आपल्या कन्येचा विवाह वेळेवर व्हावा ही कोणत्या पालकांची अपेक्षा नसणार ? प्रत्येक पालक ह्या साठी प्रयत्न करत असतात. या प्रयत्नांना दैवी उपायांची जोड मिळाली तर विवाहाच्या संदर्भात मुलींच्या पत्रिकेत खुप कठीण योग नसतील तर विवाह त्वरीत जुळुन येतात असा माझा अनुभव आहे.
चैत्रातले नवरात्र आणि अश्विन महिन्यातले नवरात्र असताना विशीष्ठ दिवशी कात्यायनी देवीची उपासना केली असता असा विवाह योग जुळून येतो असा माझा अनुभव आहे. मार्च महिन्यात २२ तारखेला संध्याकाळी असा योग येत आहे. ही पुजा कशी करावी याचा विधी खालील लिंक क्लिक केली असता मिळेल.
http://gmjyotish.blogspot.in/2016/09/blog-post_22.html
हा उपाय करावा तसेच विवाह जमल्यावर किंवा झाल्यावर अनुभव कळवावा.
आता १४ मार्च २०१८ ते १३ एप्रिल २०१८ कालावधीसाठी राशीभविष्य पाहू. हे भविष्य चंद्र राशी तसेच लग्न राशीकडून सुध्दा वाचावे.
मेष रास : राशीचा स्वामी महिनाभर धनु राशीत तुमच्या भाग्य स्थानी आहे ही जमेची बाजू असली तरी शनि या शत्रु ग्रहाशी त्याची गाठ १-२-३ एप्रिलला पडणार आहे. या तारखांना नोकरी /व्यवसायात संघर्ष अपेक्षीत आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्या विरोधात जातील. याबाबत जागरुक रहा. ज्यांच्या पत्रिकेत धनु राशीत अशी युती आहे त्यांनी वहाने जपून चालवा. २ एप्रिलच्या आधी व नंतर २-४ दिवस जोखीम पत्करु नका.
असेही ग्रहमान महिनाभर फ़ारसे तुमच्या मर्जीप्रमाणे नाही. खर्च होणार आहे. मग तो प्रवास किंवा आजारपणे यामुळे असेल. तुमचा स्वभाव नाही पण प्रत्येक कृती विचारपुर्वक करायची आहे इतके महिनाभर लक्षात ठेवा.
वृषभ रास : १४ मार्च ते २७ मार्च खिसे उघडे ठेवा. व्यावसायीक असाल तर अनेक लाभ चालत येणार आहेत. फ़क्त शेअर्स च्या बाबतीत २३ मार्च नंतर विचार करुन कृती करा. अचानक मार्केट खाली येणे अश्या घटना घडून नुकसान होऊ शकते. २७ मार्च नंतर मात्र व्यवहारांच्या बाबतीत जास्त काळजी घ्या. तरुणांच्या वागण्याकडे पालकांनी २८ मार्च ते १ एप्रिल या काळात लक्ष द्या. राशीचा स्वामी व्ययात जात असल्याने काही संकटे येणार नाहीत याबाबत २८ मार्च ते १ एप्रील जागरुक रहा.
मिथुन रास : हा काळ प्रेमात पडलेल्या तरुणासाठी फ़ारसा चांगला नाही. गैरसमजातून ब्रेक अप होऊ नये यासाठी तसेच सर्वसामान्य राशीच्या लोकांसाठी आजारपणे, अपघात या पासून बचाव व्हावा यासाठी खबरदारी घेण्याचा काळ खास करुन २८ मार्च ते १ एप्रिल आहे. आपल्या राशीचा स्वामी बुध २३ मार्च पासून वक्री होत असल्याने आपल्याला आपले शब्द जपून वापरावे लागतील किंवा शब्द आठवणार नाहीत असाही त्रास जाणवेल. खास मिटींग मधे गाफ़ील राहू नका. तयारी करुन जा.
कर्क रास : कर्क राशीच्या स्त्रीया आपल्या मुलांच्या बाबतीत २८ मार्च ते १ एप्रिल या काळात जागरुक रहा. ही शनि- मंगळाची युती जरा त्रास दायक असते. इतके सोडले तर बाकीच्या फ़्रंटवर या महिन्यात फ़ार चिंता करावे असे ग्रहमान नाही. मागील पानावरुन पुढे असे ग्रहमान आहे.
सिंह रास : राशीचा स्वामी महिनाभर अशुभ स्थानी असल्याने प्रतिकार शक्ती कमी होऊन काही आजारपण नियमीत पणे दरवर्षी या महिन्यात येत असेल तर त्याबाबत काळजी घ्या. तुमची पत तुमची प्रतिष्ठा या महिन्यात पणाला लागेल असे ग्रहमान राशीचा स्वामी रवि महिनाभर अशुभ स्थानी असल्यामुळे आहे. घरच्या आघाडीवर सुध्दा फ़ारसे चांगले ग्रहमान नाही. घरात सुध्दा तुमचा शब्द ऐकला जाईल असे वाटत नाही. त्यापेक्षा वादात न पडता सिंह जसा अलिप्त असतो तसे रहा हा सल्ला. पुढील महिना तुमचा आहे. प्रॉपर्टी संदर्भात एखादा खटला निकालाच्या दरवाज्यात असेल तर आपले वकील तो जिंकतील याबाबत खात्री करुन घ्या.
कन्या रास : तुमचे आराखडे या महिन्यात २३ मार्च नंतर चुकू शकतात. व्यापारी अंदाज चुकून किंवा तुम्ही केलेली कागदपत्रे चुकून नुकसान होणार नाही ना याची काळजी २३ मार्च ते पुढे १५ एप्रील पर्यंत घ्या. शेअर बाजारातले निर्णय या काळात जास्त काळजी पुर्वक घ्या. प्रिंटिंग/प्रकाशन/कमीशन एजंट व्यवसायात सुध्दा खबरदारी हवी आहे. व्यापारात येणारे नविन प्रपोजल्स २७ मार्च पुर्वी मार्गी लावा. घरात भांड्याला भांडे लागू शकते यासाठी २८ मार्च ते १ एप्रिल या काळात डोक्यावर बर्फ़, तोंडात साखर धरुन ठेवा.
तुळ रास : तुला राशीचा स्वामी २७ मार्च पर्यंत सहाव्या स्थानी आहे. आपल्या त्रिकोणातल्या राशीत शुक्र आला आहे. आपल्याला कर्ज हवे असल्यास पटकन मिळुन जाईल. वसूली करायची असल्यास एक नोटीस धाडा आणि पहा काय गंमत होते. चेक बाउंन्स झाला असल्यास या महिन्यात पोलीस कारवाई करुन आपल्या देणेकर्यांना जरा वठणीवर आणा. तुमच बॅलन्स करणे सोडा आणि जरा कडक व्हा. पैसे बिनव्याजी वापरण हा स्वभाव आहे त्यांना जरा दणका द्याच. २७ तारखेनंतर घरच्या फ़्रंटवर काय काय घडते आहे ते तुम्ही कुणाला सांगू नका. फ़ारच रोमॅंटीक काळ असेल.
वृश्चिक रास : आग है लगी हुवी हर तरफ़ यहा वहा हे गाणे आठवा. आग लागलीच तर अग्नीशमन करण्यासाठी काय काय करावे लागेल याचा अंदाज घ्या. नोकरी व्यवसायात आग लागली तर ते साहजीक आहे. पण घरच्या फ़्रंट्वर आग लागणे जरा त्रासदायक. तोंड येणे, गरम चहा/सुप पिल्याने तोंड भाजणे, पानातला चुना लागणे यासारख्या घटना होतील. तोंडाचा अल्सर होणार्यांनी थंडावा देणारी मलमे शोधून ठेवा. २७ मार्च पर्यंत शिमगा संपला तरी तुमचे कवित्व संपणार नाही. आपल्या प्रतिस्पर्ध्याला जळवण्यासाठी हुकमी प्रतिक्रिया द्याल. लोन हवे असेल तर २७ तारखेनंतर प्रयत्न करा.
धनु रास: आग घरात लागली तर ठीक विझवता येईल पण मस्तकात लागली तर काय करणार ? आपले व्यक्तीमत्व मुळात अंगार त्यात मंगळाचा आपल्या राशीत प्रवेश आहे. डोक्यावर बर्फ़ धरा नाहीतर जवळचे सुध्दा जळून खाक होतील असे या महिनाभरात अनेकदा घडेल. तुमचा राग सात्विक असतो. तुमचे रागावणे व्यक्तींवर नसून स्वभावावर किंवा चुकीच्या गोष्टींवर असते हे जवळच्यांना समजले तर ठीक नाहीतर त्रास तुम्हालाच. १८ मार्चला पाडव्याच्या मुहूर्तावर घरात एखादी नविन वस्तू येईल. ती आल्यावर भौतीक सुखाचा अनुभव एखाद्या थंड हवेच्या झुळकीसारखा असेल.
मकर रास : शनि आणि मंगळ जर सर्वात जास्त हानी कोणाला देणार असतील तर तुम्हाला. साडेसाती सुरु आहे. शनि तुमच्या राशीचे स्वामी असले तरी त्यांनी गुरु ला सोडले नाही तर तुम्हाला काय ते सोडणार ? आलेला पैसा घरी न येता त्याला वाटा फ़ुटतील. ती गुंतवणुक नसेल तर विनाकारण झालेला खर्च असेल. तुमची साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी असते पण मित्रांनी तुम्हाला खड्यात घालायचे ठरवलेच असेल तर खोट्या प्रतिष्ठेसाठी काही पैसे खर्च कराल. कशी भुल पडली असा प्रश्न स्वत:ला नंतर विचाराल.
कुंभ रास : शनि देत आहे अजून देणार आहे. काही अपघाताने आपला फ़ायदा होणार आहे ? हजारो लोक लॉटरीवर पैसे लावतात आणि तुम्ही चक्क जिंकता असे ग्रहमान शनि मंगळाच्या योगाने येत आहे. शनि-मंगळाच्या युतीचा तुमच्या वैयक्तीक जीवनावर वाईट प्रभाव न पडता लाभ होणार आहे. असे ग्रहमान क्वचितच असते. तुमचा कुंभ भरुन वहाणार आहे त्याचे प्लॅनिंग करा. २७ मार्च २०१८ पर्यंत शिल्लक वाढली तर गुंतवणुक करा. शेअर मार्केटमधे नको. सध्या तरी PPF/FD चा विचार करा. एकदा शेअर मार्केट स्थिरावले की मग विचार करा.
मीन रास : मीन राशीचे लोक जरा थंड असतात. पण पुढील महिना तुमची पळापळ होणार आहे. अचानक कामे वाढतील. तुम्हाला अनेक फ़्रंटवर लढाई करावी लागणार आहे. तुमच्या राशीचा मालक वक्री असल्याने या लढाईचे काय होणार ? यश हव असेल तर इच्छा शक्तीचा प्रचंड दबाव तयार करावा लागेल. हीच संधी आहे स्वत:ला सिध्द करण्याची. इथे मागे पडलात तर खुप काळ लागेल तुमची पत वाढायला. तुमच्या राशीच्या स्वामीची प्रार्थना करा आणि लढायला तयार व्हा.

No comments:
Post a Comment