्त प्रयोग करेन तितके हे तंत्र उत्तम रित्या विकसीत होऊन जोडपे कमीत कमी प्रयोगात यशस्वी कसे होईल याचे मार्गदर्शन करता येईल. या निमीत्ताने पहिल्याच खेपेला IVF फ़ेल झालेल्या जोडप्यांना ( IVF साठी उधार/ उसनावर असे पैसे जमा करावे न लागेल अश्या जोडप्यांना ) आवाहन की हे तंत्र विकसीत होण्यासाठी भेटा.

ज्योतिषाला अंधश्रध्दा म्हणुन हेटाळणी करणारे हे तंत्र विकसीत झाल्यावर IVF चा सक्सेस रेट ५५% वरुन जेव्हा अजुन वाढेल तेव्हा ज्योतिष हे शास्त्र आहे हे बहुदा मान्य करतील. आता IVF करणारे तज्ञ मात्र नाराज होतील. मला त्यांना इतकाच सांगायच आहे की तुमच्या शिवाय संतती होणे शक्य नाही. या प्रयोगात तुमची आवश्यकता नक्कीच आहे.  ज्योतिष नक्कीच तुमची आवश्यकता नाही असे म्हणण्याइतके कधीच प्रगत होऊ शकणार नाही. तुम्हालाही तुमचे तंत्र विकसीत करण्यासाठी यातुन नक्कीच इनपुटस मिळतील.

नितीन जोगळेकर
 फ़ोनवर भेटीची वेळ ठरवुन भेट हॊईल
संपर्का करीता -9763922176

भेट ठरल्यावर भेटीसाठी पत्ता

सज्जन प्लाझा बेसमेंट
हिंदुस्थान बेकरी समोर
चाफ़ेकर चौकाजवळ

चिंचवड पुणे - ४११०३३

Saturday, April 8, 2017

राशी भविष्य एप्रिल २०१७ करता व १४ एप्रिलला जन्म तारिख असणार्या सर्वांसाठी विशेष माहिती.

आज पर्यंत दर महिन्याला मी राशीभविष्य रवि बदलला की लिहीत होतो. एका पाक्षिकाने राशीभविष्य लिहीण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे प्रस्तावना सोडता इंग्रजी महिन्याप्रमाणे तेच भविष्य प्रसिध्द करण्याचे आता मी ठरवले आहे. एप्रिल महिन्यात चंद्र सोडता तीन महत्वाचे ग्रह राशी बदल करत आहे. हर्षल ७ एप्रिलला पुढील सात वर्षांकरीता मेषेत येत आहे. हर्षल हा मंगळाचे मोठे स्वरुप असलेला पापग्रह आहे. भारतापेक्षा पाकिस्थान मध्ये याचे मोठे परिणाम दिसतील. मंगळ १२ एप्रीलला वृषभ राशीत जात आहे आणि १३ एप्रिलला रवि मेषेत जाईल. हर्षल मेषेत गेल्याने राशीवार काय घडेल हे मी नक्षत्रप्रकाश ह्या ज्योतिष विषयक लेखांच्या वासंतिक विशेषांकात लिहले आहे. त्याची ही लिंक. http://gmjyotish.blogspot.in/p/blog-page_25.html

ज्यांचा जन्म १४ एप्रिलचा आहे ते मोठेच भाग्यवान असतात. रवि त्यांच्या पत्रिकेत उच्चीचा व उच्च नवमांशात असल्याने यश, किर्ती किंवा अधिकार या व्यक्तीला मिळुन या व्यक्तीचा उत्कर्ष होत असतो. माझ्याकडे १४ एप्रिलला जन्म झालेल्या दोनशे व्यक्तींच्या पत्रिका आहेत ज्या जगभरात प्रसिध्द व्यक्ति म्हणुन नावारुपास आलेल्या आहेत. याचा अर्थ त्यांना आयुष्यभर प्रसिध्दी मिळते असे नाही. त्यांच्या पत्रिकेनुसार रवि महादशेची ६ वर्षे तर या व्यक्तीला बहुदा उत्तम असतात. आता राशीवार भविष्य पाहू.

मेष रास : ह्या व्यक्ती मुळात तापट त्यात गेले महिनाभर मंगळ या राशीत आहे. ७ एप्रिलला हर्षल मेषेत येत आहे आणि १४ तारखेपासुन रवी हा मेष राशीत आल्यामुळे जवळ्च्या व्यक्तींना यांच्या डोक्यावर थंड पाण्याची धार धरावी लागेल. अश्विनी नक्षत्र वाल्यांना याचा विशेष परिणाम दिसेल. मेषेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी यांच्याकडे लक्ष द्यावे. १४ तारखेनंतर काही परिक्षा असतील तर नीट मार्गी लागतील. उष्णतेचे विकार वाढु नयेत म्हणुन विशेष काळजी घ्यावी.  

वृषभ रास : तुमचा राशीचा स्वामी महिनाभर लाभ स्थानी आहे. मीन रास शुक्राची उच्च रास आहे त्यामुळे मनात आणाल ते घडेल असे ग्रहमान आहे. फ़ायदा घ्या हे तुम्हाला सांगायला नको. आजवर अडुन राहीलेली कामे केवळ तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुर्ण होतील. नोकरीत स्थिती उत्तम राहील. मित्र मैत्रीणीच्या भेटी घडतील आणि सुवार्ता ही कानी पडतील.

मिथुन रास : तुमच्याही राशीचा अधिपती बुध मेषेत येत आहे. राशीचा अधिपती लाभात गेला की मनाप्रमाणे कामे होतात पण तुमच्या बाबतीत असे घडेलच असे नाही. कारण मेष ही बुधाची शत्रु रास आणि नीच रास आहे. कामे मार्गी लावण्यासाठी चांगले प्लॅनिंग व तुम्हाला खास शब्दांची योजना करुन काही कामे मार्गी लागतील.

कर्क रास : मेष रास तुमच्या दशम स्थानी येते. त्यात मंगळ आधीपासुन तेथे आहे ही युध्दजन्य परिस्थीती आहे. नोकरी/व्यवसायात प्रचंड कामे हातावेगळी करावी लागतील. घड्याळाकडे पहायची सोय नाही. ही परिस्थिती १२ एप्रिल पर्यंत आहे. त्यानंतर तुमच्या दशमस्थानी रवी येत आहे. महिन्याच्या उतरार्धात तुम्ही राजाप्रमाणे वागाल. तुमचा शब्द खाली पडणार नाही अशी स्थिती नोकरी/व्यवसायात १३ एप्रिल नंतर महिना अखेर असेल.

सिंह रास : १४ एप्रिल पर्यंत तुमच्या राशीचा अधिपती मीन राशीत अष्टमस्थानी असेल. ही स्थिती फ़ारशी उत्तम नव्हती. १४ एप्रिल पर्यंत किरकोळ शारिरीक तक्रारी पाठपुरावा करतील. १४ एप्रिलला रवि मेषेत गेला का हा त्रास संपेल. भाग्येश मंगळ भाग्यात १२ एप्रिल पर्यंत आहे ही चांगली स्थिती आहे. मंगळ वृषभ राशीत गेल्याने अनेक कामे मार्गी लागतील. तुम्हाला एखादा पुरस्कार मिळेल किमान चांगले शब्द तुमच्या बद्दल बोलले जातील असे योग या महिन्यात येतील.

कन्या रास : तुमच्या राशीचा स्वामी बुध महिनाभर मेष ह्या शत्रु राशीत आहे. काही काळ तो वक्री असल्यामुळे राश्याधीपती बलहीन आहे. शारिरीक आणि मानसीक शक्तीची कमतरता जाणवेल पण लग्नी गुरु असल्यामुळे विपरीत फ़ळे मिळणार नाहीत. सप्तमात भाग्येश शुक्र आहे. १५ तारखेनंतर व्यावसायीक असाल तर काही फ़ायद्याचे व्यावसायीक प्रस्ताव येतील. व्यावसायीक बाजूचा विचार करुन ते स्विकारण्यास हरकत नाही. व्यवसायात असलेला स्त्री वर्ग हे फ़ायद्याचे करार घडवण्यासाठी महत्वाचा भुमिका बजावतील.

तुळ रास : सातव्या स्थानी असलेला मेषेतला मंगळ विवाहीत असाल तर जोडीदाराचे मानसीक स्वास्थ्य बिघडवेल. ही स्थिती १२ एप्रिल पर्यंत रहाणार आहे यामुळे डोक्यावर बर्फ़, तोंडात साखर ठेऊनच जोडीदाराशी बोलावे तरच सुसंवाद होईल. आईच्या घरचे लोक ( मातुल घराणे ) विवीध कारणांनी वरचे वर भेटतील आणि जुन्या आठवणी सुखावतील.

वृश्चिक रास : १२ तारखेपर्यंत तुमच्या शत्रुची खैर नाही. सहाव्या स्थानी असलेला मेषेचा मंगळ तुम्हाला शत्रुला नामोहरम करायला रसद पुरवेल. १४ तारखेनंतर प्रशासन विभागात काम करणारे सरकारी नोकर आपल्या पदाचा वापर करुन शत्रुला अडकवुन ठेवतील. आपण कलाकार असाल तर एक उत्तम कलाकृती तुमच्या हातुन निर्माण होण्याचे योग आहेत. ह्या संधीचा शोध घ्या. १५ तारखेनंतर याचा अनुभव वेगाने येताना दिसेल.

धनु रास :  इंजिनीयरींगची परिक्षा देणारे विद्यार्थी १२ एप्रिलपर्यंत परिक्षा असल्यास खुप यश मिळवु शकतील असे योग आहेत. बारा तारखेपर्यंत खेळाडु सुध्दा चमकतील असे योग आहेत. सुख स्थानातला मीनेचा शुक्र धनु राशीच्या लोकांना जे सुख वास्तु, वहाने व  वस्तु मिळवुन देऊ शकतात असे सुख घेऊ शकतील. हे योग अगदी महिनाभर तुमच्या राशीला आहेत.

मकर रास : चतुर्थ स्थानात मंगळ असल्याने १२ तारखेपर्यंत घरात  सुसंवाद होणे जरा दुरापास्त असेल पण १२ तारखेनंतर मात्र वातावरण निवळेल. ह्या वर्षी विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणीक यश सहजपणे मिळेल पण अभ्यास करणे आवश्यक आहे. इंजिनीयरींगचे विद्यार्थी १२ तारखेनंतर अगदी मे अखेर चांगले यश मिळवु शकतील.

कुंभ रास: आपल्या राशीचा अधिपती लाभ स्थानात आहे. २६ जानेवारी २०१७ पासुन आपल्याला थोडे मनासारखे घडताना दिसत आहे त्याला थोडासा ब्रेक लागणार आहे. कारण शनि ६ एप्रिल पासुन वक्री होणार आहे. तुमच्या आयुष्यात याने फ़ार मोठे नाही पण मनासारख्या घटना न घडणे असा फ़रक ऑगस्ट पर्यंत दिसु शकतो. तिसर्या स्थानी गेलेला मंगळ तुम्हाला साहस करण्याची प्रेरणा देईल पण तुम्ही साहस करु नका. साहस करणे हा कुंभ राशीचा स्वभाव नाही. मीनेचा शुक्र तुमच्या धनस्थानी आहे. भेळ- पाणीपुरी सारख्या चटकदार पदार्थांची मेजवानी महिनाभर असेल. एकंदरीत ग्रहमान तुम्हाला चांगलेच आहे.

मीन रास : तुमच्या ही राशीचा स्वामी गुरु सप्तमात वक्री आहे. पण लग्नी शुक्रासारखा शुभ ग्रह महिनाभर असणार आहे. शुक्राची गुरुवर आणि गुरुची शुक्रावर दृष्टी आहे. फ़ार बिघडणार नाही. घरात कौटुंबीक वातावरणात १२ एप्रिल पर्यंत ताण असेल. पण नंतर वातावरण निवळेल. बुध फ़ारसा अनुकूल नसल्यामुळे फ़ारसे या महिन्यात फ़ार काही घडेल असे नाही. मागील पानावरुन पुढे सुरु असे ग्रहमान आहे.

नितीन जोगळेकर
ज्योतिषशास्त्री
चिंचवड पुणे
संपर्काकरीता फ़ोन नंबर -9763922176
पत्रिका पाहून ज्योतिषसल्ला  घेण्यासाठी फ़ोनवर भेटीची वेळ ठरवुन 

माझ्या ब्लॉगवर ज्योतिष विषयक लेखांचा वासंतीक विशेषांक गुढीपाडव्याला प्रसिध्द झाला. हा ज्योतिषप्रेमी साठी कोणत्याही शुल्का शिवाय उपलब्ध आहे. ही लिंक उघडुन वाचा आणि आपल्या स्नेह्यांना ही लिंक पुढे पाठवा. http://gmjyotish.blogspot.in/p/blog-page_25.html